12-09-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   19.03.88  ओम शान्ति   मधुबन


"आठवणी मध्ये रमणिकता आणण्याची यूक्ति


आज विधाता, वरदाता बाप दादा, आपल्या मास्टर विधाता, वरदाता मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुलगा विधाता पण बनलेला आहे, तर वरदाता पण बनलेला आहे . त्याच बरोबर बाप दादा पाहत आहेत की मुलांचे पद किती महान आहे. ह्या संगम युगाच्या ब्राह्मण जीवनाचे किती महत्त्व आहे. तुम्ही ब्राह्मण विधाता पण आहात. तुमची प्रत्येक विधी सतयुगामध्ये कशी बदलते, ते पण ऐकवलेले आहे. या वेळेच्या प्रत्येक कर्माची विधि भविष्यामध्ये तर चालतेच परंतु द्वापर नंतर पण भक्ती मार्गामध्ये या वेळेच्या श्रेष्ठ कर्मांची विधी, भक्तिमार्गाची विधी बनून जाते. तर पूज्य रूपामध्ये पण यावेळीची विधी जीवनाच्या श्रेष्ठ विधानाच्या रूपामध्ये चालते, आणि पुजारी मार्गात म्हणजेच भक्ती मार्गामध्ये पण आपली प्रत्येक विधी नीती आणि रीतीच्या रुपाने चालते. तेव्हा विधाता, वरदाता, आणि विधी विधाता पण आहात.

आपले मूळ सिद्धांत सिद्धी प्राप्त होण्याचे साधन बनून जातात. जसे मूळ सिद्धांत- " पिता एक आहे. धर्मात्मा, महान आत्मा, अनेक आहेत, परंतु परमात्मा एक आहे". ह्या मूळ सिद्धांता द्वारे अर्धाकल्प आपण श्रेष्ठ आत्म्यांना एक बाबां- च्या द्वारे प्राप्त झालेला वारसा सिद्धीच्या रूपामध्ये प्राप्त होतो. प्रालब्ध मिळणे म्हणजेच सिद्धी स्वरूप बनणे, कारण पिता एक आहे बाकी महान आत्मा किंवा धर्मात्मा पिता नाहीत, भाऊ- भाऊ आहेत. वारसा पित्या कडून मिळतो, भावा कडून नाही. या मूळ सिद्धांत द्वारे अर्धाकल्प आपल्याला सिद्धी प्राप्त होते, आणि भक्तीमध्ये पण "गॉड इज वन"- हा सिद्धांत सिद्धी प्राप्त करण्याचा आधार बनतो. भक्तीचा मूळ आधार पण एक बाबाच्या शिवलिंगाच्या रूपाने आरंभ होतो ज्याला म्हटले जाते "अव्यभिचारी भक्ती". तर भक्ती मार्गामध्ये पण या एका सिद्धांता द्वारे सिद्धी प्राप्त होते की, पिता एक आहे. असे जे पण आपले मूळ सिद्धांत आहेत, त्या एकेक सिद्धांत द्वारे सिद्धी प्राप्त होत राहते. जसे या जीवनाचा मुळ सिद्धांत "पवित्रता" आहे. या पवित्रतेचा सिद्धांता द्वारे तुम्हा आत्म्यांना भविष्यामध्ये, सिद्धी स्वरूपाच्या रूपामध्ये प्रकाशाचा मुकुट सदैव प्राप्त होतो, ज्याचे यादगार रूप डबल मुकुटधारी दाखवतात. आणि भक्ती मध्ये पण जेव्हा यथार्थ आणि मनापासून भक्ती करतात तेव्हा ही पवित्रतेच्या सिद्धांतालाच मूळ आधार समजता, आणि जाणता की पवित्रते शिवाय भक्तीची सिद्धी प्राप्त होत नाही. जरी अल्पकालासाठी जेवढी वेळ भक्ती करता, तेवढ्या वेळे करता का होईना पण पवित्रता धारण करतात. परंतु पवित्रताच सिद्धीचे साधन आहे, ह्या सिद्धांताला अवश्य स्विकार करता. अशाप्रकारे प्रत्येक ज्ञानाच्या सिद्धांताला व धारणेचा मूळ सिद्धांताचा बुद्धीने विचार करा, की प्रत्येक सिद्धांत सिद्धीचे साधन कसे बनते.हे मनन करण्याचे काम देत आहेत .जसे उदाहरण ऐकवले ह्या पद्धतीने विचार करा.

