13-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड गोड मुलांनो तत्वां सहित सर्व मनुष्य मात्रांना बदलणारे विद्यापीठ केवळ एकच आहे. येथूनच सर्वांची सद्गती होते".

प्रश्न:-
बाबा मध्ये निश्चय झाल्यानंतर कोणता विचार लगेच आचरणात आणला पाहिजे?

उत्तर:-
जेव्हा निश्चय झाला की, बाबा आलेले आहेत. तर बाबांची पहिली पहिली श्रीमत आहे की या डोळ्यांनी जे काही बघता, ते विसरा. एक माझ्या मतावर चला. या विचाराला लगेच आचरणात आणले पाहिजे. तुम्ही बेहदच्या बाबांची मुले बनले आहात, तर पतित व्यक्तींबरोबर तुमची देवाणघेवाण होता कामा नये. निश्चय बुद्धी मुलांना कधी कोणत्या गोष्टी मध्ये संशय येत नाही.

ओम शांती।
हे घराचे घर पण आहे आणि विद्यापीठ पण आहे. यालाच ईश्वरीय पित्याचे विद्यापीठ म्हटले जाते. कारण संपूर्ण दुनियेच्या मनुष्य मात्रांची सद्गती येथून होते.हे खरे विश्व विद्यापीठ आहे, घराचे घर पण आहे. मात-पित्याच्या सन्मुख बसलेलो आहोत. तरी हे विद्यापीठ आहे .अध्यात्मिक पिता बसलेले आहेत. हे आत्मिक ज्ञान आहे, जे आत्मिक पित्याद्वारा मिळते .अध्यात्मिक ज्ञान अध्यात्मिक पित्या शिवाय इतर कोणीही मनुष्य देऊ शकत नाहीत. त्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते. आणि ज्ञानानेच सद्गती होते, म्हणून ज्ञानसागर, सर्वांचे सदगती दाता एक बाबाच आहेत. बाबांच्या द्वारे संपूर्ण सृष्टीतील मनुष्यच काय, परंतु प्रत्येक वस्तू, पाच तत्वे पण सतोप्रधान बनून जातात. सर्वांची सदगती होते. ह्या समजण्याच्या गोष्टी आहेत. आता सर्वांची सद्गती होणार आहे. जुनी दुनिया आणि नवीन दुनियेमध्ये राहणार्यांमध्ये परिवर्तन होणार आहे. जे काही येथे बघता ते सर्व बदलून नवीन होणार आहे. गायन पण आहे, येथे आहे खोटी माया, खोटी काया. हा खंड खोटा बनून जातो. भारत सत्य खंड होता. आता खोटा खंड आहे. रचनेच्या बाबतीत जे मनुष्य म्हणतात, ते खोटेच आहे. आता तुम्ही बाबा द्वारा जाणता, भगवानुवाच. भगवान पिता असुन ते निराकार आहेत . मुळातच सर्व आत्मे निराकार आहेत. पुन्हा येथे साकार रूप घेतात. तेथे आकार नाही. आत्मा मुलवतन किंवा ब्रम्हतत्व मध्ये निवास करते.आम्हा आत्म्यांचे घर ब्रह्म तत्व आहे .हे आकाश तत्व आहे. येथे साकारी भूमिका चालते. जगाचा इतिहास भूगोल पुनरावृत्त होत असतो. याचा अर्थ पण समजत नाही. म्हणतात पुनरावृत्ती होते, सुवर्ण, चांदीचे युगाची, पुन्हा काय ? पुन्हा सुवर्ण युग जरूर येणार. संगमयुग एकच असते. सतयुग, त्रेता किंवा त्रेता आणि द्वापरच्या संगमला संगमयुग म्हटले जात नाही,ते चुकीचे होते. बाबा म्हणतात मी कल्प कल्प, कल्पाच्या संगम युगा वर येतो. मला बोलतात तेव्हा, जेव्हा सर्वजण पतित बनतात. असे म्हणतात तुम्ही पावन बनवणारे या आणि आम्हाला पावन बनवा.सतयुगामध्ये पावन असता, आत्ता आहे संगम. याला कल्याणकारी संगमयुग म्हटले जाते. आत्मा आणि परमात्माच्या मिलनला पण संगम म्हटले जाते. ते पुन्हा दाखवतात नद्यांचा संगम. दोन नद्या आहेत, तिसरी गुप्त नदी म्हणतात . ते पण खोटे. गुप्त नदी कोणती असू शकते काय ? मानणार नाहीत. एखादी गुप्त नदी पण असू शकते. बाण मारला गंगेचा उगम झाला,सर्व खोटे आहे. गायन पण आहे, ज्ञान, भक्ती, वैराग्य. हे अक्षर म्हणतात परंतु अर्थ समजत नाहीत. प्रथम आहे ज्ञान दिवस सुख,परत आहे भक्ती रात्र, दुःख. ब्रह्माचा दिवस ब्रह्माची रात्र. आता एकाची तर असणार नाहीत ना,खूप असतील. दिवस असतो अर्ध्या कल्पाचा,पुन्हा रात्र पण अर्ध्या कल्पाची होते . पुन्हा होतो संपूर्ण दुनियेचा वैराग.

