13-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो रक्ताच्या नात्या मध्येच दु:ख आहे, त्याला विसरून परस्परांमध्ये आत्मिक प्रेम ठेवायचे आहे, हाच सुख आणि आनंदाचा आधार आहे.

प्रश्न:-
विजयमाळे मध्ये येण्यासाठी कोणता विशेष पुरुषार्थ केला पाहिजे?

उत्तर:-
विजयमाळे मध्ये यायचे असेल तर विशेष पवित्र बनण्याचा पुरूषार्थ करा. जेव्हा पक्के संन्यासी म्हणजेच निर्विकारी बनाल, तेव्हाच विजयमाळेचा मणी बनाल. कोणत्याही कर्म बंधनाचा कर्मभोग असेल तर तो वारिस बनू शकणार नाही. प्रजा मध्ये येतील.

गीत:-
महफिल में जल उठी शमा परवानो के लिये..

ओम शांती।
आपण महीमा करतो आपल्या पित्याची .(बाबाची) मी आत्मा जरूर आपल्या पित्यालाच प्रत्यक्ष करणार ना. सन शोज फादर. मी आत्मा, तर तुम्ही पण म्हणाल आम्ही पण आत्मा आहोत. आम्हा सर्वांचे एकच पिता परमात्मा आहेत, हे तर सर्वजण मानतील. असे म्हणणार नाहीत की आम्हा आत्म्यांचे पिता वेगवेगळे आहेत. पिता सर्वांचा एक आहे. आता आम्ही त्यांची मुलं झाल्याने त्यांच्या बाबत जाणतो. आम्ही असे म्हणत नाही की परमात्मा सर्वव्यापी आहे. मग तर सर्वांमध्ये परमात्मा होऊन जातील.पित्याची आठवण करून मुलं खूश होतात. कारण जे काही पित्याच्या जवळ असते त्याचा वरसा मुलाला मिळतोच. आता आम्ही आहोत परमात्म्याचे वारीस मुलं, त्यांच्या जवळ काय आहे ? ते आनंदाचे सागर आहेत, ज्ञानाचे सागर आहेत, प्रेमाचे सागर आहेत.आम्हाला माहिती आहे म्हणूनच आम्ही त्यांची महिमा करतो . दुसरे असे म्हणणार नाहीत. जरी कोणी म्हटले तर ते कसे आहेत? हे तर कोणाला माहिती नाही. बाकी तर सर्वजण म्हणतात परमात्मा सर्वव्यापी आहे परंतु आम्ही त्यांची मुले आहोत तर आपल्या निराकार, अविनाशी पित्याची महिमा करतो, की ते आनंदाचे सागर, ज्ञानाचे सागर, प्रेमाचे भंडार आहेत. परंतु कोणी प्रश्न उठवला की तुम्ही म्हणता की ते निराकार जगामध्ये दुःखापासून वेगळ्या अवस्थेमध्ये राहतात. तेथे सुख किंवा आनंद किंवा प्रेम कुठून आलं ? आता ही तर समजण्याची गोष्ट आहे. हे जो आनंद, सुख किंवा प्रेम म्हणतात ही तर झाली सुखाची अवस्था. परंतु तेथे शांतीधाम मध्ये आनंद प्रेम ज्ञान कुठून आले. तो सुखाचा सागर जेव्हा या साकार स्रुष्टीमध्ये येतात, तेव्हा येऊन सुख देतात . तेथे तर सुख दुःखाच्या परे अवस्थे मध्ये राहतात,कारण तुम्हाला समजलेले आहे की, एक आहे सुख दुःखा पासून वेगळी दुनिया, ज्याला निराकारी धाम म्हटले जाते. दुसरी आहे सुखाची दुनिया जेथे सदासुख, आनंद असतो. त्याला स्वर्ग म्हणतात. आणि ही आहे दुःखाची दुनिया ज्याला नरक किंवा लोहतुल्य युग म्हणतात. आता ह्या लोहतुल्य युगामध्ये परमपिता परमात्मा सुखाचे सागर आहेत, ते येऊन याला बदलून आनंद, सुख, प्रेमाचे भंडार बनवतात. तेथे सुखच सुख आहे. प्रेमच प्रेम आहे .तेथे पशू पक्षांमध्ये पण खूप प्रेम राहते. वाघ, शेळी एकत्र पाणी पितात. एवढे त्यांच्यामध्ये प्रेम असते. तेव्हा परमात्मा येऊन जी आपली राजधानी स्थापन करतात, त्यामध्ये सुख आणि आनंद आहे. बाकी निराकारी दुनियेमध्ये सुख, आनंदाची गोष्टच नाही, प्रेमाची ही गोष्ट नाही. ते तर निराकारी आत्म्यांचे राहण्याचे ठिकाण आहे. ती आहे सर्वांची मुक्त जीवन किंवा निर्वाण अवस्था. तेथे सुखदुःखाची कोणती जाणीव राहात नाही. ही दुःख सुखाची भूमिका तर या साकार जगतामध्ये चालते. या सृष्टी वर जेव्हा स्वर्ग असतो, तेव्हा आंतरिक आत्मिक प्रेम राहते. कारण दुःख असते रक्ताच्या नात्या मध्ये. संन्यासी पण रक्ताच्या संबंंधा मध्ये राहत नाहीत . त्यामुळे त्यांच्यामध्ये पण दुःखाची कोणती गोष्ट नाही . ते तर म्हणतात मी सच्चिदानंद स्वरूप आहे. कारण रक्ताच्या नात्यांनाही त्यागलेले आहे. तसेच येथे पण तुमचे कोणते रक्ताचे नाते नाही . येथे आमचे सगळ्यांचे आत्मिक प्रेम आहे, जे परमपिता परमात्मा शिकवतात.

