13-05-2022      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलानो बाबांनी रुद्र ज्ञान यज्ञ रचलेला आहे- तुम्ही ब्राह्मण या यज्ञाची संभाळ करणारे आहात, म्हणून तुम्हाला पवित्र जरूर राहायचे आहे. "

प्रश्न:-
अंतिम समयी बाबा कोणत्या मुलांची सहायता करतात ?

उत्तर:-
जे चांगल्या पद्धतीने सेवा करतात, अंतकाळी जेव्हा, खूप संकटांचा सामना करावा लागेल, तेव्हा मदत मिळेल जरूर. जे बाबाचे मदतगार बनलेले आहेत बाबा त्यांना मदत करतील.

प्रश्न:-
आश्चर्यकारक चेहरा कोणाचा आहे? त्याची यादगार कोणत्या रूपामध्ये आहे?

उत्तर:-
शिवबाबा ज्यांना स्वतःचा चेहरा नाही, ते जेव्हा या चेहऱ्याचा आधार घेतात, तेव्हा हा चेहरा होतो आश्चर्यकारक, म्हणून तुम्ही मुले समोर चेहरा बघण्यासाठी येता. याची यादगार रुद्र माळे मध्ये चेहऱ्याच्या रूपाने दाखवतात.

गीत:-
कितना मिठा कितना प्यारा शिव भोला भगवान.

