12-07-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   22.02.86  ओम शान्ति   मधुबन


आत्मिक सेवा-निस्वार्थ सेवा


आज सर्व आत्म्यांचे विश्व कल्याणकारी बाबा,आपल्या सेवाधारी,सेवेच्या सोबती मुलांना पाहत आहेत.सुरुवातीपासून बापदादांच्या सोबत सेवाधारी मुलं सोबती बनले आणि शेवटपर्यंत बापदादानी गुप्त रूपांमध्ये आणि प्रत्यक्ष रूपामध्ये,मुलांना विश्वसेवेच्या निमित्त बनवले.आदि मध्ये ब्रह्मा पिता आणि ब्राह्मण मुलं गुप्त रुपामध्ये सेवेच्या निमित्त बनले.आत्ता सेवाधारी मुलं शक्ती सेना आणि पांडव सेना विश्वाच्या पुढे प्रत्यक्ष रूपामध्ये कार्य करत आहेत.सेवेचा उमंग अनेक मुलांमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतो. सेवेचे आकर्षण सुरुवातीपासूनच राहिले आणि शेवटपर्यंत राहिल. ब्राह्मण जीवन सेवेच जीवन आहे. ब्राह्मण मुलं सेवेशिवाय जगू शकत नाहीत.माये पासून सुरक्षित राहण्याचे श्रेष्ठ साधन सेवाच आहे.सेवायोग युक्त पण बनवते.परंतु कोणती सेवा? एक आहे फक्त मुखाची सेवा, ऐकलेले ऐकवण्याची सेवा.दुसरी आहे,मनापासून मुखाची सेवा. ऐकलेले मधुर बोलचे स्वरूप बनून, स्वरूपा द्वारे सेवा,निस्वार्थ सेवा.त्याग,तपस्या,स्वरूपा द्वारे सेवा. हद्दच्या इच्छेपासून पासून दूर निष्काम सेवा,याला म्हटले जाते ईश्वरीय सेवा,आत्मिक सेवा.जे फक्त मुखाची सेवा करतात, त्यांना म्हणतात फक्त स्वतःला खुश करण्याची सेवा.सर्वांना खूष करण्याची सेवा,मन आणि मुखाच्या सोबत सोबतच होते. मनापासून म्हणजेच मनमनाभव स्थिती द्वारे मुखाची सेवा.

बापदादा आपल्या उजवा हाताचे सेवाधारी आणि डाव्या हाताचे सेवाधारी दोन्ही पाहत आहेत. सेवाधारी दोन्ही आहेत परंतु उजव्या आणि डाव्या मध्ये अंतर आहे ना. उजवे हात असणारे नेहमी निष्काम सेवाधारी आहेत.डावा हात असणारे, कोणत्या ना कोणत्या हद्दच्या,या जन्मासाठी सेवेचे फळ खाण्याच्या इच्छा द्वारे,सेवेच्या निमित्त बनतात.ते गुप्त सेवाधारी आणि हे नावधारी सेवाधारी.आत्ता सेवा केली आणि आत्ता नाव झाले,फार चांगले,फार चांगले,परंतू आत्ता केले आणि आता खाल्ले,जमा झाले नाही.गुप्त सेवाधारी म्हणजे निष्काम सेवाधारी. तर एक निष्काम सेवाधारी,दुसरे आहेत नावधारी सेवाधारी.तर गुप्त सेवाधारीचे जरी वर्तमान वेळेत नाव गुप्त राहते परंतु गुप्त सेवाधारी सफलता च्या खुशी मध्ये नेहमी भरपूर राहतात.काही मुलांना विचार येतो की,आम्ही करतो पण परंतु नाव होत नाही,आणि जे बाहेरून नावधारी बनून सेवेचा दिखावा करतात,त्यांचे नाव जास्त होते,परंतु असे नाही. जे निष्काम अविनाश नाव कमावणारे आहेत,त्यांच्या मनाचा आवाज मनापर्यंत पोहोचतो,लपून राहू शकत नाही.