14-05-2022
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा
मधुबन
"गोड
मुलाने –शरीर निर्वाह अर्थ कर्म जरूर करा, परंतु कमीत कमी आठ तास बाबांची आठवण करून
संपूर्ण विश्वाला शांतीचे दान द्या. आप समान बनवण्याची सेवा करा. "
प्रश्न:-
सूर्यवंशी
घराण्यांमध्ये श्रेष्ठ पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ काय आहे?
उत्तर:-
सूर्यवंशी
घराण्यांमध्ये श्रेष्ठ पद मिळवायचे असेल तर १) बाबाची आठवण करा, आणि दुसऱ्यांनाही
सांगा. जेवढे जेवढे स्वदर्शन चक्रधारी बना, आणि बनवाल, तेवढे श्रेष्ठ पद प्राप्त
मिळेल. २) पुरुषार्थ करून पास विद ऑनर बना, म्हणजे चांगल्या गुणांने पास व्हा. असे
कोणतेही कर्म करू नका ज्याची सजा खावी लागेल. सजा खाणाऱ्याचे पद भ्रष्ट होते.
गीत:-
इस पाप की
दुनिया से …
ओम शांती।
ही आहे मुलांची प्रार्थना. कोणत्या मुलांची? ज्यांनी अजून पर्यंत बाबाला ओळखलेले
नाही. तुम्ही मुले जाणता की या पापाच्या दुनियेतून बाबा आम्हाला पुण्याच्या
दुनियेमध्ये घेऊन जात आहेत. तेथे सदैव आरामच आराम आहे. दुःखाचे नाव निशाणही नाही.
तेव्हा स्वतःला प्रश्न विचारा की आम्ही त्या सुखधामातून पुन्हा या दुःखधाम मध्ये कसे
आलो? हे तर सर्व जण जाणतात, की भारत प्राचीन देश आहे. भारतच सुखधाम होता. एकच भगवान
भगवतीचे राज्य होते. गॉड कृष्णा, गाँड राधे किंवा गाँड नारायण, गाँडेज लक्ष्मी
राज्य करत होते. हे सर्वजण जाणतात तरीही भारतवासी स्वतःला पतित भ्रष्टाचारी का
म्हणतात ? समजतात पण भारत सोन्याची चिमणी होता. पारसनाथ, पारसनाथीनीचे राज्य होते.
पुन्हा या भ्रष्टाचारी अवस्थेला कसे प्राप्त केले? बाबा समजवतात, माझा पण येथे जन्म
होतो. परंतु माझा दिव्य जन्म आहे, हे तुम्ही जाणता. आम्ही शिव वंशी आहे, आणि
प्रजापिता ब्रह्मा कुमार, कुमारी आहोत. म्हणून बाबा समजवतात, प्रथम हे विचारा
गॉडफादर ला तुम्ही ओळखता? ते म्हणतील वडील आहेत ना, मग संबंध का विचारता. पिता तर
तो झाला. शिव वंशी सर्व आत्मा आहेत, म्हणजे सर्वजण भाऊ भाऊ आहेत. साकार प्रजापिता
ब्रह्मा शी तुमचा काय संबंध आहे ? तर सर्व जण म्हणतील पिता आहे ना . ज्यांना आदी
देव पण म्हटले जाते. शिव झाले निराकार बाबा. ते झाले अविनाशी. आत्मा पण अविनाशी
आहेत. बाकी साकार एक शरीर सोडून दुसरे घेतात. निराकार शिव वंशी आहेत, यामध्ये कुमार
कुमारी म्हणत नाहीत. आत्म्यामध्ये कुमार, कुमारी पणा असत नाहीत. प्रजापिता ब्रह्मा
ची मुले आहेत तेव्हा कुमार कुमारी असतात. शिव वंशी तर पहिल्यापासूनच आहात. शिवबाबा
पुनर्जन्मा मध्ये येत नाहीत. आम्ही आत्मा पुनर्जन्मा मध्ये येतो. बर तुम्ही जे
पुण्यात्मा होता पुन्हा पाप आत्मा कसे बनलात? बाबा म्हणतात तुम्ही भारतवासींनी स्वतः
स्वतःला थप्पड मारलेली आहे. परमपिता पण म्हणतात आणि सर्वव्यापी समजतात. पुण्यात्मा
बनवणार्या बाबाला तुम्ही कुत्रे, मांजर, दगड, धोंड्या मध्ये सर्वव्यापी मानलेले आहे.
