12-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो महावीर बना,मायेच्या वादळाशी लढण्या ऐवजी,अचल अडोल बना"

प्रश्न:-
ब्रह्मा बाबाच्या समोर अनेक समस्या असताना पण कधीच नाराज झाले नाही, का?

उत्तर:-
कारण बाबांना नशा होता की,आम्हाला बाबा पासून वारसा घ्यायचा आहे.हे तर कल्पा सारखेच होत आहे, नवीन काहीच नाही.निंदा, अपशब्द तर सर्वात अधिक बाबांना च मिळाले आहेत,परत कृष्णाला मिळाले आहेत.जर आम्हाला पण निंदा,अपशब्द सहन करावे लागले तर कोणती मोठी गोष्ट आहे.दुनिया आमच्या गोष्टीला जाणत नाही,तर जरूर अपशब्द बोलतील म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये नाराज व्हायचे नाही.पित्याचे अनुकरण करत राहा.

गीत:-
भोलेनाथ से निराला न और कोई..

ओम शांती।
हे भक्तीमार्गाचे गीत आहे.ज्ञानमार्गाचे गीत इत्यादी नसते, न बनवले जाते,न आवश्यकता आहे. कारण गायन आहे बाबा पासून सेकंदांमध्ये जीवनमुक्तीचा वारसा मिळतो,त्यामध्ये गीत इत्यादी ची कोणती गोष्ट नाही.तुम्ही जाणता आम्हाला बेहद्दच्या बाबा पासून बेहद्दचा वारसा मिळत आहे.जी भक्तिमार्गाची रसम रिवाज आहे,ती ज्ञानमार्गामध्ये होऊ शकत नाही.मुलं कविता इत्यादी बनवतात,ते पण दुसऱ्यांना ऐकवण्यासाठी.ते पण जो पर्यंत तुम्ही समजावून सांगत नाहीत,तोपर्यंत कोणी समजू शकत नाहीत.आता तुम्हा मुलांना बाबा मिळाले आहेत,तर खुशीचा पारा चढायला पाहिजे.बाबांनी ८४ जन्माच्या चक्राचे ज्ञाना ऐकवले आहे.आता आम्ही स्वदर्शन चक्रधारी बनलो आहोत,विष्णू पुरीचे मालक बनण्यासाठी,तर खुशी व्हायला पाहिजे.निश्चय बुद्धीच विजयंती बनतात.ज्यांना निश्चय असतो,ते सतयुगा मध्ये जातील.तर मुलाला नेहमी खुशी राहायला पाहिजे. पित्याचे अनुकरण करा.मुलं जाणतात,निराकार बाबांनी जेव्हा या तना मध्ये प्रवेश केला,तर यांच्याजवळ खूप गोंधळ झाला. भावांची भांडण,शहरांमध्ये भांडणे, सर्व सिंधमध्ये भांडणं झाली.मुलं मोठी झाली,म्हणतात लवकर लग्न करा.लग्ना शिवाय काम कसे चालेल? गीता वाचन करणे चुकवत नव्हते,जेव्हा माहिती झाले की,गीतेचे भगवान शिव आहेत,तर ते गीता वाचणे सुटले,परत नशा चढला की आम्ही तर विश्वाचे मालक बनत आहोत.हे तर शिव भगवानुवाच आहे,तर ती गीता वाचणे सोडून गेले. परत पवित्रते वरती खूप गोंधळ झाला.भाऊ,काका,मामा इत्यादी किती होते,यामध्ये बहादुरी पाहिजे. तुम्ही महावीर महावीरनी आहात. बाबा शिवाय दुसऱ्या कोणाची काळजी करायची नाही.पुरुष तर रचनाकार आहेत.रचना स्वत:पावन बनत आहेत,रचनेला पण पावन बनवायचे आहे.पवित्र हंस आणि अपवित्र बगळे एकत्र कसे राहू शकतात?निर्माता,रचनाकार तर लगेच हुकूम करतील की,माझ्या मतावर चालायचा असेल तर चला, नाहीतर निघून जावा.तुम्हाला माहित आहे की,लौकिक मुलीचे लग्न झाले होते,तिला ज्ञान मिळाले तर म्हणाली वाह! शिवपिता म्हणतात पवित्र बना,तर मी का नाही बनणार?