त्यांच्या चेहऱ्यामध्ये,मूर्तीमध्ये खऱ्या सेवेची झलक,चमक अवश्य दिसून येते.जर कोणी नावधारीने येथे नाव कमावले,तरी पुढच्या साठी केले आणि खाल्ले आणि नष्ट केले,भविष्य श्रेष्ठ बनले नाही,अविनाश बनले नाही,म्हणून बाप दादांच्या जवळ सर्व सेवाधारींची पूर्ण नोंद आहे.सेवा करत चला,नाव व्हावे हा विचार पण करू नका.जमा व्हायला पाहिजे हा विचार करत,अविनाशी फळाचे अधिकारी बना.अविनाश वारशासाठी आले आहात.सेवेचे फळ विनाशी वेळेसाठी खाल्ले,तर अविनाशी वारशाचा अधिकार कमी होईल,म्हणून नेहमी विनाशी कामनापासून मुक्त,निष्काम सेवाधारी,उजवा हात बनून,सेवेमध्ये पुढे जात राहा.गुप्तदानाचे महत्व, गुप्त सेवेचे महत्व,जास्त होते.अशी आत्मा नेहमी स्वतःमध्ये भरपूर राहील,बेपर्वा बादशाह असेल. नावं,मानची काळजी करणार नाहीत.या मध्येच बेपर्वा बादशहा असतील,म्हणजेच नेहमी स्वमानधारी असतील.हद्दचे मानधारी नसतील. स्वमानच्या आसनधारी,अविनाश आसनधारी बनतील.अटल अखंड प्राप्ती असणारे असतील,त्यांना म्हटले जाते विश्व कल्याणकारी सेवाधारी.कधी साधारण संकल्पा मुळे विश्व सेवेच्या कार्यामध्ये सफलता प्राप्त करण्यामध्ये, पाठीमागे जायचे नाही.त्याग आणि तपस्या द्वारे,नेहमी सफलता प्राप्त करून पुढे जात रहा,समजले. सेवाधारी कोणाला म्हटले जाते?तर सर्व सेवाधारी आहात?सेवा स्थितीला डगमग करेल ती सेवा नाही.काहीजण विचार करतात, सेवेमध्ये खूप खालीवर होते,विघ्न पण सेवे मध्ये येतात आणि निर्विघ्न पण सेवाच बनवते परंतु जी सेवा विज्ञान रूप बनेल ती सेवा नाही. त्याला खरी सेवा म्हणणार नाही. नामधारी सेवा म्हणनार.खरी सेवा खरा हिऱ्या सारखी आहे.जसे खऱ्या हिऱ्याची चमक कधी लपून राहू शकत नाही,असे खरे सेवाधारी खरे हिरे आहेत.जरी खोट्या हिऱ्यामध्ये चमक कितीही जास्त असेल परंतु मूल्यवान कोण आहेत? मूल्य तर खरे हिऱ्यांचे होते ना.खोट्या हिऱ्याचे तर होत नाही.अमूल्य रत्न खरे सेवाधारी आहेत.अनेक जन्माचे मूल्य,खऱ्या सेवाधारीचे आहे.अल्पकाळाची चमक,दिखावा नावधारी सेवा आहे, म्हणूनच नेहमी सेवाधारी बनून,सेवे द्वारे विश्वकल्याण करत चला, समजले सेवेचे महत्त्व काय आहे? काही कमी महत्व नाही.प्रत्येक सेवाधारी आप-आपल्या विशेषतेमुळे विशेष सेवाधारी आहेत.स्वतःला कमी समजू नका आणि सेवा केल्यामुळे नावाची इच्छा ठेवू नका.सेवेला विश्वकल्याण प्रति अर्पण करत चला. तसेपण भक्तीमध्ये गुप्त दानी पुण्यत्मा असतात,ते हेच संकल्प करतात की,सर्वांचे चांगले व्हावे व्हावे.