12-11-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबा जे शिकवतात, ते चांगल्या प्रकारे धारण करा, तर २१ जन्मासाठी कमाईचे साधन बनेल"

प्रश्न:-
तुम्हा मुलांच्या इंद्रिय सुखाचे गायन का आहे?

उत्तर:-
कारण तुम्ही मुलंच, या वेळेत बाबांना जाणतात, तुम्हीच बाबा द्वारे सृष्टीच्या आदी मध्य अंतला जाणले आहे. तुम्ही आत्ता संगम युगामध्ये उभे आहात. तुम्ही जाणतात आत्ता आम्ही, या खाऱ्या खाडी मधून अमृताच्या गोड नदीकडे जात आहोत. आम्हाला स्वतः भगवान शिकवत आहेत. अशी खुशी ब्राह्मणांनाच राहते, म्हणून अतिइंद्रीय सुखाचे तुमचे गायन आहे.

ओम शांती।
आत्मिक बेहद्दचे पिता आत्मिक बेहद्दच्या मुलांप्रति समजावत आहेत, म्हणजेच आपले मत देत आहेत. हे तर जरूर समजता की, आम्ही जीवात्मा आहोत, परंतु निश्चय तर स्वतःला आत्मा करायचे आहे ना. हे काही आम्ही नवीन शिकत नाहीत, प्रत्येक पाच हजार वर्षानंतर शिकत आलो आहोत. बाबा विचारतात अगोदर कधी भेटण्यासाठी आले होते? तर सर्वजण म्हणतात, आम्ही प्रत्येक पाच हजार वर्षांनंतर पुरुषोत्तम संगमयुगात बाबांच्या जवळ येतो. हे तर आठवणीत राहते की, हे पण विसरतात, विद्यार्थ्याला तर शाळेची जरूर आठवण येते ना. मुख्य लक्ष एकच आहे. जे पण मुलं बनतात, मग तो दोन दिवसाचा मुलगा असेल किंवा जुना असेल, परंतु उद्दिष्ट एकच आहे. कोणालाही नुकसान होऊ शकत नाही. शिक्षणामध्ये कमाई आहे. ते लोक पण ग्रंथ ऐकतात, तर कमाई होते ना, त्याद्वारे शरीर निर्वाह होतो. साधू बनले, एक-दोन ग्रंथ ऐकवले कमाई सुरू होते. आता हे सर्व कमाईचे साधन आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये कमाई पाहिजे ना. पैसे आहेत तर कुठेही फिरून येऊ शकता. तुम्ही मुलं जाणतात, बाबा आम्हाला खूप चांगली कमाई करण्यासाठी शिकवतात. ज्याद्वारे २१ जन्माची मिळकत होते. ही मिळकत तर अशी आहे, जे आम्ही नेहमी सुखी बनतो, कधी आजारी पडणार नाही. नेहमी अमर राहू. हे निश्चित करायचे असते. असा निश्चय केल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. नाहीतर कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये संशय येत राहील. मनामध्ये स्मरण करायला पाहिजे, आम्ही बेहदच्या पित्याकडून शिकत आहोत. भगवानुवाच ही गीता आहे. गिताचे युग येते ना, फक्त विसरले आहेत, हे पाचवे युग आहे. हे संगमयुग खूप छोटे आहे. वास्तव मध्ये चौथाई पण म्हणणार नाही. तुम्ही टक्केवारी काढू शकता. तेही पुढे चालून बाबा स्पष्ट करत राहतील. काही तरी बाबांनी ज्ञान स्पष्ट केल्याची पण नोंद आहे. तुम्हा सर्व आत्म्याची भूमिका नोंदलेली आहे, ज्याची पुनरावृत्ती होत राहते. तुम्ही जे पण शिकतात, त्याची पण पुनरावृत्ती होते ना. पुनरावृत्तीच्या रहस्याला पण तुम्हा मुलांनी जाणले आहे. पाऊला-पाऊलावर भूमिका बदलत जाते, एक सेकंड दुसऱ्याशी मिळू शकत नाही. जू सारखी टिकटिक होत राहते, टिक झाले, सेकंद पास झाला. आता तुम्ही बेहद्द मध्ये उभे आहात. दुसरे कोणतेही मनुष्यमात्र बेहद्दमध्ये उभे नाहीत. कोणालाही बेहद्द म्हणजे आदी मध्य अंताचे ज्ञान नाही. आता तुम्हाला भविष्याची माहिती आहे. आम्ही नवीन दुनिया मध्ये जात आहोत. हे संगमयुग युग आहे, ज्याला क्रॉस म्हणजे पार करायचे आहे. खाडी आहे ना. ही तर गोड गोड अमृताची नदी आहे. त्या दुनियेत विषाची नदी आहे. आता तुम्ही विषयाच्या सागरा मधून क्षिरसागरामध्ये जात आहात. ही बेहद्दची गोष्ट आहे ना. दुनिये मध्ये या बाबत काहीच माहिती नाही. नवीन गोष्ट आहे ना. ते पण तुम्ही मुलंच जाणतात, भगवान कोणाला म्हटले जाते. ते काय भूमिका वठवतात. भाषण करताना पण स्पष्ट करतात, या तर परमपिता परमात्माचे जीवन चरित्र तुम्हाला समजावून सांगू. तसे तर मुलं पित्याचे जीवन चरित्र ऐकवतात, ही तर साधारण गोष्ट आहे. हे तर पित्यांचे पिता आहेत ना. तुमच्या मध्ये पण क्रमानुसार पुरुषार्थी प्रमाणेच जाणतात. आता तुम्हाला अर्थसाहित बाबांचा परिचय द्यायचा आहे. तुम्हाला पण बाबांनी दिला आहे, त्यामुळे तर समजवतात, दुसरे तर कोणी बेहद्दच्या पित्याला ओळखत नाहीत. तुम्ही पण संगम युगामध्येच जाणतात. मनुष्यमात्र देवता असो किंवा शुद्र असो, पुण्यात्मा असो किंवा पाप आत्मा, कोणीच जाणत