12-05-2022      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, वृद्ध, लहान आणि तरुण या सर्वाच्या निवृत्तीचा हा टप्पा आहे, कारण प्रत्येकाला वाणीच्या पलीकडे मुक्तीधाम मध्ये जायचे आहे, तुम्ही त्यांना घरचा रस्ता सांगा. "

प्रश्न:-
प्रत्येक मुलांसाठी बाबांचे श्रीमत वेग-वेगळे असते, ते एकच का नाही?

उत्तर:-
कारण बाबा प्रत्येक मुलाची नाडी पाहून, परिस्थिती पाहून श्रीमत देतात. तुम्ही समजा की, यांना कोणतेही बंधने नाहीत, तुम्ही वृद्ध असाल किंवा कुमारी, तुम्ही सेवेसाठी योग्य आहात, म्हणून बाबा तुम्हाला मत देतील की, या सेवेत पूर्णत: गुंतून राहा. बाकी सगळ्यांना मी इथे बसवणार नाही. ज्यांच्या प्रती बाबाचे, जे श्रीमत प्राप्त होते, त्यात कल्याण होते. मम्मा आणि बाबा, ज्याप्रमाणे शिवबाबांकडून वारसा घेतात, त्याचप्रमाणे त्यांचे अनुकरण करा आणि त्यांच्याप्रमाणे सेवा करून तुमचा वारसा घ्या.

गीत:-
भोलेनाथ से निराला न और कोई. . .