माझ्यासाठी हवे,मला फळ मिळावे,नाही.सर्वांना फळ मिळावे, सर्वांच्या सेवेमध्ये अर्पण व्हावे.कधी आपले पणाची इच्छा ठेवणार नाहीत. असेच सर्व प्रति सेवा करा.सर्वांच्या कल्याणाच्या बँकेमध्ये जमा करत चला.तर सर्वच काय बनतील? निष्काम सेवाधारी बनतील.आता कोणी विचारले नाही तरीही,परत अडीच हजार वर्ष तुम्हाला विचारतील.एक जन्मामध्ये कोणी विचारले किंवा अडीच हजार वर्ष कोणी विचारले, तर जास्त काय झाले? ते जास्त आहे ना.हद्दच्या संकल्पा पासून अनासक्त होऊन,बेहद्द सेवाधारी बनून,बाबांच्या ह्रदयासीन बेपर्वा बादशहा बनून, संगमयुगाचा आनंद घेत चला.कधी कोणती सेवा उदास करेल तर, समजा ती सेवा नाही.सेवा डगमग करेल,हलचल मध्ये आणेल,तर ती सेवा नाही.सेवा तर प्रगती करणारी आहे.सेवा बेगमपूरचे बादशहा बनवणारी आहे.असे सेवाधारी आहात ना.बेपर्वा बादशहा,बेगमपुरचे बादशहा.ज्याच्या पाठीमागे सफलता स्वतः येते,सफलतेच्या पाठीमागे जात नाहीत.सफलता त्यांच्या पाठीमागे पाठीमागे येते.अच्छा.बेहद्द सेवेचे नियोजन करता ना.बेहद स्थिति द्वारे बेहद्द सेवांचे नियोजन सहज सफल होते.

डबल परदेशी भाई बहिणींनी एक नियोजन केले,ज्यामध्ये सर्व आत्म्यांना काही मिनिट शांतीचे दान द्यायचे आहे.

हे पण विश्वाला महादानी बनवण्यासाठी चांगले नियोजन केले आहे.थोडावेळ पण शांतीच्या संस्काराला मजबुरीने किंवा स्नेहा द्वारे माहिती तर होईल ना.कार्यक्रमा प्रमाणे करतील तेव्हा पण आत्म्यामध्ये शांती चे संस्कार राहतील,तर शांती स्वर्धम तर आहेना. शांतीच्या सागराची मुलं तर आहेत ना.शांतीधाम चे निवासी पण आहात. तर कार्यक्रमा प्रमाणे झाल्यामुळे ती शांतीचे शक्ती त्यांना आकर्षित करत राहील.असे म्हणतात ना एकावेळेस ज्यांनी गोड खाल्ले तर,त्याला ती मिठाई जरी मिळाली नाही परंतु ती चव घेतलेली,त्याला नेहमी आकर्षित करत राहते.तर हे पण शांतीचा मध घेणे आहे.तर हे शांती चे संस्कार स्वतः स्मृति देत राहतील,म्हणून हळूहळू आत्म्या मध्ये शांतीची जागृती येत राहवी.हे पण तुम्ही सर्व शांतीचे दान देऊन,त्यांना पण दानी बनवतात ना.तुम्हा लोकांचा शुभ संकल्प आहे की,कोणत्याही विधीने, आत्म्यांनी शांतीची अनुभूती करावी. विश्वशांती पण आत्मिक शांती च्या आधारावरती असेल ना.प्रकृती पण पुरुषाच्या आधारा द्वारे चालते ना.ही प्रकृती पण शांत होईल,जेव्हा आत्म्या मध्ये शांतीची स्मृति येईल. कोणत्याही विधीद्वारे करा परंतु अशांती पासून तर दूर झाले ना आणि एक मिनिटाची शांती पण त्यांना अनेक काळासाठी आकर्षित करत राहिल.