नाहीत, फक्त तुम्ही ब्राह्मण जे संगम युगामध्ये आहात, तुम्हीच जाणतात. तर तुम्हा मुलांना खूप आनंद व्हायला पाहिजे, तेव्हा तर गायन आहे, अतिंद्रीय सुख विचारायचे असेल, तर गोप गोपींना विचारा. बाबा पिता पण आहेत, शिक्षक आणि सद्गुरु पण आहेत. सर्वोच्च अक्षर जरूर लिहायचे आहे. कधी-कधी मुलं विसरतात. या सर्व गोष्टी मुलांच्या बुद्धीमध्ये राहायला पाहिजेत. शिवबाबांच्या महिमा मध्ये हे अक्षर जरूर लिहायच्या आहेत. तुमच्या शिवाय दुसरे कोणी जाणत नाहीत. तुम्ही समजावू शकता, तर तुमचा विजय झाला ना. तुम्ही जाणतात, सर्वांचे शिक्षक, सर्वांचे सद्गती दाता आहेत. बेहद्दचे सुख, बेहद्दचे ज्ञान देणारे आहेत. तरी अशा पित्याला विसरतात, माया खूप समर्थ आहे. ईश्वराला तर समर्थ म्हणतात परंतु माया पण कमी नाही. तुम्ही मुलं बिनचूक जाणतात, त्यांचे नाव तर रावण ठेवले आहे. राम राज्य आणि रावण राज्य यावरती पण बरोबर समजावयाला पाहिजे. राम राज्य आहे तर रावण राज्य पण आहे. नेहमीच रामराज्य तर होऊ शकत नाही. रामराज्य, श्रीकृष्णाचे राज्य कोण स्थापन करतात, हे बेहद्दचे पिताच सन्मुख समजावतात. तुम्हाला भारत खंडाची खूप महिमा करायला पाहिजे. भारत सत्यखंड होता, खूप महिमा होती. असे बनवणारे बाबाच आहेत. तुमचे बाबांशी खूप स्नेह आहे. मुख्य लक्ष तर बुध्दी मध्ये आहे. हे पण जाणतात, आम्हा विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाचा नशा राहायला पाहिजे. चरित्राचा पण विचार असायला हवा. विवेक म्हणतो, जेव्हा ईश्वरीय शिक्षण आहे, तर एक दिवस पण मुरली चुकवायला नको आणि शिक्षकाच्या नंतर उशीरा वर्गामध्ये जायचे नाही. शिक्षकाच्या नंतर येणे हा पण शिक्षकाचा अपमान आहे. शाळेमध्ये उशिरा येतात तर त्यांना शिक्षक वर्गाच्या बाहेर उभा करतात. बाबा आपल्या लहानपणाचे उदाहरण देतात. आमचे शिक्षक तर खूप कडक होते. वर्गात उशीरा आल्यानंतर वर्गामध्ये येऊ देत नव्हते. येथे तर खूप आहेत, जे उशिरा येतात. सेवा करणारी मुलं तर जरूर बाबांना प्रिय वाटतात ना. आता तुम्ही समजतात, आदी सनातन देवी-देवता धर्म तर होता ना. यांचा धर्म कधी स्थापन झाला? जरापण कोणाच्या बुद्धीमध्ये नाही. तुमची बुद्धी पण घडीघडी विसरते. तुम्ही आत्ता देवी-देवता बनण्यासाठी शिक्षण घेत आहात, कोण शिकवत आहे? स्वतः परमपिता परमात्मा. तुम्ही समजता आमचे हे ब्राह्मण कुळ आहे, यांची राजाई होत नाही. हे सर्वोत्तम ब्राह्मण कुळ आहे. बाबा पण सर्वोत्तम आहेत ना. उच्च ते उच्च आहेत, तर जरूर त्यांची मिळकत पण उच्च असेल ना. त्यांना श्री श्री म्हणतात. तर तुम्हाला श्रेष्ठ बनवतात. तुम्ही मुलं जाणतात, आम्हाला श्रेष्ठ बनवणारे कोण आहेत? दुसरे तर काहीच समजत नाहीत. तुम्ही म्हणाल आमचे बाबा, पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि सद्गुरु पण आहेत. तेच शिकवत आहेत. आम्ही आत्मा आहोत. आम्हा आत्म्यांना बाबांनी स्मृती दिली आहे, माझी संतान आहात. बंधुत्व भाव आहे ना. बाबांची पण आठवण करत राहतात. तुम्ही समजतात, ते निराकारी आहेत तर जरूर आत्म्याला पण निराकारीच म्हणणार. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते, परत भूमिका वठवते. मनुष्य परत आत्म्याच्या ऐवजी स्वतःला शरीर समजतात. मी आत्मा आहे, हे विसरतात. मी कधी विसरत नाही. तुम्ही सर्व शाळीग्राम आहात. मी आत्मा आहे, हे विसरतात. मी कधी विसरत नाही. तुम्ही आत्मे सर्व शाळीग्राम आहात. मी परमात्मा म्हणजे परम आत्मा आहे. त्यांच्यावरती कोणते दुसरे नाव नाही, त्या परमात्म्याचे नाव शिव आहे. तुम्ही पण असेच आहात परंतु तुम्ही सर्व शाळीग्राम आहात. शिवाच्या मंदिरामध्ये जातात, तेथे पण खूप शाळीग्राम ठेवतात, शिवाची पूजा करतात, तर त्यासोबत शाळीग्राम ची पण करतात ना. तेव्हा बाबांनी समजले होते की, तुमची आत्मा आणि शरीर दोघांची पूजा होते. माझी तर फक्त आत्म्याची पुजा होते, शरीराची नाही. तुम्ही खूप उच्च बनत आहात. बाबांना तर खूप खुश होती ना. पिता गरीब असतात, तर मुलं शिक्षण घेऊन उच्चपद प्राप्त करतात. बाबा पण जाणतात तुम्ही खूप उच्च होते, आता अनाथ बनले आहात, बाबांना पण जाणत नाहीत. आता तुम्ही बाबाचे बनले आहात, तर संपूर्ण विश्वाचे मालक बनतात.