तेव्हा तुम्ही विधाता पण बनता , सिद्धिदाता पण बनता. म्हणून आत्तापर्यंत ज्या भक्तांनि ज्या ज्या सिद्धी हव्या आहेत, त्या भिन्नभिन्न देवतांच्या द्वारे भिन्नभिन्न सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्या देवतांची पूजा करतात. तर सिद्धिदाता बाप द्वारे तुम्ही पण सिद्धिदाता बनतात .असे स्वतःला समजता ना ? ज्यांना स्वयम् सर्व सिद्धी प्राप्त आहेत, तेच इतरांना पण सिद्धी प्राप्त करण्याच्या निमित्त बनू शकतात. सिद्धी वाईट गोष्ट नाही. कारण तुमची रिद्धी सिद्धी नाही. रिद्धी सिद्धी जी असते ती थोड्या वेळेसाठी, परंतु प्रभावशाली असते .परंतु तुमची यथार्थ विधि द्वारा सिद्धी आहे. ईश्वरीय विधि द्वारा जी सिद्धी प्राप्त होते, ती सिद्धी पण ईश्वरी सिद्धी आहे . जसा ईश्वर अविनाशी आहे, तशी ईश्वरीय विधी आणि सिद्धी पण अविनाशी आहे. रिद्धी सिद्धी दाखवणारे स्वयम् अल्पज्ञ आत्मा आहे, तर त्यांची सिद्धी पण अल्पकालची आहे . परंतु आपली सिद्धी सिद्धांताच्या विधीद्वारे सिद्धी आहे . यासाठी अर्धाकल्प स्वयम् सिद्धि स्वरूप बनता, आणि अर्धाकल्प आपल्या सिद्धांतात द्वारे भक्त आत्मा यथाशक्ती तसेच फळाची प्राप्ती किंवा सिद्धीची प्राप्ती करते कारण भक्तीची शक्ती पण समय प्रमाण कमी होत चाललेली आहे. सतोप्रधान भक्तीची शक्ती, भक्त आत्म्यांना सिद्धीची अनुभूती, आज कालच्या भक्ता पेक्षा ज्यास्त अनुभवास येते .यावेळीची भक्ती तमोप्रधान भक्ती असल्यामुळे न यथार्थ सिद्धांत राहिलेले आहेत न सिद्धी.

तर एवढा नशा राहतो की आम्ही कोण आहे ? सदा या श्रेष्ठ स्वमानाच्या स्थितीच्या सीटवर (सेट राहा) बसत जा. किती श्रेष्ठ सीट आहे. जर या स्थितीच्या सीटवर सेट राहील तर वारंवार अपसेट होणार नाही. ही स्थिती आहे .किती श्नेष्ठ स्थिती आहे. विधि विधान सिद्धिदाता. तर जेव्हा या स्थितीमध्ये स्थित व्हाल तर माया विरोध करणार नाही. सदा सुरक्षित राहाल. अपसेट होण्याचे कारणच हे आहे , की आपल्या श्रेष्ठ स्थितीच्या आसना पासून साधारण स्थितीमध्ये येता. आठवणीमध्ये राहणे किंवा सेवा करणे एक साधारण दिनचर्या बनून जाते. परंतु आठवणीमध्ये बसताना आपल्या कोणत्या न कोणत्या श्रेष्ठ स्वमानाच्या सीटवर बसा. फक्त असं नाही की आठवणीच्या ठिकाणी, मग योगाच्या खोलीमध्ये किंवा बाबाच्या खोलीमध्ये, अंथरूणावर उठून बसलात, किंवा संपूर्ण दिवसांभर जाऊन बसलात. परंतु जसे शरीराला योग्य स्थान देता, तसे प्रथम बुद्धीला स्थितीचे स्थान द्या. प्रथम हे तपासा की बुद्धीला ठिकाणा दिलेला आहे ? तो ईश्वरीय नशा त्या आसनाने स्वतः येतो.आज काल खुर्चीचा नशा म्हणतात ना? आपले तर श्नेष्ठ स्थितीचे आसन आहे. कधी मास्टर बीजरूप स्थितीच्या असनावर बसा, कधी अव्यक्त फरिश्तेच्या आसनावर बसा , कधी विश्व कल्याणकारी स्थितीच्या आसनावर बसा . असेच रोज भिन्नभिन्न स्थितीच्या आसनावर किंवा आसनार स्थिर होऊन बसा.