बाबा म्हणतात तुम्ही माझी खूप प्रिय मुले आहात. माझ्या जवळील आनंद, प्रेम, सुख तुमचे आहे. कारण तुम्ही ती दुनिया सोडून माझी दत्तक मुले ( गोद घेतलेली) बनलेली आहात. पालना घेत आहात. हे पण तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये दत्तक बनलेले आहात. असे नाही की जसे ते घरातून गुरुंच्या गोदीमध्ये जातात. त्यांना प्रिय मुले म्हटले जात नाही. त्यांची ती पण जशी प्रजा आहे. बाकीचे संन्यास करून जी त्यांची (गोद ) पालना घेतात, तीच प्रिय मुले बनतात. कारण गुरुच्या पाठीमागे तेच गादीवर बसतात. मुले आणि प्रजे मध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. ते वारीस बनून वरसा घेतात. जसे तुम्ही त्यांच्याशी रक्ताचे नाते सोडून या निराकार किंवा साकार ची गोद घेतलेली आहे, वारस बनण्यासाठी. यामध्येही जेवढे ज्ञान घ्याल तेवढा आशीर्वाद मिळेल,शिक्षणाला आशीर्वाद म्हटले जात नाही. जेवढे ज्ञान घेतील तेवढे त्या राजधानीमध्ये, प्रजेमध्ये सुख घेतील. हा ईश्वरीय शैक्षणिक आशीर्वाद आहे, ज्यामुळे सर्वोच्च शांती आणि सर्वोच्च आनंद मिळतो. हे अटल, अखंड, सुख आणि शांतीमय स्वराज्य आहे. ईश्वराची प्रॉपर्टी,जी मुलांना मिळते.जो जेवढे ज्ञान घेईल तेवढा बाबा कडून वारसा मिळेल. जसे तुमच्याजवळ जेवढे जीज्ञासू येतात ती आहे तुमची प्रिया प्रजा, मुले नाहीत कारण येत जात राहतात. मुले पण होऊ शकतात, कारण प्रजेमधून पण कोणी तरी वारिस बनते ना . जेव्हा ज्ञान घेतात, अनुभव करतात की, येथे तर अथाह सुख आणि शांती आहे, त्या दुनियेमध्ये तर दुःखच आहे, तेव्हा येऊन बाबांची गोद घेतात. एकदम तर कोणी मुलगा बनू शकत नाही. तुम्ही पण पहिल्यांदा येत- जात होता. पुन्हा ज्ञान ऐकून ऐकून वारस बनला. संन्यास्यां मध्ये ही असेच होते. ऐकून- ऐकून जेव्हा समज येते, संन्यासामध्येच सुख-शांती आहे, तेव्हा संन्यास करतात. येथे पण जेव्हा अनुभव येतो तेव्हा प्रिय मुले बनून जातात. व जन्मजन्मांतर साठी वरसा मिळतो. ते पुन्हा दैवी घराण्यांमध्ये येत राहतात. प्रजा तर बरोबर नसते. ती कुठे कुठे कर्म बंधनामध्ये निघून जाते.

