15-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो , आत्मा रुपी ज्योती मध्ये ज्ञान योगाचे तेल घाला , तर ज्योत नेहमीच जागृत राहील , ज्ञान आणि योगाचा फरक चांगल्या रितीने समजायचा आहे "

प्रश्न:-
बाबांचे कार्य प्रेरणा द्वारे चालू शकत नाही , त्यांना येथे सृष्टी वरती यावेच लागते का ?

उत्तर:-
कारण मनुष्याची बुद्धी अगदीच तमोप्रधान आहे.तमोप्रधान बुद्धी प्रेरणा द्वारे ज्ञान घेऊ शकत नाही.बाबा येतात तेव्हा तर म्हणतात सोडून दे आकाश सिंहाहन

गीत:-
सोडून द्या आकाश सिंहासन तुम्ही धरती वरती या ..

ओम शांती।
भक्तांनी हे गीत बनवले आहे. याचा अर्थ खूप चांगला आहे.असे म्हणतात आकाश सिंहासन सोडून धरती वरती या. आता आकाश तर हे आहे.हे राहण्याचे स्थान आहे.आकाश दुसरी कोणती गोष्ट नाही.आकाशा मधून कोणती गोष्ट येत नाही.आकाश सिंहासन म्हणतात.आकाश तत्त्वांमध्ये तुम्ही राहतात आणि बाप महतत्वा मध्ये राहतात.त्यांना ब्रह्म किंवा महतत्त्व म्हणतात,जिथे आत्मे निवास करतात.बाबा पण जरूर तेथूनच येतील. कोणी तरी येतील ना.असे म्हणतात येऊन आमची ज्योत जागृत करा.गायन पण आहे एक अंधाची संतान अंध,तर दुसरे आहेत दृष्टी असणाऱ्याची संतान,नेत्रवान.धृतराष्ट्र आणि युध्दिष्ठिर नावं दाखवतात.आता हे तर रावणाचे संतान आहेत.मायारूपी रावण आहे ना.सर्वांची रावण बुद्धी आहे.आता तुमची ईश्वरी बुद्धी आहे.बाबा तुमच्या बुद्धीचे कुलप उघडत आहेत.रावण कुलप लावतात.कोणी,कोणत्या गोष्टीला समजत नाही,तर म्हणतात यांची तर दगडा सारखी बुद्धी आहे.बाबा येथे येऊन जागृत करतील ना.प्रेरणा द्वारे थोडेच काम होते.आत्मा जी सतोप्रधान होती,त्याची ताकत आता कमी झाली आहे,तमोप्रधान बनली आहे,एकदम झुंजार बनली आहे.मनुष्य मरतात तर दिवा तेवत ठेवतात.आता दिवा का तेवत ठेवतात?असे समजतात,ज्योती विझल्यामुळे अंधार व्हायला नको,म्हणून ज्योती तेवत ठेवतात.आता येथे ज्योती तेवत ठेवल्यामुळे प्रकाश कसा होईल? काहीच समजत नाहीत.आता तुम्ही समजदार बुद्धी बनतात.बाबा म्हणतात मी तुम्हाला स्वच्छ बुद्धी बनवतो,ज्ञानाचे तेल घालतो.या खुपच समजण्याच्या गोष्टी आहेत.ज्ञान आणि योग दोन्ही वेग वेगळ्या गोष्टी आहेत.योगाला ज्ञान म्हणणार नाही. काहीजण समजतात भगवंतानी येऊन हे ज्ञान दिले की,माझी आठवण करा परंतु याला ज्ञान म्हणणार नाही.हे तर पिता आणि मुलं झाले.मुलं जाणतात,हे माझे पिता आहेत,याला ज्ञान म्हणनार नाही.ज्ञानाचा तर विस्तार आहे.ही तर फक्त आठवण आहे.बाबा म्हणतात माझी आठवण करा,बस.ही तर साधारण गोष्ट आहे.याला ज्ञान म्हटले जात नाही.मुलांनी जन्म घेतला तर जरूर वडिलांची आठवण करेल ना.ज्ञानाचा विस्तार आहे.बाबा म्हणतात माझी आठवण करा,हे ज्ञान नाही झाले.तुम्ही स्वतः जाणता,आम्ही आत्मा आहोत,आमचे पिता परम आत्मा, परमात्मा आहेत.याला ज्ञान म्हणणार का? बाबांना बोलवतात. ज्ञान तर नॉलेज आहे, जसे कोणी एम.ए. शिकतात,कोणी बी.ए. शिकतात,अनेक पुस्तकं वाचावी लागतात. आता बाबा म्हणतात तुम्ही माझी मुल आहात ना,मी तुमचा पिता आहे.माझ्याशी योग लावा अर्थात आठवण करा,याला ज्ञान म्हणणार नाही.तुम्ही मूल तर आहातच. तुम्ही आत्मे कधी विनाशाला प्राप्त करत नाहीत.कोणी मरतात तर त्यांच्या आत्म्याला बोलवतात.आता शरीर तर नष्ट झाले,आत्मा भोजन कशी करेल?भोजन तर परत ब्राह्मणच खातील परंतु ही सर्व भक्तीमार्गाची परंपरा आहे.असे नाही की आमच्या सांगण्यामुळे भक्तीमार्ग बंद होईल. तो चालतच येतो.आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते.

