13-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, नावाडी आले आहेत तुमची नाव किनाऱ्याला लावण्यासाठी,तुम्ही बाबांशी खरे होऊन रहा,तर नाव हालेल,डुलेल परंतु बुडणार नाही"

प्रश्न:-
बाबाची आठवण मुलांना यथार्थ न राहण्याचे मुख्य कारण कोणते आहे?

उत्तर:-
साकारी दुनिये मध्ये येत विसरले की आम्ही अआत्मा निराकारी आहोत आणि आमचे पिता पण निराकार आहेत. साकार असल्यामुळे साकार ची आठवण सहज येते.देही अभिमानी बणुन स्वतःला आत्मा बिंदू समजून बाबाची आठवण करणे यामध्येच कष्ट आहेत.

ओम शांती।
शिव भगवानुवाच,यांचे नाव तर शिव नाही ना.यांचे नाव ब्रह्मा आणि यांच्याद्वारे शिवभगवान ज्ञानाच्या गोष्टी करतात.हे तर अनेक वेळा समजावले आहे,कोणत्या ही मनुष्यांना,देवतांना किंवा सूक्ष्म वतनवासी ब्रह्मा विष्णू शंकराला भगवान म्हटले जाऊ शकत नाही.ज्यांना कोणतेही आकार किंवा साकारी चित्र आहे,त्यांना भगवान म्हणू शकत नाही.भगवान बेहदच्या पित्याला म्हटले जाते.भगवान कोण आहेत,हे कोणालाही माहिती नाही.आम्हाला माहित नाही,माहित नाही असे म्हणत राहतात. तुमच्यामध्ये पण खूप थोडे आहेत,जे चांगल्या प्रकारे जाणतात.आत्मा म्हणते हे भगवान.आता आत्मा तर बिंदी आहे,तर बाबा पण बिंदिच असतील ना.आता बाबा मुलांना सन्मुख समजवतात.बाबांच्या जवळ ३०-३५ वर्षाची मुलं पण आहेत,जे आम्ही आत्मा बिंदू आहोत,हे चांगल्या प्रकारे समजत नाहीत.कोणी तर चांगल्या प्रकारे समजतात,बाबांची आठवण करतात. बेहदचे बाबा खरे हिरा आहेत.हिऱ्याला खूपच चांगल्या डब्बी मध्ये ठेवले जाते.कोणाच्या जवळ चांगले हिरे असतात तर,त्याला दाखवण्यासाठी सोन्या-चांदीच्या डब्बी मध्ये घालून ठेवतात आणि परत दाखवतात.हिऱ्याला जौहरीच जाणू शकतात,दुसरे कोणी जाणू शकत नाहीत.खोटा हीरा दाखवला तरी त्याची परख कोणालाच नसते,असे खूप फसवले जाते.आता खरे बाबा आले आहेत,परंतु खोठे पण असे आहेत,जे मनुष्यांना काहीच माहिती होत नाही.गायन पण आहे सत्याची नाव हलेल डूलेल परंतु बुडणार नाही. खोट्याची नाव हालत नाही आणि खऱ्याच्या नावेला हालवण्या साठी किती प्रयत्न करतात.जे या नावे मध्ये बसले आहेत,ते पण हालवण्याचा प्रयत्न करतात. निंदकाचे गायन आहे ना.बाबा बागवान पण आहेत.बाबांनी समजावले आहे हे काट्याची जंगल आहे.सर्व पतित आहेत ना.अनेक जण खोटे आहेत.खऱ्या बाबांना थोडेच कोणी जाणतात? मुलां पैकी पण पूर्ण रीतीने जाणत नाहीत,कारण पूर्ण ओळख नाही,गुप्त आहेत ना.भगवंताची तर सर्व आठवण करतातच, हे पण जाणतात की ते निराकार आहेत,परमधाम मध्ये राहतात.आम्हीपण निराकर आत्मा आहोत,हे जाणत नाहीत.साकार मध्ये बसून हे विसरले आहेत.साकार मध्ये रहात साकार ची आठवण येते.तुम्ही मुल आत्ता देही अभिमानी बनतात.भगवंताला म्हटले जाते परमपिता परमात्मा,हे समजणे तर खूपच सहज आहे.परमपिता म्हणजे खुप दूर राहणारे,परमात्मा.तुम्हाला आत्मा म्हटले जाते.तुम्हाला परम म्हटले जात नाही.तुम्ही तर पुनर्जन्म घेत राहता ना.या गोष्टी कोणीच जाणत नाहीत.भगवंताला सर्वव्यापी म्हणतात,भक्त भगवंताला शोधण्यासाठी डोंगरावरती, तिर्थावरती,नदीच्या संगमावरती पण जातात.नदी पतीत पावनी समजुन नदीमध्ये स्नान केल्या मुळे,पावन बनू असे समजतात.भक्ती मार्गामध्ये कोणालाच माहिती होत नाही कि,आम्हाला काय पाहिजे? मुक्ती पाहिजे,मोक्ष पाहिजे,असे फक्त म्हणत राहतात,कारण येथे दु:खी झाल्यामुळे तंग होतात.सतयुगा मध्ये कोणी मोक्ष किंवा मुक्ती थोडेच मागतात.तेथे भगवंताला पण कोणी बोलवत नाहीत.येथे दुखी झाल्यामुळे बोलवतात.भक्ती मुळे कोणाचे दुःख दूर होऊ शकत नाही.जरी सर्व दिवस बसुन राम राम जप केला तरी दुःख दूर होऊ शकत नाही.हे रावणाचे राज्य आहे ना. दुःख तर गळ्याला बांधलेले आहे. दुःखामध्ये स्मरण सर्व करतात,सुखामध्ये कोणीही करत नाही,असे गायन करतात. याचा अर्थ जरुर सुख होते,आता दुःख आहे.सतयुगा मध्ये सुख होते,आता कलियुगात दुःख आहे,म्हणून याला काट्याचे जंगल म्हटले जाते.प्रथम देह अभिमानाचा विकार आहे,परत काम विकार आहे.

