14-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो आपला खरा खरा चार्ट ठेवा म्हणजे दिनचर्या लिहा तर अवस्था चांगली राहील. चार्ट ठेवल्यामुळे कल्याण होत राहील".

प्रश्न:-
कोणती आठवण जुन्या दुनियेपासून सहज किनारा करण्यास मदत करते?

उत्तर:-
जर हे आठवणीत राहिले की कल्प कल्प, बाबा कडून बेहदचा वारसा घेतो. आता पुन्हा आम्ही शिवबाबाची गोद घेतलेली आहे, वर्सा घेण्यासाठी. बाबांनी आम्हाला दत्तक घेतलेले आहे. आम्ही खरेखुरे ब्राह्मण आहोत. बाबा आम्हाला गीता ऐकवत आहेत. ह्या स्मृती मुळे जुन्या दुनियेपासून किनारा होतो.

ओम शांती।
तुम्ही मुले येथे बसलेले आहात, शिवबाच्या आठवणीमध्ये, तर तुम्ही जाणता तो आम्हाला सुखधामचा मालक पुन्हा बनवायला आलेले आहेत. मुलांची ना किती खुशी झाली पाहिजे, येथे बसून मुलांना खजाना मिळतो ना. महाविद्यालयात किंवा मध्ये विद्यापीठात कोणाच्याही बुद्धीमध्ये ह्या गोष्टी राहत नाहीत. तुम्ही जाणता की बाबा आम्हाला स्वर्गाचा मालक बनवत आहे.खुशी राहिली पाहिजे ना. यावेळी इतर सगळे विचार काढून एक बाबांची आठवण करायची आहे. येथे जेव्हा बसता तर बुद्धीमध्ये नशा राहिला पाहिजे की, आम्ही सुखधामचे मालक बनत आहोत.सुख आणि शांतीचा वर्सा आम्ही कल्प कल्प घेतो. मनुष्य तर काही जाणत नाहीत. कल्पा पूर्वी पण खूप मनुष्य अज्ञान अंधकारा मध्ये कुंभकर्णा सारखे झोपले होते पुन्हा असेच होईल. मुले समजतात आम्हाला बाबांनी दत्तक घेतलेले आहे. जो आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करत आहे. आता आम्ही ब्राह्मण आहोत. आम्ही खर्याखुर्या गीतेचा पाठ ऐकत आहोत. आम्ही बाबा कडून पुन्हा राजयोग आणि ज्ञान बलांनी वर्सा घेत आहोत. असे विचार यायला पाहिजेत. बाबा पण खुशीच्या आनंदाच्या गोष्टी ऐकवतो ना? समजतात मुले काम चितेवर बसून काळी भस्मीभूत झालेले आहेत. म्हणून अमर लोकातून मृत्यू लोकांमध्ये आलेली आहेत. तुम्ही पुन्हा म्हणतो आम्ही मृत्यूलोकातून अमर लोकामध्ये जात आहोत. बाबा म्हणतात आम्ही मृत्युलोक मध्ये जातो जेथे सगळ्यांचे मृत्यू झालेले आहे. त्यांना पुन्हा अमर लोकांमध्ये घेऊन जातो. शास्त्रांमध्ये तर काय काय लिहिलेले आहे. तो सर्वशक्तिमान आहे. जे पाहिजे ते करू शकतो. परंतु मुले जाणतात त्यांना बोलावले जाते, हे पतित पावन बाबा या, येऊन आम्हाला पतीता पासून पावन बनवा, दुःख नष्ट करून सुख द्या. यामध्ये काही जादू नाही. बाबा येतातच काट्या पासून फुल बनवण्यासाठी.

