13-01-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुमच्या मुखाद्वारे नेहमी ज्ञान रत्नच निघायला पाहिजेत, तुमचा चेहरा नेहमी हर्षित राहायला पाहिजे"

प्रश्न:-
ज्या मुलांनी ब्राह्मण जीवनामध्ये ज्ञानाची धारणा केली आहे,त्यांची लक्षणे काय असतील?

उत्तर:-
(१) त्यांची चलन देवता सारखी असेल,त्यांच्यामध्ये दैवी गुणांची धारणा असेल.(२) त्यांना ज्ञानाचा विचार सागर मंथन करण्याचा अभ्यास असेल.ते कधी आसुरी गोष्टी म्हणजे व्यर्थ गोष्टीचे मंथन करणार नाहीत.(३) त्यांच्या मुखाद्वारे अपशब्द निघणार नाहीत,निंदा करणे बंद होईल. (४) त्यांचा चेहरा नेहमी हर्षित राहील.

ओम शांती।
ज्ञान आणि भक्ती बाबत बाबा समजवत आहेत.हे तर मुलं समजले आहेत की,भक्ति द्वारे सद्गती होत नाही आणि सतयुगामध्ये भक्ती नसते.ज्ञान पण सतयुगा मध्ये मिळत नाही.कृष्ण न भक्ती करतात,न ज्ञानाची मुरली वाजवतात.मुरली म्हणजे ज्ञान देणे.गायन पण आहे ना, मुरली मध्ये जादू आहे.तर जरुर कोणती जादू असेल ना.फक्त मुरली वाजवणे,ते तर साधारण फकीर लोक पण वाजवत राहतात.या मुरली मध्ये ज्ञानाची जादू आहे. अज्ञानाला जादू तर म्हणणार नाहीत.मुरली ला जादू म्हणतात. ज्ञाना द्वारे मनुष्यांपासून देवता बनतात.जेव्हा सतयुग आहे,तर ज्ञानाचा वारसा आहे.तेथे भक्ती नसते.भक्ती तर द्वापर पासून सुरू होते,जेव्हा देवता पासून मनुष्य बनतात.मनुष्यांना विकारी तर देवतांना निर्विकारी म्हटले जाते. देवतांच्या सृष्टीला पवित्र दुनिया म्हटले जाते.आता तुम्ही देवता बनत आहात.ज्ञान कशाला म्हटले जाते? एक तर स्वतःची ओळख,बाबांची ओळख आणि सृष्टीच्या आदी मध्य अंतला जाणने, यालाच ज्ञान म्हटले जाते.ज्ञनाद्वारे सद्गती होते.परत भक्ती सुरू होती,तर उतरती कला म्हटले जाते,कारण भक्तीला रात्र आणि ज्ञानाला दिवस म्हटले जाते. हे तर कोणाच्या पण बुद्धीमध्ये बसू शकते परंतु दैवी गुणांची धारण करत नाहीत.दैवी गुण असतील तर समजले जाईल,ज्ञानाची धारणा होते.ज्ञानाची धारण करणाऱ्यांची चलन देवता सारखी होते.कमी धारणा करण्यांची चलन मिक्स होते. धारणा होत नाही,तर मुलं नाहीत.मनुष्य शिवपित्याची किती निंदा करतात.ब्राह्मण कुळाचे येतात,तर अपशब्द वापरणे,निंदा करणे बंद होते. तुम्हाला ज्ञान मिळत आहे, त्यावरती विचार सागर मंथन केल्यामुळे अमृत निघते.विचार सागर मंथन करत नाहीत,तर बाकी काय मंथन होईल,आसुरी विचार.त्याद्वारे कचराच निघेल.आता तुम्ही ईश्वरीय विद्यार्थी आहात.तुम्ही जाणतात,मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण घेत आहोत.देवता हे शिक्षण शिकवणार नाहीत. देवतांना कधी ज्ञानाचे सागर म्हटले जात नाही.ज्ञानाचे सागर तर एकालाच म्हटले जाते.दैवी गुण पण ज्ञानाद्वारेच धारण होतात.हे ज्ञान मुलांना मिळत आहे.ते सतयुगा मध्ये नसते.या देवतांमध्ये दैवी गुण आहेत.तुम्ही महिमा पण करतात, सर्वगुणसंपन्न,तर आत्ता तुम्हाला असे बनायचे आहे.स्वतःला विचारायचे आहे,माझ्यामध्ये सर्व दैवी गुण आहेत,की कोणते आसुरी गुण आहेत.जर आसुरी गुण आहेत,तर त्यांना काढून टाकायला पाहिजे,तेव्हाच देवता बनाल,नाही तर कमी दर्जा मिळेल.