ओम शांती।
बेहदचे पिता म्हणतात, मी पाच हजार वर्षांनंतर मुलांचा चेहरा बघतो. बाबाला स्वतःचा तर चेहरा नाही. शिवबाबा पण जुन्या शरीराचा आधार घेतात. तेव्हा तुम्ही बाप दादा दोघांचा चेहरा बघता. तेव्हा म्हणतात बापदादा कडून प्रेमपुर्वक आठवण आणि प्रेम स्वीकार करा. रुद्रमाळ मुलांनी बघितलेली आहे, त्यामध्ये चेहरा दाखवतात. रुद्र माळ बनवली जाते, तेव्हा शिवबाबाचा पण असा चेहरा बघणार. हे कोणाला माहिती नाही की शिवबाबा येऊन शरीराचा आधार घेतात. शिवबाबा या ब्रह्मा मुखातून बोलतात, तर हा त्यांचा चेहरा झाला ना. यावेळी एकदाच बाबा येऊन मुलांचा चेहरा बघतात. मुले जाणतात शिव बाबांनी हा चेहरा उधार घेतलेला आहे. अशा बाबाला आपले घर भाड्याने देण्यामध्ये किती फायदा होतो. प्रथम यांचे कान ऐकतात. जरी तुम्ही पटकन ऐकत असला, तरी सर्वात जवळ यांचे कान आहेत. तुमची आत्मा तर दूरवर बसलेली आहे. आत्मा कानाद्वारे ऐकेल, तर थोडा फरक तर पडणार ना. तुम्ही मुले येथे येता समोर चेहरा बघण्यासाठी. हा आहे आश्चर्यकारक चेहरा. शिवरात्री साजरी करतात तर जरूर शिवबाबा जे निराकार आहेत, ते येथे येऊन प्रवेश करतात. तर त्यांचा पण हा भारत देश झाला ना. भारत आहे अविनाशी परमपिता परमात्म्याची जन्मभूमी. परंतु यांचा जन्म इतर मनुष्याप्रमाणे (सदृश्य) नाही. स्वतः म्हणतात मी येऊन यांच्यामध्ये प्रवेश करतो, आणि पुन्हा मुलांना ज्ञान ऐकवतो. इतर सर्व आत्म्यांना तर स्वतःचे शरीर आहे. मला स्वतःचे शरीर नाही. शिवाला नेहमी लिंग रूपामध्ये दाखवतात. रुद्र यज्ञ जेव्हा रचतात तेव्हा मातीचे गोल गोल लिंग बनवतात. शालिग्राम छोटे छोटे बनवतात. शिवलिंग मोठे बनवतात. वास्तव मध्ये लहान-मोठे काही नाही फक्त बघण्यासाठी, दाखवण्यासाठी, की तो पिता आहे, ती मुले आहेत. पूजा पण दोघांची वेगवेगळी करतात. समजतात पण तो शिव आहे, ते शाळीग्राम आहेत. असे कधी म्हणत नाहीत की, सर्व शिवच शिव आहेत. नाही शिवलिंग मोठे बनवतात, आणि शाळीग्राम छोटे छोटे बनवतात. ही सर्व मुले त्यांच्याबरोबर दाख़वतात. बाबांनी समजवलेले आहे, की या शाळीग्रामांची पूजा का करतात ? कारण तुम्ही सर्व आत्मा आहात ना. तुम्ही या शरीराद्वारे भारताला श्रेष्टाचारी बनवत आहात. शिवबाबांची श्रीमत शाळीग्राम घेत आहेत. हा पण ज्ञान यज्ञ रचलेला आहे, रुद्र शिवबाबांचा. शिवबाबा बोलतात, शाळीग्राम पण बोलतात. ही अमरकथा, सत्यनारायणाची कथा आहे. मनुष्याला नरापासून नारायण बनवतात. सर्वात श्रेष्ठ पूजा त्यांची झाली ना. आत्मा काही खूप मोठी नाही. अगदी बिंदी प्रमाणे. तिच्या मध्ये किती ज्ञान आहे, किती भूमिका नोंद झालेली आहे. एवढी छोटीशी आत्मा म्हणते मी शरीरामध्ये प्रवेश करून भूमिका करते. शरीर किती मोठे आहे. शरीरामध्ये आत्म्याने प्रवेश केल्याने छोट्या पणापासूनच भूमिका करायला लागते. अनादि अविनाशी भूमिका मिळालेली आहे. शरीर तर जड आहे. त्यामध्ये जेव्हा चैतन्य आत्मा प्रवेश करते, त्यानंतर गर्भामध्ये सजा खावी लागते. सजा पण कशी खाते. भिन्नभिन्न शरीर धारण करून ज्यांना ज्यांना दुःख दिलेले आहे त्याचा साक्षात्कार केला जातो. दंड मिळत जातो. त्राही त्राही करतात. म्हणून गर्भजेल म्हटले जाते. नाटक किती चांगले बनलेले आहे. किती भूमिका करतात. आत्मा वायदा करते की मी कधी पाप नाही करणार. एवढ्या छोट्या आत्म्याला किती अविनाशी भूमिका मिळालेली आहे. ८४ जन्मांची भूमिका करून पुन्हा पुनरावृत्त करते. आश्चर्य आहे ना. हे बाबा समजावतात. मुले पण समजतात की, हे अर्थसहित आहे. एवढ्या छोट्या बिंदी मध्ये किती भूमिका आहे. आत्म्याचा कित्येकांना साक्षात्कार पण होतो. गातात पण आत्मा ताऱ्याप्रमाणे आहे, जी दोन भुवयांच्या मध्ये राहते. किती