तुम्ही जाणता आम्हीच सुखधामचे देवता होतो. सतोप्रधान होतो. प्रत्येकाला सतोप्रधान पासून तमोप्रधाना मध्ये यायचेच आहे. मुलांना येथे बसतेवेळी आणखीनच आनंद झाला पाहिजे. आठवण आली पाहिजे. बाबाला संपूर्ण जग आठवण करते. हे मुक्तिदाता, हे मार्गदर्शक, हे पतितपावन या.बोलवतात तेव्हाच जेव्हा सर्व रावणराज्यामध्ये आहेत. सतयुगामधे थोडेच बोलवणार. यासर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.हे सर्व कोणी ऐकवले? बाबाची पण महिमा करतील, शिक्षक,सद्गुरूची पण महिमा करतील. हे तीनही एकच आहेत. हे तुमच्या बुद्धीमध्ये आहे. हे बाप, शिक्षक, सद्गुरु आहेत. शिव बाबांचा धंदाच आहे पतीतांना पावन बनवणे. पतित जरूर दु:खी असतील. सतो प्रधान सुखी, तमोप्रधान दुःखी होतात. या देवतांचा किती सतोगुणी स्वभाव आहे. येथे मनुष्यांचा कलयुगी तमोगुणी स्वभाव आहे. बाकी मनुष्य नंबर वार चांगले किंवा वाईट असतात. त्यामध्ये कधी असे नाही म्हणणार की, हे सर्व खराब आहेत. हा असा आहे म्हणून. तेथे वाईट लक्षण वाले कोण असत नाहीत. तो आहे देवी संप्रदाय. होय साहुकार आणि गरीब असतील. बाकी चांगले किंवा वाईट गुणांची तुलना तेथे होत नाही. सगळे सुखी राहतात,दुःखाचे नाव रुप पण नसते. नावच आहे सुखधाम. मुलांना बाबाकडून पूर्ण वर्सा घेण्याचा पुरुषार्थ करायला पाहिजे. आपले चित्र आणि लक्ष्मीनारायणाचा चित्र पण ठेऊ शकता. म्हणतील कोणीतरी यांना शिकवणारा आहे.हे तर भगवानुवाच आहे. ईश्वराला आपले शरीर नाही. तो येऊन उधार शरीर घेतो. गायन पण आहे "भागीरथ". तर जरूर रथावर विराजमान असणार. बैलावर थोडेच येणार. शिव आणि शंकर एकत्र दाखवलेले आहेत, म्हणून तर बैल दाखवलेला आहे. तेव्हा बाबा म्हणतात तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे. आम्ही बाबाचे बनलो आहोत. बाबा पण म्हणतात तुम्ही माझे आहात. बाबाला पद मिळवण्याची खुशी नाही. शिक्षक तो शिक्षक आहे त्यांना शिकवायचे आहे. बाबा म्हणतात मुलांनो मी सुखाचा सागर आहे. आता तुम्हाला अतिंद्रिय सुखाची भासना येते, जेव्हा आम्ही तुम्हाला दत्तक घेतलेले आहे. दत्तक पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पुरुष पण मुलीला दत्तक घेतात. ती समजते की हा माझा पती आहे, आता तुम्ही समजता शिवबाबांनी आम्हाला दत्तक घेतलेले आहे. दुनिया या गोष्टींना समजत नाही. त्यांचे दत्तकपण आहे एकमेकावर काम कटारी चालवणे. समजा कोणता राजा, मुलाला दत्तक घेतो तर सुखासाठी. परंतु ते अल्पकाळचे सुख आहे. सन्यासी पण दत्तक घेतात ना. ते म्हणतील हा आमचा गुरू आहे. तो म्हणेल हा माझा शिष्य आहे. किती प्रकारे दत्तक घेतात. पिता मुलांना दत्तक घेतात,त्यांना सुख देतात पुन्हा लग्न करून दुःखाचा वारसा देतात. गुरुंचे दत्तक घेणे पण किती फर्स्टक्लास आहे. हे आहे ईश्वरीय दत्तक, आत्म्यांना आपले बनवतात. आता तुम्ही मुलांनी सगळ्यांचे दत्तक घेणे बघितले आहे. संन्यासी असताना सुद्धा गायन करतात हे पतितपावन या. येऊन आम्हाला दत्तक घेऊन पावन बनवा. सर्वजण भाऊ आहेत.परंतु जेव्हा येऊन आपले बनवतील ना? म्हणतात बाबा आम्ही दुःखी झालेलो आहोत. रावणराज्याचा अर्थ पण समजत नाहीत. पुतळा बनवून जाळत राहतात. जसे कोणी दुःख दिले तर समजतात,त्यांच्यावर केस केली पाहिजे. परंतु हा केव्हापासून शत्रु बनलेला आहे? शेवटी हा शत्रु मरेल का नाही? या शत्रूला फक्त तुम्हीच ओळखता. त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला दत्तक घेतले जाते. हे पण तुम्ही जाणता, विनाश होणार आहे. ॲटॉमिक बॉब्स पण बनवलेले आहेत. ह्या ज्ञान यज्ञातूनच विनाशाची ज्वाला निघालेली आहे.आता तुम्ही समजता. रावणावर विजय प्राप्त करून पुन्हा नवीन सृष्टी वरती राज्य करु. बाकी इतर सर्व बाहुल्यांचा खेळ आहे. रावणाची बाहुली तर खूप खर्च करवते. मनुष्य खूप फालतू खर्च करतात. किती रात्रं दिवसाचा फरक आहे. ते खूप भटकून दुःखी होतात.धक्के खात राहतात. आणि आम्ही आता श्रीमतावर श्रेष्टाचारी सतयुगी स्वराज्य प्राप्त करत आहात. श्रेष्ठ ते श्रेष्ठ सतयुग स्थापन करणारा शिवबाबा आम्हाला श्रेष्ठ देवता, विश्वाचं मालक बनवत आहेत. श्री श्री शिवबाबा आम्हाला श्री बनवतात. श्री श्री फक्त एकालाच म्हटले जाते. देवतांना श्री म्हटले जाते, कारण ते पुनर्जन्मा मध्ये येतात ना. वास्तव मध्ये श्री विकारी राज्यांना पण म्हटले जात नाही.