जर कुणाला सीट नाही मिळाली तर हालचाल करतात ना. कधी असे तर कधी तसे करतील.तर बुद्धी पण तेव्हा हलचल मध्ये येते जेव्हा आपल्या सीटवर सेट होत नाही. सर्वच जाणतात कि आम्ही हे -हे आहे. .जर आता हे विचारले की आपण कोण आहात ? तर लांब लचक यादी निघेल. परंतु प्रत्येक वेळी जे जाणता, तसे स्वतःला माना. फक्त जाणू नका, मानत जा. कारण जाणण्याने सूक्ष्ममध्ये खुश राहता हा मी "हा" आहे . परंतु मानल्याने "शक्ती" येते आणि मानून चालल्याने "नशा" राहतो. जसे कोणताही अधिकारी जेव्हा आसनावर स्थिर होतो तेव्हा खुशी होते परंतु शक्ती राहात नाही . तेव्हा जाणता परंतु "मानून" चला . आणि वेळोवेळी स्वतःला विचारा चेक करा की, मी या आसनावर बसलेला आहे? की साधारण स्थितीमध्ये खाली आलेलो आहे ? जे इतरांना सिद्धी देणारे आहेत,ते स्वयम् प्रत्येक संकल्पा मध्ये प्रत्येक कर्मामध्ये सिद्धी स्वरूप अवश्य होतील. दाता होतील. सिद्धिदाता कधी हा विचार करणार नाहीत की जेवढा पुरुषार्थ करतो वा मेहनत करतो तेवढी सिद्धि दिसून येत नाही किंवा जेवढा याचा अभ्यास करतो तेवढी सिद्धी अनुभव होत नाही. यामुळे सिद्ध आहे की सीट वर सेट होण्याची विधी यथार्थ नाही . हे रमणिक ज्ञान आहे. रमणिक अनुभव स्वतः सुस्तीला पळवून लावतात . असे तर काही म्हणतात, तशी झोप येत नाही परंतु योगामध्ये झोप आवश्य येईल. हे का होते? ही गोष्ट नाही की थकावट आहे, परंतु रमणिक रूपाने किंवा सहज रूपाने बुद्धीला सीटवर सेट करत नाही, फक्त एक रूपाने नाही परंतु विविध रूपांनी सेट करा. तीच गोष्ट जर विविध रूपाने परिवर्तन करून वापरली तर मन खूष राहते . भले चांगली वस्तू असेल परंतु जर एकच वस्तू वेळोवेळी खात राहाल,पाहत राहाल तर काय होईल? असे बीजरूप बना, कधी लाईट हाऊसच्या रूपामध्ये ,कधी माईट हाऊसच्या रूपामध्ये कधी वृक्षाच्या वर बीज रुपामध्ये, कधी सृष्टी चक्राचा वर उभे राहून सर्वांना शक्ती द्या. जे वेग वेगळे स्वमान मिळालेले आहेत त्याचा अनुभव करा. कधी नडोळ्यातीई रत्न बनून, बाबाच्या डोळ्यामध्ये समावून राहा- या स्वरूपाची अनुभूती करा, कधी मस्तक मणी बना, कधी तख्तनशीन बनून वेगवेगळ्या स्वरूपाचा अनुभव करा. विविधता करा तर रमणीयता येईल. बाप दादा रोज मुरली मध्ये वेगवेगळे स्वमान का देतात ? त्या सीटवर सेट राहण्यासाठी, आणि फक्त मध्ये मध्ये चेक करत जा . यापूर्वीही ऐकवले होते की विसरून जातात. सहा तास, आठ तास व्यतित होतात. पुन्हा विचार करतात, म्हणून उदास होऊन जाता, कि अर्धा दिवस तर गेलेला आहे.