जसे गीत आहे महफिलमे जल उठी शमा परवाना के लिये महाज्योती शमा शिवावरती आत्मे (परवाने) आनंदाने बळी जातात, तर काही चक्कर लावून जातात. हे शरीर पण एक शमा आहे, ज्यामध्ये सर्वशक्तिमान बाबांनी प्रवेश केलेला आहे. तुम्ही परवाने बनवून येता, जाता जेव्हा सर्व रहस्य समजून घेता तेव्हा बाबाच्या गोदमध्ये येता. हजारोंच्या संख्येने येतात. तुमच्याकडून पण ऐकत राहतात. जेवढे ऐकतील तेवढी शांती आणि आशीर्वादाचे वरदान घेऊन जातील . कारण की अविनाशी पित्याच्या ज्ञानाचा विनाश तर होत नाही. याला म्हटले जाते अविनाश ज्ञानदान. त्याचा विनाश होत नाही. तर जे कोणी थोडेही ऐकतील तर ते प्रजेमध्ये जरूर येतील. तेथे तर प्रजा पण खूप सुखी असते. आंतरिक आशीर्वाद आहेत कारण तेथे सर्वजण आत्मअभिमानी स्थिती मध्ये राहतात. येथे देहाभिमानी झालेत त्यामुळे दु:खी आहेत. तेथे आहेच स्वर्ग. दुःखाचं नाव निशाणही नाही. पशु पक्षी पण किती सुख-शांती मध्ये राहतात. तर प्रजेमध्येही किती अपार प्रेम आणि सुख असेल. हे पण जरुर आहे की सर्वजण वारीस बनणार नाहीत. येथे तर एकशे आठ टक्के संन्यासी विजय माळेचे दाणे बनणारे आहेत. ते पण अजून बनलेले नाहीत, बनत आहेत . त्याचबरोबर प्रजा पण बनत आहे. ते पण बाहेर राहून ऐकत राहतात. घरी बसून बाबाची आठवण करत आहेत. बाबा ची आठवण करत करत कोणी येतात ते प्रजे पासून पुन्हा वारीस बनतात. जोपर्यंत कर्म बंधनाचा हिसाब किताब आहे, तोपर्यंत बाहेर राहून आठवण करतील, निर्विकारी राहतील . घरामध्ये राहून निर्विकार राहतील तर घरामध्ये भांडण तंटा जरूर होणार . कारण कामेशु, क्रो्धेशु. 'काम' शत्रुवर तुम्ही आता विजय प्राप्त करता विष देणे बंद करता त्यामुळे भांडण-तंटा होतो.

बाबा म्हणतात मुलांनो मृत्यू समोर उभा आहे. संपूर्ण दुनियेचा विनाश होणार आहे. जसे व्रदध व्यक्तींना म्हटले जाते, मृत्यू समोर आहे परमात्म्याची आठवण करा. बाबा पण म्हणतात मुलांनो निर्विकारी बना. परमात्म्याचे आठवण करा. जेव्हा तीर्थक्षेत्राला जाता, तेव्हा काम करत सर्व सोडून देतात रस्त्यामध्ये 'काम' 'क्रोध' सर्व बंद करता. रस्त्यामध्ये काम चेष्टा थोडीच करता. तेथे तर संपूर्ण रस्ता अमरनाथचा जयजयकार करत जाता, आणि पुन्हा परत येता तेव्हा विकारांमध्ये घुटके खात राहता. तुम्हाला मागे परतायचे नाही. काम, क्रोधाच्या आहारी जायचे नाही. विकारांमध्ये जाल तर पद भ्रष्ट होऊन जाईल. पवित्र बनू शकणार नाही. जे पवित्र बनतील तेच विजय माळेमध्ये येतील. जे नापास होतील ते चंद्रवंशी घराण्यांमध्ये जातील.

