14-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,संगमयुगा मध्येच तुम्हाला आत्मअभिमानी बनण्याचे कष्ट घ्यावे लागतात,सतयुग किंवा कलियुगा मध्ये हे कष्ट घ्यावे लागत नाहीत"

प्रश्न:-
श्रीकृष्णाचे नाव त्यांच्या मातपित्या पेक्षा अधिक प्रसिद्ध का आहे?

उत्तर:-
कारण श्रीकृष्णाच्या अगोदर ज्यांचा पण जन्म होतो,तो जन्म काही योग बळाद्वारे होत नाही. कृष्णाच्या मात पित्याने काही योगबळा द्वारे जन्म घेतला नाही. (२) पूर्ण कर्मीतीत अवस्था असणारे राधा कृष्णच आहेत,तेच सदगतीला प्राप्त करतात.जेव्हा सर्व पापं नष्ट होतात, तेव्हा पावन नवीन दुनिया मध्ये श्रीकृष्णाचा जन्म होतो, त्यालाच वैकुंठ म्हटले जाते.संगम युगामध्ये श्रीकृष्णाच्या आत्म्याने सर्वात अधिक पुरुषार्थ केला आहे, त्यामुळे त्यांचे नाव प्रसिद्ध आहे.

ओम शांती।
गोड गोड बाबा सन्मुख समजवत आहेत,पाच हजार वर्षानंतर एकाच वेळेत,मुलांना शिकवतात,त्यांना बोलवतात पण येऊन पावन बनवा,तर सिद्ध होते की ही पतित दुनिया आहे.नवीन दुनिया होती.नवीन घर सुंदर असते ना,जुन्या घराची तर नंतर मोडतोड होते,पावसामध्ये पडझड होते. आता तुम्ही मुलं जाणतात,बाबा नवीन दुनिया बनवण्यासाठी आले आहेत.आता शिकवत आहेत,परत पाच हजार वर्षानंतर शिकवतील. असे कधी कोणी साधुसंत इत्यादी आपल्या शिष्याला शिकवत नाहीत. त्यांना माहीत पण नाही.न खेळाची माहिती आहे,कारण निवृत्ती मार्गाचे आहेत.बाबा शिवाय कोणीही सृष्टीच्या आदी मध्य अंतचे रहस्य समजावू शकत नाहीत. आत्माभिमानी बनण्यामध्ये मुलांना कष्ट वाटणात,कारण तुम्ही अर्ध्याकल्पा मध्ये कधी आत्माभिमानी बनले नाहीत.आता बाबा म्हणतात,स्वत:ला आत्मा समजा. असे नाही की,आत्मा सो परमात्मा,नाही.आत्मा समजून परमपिता परमात्मा शिवाची आठवण करायची आहे. आठवणीची यात्राच मुख्य आहे. ज्याद्वारे तुम्ही पतिता पासून पावन बनतात,यामध्ये कोणती स्थुल गोष्ट नाही.कोणते नाक कान इत्यादी बंद करायची नाहीत.मुख्य गोष्ट स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे.तुम्हाला अर्ध्याकल्पा पासून देह अभिमानामध्ये राहण्याची सवय झाली आहे.प्रथम स्वतःला आत्मा समजाल तेव्हाच,बाबांची आठवण करू शकाल.भक्ती मार्गामध्ये बाबा बाबा म्हणत आले आहात.मुलं जाणतात,सतयुगा मध्ये एकच लौकिक पिता आहेत,तेथे पारलौकिक पित्याची आठवण करत नाहीत,कारण सुख आहे. भक्ती मार्गामध्ये परत दोन पिता बनतात,लौकिक आणि पारलौकिक.दुःखामध्ये सर्व त्या पारलौकिक पित्याची आठवण करतात,सतयुगामध्ये भक्ती नसते, तेथे ज्ञानाचे प्रारब्ध आहे.असे नाही की ज्ञान राहते.या वेळेतच ज्ञानाचे प्रारब्ध मिळते.बाबा तर एकाच वेळेत येतात.अर्ध्या कल्पाच्या नंतर सुखाचा वारसा मिळतो,परत लौकिक पित्यापासून अल्पकाळाचा मिळतो.हे पण मनुष्य समजू शकत नाहीत.या नवीन गोष्टी पाच हजार वर्षांमध्ये,संगम युगामध्ये एकाच वेळेत,बाबा येतात.कलियुगाचा अंत आणि सतयुगाचा संगम असतो, तेव्हाच बाबा,नवीन दुनियेची परत स्थापन करण्यासाठी येतात.नवीन दुनिया मध्ये लक्ष्मीनारायणचे राज्य होते,परत त्रेतामध्ये राम राज्य होते. बाकी सर्व भक्तिमार्गाची सामग्री आहे.बाबा म्हणतात या सर्वांना विसरा,आता आपल्या घराला आणि नवीन दुनियेला आठवण करा.