भूमिका करते. याला म्हणतात कुदरत. तुम्ही तर जाणता आम्ही आत्मा एक शरीर सोडून दुसरा घेतो. किती भूमिका करतो. आम्हाला बाबा येऊन समजवतात. किती श्रेष्ठ ज्ञान आहे. जगामध्ये कोणालाही हे ज्ञान नाही. हे पण मनुष्यच होते ना, यांच्यामध्ये आत्ता बाबांनी प्रवेश केलेला आहे. असं नाही की गुरु गोसाईचा चेला झाला, त्याच्याकडून रिद्धी-सिद्धी शिकले. काही जण समजतात की गुरुचे वरदान किंवा गुरूकडून शक्ती मिळालेली आहे. या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत. समोर ऐकण्याने तुम्हाला खूप मजा येते. तुम्ही जाणता आम्हाला बाबा सन्मुख समजावत आहेत. बाबा पण किती छोटा आहे, जशी आम्ही आत्मा छोटी आहे. त्यांना म्हटले जाते परमपिता परमात्मा. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. सर्वाच्या परे ते परे परमधाम मध्ये राहणारे. परे ते परे तुम्ही मुले पण राहता. बाबा किती गुह्य गोष्टी ऐकवतात. सुरुवातीला तर थोडेच ऐकवत होते. दिवसेंदिवस तुम्हा मुलांना किती गुह्य ज्ञान मिळत आहे. कोण देतात? श्रेष्ठ ते श्रेष्ठ भगवान. ते म्हणतात हे मुलांनो- आत्मा कशी अवयवांच्या द्वारे बोलते. म्हणतात पण भुवयांच्या मध्ये आत्मा चमकते. हे फक्त बोलण्यापुरतेच, कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. कोणामध्ये हे ज्ञान नाही, जे समजावतील. तुमच्यामध्ये पण हे खूप कमी समजतात. जे समजतात ते चांगल्या रीतीने धारण करतात, आणि इतरांच्या कडे वर्णन ही करतात. परमपिता परमात्मा म्हणतात तर पित्याकडून जरूर वारसा मिळायला पाहिजे ना, स्वर्गाचे मालक होण्याचा. जरूर त्यांना बाबा कडून स्वर्गाचा वारसा मिळाला असणार. वारसा कोठे दिला? काय सतयुगामध्ये दिला ? जरूर पाठीमागचे कर्म आहेत. आता तुम्ही कर्मांच्या थेरीला समजता. तुम्हाला बाबा असे कर्म शिकवतात, ज्यामुळे तुम्ही असे बनता. जेव्हा तुम्ही ब्रह्मा मुख्य वंशावली बनता, तेव्हा शिवबाबा ब्रह्मा मुखाच्या द्वारे तुम्हाला ज्ञान ऐकवतात. किती रात्रं दिवसाचा फरक आहे. किती घोर अंधकार पसरलेला आहे. कोणीही बाबाला ओळखत नाहीत. ज्यांच्या कडून प्रकाश मिळतो. म्हणतात आम्ही कलाकार, भूमिका करण्यासाठी या कर्मक्षेत्रा वर आलेलो आहे. परंतु आम्ही कोण आहे, आमचा बाबा कोण आहे- हे काही माहित नाही. सृष्टिचक्र कसे फिरते. काही जाणत नाहीत. गायन पण आहे, अहिल्या, कुब्जा, गणिका ज्या आहेत त्यांना येऊन शिकवतात. प्रदर्शनीमध्ये खूप मोठ मोठी लोकं येतात, परंतु त्यांच्या नशिबामध्ये नाही. बाबा आहेत गरीब निवाज. शंभरातून मुश्किल मध्ये एखादा साहुकार निघतो. तरी ही श्रेष्ठ पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ एखादाच करतो. तुम्ही आहात गरीब. मातां जवळ पैसे थोडेच असतात. कन्याजवळ कोठून येणार. ती तर हाप पार्टनर आहे. कन्येला तर काही मिळत नाही. ती तिकडे जाते तेव्हा हाप पार्टनर, अर्धांगिनी बनते. वारसा घेऊ शकत नाही. मुले तर पुर्ण मालक असतात. तर अशा कन्यानांच बाबा प्रथम आपले बनवतात. एक तर शिकण्याचे ब्रह्मचारी जीवन आहे, गरीब आहे, पवित्र आहे, त्यांची पूजा होते. आहेत सर्व या वेळेच्या गोष्टी. यावेळी तुम्ही जे काही करता त्याची पुन्हा पूजा होते. शिवजयंती शिवाय कृष्ण जयंती होऊ शकत नाही. तुम्ही जाणता शिवजयंती पुन्हा कृष्णाची, रामाची जयंती. शिवजयंतीने जगत अंबा, जगत पित्याचा जन्म होतो. तर जरुर जगताचा वारसा मिळणार. संपूर्ण जगाचे तुम्ही मालक बनता. जगत माता आहे जगाची मालकीण. जगत अंबाचे खूप मेळे लागतात. ब्रह्माची एवढी पूजा होत नाही. बाबा मातांना पुढे ठेवतात. शिवशक्ती मातांना सर्वांनी ठोकर मारली आहे, खास करून पतीनी. हा तर पतींचा पती आहे. कन्यांना समजावतात, या