14-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,या शरीराची किंमत तेव्हाच आहे,जेव्हा यामध्ये आत्मा प्रवेश करेल,परंतु सजावट शरीराची होते,आत्म्याची नाही.

प्रश्न:-
मुलांचे कर्तव्य काय आहे, तुम्हाला कोणती सेवा करायची आहे?

उत्तर:-
तुमचे कर्तव्य आहे,आपल्या समवयस्कांना नरा पासून नारायण,नारी पासून लक्ष्मी बनवण्याची युक्ती सांगणे.तुम्हाला आता भारताची खरी आत्मिक सेवा करायची आहे.तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे,तर तुमची बुद्धी आणि चलन खूप शुद्ध पाहिजे. कोणत्याही व्यक्तीमध्ये जरापण मोह नको.

गीत:-
नेत्रहीन मनुष्यांना रस्ता दाखवा,हे प्रभू.

ओम शांती।
डबल ओम शांती.तुम्हा मुलांना प्रतिसाद द्यायला पाहिजे ओम शांती.आपला स्वधर्म शांती आहे.तुम्ही आता शांतीसाठी थोडेच कुठे जाल? मनुष्य मनाच्या शांतीसाठी साधुसंताच्या जवळ जातात ना.आता मन-बुद्धी तर आत्म्याचे कर्मेंद्रिये आहेत.जसे या शरीराचे कर्मेंद्रिये आहेत,तसेच मन बुद्धी आणि चक्षू.आता चक्षू तर हे नेत्र पण आहेत,तसे ते नाहीत.असे म्हणतात,हे प्रभू नेत्रहीनला रस्ता दाखवा.आता प्रभू किंवा ईश्वर म्हटल्यामुळे,पित्याच्या प्रेमाची भासना मिळत नाही.पित्याकडून तर मुलांना वारसा मिळतो.येथे तर तुम्ही पित्याच्या समोर बसले आहात.तुम्हाला कोण शिकवत आहे.तुम्ही असे पण म्हणत नाहीत, की परमात्मा किंवा प्रभू शिकवत आहेत.तुम्ही म्हणाल शिवबाबा शिकवत आहेत.बाबा अक्षर अगदीच सहज सोपे आहे.बाप दादा पण आहेत.आत्म्याला आत्माच म्हटले जाते.तसे ते परमात्मा आहेत,ते म्हणतात,मी परम आत्मा म्हणजे तुमचा पिता आहे,परत मज परमात्म्याचे, वैश्विक नाटका नुसार नाव शिव ठेवले आहे.नाटकांमध्ये सर्वांचे नाव तर पाहिजे ना.शिवाचे मंदिर पण आहे.भक्तिमार्ग मध्ये एका नावाच्या ऐवजी,अनेक नाव ठेवली आहेत आणि परत अनेक मंदिरं बनवत राहतात.गोष्ट एकच आहे. सोमनाथ चे मंदिर किती मोठे आहे, किती सजावट करतात.महल इत्यादीची पण खूप सजावट करतात. आत्म्याची तर काहीच सजावट नाही, तसेच परमात्म्याची पण काहीच सजावट नाही,ते तर बिंदी आहेत. बाकी जी पण सजावट होते शरीराची.बाबा म्हणतात,न माझी सजावट होती,न आत्म्याची सजावट आहे.आत्मा तर बिंदू आहे.इतका छोटा बिंदू तर काहीच भूमिका करू शकणार नाही.ती छोटीशी आत्मा शरीरांमध्ये प्रवेश करते,तर शरीराची अनेक प्रकारे सजावट होते.मनुष्यांची किती नावं आहेत.राजा राणीचा श्रूंगार कसे करतात,आत्मा तर अगदी साधी,बिंदू आहे.आता तुम्हा मुलांनी समजले आहे,आत्माच ज्ञान धारण करते.बाबा म्हणतात माझ्यामध्ये पण ज्ञान आहे ना. शरीरांमध्ये थोडेच ज्ञान असते.मज आत्म्यामध्ये ज्ञान आहे,मला हे शरीर तुम्हाला ज्ञान देण्यासाठी घ्यावे लागते.शरीरा शिवाय तर तुम्ही ऐकू शकत नाहीत.आता हे गीत बनवले आहे, नेत्रहीनला रस्ता दाखवा, तर काय शरीराला रस्ता दाखवायचा आहे,नाही.आत्म्याला दाखवायचा आहे,आत्मा बोलवते,तर दोन नेत्र आहेत.तीन तर होऊ शकत नाहीत. तिसऱ्या नेत्राचा तिलक पण येथे मस्तका मध्ये देतात.काही फक्त बिंदू सारखे देतात,कोणी रेषा ओढतात. आत्मा तर बिंदू आहे ना.बाकी ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. आत्म्याला प्रथम हा ज्ञानाचा तिसरा नेत्र नव्हता.कोणत्याही मनुष्यमात्राला हे ज्ञान नाही,म्हणून ज्ञान नेत्र हीन म्हटले जाते.बाकी हे डोळे तर सर्वांना आहेत.साऱ्या दुनिया मध्ये कोणाला ही तिसरा नेत्र नाही.तुम्ही सर्वोत्तम ब्राह्मण कोणाचे आहात?तुम्ही जाणतात भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्गा मध्ये खूप फरक आहे.तुम्ही रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अंतला जाणून चक्रवर्ती राजा बनतात.जसे भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा पास झाल्यानंतर उच्चपद मिळवतात परंतु येथे काही शिक्षणाद्वारे खासदार इत्यादी बनत नाहीत.येथे तर निवडणूक होते,मता द्वारे खासदार इत्यादी बनतात.