13-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बाबा आले आहेत तुम्हाला परमधाम घराचा रस्ता दाखवण्यासाठी,तुम्ही आत्म अभिमानी बणून राहा,तर हा रस्ता सहज दिसून येईल"

प्रश्न:-
संगमयुगा मध्ये कोणते असे ज्ञान मिळाले आहे,ज्याद्वारे सतयुगी देवतांना मोहजीत म्हणतात?

उत्तर:-
संगमयुगा मध्ये तुम्हाला बाबांनी अमर कथा ऐकवून,अमर आत्म्याचे ज्ञान दिले आहे.हे अविनाशी पूर्वनियोजित नाटक आहे,प्रत्येक आत्मा आपापली भूमिका वठवते.ते एक शरीर सोडून दुसरे घेतात,यामध्ये रडण्याची आवश्यकता नाही.या ज्ञानाद्वारे सतयुगी देवतांना मोहजीत म्हटले जाते.तेथे मृत्यूचे नाव नाही. आनंदाने जुने शरीर सोडून नवीन घेतात.

गीत:-
नयन हिन को राह दिखाओ प्रभू..( हे प्रभू अज्ञानी मनुष्यांना रस्ता दाखवा)

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलां प्रती आत्मिक पिता म्हणतात,रस्ता तर दाखवतो परंतु प्रथम स्वतःला आत्मा निश्चय करून बसा.देही अभिमानी बनून राहिले,तर तुम्हाला रस्ता खूप सहज दिसून येईल. भक्तिमार्ग मध्ये अर्धा कल्प धक्के खाल्ले आहेत.भक्तिमार्गाची खूप सामग्री आहे.आता बाबाने समजवले आहे बेहद्दचे पिता एकच आहेत.बाबा तुम्हाला रस्ता दाखवत आहे.हे पण माहीत नाही कोणता रस्ता दाखवतात,मुक्ती जीवनमुक्ती चा,गती सद्गती चा. मुक्ती म्हटले जाते शांतीधाम ला. आत्म शरीरा शिवाय काहीच बोलू शकत नाही.कर्मेंद्रिया द्वारे आवाज होतो,मुखाद्वारे आवाज होतो ना. मुख नसेल तर आवाज कुठून येईल.आत्म्याला हे कर्मेंद्रिये काम करण्यासाठी मिळाले आहेत. रावण राज्य मध्ये तुम्ही विकर्म करतात.हे विकर्मच छी-छी खराब कर्म होतात.सतयुगा मध्ये रावणच नाही,तर कर्म,अकर्म होतात.तेथे पाच विकार नसतात.त्याला स्वर्ग म्हटले जाते.भारत वासी स्वर्गवासी होते,आत्ता परत नर्कवासी म्हणणार.विषय वैतरणी नदी मध्ये बुडत राहतात.सर्व एकमेकांना दुःख देत राहतात.आता बाबांना म्हणतात अशा जागी घेऊन चला,जिथे दुःखाचे नाव नाही.तो तर भारत आहे,जेव्हा स्वर्ग होता,दुःखाचे नाव नव्हते.स्वर्गा मधुन नर्का मध्ये आले आहेत.आता परत स्वर्गामध्ये जायचे आहे.हा खेळ आहे.बाबाच मुलांना सन्मुख समजवत आहेत.तुम्ही त्याची आठवण करतात,तेच उच्च ते उच्च भगवान आहेत.ते रचनाकार आहेत,त्यांच्या कडूनच वारसा मिळतो.पिताच मुलांना वारसा देतात.हदचे पिता असताना,पण परत आठवण करतात,हे भगवान, हे परमपिता परमात्मा दया करा.भक्तिमार्गात धक्के खात-खात दुःखी झाले आहेत.असे म्हणतात, हे बाबा आम्हाला सुख शांतीचा वारसा द्या.हे तर बाबाच देऊ शकतात,तेही २१ जन्मासाठी. हिशेब करायला पाहिजे.सतयुगा मध्ये जेव्हा यांचे राज्य होते,थोडे मनुष्य असतील.एक धर्म होता, एकच राजाई होती,त्याला स्वर्ग म्हटले जाते,सुखधाम म्हणले जाते. नवीन दुनियेला सतोप्रधान म्हटले जाते,तर जुन्या दुनियेला तमोप्रधान म्हटले जाते.प्रत्येक गोष्ट प्रथम सतो प्रधान,परत सतो,रजो,तमो मध्ये येते.लहान मुलांना सतोप्रधान म्हणाल.लहान मुलांना महात्मा पेक्षा उच्च म्हणले जाते.महात्मा तर जन्म घेऊन,मोठे होऊन विकारांचा अनुभव करून,घरदार सोडून जातात.लहान मुलांना तर विकाराची माहितीच नाही.बिलकुल निष्पाप आहेत,म्हणून महात्मा पेक्षा उच्च म्हटले जाते.देवतांची महिमा करतात,सर्वगुण संपन्न इत्यादी. साधूंची कधीच करत नाहीत. बाबांनी हिंसा आणि अहिंसाचा अर्थ पण समजावला आहे.कुणाला मारणे त्याला हिंसा म्हटले जाते. सर्वात मोठी हिंसा काम कटारी चालवणे आहे.देवता हिंसक नसतात.काम कटारी चालवत नाहीत.बाबा म्हणतात,आता मी आलो आहे,तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी.देवता सतयुगा मध्ये असतात.येथे कोणीही स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत.ते समजतात,आम्ही निच, पापी, विकारी आहोत.परत स्वतःला देवता कसे म्हणू शकतो,म्हणून हिंदू धर्माचे म्हटले आहे.वास्तवामध्ये आदी सनातन देवी देवता धर्म होता. हिंदू तर हिंदुस्तान पासून निघाला आहे. त्यांनी परत हिंदू धर्म म्हटले आहे. तुम्ही म्हणाल आम्ही देवता धर्माचे आहोत,तरी ते हिंदू मध्येच लिहतात. ते म्हणतात,आमच्या जवळ रखानाच हिंदू धर्माचा आहे.पतित असल्यामुळे स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत.