नैसर्गिकरित्या अभ्यास व्हावा .तेव्हा ही विधि- विधाता वा सिद्धिदाता बनून विश्वाच्या आत्म्यांचे कल्याण करू शकाल. समजले. अच्छा

आज मधुबन निवासींचा दिवस आहे. डबल विदेशी आपल्या वेळेची संधी देत आहेत. कारण मधुबन निवासींना बघून खुश होतात. मधुबन वाले म्हणतात महिमा करू नका .महिमा खूप ऐकलेली आहे. महिमा ऐकत ऐकत महान बनत आहात. कारण ही महिमाच ढाल बनून जाते. जसे युद्धामध्ये सुरक्षिततेचे साधन ढाल असते ना?

ही महिमा पण स्मृती देते की आम्ही किती महान आहे. मधुबन फक्त मधुबन नाही, परंतु मधुबन आहे विश्वाची स्टेज. मधुबन मध्ये राहणे अर्थात विश्वाच्या स्टेजवर राहणे. तर जो स्टेजवर राहतो तो किती अटेन्शन ने राहात असला पाहिजे. साधारण रीतीने तर कोणी कोणत्याही स्थानावर राहतो, तर एवढे अटेन्शन राहत नाही. परंतु जेव्हा स्टेजवर येतो तर प्रत्येक वेळी प्रत्येक कर्मावर तेवढेच लक्ष असते. तेव्हा मधुबन आहे विश्वाची स्टेज. चहूबाजूची नजर मधुबन वर आहे. तसेही सर्वांचे लक्ष स्टेजच्याकडे असते. तर मधुबन निवासी सदा विश्वाच्या स्टेजवर उपस्थित आहेत.

त्याच बरोबर मधुबन एक विचित्र प्रतिध्वनि आहे. जो या प्रतिध्वनी च्या क्षेत्रात असतो त्याचा आवाज स्वतः पर्यंत येतो, परंतु मधुबन असा विचित्र प्रतिध्वनी क्षेत्र आहे, जो मधुबनचा जरासा आवाज विश्वापर्यंत जातो . जसे आजकाल जुनी पुरानी अशी काही प्रकारची स्थान निशाणी मात्र आहेत, जे एका भिंतीला जरी असा हात लावला, किंवा आवाज केला तर त् दहा भिंतीमधून तो आवाज येईल आणि असे ऐकायला येईल,जसे काही ह्या भिंतींना कोणी हलवत आहे किंवा आवाज करत आहे .तर मधुबन असा विचित्र प्रतिध्वनी क्षेत्र आहे जो मधुबन चा आवाज फक्त मधुबन पर्यंत राहत नाहीत, परंतु चारही बाजूला पसरतो. असा पसरतो जो मधुबन मध्ये राहणाऱ्यां ना,ही माहिती होत नाही. परंतु विचित्र आहे ना ,म्हणून बाहेर पोहोचतो, म्हणून असे समजू नका की येथे बघितले, येथेच बोललो परंतु विश्वापर्यंत आवाज हवेच्या वेगाने पोहोचतो. कारण सर्वांच्या नजरेमध्ये, बुद्धीमध्ये, सदैव मधुबन आणि मधुबनचे बाप दादाच राहतात. तर जेव्हा मधुबनचा बाबा डोळ्या मध्ये राहतो तर मधुबन पण येणार ना ? मधुबनचा बाबा आहे तर मधुबन येणारच, आणि मधुबन मध्ये फक्त बाबा नाहीत, तर मुलेही आहेत. तर मधुबन वासी स्वतःच सर्वांच्या डोळ्यांमध्ये येतात. कोणत्याही ब्राह्मणाला विचारा भले किती पण दूर राहणारा असेल, परंतु आठवणीत काय राहते? मधुबन आणि मधुबनचा बाबा. तर एवढे महत्त्व आहे मधुबन वासियांचे. समजले. अच्छा