आता बाबा समजवतात,तुम्ही या डोळ्यांनी जे पण पाहता,ते सर्व विनाश होणार आहे.आता तुम्हाला शांतीधाम मध्ये जायचे आहे.स्वतःच्या घराला आणि राजधानीला आठवण करा.घराच्या आठवणी सोबतच बाबांची आठवण पण जरुरी आहे,कारण घर काही पतित-पावनी नाही.तुम्ही तर पतित पावन बाबांनाच म्हणतात,तर बाबांची आठवण करावी लागेल.ते म्हणतात माझीच आठवण करा. मलाच बोलवतात ना,बाबा येऊन पावन बनवा.ज्ञानाचे सागर आहेत,तर जरूर मुखाद्वारे येऊन समजावा लागेल.प्रेरणा तर करणार नाहीत.एकीकडे शिवजयंती पण साजरी करतात,दुसरीकडे म्हणतात नावां रूपापेक्षा वेगळा आहे.नावां रुपा पेक्षा वेगळी गोष्ट कोणती होत नाही.अनेक मतं आहेत.दगडा माती मध्ये सर्वां मध्ये ईश्वर आहे,असे म्हणतात,अनेक मतं आहेत.बाबा समजवतात तुम्हाला पाच विकार रुपी रावणाने एकदम तुच्छ बुद्धी बनवले आहे, म्हणून देवतांच्या पुढे जाऊन नमस्ते करतात.कोणी तर नास्तिक असतात, कोणाला ही मानत नाहीत.येथे बाबांच्या जवळ ब्राह्मणच येतात,ज्यांना पाच हजार वर्षापूर्वी समजवले होते.परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करतात,तर ब्रह्माचे संतान झाले ना,असे लिहिले आहे. प्रजापिता ब्रह्मा तर प्रसिद्ध आहेत,जरूर ब्राह्मण ब्राह्मणी पण असतील.तुम्ही आता शूद्र धर्मापासून निघुन ब्राह्मण धर्मामध्ये आले आहात.वास्तव मध्ये हिंदू म्हणणारे आपल्या खऱ्या धर्माला जाणत नाहीत, म्हणून कधी कुणाला मानतात,कधी कुणाला मानतात,अनेकांच्या जवळ जात राहतात.ख्रिश्चन लोक कधी दुसऱ्या,कोणा कडे जाणार नाहीत.आता तुम्ही स्पष्ट करून सांगू शकता,भगवान पिता म्हणतात माझी आठवण करा.एके दिवशी सर्व वर्तमानपत्र मध्ये पण येईल की,भगवान म्हणतात,माझी आठवण केल्यामुळे तुम्ही पतीता पासून पावन बनाल.जेव्हा विनाश जवळ येईल तेव्हा पेपर द्वारे पण हा आवाज सर्वांच्या काना वरती पडेल.पेपर मध्ये कुठून कुठून समाचार येतो.आता पण तुम्ही पेपर मध्ये देऊ शकतात,भगवान परमपिता परमात्मा शिव म्हणतात,मीच पतित पावन आहे,माझी आठवण करा. तुम्ही पावन बनाल.या पतित दुनिये चा विनाश समोर उभा आहे.विनाश तर जरूर होणार आहे,हा पण सर्वांना निश्चय होईल. रंगीत तालीम पण होत राहिल.तुम्ही मुलं जाणता,जोपर्यंत राजधानी स्थापन झाली नाही तोपर्यंत विनाश होत नाही.भूकंप इत्यादी पण होणार आहे ना,एकीकडे बॉम्स फुटतील,दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती पण होतील.अन्न धान्य मिळणार नाही,दुसऱ्या देशातून जहाजा द्वारे पण अन्न धान्य आणता येऊ शकणार नाही.दुष्काळ पडेल,भुकेने व्याकुळ होऊन मरुन जातील.भूक हडताळ करणारे तर, काहीना काही पाणी किंवा मध इत्यादी घेत राहतात,त्यांचे वजन कमी होत जाते .येथे तर बसल्या बसल्या अचानक भूकंप होईल,मरून जातील. विनाश जरूर होणार आहे.साधुसंत इत्यादी असे म्हणणार नाहीत की,विनाश होणार आहे म्हणून राम राम म्हणा.मनुष्य तर भगवंताला जाणतच नाहीत.भगवान स्वत:च,स्वतःला जाणतात,दुसरे कोणी जाणत नाहीत.ही वेळ त्यांच्या येण्याची आहे.जे परत या वृद्ध तना मध्ये येऊन साऱ्या सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान ऐकवतात.तुम्ही मुलं जाणता आता परत जायचे आहे,यामुळेच खुश व्हायला पाहिजे.आम्ही शांतीधाम जातो.मनुष्य शांतीची इच्छा ठेवतात परंतु शांती कोण देईल?शांती देवा,शांती देवा असे म्हणतात.आत्ता देवांचा देव तर एकच उच्च ते उच्च बाबाच आहेत.