13-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , शांती पाहिजे तर अशरीरी बना , या देहाच्या भाना मध्ये आल्या मुळेच अशांती होते म्हणून आपल्या स्वधर्मा मध्ये स्थिर राहा "

प्रश्न:-
यर्थात आठवण काय आहे? आठवण करताना कोणत्या गोष्टीचे विशेष लक्ष पाहिजे?

उत्तर:-
स्वतःला या देहापासून वेगळी आत्मा समजून,बाबांची आठवण करणे हीच यथार्थ आठवण आहे.कोणताही देह आठवणीत यायला नको.हे लक्ष जरूर ठेवायचे आहे.आठवणी मध्ये राहण्यासाठी ज्ञानाच्या नशा चढलेला हवा.बुद्धीमध्ये राहावे,बाबा आम्हाला सार्या विश्वाचे मालक बनवत आहेत.आम्ही सर्व समुद्र,सर्व धरते चे मालक बनत आहोत.

गीत:-
बाबा तुम्हाला प्राप्त केल्यानंतर सर्व काही मिळाले

ओम शांती।
ओम चा अर्थच आहे अहम, मी आत्मा आहे.मनुष्य परत समजतात ओम म्हणजे भगवान परंतु तसे नाही.ओम म्हणजे मी आत्मा,माझे हे शरीर आहे.ओम शांती म्हणतात.अहंम आत्म्याचा स्वधर्म शांत आहे.आत्मा आपला परिचय देते. मनुष्य जरी ओम शांती म्हणतात परंतु त्याचा अर्थ कोणीही समजत नाहीत.ओम शांती अक्षर खूपच चांगले आहे.आपण आत्मा आहोत,आपला स्वधर्म शांत आहे. आम्ही आत्मा शांतीधाम ची राहणारी आहे. खूपच सहज अर्थ आहे,लांबलचक गपोडा नाही.यावेळेस मनुष्यमात्र हे पण जाणत नाहीत की,आत्ता जुनी दुनिया आहे की नवीन दुनिया आहे.नवीन दुनिया परत जुनी कधी होते,जुनी परत नवीन कधी होते,हे कोणीही जाणत नाहीत.कोणालाही विचारले दुनिया नवीन कधी होते आणि परत जुनी कशी होते,तर कोणीच सांगू शकणार नाहीत.आता तर कलियुगी जुनी दुनिया आहे.नवीन दूनिया सतयुगा ला म्हटले जाते.अच्छा,नवीन ला जुनी होण्यामध्ये किती वर्षे लागतात,ते पण कोणी जाणत नाहीत.मनुष्य होऊन हे जाणत नाहीत म्हणून त्यांना जनावरां पेक्षा ही खराब म्हटले जाते.जनावरं तर स्वतःला काहीच म्हणत नाहीत,मनुष्य म्हणतात आम्ही पतित आहोत,हे पतितपावन या, परंतु त्यांना काहीच जाणत नाहीत.पावन शब्द खूपच चांगला आहे.पावन दुनिया स्वर्ग,नवीन दुनिया चा असेल.देवतांचे चित्र पण आहेत परंतु कोणीही समजत नाहीत, लक्ष्मी-नारायण नवीन पावन दुनियेचे मालक आहेत.या सर्व गोष्टी बेहदचे बाबाच सन्मुख समजतात.नवीन दुनियेला स्वर्ग म्हटले जाते.देवताला स्वर्गवासी म्हणाल. आता तर जुनी दुनिया आहे.येथे कोणी मरतात तर म्हणतात,स्वर्गवासी झाले म्हणजे येथील मनुष्य नर्कवासी आहेत ना. हे बरोबर म्हणतात.बरोबर हा नर्क झाला परंतु तुम्ही नर्कवासी आहात,असे म्हटले तर मनुष्य बिघडतात.बाबा समजवतात तसे पाहण्यात तर मनुष्य आहेत,चेहरा मनुष्याचा आहे परंतु चलन माकडा सारखी आहे.हे पण गायन करतात ना,स्वतः पण मंदिरां मध्ये जाऊन देवतांच्या पुढे गायन करतात,तुम्ही सर्व गुण संपन्न,संपूर्ण निर्विकारी.स्वतःसाठी काय म्हणतात, आम्ही पापी आहोत,परंतु तुम्ही कोणाला विकारी म्हटले तर बिघडतात,म्हणून बाबा फक्त मुलांशीच गोष्टी करतात,त्यांनाच समजावतात.दुसऱ्याशी गोष्टी करत नाहीत, कारण कलयुगी मनुष्य आहेत ना.आता तर तुम्ही संगमवासी आहात.तुम्ही पवित्र बनत आहात.