बाबा म्हणतात देह सहित जे काही तुम्ही या डोळ्यांनी बघता त्याला ज्ञानाच्या आधारे विसरायचे आहे. धंदा व्यवसाय सर्वकाही करायचे आहे. मुलांना सांभाळायचे आहे. परंतु बुद्धीचा संबंध एकाशी लावायचा आहे . अर्धा कल्प तुम्ही रावणाच्या मतावर चालता. आता बाबाचे बनले आहात, तर जे काही कराल ते बाबाच्या मतानुसार करा. तुमची देवाण-घेवाण एवढ्या वेळेपासून पतित व्यक्ती सोबत आहे . त्याचा परिणाम काय झाला ? दिवसेंदिवस तुम्ही पतितच बनत गेले . कारण भक्तिमार्ग आहेच उतरत्या कलेचा (पतनाचा) मार्ग. सतोप्रधान, सतो,रजो, तमो मध्ये यावेच लागते. पतन होणे जरुरी आहे. याच्यातून कोणी सुटका होऊ शकत नाही. लक्ष्मीनारायणाचे पण 84 जन्म सांगितलेले आहेत. इंग्रजी अक्षरे खूप चांगली आहेत. सुवर्णयुग, चांदीचे युग,लोहयुग. अशी भेसळ होत जाते . यावेळी लोहयुग म्हणजे लोखंड तुल्य बनला आहात. सुवर्ण युगामध्ये नवीन दुनिया होती. नवीन भारत होता . कालचीच गोष्ट आहे. परंतु शास्त्रांमध्ये लाखो वर्ष लिहिलेले आहे. बाबा म्हणतात तुमचे ग्रंथ बरोबर आहेत का मी बरोबर आहे ? बाबाला म्हटले जाते सर्वशक्तिमान अधिकारी. वेदशास्त्र खूप वाचतात, त्यांना अँथोरिटी,अधिकारी म्हटले जाते. बाबा म्हणतात ही सर्व भक्तीमार्गाचे अधिकारी. ज्ञानासाठी तर माझे गायन करतात,तुम्ही ज्ञानाचे सागर आहात ,आम्ही नाही . मनुष्य सर्वजण भक्तीच्या समुद्रामध्ये बुडालेले आहेत. सतयुगा मध्ये कोणी विकारांमध्ये जात नाही. कलियुगामध्ये तर मनुष्य आदि- मध्य- अंतु दुःखी राहतो. बाबांनी कल्पा पुर्वी ही असे समजवलेले होते. आता पुन्हा समजावत आहेत. मुले समजतात कल्पा पूर्वी ही बाबा कडून वरसा घेतला होता. आता पुन्हा शिकून घेत आहोत. वेळ खूप थोडा आहे . हे तर विनाश होऊन जाईल, म्हणून बाबा कडून पूर्ण वरसा घेतला पाहिजे. ते बाप, शिक्षक आणि गुरु पण आहेत. सर्वोच्च पिता,सर्वोच्च शिक्षक पण आहेत. जगाचा इतिहास भूगोल कसा पुनरावृत्त होतो याचे संपूर्ण ज्ञान देतात . हे इतर कोणी समजावू शकत नाहीत. आता मुले समजतात पाच हजार वर्षापूर्वी प्रमाणे, हे तेच गीतेचे भगवान आहेत, श्रीकृष्ण नाही. मनुष्याला भगवान म्हटले जात नाही. भगवान तर पुनर्जन्म रहित आहेत. त्यांचा दिव्य जन्म म्हटला जातो. नाहीतर मी निराकार कसे बोलणार. मला तर जरूर येऊन पावन बनवावे लागते . तर युक्ती पण सांगावी लागेल. तुम्ही जाणता आम्ही आत्मा अमर आहोत. रावण राज्यांमध्ये तुम्ही सर्व देह अभिमानी बनलेला आहात . सतयुगामध्ये देही अभिमानी, आत्म अभिमानी होता. बाकी परमात्मा रचना आणि त्यांच्या रचनेला तेथे कोणीही जाणत नाही. तिथे पण माहिती झाले की, पुन्हा आम्हाला असेच उतरायचे आहे, पुन्हा आमचे असेच पतन होणार आहे,तर राजाईची खुशी पण राहणार नाही,म्हणून बाबा म्हणतात हे ज्ञान तेथे प्राया लोप, होऊन जाते. जेव्हा तुमची प्रगती होते , पुन्हा ज्ञानाची आवश्यकता लागत नाही. ज्ञानाची गरजच दुर्गति मध्ये पडते. यावेळेला सर्वजण दुर्गति मध्ये आहेत. सर्वजण काम चितेवर बसून जळून मेलेले आहेत. बाबा म्हणतात माझी मुले, आत्मा शरीर द्वारा भूमिका करतात, ते काम चितेवर बसून तमोप्रधान बनलेली आहेत. असे म्हणतात पण की आम्ही पतित बनलेले आहोत. पतीत बनतातच काम चितेवर बसून. क्रोध किंवा लोभाने पतित बनत नाहीत. साधुसंत इत्यादी पावन आहेत. देवता पण पावन आहेत. म्हणून तर पतित मनुष्य जाऊन त्यांच्या पाया पडतात. गायन पण आहे तुम्ही निर्विकारी, आम्ही विकारी आहोत. निरविकारी दुनिया, विकारी दुनिया गायन पण आहे ना .भारत निर्विकारी होता .आता विकारी आहे. भारता बरोबर संपूर्ण जगच पतित झालेले आहे. जगामध्ये आज पासून पाच हजार वर्षापूर्वी एक धर्म होता. पवित्रता होती. शांती आणि सम्रुद्धी पण होती. पवित्रता आहे प्रथम. आत्ता पवित्रता नाही तर शांती आणि समृद्धी ही नाही.