तीने पतीला उत्तर दिले की,मी विष देणार नाही,म्हणजे अपिवत्र बनणार नाही. या गोष्टीवरती खूप भांडणं झाली. मोठ्या मोठ्या घरातील मुली ज्ञानामध्ये आल्या,कोणाची काळजी केली नाही.ज्यांच्या भाग्यामध्ये नाही ते तर समजू शकत नाहीत.पवित्र राहायचे असेल तर राहा,नाहीतर जाऊन आपला प्रबंध करा,इतकी हिंमत पण पाहिजे.बाबांच्या समोर खूप गोंधळ झाला,बाबा कधी नाराज झाले नाही.अमेरिकेपर्यंत पेपर मध्ये गेले,यामध्ये पण नवीन काहीच नाही.हे तर कल्पा पूर्वीसारखेच होत आहे,यामध्ये घाबरण्याची गोष्ट नाही.आम्हाला तर आपल्या बाबा कडून वारसा घ्यायचा आहे. आपल्या रचनेला वाचवायचे आहे.बाबा जाणतात,सर्व रचना या वेळेत पतित आहेत.मलाच सर्वांना पावन बनवायचे आहे.बाबांना सर्व बोलवतात,हे पतित-पावन,मुक्तिदाता या.तर त्यांनाच दया येते,दयावान आहेत ना.तर बाबा समजवतात मुलांनो कोणत्याही गोष्टींमध्ये घाबरू नका.घाबरल्यामुळे इतके उच्च पद मिळणार नाही.अत्याचार माता वरतीच होतात,ही पण खूण आहे. द्रोपदीचे वस्त्रहरण करत होते.बाबा २१ जन्मासाठी विकारी बनण्यापासून वाचवतात.दुनिया या गोष्टीला जाणत नाही.सद्गती दाता तर मी आहे ना.जोपर्यंत मनुष्याची दुर्गती होत नाही,तोपर्यंत मी कसे येऊन सदगती देऊ.पतित तमोप्रधान सृष्टी तर बनणारच आहे.प्रत्येक वर्षी नवीन पासून जुनी जरूर होते.जुन्या घराला सोडावे लागते.नवीन दुनिया सुवर्णयुग,जुनी दुनिया लोहयुग आहे. नेहमीच नवीन तर राहू शकत नाही. तुम्ही मुलं जाणता,हे सृष्टीचे चक्र आहे.देवी-देवतांचे राज्य परत स्थापन होत आहे.बाबा म्हणतात, परत मी तुम्हाला गीता ज्ञान ऐकवतो. येथे रावण राज्यामध्ये दुःख आहे. रामराज्या बाबत कोणाला माहित नाही आणि समजत ही नाहीत.बाबा म्हणतात,मी स्वर्ग किंवा रामराज्याची स्थापना करण्यासाठी आलो आहे. तुम्हा मुलांनी अनेक वेळा राज्य घेतले आणि गमावले आहे.हे सर्वांच्या बुद्धीमध्ये आहे,21 जन्म सतयुगा मधे राहतो,त्याला म्हटले जाते २१ पिढी,म्हणजे जेव्हा वृद्ध होतात तेव्हाच शरीरात सोडतात. अकाली मृत्यू कधी होत नाही.आत्ता तर तुम्ही जसे त्रिकालदर्शी बनले आहात.आता तुम्ही जाणता आम्ही जन्म जन्मांतर,भक्ती करत आलो आहोत.रावण राज्या मध्ये देखावा खूप आहे,हा तर अंत काळातील दिखावा आहे.रामराज्य सतयुगा मध्ये असते,तेथे विमान इत्यादी सर्व होते परत सर्व गायब झाले.हे यावेळीच सर्व निघाले आहेत.आत्ता हे सर्व शिकत आहेत.जे शिकणारे आहेत,ते सर्व संस्कार घेऊन जातील. परत सतयुगा मध्ये विमान बनवतील.हे तुम्हाला भविष्यामध्ये सुख देणारे आहेत.हे विमान इत्यादी भारतवासी बनवू शकतात,काही नवीन गोष्ट नाही,हुशार तर आहेत. हे विज्ञान परत तुम्हाला सतयुगा मध्ये कामाला येईल.हे विज्ञान,येथे दुःखासाठी आहे,परत तिथे सुखासाठी असेल.तेथील प्रत्येक वस्तू नवी असेल.आता तर नवीन दुनियेची स्थापना होत आहे.बाबाच नवीन दुनियेची राजधानी स्थापन करत आहेत,तर मुलांना महावीर बनायचे आहे.जुन्या दुनियेत कोणी थोडीच जाणतात की,भगवान आले आहेत.