जगत अंबाच्या मुली जगत अंबाच झाल्या ना. या मुली पण आई सारखे कार्य करीत आहेत. मम्मा प्रमाणे तुम्ही पण त्रिकालदर्शी आहात. स्त्री पुरुष दोघे ही. प्रवृत्ती मार्ग आहे ना. बहुमत मातांचे आहे. त्यांचेच नाव प्रसिद्ध आहे. ब्रह्मा यांचे नाव एवढे प्रसिद्ध नाही. सारसिद्ध ब्राम्हण ब्रह्माचे पूजन करतात. ब्राह्मण दोन प्रकारचे आहेत - सारसिद्ध आणि पुष्करनी. शास्त्र ऐकवणारे वेगळे असतात. या सर्व गोष्टी बाबा आत्ता सांगतात. हे चक्र कसे फिरते, कसा मी येतो, वचन तर आहे ना मी पुन्हा पाच हजार वर्षानंतर येऊन ज्ञान ऐकवणार. गीत पण आहे ना. जे भूतकाळात होऊन जाते त्याचे पुन्हा भक्ती मार्गामध्ये गायन केले जाते. हे तर अनादि, पूर्वनियोजित नाटक आहे. कधी बंद होत नाही. न याचा काही आदी, मध्य, अंत आहे. चालतच राहते. बाबा येऊन समजवतात, हे नाटक कसे चालते. ८४ जन्म तुम्हालाच घ्यावे लागतात. तुम्हीच ब्राह्मण, देवता, क्षत्रिय इत्यादी वर्णांमध्ये येता. शिवबाबा आणि ब्राह्मण दोघांना विसरलेले आहेत. ब्रम्हा द्वारे तुम्ही ब्राह्मण बनता. ब्राह्मणच यज्ञाची सांभाळ करतात. पतीत तर यज्ञाची सांभाळ करू शकत नाहीत. यज्ञ जेव्हा रचतात तेव्हा विकारांमध्ये जात नाहीत. यात्रेच्या वेळी पण विकारांमध्ये जात नाहीत. तुम्ही आहात आत्मिक यात्रेमध्ये. तेव्हा विकारांमध्ये जाऊ शकत नाही. नाहीतर विघ्न पडतील. तुमची आहे ही आत्मिक यात्रा. बाबा म्हणतात मी येतो, तुम्हा मुलांना घेऊन जाण्यासाठी. मच्छर सदृश्य घेऊन जातो. जेथे आम्ही आत्मा राहतो. ते आहे परमधाम. येथे आत्मा निवास करतात. पुन्हा आम्ही येतो देवता क्षत्रिय, वैश्य, शुद्ध बनतो. आता पुन्हा ब्राह्मण बनलो आहोत. जो ब्राम्हण बनेल तो स्वर्गामध्ये येईल. तेथे पण झोक्यामध्ये झोके घेता ना. तेथे तर तुम्ही रत्नजडित झोक्यामध्ये झोके घेणार. श्रीकृष्णाचा पाळणा किती चांगला सजवतात. त्यांच्या बद्दल सर्वांना प्रेम आहे. गातात ना भजो राधे गोविंद, चलो वृंदावन . . आता तुम्ही प्रत्यक्षात तेथे जाण्यासाठी तयार होत आहात. जाणता आमची मनोकामना पूर्ण होत आहे. तुम्ही ईश्‍वरीय घरामध्ये जाता. तुम्ही जाणता बाबा सर्वांना कसे घेऊन जातात, लोण्यतून केस काढल्यासारखे. बाबा तुम्हाला कोणताही त्रास देत नाहीत. कसे सहजपणे बादशाही देतात. बाबा म्हणतात जेथे जायचे आहे त्या आपल्या कृष्णपुरीची आठवण करा. प्रथम जरूर बाबा तुम्हाला घरी घेऊन जातील. तेथून पुन्हा स्वर्गामध्ये पाठवतील. आता तुम्ही श्रीकृष्ण पुरी मध्ये जात आहात, शांतीधाम मार्गे, जसे दिल्ली मार्गे जातात ना. आता तुम्ही समजता आम्ही परत जात आहोत, पुन्हा येणार कृष्णपुरी मध्ये. आम्ही श्रीमतावर चालत आहोत तर बाबाची आठवण करायची आहे, पवित्र बनायचे आहे. यात्रेमध्ये नेहमी पवित्र राहतात. शिक्षण घेतानाही ब्रह्मचारी मध्येच शिक्षण घेतात. पवित्रता जरूर पाहिजे. बाबा तरीही मुलांच्या कडून पुरुषार्थ करून घेतात . या वेळेचा पुरुषार्थ कल्प कल्पाचा बनतो. पुरुषार्थ तर करायला पाहिजे ना. ही खूप मोठी शाळा आहे तर जरूर शिकले पाहिजे. भगवान स्वतः शिकवतात. एक दिवस पण चुकवायचा नाही. खूप खूप अमुल्य शिक्षण आहे हे. बाबा पण कधी चुकवत नाहीत. येथे तुम्ही मुले समोर खजान्यांनी झोळी भरून घेवू शकता. जेवढे शिकाल तेवढा नशा चढेल. बंधन नाही तर थांबू शकता. परंतु माया अशी आहे जी बंधनामध्ये बांधते. खूप आहेत ज्यांना सुट्टी पण मिळते. बाबा म्हणतात पूर्ण ताजेतवाने व्हा. बाहेर गेल्यामुळे पुन्हा तो नशा राहात नाही. काहींना फक्त मुरली वाचून ही नशा चढतो. खूप संकटे येणार आहेत. मदत त्यांना मिळेल जे मदतगार बनतील. चांगल्या रीतीने सेवा करतील, त्यांना अंत मध्ये मदत पण मिळते. अच्छा