ज्ञानाचे सागर, सुखाचे सागर, प्रेमाचे सागर एक बाबाच आहेत. तुम्हाला पण असे प्रिय बनवतात. या लक्ष्मीनारायणाच्या राजधानी मध्ये सर्वजण प्रिय आहेत. मनुष्यमात्र, पशु, सर्वजण प्रिय आहेत. वाघ, शेळी एकत्रित पाणी पितात. हा एक दृष्टांत आहे. तेथे अशी कोणती वस्तू नाही जेणे करून डास किंवा आजार पसरतील. तेथे अशा वस्तू असत नाहीत. श्रीमंत लोकांच्या कडे फर्निचर पण फर्स्टक्लास,खुप चांगले असते. गरिबांचे फर्निचर पण साधारण असते. भारत आता गरीब, अस्वच्छ झालेला आहे. सतयुगामध्ये किती स्वच्छता राहते. सोन्याचे महल किती फर्स्टक्लास असतात. स्वर्गा मध्ये गाई पण बघा किती फर्स्टक्लास होत्या. कृष्णाजवळ किती चांगल्या चांगल्या गाई दाखवतात . कृष्णपुरीमध्ये गायी तर असणार ना? तेथे वस्तू किती फर्स्टक्लास असतात. स्वर्गच आहे तो . ह्या जुन्या दुनियेमध्ये तर खुपच घाण आहे. हे सर्व ज्ञान यज्ञामध्ये स्वाहा होऊन जाणार आहे. किती तऱ्हेचे बॉब्स् बनवतात. बॉम्ब फेकले तर अग्नी बाहेर पडतो. हल्ली तर असे जिवाणू पण घालतात. असा विनाश करतात. बेहद मध्ये नष्ट होऊन जाते. दवाखाने वगैरे तर राहणार नाहीत. ज्यामुळे औषधाने काम होईल. बाबा म्हणतात मुलांना कोणताही त्रास होता कामा नये, म्हणून गायन केलेले आहे. नैसर्गिक आपत्ती, मुसळधार पाऊसाची. मुलांनी विनाशाचा साक्षात्कार पण केलेला आहे .बुद्धी पण म्हणते विनाश जरूर होणार आहे. काही जण म्हणतील विनाशाचा साक्षात्कार झाल्यावर आम्ही खरे मानू. माना किंवा नाही, तुमची मर्जी. कोणी म्हणतील, आम्हाला आत्म्याचा साक्षात्कार करा तेव्हा आम्ही मानू. बरे मानू नका तुमची मर्जी. आत्मा बिंदी आहे . बघितलं तर काय होणार ? यामुळे सदगती होईल ? असे म्हणतात परमात्मा अखंड ज्योती स्वरूप, हजारो सूर्यापेक्षा तेजोमय आहे. परंतु असे नाही. गीते मध्ये लिहिलेले आहे. अर्जुन ने म्हटले "बस करा मी सहन करू शकत नाही" ,वास्तव मध्ये तसे नाही. पित्याला मुले पाहतील आणि म्हणतील आम्ही सहन करू शकत नाही . असे तर काहीच नाही. जशी आत्मा आहे तसेच परमपिता परमात्मा पिता आहेत. फक्त ते ज्ञानाचे सागर आहेत. तुमच्यामध्ये पण ज्ञान आहे. बाबाच येवून शिकवतात. इतर कुठलीही गोष्ट नाही, जो ज्या भावनेने आठवण करतो, ती भावना पूर्ण करतात. हे पण नाटकांमध्ये नोंद आहे. बाकी भगवान कोणालाही मिळू शकत नाहीत. मीरा साक्षात्कारा- मध्ये किती