14-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो योग बळाने विकार रुपी रावणावर विजय प्राप्त करून खराखुरा दसरा साजरा करा."

प्रश्न:-
रामायण आणि महाभारताचा परस्परांमध्ये काय संबंध आहे ? दसरा कोणत्या गोष्टीला सिद्ध करतो ?

उत्तर:-
दसरा साजरा करणे म्हणजे रावण नष्ट होणे, आणि सीतांना मुक्ती मिळणे. परंतु दसरा साजरा करण्याने तर रावणाकडून मुक्ती मिळत नाही. जेव्हा महाभारत असते तेव्हा सीतांची (मुक्ती मिळत) सुटका होते. महाभारत लढाईने रावण राज्य नष्ट होते. रामायण , महाभारत आणि गीतेचा परस्परांमध्ये खूप खूप घनिष्ठ संबंध आहे.

गीत:-
महफिल मे जल उठी शमा .

ओम शांती।
बाबा म्हणतात तुम्ही ब्राह्मण संप्रदाय आहात. तुम्हाला दैवी संप्रदाय म्हणू शकत नाही. तुम्ही आत्ता आहात ब्राह्मण संप्रदाय, पुन्हा दैवी संप्रदाय बनणारे आहात. हे जे रामायण आहे आज दसर्याच्या दिवशी त्यांचे रामायण पूर्ण होणार आहे. परंतु पूर्ण होत नाही. जर रावण मरत असेल तर रामायणाची कथा पूर्ण झाली पाहिजे, परंतु होत नाही. सुटका होते महाभारताने . ह्या पण समजण्याच्या गोष्टी आहेत. रामायण काय आहे आणि महाभारत काय आहे ? या गोष्टींना दुनिया जाणत नाही. रामायण, महाभारताचा दोघांचा संबंध आहे. महाभारत लढाईने रावण राज्य नष्ट होते. पुन्हा दसरा साजरा करण्याचा प्रश्नच येत नाही. गीता किंवा महाभारत पण आहे रावण राजाला नष्ट करणारे. आता तर वेळ आहे, तयारी होत आहे ती आहे हिंसक तुमचे आहे अहिंसक. तुमची आहे गीता, तुम्ही गीते ज्ञान ऐकत आहात. त्यामुळे काय होणार आहे ? रावण राज्य नष्ट होते. ते रावणाला मारतात परंतु रामराज्य तर होत नाही . आता रामायण आणि महाभारत तर आहे ना. महाभारत आहे रावणाला नष्ट करण्यासाठी , या समजण्याच्या गोष्टी आहेत. या मध्ये विशाल बुद्धी पाहिजे. बाबा समजवतात महाभारत लढाई ने रावण राज्य नष्ट होते . असे नाही की फक्त रावणाला मारण्याने रावणराज नष्ट होते. त्यासाठी पाहिजे संगम. आता हे संगम. आता तुम्ही तयारी करत आहात रावणावर विजय प्राप्त करण्याची. त्यासाठी ज्ञानाचे अस्त्र शस्त्र पाहिजेत. ती नाहीत . जसे दाखवतात रावण आणि रामाचे युद्ध झाले. हे सर्व शास्त्र आहे भक्तिमार्गाचे. आता तुम्ही रावण राज्यावर विजय प्राप्त करत आहात योग बलाने . ही आहे गुप्त गोष्ट. 5 विकार रूपी रावणावर तुमची विजय होते. कशामुळे ? गीतेने. बाबा तुम्हाला गीता ऐकवत आहेत .भागवत तर नाही. भागवतामध्ये दाखवतात कृष्णचरित्र. कृष्णाचे चरित्र तर काहीच नाही. तुम्ही जाणता जेव्हा विनाश होईल, महाभारत लढाई लागेल , त्यामुळे रावण राज्य नष्ट होईल . सिढी मध्ये पण दाखवलेले आहे. जेव्हा पासून रावण राज्य सुरू झाले तेव्हापासून भक्तिमार्ग सुरू झाला. हे पण तुम्ही जाणता. गीतेचा संबंध महाभारत लढाईची आहे . तुम्ही गीता ऐकून राज्य प्राप्त करता आणि लढाई लागतेच सफाईसाठी . बाकी भागवतामध्ये चरित्र वगैरे फालतू गोष्टी आहेत. शिव पुराणामध्ये काहीच नाही. नाहीतर गीतचे नाम गीतेचा नाव व्हायला पाहिजे शिवपुराण . शिव बाबा ज्ञान देतात -सगळ्यात श्रेष्ठ हे गीता. गीता सर्व शास्त्रांमध्ये लहान आहे आणि इतर सर्व पुस्तके मोठी बनवलेली आहेत . मनुष्यांची जीवन कहाणी पण खूप मोठी बनवलेलु आहे. नेहरूंनी शरीर सोडले त्याचे किती मोठे वाल्युम बनवलेले आहेत. ह्या गीतेची शिव बाबांची वाल्युमची किती मोठी व्हायला पाहिजे, परंतु गीता किती छोटी आहे, कारण बाबा एकच गोष्ट ऐकवतात की माझी आठवण करा तर विक्रर्म विनाश होतील, आणि सृष्टी चक्राला समजून घ्या. म्हणून गीता छोटी बनवलेली आहे. हे ज्ञान कंठस्थ करण्याचे आहे. तुम्हाला माहिती आहे गीतेचे लॉकेट बनवतात. त्याच्यामध्ये छोटी अक्षर असतात. आता बाबा पण तुमच्या गळ्यामध्ये लॉकेट घालतात- त्रिमूर्ती आणि राजाईचे. बाबा म्हणतात गीता आहे दोन अक्षरांची अल्फा आणि बे . हेच आहे गुप्त मंत्राचा लॉकेट मनमनाभव. माझी आठवण करा तर विक्रर्म विनाश होतील. तुमचे काम आहे योग बलाने विजय प्राप्त करणे. पुन्हा तुमच्यासाठी स्वच्छता पण पाहिजे. बाबा समजवतात तुमच्या योगबलानेच रावण राज्याचा विनाश होणार आहे. रावण राज्य केव्हा सुरू झाले हे पण जाणत नाहीत. हे ज्ञान खूप सहज आहे. सेकंदाची गोष्ट आहे ना. 84 जन्मांच्या सीढी मध्ये पण एवढे एवढे जन्म दाखवले आहेत. किती सहज आहे. बाबा हे ज्ञानाचा सागर. ज्ञानच ऐकवत येतात. तुम्ही सर्व मुरलीचे कागद एकत्रित कले तर किती मोठा डोंगग ह़ोईल. बाबा डिटेलमध्ये समजवतात. वरवर तर म्हणतात अल्फची आठवण करा. बाकी वेळ कशात लावता. तुमच्या डोक्यावर पापांचा बोझा खूप आहे .तो आठवणीनेच नष्ट होणार आहे, यामध्ये मेहनत लागते. घडोघडी तुम्ही विसरता. तुम्ही बाबाची आठवण करत राहा तर विघ्न कधी पडणार नाहीत. देहअभिमानी बनल्याने विघ्न पडतात. देहीअभिमानी बनता शेवटी. पून्हि अर्धा कल्प विघ्न पडत नाही. ह्या किती गुहा गोष्टी आहेत समजाण्याच्या. सुरुवातीपासूनच किती समजावत आलेले आहेत, आणि पुन्हा म्हणतात फक्त अल्फ आणि बे ची आठवण करा. बस . झाडाचा विस्तार आहे. बी तर सर्वात छोटे असते. झाड किती मोठे निघते.