चहू बाजूचे सर्व सेवेच्या उमंग उत्साहामध्ये राहणारे, सदा एक बाबांच्या स्नेहा मध्ये सामावलेले, सदा प्रत्येक कर्मामध्ये श्रेष्ठ विधि द्वारा सिद्धीचा अनुभव करणारे, सदा स्वतःला विश्वाचे कल्याणकारी अनुभव करून प्रत्येक संकल्पाने बोलाने श्रेष्ठ कल्याणाची भावना आणि श्रेष्ठ इच्छेने सेवेमध्ये व्यस्त राहणारे, असे बाप समान सदा अथक सेवाधारी मुलांना बाप दादाची स्नेह पूर्वक आठवण आणि नमस्ते.

वैयक्तिक स्नेह मिलन :

1) स्वतःला कर्मयोगी श्रेष्ठ आत्मा अनुभव करता? कर्मयोगी आत्मा सदा कर्माचे प्रत्यक्ष फळ स्वतः अनुभव करते. प्रत्यक्ष फळ "खुशी आणि शक्ती". तर कर्मयोगी आत्मा अर्थात प्रत्यक्ष फळ खुशी आणि शक्तीचा अनुभव करणारी. बाबा सदाच मुलांना प्रत्यक्ष फळ प्राप्त करणारा आहे. आत्ता आता कर्म केले. कर्म करताना खुशी आणि शक्तीचा अनुभव केला. अशी कर्मयोगी आत्मा आहे या स्मृतीने पुढे चालत राहा.

2) बेहदची सेवा करण्याने बेहदच्या खुशीचा स्वतः अनुभव होतो ना ? बेहदचा बाप बेहदचे अधिकारी बनवतात. बेहद सेवेचे फळ बेहदचे राज्य भाग्य स्वतः प्राप्त होते. जेव्हा बेहदच्या स्थितीमध्ये स्थित होऊन सेवा करता, तर ज्या आत्म्यांचे निमित्त बनलेला आहात, त्यांची दुवा आशीर्वाद, स्वतः आत्म्यामध्ये शक्ती आणि खुशीची अनुभूती करवते. एका ठिकाणी बसून ही या सेवेचे फळ मिळत आहे . या बेहदच्या नशेने बेहदचे खाते जमा करत पुढे चालत राहा.

वरदान:-
सेकंदामध्ये देहरूपी वस्त्रा पासून वेगळे बनून कर्म भोगावर विजय प्राप्त करणारे सर्व शक्तिसंपन्न भव.

जेव्हा कर्म भोगाचा जोर होतो, कर्मेंद्रिया कर्म भोगाच्या वशीभूत आपल्याकडे आकर्षित करतात, अर्थात ज्या वेळेला खूप दर्द(दुखणे)अनुभव होते, अशा वेळेला कर्मभोगाला कर्मयोगामध्ये परिवर्तन करणारे, साक्षी होऊन कर्मेंद्रिया कडून भोगणाऱ्याला सर्व शक्तीसंपन्न अष्ट रतन विजयी म्हटले जाते. त्यासाठी शरीर रुपी वस्त्रापासून पासून, वेगळे बनण्याचा खूप काळचा अभ्यास पाहिजे .हे वस्त्र दुनियेच्या किंवा मायेच्या अकर्षणा मध्ये टाईट म्हणजेच चिकटलेले नसावे. तेव्हाच सहज उतरेल.

सुविचार:-
सर्वांचा मान प्राप्त करण्यासाठी निर्माण चित्त बना. निर्मानता ही महानतेची निशाणी आहे.