तर छान नियोजन बनवले आहे.हे पण जसे कोणाला थोडा ऑक्सीजन देऊन,शांतीचा श्वास घेण्याचे साधन आहे.शांतीचा श्वास पासून जसे बेहोश झाले आहेत.तर हे साधन जसे ऑक्सिजन आहे त्यामध्ये थोडा श्वास चालणे सुरू होईल.काहींचा श्वास ऑक्सिजन द्वारे चालत-चालत पुढे ज्ञान घेत राहतात. तर उमंग उत्साहासाठी प्रथम स्वतःला पूर्ण वेळ शांती स्तंभ बनून शांतीचे किरणे द्या.तेव्हा आपल्या शांतीच्या किरणाच्या मदती द्वारे,आपल्या शांतीच्या संकल्पा द्वारे, त्यांना पण संकल्प येईल आणि कोणत्या विधीद्वारे करतील.तुम्हा लोकांचे शांतीचे प्रकंपन पण त्यांना खऱ्या विधीपर्यंत आकर्षित करतील. हे पण कोणाला,जे निराशवादी आहेत,त्यांना आशावादी बनवण्याचे साधन आहे.निराशा पासून आशा उत्पन करण्याचे साधन आहे.जेवढे शक्य होईल तेवढे संपर्क मध्ये यावेत, ज्यांच्या पण संपर्क मध्ये येतील त्यांना दोन शब्दांमध्ये आत्मिक शांती,मनाची शांती चा परिचय देण्याचा प्रयत्न जरूर करा,कारण प्रत्येक आपापले नाव तर लिहतील ना.ते पत्रव्यवहारा द्वारे करतील किंवा सबंध संपर्क मध्ये तर येतील. यादीमध्ये तर येतील ना.तर जोपर्यंत जेवढे शक्य होईल,शांती चा अर्थ काय आहे,ते दोन शब्दांमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा.एका मिनिटांमध्ये पण आत्म्यामध्ये जागृती येऊ शकते,समजले.नियोजन तर तुम्हा सर्वांना पसंत आहे ना.दुसरे तर कामात चालढकल करतात,तुम्ही तर काम करतात.जेव्हा आहेतच शांतीचे दुत तर,चहूबाजूला शांतीच्या दुताचाआवाज पसरेल आणि शांतीचे फरिश्ते प्रत्यक्ष होतील.फक्त आपसा मध्ये चर्चा करा की,शांतीच्यापुढे असा कोणता शब्द हवा,जो दुनिया पासून थोडा वेगळा असेल.शांती यात्रा किंवा शांती हा शब्द तर दुनिया वाले पण वापरतात.तर शांती शब्दाच्या सोबत कोणता विशेष शब्द हवा,जो वैश्विक असेल आणि ऐकल्यामुळे पण वेगळे वाटले.तर त्याचे संशोधन करा बाकी चांगल्या गोष्टी आहेत.कमीत कमी जितका वेळ हा कार्यक्रम चालेल, तेवढा वेळ,काहीही झाले तरीही,न स्वतःला अशांत ठेवायचे आहे,न अशांत करायचे आहे.शांतीला कधी सोडायचे नाही.प्रथमतः ब्राह्मणांनी कडे घालायचे आहे.जेव्हा त्यांना कडे घालाल,जेव्हा प्रथम ब्राह्मण कडे घालतील,तर दुसऱ्याला पण घालू शकतील.जसे स्वर्णजयंती मध्ये सर्वांनी कोणता संकल्प केला? आम्ही समस्या बनणार नाहीत,हा विचार केला ना.त्यालाच सारखे सारखे लक्षात ठेवत राहा.असेही नाही,समस्या बना आणि म्हणा समस्या स्वरूप बनू नका.तर हे कडे बांधणे पसंद आहे ना.