बाबा म्हणतात,ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहत,कमल फुलासारखे पवित्र राहा. यामध्ये घाबरण्याची गोष्टच नाही, काय करतील?जास्तीत-जास्त निंदा करतील,अपशब्द म्हणतील.निंदा पण यांची पण खूप झाली आहे.कृष्णाची पण निंदा खूप झाली आहे.आत्ता कृष्णाची तर कोणी निंदा करू शकत नाहीत.निंदा अपशब्द तर कलियुगामध्ये होतात. तुमचे रूप जे आत्ता आहे,ते परत कल्पा नंतर,या वेळेत च होईल, मध्येच होऊ शकत नाही.जन्म जन्मांतर चित्र,शारीरिक रचना बदलत जाते.एका आत्म्याला ८४ जन्मामध्ये एकसारखेच चित्र, शरीर मिळू शकत नाही.सतो,रजो,तमो मध्ये येत जातात.चित्र बदलत जातात.हे अविनाशी नाटक बनले आहे,८४ जन्मा मध्ये जे चित्र आहेत, तेच परत घेतील.आत्ता तुम्ही जाणता यांचे चित्र बदलून दुसऱ्या जन्मात लक्ष्मी-नारायण बनतील. तुमच्या बुध्दीचे कुलूप आता उघडले आहे. आत्ता ही नवीन गोष्ट आहे.बाबा पण नवीन,गोष्टी पण नवीन.या गोष्टी कोणाच्या बुध्दीमध्ये लवकर येऊ शकत नाहीत.जेव्हा भाग्यामध्ये असेल,तेव्हा काही समजतील. महावीर तर कोणत्याही परिस्थितीला घाबरणार नाहीत.ही अवस्था अंत काळात होईल,म्हणून गायन आहे, अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर गोप-गोपीना विचारा.बाबा आले आहेत,तुम्हा मुलांना स्वर्गाचे लायक बनवण्यासाठी.कल्प पूर्वी सारखा विनाश तर होणारच आहे.सतयुगा मध्ये एक धर्म असेल.त्यांची इच्छा पण असते की,एकमत व्हावे,एक धर्म असायला पाहिजे.हे कोणालाच माहीत नाही की, रामराज्य आणि रावण राज्य वेग-वेगळे आहेत.येथे विकारा शिवाय जन्म होऊ शकत नाही.खूप पतित आहेत ना.आत्ता बाबा मध्ये निश्चय आहे,तर श्रीमता वरती पूर्ण पणे चालावे लागेल. प्रत्येकाची नाडी पाहिली जाते, त्यानुसार मत दिले जाते.बाबानी (ब्रह्मा) लौकिक मुलाला म्हटले,जर लग्न करायचे असेल,तर जाऊन करा.खूप मित्र संबंधी इत्यादी खूप आहेत,ते लग्न करून देतील. प्रत्येकाची नाडी पाहून मत दिले जाते.मुलं विचारतात बाबा ही परिस्थिती आहे,आम्ही पवित्र राहू इच्छितो परंतु,आमचे संबंधी आम्हाला घरामधून बाहेर काढतील. आता काय करायचे आहे? हे विचारतात,पवित्र राहायचे आहे?जर पवित्र राहू शकत नाहीत,तर जाऊन लग्न करा.समजा कुणाचा साखरपुडा झाला आहे,त्यांना खूश करायचे आहे,हरकत थोडीच आहे. ज्यावेळेस साखरपुडा करतात, त्यावेळेस म्हणतात ना,तुमचा पतीच गुरु आहे,त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडून लिहून घ्या.तू मानते ना, मी तुझा गुरु, ईश्वर आहे.तर अच्छा,आत्ता मी तुला हुकूम देतो, पवित्र राहायचे आहे, हिम्मत पाहिजे ना.लक्ष खूप उच्च आहे.दोघे एकत्र कसे राहू शकतील.हे सर्वांना दाखवायचे आहे.