ते म्हणतात मी तुम्हा सर्वांना पावन बनवून घेऊन जाईल, एकाला पण सोडणार नाही.या बेहदच्या नाटका नुसार सर्वांना जायचेच आहे.मच्छारा सारखे सर्वच जातील,असे गायन पण आहे.सतयुगा मध्ये खूप थोडे मनुष्य असतात,कलियुगाच्या अंत मध्ये तर असंख्य मनुष्य आहेत,परत कमी कसे होतील?आता संगमयुग आहे,तुम्ही सतयुगा मध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. विनाश होऊन जाईल,मच्छरा सदृश्य आत्मे जातील.सर्व आत्म्यांचा समुह जाईल. सतयुगा मध्ये खूप कमी लोक असतात. . बाबा म्हणतात कोणत्याही देहधारीची आठवण करू नका,पाहून पण न पाहिल्यासारखे करा.आम्ही आत्मा आहोत,आम्ही आपल्या घरी जाऊ.खुशीने जुने शरीर सोडायचे आहे.आपल्या शांतीधाम ची आठवण करत राहाल तर अंत मती सो गती होईल.एका बाबांची आठवण करण्यामध्ये कष्ट आहेत. कष्टा शिवाय उच्चपद कसे मिळेल? बाबा येतातच तुम्हा मुलांना नरा पासून नारायण बनवण्यासाठी.आता या जुन्या दुनिया मध्ये काहीच आराम नाही,आराम तर शांतीधाम आणि सुखधाम मध्ये आहे.येथे तर घरा घरांमध्ये अशांती आहे,मारा-मारी आहे. बाबा म्हणतात,या खराब,छी छी दुनिया ला विसरा.गोड-गोड मुलांनो मी तुमच्यासाठी, स्वर्गाची स्थापना करण्यासाठी आलो आहे.या नर्का मध्ये तुम्ही पतित बनले आहात.आता स्वर्गा मध्ये जायचे आहे. आता बाबा आणि स्वर्गाची आठवण करा तर अंत मती सो गती होईल.लग्न इत्यादीं मध्ये खुशाल जावा परंतु बाबांची आठवण करा.हे ज्ञान सर्व बुद्धीमध्ये राहायला पाहिजे.खुशाल घरामध्ये रहा,मुलांची सांभाळ करा परंतु बुद्धीमध्ये ठेवा,बाबांचा आदेश आहे माझी आठवण करा.घरदार सोडायचे नाही,नाहीतर मुलांची सांभाळ कोण करेल?भक्त लोक घरी राहतात,ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहतात,तरी पण भक्त म्हटले जाते,कारण भक्ती करत घरदार सांभाळतात.विकारांमध्ये जातात तरी गुरु लोक म्हणतात कृष्णाची आठवण करा,तर त्यांच्या सारखा मुलगा होईल. या गोष्टीमध्ये आता तुम्हा मुलांना जायचे नाही कारण तुम्हाला सतयुगा मध्ये जाण्याच्या गोष्टी ऐकवल्या जातात,ज्याची स्थापना होत आहे.वैकुंठाची स्थापना कृष्ण करत नाहीत,कृष्ण तर मालक बनतात ना.बाबा कडुन वारसा घेतला आहे.संगम च्या वेळेतच भगवान येतात.कृष्णाला भगवान म्हटले जात नाहीत,ते तर शिकणारे झाले ना.भक्तिमार्ग मध्ये बाबाच्या ऐवजी मुलाचे नाव लिहिले आहे.बाबांना विसरले आहेत तर गीतेचा पण खंडन झाले आहे, त्या खंडन झालेल्या गीताद्वारे काय होईल? बाबा तर राजयोग शिकवून गेले,त्याद्वारे कृष्ण सतयुगाचे मालक बनले.भक्ती मार्गा मध्ये सत्यनारायणाची कथा ऐकल्यामुळे कोणी स्वर्गाचे मालक बनले का? न कोणी या विचाराने ऐकतात,त्याद्वारे काहीच फायदा मिळत नाही.साधु संत इत्यादी आप आपले मंत्र देतात,फोटो देतात.येथे ही गोष्टच नाही.दुसऱ्या सत्संगामध्ये म्हणतात स्वामी ची कथा आहे.कोणाची कथा,वेदांची कथा,गिता कथा,भागवत कथा.आता तुम्ही मुलं जाणतात,आम्हाला शिकवणारे कोणी देहधारी नाहीत,न कोणते ग्रंथ इ. वाचलेले आहेत.शिवबाबांनी कोणते ग्रंथ वाचले आहेत का?मनुष्य अभ्यास करतात.शिवबाबा म्हणतात, मी काहीच वाचलेले नाही.हा रथ ज्यामध्ये मी बसलो आहे,त्यांनी वाचले आहेत,मी वाचलेले नाहीत.माझ्यामध्ये तर सर्व सृष्टीच्या चक्राचे आदी मध्य आणि अंतचे ज्ञान आहे.ब्रह्मा रोज गीत वाचत होते, पोपटा सारखे कंठ करत होते,तेव्हा बाबांनी प्रवेश केला,तर लगेच वाचण्याचे सोडून दिले,कारण बुद्धीमध्ये आले,हे तर शिवबाबा ऐकवत आहेत.