प्रथम स्वत: नंतर विश्व.स्वतःचा प्रभाव प्रथम विश्वावरती पडतो.अच्छा आज युरोपच्या पाळी आहे.युरोप तर खूप मोठा आहे ना.जितका मोठा युरोप आहे,तेवढ्याच मोठ्या मनाच्या आहात ना.जसा युरोपचा विस्तार आहे,जितका विस्तार आहे,तेवढाच सेवेमध्ये सार पण आहे.विनाशाची ज्वाळा कोठून निघाली?युरोपमधून निघली,जसे विनाशाचे साधन युरोपमधून निघाले,तर स्थापना चे कार्यामध्ये पण विशेष युरोप मधूनच आत्मे प्रत्यक्ष होतील.जसे प्रथम गुप्तरितीने,बाँम्बस बनवले नंतर वापर केला.अशा प्रकारे आत्मे पण तयार होत आहेत,आता गुप्त आहेत.गुप्त पण आहेत परंतु प्रत्यक्ष पण आहेत आणि होत राहतील.जसे प्रत्येक देशाची आपापली विशेषता असते,तसेच येथे पण प्रत्येक स्थानाची आप-आपली विशेषता आहे.नाव प्रत्यक्ष करण्यासाठी युरोपचे यंत्र कामांमध्ये येतील.जसे विज्ञानाचे यंत्र कार्यामध्ये आले,असे ज्ञानाचा आवाज प्रत्यक्ष करण्यासाठी युरोपचे यंत्र निमित्त बनतील.नवीन विश्व तयार करण्यासाठी,युरोपच तुमचा मदतगार बनेल.युरोपच्या वस्तू नेहमी मजबूत असतात.जर्मनीच्या वस्तूला सर्व महत्त्व देतात,तसेच सेवेच्या निमित्त,महत्त्वपूर्ण आत्मे प्रत्यक्ष होत राहतील,समजले.युरोप पण काही कमी नाही.आता प्रत्यक्षते चा पडदा उघडत आहे,वेळेनुसार प्रत्यक्ष होईल.अच्छा,थोड्या काळामध्ये आजूबाजूला विस्तार चांगला केला आहे.रचना केली आहे आता पालनाचे पाणी देऊन,मजबूत बनवत आहात.जसे युरोपच्या वस्तू खूप मजबूत असतात,तसेच आत्मे पण विशेष अचल-अडोल, मजबूत होतील.कष्ट प्रेमाने करत आहात, म्हणून कष्ट,कष्ट वाटत नाही परंतु सेवेची लगन चांगली आहे.जेथे लगन आहे,तेथे विघ्न पण समाप्त होतात, सफलता मिळत राहते.तसे एकुण युरोपचे श्रेष्ठ आत्मे पहिले तर छान आहेत.ब्राह्मण पण महत्वाच्या व्यक्ती आहेत.तसे पण महत्वाचे व्यक्ती आहेत म्हणून युरोपचे निमित्त सेवाधारींना आणखीनच स्नेहपुर्ण श्रेष्ठ पालने द्वारे मजबूत करून, विशेष सेवेच्या मैदानामध्ये आणत चला.तसे तर धरती प्रत्यक्ष फळ देणारी आहे,अच्छा.ही तर विशेषता आहे,जे बाबांचे बनताच,दुसऱ्यांना तयार करण्यासाठी हिम्मत चांगली ठेवली आहे आणि त्यामुळेच ही भेट आहे,ज्यामुळे सेवा केंद्र वृद्धीला प्राप्त होत आहे.चांगल्या आत्म्याची संख्या वाढवा आणि साधारण आत्म्यांची संख्या पण वाढवा.श्रेष्ठ आत्म्याची विशेषता आपली आहे आणि साधारण आत्म्यांची आपली शोभा आहे.दोन्ही पाहिजेत,फक्त चांगले असतील आणि साधारण नसतील,तर सेवा करणारे पण थकतील म्हणून दोन्ही आपापल्या विशेषतामुळे कामाचे आहेत.