हे तुम्हाला परमपिता परमात्मा शिकवतात. ते ज्ञानाचे सागर आहेत ना .तेथे निराकारी दुनियेमध्ये तर आत्म्याला ज्ञान नाही ऐकवणार . येथे येऊन तुम्हाला ऐकवतात. बाबा म्हणतात तुम्ही माझी मुले आहात. जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पण पवित्र बना. तर तुम्ही सतयुगामध्ये सुखमय, प्रेममय होऊन राज्य कराल. त्याला वैकुंठ म्हटले जाते. आता ही दुनिया बदलत आहे. कारण लोहतुल्य युगापासून सुवर्णयुग बनत आहे. सुवर्णयुगानंतर चांदीच्या युगा मध्ये जाल. चांदीच्या युगा नंतर ताम्रयुगांमध्ये याल, आणि ताम्रयुगानंतर पुन्हा लोह युगामध्ये बदलत जाल. अशी दुनिया बदलत राहते. तर आता ही दुनिया बदलत आहे. कोण बदलत आहे ? परमात्मा स्वतः ज्याची तुम्ही गोड मुले आहात. प्रजा पण बनवत आहे .परंतु "मुलं" मुलं आहेत, प्रजा, प्रजा आहे .जे संन्यास करतात ते वारीस बनतात. त्यांना श्रेष्ठ घराण्यांमध्ये अवश्य घेवून जायचे आहे. परंतु ज्ञान जास्त नाही घेतले तर पद पण श्रेष्ठ मिळणार नाही. जो शिकेल तो नबाब बनेल. जे येत जात राहतात, ते पुन्हा प्रजे मध्ये येतात. जेवढे पवित्र बनत जातील तेवढे सुख मिळेल . प्रिय तर ते पण बनतात परंतु जास्त प्रिय तेव्हा बनतात, जेव्हा मुले बनतात.समजले.

संन्यासी पण खूप प्रकारचे असतात. एक घरदार सोडून जातात. दुसऱ्या असे असतात जे घरी राहतात परंतु विकारांमध्ये जात नाहीत . ते आपल्या अनुयायांना शास्त्र ऐकवतात .आत्म्याचे ज्ञान देतात, त्यांचे पण शिष्य असतात. परंतु त्यांचे शिष्य त्यांची प्रिय मुले बनू शकत नाहीत. कारण ते घरात मुलांबरोबर राहणारे असतात. त्यामुळे त्यांना ते आपल्या जवळ ठेवू शकत नाहीत. न स्वतः संन्यास केलेला आहे न इतरांना संन्यास करायला लावतात . त्यांचे शिष्य पण घरामध्ये राहून त्यांच्याकडे येत जात राहतात. ते फक्त त्यांना ज्ञान देत राहतात किंवा मंत्र देतात. त्यामुळे त्यांचे वारस बनत नाहीत. तर त्यांची वृद्धी कशी होणार ? ते ज्ञान देत देत शरीर सोडतात. बघा एक माळ आहे 108ची. पुन्हा त्याच्या पेक्षा मोठी 16108 ची. ती आहे चंद्रवंशी घराण्याचे रॉयल राजकुमार राजकुमारींची माळा. जे येथे एवढे ज्ञान घेणार नाहीत, पवित्र बनणार नाहीत, तर सजा खाऊन चंद्रवंशी घराण्याच्या माळे मध्ये येतील. राजकुमार राजकुमारी तर खूप असतात. हे रहस्य तुम्ही आता ऐकता, जाणता. तेथे या ज्ञानाची गरज भासत नाही. हे ज्ञान तर फक्त संगमयुगावार मिळते, जेव्हा दैवी धर्माची स्थापना होत असते. तर जे पूर्ण कर्मेंद्रियांवर विजय प्राप्त करू शकत नाहीत, ते चंद्रवंशी घराण्याच्या माळे मध्ये जातात. जे विजय प्राप्त करतात ते सूर्यवंशी घराण्यांमध्ये येतात. त्यांच्यामध्ये पण नंबर जरुर असतात. शरीर पण आपल्या अवस्थेनुसार मिळते. बघा, सर्वात तीव्र मम्मा गेली तर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली, मॉनिटर बनल्या.त्यांना संपूर्ण ज्ञानाचा कलश दिलेला आहे. त्यांना आपण ही माता म्हणतो कारण बाबांनी पण संपूर्ण तन-मन-धन त्यांच्या पायावर अर्पण केलेले आहे . लौकिक मुलाला दिले नाही , कारण ते रक्ताचे नाते होते. हे तर आंतरिक मुले जाणतात सर्व संन्यास केलेल्यांवर जास्त प्रेम राहते. आंतरिक प्रेम सगळ्यात तीव्र असते. सन्यासी तर एकटे घरदार सोडून पळून जातात . येथे तर सर्व घेऊन येवून अर्पण केलेले आहे. परमात्मा स्वतः प्रत्यक्षात करून करून दाखवतात.

तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर येथे मिळू शकते. परमात्मा स्वतःहून तुम्हाला ऐकवतो. ते तर जादुगर आहेत. त्यांच्या जादुगिरी ची भूमिका आत्ता चाललेली आहे. तुम्ही तर खूप प्रिय मुले आहात . तुम्हाला बाबा कधी नाराज करू शकत नाहीत . नाराज केले तर मुलं पण राग करायला शिकतील. येथे तर सर्वांचे आंतरिक प्रेम आहे. स्वर्गामध्ये पण किती प्रेम असते. तेथे तर सतोप्रधान असतात. येथे जे विजिटर,पाहण्यासाठी येतात त्यांची पण खूप सेवा होते. कारण त्यांच्या वर पण शांती आणि आनंदाची वर्षा होते. ते पण प्रिय प्रजा बनणाऱ्यातील आहेत.माता पिता, मुलं सर्वजण त्यांच्या सेवेमध्ये लागतात . भले देवी-देवता बनत आहेत परंतु येथे त्या पदाचा अहंकार राहत नाही. सर्वजण आज्ञाधारक सेवक बनवून सेवेमध्ये हजर राहतात. ईश्वर पण आज्ञाधारक सेवक बनून आपल्या प्रिय मुलांच्या आणि प्रजेची सेवा करतात. त्यांचे मुलांवर आशीर्वाद राहतात. अच्छा

गोड गोड खूप वर्षांनी भेटलेल्या, नुरे रत्न कल्प कल्पू बाबा पासून दूर जाऊन, पुन्हा येऊन भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादांची हृदयापासून स्नेहा पूर्वक आठवण, .आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. जसे बापदादा मुलांना कधीही नाराज करत नाहीत, तसे तुम्ही मुलांनी पण कुणाला नाराज करू नये .परस्परांमध्ये आंतरिक प्रेमाने राहायचे आहे. कधी राग करायचा नाही.

2. शांती आणि आशीर्वादाचे वरदान घेण्यासाठी बाप दादा वर पूर्णपणे समर्पित व्हायचे आहे. ज्ञानाने सर्वोच्च शांती आणि आनंदाचा ईश्वरीय अधिकार घ्यायचा आहे.

वरदान:-
संघटनांमध्ये सहयोगाच्या शक्तीद्वारे विजयी बनणारे शुभचिंतक बना.

जर संघटनेमध्ये प्रत्येक जण एकमेकांचे मदतगार, शुभचिंतक बनून राहिले तर सहयोगाच्या शक्तीचा घेराव खूप धमाल करू शकतो. परस्परांमध्ये एकमेकाचे शुभचिंतक सहयोगी बनून रहा, तर मायेची हिंमत होणार नाही या घेरावाच्या आत येण्याची. परंतु संघटनेमध्ये सहयोगाची शक्ती तेव्हा येईल जेव्हा हा दृढ संकल्प करा की कितीही गोष्टी सहन कराव्या लागोत परंतु सामना करूनच दाखवू, विजयी बनवून दाखवू.

बोधवाक्य:-
कोणतीही इच्छा चांगले बनू देत नाही .म्हणून इच्छा मात्रं अविद्या बना.