तुम्ही जाणता,आम्हा ब्राह्मणाला शिवबाबा शिकवत आहेत,ते पतित-पावन आहेत.आम्हा सर्व मुलांना घेऊन जाण्यासाठी बाबा आले आहेत.किती सोप्या गोष्टी आहेत.बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही शांतीधाम वरून येथे भूमिका करण्यासाठी येतात.या दुःखधाम मध्ये सर्व दुःखी आहेत,त्यामुळे म्हणतात मनाला शांती कशी मिळेल?असे म्हणत नाहीत आत्म्याला शांती कशी मिळेल?अरे तुम्ही म्हणतात ना ओमशांती.माझा स्वधर्म शांत आहे,परत शांती का मागतात? स्वतःला आत्मा विसरून देह अभिमानामध्ये येतात. आत्मे तर शांतीधाम चे राहणारे आहेत. येथे परत शांती कशी मिळेल.अशरीरी झाल्या मुळेच शांती होईल.शरीराच्या सोबत आत्मा आहे,तर त्याला बोलावे, चालावे,जरूर लागते ना.आम्ही आत्मा शांतीधाम वरून येथे भूमिका वठवण्यासाठी आलो आहोत.हे कोणी पण जाणत नाहीत की,रावणच आपला दुश्मन आहे.केव्हापासून हा रावण दुश्मन बनला आहे,हे कोणी पण जाणत नाहीत.मोठमोठे विद्वान पंडित इत्यादी एक पण जाणत नाहीत कि,रावण कोण आहे? याचा पुतळा बनवून जाळतात,जन्म जन्मांतर जाळता आले,काहीच माहिती नाही.कोणालाही विचारा रावण कोण आहे,तर असे म्हणतात,या सर्व कल्पना आहेत.ते जाणतच नाहीत,तर काय प्रतिसाद देतील? ग्रंथांमध्ये पण असे लिहिले आहे ना, हे रामजी संसार बनलाच नाही.ही सर्व कल्पना आहे,असे अनेक म्हणतात.आता कल्पना चा अर्थ काय आहे?ही संकल्पाची दुनिया आहे,असे म्हणतात.जे जसा विचार करतात तसे होते,अर्थ समजत नाहीत. बाबा सम्मुख मुलांना समजवतात, काहीजण चांगल्या रीतीने समजतात,काही समजत पण नाहीत.चांगल्या रीतीने समजतात त्यांना सख्खे मुलं म्हणाल आणि जे समजत नाही ते सावत्र झाले.आता सावत्र वारस थोडेच बनतील.बाबांच्या जवळ सख्ये आणि सावत्र दोन्ही आहेत. सख्ये तर बाबाच्या श्रीमतावर पूर्णपणे चालतात,सावत्र चालत नाहीत.बाबा म्हणतात हे माझ्या मतावर चालत नाहीत म्हणजेच रावणाच्या मतावर आहेत.राम आणि रावण दोन अक्षर आहेत.राम राज्य आणि रावण-राज्य.आता संगम आहे.बाबा समजतात हे सर्व ब्रह्माकुमार ब्रहाकुमारी, शिवबाबा कडून वारसा घेत आहेत, आपणही वारसा घ्या,श्रीमता वर चालणार?तर म्हणतात कोणती मत?बाबा श्रीमत देतात पवित्र बना.असे म्हणतात आम्ही पवित्र राहिलो,पतीने मानले नाही, तर मी कोणाचे ऐकू?पती तर आमचे परमेश्वर आहेत.कारण भारतामध्ये हे शिकवले जाते,पती तुमचा गुरु ईश्वर इत्यादी सर्व काय आहे,परंतु असे कोणी समजत नाहीत.त्या वेळेत होय म्हणतात, मानत काहीच नाहीत.परत गुरूंच्या जवळ मंदिर इत्यादी ठिकाणी जात राहतात.ते म्हणतात तुम्ही बाहेर जाऊ नका,मी रामाची मूर्ती तुम्हाला घरी आणून देतो.परत तुम्ही आयोध्या इ. ठिकाणी का भटकतात.तर मानत नाही.हे भक्तिमार्गाचे धक्के आहेत. ते जरूर खातील,कधी मानणार नाहीत.असे समजतात ते तर त्यांचे मंदिर आहे.अरे तुम्हाला आठवण रामाची करायची आहे,की मंदिराची,परंतु समजत नाहीत.तर बाबा समजवतात भक्ती मार्गामध्ये म्हणतात,हे भगवान येऊन आमची सद्गती करा,कारण ते एकच सर्वांचे सद्गती दाता आहेत.अच्छा ते कधी येतात, हे पण कोणी जाणत नाहीत.

