15-01-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही अर्धाकल्प ज्यांची भक्ती केली आहे, ते बाबा स्वतः तुम्हाला शिकवित आहेत, या शिक्षणामुळे तुम्ही देवी-देवता बनत आहात."

प्रश्न:-
योगबळा च्या लिफ्टची ( उद्वाहक ) कमाल काय आहे?

उत्तर:-
तुम्ही मुले योगबळा च्या लिफ्ट( उदवाहक ) द्वारे सेकंदा मध्ये वर चढत आहात, म्हणजे सेकंदा मध्ये जीवनमुक्तीचा वारसा तुम्हाला मिळत आहे. तुम्ही जाणता कि, शिडी उतरण्या साठी ५००० वर्ष लागली आणि आता सेकंदा मध्ये चढत आहात, हीच योग्यबळाची कमाल आहे. बाबाच्या आठवणीने सर्व पाप नाहीसे होत आहेत. आत्मा सतोप्रधान बनते.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावत आहेत. आत्मिक पित्याची महिमा तर मुलांना सांगितली आहे. ते ज्ञानाचे सागर, सत चित आनंद स्वरूप आहेत. शांतीचे सागर आहेत. त्यांना सर्व बेहदची पदके दिली जातात. आता बाबा ज्ञानाचे सागर आहेत. आणि यावेळी जे पण मनुष्य आहेत, ते सर्व जाणतात कि, आम्ही भक्तीचे सागर आहोत. भक्ती मध्ये जे सर्वात तीव्र असतात, त्यांना मान मिळतो. यावेळी कलियुगा मध्ये भक्ती आहे, दु:ख आहे. सतयुगा मध्ये ज्ञानाचे सुख आहे. असे नाही कि, तिथे ज्ञान असते. तर ही महिमा फक्त एक बाबाची आहे आणि मुलांची पण महिमा आहे. कारण बाबा मुलांना शिकवित आहेत, म्हणजे यात्रा शिकवित आहेत. बाबांनी सांगितले आहे, दोन यात्रा आहेत. भक्त लोक तीर्थयात्रा करतात, चोहीकडे चक्कर लावतात. तर जेवढा वेळ चोहीकडे चक्कर लावतात, त्यावेळी विकारा मध्ये जात नाहीत. दारू इ.खराब कोणतीही वस्तू खात पीत नाहीत. कधी बद्रीनाथ, कधी काशी चे चक्र लावतात. भक्ती भगवंताची करतात. आता भगवान तर एक असले पाहिजेत ना. सर्वत्र चक्कर लावले नाही पाहिजे.शिवबाबा च्या तिर्थाचे चक्कर लावतात. सर्वात मोठे बनारस तिर्थाची महिमा केली जाते. ज्याला शिवाची पुरी म्हणतात. सर्वत्र जातात परंतु ज्यांचे दर्शन करण्या साठी जातात किंवा ज्यांची भक्ती करतात, त्यांचे चरित्र, धंदा, याची कोणाला माहिती नाही, त्यामुळे त्याला अंधश्रद्धा म्हटले जाते. ज्याची पुजा करतात, डोके टेकवतात, आणि त्यांच्या जीवन कहाणी ला ओळखत नाहीत, त्याला अंधश्रद्धा म्हटले जाते. घरामध्ये पण साजरी करतात, देवींची किती पूजा करतात,मातीची किंवा दगडाची देवी बनवून, त्यांचा फार शृंगार करतात. समजा, लक्ष्मीचे चित्र बनवितात, त्यांना विचारा, यांचे चरित्र सांगा, तर म्हणतात सतयुगाची महाराणी होती. त्रेता मध्ये मग सीता होती. बाकी यांनी किती वेळ राज्य केले, लक्ष्मी नारायणा चे राज्य कधी पासून कुठ पर्यंत चालले, हे कोणी पण जाणत नाहीत. मनुष्य भक्ती मार्गा मध्ये यात्रेवर जातात, हे सर्व भगवंताला भेटण्याचे उपाय आहेत. शास्त्र वाचणे हा पण उपाय भगवाना ला भेटण्याचा आहे. परंतु भगवान कोठे आहे? तर म्हणतात ते तर सर्वव्यापी आहेत.