ओम शांती।
गोड गोड, खुप वर्षानंतर भेटलेल्या मुलांनी गित ऐकले. शिवाला भोलानाथ म्हणतात. आणि हे जे डमरू वाजवतात, त्यांना शंकर म्हणतात. इथे असे अनेक आश्रम आहेत, जिथे ते वेद, धर्मग्रंथ, उपनिषद इत्यादी कथन करतात, हे जसे ढोल वाजवतात. असे अनेक आश्रम आहेत, जिथे माणसे जातात आणि राहतात. परंतू मुख्य उद्दिष्ट काय आहे, हे कोणालाच समजत नाही. गुरु लोक आपल्याला वाणीच्या पलीकडे शांतीधाम मध्ये घेऊन जातील, असे समजतात. इथेच आपला प्राण सोडावा, या विचाराने तिकडे जातात, पण कोणीही परत जाऊ शकत नाही. ते लोक तर आपापली भक्ती वगैरे शिकवतात. इथे तर तुम्ही मुलं हेच जाणतात की, हाच खरा वानप्रस्थ लहान मुले, वृद्ध, तरुण, सर्व वानप्रस्थी आहेत. बाकीचे मुक्तधाम मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सदगती किंवा वाणीच्या पलीकडे जाण्याचा मार्ग सांगणारे, दुसरे कोणी नसेल. गती आणि सदगती देणारे फक्त एकच आहेत. बाबा असे म्हणत नाहीत की, घरातील व्यवहार सोडून इथेच बसा. होय, सेवेसाठी पात्र असलेल्यांना कायम ठेवता येईल. इतरांनाही वानप्रस्थाचा मार्ग दाखवावा लागेल, कारण आता प्रत्येकाला वाणी पासून दूर जाण्याची वेळ आली आहे. तुम्हाला वानप्रस्थ किंवा मुक्तीभूमीत घेऊन जाणारा एकच पिता आहे. तुम्ही त्या बाबाजवळ बसले आहात. त्या लोकांनी जरी वानप्रस्थ घेतले, तरी कोणीही परत जाऊ शकत नाही. एकच पिता आहेत, जे तुम्हाला वानप्रस्थ मध्ये घेऊन जातात, तेच तुम्हाला चांगला सल्ला देतात. कोणी म्हणतात, बाबा आम्ही घरबार घेऊन इथेच राहतो, असे पण नाही. ते सेवेला योग्य आहे की नाहीत, हे तपासले जाते. कोणी बंधनमुक्त आहे की नाही, वृद्ध, सेवायोग्य आहे की नाही, हे तपासून त्यांना श्रीमत दिले जाते. तुम्ही मुलं म्हणता, परिसंवाद घ्या आणि मग सेवेच्या युक्त्या शिकतील. मुलींबरोबरच माता आणि पुरुषही शिकत राहतील. हा एक परिसंवाद आहे, नाही का? कोणाला कसं समजवायचे, हे तर बाबा रोज शिकवत राहतात. आपले मत देत राहतात. आधी तर एकच गोष्ट स्पष्ट करा. परमपिता, परमात्मा, ज्याचे तुम्ही स्मरण करता, त्याबद्दल तुमचे काय मत आहे. जर पिता असेल, तर पित्याकडून वारसा मिळाला पाहिजे. तुम्ही पित्याला ओळखत नाही. प्रत्येकामध्ये ईश्वर आहे, असे तुम्ही म्हणता. प्रत्येक कणात भगवान आहे, मग तुमचे काय होणार! आत्ता तुम्हा मुलांना आता माहित आहे की, आपण बाबांसमोर बसलो आहोत. बाबा आम्हांला लायक बनवून, काट्या पासून फुलासारखे बनवून सोबत घेऊन जातात, बाकी तर सर्व जंगलाचा रस्ता दाखवतात. बाबा तुम्हाला सोपा मार्ग दाखवतात. जीवनमुक्ती एका सेकंदात गायली जाते. ते खोटे तर नाही. बाबा म्हटले आणि जीवनमुक्त झाले. सर्वप्रथम बाबा तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जातात. तुम्ही सर्वजण आपल्या घराला विसरलात, तुम्ही म्हणत नाही का, की ईश्वर पिता सर्व दूतांना धर्म स्थापनेसाठी पाठवतो, मग तो सर्वव्यापी आहे असे का म्हणायचे? वरून पाठवतात ना. ते बोलतात एक आणि नंतर ते मानत नाहीत. बाबा धर्म स्थापने अर्थ पाठवतात आणि म्हणून त्यांची संस्थाही त्यांच्या मागे येऊ लागते. सर्वप्रथम देवतांची संस्था आहे. सर्वप्रथम आदी सनातन देवी देवता धर्माचे, लक्ष्मी नारायण आपल्या प्रजेसहित येतात, बाकी प्रजेसोबत कोणीही येत नाही. ते एक येतील, मग दुसरे, तिसरे येतील. इथे तुम्ही सर्व, बाबाकडून तुमचा वारसा घ्यायला तयार आहात. ही शाळा आहे, घरात राहत असताना एक तास, अर्धा तास, . . . पुन्हा अर्ध्यातला अर्धा तास, तुम्ही राजयोग अभ्यास करा. एका सेकंदात ते तुम्हाला सांगतात की, तुमचा परमपिता, परमात्मा यांच्याशी काय संबंध आहे. तोंडानेही ते म्हणतात, परमपिता परमात्मा. . . . ते सर्वांचा पिता आणि रचनाकार आहेत, तरीही पिता समजत नसतील तर काय म्हणाल!स्वर्गाचे पिता तर निर्माता आहेत म्हणून ते स्वर्गाची बादशाही जरुर देतील. भरताला दिले आहे, नाही का? नरापासून नारायण बनविणारा राजयोग प्रसिद्ध आहे. ही सत्यनारायणाचीही कथा आहे. एक अमर कथाही आहे, तिजरीची म्हणजे तिसरा नेत्र मिळण्याचीही कथा आहे. बाबा आपल्याला वारसा देत आहेत, हे तुम्हा मुलांना माहीत आहे. पिता श्रीमत देतात. त्यांच्या मताने नक्कीच कल्याण होईल. बाबा सगळ्यांची नाडी बघतात.