आता तुमची बुद्धी किती विशाल झाली व्हायला पाहिजे. तुम्ही जाणता की आम्ही या ज्ञानाने डबल मुकुट धारी बनत आहोत. आम्ही डबल मुकुट वाले होतो आता एकही मकुट राहिलेला नाही, पतित आहेत ना. येथे लाईटचा मुकट कुणालाही देऊ शकत नाही. या चित्रांमध्ये जेथे तुम्ही तपस्या करत बसलेला आहात तेथे लाईटचा मुकट द्यायला नको. तुम्हाला डबल मुकटधारी भविष्यामध्ये बनवायचे आहे. तुम्ही मुले जाणता आम्ही बाबाकडून येथे डबल मुकुटधारी महाराजा महारानी बनण्यासाठी आलेलो आहोत. ही खुशी झाली पाहिजे. शिवबाबांची आठवण करुन,पतीता पासून पावन बनाल आणि स्वर्गाचे मालक बनाल. यामध्ये कोणतेही कष्ट नाही. येथे तुम्ही विद्यार्थी बसलेले आहात. तेथे बाहेर मित्र संबंधी जवळ जाण्यामुळे विद्यार्थी जीवनाचा विसर पडतो. पुन्हा मित्र संबंधीचे आठवण येते. मायेचा फोर्स आहे ना. होस्टेलमध्ये राहिल्याने चांगल्या रीतीने शिकता. बाहेर गेल्यामुळे संग दोषांमुळे खराब होता. येथून बाहेर जाता तर पुन्हा विद्यार्थी जीवनाचा नशा नाहीसा होतो. शिकवणाऱ्या ब्राह्मणीला पण बाहेर एवढा नशा राहणार नाही, जेवढा येथे राहील. हे मुख्य कार्यालय मधुबन आहे. विद्यार्थी शिक्षकांसमोर राहतात. इतर कोणता धंदा नाही. रात्रं दिवसाचा फरक आहे. काही तर संपूर्ण दिवसभरा मध्ये शिवबाबांची आठवण करत नाहीत. शिवबाबाचे मदतगार बनत नाहीत. शिवबाबाची मुले बनलेला आहात तर सेवा करा. सेवा करत नाही म्हणजे तो कपूत मुलगा आहे. बाबा तर समजतात, मुलांचे कर्तव्य आहे - माझी आठवण करा,अनुकरण करा तर खूप खूप कल्याण होईल. विकारी संबंध तर भ्रष्टाचारी आहेत. त्यांना विसरून जा. त्यांच्याशी संबंध ठेवू नका. बाबा तर समजवतात परंतु त्यांच्या नशिबात पण पाहिजे ना. बाबा म्हणतात चार्ट ठेवायचा आहे. या मध्ये पण खूप कल्याण आहे. कोणी तासभर पण आठवण करणे मुश्किल आहे. आठ तास आठवण तर शेवटी होणार आहे. कर्मयोगी तर आहात ना. कोणा कोणाला कधी कधी ऊत्साह आला की चार्ट ठेवतात. हे चांगले आहे. जेवढी बाबांची आठवण कराल तेवढा फायदाच आहे. गायन पण आहे. "अन्तकाळ जे हरीचे आठवण करत नाहीत, तर जन्म जन्मांतरचा जे ओझे आहे, वारंवार जन्म देवून साक्षात्कार करून, पून्हा सजा देतात. जसे "काशी कलवट" घेतल्याने झटकन पापांचा साक्षात्कार होतो. जाणीव होते की आम्हाला पापाची सजा मिळत आहे. खूप सजा खावी लागते. बाबांच्या सेवेमध्ये जे विघ्न घालतात ते शिक्षेच्या पात्र बनतात. बाबांच्या सेवेमध्ये जे विघ्न घालतात त्यांचा उजवा धर्मराज असतो. बाबा म्हणतात स्वतः स्वतः शीच प्रतिज्ञा करा. कारण बाबांच्या आठवणीनेच तुम्ही पावन बनणार, नाहीतर कसे बनाल. बाबा प्रतिज्ञा करवून घेतात. करा किंवा न करा. तुमची मर्जी. जो करेल त्याला मिळेल. खूप आहेत जे प्रतिज्ञा करतात, तरी पुन्हा वाईट काम करत राहतात.