आता तुम्ही जाणत आहात, या शिक्षणामुळे आम्ही देवी देवता बनत आहोत. बाबा स्वतः येवून शिकवित आहेत. ज्यांना भेटण्या साठी अर्धाकल्प भक्तीमार्ग चालत आहे.असे म्हणतात, बाबा पावन बनवा आणि तुमचा परिचय पण द्या कि, तुम्ही कोण आहात? बाबाने समजावले आहे कि, तुम्ही आत्मा बिंदी आहात, आत्म्याला इथे शरीर मिळाले आहे, त्यामुळे इथे कर्म करत आहे. देवतांसाठी म्हणतात कि, ते सतयुगा मध्ये राज्य करून गेले. ख्रिश्चन लोक तर समजतात कि, बरोबर ईश्वरीय पित्याने स्वर्गाची स्थापना केली. आम्ही त्या मध्ये नव्हतो. भारता मध्ये स्वर्ग होता, त्यांची बुद्धी तरी पण चांगली आहे. भारतवासी सतोप्रधान पण बनतात, मग तमोप्रधान पण बनतात. ते एवढे सुख पण पाहत नाहीत तर दुःख पण एवढे भोगत नाहीत. आता अंत काळात ख्रिश्चन लोक किती सुखी आहेत. अगोदर ते गरीब होते. पैसे तर कष्टाने कमविले जातात ना. अगोदर एक क्राइस्ट आले, मग त्यांचा धर्म स्थापन झाला,परत वृद्धी होत राहते. एका पासून दोन, दोघा पासून चार... मग अशी वृध्दी होत राहते. आता पहा, खिश्चनाचे झाड केवढे झाले आहे. पाया तर देवी-देवता घराण्याचा आहे. तो मग येथे यावेळेत स्थापन होत आहे. अगोदर एक ब्रह्मा, मग ब्राह्मण दत्तक मुलांची वाढ होत राहते. बाबा शिकवित आहेत तर अनेक ब्राह्मण तयार होत आहेत. अगोदर तर हे एकच होते. एका पासून किती वृध्दी झाली आहे. केवढी होणार आहे. जेवढे सूर्यवंशी, चंद्रवंशी देवता होते, तेवढे सर्व बनणार आहेत. अगोदर एक बाबा आहेत, यांची आत्मा तर आहेच. बाबांची आम्ही आत्मे मुलं किती आहोत? आम्हा सर्व आत्म्यांचा पिता एक आनादि आहे. परत सृष्टीचे चक्र फिरत राहते. सर्व मनुष्य तर नेहमीच असत नाहीत ना. आत्म्याला भिन्न भिन्न अभिनय करावयाचा आहे. या झाडाचे प्रथमचे मूळ, देवी-देवता धर्माचे आहे, मग त्या पासून इतर फांद्या निघत आहेत. तर बाबा मुलांना समजावत आहेत कि, मुलांनो, मी येऊन काय करत आहे? आत्म्या मध्ये धारणा होत आहे. बाबा सांगत आहेत, मी कसा येतो? तुम्हीं सर्व मुलं, जेंव्हा पतित बनता, तेव्हा माझी आठवण करता. सतयुग त्रेता मध्ये तर तुम्हीं सुखी होता, तेंव्हा आठवण करत नव्हता. द्वापार नंतर जेंव्हा दुःख जास्त झाले, तेंव्हा मला बोलावले होते कि, हे परमपिता परमात्मा, बाबा. होय, मुलांनो ते ऐकले,तुमची काय इच्छा आहे.मुलं म्हणतात बाबा येऊन पतितांना पावन बनवा. बाबा आम्ही फार दुखी, पतित आहोत. आम्हाला येऊन पावन बनवा. कृपा करा, आशीर्वाद करा. तुम्ही मला बोलावले आहे, बाबा येऊन पतितांना पावन बनवा. पावन सतयुगाला म्हटले जाते. हे पण बाबा स्वतः सांगत आहेत. विश्व नाटकातील योजने नुसार जेंव्हा संगमयुग असते, सृष्टी जुनी होते, तेंव्हा मी येतो.