बाबा समजवतात रावण तुमचा दुश्मन आहे. रावणाचे तर आश्चर्य आहे,दर वर्षी जाळत येतात परंतु मरत नाही.रावण काय गोष्ट आहे,हे कोणीही जाणत नाहीत.आता तुम्ही मुलं जाणता आम्हाला बेहदच्या बाबा कडुन वारसा मिळत आहे.शिवजयंती पण साजरी करतात परंतु शिवाला कोणीही जाणत नाहीत.शासनाला पण तुम्ही समजून सांगता शकता.शिव तर भगवान आहेत, तेच कल्प कल्प येऊन भारताला नर्कवासी पासून स्वर्गवासी,गरिबा पासून राजकुमार बनवतात.पतीतांना पावन बनवतात.ते सर्वांचे सदगती दाता आहेत.या वेळेत सर्व मनुष्य मात्र येथेच आहेत.येशू ख्रिस्ताची आत्मा पण कोणत्या न कोणत्या जन्मात येथे असेल.परत कोणीही जाऊ शकत नाहीत.या सर्वांची सद्गती करणारे एकच मोठे पिता आहेत.ते भारता मध्येच येतात.वास्तव मध्ये भक्ती पण त्यांचीच करायला पाहिजे,जे सद्गती देतात.ते निराकार पिता येथे तर नाहीत,त्यांना नेहमी वरती समजून आठवण करतात.कृष्णाला वरती परमधाम मध्ये समजत नाहीत,बाकी सर्वांना खालीच आठवण करतात.कृष्णा ला पण येथेच आठवण करतात.तुम्हा मुलांची यथार्थ आठवण आहे.तुम्ही स्वतःला देहा पेक्षा वेगळे आत्मा समजून बाबांची आठवण करतात.बाबा म्हणतात तुम्हाला कोणत्याही देहाची आठवण करायची नाही.हे लक्ष जरूर ठेवायचे आहे,तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा.बाबा आम्हाला मालक बनवतात.सर्व समुद्र,सर्व धरती,सर्व आकाशाचे मालक बनवतात. आता तर अनेक तुकडेआहेत.एकाच्या हद्दीमध्ये दुसऱ्यांना येऊ देत नाहीत.स्वर्गा मध्ये अशा गोष्टी नसतात.भगवान तर एकच पिता आहेत.असे नाही की सर्व पिता आहेत.असे पण म्हणतात हिंदू चिनी भाऊ भाऊ,हिंदू-मुस्लीम भाऊ भाऊ परंतु अर्थ काहीच समजत नाहीत.असे कधी म्हणत नाहीत हिंदू-मुस्लीम बहिण भाऊ,नाही. आत्मे आप आपसा मध्ये सर्व भाऊ भाऊ आहेत परंतु या गोष्टीला जाणत नाहीत. ग्रंथ इत्यादी ऐकत सत्य वचन,सत्य वचन करत राहतात,अर्थ काहीच जाणत नाहीत. वास्तव मध्ये असत्य आहे,सर्व खोटे आहे. सत्य खंडा मध्ये तर सत्यच बोलतात.येथे तर खोटेच खोटे आहे.कोणाला विचारले तुम्ही तर खोटे बोलतात,तर बिघडतात. तुम्ही सत्य सांगतात तर,काहीजण शिव्या पण द्यायला लागतात.आता तुम्ही ब्राह्मणंच बाबांना जाणतात.तुम्ही मुलं आता दैवी गुण धारण करतात.तुम्ही जाणतात पाच तत्व पण तमोप्रधान आहेत.आजकाल मनुष्य भुतांची पूजा करतात.भुतांची आठवण राहते.बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून माझीच आठवण करा,भुतांची आठवण करू नका.गृहस्थ व्यवहारांमध्ये राहत बुद्धीचा योग बाबांच्या सोबत लावा.आत्ता देही अभिमानी बनायचे आहे,जितकी बाबांची आठवण कराल,तेवढे विकर्म विनाश होतील.ज्ञानाचा तिसरा नेत्र तुम्हाला मिळाला आहे.