भक्ती मार्गामध्ये गायन करतात, माझे तर एक दुसरे कोणी नाही परंतु बुद्धीमध्ये आत्ता येते की आत्मा असे का गायन करत आलेली आहे. संपूर्ण दिवस गायन करत राहतात माझा तर एक गिरीधर गोपाल. बाबा जेव्हा संगम युगामध्ये येतील तेव्हा आपल्या घरी घेऊन जातील. कृष्णपुरी मध्ये जाण्यासाठी तुम्हाला शिकवत आहेत. राजकुमारांचे कॉलेज असते ना? जेथे राजकुमार राजकुमारी शिकतात. ती आहे हदची गोष्ट. कधी आजारी पडतात. कधी मरून पण जातात. ही तर राजकुमार राजकुमारी बनण्याची ईश्वरीय पित्याचे विद्यापीठ आहे. राजयोग आहे ना. तुम्ही नरा पासून नारायण बनता. तुम्ही बाबाकडून वारसा घेऊन सतयुगाचे राजकुमार राजकुमारी बनता. बाबा किती आनंदाच्या गोष्टी ऐकवत आहेत.या आठवणीत राहिल्या पाहिजेत. कोणी तर येथून बाहेर गेले की फसतात. बाबाची आठवण पण क्रमवार करतात. जे जास्त आठवण करतात ते इतरांनाही आठवण करायला लावतात. बुद्धीमध्ये हेच राहिले पाहिजे की कसे इतरांचे कल्याण करता येईल. बाहेरचे प्रजे मध्ये दास-दासी बनतील आणि येथील राजांचे दासदासी बनतील. पुढे जाऊन तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. तुम्ही पण अनुभव कराल की बरोबर आम्ही पूर्ण पुरुषार्थ केलेला नाही.खूप चमत्कार बघायला मिळतील. चांगल्या रीतीने शिकतील तेच राजा बनतील. बाबा किती सांगत राहतात.सेंटरला प्रदर्शनी देतात मुलांनी शिकून हुशार बनावे म्हणून. तेव्हा बाबा समजतील की बी.के. सेवा करणे जाणतात. सेवा कराल तर श्रेष्ठ पद मिळेल. म्हणून बाबा प्रदर्शनी बनवण्यावर जास्त भर देतात. ही चित्रे बनवणे तर साधारण गोष्ट आहे.हिमत्त करुन प्रदर्शनीची चित्रे बनवायला मदत केली पाहिजे, तर समजवून सांगायला पण मुलांना सहज होईल. बाबा समजतात शिक्षक, व्यवस्थापक थंड झालेले आहेत. काही काही ब्राह्मणी व्यवस्थापक बनतात तर देह अभिमानामध्ये येतात. स्वतःला मिया मिठू समजतात. मी खूप चांगल्या रीतीने चालते म्हणून. दुसऱ्यांना विचारले तर दहा गोष्टी ऐकवतील. माया खूप फेऱ्यांमध्ये घालते. मुलांना तर "सेवा आणि सेवेमध्ये" रहायचेचे आहे. बाबा दयावान, दुखहर्ता, सुखकर्ता आहेत. तर मुलांना पण तसे बनायचे आहे. फक्त बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबा म्हणतात माझी आठवण करा तर नर्कवासी पासून स्वर्गवासी बनाल. किती सहज आहे. बाबा म्हणतात माझी आठवण करा तर पतीता पासून पावन बनून, तुम्ही शांतीधाम, सुखांमध्ये याल. निश्चय झाला तर त्यांच्याकडून लिहून घेतले पाहिजे. लिहितात पण बरोबर ब्रह्मकुमार, कुमारी बाबा कडून वरसा घेत आहेत. तर समजतील अशा बाबाचे जरूर बनायला पाहिजे. शरण घेतली पाहिजे. तुम्ही बाबाच्या शरणमध्ये आलेला आहात. म्हणजेच धर्माची मुले (दत्तक) झालेला आहात.

