13.11.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, हा भुल भुलैया चा खेळ आहे, तुम्ही सारखे-सारखे बाबांना विसरतात, निश्चय बुद्धी बना, तर या खेळामध्ये फसणार नाहीत"

प्रश्न:-

विनाशाच्या वेळेला पाहत, तुम्हा मुलांचे कर्तव्य कोणते आहे?

उत्तर:-

तुमचे कर्तव्य आहे, आपल्या ज्ञान योगामध्ये चांगल्या रीतीने तत्पर राहणे आणि दुसर्या कोणत्याही गोष्टींमध्ये पण न जाणे. बाबा तुम्हाला डोळ्या वरती बसून, गळ्यात हार बनवून, सोबत घेऊन जातील. बाकी तर सर्वांना आपापला कर्मभोग चूक्तू करून जायचेच आहे. बाबा सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी आले आहेत.

गीत:-

दूर देश का रहने वाला, आया पराया देश. . . .

ओम शांती. आत्मिक पिता आत्मिक मुलांना सन्मुख समजावत आहेत, भारत खास आणि सर्व दुनिये मध्ये शांतीची इच्छा ठेवतात. आता हे तर समजायला पाहिजे, जरूर विश्वाचे मालकच, विश्वामध्ये शांती स्थापन करतील. ईश्वरीय पित्यालाच बोलवायचे आहे की, येऊन विश्वामध्ये शांती पसरवा. कोणाला बोलवतात तर, त्या बिचार्‍यांना माहीत नाही, संपूर्ण विश्वाची गोष्ट आहे ना. संपूर्ण विश्वामध्ये शांतीची इच्छा ठेवतात. आता शांतीधाम तर वेगळे आहे, जेथे पिता आणि तुम्ही राहतात. हे पण बेहद्द चे बाबाच समजवतात. आता या दुनिया मध्ये तर असंख्य मनुष्य आहेत, अनेक धर्म आहेत. असे म्हणतात सर्व धर्म मिळून एक झाले तर शांती होईल. सर्व धर्म एक तर होऊ शकत नाहीत. त्रिमूर्तीची महिमा पण आहे. त्रिमूर्तीचे चित्र खूप ठेवतात. हे पण जाणतात, ब्रह्मा द्वारा स्थापना. कोणाची? फक्त शांती थोडीच असेल. शांती आणि सुखाची स्थापना होते. या भारतामध्येच पाच हजार वर्षांपूर्वी जेव्हा यांचे राज्य होते, तर जरूर बाकी सर्व जीवात्मे शरीराला सोडून आपल्या घरी गेले असतील. एक धर्म, एक राज्य, एक भाषा व्हावी अशी इच्छा करतात. आता तुम्ही मुलं जाणतात, बाबा सुख शांती संपत्ती ची स्थापना करत आहेत. एक राज्य पण जरूर येथेच असेल ना. एक राज्याची स्थापना होत आहे, ही कोणती नवीन गोष्ट नाही. अनेक वेळेस एक राज्य स्थापन केले आहे परत अनेक धर्माची वृद्धी होत, झाड मोठे होत जाते, परत बाबांना यावे लागते. आत्माच ऐकते, वाचते, आत्म्यामध्येच संस्कार असतात. आम्ही आत्मा वेगवेगळे शरीर धारण करतो. मुलांना निश्चय बुद्धी होण्यामध्ये खूप कष्ट होतात. मुलं म्हणतात, बाबा घडीघडी आठवण विसरते. बाबा समजवतात, हा भूल भुलैयाचा खेळ आहे. यामध्ये तुम्ही जसे बसले आहात, माहित