बाबा म्हणतात मला, स्वर्गीय ईश्वरीय पिता म्हणतात, हे पण तुम्ही जाणतात. स्वर्गाची स्थापना होत आहे. तेथे काय काय असेल, हे तुमच्याशिवाय कोणाच्या बुद्धी मध्ये नाही. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही विश्वाचे मालक होतो, आता परत बनत आहोत. प्रजा पण असेच म्हणेल की, आम्ही मालक आहोत. या गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये आहेत, तर खूप खुश राहायला पाहिजे ना. या गोष्टी ऐकून परत दुसर्यांना पण समजून सांगायच्या आहेत म्हणून सेवा केंद्र किंवा संग्रहालय उघडत राहा. कल्पा पूर्वी झाले होते, तेच होत राहील. संग्रहालय सेवाकेंद्र इत्यादी उघडण्यासाठी तुम्हाला खूप निमंत्रण मिळतील. अनेक जण नम्र होत जातील. संपूर्ण दुनिया आता नम्र होत जाईल. तुमच्या योगा मध्ये खूप ताकत आहे. बाबा म्हणतात तुमच्यामध्ये खूप ताकत आहे. भोजन पण तुम्ही योगा मध्ये राहून बनवा, खाऊ घाला तर बुद्धी बाबा कडे आकर्षित होईल. भक्ती मार्गामध्ये तर गुरूंचे उष्टे पण खातात. तुम्ही मुलं समजतात भक्तिमार्गाचा खूप विस्तार आहे, त्याचे वर्णन करू शकत नाही. हे बीज, ते झाड आहे. बीजाचे वर्णन करू शकतात. बाकी कोणाला सांगा, झाडाचे पानं मोजा तर मोजू शकत नाहीत. अनेक पाने असतात. बीजामध्ये तर पानाची लक्षणे दिसून येत नाहीत‌. हे तर आश्र्चर्य आहे ना. याला पण कुदरत म्हणतात. अनेक जीवजंतू आश्चर्यकारक आहेत, अनेक प्रकारचे किडे आहेत. ते कसे उत्पन्न होतात, हे खूप आश्चर्यकारक नाटक आहे, याला निसर्ग म्हटले जाते. हा पण पूर्वनियोजित खेळ आहे. सतयुगा मध्ये काय काय पाहाल, त्यापण नवीन गोष्टी असतील. सर्व काही नवीन असते. मोरा साठी तर बाबांनी समजवले आहे, त्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणतात कारण श्रीकृष्ण च्या मुकुटा मध्ये मोराचे पंख दाखवतात. मोर आणि मोरणी खूप सुंदर असतात, गर्भधारणा पण त्यांच्या अश्रू द्वारे होते, म्हणून राष्ट्रीय पक्ष म्हणतात. असेच सुंदर पक्षी परदेशात पण असतात. आता तुम्हा मुलांनी सर्व सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य समजले आहे. हे दुसरे कोणी जाणत नाहीत. तुम्ही सांगा आम्ही आपल्या परमपिता परमात्मा चे जीवन चरित्र सांगतो. रचनाकार आहेत तर जरूर त्यांची रचना पण असेल, त्यांचा इतिहास भूगोलास आम्ही जाणतो. उच्च ते उच्च बेहद्दच्या पिताची कोणती भूमिका आहे, हे आम्ही जाणतो, दुनिया तर काहीच जाणत नाही. ही खूप खराब दुनिया आहे. या वेळेत सुंदरता पण एक समस्याच आहे, मुलींना पळवून घेऊन जातात. तुम्हा मुलांना विकारी दुनिया पासून तर नफरत द्वेष यायला पाहिजे. ही खूप खराब दुनिया, खराब शरीर आहे. आम्हाला तर आता बाबांची आठवण करून आत्म्याला पवित्र बनवायचे आहे. आम्ही सतोप्रधान होतो तर खूप सुखी होतो, आता तमोप्रधान बनलो आहोत, तर खूप दुःखी आहोत, परत सतोप्रधान बनायचे आहे. तुमची इच्छा आहे, आम्ही पतिता पासून पावन बनू. जरी गायन करतात पतित-पावन, परंतु विकारी दुनिया पासून नफरत, द्वेष येत नाही. तुम्ही मुलं समजतात, खूप खराब दुनिया आहे, नवीन दुनिये मध्ये आम्हाला शरीर पण खूप सुंदर मिळेल. आता आम्ही अमरपुरी चे मालक बनत आहोत. तुम्हा मुलांना खूप आनंद राहायला पाहिजे. तुम्ही खूप गोड मुलं आहात. बाबा पाच हजार वर्षानंतर त्याच मुलांना येऊन भेटतात, तर जरूर खुशी राहिली पाहिजे. आम्ही परत मुलांना भेटण्यासाठी आलो आहोत, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आम्ही ईश्वरीय विद्यार्थी आहोत म्हणून ज्ञानाचा नशा पण राहावा आणि आपल्या चरित्रावर ती पण ध्यान हवे. एक दिवस पण मुरली चुकवायची नाही. मुरलीच्या वर्गामध्ये उशिरा येऊन शिक्षकांचा अपमान करायचं नाही.