त्यांना कोणतेही बंधन नाही. सेवाही करू शकतात. तुम्हाला योग्यतेचे पाहून बाबा तुम्हाला सुचना देतात. परिस्थितीजन्य भाग पाहून असे म्हणतात, तुम्ही येथे राहून सेवा करु शकता. जिथे जिथे गरज आहे तिथे, प्रदर्शनात अनेकांची गरज असते. वडीलधारी पण लागतात, मुलीही लागतात. प्रत्येकजणाला शिक्षण मिळत आहे. हा अभ्यास आहे. भगवानुवाच, निराकारला च भगवान म्हणतात. तुम्ही आत्मा त्याची मुलं आहात. तुम्ही म्हणता, हे ईश्वरीय पिता, म्हणून कोणीही त्याला सर्वव्यापी म्हणणार नाही. लौकिक पिता सर्वव्यापी आहेत का? नाही, तुम्ही पिता म्हणता आणि तुम्ही सुद्धा गाता की, पतित पावन एकच पिता आहेत, तर जरूर इथेच येतील आणि तुम्हाला पवित्र करतील. तुम्ही मुले जाणता की, तुम्ही पतित पासून पावन बनत आहात. बाबा म्हणतात माझ्या, ५ हजार वर्षांनी पुन्हा भेटलेल्या मुलांनो. तुम्ही परत वारसा घेण्यासाठी पुन्हा आला आहात. तुम्ही जाणता आत्ता राजधानी स्थापन होत आहे, हे तुम्हाला माहीत आहे. जसे मम्मा आणि बाबा शिवबाबांकडून वारसा घेतात, तसेच आम्हीही त्यांच्याकडून वारसा घेतो, अनुकरण करा. मम्मा बाबांसारखी सेवा करा. मम्मा बाबा नरापासून नारायण बनवण्याची कथा सांगतात. आपण पुन्हा कमी का ऐकायचे? हे माहित आहे, सूर्यवंशीच परत चंद्रवंशी बनतात. सर्वप्रथम सूर्यवंशीत जावे लागेल. ही समज तर आहे ना ? समजून घेतल्याशिवाय कोणीही शाळेत बसू शकत नाही. बाबा श्रीमत देतात. बाबांची यांच्यामध्ये प्रवेशता आहे, हे आम्ही जाणतो. नाहीतर प्रजापिता कुठून आले ? ब्रह्मा तर सूक्ष्मवतन निवासी आहेत. प्रजापिता तर येथे पाहिजेत. पिता म्हणतात, मी ब्रह्माद्वारे स्थापना करतो? कोणाची? ब्राह्मणांची. मी या ब्रह्मामध्ये प्रवेश करतो. तुम्ही आत्मे पण शरीरात प्रवेश करतात, नाही का? मला ज्ञानाचे सागर म्हणतात. तर, मी निराकार ज्ञान कसे सांगू शकतो? कृष्णाला ज्ञानाचे सागर म्हणता येणार नाही. अनेक जन्मांच्या शेवटी कृष्णाची आत्मा ज्ञान घेऊन, पुन्हा कृष्ण बनली आहे, आत्ता नाहीत. भगवंताकडून राजयोग शिकून देवता स्वर्गाचे स्वामी झाले आहेत, हे तुम्हाला माहीत आहे. बाबा म्हणतात, प्रत्येक चक्रात, मी तुम्हाला राजयोग शिकवतो. अभ्यास करून राजाई मिळते. तुम्ही राजांचे राजा बनाल. हा तुमचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही पुन्हा सूर्यवंशाचे देवता बनण्यासाठी आला आहात. देवता धर्माची स्थापना होत आहे. आत्ता अनेक धर्म आहेत. अनेक गुरू आहेत. त्या सर्वांचा नाश होईल. या सर्व गुरूंचा गुरू एकच पिता, सदगती दाता आहे. मी ऋषीमुनींनाही आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. पुढे चालून ते पण कल्पपुर्व प्रमाणे तुमच्यापुढे नतमस्तक होतील. नाटकाची सर्व रहस्ये, तुम्हा मुलांच्या बुद्धीत आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे सूक्ष्म वतनमध्ये आहेत आणि हे परत प्रजापिता आहेत. मी ब्रह्माच्या जुन्या शरीरात प्रवेश करतो, असे म्हणतात. ते यांना सुद्धा म्हणतात मुलांनो, तुम्ही सर्व ब्राह्मण आहात, तुमच्यावर कलश ठेवतो. तुम्ही इतके जन्म घेतले आहेत. यावेळी फक्त रौरव नरक आहे, परंतु नरक म्हणता येईल अशी दुसरी कोणतीही नदी नाही. गरुड पुराणात अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. आत्ता बाबा इथे बसून, तुम्हा मुलांना समजावतात. हे पण शिकलेले आहेत ना. तर आता भोलानाथ बाबा, इथे बसून तुम्हा निरागस मुलांना समजावत आहेत. गरीब निष्पाप मुलांनाच, नंतर उच्च ते उच्च सावकार बनवले जाते. तुला माहीत आहे की, सुर्यवंशीच मालक बनतात. मग हळुहळू उतरत उतरत काय बनले आहेत? काय अप्रतिम खेळ आहे. तुम्ही स्वर्गात