आता तुम्ही जाणता,आम्ही पूज्य देवता होतो,आता पुजारी बनलो आहोत.पुजा पण प्रथम फक्त शिवाची करतात,परत व्यभिचारी पुजारी बनतात.बाबा एकच आहेत, त्यांच्याद्वारे वारसा मिळतो.बाकी तर अनेक प्रकारच्या देवी इत्यादी आहेत,त्यांच्याद्वारे कोणता वारसा मिळत नाही.या ब्रह्मा द्वारे तुम्हाला वारसा मिळत नाही.एक आहेत निराकारी पिता,दुसरे आहेत साकारी पिता.साकारी पिता असताना पण हे भगवान,हे परमपिता म्हणत राहतात.लौकिक पित्याला असे म्हणणार नाहीत,तर वारसा पित्याकडून मिळतो.पती आणि पत्नीला अर्धांगिनी म्हटले जाते,तर त्यांचा अर्धा हिस्सा मिळाला पाहिजे.प्रथम अर्धा काढून,बाकी अर्धा मुलांना द्यायला पाहिजे,परंतु आज काल तर मुलांनाच सर्व संपत्ती देतात. कोणा-कोणाचा खूप मोह असतो.ते समजतात,आमच्या मृत्युनंतर मुलगाच हकदार राहील.आजकाल ची मुलं तर वडिलांच्या मृत्यूनंतर आईला विचारत पण नाहीत.काही काही मातृ-स्नेही असतात.काही परत मातृ-द्रोही पण असतात. आजकाल सहसा मातृ-द्रोहीच असतात.सर्व पैसे उडवून टाकतात.धर्माचे म्हणजे दत्तक मुलं पण काही काही असे असतात,जे खूप तंग करतात.आता मुलांनी गीत ऐकले,असे म्हणतात बाबा आम्हाला सुखाचा रस्ता दाखवा, जिथे आराम असेल.रावण राज्यांमध्ये तर सुख असू शकत नाही.भक्तिमार्गा मध्ये इतके पण समजत नाहीत की,शिव वेगळे आहेत आणि शंकर वेगळे आहेत. बस माथा टेकत राहतात,ग्रंथ वाचत राहतात,याद्वारे काय मिळेल? काहीच माहिती नाही.सर्वांच्या सुख-शांतीचे दाता तर एकच बाबा आहेत.सतयुगा मध्ये सुख आहे,तर शांती पण आहे.भारतामध्ये सुख-शांती होती,आता नाही म्हणून भक्ती करत,धक्के खात राहतात. आता तुम्ही जाणतात,शांतीधाम सुखांमध्ये घेऊन जाणारे एक बाबाच आहेत.बाबा आम्ही फक्त तुमचीच आठवण करू, तुमच्या कडूनच वारसा घेऊ.बाबा म्हणतात देह साहित् देहाच्या सर्व संबंधांना विसरायचे आहे.एक बाबांची आठवण करायची आहे.आत्म्याला येथेच पवित्र बनायचे आहे. आठवण करणार नाही तर परत सजा खावी लागेल,पद पण भ्रष्ट होईल,म्हणून बाबा म्हणतात आठवण करण्याचे कष्ट घ्या. आत्म्यांनाच समजवतात.दुसऱ्या कोणत्याही सत्संगा मध्ये असे म्हणणार नाहीत,जेथे असे म्हणतील,हे आत्मिक मुलांनो.हे आत्मिक ज्ञान आत्मिक पित्याकडूनच मुलांना मिळते. आत्मा म्हणजे निराकार,शिवपिता पण निराकार आहेत.तुमची आत्मा पण बिंदू आहे, खूप लहान आहे, त्यांना कोणी पाहू शकत नाहीत, शिवाय दिव्य दृष्टीच्या. दिव्य दृष्टी बाबाच देतात.भक्त बसून हनुमान गणेश इत्यादींची पूजा करतात. आता त्यांचा साक्षात्कार कसा होईल.बाबा म्हणतात दिव्यदृष्टी दाता मीच आहे. जे खूप भक्ती करतात,त्यांना मी,परत त्यांचा साक्षात्कार करतो,परंतु यामुळे फायदा काहीच नाही,फक्त खुश होतात.पाप तरीही करत राहतात, मिळत काहीच नाही. शिक्षणाशिवाय काही थोडेच बनू शकतात.देवता सर्वगुणसंपन्न आहेत.तुम्ही पण असेच बना ना. बाकी तर ते सर्व भक्तिमार्गाचे साक्षात्कार आहेत.खरोखर कृष्णाच्या सोबत झोके घ्या, स्वर्गामध्ये त्यांच्यासोबत रहा.हे सर्व राजयोगाच्या शिक्षणावरती आधारित आहे.जितके श्रीमता नुसार चालाल,तेवढे उच्चपद मिळेल.श्रीमताचे तर भगवंताचे गायन आहे,कृष्णाचे श्रीमत म्हणणार नाही.परमपिता परमात्माच्या श्रीमताने,कृष्णाच्या आत्म्याने हे पद मिळवले आहे. तुमची आत्मा पण देवता धर्मांमध्ये होती,म्हणजेच कृष्णाच्या दैवी घराण्यांमध्ये होती.भारतवासींना हे माहिती नाही की,राधा कृष्ण आपसा मध्ये कोण होते.दोघेही वेगवेगळ्या राजधानीचे होते,परत स्वयंवरा नंतर लक्ष्मीनारायण बनतात.या सर्व गोष्टी बाबाच समजवतात.आता तुम्ही स्वर्गाचे राजकुमार राजकुमारी बनण्यासाठी शिक्षण घेत आहात.राजकुमार राजकुमारीचे जेव्हा स्वयवर होते, तेव्हा नावं बदलतात.तर बाबा मुलांना असे श्रेष्ठ देवता बनवत आहेत,जर बाबांच्या श्रीमता नुसार चालाल तर.तुम्ही मुख वंशावळ आहात आणि ते कुख वंशावळ आहेत.ते ब्राह्मण लोक तर,काम चितावर बसण्यासाठी साखरपुडा करतात.आता तुम्ही खरे-खुरे ब्राह्मणी,काम चिते वरुन उतरुन ज्ञान चितावर बसवण्यासाठी हाथियाला बांधतात.तर तो सोडावा लागेल.येथील मुलं तर भांडण करत सर्व पैसे बरबाद करतात.आजकाल दुनिये मध्ये खूप खराबी आहे. सर्वात खराब आजार,सिनेमा पाहणे आहे.चांगली मुलं पण सिनेमा पाहिल्यामुळे खराब बनतात,म्हणून ब्रह्मकुमार-कुमारींना सिनेमा पाहण्यासाठी मनाई केली जाते.होय,जे मजबूत आहेत,त्यांना बाबा म्हणतात,तेथे पण तुम्ही सेवा करा. त्यांना समजून सांगा,हा सिनेमा आहे हद्दचा.एक बेहद्दचा पण सिनेमा आहे.या बेहद्दच्या सिनेमाद्वारेच हे खोटे सिनेमा निघाले आहेत.