(२) ह्या विकारी खराब दुनिया पासून नफरत यायला पाहिजे. बाबाच्या आठवणी द्वारे आपल्या आत्म्याला पवित्र सतोप्रधान बनवण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. नेहमी खुश करायचे आहे.

वरदान:-
अंतःवाहक शरीरा द्वारे सेवा करणारे, कर्म बंधन मुक्त, डबल लाईट भव.

जसे स्थूल शरीरा द्वारे साकार ईश्वरी सेवेमध्ये व्यस्त राहतात, तर असेच आपल्या शरीराद्वारे अंत वाहक सेवा पण सोबत करायची आहे. जसे ब्रह्मा द्वारा स्थापने मध्ये वृद्धी झाली, तसेच आता आपल्या सूक्ष्म शरीरा द्वारे शिवशक्ती च्या एकत्रित रूपाच्या साक्षात्कार द्वारे साक्षात्कार आणि संदेश देण्याचे कार्य सुरू होईल, परंतु या सेवेसाठी कर्म करताना पण, कोणत्याही कर्म बंधनापासून मुक्त, नेहमी डबल लाईट रुपामध्ये राहा.

बोधवाक्य:-
मान-शानच्या त्यागा मध्येच, सर्वांचे माननीय बनण्याचे भाग्य सामावलेले आहे.