आज दसरा आहे ना. बाबा समजवतात रामायणाचा महाभारताशी काय संबंध आहे. रामायण भक्तिमार्गाचे आहे . अर्ध्या कल्पा पासून चालत आलेले आहे , आता चालत आहे. पुन्हा महाभारत आले तर रावण राज्य नष्ट होईल. रामराज्य सुरू होईल. रामायण आणि महाभारत या मध्ये काय फरक आहे ? रामराज्याची स्थापना आणि रावण राज्याचा विनाश होणार आहे. गीता ऐकून तुम्ही विश्वाचे मालक बनण्याच्या लायकीचे बनता. महाभारत पण आत्ता साठी होण्यासाठी आहे बाकी त्यांनी तर लढाई दाखवलेली आहे. ते सगळे चुकीचे आहे. लढाई आहे पाच विकारांवर विजय प्राप्त करण्याची. तुम्हाला बाबा गीतेची दोनचा अक्षरे ऐकवतात, मनमनाभव मध्याजी भव. गीतेच्या सुरुवातीला आणि अंताला ही दोनच अक्षरे येतात. मुले समजतात बरोबर आता गीतेचे युग चालले आहे. परंतु कोणाला म्हणाल तर म्हणतील, कृष्ण कोठे आहे ? बाबाच्या समजावण्यामध्ये आणि भक्तिमार्गाच्या शास्त्रामध्ये किती फरक आहे, ते कोणी जाणत नाहीत. हे रामायण काय आहे, महाभारत काय आहे ? महाभारत लढाईच्या नंतरच स्वर्गाची दारे उघडणार आहेत ,परंतु मनुष्य हे समजत नाहीत. म्हणून तुम्ही बाबाचा परिचय द्या. बाबा म्हणतात माझी आठवण करा. हे बाबा संपूर्ण दुनियेसाठी म्हणतात . एका गीतेचे खंडन केलेले आहे. गीतेचा सगळ्या भाषा मध्ये प्रचार व्हायला पाहिजे. भारताचा संबंध आहेच रामायण, महाभारत आणि गीतेशी . भगवान तर मुलांना गीता ऐकवतात. ज्यामुळे तुम्ही स्वर्गाचे मालक बनता. महाभारत लढाई पण जरूर लागणार आहे . ज्या मुळे पतीत दुनिया नष्ट होऊन जाईल. गीते मुळे तुम्ही पावन बनता. पतित पावन भगवान येतातच अंतामध्ये. म्हणतात काम महा शत्रू आहे. यावर विजय प्राप्त करा. काम विकाराशी कधी हार खायची नाही. त्यामुळे खूप नुकसान होते. विकारांसाठी मोठे मोठे नामी ग्रामी मंत्री पण आपले नाव बदनाम करतात. काम विकाराच्या मागे लागून खराब होतात. म्हणून बाबा समजवतात बाबा जवळ तरुण तरुण मुले येतात. अशी खूप आहेत जी ब्रह्मचारी राहतात . संपूर्ण आयुष्य लग्न करत नाहीत. स्त्रिया पण आहेत. नन्स केव्हा विकारांमध्ये जात नाहीत परंतु त्यापासून काही प्राप्ती नाही. येथे तर पवित्र बनून जन्मजन्मांतर स्वर्गाचे मालक बनण्याचे आहे. जन्मजन्मांतर पापांचा बोजा डोक्यावर आहे, तो जेव्हा नष्ट होईल तेव्हा स्वर्गामध्ये जाल. येथे मनुष्य पाप करत राहतात . काही तर एक जन्मासाठी संन्यासी बनतात. जन्म पण विकारातूनच घेतात. रावण राज्यामध्ये विकाराशिवाय जन्म होत नाही. विचारतात तेथे जन्म कसा होतो. योगबल कशाला म्हटले जाते ? ही विचारण्याची गोष्ट नाही. आहेच संपूर्ण निर्विकारी दुनिया . रावण राज्य नाही तर प्रश्नच उठू शकत नाही. सर्व साक्षात्कार होतील. जेव्हा म्हातारे होतात तेव्हा हा साक्षात्कार होतो की जाऊन मुलगा बनणार आहे. आईच्या गर्भामध्ये जाणार. हे माहित होत नाही कोणत्या घरामध्ये जाणार आहे . फक्त छोटा मुलगा बनायचे आहे. मोर व लांडोरीचे उदाहरण आहे. डोळ्याच्या अश्रूने गर्भ बनतो . पपीते च्या झाडा मध्ये पण एक नर आणि एक मादीचे झाड