ज्ञान मार्ग समज चा मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही २१जन्म समजदार बनतात.कोणतेही दुख नाही.सतयुगा मध्ये,कधी कोणी असे म्हणणार नाही की,आम्हाला शांती पाहिजे.असे म्हटले जाते मागण्यापेक्षा मरणे चांगले.बाबा तुम्हाला असे सावकार बनवतात,जे देवतांना भगवंताकडून कोणती गोष्ट मागण्याची आवश्यकताच राहत नाही.येथे तर आशीर्वाद मागत राहतात ना.पोप इत्यादी येतात,तर अनेक मनुष्य आशीर्वाद घेण्यासाठी जातात.पोप अनेकांचे लग्न लावतात.बाबा तर हे काम करत नाहीत.भक्तिमार्ग मध्ये होऊन गेले आहे,ते परत होत आहे,परत त्याची पुनरावृत्ती होईल.दिवसेंदिवस भारत विकारी बनत चालला आहे.आता तुम्ही संगमयुगा मध्ये आहात,बाकी सर्व कलयुगी मनुष्य आहेत.जोपर्यंत येथे आले नाहीत,तोपर्यंत काहीच समजू शकणार नाहीत की,आता संगम आहे की,कलियुग आहे. एकाच घरांमध्ये मुलं समजतात आम्ही संगमयुगी आहोत,त्यांचे पिता म्हणतात आम्ही कलियुगामध्ये आहोत,तर खानपान इत्यादीचे खूप कष्ट होतात.तुम्ही संगमयुगी शुद्ध पवित्र भोजन खाणारे आहात.देवता कधी कांदा-लसूण इत्यादी थोडेच खातात.या देवतांना निर्विकारी म्हटले जाते.भक्तिमार्गा मध्ये सर्व तमोप्रधान बनले आहेत.आत्ता बाबा म्हणतात सतोप्रधान बना.कोणी पण असे नाहीत,जे समजतील की,आत्मा प्रथम सतोप्रधान होती, परत तमोप्रधान बनली आहे, कारण ते तर आत्म्याला निर्लेप समजतात. आत्मा सो परमात्मा आहे,असे म्हणतात.बाबा म्हणतात ज्ञानाचा सागर मीच आहे.जे या देवी-देवता धर्माचे असतील,ते सर्व येऊन परत आपला वारसा घेतील.आता त्याचे कलम लागत आहे.तुम्ही समजाल,हे इतके उच्च पद मिळवण्याच्या लायक नाहीत.घरी जाऊन लग्न इत्यादी करून खराब बनतात,विकारी बनतात.तर समजवले जाते,एवढे उच्च पद मिळवू शकणार नाहीत.ही राजाईची स्थापना होत आहे.बाबा म्हणतात मी तुम्हाला राजांचा राजा बनवतो. तर प्रजा जरूर बनवावी लागेल, नाहीतर राज्य कसे मिळवाल.हे गीतेचे अक्षर आहेत ना,याला म्हटले जाते गीतेचे युग.तुम्ही राजयोग शिकत आहात.तुम्ही जाणतात आदी सनातन देवी-देवता धर्माचे कलम लागत आहे.सूर्यवंशी चंद्रवंशी दोन्ही राजाई स्थापन होत आहेत. ब्राह्मण कुळाची स्थापना झालेली आहे.ब्राह्मणच सूर्यवंशी चन्द्रवंशी बनतात.जे चांगल्या रीतीने कष्ट करतील,ते सूर्यवंशी बनतील.बाकी दुसऱ्या धर्माचे आहेत,ते आपल्या धर्माची स्थापना करण्यासाठी येतात,नंतर त्या धर्माचे आत्मे येत राहतात.धर्माची वृद्धी होत जाते. समजा कोणी ख्रिश्चन आहेत,तर त्यांचे बीजरूप ख्रिस्त झाले.तुमचे बीजरूप कोण आहेत? शिवपिता, कारण बाबाच येऊन स्वर्गाची स्थापना ब्रह्मा द्वारे करतात.ब्रह्मांना प्रजापिता म्हटले जाते.रचनाकार म्हटले जात नाही.यांच्याद्वारे मुलं दत्तक घेतात.ब्रह्माची पण स्थापना करतात ना.बाबा येऊन प्रवेश करून रचना करतात.शिवबाबा म्हणतात तुम्ही माझी मुलं आहात. ब्रह्मा पण म्हणतात तुम्ही माझी साकारी मुलं आहात.आता तुम्ही काळे छी-छी बनले आहात.आता परत ब्राह्मण बनले आहात.या संगम युगामध्येच,तुम्ही पुरुषोत्तम देवी-देवता बनण्याचे कष्ट घेतात. देवतांना आणि शूद्रांना काहीच कष्ट करावे लागत नाहीत.तुम्हा ब्राह्मणांना देवता बनण्यासाठी कष्ट करावे लागतात.बाबा संगमा वरती येतात.हे खुप छोटे युग आहे,म्हणून याला लिप युग म्हणले जाते,यांना कोणी जाणत नाहीत.बाबांना पण कष्ट घ्यावे लागतात.असे नाही की लगेच नवीन दुनिये ची स्थापना होते.