तो बेहदचा पिता आहे, ज्याची तुम्ही आठवण करता. तेच प्रजापिता ब्रह्माच्या मुखाद्वारे
ब्राह्मण रचतात. तुम्ही ब्राह्मण पुन्हा देवता बनता. पतिता पासून पावन बनवणारा एकच
बाप आहे. ज्यांची तुम्ही सर्वात जास्त निंदा केलेली आहे. म्हणून तुमच्यावर धर्मराजा
द्वारे केस चालेल. तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे पाच विकार रुपी रावण. तुमची आहे
रामाची बुद्धी, बाकी सर्वांची आहे रावण बुद्धी. रामराज्या मध्ये तुम्ही किती सुखी
होता. रावण राज्यांमध्ये तुम्ही किती दु:खी आहात . तेथे आहे पावन राजाई. येथे आहे
पतित राजाई. आता कोणाच्या मतावर चालायचे? पतित पावन तर एक निराकार आहे. ईश्वर
सर्वव्यापी आहे, ईश्वर हाजिरा हजूर आहे. शपथ पण अशी घेतली जाते. हे फक्त तुम्ही मुले
जाणता की, बाबा यावेळी हजर आहे. आम्ही डोळ्याद्वारे बघतो. आत्म्याला माहिती झालेले
आहे परमपिता परमात्मा या शरीरामध्ये आलेले आहेत. आम्ही जाणतो, ओळखतो . शिवबाबा
पुन्हा ब्रह्मामध्ये प्रवेश होऊन आम्हाला वेद शास्त्रांचे सार आणि सृष्टीच्या आदी,
मध्य, अंताचे ज्ञान देऊन, त्रिकालदर्शी बनवत आहेत. स्वदर्शन चक्रधारीलाच
त्रिकालदर्शी म्हटले जाते. विष्णुला हे चक्र दिले जाते. तुम्ही ब्राह्मणच पुन्हा
देवता बनता. देवताची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र आहेत. तुमचे शरीर तर विकारापासून
बनलेले आहे. तुमची आत्मा शेवटी पवित्र होते परंतु शरीर तर पतित आहे ना. म्हणून
तुम्हाला स्वदर्शन चक्र देऊ शकत नाहीत. तुम्ही संपूर्ण बनता पुन्हा विष्णूच्या विजय
माळेमध्ये येता. रुद्र माळा आणि पुन्हा विष्णुची माळा. रुद्र माळा आहे निराकारी आणि
ते जेव्हा साकार मध्ये राज्य करतात तेव्हा माळ बनते. तरी या सर्व गोष्टींना तुम्ही
आता जाणत आहात. गातात पण पतित पावन या म्हणून, तर जरूर एकच झाले ना. सर्व पतितांना
पावन बनवणारा एकच बाबा आहेत, ते पतित-पावन मोस्ट बिलवेड, निराकार गॉड फादर म्हणजे
अतिप्रिय, निराकार ईश्वरीय पिता आहेत. तो आहे मोठा बाबुल. छोट्या बाबा ला तर सर्वजण
बाबा बाबा म्हणत राहतात. जेव्हा दुःख होते तेव्हा परमपिता परमात्माची आठवण केली जाते.
या समजण्याच्या गोष्टी आहेत. प्रथम ह्या गोष्टी समजावयाच्या आहेत. परमपिता
परमात्म्याशी आपला काय संबंध आहे ? शिवजयंती तर साजरी केली जाते. निराकार परमपिता
परमात्मा ची खूप मोठी महिमा आहे. जेवढी मोठी परीक्षा तेवढे त्यांना नाव मिळते.
बाबाचे नाव तर खूप मोठे आहे. देवतांची महिमा तर सर्वसामान्य आहे.