दोन्ही सेवा जरुरी आहेत कारण नऊ लाख तर बनवायचे आहेत ना.नऊ लाखांमध्ये परदेशातून किती बनले आहेत.(५०००) अच्छा,एका कल्पाचे चक्रतर पूर्ण केले.परदेशींना शेवटी येऊन प्रथम जाण्याचे वरदान आहे. तर भारतापेक्षा तीव्र गतीने जायचे आहे,कारण भारतवाल्यांनी धरती बनवण्यामध्ये कष्ट घेतले आहेत. परदेशांमध्ये कलराठी जमीन तर नाही.येथे प्रथम खराब ला चांगले बनवावे लागते.तेथे खराब नाहीच,तर वाईट गोष्टी,उलट्या गोष्टी ऐकल्याच नाहीत,म्हणून स्वच्छ आहेत.भारत निवासीना तर प्रथम बुद्धी स्वच्छ करावी लागते,परत ज्ञान द्यावे लागते. परदेशींना तर वेळे प्रमाण वरदान आहे,शेवटी येऊन प्रथम जाण्याचे, म्हणून युरोप किती लाख तयार करेल.तर जसे हे दहा लाख मिनिट शांतीचे,कार्यक्रम बनवला.अशीच प्रजा पण बनवा,बनवू तर शकता ना. शांतीचे दहा लाख मिनिट बनवू शकतात तर,प्रजा पण बनवू शकत नाही काय?आणखीनच एक लाख कमी, नऊ लाखच म्हणतात ना, समजले. युरोप निवासींना काय करायचे आहे?खूप जोरात तयारी करा.अच्छा डबल परदेशीचे डबल भाग्य आहे.तसेच सर्वांना एक मुरली ऐकण्यासाठी मिळते,तुम्हाला दोन मिळाल्या.संमेलन पण पहिले, स्वर्णजयंती पण पहिली,मोठ-मोठ्या दादींना पण पाहिले.गंगा,जमुना, गोदावरी,ब्रह्मपुत्रा सर्व पाहिल्या.सर्व मोठ मोठ्या नद्या पहिल्या ना.एकेक दादीची,एकेक विशेषता भेट म्हणून घेऊन जावा,तर सर्व विशेषताकामामध्ये येतील.विशेषतांची भेट झोळी भरून घेऊन जावा.यामध्ये कस्टम वाले पण काय करू शकणार नाहीत,अच्छा.

नेहमी विश्व कल्याणकारी बनून,विश्व सेवेच्या निमित्त खरे सेवाधारी श्रेष्ठ आत्मे,नेहमी सफलताच्या जन्मसिध्द अधिकाराला प्राप्त करणारे विशेष आत्मे,नेहमी स्वच्या स्वरुपाद्वारे,सर्वांना स्वरुपाची स्मृति देणारे जवळचे आत्मे,नेहमी निष्काम सेवाधारी बनून उडत्या कलांमध्ये उडणारे, दुहेरी प्रकाशधारी मुलांना,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
आपल्या फरिश्ता रूपा द्वारे, गती सदगतीचा प्रसाद वाटणारे, मास्टर गती सद्गती दाता भव.

वर्तमान वेळेत विश्वाचे अनेक आत्मे परिस्थितीच्या वश ओरडत आहेत. कोणी महागाई द्वारे,कोणी भुकेमुळे, कोणी तनाच्या रोगामुळे,कोणी मनाच्या अशांती मुळे,सर्वांची नजर शांतीच्या शिखराकडे जात आहे.सर्व पहात आहेत, हाहाकारा नंतर जय जयकार कधी होईल.तर आता आपल्याच साकार फरिश्ता रूपा द्वारे विश्वाचे दुःख दूर करा.मास्टर गती सद्गती दाता बनून,भक्तांना गती आणि सद्गतीचा प्रसाद वाटा.

सुविचार:-
बापदादांच्या प्रत्येक आदेशाला प्रत्यक्षात आणणारेच आदर्शमूर्त बनतात .