बाबा म्हणतात मी स्वर्गाची बादशाही देतो,जुन्या दुनिये पासून फक्त ममत्व नष्ट करा.फक्त माझीच आठवण करा,हे कष्ट घ्यायचे आहेत.खऱ्या खऱ्या सजनीला,साजनची नेहमी आठवण येत राहिल.तर आत्ता बाबांची आठवण पण अशी पक्की राहायला पाहिजे.पारलौकिक बाबा म्हणतात मुलांनो माझी आठवण करा आणि स्वर्गाच्या वारशा ची आठवण करा.यामध्ये काहीच आवाज करण्याची आवश्यकता नाही.हे गीत पण काही चांगले आहेत,जे वाजवले जातात,याचा अर्थ पण तुम्हीच समजतात.गीत बनवणारे स्वतः काहीच जाणत नाहीत.मीरा भक्त होती.तुम्ही तर आत्ता ज्ञानी आहात.मुलां द्वारे जेव्हा कोणते काम ठीक होत नाही,तर बाबा म्हणतात तुम्ही तर जसे भक्त आहात.तर ते समजतात कि बाबा आम्हाला असे का म्हणाले?बाबा म्हणतात, मुलांनो माझी आठवण करा,पैगंबर बना,संदेशी बना,सर्वांना संदेश द्या की, बाबा आणि वारशाची आठवण करा,तर जन्म जन्मांतरची पाप नष्ट होतील.आता परत घरी जाण्याची वेळ आहे.भगवान एकच निराकार आहेत त्यांना स्वतःचा देह नाही.बाबाच आपला परिचय देतात,मनमनाभव चा मंत्र देतात.साधू सन्याशी असे कधीच म्हणणार नाहीत,की आत्ता विनाश होणार आहे,पित्याची आठवण करा.बाबा ब्राह्मण मुलांनाच आठवण करुन देतात.आठवणी द्वारे आरोग्य,राजयोग अभ्यासा द्वारे संपत्ती मिळते.तुम्ही काळा वरती विजय मिळवत आहात.स्वर्गा मध्ये कधीच अकाले, अचानक मृत्यू होत नाही.देवतांनी काळा वरती विजय मिळवला आहे.