प्राप्ती खूप जबरदस्त आहे.काम विकाराची आग तेव्हाच लागते,जेव्हा प्राप्तीची माहिती नाही.बाबा म्हणतात इतकी मोठी प्राप्ती आहे,तर एक जन्म पवित्र राहणे काय मोठी गोष्ट आहे? मी तुमचा पती,ईश्वर आहे, माझ्या आज्ञेनुसार पवित्र राहायचे आहे. बाबा युक्ती सांगतात.भारतामध्येच कायदा आहे,पत्नीला म्हणतात,पती ईश्वर आहे,त्यांच्या आज्ञेनुसार चालायचे आहे.पतीचे पाय चोपायचे आहेत,कारण ते समजतात,लक्ष्मीने नारायणचे पाय चोपले होते.ही सवय कोठून निघाली?या खोट्या चित्रावरून.सतयुगामध्ये अशा गोष्टी नसतात.नारायण कधी थकेल का? जे लक्ष्मी बसून त्यांचे पाय चोपेल. तेथे थकण्याची गोष्टच नाही.येथे तर दु:खाच्या गोष्टी होतात.तेथे दु:खाच्या गोष्टी कशा होतील? तर खूप खोट्या गोष्टी लिहिल्या आहेत.बाबांना लहानपणापासूनच वैराग्य होता, म्हणून भक्ती करत होते.बाबा मुलांना,युक्ती खूप चांगल्या प्रकारे सांगतात.काही मुलांना नातेवाईक त्रास देतात.अच्छा लग्न करा.पत्नी तर तुमची आहे ना.परत कोणी काही करू शकत नाही.दोघे मिळून पवित्र राहा,जोडीदार झाले ना. परदेशामध्ये जेव्हा वृद्ध होतात,त्या वेळेस सांभाळ करण्यासाठी सोबती ठेवतात.कोर्टात लग्न करतात, विकारांमध्ये जात नाहीत.आता तुम्ही जाणता,आम्ही एक पित्याची मुलं आहोत,तर आपसा मध्ये भाऊ बहीण झाले.दादा पासून वारसा मिळतो.बाबांना बोलवतातच पतित दुनिये मध्ये,हे पतित पावन सर्व सितांचे राम.मनुष्य राम राम जपतात,तर सीतेची थोडीच आठवण करतात.त्यांच्या पेक्षा मोठी तर लक्ष्मी आहे परंतु आठवण तर एका पित्याची करतात.लक्ष्मीनारायणला तरीही जाणतात,शिवाला तर कोणी जाणत नाहीत.आत्मा बिंदू आहे,तर आत्म्याचा पिता पण बिंदूच असेल ना.आत्म्यामध्ये सर्व ज्ञान आहे. त्यांना म्हटले जाते,ज्ञानाचे सागर.तुम्ही आत्मा पण ज्ञानाचे सागर बनतात.ज्ञान सागर सन्मुख तुम्हा आत्म्यांना समजवतात.आत्मा चैतन्य आहे.तुमची आत्मा ज्ञानाची सागर बनत आहे.सर्व सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान तुम्हाला आहे.गोड मुलांनी हिम्मत ठेवायला पाहिजे. आम्हाला बाबाच्या श्रीमतावरती चालायला पाहिजे ना.बेहद्दचे बाबा बेहद्दच्या मुलांना स्वर्गाचे मालक बनवतात.तर बाबा म्हणतात,तुम्ही पण आपल्या रचनेला हातामध्ये ठेवा.जर मुलगा तुमची आज्ञा मानत नाही,तर तो मुलगा,मुलगा नाही तो तर कुपात्र झाला.आज्ञाधारक, आदेशानुसार चालणारी मुलंच वारशाचे हक्कदार बनू शकतात. बेहद्दचे पिता पण म्हणतात, माझ्या श्रीमतावरती चालाल,तर तुम्ही असे श्रेष्ठ बनाल,नाही चालले तर प्रजामध्ये चालले जाणार.बाबा तुम्हाला नरापासून नारायण बनवण्यासाठी आले आहेत.हीच खरी सत्यनारायणाची कथा आहे. तुम्ही राजाई प्राप्त करण्यासाठी आले आहात.