खुश होती. दुसऱ्या जन्मामध्ये भक्तीन बनली असेल. स्वर्गात तर जाऊ शकत नाही. आता तुम्ही मुले स्वर्गामध्ये जाण्याची तयारी करत आहात. जाणता आम्ही वैकुंठ कृष्णपुरीचे मालक बनत आहोत. येथे तर सर्वजण नरकाचे मालक आहेत. इतिहास भूगोल पुनरावृत्त होतो ना. मुले जाणतात आम्ही आपले राज्य भाग्य पुन्हा घेत आहोत . हे आहे राजयोगचे बळ. बाहुबलाची लढाई तर अनेक वेळा, अनेक जन्म चाललेली आहे. योग बलाने तुमची चढती कला होते,तुम्ही समजता बरोबर स्वर्गाची राजधानी स्थापन होत आहे . ज्यांनी ज्यांनी पूर्वीप्रमाणे पुरूषार्थ केला होता तसाच करतील . तुमचा हार्टफेल होता कामा नये . जे पक्के निश्चयबुद्धी आहेत त्यांना कधी संशय येऊ शकत नाही. संशय बुद्धी पण जरूर असतात . बाबाने म्हटलेले आहे, आश्चर्यचकीत होऊन ऐकतात , इतरांना सांगतात, आणि शेवटी पलायन करतात . खरच माया तू यांच्यावर विजय प्राप्त करतेस. लिहितात बाबा लग्न करून तोंड काळे केले. काम कटारी मुळे आम्ही हार खाल्ली. आता तर तुमच्या समोर येण्या लायक पण राहिलेलो नाही. पुन्हा लिहितात बाबा तुमच्या समोर येऊ ? बाबा लिहितात काळे तोंड केले आहे, तर येथे येऊ शकत नाही . येथे येऊन काय करणार ? तेथे राहून पुरुषार्थ करा. एक वेळा पडला तो पडला. असेच नाही राजाई पद मिळत . म्हटले जाते चढती कला कराल तर वैकुंठरस मिळेल. पुरुषार्थामध्ये खाली पडाल तर हाडे एकदम चकनाचूर होतील . पाचव्या मजल्यावरून पडल्या सारखे. तरी काही जणच खरे सांगतात. काही तर सांगत पण नाहीत. इंद्रप्रस्थ मधील परींचे उदाहरण आहे ना. ह्या सर्व ज्ञानाच्या गोष्टी आहेत. या सभेमध्ये कोणीही पतिताला बसण्याची परवानगी नाही. परंतु काही वेळेला बसवावे लागते. पतित तर येणार ना. आता तर पाहा,अनेक द्रोपदी बोलवतात, म्हणतात बाबा आम्हाला वाचवा. बंधनात असणार्यांची पण भूमिका चालते. कामेशु, क्रोधेशु असतात ना. खूप चिडचिड होते, बाबा जवळ बातम्या येतात. बेहदचे बाबा म्हणतात हे मुलांनो यावर विजय प्राप्त करा. आता पवित्र राहून माझी आठवण करा, तर गॅरंटी आहे, तुम्ही विश्वाचे मालक बनणार .वृत्तपत्रांमध्ये स्वतः घालतात, स्वतः लिहितात, की कोणी प्रेरक शक्ती आहे जी आम्हाला हे बॉम्बस इ. बनवायला प्रेरीत करते. त्यामुळे स्वतःच्याच कुळाचा नाश होतो. परंतु काय करणार ? नाटकांमध्ये नोंद आहे .दिवसेंदिवस बनवत जातात . वेळ तर खूप नाही ना .