आता तुम्हा आत्म्यांना बाबाची श्रीमत मिळत आहे.दुसरे कोणी असे म्हणणार नाहीत की,आम्ही आत्म्याला मत देतो.ते तर सर्व देहाभिमानी आहेत. बाबा येऊन देही अभिमानी बनवणे शिकवतात.सर्व देह-अभिमानी आहेत.मनुष्य शरीराचा खूप दिखावा करतात.येथे तर बाबा आत्म्यालाच पाहतात.शरीर तर नाशवंत आहे,कवडी तुल्य आहे. जनावरांची तरीही चमडी इत्यादी विकते,मनुष्याचे शरीराचे तर काहीच कामाला येत नाही.आता बाबा येऊन तुम्हाला हिरेतुल्य बनवतात.तुम्ही मुलं जाणता आम्ही ब्राह्मणच देवता बनत आहोत, तर हा नशा राहिला पाहिजे परंतु हा नशा पण क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे राहतो.धनाचा पण नशा राहतो ना.आता तुम्ही मुलं खूप धनवान बनतात.आत्ता तुमची खूप कमाई होत आहे.तुमची महिमा पण अनेक प्रकारची आहे.तुम्ही फुलांची बाग बनवत आहात.सतयुगाला फुलांची बाग म्हटले जाते.याचे कलम कधी लागते,हे पण कोणालाही माहिती नाही.तुम्हाला बाबा समजवतात.बाबांना बोलवतात,हे भगवान या,त्यांना माळी म्हणणार नाही.माळी तुम्ही मुल आहात,जे सेवाकेंद्र संभळतात.माळी पण अनेक प्रकारचे असतात.बागवान पण एकच आहेत. मुगल गार्डन च्या माळ्याला पगार पण जास्त असेल ना.ते बाग अशी सुंदर बनवतात,तर अनेकजण पाहण्यासाठी येतात.मुगल लोक खूप शौकीण होते,त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला तर ताजमहाल बनवले.त्याचे नाव चालत येते.खूप चांगले चांगले स्मृतिस्थळ बनवले आहेत.तर बाबा समजवतात मनुष्याची किती महिमा होते. मनुष्य तर मनुष्यच आहेत. लढाईमध्ये पण अनेक मनुष्य मरतात परत काय करतात,रॉकेल पेट्रोल टाकून नष्ट करतात.काही तसेच पडून राहतात.दफन थोडेच करतात, काहीच मान नाही.तर आता तुम्हाला खूप नारायणी नशा चढलेला पाहिजे.हा विश्वाच्या मालक पणाचा नशा आहे. सत्यनारायणाची कथा आहे,तर जरूर नारायणच बनतील. आत्म्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो,देणारे शिवपिता आहेत. तिजरी ची कथा पण आहे ना.या सर्वांचाअर्थ बाबाच समजवतात.कथा ऐकवणारे काहीच समजत नाहीत. अमर कथा पण ऐकवतात.आता अमरनाथला खूप दूर दूर जातात.बाबा येथे येऊन ऐकवतात.वरती तर ऐकवत नाहीत. तेथे थोडेच पार्वतीला बसून अमर कथा ऐकवतील.या कथा ज्या बनवल्या आहेत,याची पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.तरीही असेच होईल.बाबा ज्ञान आणि भक्तीचा फरक तुम्हाला सांगतात.आत्ता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे.असे म्हणतात,हे प्रभु अंधाला मार्ग दाखवा.भक्तिमार्गा मध्येच बोलतात ना.बाबा येऊन तिसरा नेत्र देतात,हे तुमच्या शिवाय कोणालाही माहिती नाही.ज्ञानाचा तिसरा नेत्र नाही तर अज्ञानी आहेत.डोळे पण कोणाचे कसे,कोणाचे कशी असतात. कोणाचे डोळे खूप सुंदर असतात, परत त्यांच्यासाठी बक्षीस पण मिळते आणि नाव ठेवतात मिस इंडिया,इत्यादी.आता बाबा मुलांना खूप श्रेष्ठ बनवत आहेत.स्वर्गामध्ये तर नैसर्गिक सुंदराता असते.कृष्णा ची इतकी महिमा का आहे,कारण क्रमांक एक मध्ये कर्मातीत अवस्थेला प्राप्त करतात ना,म्हणून क्रमांक एकचे गायन आहे.बाबा सन्मुख समजवतात.बाबा नेहमी म्हणतात मुलांनो,मज पित्याची आठवण करा (मनमनाभव).मुलांमध्ये पण क्रमानुसार तर आहेत ना.लौकिक पित्याला समजा ४-५मुलं आहेत, त्याच्या मध्ये जे हुशार असतील, त्यांना क्रमांक एक देतील.तर माळेचे मनी झाले ना.असे म्हणतात,हा दुसरा, तिसरा आहे.एक सारखे सर्व नसतात.पित्याचे प्रेम पण क्रमानुसर होते.त्या हद्दीच्या गोष्टी आहेत, या बेहद्दच्या गोष्टी आहेत.ज्या मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, त्यांच्या बुद्धी आणि चलन खूप शुद्ध राहते.एक फुलांचा राजा असतो.तर हे ब्रह्मा आणि सरस्वती फुलांचे राजा- राणी झाले ना.ज्ञान आणि आठवण दोन्हीमध्ये हुशार आहेत. तुम्ही जाणता आम्ही देवता बनत आहोत.मुख्य ८ रत्न बनतात.प्रथम फूल आहे,परत युगल दाना, ब्रह्मा-सरस्वती आहेत.