12-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बाबा आले आहेत तुम्हा मुलांना पोहणे शिकवण्यासाठी,याद्वारे तुम्ही या दुनिया पासून पार होतात, तुमच्यासाठी दुनियाच बदलते"

प्रश्न:-
जे बाबांचे मदतगार बनतात,त्यांना त्या बदलण्यामुळे कशाची प्राप्ती होते?

उत्तर:-
जी मुलं बाबांचे मदतगार बनतात,त्यांना बाबा असे बनवतात,जे अर्धाकल्प कोणाची मदत घेण्याची किंवा मदत देण्याची आवश्यकता राहत नाही.किती मोठे बाबा आहेत,ते म्हणतात मुलांनो तुम्ही माझे मदतगार बनले नसते तर,मी स्वर्गाची स्थापना कसे करू शकलो असतो.

ओम शांती।
गोड-गोड क्रमानुसार अतिगोड आत्मिक मुलांप्रति आत्मिक पिता समजावत आहेत कारण अनेक मुलं बेसमज बनले आहेत.रावणांने खूप बेसमज बनवले आहे.बाबा आता आम्हाला खूप समजदार बनवत आहेत.कोणी भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा पास करतात,तर समजतात खूप मोठी परीक्षा पास केली.आता तुम्ही खूप मोठी परीक्षा पास करतात. तुम्ही जरा विचार तर करा, आम्हाला शिकवणारे कोण आहेत? आणि शिकणारे कोण आहेत?हा पण निश्चय आहे की,आम्ही कल्प-कल्प,प्रत्येक पाच हजार वर्षानंतर,पिता,शिक्षक,सद्गुरुशी परत भेटतच राहतो.फक्त तुम्ही मुलंच जाणता,आम्ही किती उच्च ते उच्च बाबा द्वारा,उच्च वारसा मिळवतो.तुम्हाला शिकवून शिक्षक पण वारसा देतात.तुम्हाला शिकवून, तुमच्यासाठी दुनियाच बदलतात, नवीन दुनिया मध्ये राज्य करण्यासाठी,तुम्हाला शिकवून दुनियेलाच परिवर्तित करतात.भक्तिमार्गा मध्ये खूप महिमा गातात.तुम्ही त्यांच्याद्वारे आपला वारसा मिळवत आहात.हे पण तुम्ही मुलं जाणता की,जुनी दुनिया बदलत आहे.तुम्ही म्हणतात,आम्ही सर्व शिवबाबांची मुलं आहोत.जुन्या दुनियेला बदलण्यासाठी बाबांना पण यावे लागते.त्रिमूर्तीच्या चित्रांमध्ये पण दाखवतात,ब्रह्मा द्वारा नवीन दुनियाची स्थापना होते.तर जरूर ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण ब्राह्मणी पाहिजेत.ब्रह्मा तर नवीन दुनिया स्थापन करत नाहीत,रचनाकार तर शिवपिता आहेत.ते म्हणतात,मी येऊन युक्तीने जुन्या दुनियेचा विनाश करून,नवीन दुनिया बनवतो.नवीन दुनियाचे रहिवासी खूप थोडे असतात.शासन प्रयत्न करते की लोकसंख्या कमी व्हावी, आता कमी तर होत नाही. लढाईमध्ये करोडो मनुष्य मरतात, परत मनुष्य कमी थोडेच होतात. लोकसंख्या तरीही वृद्धी होत जाते.