आता तुम्हा मुलांना बाबांनी समजवले आहे,मुलवतन जेथे सर्व आत्मे राहतात आणि मध्येच सूक्ष्म वतन आहे.हे साकार वतन आहे.सर्व खेळ येथे चालतो.हे चक्र फिरत राहते.तुम्हा ब्राह्मण मुलांनाच स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे, देवतांना नाही.परंतु ब्राह्मणांना हे अलंकार देत नाहीत कारण पुरुषार्थी आहेत.आज चांगले चालत आहेत,उद्या विकारात जातात, म्हणून अलंकार देवतांना देतात. कृष्णासाठी म्हणतात सुदर्शन चक्रा द्वारे आकासुर-बकासुर इत्यादींना मारले.आता त्यांना तर अहिंसा परमोधर्म म्हटले जाते,परत हिंसा कसे करतील.ही सर्व भक्तीमार्गाची सामग्री आहे.जेथे पण जावा शिवाचे लिंगच असेल,फक्त नावं वेगवेगळी ठेवली आहेत.मातीच्या देवी खूप बनवत राहतात,शृंगार करतात, हजारो रुपये खर्च करतात.स्थापना करतात,परत पूजा करतात,त्याचे विसर्जन करतात.किती खर्च करतात,बाहुल्यांची पूजा करण्यासाठी,त्याद्वारे मिळत काहीच नाही.बाबा समजवतात हे सर्व पैसे बरबाद करण्याची भक्ती आहे,शिडी उतरतच आले आहेत. बाबा येतात तर सर्वांची चढती कला म्हणजे प्रगती होते.सर्वांना शांती धाम सुखधाम मध्ये घेऊन जातात.पैसे बरबाद करण्याची गोष्टच नाही, परत भक्ती मार्गामध्ये तुम्ही पैसे बरबाद करत करत अपवित्र बनतात.पवित्र अपवित्र बनण्याची कथा,बाबा सन्मुख समजवतात.