किती श्रीमंत होते? आजही राजांचे खूप मोठे राजवाडे आहेत, जयपूर मध्येही आहेत. आत्ताच अशा प्रकारचे महल आहेत, तर सतयुग त्रेतामधील कसे असतील माहीत नाही. राष्ट्रपती भवन, राज्यपाल भवन इत्यादी घरे अशी बांधली जात नाहीत. राजांसाठी राजवाडे बांधण्याचा भपकाच वेगळा आहे. बरं, मग स्वर्गाचे मॉडेल बघायचं असेल तर, अजमेरला जावा. एक स्वर्गाचे मॉडेल बनवताना खूप मेहनत घेतली आहे. ते पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. इथे तर बाबा लगेच तुम्हांला साक्षात्कार करवतात. जे दिव्य डोळ्यांनी पाहतात, ते प्रत्यक्षात पहाल. भक्तांना भक्तीमार्गात जरी साक्षात्कार होत असेल, पण ते काही वैकुंठाचे स्वामी बनत नाही. तुम्ही तर प्रत्यक्षात मालक बनतात. आता तर फक्त नरक आहे. ते भांडत राहतात, एकमेकांना मारत राहतात. वडिलांना किंवा भावालाही मारायला मुलं उशीर करत नाहीत. सुवर्णकाळात भांडणं वगैरेचा प्रश्नच येत नाही. आत्ताच्या कमाईसह, तुम्ही २१ जन्मांसाठी पद मिळवतात. तर आपल्याला किती खुशी असायला हवी? पहिली गोष्ट म्हणजे बाबाचा परिचय आणि बाबाचे चरित्र माहीत नसेल, तर बाकी बाबा बाबा म्हणल्या मुळे काय उपयोग? इतके दान पुण्य करतात तरीसुद्धा भारताचे असे हाल झाले आहेत. परंतू हे कोणालाच कळत नाही. भक्ती केल्यावर भगवान मिळतो असे म्हणतात. पण कधी आणि कोणाला मिळेल ? भक्ती प्रत्येकजण करतो, पण राजाई तर सर्वांना मिळणार नाही. हे ज्ञान समजण्यासाठी खुप संधी, खुप वाव आहे. तुम्ही कोणाला ही सांगा, हे सगळे शास्त्र वगैरे विसरून, जिवंत पणी मरा. ब्रह्म हे तत्व आहे, त्याच्याकडून वारसा तर मिळू शकत नाही. वारसा पित्याकडूनच मिळतो. आम्ही तर प्रत्येक चक्रात घेतो. नवीन काही नाही. आता नाटक संपणार आहे. शरीर सोडून घरी परत जावे लागेल. तुम्ही जितके जास्त लक्षात ठेवाल, तितकेच तुमची अंत मती सो गती प्राप्त कराल. याला विनाशाचा काळ म्हणतात. पापी आत्म्याचा हिशेब चुकता होईल. तुम्हाला आता योगाच्या सामर्थ्याने, परोपकारी आत्मा बनायचे आहे. या सृष्टीला आग लागेल. आत्मे परत जातील आणि एक धर्म प्रस्थापित होईल, बाकी धर्म नक्कीच परत जातील. शरीर थोडेच परत जाईल. कोणी म्हणतात मोक्ष मिळवा. पण हे कसं होईल, जेव्हा पुर्वनियोजित नाटक आहे, ते तर चालतच राहते. ते कधीच संपत नाहीत. बाबा इथे बसून शाश्वत चक्र, कसे फिरते याचे रहस्य सांगतात. या सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतील. जेव्हा तुम्ही जास्त समजायला लागाल, तेव्हा वृध्दी व्हायला सुरुवात होईल. हा तुमचा उच्च धर्म आहे, याला चिमण्या खातात, बाकी धर्माला पक्षी चिमण्या खात नाहीत. तुम्हा मुलांना या जगात कोणताही छंद नसावा, ही स्मशानभुमी आहे. जुन्या जगाशी काय लगाव ठेवायचा ? अमेरिकेतील जे समजदार आहेत, त्यांना वाटते की, कोणीतरी विनाशी साधने बनवण्यासाठी प्रेरक आहे. मृत्यू समोर उभा आहे. विनाश तर होणारच आहे. प्रत्येकाचे मन खात राहते. नाटकाचे भविष्य असेच बनलेले आहे. शिवबाबा दाता आहेत. त्यांना आसक्ती नाही. निराकार आहे. हे सर्व काही मुलांचे आहे. नवे जगही मुलांचे आहे. आम्ही जगाचे सार्वभौमत्व प्रस्थापित करत आहोत आणि आम्हीच राज्य करणार आहोत. बाबा किती निस्वार्थी आहेत. तुम्ही बाबांची आठवण कराल, तर तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडेल. तुम्ही दुहेरी परोपकारी (महादानी) आहात. तुम्ही तन, मन आणि धन देता आणि ज्ञानाची अविनाशी रत्नेही देता. शिवबाबांना काय देणार? करनीघोरांना देता ना. ईश्वर समर्पण, ईश्वर भुखेले आहेत का? किंवा कृष्ण अर्पणम् करतात. दोघांना भिकारी बनवले आहे. ते तर देणारे आहेत. अच्छा!