सर्वगुणसंपन्न, 16 कला
संपूर्ण… सर्वात मोठी हिंसा आहे काम कटारी चालवूण, एक मेकाला आदी, - मध्य- अंत दुःख
देतात. ही आहे सर्वात मोठी हिंसा. आता तुम्हाला डबल अहिंसक बनायचे आहे. भगवानुवाच -
हे मुलांनो, तुम्ही आत्मा आहात, मी परमात्मा आहे. तुम्ही 63 जन्म विषय सागरामध्ये
राहिला आहात. आत्ता मी तुम्हाला क्षीरसागरा मध्ये घेऊन जात आहे . बाकी अंतकाळी थोडा
वेळ तुम्ही पवित्रतेची प्रतिज्ञा करा. हे तर चांगले मत आहे ना. म्हणतात पण आम्हाला
पावन बनवा. पावन आत्मा मुक्तीधाम मध्ये राहतात. सतयुगामध्ये आहे जीवन मुक्ती. बाबा
म्हणतात जर सूर्यवंशी बनायचे आहे तर पूर्ण पुरुषार्थ करा. माझी आठवण करा आणि इतरांना
पण आठवण द्या. जेवढे जेवढे स्वदर्शन चक्रधारी बनाल आणि बनवाल तेवढे श्रेष्ठ पद
प्राप्त कराल. बघा ही प्रेम मुलगी डेहराडूनला राहते. एवढे सर्व डेहराडून निवासी
स्वदर्शन चक्रधारी तर नव्हते. हे कसे बनले? प्रेम मुलीने आप समान बनवले. असे आप
समान बनवत बनवत दैवी झाडाची वृद्धी होते. आंधळ्यांना डोळस बनवण्याचा पुरुषार्थ
करायचा आहे ना. तुम्हाला ८ तास सूट आहे. शरीर निर्वाह अर्थ काम धंदा करायचा आहे.
जेथे जाल तेथे प्रयत्न करून माझी आठवण करा. जेवढे तुम्ही बाबाची आठवण करता म्हणजे
तुम्ही शांतीचे दान संपूर्ण सृष्टीला देता. योगातून शांतीचे दान देणे काही अवघड नाही.
हां कधीकधी योगामध्ये बसवले जाते, कारण संघटनामुळे बल एकत्रित मिळते. बाबाने
समजावलेले आहे शिव बाबांची आठवण करून त्यांना म्हणा बाबा, हे आमच्या कुळातले आहेत
यांच्या बुद्धीचे कुलूप उघडा. ही पण आठवण करण्याची युक्ती आहे. स्वतः तर अभ्यास
करायचा आहे, चालता-फिरता शिवबाबा ची आठवण करण्याचा. बाबा यांच्यावर दया करा. दया
करणारे दयावान तर एक बाबा आहेत. हे भगवान यांच्यावर रहम (दया) करा. तेच दयावान,
ज्ञानसंपन्न, आशीर्वाद करणारे आहेत. पवित्रते मध्ये पण संपूर्ण आहे, प्रेमामध्ये पण
संपूर्ण आहे. तेव्हा ब्राह्मण कुलभूषणां मध्ये पण परस्परांमध्ये किती प्रेम असायला
पाहिजे . कोणालाही दुःख द्यायचे नाही. तेथे पशुपक्षी पण कोणाला दुःख देत नाहीत.
तुम्ही मुले घरामध्ये राहत असताना भाऊ भाऊ परस्परांमध्ये लढता, थोड्या थोड्या
गोष्टींसाठी. तेथे तर पशुपक्षी पण लढत नाहीत. तुम्हाला पण हे शिकायचे आहे. नाही
शिकला तर बाबा म्हणतात तुम्ही खूप सजा खाल. पद भ्रष्ट होईल. तर असे सजा लायक आम्ही
का बनावे . पास विद आँनर व्हायचे आहे ना . पुढे जाऊन बाबा सर्व साक्षात्कार करत
राहतील. आता थोडा समय आहे म्हणून बाबा लवकर करा. आजारपणा मध्ये पण सर्वांना म्हणतात
ना राम राम म्हणा, मनातून पण म्हटले जाते. शेवटी पण कोणी कोणी खूप पुढे जातील.
मेहनत करून पुढे जातात. तुम्ही खूप आश्चर्यकारक गोष्टी बघाल. नाटकाच्या शेवटी खूप
आश्चर्यकारक भूमिका असतात ना. शेवटीच वाहवा होते. त्यावेळी तर खूप खुशीमध्ये राहाल.
ज्यांच्यामध्ये ज्ञान नाही ते तर बेहोष होऊन जातील. डॉक्टर ऑपरेशनच्या वेळी कोणाही
कमजोराला समोर उभे करत नाहीत. फाळणीच्या वेळी काय झाले, सगळ्यांनी पाहिले ना. ही तर
खूप दर्दनाक वेळ आहे. याला खुने नाहक खेळ म्हटले जाते. हे बघण्यासाठी पण तुमच्या
मध्ये खूप हिम्मत असली पाहिजे. तुमची आहे 84 जन्माची कहाणी. आम्ही तेच देवी-देवता
राज्य करत होतो. पुन्हा मायेच्या वशीभूत होऊन वाम मार्गामध्ये गेलो, आता पुन्हा
देवता बनत आहोत. हे स्मरण करत राहिले तरीपण बेडा पार होईल. हेच स्वदर्शनचक्र आहे
ना. अच्छा
गोड गोड खूप वर्षांनी
भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बाप दादाची स्नेह पूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक
पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाप समान
सर्व गुणांमध्ये संपूर्ण बनायचे आहे. परस्परांमध्ये खूप प्रेमाने राहायचे आहे. कधीही
कोणाला दुःख द्यायचे नाही.