हे पण तुम्ही जाणतात,तुमच्या बुद्धीमध्ये विश्वाच्या आदी मध्य अंतचे ज्ञान आहे.तुम्ही स्वतःला विद्यार्थी पण समजतात.पोहायला पण शिकतात.असे पण म्हणतात, माझी नाव किनार्याला लावा.असे म्हणतात ना पट्टीचे पोहणारे असतात,ते पोहायला शिकवतात. आता तुमचे पोहणे कसे आहे, एकदम वरती चालले जातात,परत येथे येतात.ते तर दाखवतात इतके किलोमीटर,इतके वरती गेले.तुम्ही किती वरती जातात,त्या तर स्थुल वस्तू आहेत,ज्याचे मोजमाप होऊ शकते.तुमचे तर अगणित आहे. तुम्ही जाणतात आम्ही आत्मा आपल्या घरी चालले जाऊ,तेथे सूर्य चंद्र इत्यादी नसतात.तुम्हाला तर आनंद आहे,ते आमचे घर आहे. आम्ही तेथे राहणारे आहोत.मनुष्य भक्ती करतात,पुरुषार्थ करतात, मुक्तिधाम मध्ये जाण्यासाठी, परंतु कोणी जाऊ शकत नाहीत. मुक्तिधाम मध्ये भगवंताला भेटण्याचे प्रयत्न करतात.अनेक प्रकारचे प्रयत्न,कष्ट करत राहतात. कोणी म्हणतात,आम्ही ज्योती ज्योत मध्ये सामावले जाऊ.कोणी म्हणतात,मुक्तिधाम मध्ये जाऊ.मुक्तीधामची कोणालाही माहिती नाही.तुम्ही मुलं जाणतात, बाबा आले आहेत,आपल्या घरी घेऊन जातात.गोड गोड बाबा आले आहेत,आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी लायक बनवतात. ज्यासाठी अर्धाकल्प पुरुषार्थ करून पण,बनू शकले नाहीत.न कोणी ज्योती मध्ये सामवले आहेत, न मुक्तिधाम मध्ये जाऊ शकतात,न मोक्ष मिळवू शकतात.जो काही पुरुषार्थ केला तो व्यर्थ.आता तुम्हा ब्राह्मण कुलभूषणचा पुरुषार्थ सत्य सिद्ध होतो.हा खेळ कसा बनलेला आहे.तुम्हाला आत्ता आस्तिक म्हटले जाते.बाबांना चांगल्या रीतीने तुम्ही जाणतात आणि बाबा द्वारे सृष्टीचक्राला पण जाणले आहे. बाबा म्हणतात,मुक्ती जीवनमुक्ती'चे ज्ञान कोणामध्ये नाही,देवतांमध्ये पण नाही.बाबांना कोणीच जाणत नाहीत,तर कसे घेऊन जातील. अनेक गुरू लोक आहेत आणि किती त्यांचे शिष्य बनतात.खरे-खुरे सद्गुरु तर शिवबाबाच आहेत,त्यांचे तर चरण नाहीत.ते म्हणतात माझे तर चरण नाहीत,मी कशी तुमच्याकडून पूजा करवून घेऊ. मुलं विश्वाचे मालक बनतात,तर त्यांच्याकडून चरणाची पूजा कशी करून घेऊ.भक्ती मार्गांमध्ये मुलं त्याच्या पाया पडतात.वास्तव मध्ये पित्याच्या संपत्तीचे मुलं तर मालक आहेत,परंतु नम्रता दाखवतात. लहान मुलं इत्यादी सर्व जाऊन पाया पडतात.येथे तर बाबा म्हणतात,तुम्हाला पाया पडण्यापासून पण सोडवतो.बाबा किती मोठे आहेत,ते म्हणतात तुम्ही माझी मुलं मदत करतात.तुम्ही मदतगार नसते तर,मी स्वर्गाची स्थापना कसे करू शकलो असतो. बाबा समजवतात मुलांनो,आता तुम्ही मदतगार बना,परत मी तुम्हाला असे बनवतो,जे कोणाची मदत घेण्याची आवश्यकता राहत नाही.तुम्हाला कोणाच्या मताची पण आवश्यकता राहणार नाही.येथे पिता मुलांची मदत घेत आहेत.ते म्हणतात मुलांनो,आत्ता छी-छी बनू नका.माये पासून हार खाऊ नका, नाही तर बदनाम कराल.बॉक्सिंग असते तर,त्यामध्ये जेव्हा कोणी जिंकतात,तर वाहवा वाहवा होते. हार खाणाऱ्याचे तोंड पिवळे पडते. येथे पण हार खातात.येथे हार खाणाऱ्याला म्हटले जाते,काळे तोंड केले.गोरा बनण्यासाठी आले होते, परत काय केले? केलेली सर्व कमाई नष्ट होते,परत सुरुवाती पासून कमाई सुरू करावी लागते. बाबाचे मदतगार बनून परत हार खाल्ली तर नाव बदनाम करतात. दोन पार्टी आहेत,एक आहेत मायेचे गुलाम,दुसरे आहेत ईश्वराचे.तुम्ही बाबांना प्रेम करतात.असे गायन पण आहे,विनाश काले विपरीत बुद्धी.तुमची प्रीत बुद्धी आहे तर, तुम्ही नाव बदनाम थोडेच करणार? तुम्ही प्रीत बुद्धी परत माये पासून हार का खातात? हारणाऱ्यांना दुःख होते,तर जिंकणाऱ्यांची टाळ्या वाजवून वाहवा करतात.तुम्ही मुलं समजता,आम्ही तर पैलवान आहोत.आता मायेला जिंकायचे जरूर आहे.बाबा म्हणतात देह सहीत,जे काही पाहतात,त्या सर्वांना विसरा,माझीच आठवण करा. मायाने तुम्हाला सतोप्रधान पासून तमोप्रधान बनवले आहे,आता परत सतोप्रधान बनायचे आहे.माया जीते जगतजीत बनायचे आहे.हा हार आणि जीत,सुख आणि दुःखाचा खेळ आहे.रावण राज्यांमध्ये हार खातात.आता बाबा परत हिरेतुल्य बनवत आहेत.बाबानी समजवले आहे,एक शिव बाबांची जयंतीच हिरेतुल्य आहे.आता तुम्हा मुलांना असे लक्ष्मीनारायण सारखे बनायचे आहे.स्वर्गामध्ये तर घराघरांमध्ये दिवाळी असते,सर्वांची ज्योत जागृत झालेली असते.मेन पावर हाउस पासून ज्योत जागृत होते.बाबा खूप सहज रित्या सन्मुख ज्ञान समजावतात.बाबांच्या शिवाय गोड गोड फार वर्षांनी भेटलेली मुलं कोण म्हणू शकेल?आत्मिक पिताच म्हणतात,माझ्या लाडक्या मुलांनो, तुम्ही अर्ध्याकल्पा पासून भक्ती करत आले आहात,परत एक पण जाऊ शकत नाही.बाबा सर्वांना घेऊन जातात.