तुम्ही समजत आहात, संन्यासी पण दोन प्रकारचे आहेत.ते हठयोगी आहेत. त्यांना राजयोगी म्हणत नाहीत. त्यांचा आहे हदचा संन्यास. घरबार सोडून जंगला मध्ये राहतात. गुरूंचे शिष्य बनतात. गोपीचंद राजा साठी पण एक कथा सांगतात. त्यांनी म्हटले, तुम्ही घरदार कां सोडतात ? कुठे जात आहात? शास्त्रां मध्ये तर अनेक कथा बनविल्या आहेत. आता तुम्ही बी‌.के. राजांना पण जाऊन ज्ञान आणि योग शिकवत आहात. एक अष्टवक्र गीता पण आहे, त्यामध्ये दाखवतात, राजाला वैराग्य आले आणि म्हणाले कि, आम्हाला कोणी परमात्म्याशी भेटवा, दवंडी दिली. ती हीच वेळ आहे. तुम्ही जाऊन राजांना ज्ञान देता ना, बाबाला भेटण्यासाठी. जसे तुम्ही भेटले आहात, तर इतरांना पण भेटण्या साठी प्रयत्न करत आहात. तुम्ही म्हणता कि, आम्ही तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवितो मुक्ती जीवनमुक्ती देतो. मग त्यांना सांगा कि, शिवबाबाची आठवण करा, आणखीन कोणाची नाही. तुमच्या जवळ सुरुवातीला पण बसल्या बसल्या एक दोघांना पाहून ध्याना मध्ये जात होते. फार आश्चर्य वाटत होते. यांच्या मध्ये बाबा होते ना. तर ते चमत्कार दाखवित होते. सर्वांच्या बुद्धीची दोरी ओढत होते. बापदादा एकत्र होते ना. कब्रिस्थान बनवत होते. सर्व बाबाच्या आठवणी मध्ये झोपत होते. सर्व ध्याना मध्ये जात होते. ही सर्व शिवबाबा ची चतुराई होती. याला मग काही जादु समजत होते. हा शिवबाबा चा खेळ होता. बाबा जादूगर, सौदागर, रत्नागर आहेत ना. धोबी पण आहेत, सोनार पण आहेत, वकील पण आहेत. सर्वांना रावणा च्या तुरंगा मधून सोडवत आहेत. त्यांना सर्व बोलावत आहेत, हे पतित पावन, हे दूरदेशां मध्ये राहणारे... आम्हाला येऊन पावन बनवा. या पण पतित दुनियेमध्ये, पतित शरीरा मध्ये येऊन, आम्हाला पावन बनवा. आता तुम्हीं त्याचा अर्थ पण समजत आहात. बाबा येऊन सांगत आहेत कि, तुम्ही मुलांनी रावणाच्या देशा मध्ये मला बोलावले आहे, मी तर परमधाम मध्ये बसलो होतो. स्वर्ग स्थापन करण्या साठी, मला नर्क रावणाच्या देशा मध्ये बोलावले कि, आता सुखधामला घेऊन चला. आता तुम्हां मुलांना घेऊन जात आहेत ना. तर हे विश्व नाटक आहे. मी जे तुम्हाला राज्य दिले होते, ते पूर्ण झाले, मग व्दापर पासून रावण राज्य चालत आले. पाच विकारा मध्ये गेलात, त्यांचे चित्र पण जगन्नाथपुरी मध्ये आहेत. पहिल्या नंबर मध्ये जे होते, तेच मग 84 जन्म घेऊन आता अंता मध्ये आहेत. मग त्यांनाच पहिल्या नंबर मध्ये जायचे आहे. हे ब्रह्मा बसले आहेत, विष्णू पण बसले आहेत. त्यांचा आपसा मध्ये काय संबंध आहे? दुनिये मध्ये कोणी पण जाणत नाहीत. ब्रह्मा-सरस्वती मूळात सतयुगा चे मालक, लक्ष्मी नारायण होते. आता नरकाचे मालक आहेत. आता ते तपस्या करत आहेत, लक्ष्मी नारायण बनण्यासाठी. दिलवाला मंदिरा मध्ये पूर्ण स्मृति स्थळ आहे. बाबा पण येथेच आले आहेत, त्यामुळे आता लिहितात कि, आबू सर्व तीर्था मध्ये, सर्व धर्माच्या तीर्था मध्ये, मुख्य तीर्थ आहे कारण इथेच बाबा येऊन सर्व धर्माची सदगती करत आहेत. तुम्ही शांतीधाम ला जाऊन मग स्वर्गामध्ये जात आहात. बाकी इतर सर्व शांतीधाम मध्ये निघून जातात. ते जड स्मृतिस्थळ आहे, हे चैतन्य आहे. जेंव्हा तुम्ही चैतन्या मध्ये तसे बनता, तर मग हे मंदिर इ. सर्व नाहीशी होऊन जातील. मग भक्ती मार्गामध्ये ही स्मृती स्थळे बनवाल. आता तुम्ही स्वर्गाची स्थापना करत आहात. मनुष्य समजतात, स्वर्ग वर आहे. आता तुम्ही समजत आहात, हाच भारत स्वर्ग होता, आता नरक आहे. हे चक्र पाहिल्याने सारे ज्ञान समजत आहे. व्दापार पासून इतर धर्म येतात. तर पहा आता किती धर्म आहेत. हे लोहयुग आहे. आता तुम्ही संगमयुगा वर आहात. सतयुगा मध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. कलियुगा मध्ये सर्व पत्थरबुद्धी आहेत. सतयुगा मध्ये पारसबुद्धी आहेत. तुम्हींच पारसबुध्दी होता, तुम्हीच मग पत्थरबुद्धी बनले आहात, मग पारस बुद्धी बनायचे आहे. आता बाबा सांगतात कि, तुम्ही मला बोलावले आहे, तर मी आलो आहे, आणि तुम्हाला सांगत आहे कि, काम विकाराला जिंका, तर जगतजीत बनाल. मुख्य हा विकारच आहे. सतयुगा मध्ये सर्व निर्विकारी आहेत. कलियुगा मध्ये सर्व विकारी आहेत.