२) चालता-फिरता
बाबांची आठवण करण्याचा अभ्यास करायचा आहे. आठवणी मध्ये राहून संपूर्ण विश्वाला
शांतीचे दान द्यायचे आहे.
वरदान:-
ज्ञानाच्या
रहस्यांना समजून सदैव स्थिर राहणारे निश्चय बुद्धी विघ्नविनाशक भव.
विघ्नविनाशक
स्थितीमध्ये राहिल्याने कितीही मोठे विघ्न खेळाप्रमाणे अनुभव होईल. खेळ समजल्याने
विघ्नांना कधी घाबरणार नाही, परंतु खुशी खुशी ने विजयी बनाल, आणि डबल लाईट राहाल.
नाटकाच्या ज्ञानाच्या स्मृतीने प्रत्येक विघ्न नविन वाटणार नाही. कोणतीही नवीन
गोष्ट वाटणार नाही, खूप जुनी गोष्ट आहे, अनेक वेळा विजयी बनलेले आहोत- असे निश्चय
बुद्धी ज्ञानाच्या रहस्याला समजणाऱ्या मुलांचे यादगार अचल घर आहे.
बोधवाक्य:-
दृढतेची शक्ती
बरोबर असेल तर सफलता गळ्याचा हार बनेल.
मातेश्वरीजींची अनमोल
महावाक्य:-
आम्ही जे चांगली वाईट
कर्म करतो त्याचे फळ अवश्य मिळते. जसे कोणी दान पुण्य करतात, यज्ञ हवन करतात, पूजा
पाठ करतात तर ते समजतात की आम्ही ईश्वर अर्थ जे पण दान केलेले आहे ते परमात्म्याच्या
दरबारामध्ये पोहोचलेले आहे. जेव्हा आम्ही मरु तेव्हा ते फळ अवश्य मिळेल, आणि आमची
मुक्ती होऊन जाईल, परंतु हे तर आम्ही जाणलेले आहे की असे करण्याने सदा काल साठी
फायदा होत नाही. हे तर जसे कर्म आम्ही करू त्याच्यातून अल्पकाल क्षणभंगुर सुखाची
प्राप्ती आवश्य होते. परंतु जोपर्यंत प्रत्यक्ष जीवन सदासुखी बनत नाही तोपर्यंत
त्याचा मोबदला मिळू शकत नाही. जरी आम्ही कोणाला विचारले की, हे जे तुम्ही करता असे
करण्याने तुम्हाला पुर्ण लाभ मिळाला? तर त्यांच्याजवळ काही उत्तर नसते. आता
परमात्म्या जवळ पोहोचलेले आहे किंवा नाही ते आम्हाला काय माहीत ? जोपर्यंत आपल्या
वास्तविक जीवनामध्ये कर्म श्रेष्ठ बनत नाहीत, तोपर्यंत कितीही मेहनत केली तरीही
मुक्ती, जीवन मुक्ती प्राप्त होत नाही . बरे पुण्य केले तर त्या करण्याने विकर्म तर
भस्म नाही झाले, तर मुक्ती, जीवनमुक्ती कशी प्राप्त होईल? एवढे संत महात्मा आहेत
जोपर्यंत त्यांना कर्माचे ज्ञान नाही, तोपर्यंत ते कर्म अकर्म होऊ शकत नाही, न ते
मुक्ती, जीवन मुक्तीला प्राप्त करतील. त्यांना तर हे पण माहीत नाही की खरा धर्म काय
आहे, खरे कर्म काय आहे, फक्त तोंडाने राम राम म्हणणे यामुळे काही मुक्ती मिळत नाही.
बाकी असे समजणे की मरणा नंतर आम्हाला मुक्ती मिळेल. त्यांना हे माहीतच नाही की
मेल्यानंतर काय फायदा होईल. काहीच नाही. जरी मनुष्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगले
कर्म केली, वाईट कर्म केली तेही या जीवनामध्ये भोगावे लागते. हे संपूर्ण ज्ञान
आम्हाला परमात्मा शिक्षका द्वारे मिळत आहे, की कसे शुद्ध कर्म करून आपले प्रत्यक्ष
जीवन बनवायचे आहे. अच्छा. ओम शांती.