तुम्ही या लक्ष्मीनारायणाच्या दैवी घराण्याचे होते ना.आता तुम्हाला नरा पासून नारायण बनण्याची शिक्षा बाबाच देतात.ते लोक तिजरी ची कथा अमरकथा ऐकवतात.या सर्व खोट्या कथा आहेत.ही कथा तर ही आहे,ज्यामध्ये आत्म्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो.सर्व चक्र बुद्धीमध्ये येते.तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळत आहे.अमर कथा आपण ऐकत आहात,अमरबाबा तुम्हाला कथा ऐकवत आहेत, त्यामुळे तुम्ही अमरपुरी चे मालक बनतात.तेथे तुम्हाला कधी अचानक मृत्यू येत नाही,येथे तर मृत्यूचे भय मनुष्यांना खूप राहते.तेथे घाबरण्याची,रडण्याची गोष्टच नाही. आनंदाने जुने शरीर सोडून,नवीन घेतात.येथे तर मनुष्य खूप रडत राहतात, ही आहे रडण्याचे दुनिया. बाबा म्हणतात,हे तर पूर्वनियोजित नाटक आहे,प्रत्येक जण आपआपली भूमिका वठवत राहतात.हे देवता तर मोहजीत आहेत ना.येथे तर दुनिया मध्ये अनेक गुरु आहेत.ज्यांचे अनेक मतं मिळत राहतात.प्रत्येकाची मतं वेगळी आहेत.एक संतोषी देवी पण आहे,त्याची पूजा होते.आता संतोषी देवी तर सतयुगा मध्ये होऊ शकत, येथे कसे होऊ शकतात.सतयुगा मध्ये देवता नेहमी संतुष्ट असतात. येथे तर काही ना काही इच्छा राहते. सतयुगा मध्ये कोणतीही इच्छा नसते.बाबा सर्वांना संतुष्ट करतात. तुम्ही पदमपती बनतात.कोणती अप्राप्त वस्तू नसते,ज्या प्राप्तीची चिंता करावी लागेल.तेथे चिंता नसते.बाबा म्हणतात,सर्वांचा सद्गती दाता तर मीच आहे.तुम्हा मुलांना २१ जन्मासाठी आनंदच आनंद देतो.अशा प्रकारे बाबाची आठवण करायला पाहिजे ना.बाबांच्या आठवणी द्वारेच तुमचे पाप भस्म होतील आणि तुम्ही सतोप्रधान बनाल.या समजण्याच्या गोष्टी आहेत.जितके दुसऱ्यांना समजावून सांगाल,तेवढी प्रजा बनत जाईल आणि उच्चपद मिळेल.हे काय साधू इत्यादी ची कथा नाही.भगवान सन्मुख यांच्या मुखाद्वारे तुम्हाला समजावत आहेत.आता तुम्ही संतुष्ट देवीदेवता बनत आहात.आता तुम्हाला नेहमी पवित्र राहण्याचे व्रत ठेवायचे आहे,कारण पावन दुनिया मध्ये जायचे आहे, त्यामुळे पतित बनायचे नाही.बाबांनीच हे व्रत शिकवले आहे.मनुष्यांनी परत अनेक प्रकारचे व्रत केले आहेत.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बाबांच्या मतानुसार चालून नेहमी संतुष्ट राहून,संतोषी देवी बनायचे आहे.येथे कोणतीही इच्छा ठेवायची नाही.बाबांकडून सर्व प्राप्ती करून पदमपती बनायचे आहे.