असते. एकमेकाच्या जवळ असल्याने फळ मिळते. ही पण आश्चर्यकारक गोष्ट आहे. जर जड वस्तूमध्ये असे आहे, तर चैतन्यमध्ये सतयुगामध्ये का होऊ शकत नाही. या सर्व गोष्टी पुढे डिटेल मध्ये समजाल. मुख्य गोष्ट आहे तुम्ही बाबाची आठवण करुन तम़ोप्रधाना पासून सतोप्रधान बनुन वरसा घ्या. तेथील रितीरिवाज जे असतील ते पुन्हा बघूया. तुम्ही योगबलाने विश्वाचे मालक बनता तर मुले का निर्माण होऊ शकत नाहीत. असे खुप प्रश्न विचारतात . आणि जर कोणत्या गोष्टीचे पूर्ण उत्तर मिळाले नाही, तर विकारांमध्ये जातात. थोड्याशा गोष्टीवर संशय येतो शास्त्रामध्ये अशा गोष्टी नाहीत . शास्त्र आहेत भक्तिमार्गाचे. परमपिता परमात्मा येऊन ब्राह्मण धर्म, सूर्यवंशी, चंद्रवंशी धर्माची स्थापना करतात. ब्राह्मण आहेत संगमयुगी. बाबाला संगम युगावर यावे लागते. बोलवतात पण हे पतित-पावन या म्हणून. तिकडचे (भक्तीकरणारे) म्हणतात हे मुक्तिदाता दुःखातून मुक्त करा. दुःख कोण देतात हे पण त्यांना माहिती नाही. तुम्ही जाणता रामराज्य नष्ट होणार आहे. तुम्हाला बाबा राजयोग शिकवतात. जेव्हा पूर्ण शिकणे होते तेव्हा विनाश होतो. ज्याचे नाव महाभारत ठेवलेले आहे . महाभारतामध्ये रावण राज्य नष्ट होते . दसर्यामध्ये एका रावणाला नष्ट करतात . त्या आहेत सगळ्या हद्च्या गोष्टी. या आहेत बेहदच्या गोष्टी. ही संपूर्ण दुनिया नष्ट होऊन जाईल. एवढ्या छोट्या छोट्या मुलीं ज्ञान किती मोठे घेत आहेत. ते लौकीक ज्ञान जसे तेला प्रमाणे आहे, हे आहे तूप . रात्रंदिवसाचा फरक आहे. रावण राज्यांमध्ये तुम्हाला तेल खावे लागते. यापूर्वी किती स्वस्त तूप मिळत होते. पुन्हा महाग झाले तर तेल खावे लागत आहे. हा गॅस, लाईट यापूर्वी काहीच नव्हते. थोड्याच वर्षांमध्ये किती फरक पडलेला आहे. आता तुम्ही जाणता हे सर्व नष्ट होणार आहे. बाबा आम्हाला लक्ष्मीनारायण प्रमाणे बनवण्यासाठी शिकवत आहेत. हा नशा या बाबांना खूप राहतो. मुलांना माया विसरायला लावते . जेव्हा म्हणतो आम्ही बाबा कडून वरसा घेण्यासाठी आलेलो आहे, तर तो नशा का नाही चढत ? स्वीट होम, स्वीट राजधानी विसरली जाते ? बाबा बाबा जाणतात जे हड्डी हड्डी सर्विस करतात तेच महा-राजकुमार बनतील. तुम्हाला हा नशा का राहत नाही ? कारण याद मध्ये राहत नाही. सर्विस मध्ये पूर्ण तत्पर राहात नाही. कधी तर सर्विस मध्ये उड्या मारता, कधी थंड होता. हेच प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे असे होते ना. कधी कधी चुका पण होतात, म्हणून बाबा समजवतात. तोंड खूप गोड पाहिजे सगळ्यांना संतुष्ट करता आले पाहिजे .कुणाला आवेश येता कामा नये. बाबा किती प्रेमाचा सागर आहे. गोहत्या बंद करण्यासाठी किती प्रयत्न करतात. बाबा म्हणतात सगळी मोठी हत्या आहे काम कटारी चालवणे. हे प्रथम बंद करा. गोहत्या काही बंद होणार नाही, कितीही प्रयत्न करा. काम विकारा मध्ये दोघांनी ही जायचे नाही. कुठे मनुष्याचा विचार, कुठे बाबांचा विचार. जे काम विकारांवर विजय प्राप्त करतील तेच पवित्र दुनियेचे मालक बनतील. अच्छा.