बाबा सांगतात, मुलांनो, आता निर्विकारी बना. ६३ जन्म विकारा मध्ये गेले आहात. आता हा अंतिम जन्म पवित्र बना. आता मरायचे तर सर्वांनाच आहे. मी स्वर्गाची स्थापना करण्यासाठी आलो आहे, तर आता माझ्या श्रीमता वर चाला. मी जे सांगत आहे ते ऐका. आता तुम्ही पत्थर बुद्धीला पारस बुद्धी बनविण्याचा पुरुषार्थ करत आहात. तुम्हीच संपूर्ण शिडी उतरता, मग चढत आहात. तुम्हीं जसे कि, जीन(राक्षस) आहात. जीन ची गोष्ट आहे ना. त्यांनी सांगितले मला काम द्या, तर राजाने म्हटले, बरं,शिडी उतरा आणि चढा. फार मनुष्य म्हणतात कि, भगवानाला काय पडले होते,जे शिडी चढवितात आणि उतरवितात. भगवानाला काय झाले होते, ज्यांनी अशी शिडी बनविली. बाबा समजावतात कि, हा अनादि खेळ आहे. तुम्ही पाच हजार वर्षांमध्ये 84 जन्म घेतले आहेत. पाच हजार वर्ष तुम्हाला खाली उतरण्यासाठी लागले आहेत, मग वर जाण्यासाठी सेकंद लागतो. ही तुमच्या योगबळाची लिफ्ट( विजेचा पाळणा) आहे. बाबा म्हणतात आठवण करा तर तुमचे पाप नाहीसे होतील. बाबा येतात तर सेकंदा मध्ये तुम्ही वर चढत आहात. मग खाली उतरण्यासाठी पाच हजार वर्षे लागतात. कला कमी होत जातात. चढण्यासाठी तर लिफ्ट आहे. सेकंदा मध्ये जीवनमुक्ती, सतोप्रधान बनायचे आहे. मग हळूहळू तमोप्रधान बनायचे आहे. पाच हजार वर्षे लागतात .तर आता तमोप्रधान पासून सतोप्रधान, एका जन्मा मध्ये बनायचे आहे. आता जेंव्हा मी तुम्हाला स्वर्गाची बादशाही देत आहे, तर तुम्ही पवित्र कां बनत नाहीत. परंतु कामेशु,क्रोधेशु पण आहेत ना. विकार न मिळाल्यामुळे मग स्त्रियांना मारतात. घराबाहेर काढतात. आग लावून देतात. अबला वर किती अत्याचार होत आहेत. हे पण विश्व नाटका मध्ये नोंदलेले आहे. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) जगाचे मालक बनण्यासाठी किंवा विश्वाची राजाई घेण्यासाठी, मुख्य काम विकारावर विजय प्राप्त करायचा आहे. संपूर्ण निर्विकारी जरूर बनायचे आहे.

(२) जसे आम्हाला बाबा मिळाले आहेत, तसेच सर्वांना बाबांशी भेटण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. बाबा चा खरा परिचय द्यायचा आहे. खरी खरी यात्रा शिकवायची आहे.

वरदान:-
शांतीच्या शक्तीद्वारे, सेकंदा मध्ये प्रत्येक विघ्नाला नाहीसे करणारे, एकांतवासी भव:

जेंव्हा कोणता पण नवीन किंवा शक्तिशाली शोध करत आसतात तर एकांतवासी बनतात. इथे एकांतवासी बननेच अंडरग्राउंड आहे. जो पण वेळ मिळेल, कार्य व्यवहार करताना, सांगताना, ऐकताना, सूचना देताना, या देहाची दुनिया आणि देहाच्या भानापासून दूर, शांती मध्ये जावा. या अभ्यासाचा अनुभव करणे आणि करविण्याची अवस्था, प्रत्येक समस्येला नाहीशी करेल. या मध्ये एका सेकंदात कोणाला पण, शांती किंवा शक्तीची अनुभूती कराल. जो पण समोर येईल, तो या अवस्थे मध्ये साक्षात्काराचा अनुभव करेल.

बोधवाक्य:-
व्यर्थ संकल्प किंवा विकल्पा पासून किनारा करून, आत्मिक स्थितीमध्ये राहणेच योगयुक्त बनणे होय.