नाही की आपले घर किंवा राजधानीमध्ये कसे जाऊ? आता बाबांनी समजावले आहे, अगोदर काहीच जाणत नव्हते. आत्मा खूपच पत्थरबुद्धी बनली आहे. पत्थर बुद्धी आणि पारसबुध्दीचे भारतामध्येच गायन आहे. पत्थर बुद्धी राजे आणि पारस बुद्धी राजे येथेच असतात. पारसनाथ चे मंदिर पण आहे. आता तुम्ही जाणतात, आम्ही आत्मे कोठून भूमिका वठण्यासाठी आलो आहोत, अगोदर काहीच जाणत नव्हते. या दुनियेला काट्याचे जंगल म्हटले जाते. ही सर्व दुनिया काट्याचे चे जंगल आहे ना. फुलांच्या बागेला कधी आग लागली, असे कधी ऐकले नसेल. नेहमी जंगलाला आग लागते, हे पण जंगल आहे, यास जरूर आग लागणार आहे. सर्व विश्वाला आग लागेल ना. या साऱ्या दुनियेला भंभोर म्हटले जाते. तर तुम्हा मुलांनी बाबांना जाणले आहे. तुम्ही बाबांच्या सन्मुख बसले आहेत. जे गायन करत होते, तुमच्या जवळ बसू, खाऊ, तुमच्याजवळ राहू . . . ते सर्व काही होत आहे. भगवानुवाच आहे तर जरूर शिकवतील ना. भगवानुवाच जरूर मुलांसाठीच असेल ना. तुम्ही जाणतात भगवान शिकवत आहेत. भगवान कोण आहेत? निराकार शिवालाच भगवान म्हणणार. भगवान शिवाची पूजा पण येथेच होते. सतयुगामध्ये पूजा इत्यादी होत नाही, आठवण करत नाहीत. भक्तांना सतयुगाच्या राजधानीचे फळ मिळते. तुम्ही समजतात, आम्ही सर्वात जास्त भक्ती केली आहे म्हणून आम्हीच प्रथम बाबा च्या जवळ आलो आहोत, परत आम्हीच राजधानीमध्ये येऊ. तर मुलांना खूप पुरुषार्थ करायला पाहिजे. नवीन दुनिया मध्ये उच्च पद मिळवण्यासाठी मुलांना खूप पुरुषार्थ करायला पाहिजे. मुलांची इच्छा असते आम्ही लवकर नवीन घरांमध्ये जाऊ. सुरुवातीला नवीन घर असते, परत जुने होत जाते. घरांमध्ये मुलांची वृद्धी होत जाते. मुलं, नातवंडे, ते तर जुन्या घरांमध्ये येतील ना. ते म्हणतात आमचे, दादा आजोबाचे हे घर आहे. शेवटी तर खूप येतील ना. जितका तीव्र गतीने पुरुषार्थ कराल तर, प्रथम नवीन घरामध्ये येऊ शकाल. पुरुषार्थाच्या युक्त्या पण बाबा खूप सहज समजावून सांगतात. भक्तिमार्गा मध्ये पुरुषार्थ करतात ना. जास्त भक्ती करणार्‍यांचे नाव प्रसिद्ध होते. काही भक्तांचे पोस्टाचे तिकिटे पण निघतात. ज्ञानाची माळेची तर कोणालाही माहिती नाही. प्रथम ज्ञान नंतर भक्ती आहे. हे तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, अर्धा वेळ ज्ञान, सतयुग- त्रेता युग आहे. आता तुम्ही मुलं ज्ञानसंपन्न बनतात. शिक्षक नेहमीच ज्ञानसंपन्न असतात. विद्यार्थी क्रमानुसार गुण घेत राहतात. हे बेहद्द चे शिक्षक आहेत. तुम्हीपण