आत्ता मम्मा बाबा राजा-राणी बनतात,तर तुम्ही पण हिम्मत ठेवा.बाबा तर जरूर आपल्यासारखे बनवतील ना.प्रजा बनण्यांमध्ये खूश व्हायचे नाही, पुरुषार्थ करायचा आहे,यामुळे बाबा पासून पूर्ण वारसा घेऊ,कुरबान जाऊ.तुम्ही त्यांना वारिस बनवणार तर,ते तुम्हाला २१ जन्मासाठी वारसा देतील.बाबा मुलांवरती कुर्बान जातात,तर मुलं म्हणतात बाबा हे तन-मन-धन सर्व आपले आहे. तुम्ही पिता पण आहेत आणि मुलगा पण आहात.त्वमेय माताश्च पिता त्वमेय. एक बाबा ची महिमा खूप मोठी आहे,दुनियेमध्ये या गोष्टींना कोणी जाणत नाहीत.भारताच्याच या सर्व गोष्टी आहेत.तुम्ही मुलं जाणता,ही पाच हजार वर्षापूर्वीचे लढाई आहे. आता स्वर्गाची स्थापना होत आहे, तर तुम्हा मुलांना खूप आनंदात राहायला पाहिजे.भगवंताने स्वतः तुम्हाला दत्तक घेतले आहे,तर तुम्हाला खूप आनंद राहायला पाहिजे.परत मी तुम्हा मुलांचा बाबा शृंगार पण करतात,शिकवतात पण, कारण ते ज्ञानसागर आहेत. आम्हाला सर्व सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान समजवतात.जे शिव पित्याला जाणत नाहीत,ते नास्तिक आहेत.तुम्ही पिता आणि रचनेला जाणतात,तुम्ही आस्तिक आहात. लक्ष्मी-नारायण नास्तिक आहेत की,आस्तिक आहेत? तुम्ही काय म्हणणार?तुम्ही स्वतः म्हणनार, सतयुगा मध्ये परमात्माला कोणी आठवण करत नाहीत.तेथे सुख आहे,तर सुखा मध्ये परमात्म्याचे स्मरण करत नाहीत,कारण परमात्म्याला जाणत नाहीत. यावेळी तुम्ही आस्तिक बनून वारसा घेत आहात.परत तेथे आठवण पण करत नाहीत.त्यांना माहीत नाही की, हा वारसा आम्हाला शिवबाबा पासून मिळाला आहे परंतु त्यांना नास्तिक म्हणणार नाही,कारण ते पावन आहेत,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) श्रीमतावरती चालण्यासाठी पूर्ण हिम्मत ठेवायला पाहिजे.कोणत्या गोष्टी मध्ये नाराज व्हायचे नाही.

(२) आपल्या रचनेला आपल्या हातामध्ये ठेवायचे आहे,त्यांना विकारापासून वाचवायचे आहे.पावन बनण्यासाठी मत द्यायचे आहे.

वरदान:-
शरीराला ईश्वरीय सेवेसाठीची भेट समजून कार्यामध्ये लावणारे नष्टमोहा भव.

जसे कोणाची अमानत,सुरक्षा ठेव असते तर त्यामध्ये आपलेपणा नसतो,ममता पण राहत नाही.तर हे शरीर पण ईश्वरी सेवेसाठी अमानत,सुरक्षा ठेव आहे.ही भेट ईश्वरीय पित्यानी दिली आहे.तर जरूर आत्मिक पित्याची आठवण राहायला पाहिजे.अमानत समजल्यामुळे आत्मीयता येईल, आपल्या पदाची आसक्ती राहणार नाही. हाच सहज उपाय निरंतर योगी आणि नष्टोमोहा बनण्यासाठी आहे. तर आता आत्मिक स्थितीला प्रत्यक्ष करा.

बोधवाक्य:-
वानप्रस्थ स्थितीमध्ये जायचे असेल तर, दृष्टी वृत्तीमध्ये पण पवित्रतेला अधोरेखित करा.