वास्तव मध्ये तुमचे पूजन होत नाही,स्मरण आहे. तुमच्या वरती फुलं चढवू शकत नाहीत.फुल तेव्हाच चढवतील, जेव्हा शरीर पवित्र मिळेल.येथे कोणाचे शरीर पवित्र नाही.काम रुपी विषा द्वारे संतती होते,म्हणून विकारी म्हटले जाते.या लक्ष्मीनारायणला संपूर्ण निर्विकारी म्हणतात.स्वर्गामध्ये मुलं तर होत असतील ना.असे नाही, कोणत्या ट्यूब पासून मुलं होतील.या पण समजण्याच्या गोष्टी आहेत.तुम्हा मुलांना येथे ७ रोज भट्टीमध्ये बसवले जाते.भट्टीमध्ये परत काही पक्क्या विटा तयार होतात,काही कच्च्या राहतात.भट्टीचे उदाहरण देतात ना. आता वीट भट्टीचे उदाहरण ग्रंथांमध्ये थोडेच होऊ शकते,परय त्याच्यामध्ये मांजराची पण गोष्ट आहे. गुलबकावली च्या गोष्टींमध्ये मांजरीचे पण नाव आहे,ती दीपक विझवत होती.तुमचे पण हेच होते ना.माया मांजर विघ्न घालते.तुमच्या अवस्थेला खाली घेऊन येते.देह अभिमान प्रथम क्रमांकाचा विकार,परत दुसरे विकार येतात.मोह पण खूप असतो.कन्या म्हणते मी भारताला स्वर्ग बनवण्याची आत्मिक सेवा करते,तर मात पिता म्हणतात आम्ही परवानगी देणार नाही.हा पण खूप मोह आहे.तुम्हाला मायेचे मांजर बनायचे नाही.तुमचे मुख्य उद्देश हे आहे.बाबा मनुष्यापासून देवता,नरापासून नारायण बनवतात.तुमचे पण कर्तव्य आहे,आपल्या समवयस्काची सेवा करणे,भारताची सेवा करणे.तुम्ही जाणतात,आम्ही काय होतो,आता कसे बनलो आहोत.आता परत पुरुषार्थ करून राजांचे राजा बनायचे आहे.तुम्ही जाणता आम्ही आपले राज्य स्थापन करत आहोत.कोणत्या कष्टाची गोष्ट नाही.विनाशासाठी वैश्विक नाटकांमध्ये युक्ती आहे.यापुर्वी लढाई लागली होती.जेव्हा पूर्ण तयारी होईल,सर्व फुलासारखे बनतील,तेव्हा विनाश होईल.कोणी राजा फुल आहेत, कोणी गुलाब,कोणी मोती आहेत. प्रत्येक जण स्वतःला चांगल्या रीतीने जाणतात की,आम्ही रुईचे फुल आहोत की,दुसरे फुल आहोत.अनेक आहेत,ज्यांना ज्ञानाची काहीच धारणा होत नाही,क्रमानुसार तर बनतील ना. एक तर अगदीच उच्च नाही तर, अगदीच कनिष्ठ बनतील. राजधानी येथेच बनते.ग्रंथांमध्ये दाखवले आहे पांडवांनी डोंगरावरती जाऊन शरीर सोडले,परत काहीच माहिती नाही. कथा तर खूप बनवल्या आहेत.अशा कोणत्या गोष्टी नाहीत.आता तुम्ही मुलं खूप स्वच्छ बुद्धी बनत आहात. बाबा तुम्हाला अनेक प्रकारे समजवत राहतात,खूप सहज आहे,फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे.बाबा म्हणतात मीच पतित-पावन आहे.तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही पतित आहेत.आता पावन बनायचे आहे,आत्मा पवित्र बनते तर शरीर पवित्र बनते.आता तुम्हाला खूप कष्ट घ्यायचे आहेत. बाबा म्हणतात,मुलं खूप कमजोर आहेत,आठवण विसरतात.बाबा (ब्रह्मा बाबा)स्वत: आपला अनुभव सांगतात,भोजन करताना आठवण करतो,शिवबाबा आम्हाला खाऊ घालतात,परत विसरतो,परत स्मृतीमध्ये येते. तुमच्यामध्ये पण क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे आहेत.काहीतरी बंधन मुक्त असताना पण फसून मरतात,धर्माची मुलं बनवतात.आता तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र देणारे मिळाले आहेत,परत नाव दिले आहेत तिजरी ची कथा.आता तुम्ही नास्तिक पासून आस्तीक बनत आहात.मुलं जाणतात, बाबा बिंदू आहेत,ज्ञानाचे सागर आहेत.ते तर म्हणतात नावा रूपापेक्षा वेगळे आहेत.अरे ज्ञानाचे सागर तर जरूर ज्ञान देणारे असतील ना.यांचे लिंगरूप पण दाखवतात,परत त्यांना नावारूपा पेक्षा वेगळे कसे म्हणू शकतात? शेकडो नाव दिले आहेत.मुलांच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान चांगल्या रीतीने राहायला पाहिजे.असे म्हणतात परमात्मा ज्ञानाचे सागर आहेत,सारे जंगल कलम बनवा,तरी अंत मिळू शकत नाहीत.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आता आम्ही हिरेतुल्य बनत आहोत.आम्ही ब्राह्मणच देवता बनणारे आहोत,याच नशे मध्ये राहायचे आहे.बंधनमुक्त बनून सेवा करायची आहे.बंधनांमध्ये फसवायचे नाही.