बेहद्दचे विद्यार्थी आहात, विद्यार्थी तर क्रमानुसार पास होतील. जसे कल्पा पूर्वी झाले होते. बाबा समजवतात तुम्हीच, ८४जन्म घेतले आहेत. ८४ जन्मांमध्ये ८४ शिक्षक असतात. पुनर्जन्म तर जरुर घ्यायचा आहे. प्रथम जरुर सतोप्रधान दुनिया असते, परत जुनी तमोप्रधान दुनिया होते. मनुष्य पण तमोप्रधान असतात ना. झाड पण प्रथम नवीन सतोप्रधान असते. नवीन पाने खूप चांगले चांगले असतात. हे तर बेहद्द चे झाड आहे, अनेक धर्म आहेत. तुमची बुद्धी आत्ता बेहद्दमध्ये जाते. किती मोठे झाड आहे. प्रथम आदी सनातन देवी-देवता धर्मच असतो. परत अनेक धर्म येतात. तुम्हीच ८४ जन्म घेतले आहेत, ते पण अविनाशी आहेत. तुम्ही जाणतात कल्प कल्प ८४चे चक्र फिरत राहते. ८४ च्या चक्रामध्ये आम्हीच येतो. ८४ लाख जन्म कोणते मनुष्य आत्मा घेत नाहीत. ते तर असंख्य जनावरं इत्यादी आहेत. त्यांची कोणी मोजदाद करू शकत नाहीत. मनुष्य आत्म्यांनीच ८४ जन्म घेतले आहेत. तर ही भूमिका वठवत वठवत एकदम जसे थकले आहात, दुःखी बनले आहेत. शिडी उतरत उतरत सतोप्रधान पासून तमोप्रधान बनले आहेत. बाबा परत तमोप्रधान पासून सतोप्रधान बनवतात. बाबा म्हणतात मी तमोप्रधान दुनिया, तमोप्रधान शरीरा मध्ये आलो आहे. आता सारी दुनिया तमोप्रधान आहे. मनुष्य तर असेच म्हणतात, सर्व विश्वा मध्ये शांती कशी होईल? ते समजत नाहीत विश्वामध्ये शांती कशी होईल? बाबा म्हणतात तुमच्या घरांमध्ये चित्र ठेवले आहेत ना, यांचे राज्य होते, तर सर्व विश्वामध्ये शांती होते, त्यांना स्वर्ग म्हटले जाते. नवीन दुनियेला स्वर्ग सुवर्णयुग म्हटले जाते. आत्ता ही जुनी दुनिया बदलणार आहे. ती राजधानी स्थापन होत आहे. लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अनेक मनुष्य जातात, हे थोडेच कोणाच्या बुद्धीमध्ये आहे की, हे भारताचे मालक होते. त्यांच्या राज्यामध्ये जरूर सुख-शांती होती. पाच हजार वर्षाची गोष्ट आहे, जेव्हा यांचे राज्य होते. अर्ध्या कल्पाच्या नंतर जुनी दुनिया म्हटले जाते, म्हणून व्यापारी स्वस्तिक त्यांच्या वहीमध्ये स्वस्तिक काढतात. त्यांचा अर्थ पण आहे ना. ते तर गणेश म्हणतात. गणेशाला परत विघ्नविनाशक देवता समजतात. स्वस्तिका मध्ये पूर्ण चार भाग असतात. हा सर्व भक्ती मार्ग आहे. आता दिवाळी साजरी करतात, वास्तव मध्ये खरीखुरी दिवाळी आठवणी ची यात्रा आहे, ज्याद्वारे आत्म्याची ज्योती, २१जन्मासाठी जागृत होते. खूप कमाई होते. तुम्हा मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे.