अच्छा गोड गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बाप दादांची स्नेह पूर्वक आठवण, आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. बाबा समान रहमदिल, दुखहर्ता, सुखकर्ता बनायचे आहे.

2. संगदोषापासून आपली खूप खूप सांभाळ करायची आहे. एका बाबांचे अनुकरण करायचे आहे. सर्वांच्या कल्याणासाठी सेवा करायची आहे. कधी अहंकारा मध्ये येऊन मिया मिठू बनायचे नाही.

वरदान:-
विचारांच्या इशाऱ्याने संपूर्ण कारभार चालवणारे नेहमी प्रकाशाचे मुकुटधारी बना.

जी मुले सदा हलकी राहतात, त्यांचा संकल्प, वाणी, वेळ कधी व्यर्थ जात नाही तोच संकल्प येतो जो होणार आहे.जसे बोलण्यानी एखाद्या गोष्टीला स्पष्ट करतात, तसेच संकल्पाच्या आधारे संपूर्ण कारभार चालवतील. जेव्हा अशी विधी वापराल तेव्हा, हे साकार वतन सूक्ष्मवतन बनेल. त्यासाठी शांतीची शक्ती जमा करा, आणि प्रकाशाचे मुकुटधारी बना.

बोधवाक्य:-
या दुखधमापासून किनारा करा, तर कधी दुःखाची लहर येणार नाही.