(२) ज्ञान योगामध्ये हुशार बनून, फुलांच्या राजा सारखे बनायचे आहे.आपल्या समवयस्कांची सेवा करायची आहे.

वरदान:-
का,कसे या प्रश्नाच्या जाळ्याद्वारे नेहमी मुक्त राहणारेविश्व सेवाधारी चक्रवर्ती भव.

जेव्हा स्वदर्शन चक्र उजव्या बाजूला चालवण्याच्या ऐवजी चुकीच्या बाजूला चालते,तेव्हा मायाजीत बनण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या दर्शनाचे चक्र फिरवतात.यामुळे का कसे या प्रश्नाचे जाळे बनते,ते स्वतः रचना करतात आणि स्वतः फसतात,म्हणून ज्ञानसंपन्न बनून सुदर्शन चक्र फिरवत रहा.तसेच या प्रश्नाच्या जाळ्या पासून मुक्त होऊन, योगयुक्त,जीवनमुक्त चक्रवर्ती बनून बाबांचे सोबत विश्वकल्याणाच्या सेवेमध्ये चक्र लावत राहा,तर विश्व सेवाधारी चक्रवर्ती राजा बनाल.

बोधवाक्य:-
घोषवाक्य:- सरळ बुद्धी द्वारे योजना प्रत्यक्षात आणा,तर त्यामध्ये सफलता सामावलेली आहे.