तुम्ही संगम युगावरती चांगल्या रीतीने समजावू शकतात.बाबा कसे येऊन सर्वांना घेऊन जातात.दुनिया मध्ये या नाटकाची कोणालाही माहिती नाही.हे पण तुम्ही समजतात,दुसरे कोणी समजावू शकत नाहीत.जर तुम्ही म्हणाल बेहद्दचे नाटक आहे,तर परत नाटकाचे वर्णन कसे कराल.तुम्हीच चक्राला जाणतात.तुम्हा मुलांनीच जाणले आहे,तुम्हालाच आठवण करायची आहे.बाबा खूप सहज समजवतात,भक्ती मार्गामध्ये तुम्ही किती धक्के खाल्ले आहेत.तुम्ही स्नान करण्यासाठी किती दूर जातात.एक तलाव आहे त्याच्यामध्ये स्नान केल्यामुळे परी बनतात,असे म्हणतात.आता तुम्ही ज्ञान सागरामध्ये डुबकी मारून राजकुमार बनतात.कोणी चांगली फॅशन करतात,तर म्हणतात ही तर तर परी बनली आहे.आता तुम्ही रत्न बनत आहात,बाकी मनुष्याला उडण्यासाठी पंख इत्यादी होऊ शकत नाहीत,असे उडू शकत नाहीत.उडणारी तर आत्मा आहे.आत्म्याला राॅकेट पण म्हटले जाते.आत्मा खूप लहान आहे. जेव्हा सर्व आत्मे जातील,तर होऊ शकते,तुम्हा मुलांना पण साक्षात्कार होईल.बुद्धी द्वारे समजू शकता,येथे तुम्ही वर्णन करू शकतात.होऊ शकते,जसे विनाश पाहिला तसे, आत्म्यांना पण पाहू शकतात,कसे जातात.हनुमान गणेश इत्यादी तर नाहीत परंतु त्यांना भावने नुसार साक्षात्कार होतो.बाबा तर बिंदी आहेत,त्यांचे काय वर्णन काय करावे.असे म्हणतात लहान बिंदू आहे,ज्याला या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत.शरीर तर खूप मोठे आहे,ज्याद्वारे कर्म करायचे आहे. आत्मा खूप लहान आहे, त्याच्यामध्ये ८४चे चक्र नोंदलेले आहे.एक पण मनुष्य नसेल,ज्याच्या बुद्धीमध्ये असेल की,आम्ही ८४ जन्म कसे घेतो. आत्म्या मध्ये कशी भूमिका भरलेली आहे.आत्मा शरीर घेऊन भूमिका करते,अभिनय करते. ते हद्दचे नाटक आहे,हे बेहद्द चे नाटक आहे.बेहद्दचे बाबा स्वतः येऊन आपला परिचय देतात.जे चांगली सेवाधारी मुलं आहेत,ते विचार सागर मंथन करत राहतात, कुणाला कसे समजून सांगायचे? तुम्ही किती माथा मारत राहतात, तरीही म्हणतात बाबा आम्ही समजत नाही.कोणी शिकत नाही तर म्हटले जाते, हे तर पत्थर बुध्दी आहेत.तुम्ही पाहता, येथे पण कोणी सात दिवस, खूप आनंदामध्ये समजून घेऊन म्हणतात की, आम्ही बाबांना भेटू.कोणी तर काहीच समजत नाहीत.मनुष्य तर फक्त म्हणतात,पत्थर बुद्धी पारस बुद्धी परंतु अर्थ समजत नाहीत.आत्मा पवित्र बनते तर,पारसनाथ बनते.पारसनाथचे मंदिर पण आहे. सर्व सोन्याचे मंदिर तर नसते,वरती थोडे सोनं लावतात.तुम्ही मुलं जाणतात,आम्हाला बागवान मिळाले आहेत,जे काट्या पासून फुल बनण्याची युक्ती सांगत आहेत.असे गायन पण आहे, अल्लाहची बाग.तुमच्याजवळ सुरुवातीला एक मुसलमान ध्यानामध्ये जाऊन म्हणत होता, आम्हाला खुदाने फुल दिले.उभ्या-उभ्या पडत होता.खुदाची बाग पाहत होता. आता दाखवणारे तर स्वतः खुदा असतील ना,दुसरे कसे दाखवतील. तुम्हाला वैकुंठाचा साक्षात्कार करतात,खुदाच घेऊन जातात. स्वतः तेथे राहत नाहीत.खुदा तर शांतीधाम मध्ये राहतात.तुम्हाला वैकुंठाचे मालक बनवतात.किती चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही समजतात.मनामध्ये आनंद होतो. मनामध्ये खूप आनंद व्हायला पाहिजे,आता आम्ही सुखधाम मध्ये जात आहोत.तेथे दुःखाची तर गोष्ट नसते.बाबा म्हणतात सुखधाम आणि शांतीधाम ची आठवण करा. घराची आठवण का करणार नाही?आत्मा घरी जाण्यासाठी खूप माथा मारते,जप-तप इत्यादी खूप कष्ट घेतात,परंतु वापस कोणी जाऊ शकत नाहीत.झाडापासून क्रमानुसार आत्मे येत राहतात,परत मध्येच कसे जाऊ शकतात.जेव्हा की बाबाच येथे आहेत.मुलांना रोज समजवत राहतात.शांतीधाम आणि सुखधामची आठवण करा.बाबांना विसरल्यामुळे तुम्ही दुःखी झाले आहात.मायेचा मोचरा लागतो. आत्ता तर जरा पण मोचरा खायचा नाही.मुख्य देहाभिमान आहे.