नविन दुनियेसाठी, आत्ता तुमचे खाते सुरु होत आहे. २१ जन्मासाठी आता जमा करायचे आहे. आता बाबा मुलांना समजवत आहेत, स्वतःला आत्मा समजून ऐकत आहात ना. आत्मा समजून ऐकाल, तर खुशी पण राहील. बाबा आम्हाला शिकवत आहेत, भगवानुवाच पण आहे ना. भगवान तर एकच असतात. जरूर ते येऊन शरीर घेत असतील ना, तेव्हा तर भगवानुवाच म्हटले जाते. हे पण कोणाला माहित नाही, तेव्हा तर नेती नेती करत आले आहेत. असे म्हणतात, ते परमपिता परमात्मा आहेत. परत म्हणतात आम्ही जाणत नाहीत. शिव बाबा असे म्हणतात, ब्रह्माला पण बाबा म्हणतात. विष्णूला कधी बाबा म्हणणार नाहीत. प्रजापिता तर बाबा झाले. तुम्ही ब्रह्मकुमार कुमारी आहात, प्रजापिता नाव नसल्यामुळे समजत नाहीत. अनेक ब्रह्मकुमार कुमारी आहेत, तर जरूर प्रजापिता पण असतील ना, म्हणून प्रजापिता अक्षर जरूर लिहा. तर समजतील, प्रजापिता तर आमचेच पिता आहेत. नवीन सृष्टी जरूर प्रजापिता द्वारे स्थापन केली जाते. आम्ही आत्मे भाऊ भाऊ आहोत, परत शरीर धारण करून भाऊ-बहीण होतो. बाबांचे मुलं तर अविनाशी आहेत, परत साकार मध्ये भाऊ-बहीण पाहिजेत. तर नाव प्रजापिता ब्रह्मा आहे, परंतु ब्रह्माला काही, आठवण करत नाहीत. आठवण तर लौकिक व पारलौकिक ची करतात. प्रजापिता ब्रह्माची कोणी आठवण करत नाहीत. दुःखामध्ये बाबांची आठवण करतात, ब्रह्माची नाही. असे म्हणतात हे भगवान. हे ब्रह्मा असे म्हणत नाहीत. सुखामध्ये कोणाची आठवण करत नाहीत. तेथे तर सुखच सुख आहे. हे पण कोणाला माहिती नाही. तुम्ही जाणता या वेळेत तीन पिता आहेत, भक्तिमार्गा मध्ये लौकिक आणि पारलौकिक पित्याची आठवण करतात. सतयुगामध्ये फक्त लौकिक पित्याची आठवण करतात. संगमयुगामध्ये तिघांची आठवण करतात. लौकिक पण आहेत परंतु जाणतात, ते हद्दचे पिता आहेत, त्यांच्याद्वारे हद्दचा वारसा मिळतो. आता आम्हाला बेहद्दचे पिता मिळाले आहेत, ज्याद्वारे बेहद्दचा वारसा मिळतो. ही समजून घेण्याची गोष्ट आहे. आत्ता बेहद्द चे पिता, ब्रह्मा तनामध्ये, मुलांना सुख देण्यासाठी आले आहेत. त्यांचे बनल्यामुळे आम्हाला बेहद्दचा वारसा मिळतो. हे जसा दादांचा वारसा ब्रह्मा द्वारा मिळतो, ते म्हणतात मी तुम्हाला वारसा देतो, शिकवतो. ज्ञान माझ्याजवळच आहे, बाकी न मनुष्यामध्ये ज्ञान आहे, ना देवतांमध्ये ज्ञान आहे. ज्ञान तर माझ्यामध्ये आहे, जे मी तुम्हा मुलांना देतो. हे आत्मिक ज्ञान आहे. तुम्ही जाणता आत्मिक पित्याद्वारे आम्हाला हे पद मिळते. अशाप्रकारे विचार सागर मंथन करायला पाहिजे. असे गायन आहे, मनाला जिंकल्यामुळे विजय होतो, तर मन हरल्यानंतर, पराजय होतो. वास्तव मध्ये असे म्हणायला पाहिजे की, मायेला जिंकल्यामुळे विजय होतो, कारण मनाला तर जिंकले जात नाही. मनुष्य म्हणतात मनाची शांती कशी होईल? बाबा म्हणतात आत्मा कशी म्हणेल की, मनाला शांती पाहिजे. आत्मा तर शांतीधाम मध्ये राहणारी आहे. आत्मा जेव्हा शरीरांमध्ये येते, तेव्हाच कार्य करायला सुरु करते. बाबा म्हणतात, तुम्ही आता स्वधर्मा मध्ये राहा, स्वतःला आत्मा समजा. आत्म्याचा स्वधर्म शांत आहे. बाकी शांती कुठे शोधणार. यावरती राणीच्या गळ्यातील हाराचे पण उदाहरण आहे. संन्यासी पण दृष्टांत देतात आणि जंगलामध्ये जाऊन, स्वत: शांती शोधतात. बाबा म्हणतात, तुम्हा आत्म्यांचा धर्म शांती आहे. शांतीधाम तुमचे घर आहे, तेथुन भूमिका वठवण्यासाठी तुम्ही येतात. शरीराद्वारे परत काम करावे लागते. आत्मा शरीरा पासून वेगळी झाल्यानंतर एकदम सन्नाटा होतो. आत्म्याने जाऊन दुसरे शरीर घेतले, परत चिंता का करायला पाहिजे, परत थोडीच येईल. परंतु मोह त्रास देत राहतो. सतयुगामध्ये मोह तुम्हाला त्रास देणार नाही. तेथे पाच विकार नसतात, रावण राज्यच नाही. तेथे राम राज्य आहे. नेहमी रावण राज्य असेल तर, मनुष्य अगदीच थकून जातील. सुख कधीच पाहू शकणार नाहीत. आता तुम्ही आस्तिक बनले आहात आणि त्रिकालदर्शी पण बनले आहात. मनुष्य पित्याला जाणत नाहीत, म्हणून नास्तिक म्हटले जाते.