आता तुम्ही मुलं दैवी गुण धारण करतात, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकवतात.यालाच पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते.जेव्हा तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात,तर वातावरण पण खूप चांगले असायला हवे.मुखाद्वारे कोणत्या छी-छी गोष्टी निघायला नकोत,नाहीतर कमी दर्जा मिळेल. बोलचाल आणि वातावरणाद्वारे लगेच माहिती होते.तुमचा चेहरा नेहमी हर्षित राहायला पाहिजे, नाहीतर त्यांच्या मध्ये ज्ञान नाही,असे म्हटले जाईल.मुखाद्वारे नेहमी रत्न निघावेत. हे लक्ष्मीनारायण पहा, किती हर्षित आहेत,यांच्या आत्म्याने ज्ञान धारण केले होते.मुखाद्वारे नेहमी ज्ञानाचे रत्न निघतात.रत्न ऐकत ऐकत खूप खुशी होते.ज्ञान रत्न जे आता तुम्ही घेतात,परत हे सर्व हिरे जवाहर बनतात.नवरत्नांची माळ काही नसते.या ज्ञान रत्नाची माळ आहे. मनुष्य लोक परत त्यांना रत्न समजून अंगठी मध्ये घालतात.या ज्ञान रत्नाची माळ पुरुषोत्तम संगमयुगामध्ये च असते.हे रत्न तुम्हाला भविष्य २१ जन्मासाठी मालामाल बनवतात,याला कोणी लुटू शकत नाहीत.येथे तुम्ही हिरे जवाहर घातले, तर लगेच लुटून घेऊन जातील.तर स्वतःला खूप खूप समजदार बनवायचे आहे.आसुरी गुणांना काढून टाकायचे आहे.आसुरी गुणांनी चेहरा पण असाच होतो.क्रोधामध्ये लाल लाल तांब्या सारखा चेहरा होतो. काम विकार असणारे तर काळे बनतात.तर मुलांना प्रत्येक गोष्टींमध्ये विचार सागर मंथन करायला पाहिजे.हे राज योगाचे शिक्षण खूपच धन प्राप्त करणारे आहे. त्या शिक्षणाद्वारे थोडेच रत्न मिळतात. हे ज्ञान शिकून मोठे पद मिळू शकते,तर शिक्षण कामाला आले,ना की पैसा.हे शिक्षणच धन आहे.ते हद्दचे धन,परत हे बेहद्दचे धन आहे.दोन्ही शिक्षण आहेत. आता तुम्ही समजतात, बाबा आम्हाला शिकवून विश्वाचे मालक बनवतात.ते अल्पकाळाचे क्षणभंगुर शिक्षण,तर एक जन्मासाठी असते,परत दुसऱ्या जन्मांमध्ये सुरुवाती पासून शिकावे लागते.सतयुगामध्ये धन कमविण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता नसते.तेथे तर आत्ताच्या पुरुषार्थ द्वारे खूप धन मिळते.धन अविनाश बनते. देवतांच्या जवळ तर खूप धन राहते. परत जेव्हा भक्ती मार्ग म्हणजे रावण राज्यांमध्ये आले, तरीही किती धन होते,अनेक मंदिर बनवले.परत मुसलमानाने येऊन धन इत्यादी लुटले.खूप धनवान होते.आजच्या शिक्षणाद्वारे इतके धनवान कोणी बनू शकत नाहीत. तुम्ही आता जाणतात की, आम्ही खूप उच्च शिक्षण घेत आहोत, ज्याद्वारे असे श्रेष्ठ देवी-देवता बनता.तर शिक्षणाद्वारे मनुष्य काय काय बनतात,गरिबांपासून सावकार.आता भारत खूप गरीब आहे,सावकारांना तर वेळच नाही. त्यांना तर आपलाच अहंकार राहतो, मी अमका आहे,तमका आहे.यामध्ये अहंकार नष्ट व्हायला पाहिजे.आम्ही आत्मा आहोत. आत्म्याच्या जवळ धन-दौलत इत्यादी काहीच नसते.बाबा म्हणतात,देहाचे सर्व संबंध सोडा.आत्मा शरीर सोडते तर,सावकारी इत्यादी सर्व नष्ट होते. जेव्हा परत शिकाल,परत धन कमवाल किंवा दान पुण्य चांगले केले,तर सावकाराच्या घरी जन्म मिळतो.