(२) सर्वात खराब बनवणार सिनेमा आहे,म्हणून तुम्हाला सिनेमा पाहण्याची मना आहे.तुम्ही बहादूर आहात,तर हद्द आणि बेहद्दच्या सिनेमाचे रहस्य समजून, दुसऱ्यांनाही समजून सांगा.सेवा करत रहा.

वरदान:-
पूर्ण विरामच्या स्थिती द्वारे प्रकृतीच्या हलचल ला विराम देणारे प्रकृती पती भव.

वर्तमान वेळेत हालचल मध्ये वृद्धीची वेळ आहे.अंतिम परीक्षेमध्ये एकीकडे प्रकृतीचे आणि दुसरीकडे पाच विकारांचे विकराल रूप असेल.तमोगुणी आत्म्यांचा आघात आणि जुने संस्कार सर्व अंतिम वेळेत परीक्षा घेतील.अशा वेळेस समेटण्याच्या शक्तीद्वारे,आत्ता साकारी,आत्ता आकारी आणि आत्ता निराकारी स्थितीमध्ये,एकाग्र स्थिर,राहण्याचा अभ्यास पाहिजे.यासाठी पाहून पण न पाहणे,ऐकुन पण न ऐकणे, जेव्हा अशा प्रकारे पूर्णविराम देण्याची स्थिती असेल,तेव्हाच प्रकृती प्रति बनून प्रकृतीच्या हलचल ला विराम देऊ शकाल.

बोधवाक्य:-
निर्विघ्न राज्य अधिकारी बनण्यासाठी,निर्विघ्न सेवाधारी बना.