तुम्ही आज पर्यंत ज्या बाबांची आठवण करत होते, हे पतित-पावन या,त्याच शिव पित्याकडून तुम्ही शिकत आहात. तुमचे आज्ञाधारक सेवक,शिक्षक पण आहेत.मोठे मनुष्य सही करताना तर,नेहमी लिहितात आज्ञाधारक सेवक.बाबा म्हणतात मी तुम्हा मुलांना कसे सन्मुख समजवत आहे.सुपात्र मुलांशी बाबा प्रेम करतात.जे कुपात्र आहेत,ते बाबांचे बणून परत निंदक बनतात,विकारांमध्ये जातात,तर पिता म्हणतात असा मुलगा तर जन्मला नसता तर चांगले झाले असते. एका मुळे खूप नाव बदनाम होते.अनेकांना कष्ट होतात.तेथे तुम्ही खूप उच्च काम करत आहात, विश्वाचा उद्धार करत आहात आणि तुम्हाला तीन पाऊल पृथ्वीचे पण मिळत नाहीत.तुम्ही मुलं कुणाचेही घरदार सोडवत नाहीत.तुम्ही तर राजांना पण म्हणतात,तुम्ही पुज्य दुहेरी मुकुटधारी होते,आता पुजारी बनले आहात.आता बाबा परत पुज्य बनवत आहेत,तर बनायला पाहिजे ना.थोडा उशीर आहे.आम्ही येथे कुणाचे लाख रुपये घेऊन काय करणार? गरिबांनाच राजाई मिळणार आहे.बाबा गरिब निवाज आहेत ना.तुम्ही अर्थसहीत समजता की,बाबांना गरीब निवाज का म्हटले जाते.भारत पण खूप गरीब आहे, त्यामध्ये पण तुम्ही माता गरिब आहात.जे सावकार आहेत,ते ज्ञानाला घेऊ शकत नाहीत.गरीब माता तर खूप येतात,त्यांच्यावर अत्याचार होतात.बाबा म्हणतात मातांना पुढे करायचे आहे. प्रभात फेरी मध्ये प्रथम माता हव्यात.बैज पण तुमचा खूप चांगला आहे.हे ट्रान्सलेट चे चित्र,प्रभात फेरी मध्ये सर्वात पुढे असायला हवे.सर्वांना सांगा दुनिया बदलत आहे.बाबा पासून कल्प पूर्वीप्रमाणे वारसा मिळत आहे.मुलांना विचार सागर मंथन करायचे आहे,कसे सेवेची वृद्धी होईल?वेळ तर लागतो ना. अच्छा