आता तुम्ही मुलं जाणतात हे ग्रंथ इत्यादी भूतकाळात होऊन गेले आहेत, हा सर्व भक्तिमार्ग आहे. आता तुम्ही ज्ञान मार्गामध्ये आहात. बाबा तुम्हा मुलांना खूप प्रेमाने, डोळ्यावरती बसवून घेऊन जातात. गळ्यातील हार बनवून सर्वांना घेऊन जातात. ईश्वराला तर सर्वच बोलतात ना. जे कामचिते वरती बसून काळे झाले आहेत, त्यांना ज्ञान चिते वरती बसून कर्मभोग चुकतो करून परत घेऊन जातात. आत्ता तुमचे काम आहे शिकण्याचे, बाकी दुसऱ्या गोष्टीमध्ये का जायला पाहिजे? कसे मरतील, काय होईल इत्यादी गोष्टींमध्ये आम्ही का जावे? ही तर कयामतची वेळ आहे. सर्व कर्मभोग चुक्तू करून वापस चालले जातील. हे नाटकाचे रहस्य तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. दुसरे कोणी जाणत नाहीत. मुलं जाणतात आम्ही बाबांच्या जवळ कल्प-कल्प येऊन, वारसा घेतो. आम्ही जिव आत्मे आहोत. बाबांनी पण देहामध्ये येऊन प्रवेश केला आहे. बाबा म्हणतात मी साधारण तनामध्ये येतो. यांना पण सन्मुख समजवतो की, तुम्ही स्वतःच्या जन्माला जाणत नाहीत, दुसरे कोणी असे म्हणू शकत नाहीत की, मुलांनो देही अभिमानी बनून बाबांची आठवण करा, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. (१) आठवणीच्या यात्रेमध्ये राहून खरीखुरी दिवाळी रोज साजरी करायची आहे. आपले नवीन खाते २१ जन्मासाठी जमा करायचे आहे.
  2. (२) वैश्विक नाटकाच्या रहस्याला बुद्धीमध्ये ठेवून ज्ञान योगाच्या अभ्यासाशिवाय कोणत्याही गोष्टी मध्ये जायचे नाही. सर्व कर्मभोग चुक्तू करायचे आहेत.

वरदान:-

लगन किंवा आकर्षणाच्या अग्नीद्वारे एका दिपका पासून अनेक दीपक जागृत करणारे खरे सेवाधारी भव.

जसे दिपवाळीला एका द्वारे अनेक दिपक प्रज्वलित करतात आणि दीवाळा साजरी करतात. दिपका मध्ये अग्नी असते, तसेच तुम्हा दीपका मध्ये लगनची, आकर्षणाची अग्नी आहे. जर एक एक दीपकाचे, एका दीपक सोबत लगन असेल तर, हीच खरी दिवाळ आहे. तर पाहायचे आहे की आम्ही दीपक लगन लावून, अग्नी रुप बनणारे, आपल्या प्रकाशा द्वारे अज्ञानाचा अंधार, नष्ट करणारेच खरे सेवाधारी आहोत.

बोधवाक्य:-

एक बळ, एक भरोसा या धर्माला नेहमी पक्के करा, तर विषय विकारुपी भवऱ्या मधून सहज निघाल.

||| ओम शांती |||

ओम शांती.