अच्छा गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्यांचा,आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) असे कोणतेच कर्म करायचे नाही,जे बाबा द्वारे भक्ताची पदवी मिळेल.संदेश वाहक बणून सर्वांना बाबा आणि वारशाची आठवण करण्याचा संदेश द्यायचा आहे.

(२) या जुन्या दुनिया मध्ये काहीच आराम नाही,या छी छी दुनियेला विसरायचे आहे. घराच्या आठवणी बरोबर,पावन बनण्यासाठी बाबांची पण आठवण जरूर करायची आहे.

वरदान:-
त्याग तपस्या आणि सेवाभावच्या विधीद्वारे नेहमी सफलता स्वरूप भव.

त्याग तपस्या च सफलतेचा आधार आहे. त्यागाची भावना असणारे खरे सेवाधारी बनू शकतात,त्यामुळे स्वतःच्या आणि दुसऱ्याचे भाग्य बनते.दृढ संकल्प करणे म्हणजेच तपस्या आहे.त्याग तपस्या आणि सेवा भावा द्वारे हदचे भाव समाप्त.संघठन शक्तिशाली बनते,एकाने म्हटले दुसऱ्याने केले,कधीच तू, मी, माझे,तुझे यायला नको, तर सफल बनू शकतात.

बोधवाक्य:-
संकल्पा द्वारे पण कोणालाच दुःख न देणे हीच संपूर्ण अहिंसा आहे.