गोड गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात पिता दादांची स्नेह पूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार .

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1) बाबा समान प्रेमाचे सागर बनायचे आहे. कधीही राग करायचा नाही. आपले तोंड गोड ठेवायचे आहे . सगळ्यांना संतुष्ट करायचे आहे.

2. हड्डी सर्विस करायची आहे. नशे मध्ये रहायचे आहे की हे जुने शरीर सोडून राजकुमार राजकुमारी बनणार आहोत.

वरदान:-
सेवेच्या लगन द्वारा लौकिकला अलौकिक प्रवृत्ती मध्ये परिवर्तन करणारे निरंतर सेवाधारी बना.

सेवाधारीचे कर्तव्य आहे, निरंतर सेवेमध्ये राहणे. मग ती मनसा सेवा किंवा वाचा किंवा किंवा कर्मणा सेवा असेल. सेवाधारी सेवेला कधीही स्वतः पासून वेगळे समजत नाहीत . ज्यांच्या बुद्धीमध्ये सदा सेवेची लगन राहते, त्यांची लौकिक प्रवृत्ती बदलून ईश्वरीय प्रवृत्ती होते. सेवाधारी घराला घर समजत नाहीत. परंतु सेवा स्थान समजून चालतात. सेवाधारीचा मुख्य गुण आहे त्याग. त्याग वृत्ती वाले प्रवृत्ती मध्ये पण तपस्वी मूर्त होऊन राहतात. त्यामुळे सेवा स्वतः होत राहते .

बोधवाक्य:-
आपल्या संस्कारांना दिव्य बनवायचे आहे ,तर मन बुद्धी बाबांना समर्पित करा.