तुम्हाला देवता बनण्यामध्ये वेळ लागतो.जे चांगले कर्म करतात,त्यांचा जन्म पण चांगल्या कुळामध्ये होतो.आता तुम्ही क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे सुंदर बनत आहात.आत्माच सुंदर बनते ना.आता तुमची आत्मा चांगले कर्म शिकत आहे.आत्माच चांगले किंवा वाईट संस्कार घेऊन जाते.आता तुम्ही सुंदर फुल बनून चांगल्या घरांमध्ये जन्म घेतात.येथे जे चांगला पुरुषार्थ करतात,ते जरूर चांगल्या कुळामध्ये जन्म घेतील. क्रमानुसार तर आहेतच ना.जस- जसे काम करतात,तसाच जन्म होतो.जेव्हा खराब कर्म काम करणारे,बिलकुल नष्ट होतात,परत स्वर्गाची स्थापना,छाटछूठ होऊन होते.तमोप्रधान जे पण आहेत,ते नष्ट होतात,परत नवीन देवतांचे येणे सुरू होते.जेव्हा भ्रष्टाचारी सर्व नष्ट होतात,तेव्हा कृष्णाचा जन्म होतो, तोपर्यंत आदलाबदली होत राहते. जेव्हा कोणीच खराब राहणार नाहीत,तेव्हाच कृष्ण येतात. तोपर्यंत तुम्ही येत राहाल.कृष्णाचे स्वागत करणारे मात पितापण प्रथम पाहिजेत,परत सर्व चांगले चांगले राहतील.बाकी सर्व चालले जातील, तेव्हाच त्याला स्वर्ग म्हटले जाते. तुम्ही कृष्णाचे स्वागत करणारे राहणार.जरी तुमचा छी-छी जन्म असेल,कारण रावण राज्य आहे ना. शुद्ध सात्विक जन्म तर होऊ शकणार नाही.पवित्र जन्म तर कृष्णाचा प्रथम होतो.त्याच्यानंतर नवीन दुनियेला वैकुंठ म्हटले जाते. कृष्ण बिलकुल पवित्र,नवीन दुनिया मध्ये येतात.रावण संप्रदाय बिलकुल नष्ट होतात.कृष्णाचे नाव त्यांच्या मात पित्यापेक्षा प्रसिद्ध आहे. कृष्णाच्या माता पित्याचे नाव इतके प्रसिद्ध नाही.कृष्णा च्या अगोदर ज्यांचा जन्म होतो,तो योगबळा द्वारे जन्म म्हणनार नाहीत.असे नाही कृष्णाच्या मातपित्याने योगाद्वारे जन्म घेतला आहे,नाही.असे असते तर,त्यांचे नाव पण प्रसिद्ध झाले असते.तर सिद्ध होते त्यांच्या मात पित्याने इतका पुरुषार्थ केला नाही, जितका कृष्णाने केला.या सर्व गोष्टी तुम्ही पुढे चालून समजत जाल. पूर्ण कर्मातित असणारे राधाकृष्ण च आहेत,तेच सद्गती मध्ये येतात.पाप आत्मे सर्व नष्ट होतात,तेव्हा त्यांचा जन्म होतो. परत म्हणणार पावन दुनिया,म्हणून कृष्णाचे नाव प्रसिद्ध आहे. मातपित्याचे नाव इतके प्रसिद्ध नाही.पुढे चालून तुम्हाला खूप साक्षात्कार होतील,वेळ तर आहे ना.तुम्ही कोणालाही समजावू शकतात.आम्ही असेच श्रेष्ठ बनण्यासाठी शिकत आहोत. विश्वामध्ये यांचे राज्य स्थापन होत आहे.आमच्यासाठी तर नवीन दुनिया पाहिजे.आता तुम्हाला दैवी संप्रदाय म्हणणार नाही.तुम्ही ब्राह्मण संप्रदाय आहात,देवता बनणारे आहात.दैवी संप्रदाय बनाल,तर तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही स्वच्छ होतील.आता तुम्ही संगमयुगी पुरुषोत्तम बनणार आहात.हे सर्व कष्ट करण्याच्या गोष्टी आहेत.आठवणी द्वारेच विकर्माजीत बनायचे आहे. तुम्ही स्वतः म्हणतात आठवण सारखी- सारखी विसरते.तर बाबांना विचार येतो,आम्ही आठवण करणार नाहीत,तर बाबा काय म्हणतील म्हणून तुम्ही आठवणी मध्ये बसून सहल करा.कामधंदा करत आठवण करा,यामध्येच कष्ट आहेत. आठवणी द्वारेच आत्मा पवित्र होईल,अविनाश धन पण जमा होईल.परत जर अपवित्र बनले तर सर्व ज्ञान नष्ट होते.पवित्रता च मुख्य आहे.बाबा तर चांगल्या चांगल्या गोष्टी समजवत राहतात. या सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान दुसऱ्या कोणामध्ये नाही.दुसरे जे पण सत्संग इत्यादी आहेत,ते सर्व भक्ती मार्गातील आहेत.