असे म्हणतात हे पूर्वजन्मातील कर्माचे फळ आहे. ज्ञानाचे दान केले असेल,तर कॉलेज धर्मशाळा इत्यादी बनवले असेल, तर त्याचे फळ मिळते परंतु तेही अल्पकाळासाठी मिळते.हे दान पुण्य पण येथे केले जाते.सतयुगा मध्ये केले जात नाही.सतयुगामध्ये चांगले कर्मच होतात,कारण आत्ताचा वारसा मिळाला आहे.तेथे कोणाचेही विकर्म होत नाही, कारण रावण राज्यच नसते.गरीबाचे पण विकर्म बनत नाहीत.येथे तर सावकाराचे पण विकर्म बनतात, तेव्हा तर आजारी पण, दु:ख इत्यादी होत राहते.सतयुगा मध्ये विकारांमध्ये जात च नाहीत,तर विकर्म कसे होतील.सर्व कर्मावर आधारित आहे.हे रावणाचे राज्य आहे,ज्यामुळे मनुष्य विकारी बनतात.बाबा येऊन निर्विकारी बनवण्यासाठी शिकवतात.बाबा निर्विकारी बनवतात,परत माया विकारी बनवते.रामवंशी आणि रावणवंशीचे युद्ध चालते.तुम्ही रामाची मुलं आहात,ते रावणाची मुलं आहेत.खूप चांगली चांगली मुलं पण माया पासून हार खातात.माया खूप प्रबळ आहे. तरीही आशा ठेवतात.आधम पेक्षा आधमचा पण पण उद्धार करावा लागतो ना.बाबांना तर संपूर्ण विश्वाचा उध्दार करायचा असतो. अनेक जण विकारात जातात. एकदम चट खात्यांमध्ये,अधम ते अधम बनतात.अशांचा पण बाबांना उद्धार करावा लागतो.अधम तर सर्व रावण राज्यांमध्ये आहेत परंतु बाबा वाचवतात.तरीही विकारात जातात,तर खूप अधम बनतात. त्यांची परत इतकी प्रगती होत नाही.तो अधमपना मनामध्ये खात राहतो.जसे तुम्ही म्हणतात अंत काळात जे स्त्रीची आठवण करतात,त्यांच्या बुद्धी मध्ये तोच अधमपणा येत राहतो.तर बाबा मुलांना समजवतात, कल्प-कल्प तुम्हीच देवता बनतात.जनावरं बनतील का?मनुष्यच बनतात आणि समजतात.या लक्ष्मीनारायणला पण कान,नाक इत्यादी आहेत,कारण मनुष्य आहेत ना परंतु दैवी गुणांचे असल्यामुळे यांना देवता म्हटले जाते. हे इतके सुंदर देवता कसे बनले,परत कसे विकारात जातात, याचक्राला तुम्हा मुलांनी समजले आहे. जे विचार सागर मंथन करत असतील त्यांना ज्ञानाची धारणा पण चांगली होईल.विचार सागर मंथन च करत नाहीत तर बुध्दू बनतात. मुरली चालवणाऱ्यांचा विचार सागर मंथन चालत राहील.या विषयावरती हे समजावयाचे आहे.आपोआप विचार सागर मंथन चालतो.अमके येणार आहेत,त्यांना पण आनंदाने समजावतील.होऊ शकते,थोडे फार समजतील.सर्व भाग्यावर अवलंबून आहे.कोणी लगेच निश्चय करतील, कोणी करणार नाहीत.आशा ठेवली जाते.आशा ठेवणे म्हणजे सेवेची आवड असणे.थकायचे नाही.जरी कोणी शिकून परत अधम बनले,ते आले तर त्यांना स्वत्रंत रूम मध्ये बसवायचे,असे म्हणतील का, चालले जावा.जरूर विचारतील की, इतके दिवस का आले नाही?ते म्हणतील माया द्वारे हार खाल्ली.असे अनेक जण येतात. समजतात ज्ञान तर खूप चांगले होते परंतु माया ने हरवले.स्मृती तर राहते ना.भक्तीमध्ये तर हारणे आणि जिंकण्याची गोष्टच नसते.येथे ज्ञान धारण करायचे आहे.आता तुम्ही बाबा द्वारा खरी गीता ऐकत आहात ज्याद्वारे देवता बनतात.ब्राह्मण बनल्या शिवाय देवता बनू शकत नाहीत.ख्रिश्चन,पारसी, मुसलमानांमध्ये ब्राह्मण नसतात.या सर्व गोष्टी तुम्ही आत्ताच समजतात.