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातापिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बाबांशी पूर्णपणे प्रेम ठेवून मदतगार बनायचे आहे.मायेशी हार खाऊन कधीच नाव बदनाम करायचे नाही.पुरुषार्थ करून देह सहीत,जे काही दिसते,त्याला विसरायचे आहे.

(2) मनामध्ये खुशी राहावी की, आम्ही आत्ता शांतीधाम सुखधाम मध्ये जात आहोत.बाबा आज्ञाधारक शिक्षक बणून आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी लायक बनवत आहेत.लायक, सुपात्र बनायचे आहे,कपुत,कुपात्र बनायचे नाही.

वरदान:-
त्री-स्मृती स्वरूपाचा तिलक धारण करणारे,संपूर्ण विजयी भव.

स्वतःची स्मृती,बाबांची स्मृती आणि नाटकाच्या ज्ञानाची स्मृती,या तीन स्मृतीमध्ये सर्व ज्ञानाचा विस्तार सामावलेला आहे.ज्ञानाच्या वृक्षाच्या या तीन स्मृती आहेत.जसे वृक्षाचे प्रथम बीज असते,त्याद्वारे दोन पान निघतात,परत वृक्षाचा विस्तार होतो. असे मुख्य बीज आहे,बाबांची स्मृति,परत दोन पाने म्हणजे आत्मा आणि नाटकाचे सर्व ज्ञान.या तीन स्मृतीला धारण करणारे,स्मृति भव किंवा संपूर्ण विजय भवचे वरदानी बनतात.

बोधवाक्य:-
प्राप्तींना नेहमी समोर ठेवा,तर कमजोरी सहज समाप्त होतील.