बाबांनी समजावले आहे,भक्ती वास्तव मध्ये प्रवृत्ती मार्ग असणाऱ्यांसाठी आहे.तुमच्या मध्ये खूप शक्ती राहते.घर बसल्या तुम्हाला सुख मिळते.सर्वशक्तिमान बाबांकडून तुम्ही खूप शक्ती घेतात. संन्याशा मध्ये पण अगोदर शक्ती होती,जंगलामध्ये राहत होते.आता तर खूप मोठ -मोठ्या इमारती बनवून राहतात.आता ती शक्ती राहिली नाही.जसे तुमच्यामध्ये पण प्रथम सुखाची शक्ती होते,परत गायब झाली.सन्याशांमध्ये पण अगोदर शांतीची शक्ती होती,आता ती शक्ती राहिली नाही.अगोदर तर खरे बोलत होते की,रचनाकार आणि रचनेला आम्ही जाणत नाहीत.आता तर स्वतःला भगवान शिवोहम म्हणतात.बाबा समजवतात,या वेळेत सर्व झाड तमोप्रधान झाले आहे,म्हणून साधू इत्यादींचा पण उद्धार करण्यासाठी मी येतो.ही दुनियाच बदलणार आहे.सर्व आत्मे परत आपल्या घरी जातील.एक पण नाही ज्याला हे माहिती आहे की,आत्म्यामध्ये अविनाशी भूमिका भरलेली आहे, ज्याची परत पुनरावृत्ती होईल. आत्मा इतकी लहान आहे, त्याच्यामध्ये अविनाशी भूमिका भरलेली आहे,ज्याचा कधी विनाश होत नाही.यामध्ये बुद्धी खूप चांगली पवित्र पाहिजे.ती तेव्हाच होईल जेव्हा,आठवणीच्या यात्रामध्ये मस्त राहाल.बाबांच्या आठवणीशिवाय पद थोडेच मिळू शकते,म्हणून गायन पण आहे,चढे तो चाखे वैकुंठ रस,गिरे तो चकनाचूर.कुठे उच्च ते उच्च दुहेरी मुकुटधारी राजे,कुठे प्रजा. सर्वांना शिकवणारे तर एकच आहेत.यामध्ये समज खूप चांगली पाहिजे. बाबा नेहमीच समजवतात, आठवणीची यात्रा मुख्य आहे.मी तुम्हाला शिकवून विश्वाचे मालक बनवतो.तर शिक्षक गुरु पण असतील ना.बाबा तर शिक्षकांचे शिक्षक,पित्यांचे पिता आहेत.हे तर तुम्ही मुलं जाणतात,आमचे बाबा खूप गोड आहेत,प्रेमळ आहेत. अशा बाबांची खुप आठवण करायची आहे.राजयोगाच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे. बाबांची आठवण करणार नाही,तर पाप नष्ट होणार नाहीत.बाबा सर्व आत्म्यांना सोबत घेऊन जातील. बाकी सर्वांचे शरीर तर नष्ट होणार आहेत.आत्मे आप आपल्या धर्माच्या विभागांमध्ये जाऊन निवास करतील,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बुद्धीला पवित्र बनवण्यासाठी, आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त राहायचे आहे.कर्म करत एका साजनची आठवण राहावी,तेव्हाच विकर्माजीत बनाल.