तुम्ही जाणतात अल्लाहाची आठवण करायची आहे,आठवण केल्यामुळेच बादशाही मिळते. जेव्हा पण तुम्हाला कोणी भेटले तर तुम्ही सांगा,अल्फ अल्लाहाची आठवण करा.अल्फलाच उच्च म्हटले जाते. बोटाने अल्फ काही इशारा करतात.अल्फला एक पण म्हटले जाते.एकच भगवान आहेत.बाकी सर्व मुलं आहेत.बाबा तर नेहमी अल्फच राहतात. बादशाही करत नाहीत.ज्ञान पण देतात,आपला मुलगा बनवतात,तर मुलांना खूप खुशी मध्ये राहायला पाहिजे.बाबा आमची खूप सेवा करतात.आम्हाला विश्वाचे मालक बनवतात,परत स्वतः त्या नवीन पवित्र दुनिया मध्ये येत नाहीत.पावन दुनिया मध्ये त्यांना कोणी बोलावत नाहीत.पतित दुनिया मध्ये पतितच बोलवतात. पावन दुनिया मध्ये येऊन काय करतील? त्यांचे नावच आहे पतित-पावन.तर जुन्या दुनियेला नवीन बनवणे त्यांचे कर्तव्य आहे. बाबांचे नाव शिव आहे आणि शाळीग्राम मुलांना म्हटले जाते. त्यांची पूजा होते,शिवबाबा म्हणून सर्व आठवण करतात.दुसरे म्हणजे ब्रह्मालापण बाबा म्हणतात. प्रजापिता ब्रह्मा तर अनेक जण म्हणतात,परंतु त्यांना अर्थ सहित जाणत नाहीत.ब्रह्मा कोणाचा मुलगा आहे? तुम्ही म्हणाल परमपिता परमात्मा शिवाने त्यांना दत्तक घेतले आहे.हे तर शरीरधारी आहेत ना.ईश्वराचे सर्व आत्मे संतान आहेत. सर्व आत्म्यांना आप आपले शरीर आहे.आपली भूमिका मिळाली आहे,जी वठवयाची आहे. हे परंपरा द्वारे चालत येते.अनादी म्हणजे त्याचा आदी मध्य अंत नाही.मनुष्य असे ऐकतात की,सृष्टीचा अंत होतो,तर परत संभ्रमित होतात,परत कशी बनेल? बाबा समजवतात ही तर अनादी आहे.कधी बनेल हा प्रश्नच नाही. प्रलय होत नाही,या पण थापा मारल्या आहेत.नवीन सृष्टीमध्ये थोडेच मनुष्य राहतात म्हणून म्हणतात की प्रलय झाला.बाबा मध्ये जे ज्ञान आहे,ते आता स्पष्ट होत आहे.शिवपित्या साठीच म्हणतात की संपूर्ण समुद्राची शाई बनवा तरीही पूर्ण होणार नाही अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेम पूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आपल्या हर्षित मुख चेहऱ्या द्वारे,बाबांचे नाव प्रसिद्ध करायचे आहे.ज्ञान रत्न ऐकायचे आहेत आणि ऐकावयाचे आहेत. गळ्यामध्ये ज्ञान रत्नाची मला असावी.आसुरी गुणांना काढून टाकायचे आहे.

(२) सेवेमध्ये कधी थकायचे नाही. आशावादी बनून सेवा करायची आहे.विचार सागर मंथन करून आनंदात राहायचे आहे.

वरदान:-
स्नेहाच्या मोबदल्यांमध्ये समानतेचा अनुभव करणारे सर्व शक्तिसंपन्न भव.

जे मुलं बाबाच्या स्नेहा मध्ये नेहमी सामावलेले राहतात,त्यांना स्नेहाच्या प्रतिसादांमध्ये बाप समान बनण्याचे वरदान प्राप्त होते.जे नेहमी स्नेहयुक्त आणि योगयुक्त आहेत,ते सर्व शक्तीद्वारे संपन्न स्वतःच बनतात.सर्वशक्ती नेहमी सोबत आहेत,तर विजय झालेलाच आहे. ज्यांना स्मृती राहते की, सर्वशक्तिमान बाबा आमचे साथी आहेत,ते कधी कोणत्या गोष्टी द्वारे विचलित होऊ शकत नाहीत.

बोधवाक्य:-
जीवनामध्ये जे नेहमी संतुष्ट खुश राहणारे आहेत,तेच खुषनसीब आहेत.