आत्ता तुम्हाला विकर्माजीत बनवायचे आहे.ते विकर्माजीत संवत आहे,हे विकर्मी संवत आहे.तुम्हाला योग बळा द्वारे विकर्मा वरती विजय मिळवता.भारताचा योग तर प्रसिद्ध आहे,मनुष्य जाणत नाहीत. संन्यासी लोक तर परदेशात जाऊन म्हणतात,आम्ही भारताचा प्राचीन योग शिकवण्यासाठी आलो आहोत.त्यांना माहीतच नाही की,हे हटयोगी आहेत,राजयोग शिकवू शकत नाहीत. तुम्ही राजषऋषी आहात.ते हदचे सन्याशी आहेत.तुम्ही बेहदचे सन्यासी आहात. रात्रंदिवसा चा फरक आहे.तुम्हा ब्राह्मणां शिवाय कोणीही राजयोग शिकवू शकत नाही.या नवीन गोष्टी आहेत,नवीन कोणीही समजू शकत नाहीत,म्हणून नवीन मनुष्यांना परवानगी दिली जात नाही.ही इंद्रसभा आहे ना.यावेळेस सर्व दगड बुद्धी आहेत.सत्ययुगा मध्ये तुम्ही पारस बुध्दी बणतात.आता संगम युग आहे. दगडा पासून परीस बाबां शिवाय कोणी बनवू शकत नाही.तुम्ही येथे पारस बुद्धी बनण्यासाठी आले आहात.बरोबर भारत सोन्याची चिमणी होता.हे लक्ष्मी नारायन विश्वाचे मालक होते ना.हे कधी राज्य करत होते,हे कुणालाच माहिती नाही. आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी लक्ष्मी-नारायण चे राज्य होते,परत हे कोठे गेले? तुम्ही सांगू शकता यांनी 84 जन्म भोगले आहेत.आता तर तमोप्रधान आहेत, परत बाबा द्वारे सतोप्रधान बनत आहेत. ततत्वम,म्हणजे तुम्ही पण असेच बनत आहात.हे ज्ञान बाबां शिवाय कोणीही साधुसंत इत्यादी देऊ शकत नाहीत.तो भक्तिमार्ग आहे,हा ज्ञान मार्ग आहे.तुम्हा मुलां जवळ चांगले चांगले गीत आहेत,ते ऐका,तर तुमच्या अंगावर शहारे येतील. आनंदाचा पारा एकदम चढेल,परत तो नशा पण कायम स्वरूपी राहिला पाहिजे.हे ज्ञानामृत आहे.ते मनुष्य दारू पितात तर त्याचा नशा चढतो,येथे ज्ञानामृत आहे. तुमचा आत्मिक नशा उतरायला नाही पाहिजे,नेहमीच चढलेला पाहिजे.तुम्ही या लक्ष्मी-नारायण ला पाहतात तर खूप आनंद होतो.तुम्ही जाणता श्रीमता द्वारे आम्ही परत श्रेष्ठ चारित्रवान बनत आहोत.येथे पाहून सुद्धा बुद्धी,बाबा आणि वारशा सोबत लावायची आहे.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मात पिता, बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
 

वरदान:-
संपूर्णतेच्या प्रकाशा द्वारे अज्ञानाचा पडदा हटवणारे सर्चलाईट भव.

आता प्रत्यक्षते ची वेळ जवळ येत आहे, म्हणून अंतर्मुखी बणुन अनेक रहस्य युक्त अनुभवाच्या रत्ना द्वारे स्वतःला भरपूर करा.असे सर्च लाईट (प्रखर ज्योत) बना,ज्यामुळे तुमच्या संपूर्णते च्या प्रकाशा द्वारे अज्ञानाचा पडदा नष्ट होईल,कारण तुम्ही धरतीचे तारे,या विश्वाला हलचल पासून वाचवून सुखी संसार,स्वर्णिम संसार बनवणारे आहात.तुम्ही पुरुषोत्तम आत्मे विश्वाला सुख शांतीचे श्वास देण्याच्या निमित्त आहात.

बोधवाक्य:-
माया आणि प्रकृतीच्या आकर्षणा पासून दूर राहा,तर नेहमी आनंदीत रहाल.