गोड -गोड खुप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बाप दादांची स्नेह पूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) शिक्षण खूप अमूल्य आहे. स्वयं भगवान शिकवतात यामुळे एक दिवस पण चुकवायचा नाही. ज्ञान खजान्यांनी रोज झोळी भरायची आहे .

२)ही शिक्षण घेण्याची वेळ आहे, आत्मिक यात्रेमध्ये आहात. रुद्र यज्ञाची सांभाळ पण करायची आहे. म्हणून पवित्र जरूर राहायचे आहे. कोणत्याही विकाराच्या वश होऊन विघ्न घालायचे नाही.

वरदान:-
भाग्यविधाता बाबाद्वारे मिळालेल्या भाग्याला इतरांना वाटणारे आणि वाढवणारे खुशनसीब भव .

सर्वात मोठे नसिब, हे आहे की भाग्यविधाता बाबांनी आपले बनवले आहे. दुनियावी तडपत आहेत की, भगवंताची एक सेकंद तरी आमच्या वर नजर पडावी म्हणून . आणि तुम्ही त्यांच्या डोळ्यांमध्ये सामावलेले आहात. याला म्हटले जाते खुशनसीबी. भाग्य आपला वारसा आहे. संपूर्ण कल्पा मध्ये असे भाग्य आत्ताच मिळते, तर भाग्याला वाढवत जा. भाग्य वाढवण्याचे साधन आहे वाटणे. जेवढे इतरांना द्याल अर्थात भाग्यवान बनवाल तेवढे भाग्य वाढत जाईल

बोधवाक्य:-
निर्विघ्न आणि एक रस स्थितीचा अनुभव करायचा असेल तर एकाग्रतेचा अभ्यास वाढवा.