गोड गोड, खुप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती, मातपिता बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जुन्या जगात कोणत्याही गोष्टीची आसक्ती ठेवू नका. या जगातील कोणत्याही गोष्टीत रस घेऊ नका, कारण ही स्मशानभुमी होणार आहे.

२) आता नाटक संपले आहे, तुम्हाला तुमचा हिशेब चुकता, करून घरी जावे लागेल, त्यामुळे तुम्ही योगसामर्थ्याने पापांपासून मुक्त होऊन पुण्य आत्मा बनायचे आहे. तुम्हाला दुहेरी दाता बनायचे आहे.

वरदान:-
आनंदाच्या डोस द्वारे, तुमच्या मन आणि बुद्धीला शक्तीशाली बनवणारे, अचल आणि अडोल भव.

वाह!बाबा वाह! आणि वाह! माझे भाग्य वाह! हे आनंदाचे गाणे नेहमी गात रहा. 'आनंद' हा सर्वात मोठा डोस आहे, आनंदासारखा दुसरा डोस नाही. जे रोज आनंदाचे खुराक खातात, ते सर्वकाळ निरोगी राहतात. ते तंदरुस्त राहतात, म्हणून तुमचे मन आणि तुमची बुद्धी, आनंदाच्या डोसने मजबूत करा, तर तुमची स्थिती शक्तीशाली राहील. अशा शक्तिशाली स्थितीत असलेले लोक, नेहमीच अचल अडोल राहतात.

बोधवाक्य:-
तुमचे मन आणि तुमची बुद्धी, अनुभवाच्या आसनावर बसवा, तर तुम्ही कधीही अस्वस्थ होणार नाहीत.