(२) या लहान युगामध्ये मनुष्या पासून देवता बनण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.चांगल्या कर्मानुसार चांगल्या संस्कारांना धारण करून,चांगल्या कुळामध्ये जायचे आहे.

वरदान:-
डोळ्यातील तारे बनून भक्तांना दृष्टी द्वारे आनंदित करणारे दर्शनीय मूर्त भव.

संपूर्ण विश्व तुम्हा डोळ्यातील ताऱ्यांची दृष्टी घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.जेव्हा तुम्ही डोळ्यातील तारे आपल्या संपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचाल म्हणजे संपूर्णतेचे डोळे उघडतील.तेव्हा सेकंदांमध्ये विश्व परिवर्तन होईल परत तुम्ही दर्शनीय मुर्त आत्मे आपल्या दृष्टीने,भक्त आत्म्यांना आनंदित कराल.दृष्टी द्वारे आनंदित होणाऱ्यांची खूप लांबलचक रांग आहे,म्हणून संपूर्णतेचे डोळे उघडे राहावेत.डोळ्यांचे मळणे आणि संकल्पा मध्ये घुटका,झुटका खाणे बंद करा,तेव्हाच दर्शनिय मूर्त बनू शकाल.

बोधवाक्य:-
निर्मळ स्वभाव, निर्मानतेची लक्षणे आहेत,निर्मळ बनाल,तर सफलता मिळेल.