अच्छा गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बाप दादाची स्नेह पूर्वक आठवण, आणि सू प्रभात . आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्कार.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. सतयुगी प्रिय राजधानीमध्ये जाण्यासाठी स्वतःला खूप चांगले बनवायचे आहे. राजाई पदासाठी पावन जरूर बनायचे आहे . पवित्रता आहे प्रथम . म्हणून काम महा शत्रूवर विजय प्राप्त करायचे आहे .

2. या पुरानी दुनियेमध्ये बेहदचे वैरागी बनण्यासाठी या डोळ्यांनी देह सहित जे काही बघता त्याला बघून ही न बघितल्यासारखे करायचे आहे. प्रत्येक पाऊलावर बाबा कडून श्नीमत घेऊन चालायचे आहे

वरदान:-
समस्येला चढत्या कलेचे साधन अनुभव करून सदा संतुष्ट राहणारे शक्तिशाली बना.

जी शक्तिशाली आत्मा आहेत त्या समस्येला असे पार करतात, जसे कोणी सरळ रस्ता सहज पार करतो. समस्या त्यांच्यासाठी चढत्या कलेचे साधन बनून जाते. प्रत्येक समस्या ओळखीची आहे असा अनुभव करते. ते कधीही आश्चर्यचकित होत नाहीत. परंतु सदैव संतुष्ट राहतात. तोंडातून कधी कारण शब्द निघत नाही, परंतु त्यावेळी कारणाला निवारणा मध्ये बदलतात.

बोधवाक्य:-
स्व स्थितीमध्ये स्थित राहून सर्व परिस्थितींना पार करून करणे हीच श्रेष्ठता आहे.