मुलांच्या बुद्धीमध्ये ज्ञान आणि योगाचा फरक स्पष्ट व्हायला पाहिजे.बाबा जे म्हणतात माझी आठवण करा,हे ज्ञान नाही. बाबा तर सूचना देतात,याला योग म्हटले जाते.ज्ञान तर सृष्टीचक्र कसे फिरते,याला ज्ञान म्हणतात.योग म्हणजे आठवण. मुलांचे कर्तव्य आहे बाबांची आठवण करणे.ते लौकिक आहेत आणि हे पारलौकिक आहेत.बाबा म्हणतात माझी आठवण करा.तर ज्ञान वेगळी गोष्ट झाले ना.मुलांना असे सांगावे लागते का,

वडिलांची आठवण करा.लौकिक पिता तर जन्मताच आठवणीत राहतात.येथे तर पित्याची आठवण द्यावी लागते.यामध्येच कष्ट आहेत,स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा.हे फार कष्टाचे काम आहे.तर बाबा म्हणतात,योगामध्ये का स्थिर राहू शकत नाहीत.मुलं लिहतात,बाबांची आठवण विसरते,असे म्हणत नाहीत ज्ञान विसरते.ज्ञान तर खूपच सहज आहे.आठवणीला ज्ञान म्हटले जात नाही.या मध्ये खूप वादळ येतात.जरी कोणी ज्ञानामध्ये खूप हुशार आहेत,मुरली चांगली चालवतात परंतु बाबा विचारतात आठवणीचा चार्ट लिहा,किती समय आठवणीमध्ये राहतो.बाबांना आठवणीचा यर्थात चार्ट बनवून दाखवा.आठवणच मुख्य गोष्ट आहे.पतितच बोलवतात,येऊन पावन बनवा.पावन बनण्याची मुख्य गोष्ट आहे.यामध्ये च मायेचे विघ्न पडतात.शिव भगवानुवाच,आठवणीमध्ये सर्व मुलं खुप कच्चे आहेत.चांगली चांगली मुलं,मुरली तर खूप चांगली चालवतात परंतु आठवणीमध्ये कमजोर आहेत.योगा द्वारे च विकर्म विनाश होतील.योगा द्वारेच कर्मेंद्रिया बिल्कुल शांत होतात.एका बाबां शिवाय कोणाची आठवण यायला नको.कोणत्याही देहधारी ची आठवण यायला नको.आत्मा जाणते, ही सारी दुनिया नष्ट होणार आहे.आम्ही आपल्या घरी जातो,परत राजधानीमध्ये येऊ.हे नेहमी बुद्धीमध्ये राहायला पाहिजे. ज्ञान जे मिळते ते आत्म्यामध्ये राहिले पाहिजे.बाबा तर योगेश्वर आहेत,जे आठवण करणे शिकवतात.वास्तव मध्ये ईश्वराला योगेश्वर म्हणत नाहीत.तुम्ही योगेश्वर आहात.ईश्वर पिता म्हणतात माझी आठवण करा.आठवण शिकवणारे ईश्वर पिता आहेत.ते निराकार बाबा शरीराद्वारे ऐकवतात.मुलं पण शरीराद्वारे ऐकतात. काही तर योगामध्ये खूप कच्चे आहेत, बिल्कुलच आठवण करत नाहीत.जे पण जन्म जन्मांतराचे पापं आहेत, त्याची सजा खावी लागेल.येथे येऊन जे पाप करतात ते ते तर आणखीनच शंभर पटीने सजा खातात.ज्ञानाची टिकटिक तर खूप करतात.योग बिलकुलच नाही,ज्यामुळे पाप भस्म होत नाहीत,कच्चेच राहतात,म्हणून खरी-खरी माळ ८ मण्याची बनते. ९ रत्नांचे गायन केले जाते.१०८ रत्न कधी ऐकले आहेत.१०८ रत्नाची कोणतीच गोष्ट बनत नाही.अनेक आहेत जे,या गोष्टींना पूर्णपणे समजत नाहीत.आठवणीला ज्ञान म्हटले जात नाही. ज्ञान सृष्टी चक्राला म्हटले जाते. ग्रंथांमध्ये हे ज्ञान नाही.ते ग्रंथ भक्ती मार्गातील आहेत.बाबा स्वतः म्हणतात यांच्याद्वारे मी भेटत नाही.साधू संतांचा उद्धार करण्यासाठी मी येतो.ते समजतात ब्रह्म मध्ये मिसळून जायचे आहे,परत पाण्याच्या बुडबुड्या चे उदाहरण देतात. आता तुम्ही असे म्हणत नाही.तुम्ही तर जाणतात आम्ही आत्मा बाबांची मुलं आहोत.माझीच आठवण(मामेकम याद) करा,हे अक्षर पण म्हणतात परंतु अर्थ समजत नाहीत.जरी म्हणतात आम्ही आत्मा आहोत,परंतू मी आत्मा कशी आहे, परमात्मा कोण आहेत, हे ज्ञान बिलकूलच नाही. हे बाबाचे येऊन ऐकवतात.आता तुम्ही जाणतात,आमचे ते घर आहे.तेथे सर्व सिजरा आहे.प्रत्येक आत्म्याला आपापली भूमिका मिळालेली आहे.सुख कोण देते, दुःख कोण देते,हे कुणालाच माहिती नाही. भक्ती रात्र आहे,ज्ञान दिवस आहे.६३ जन्म तुम्ही धक्के खातात,परत मी ज्ञान देतो,तर किती वेळ लागतो,एक सेकंड.हे तर गायन आहे सेकंदामध्ये जीवन मुक्ती.हे तर तुमचे पिता आहेत ना,तेच पतित पावन आहेत.त्यांची आठवण केल्यामुळे तुम्ही पावन बनाल.सतयुग त्रेता द्वापर,कलियुग हे चक्र आहे ना.नावं पण जाणतात परंतु पत्थर बुद्धी असे आहेत,जे वेळेची कुणालाच माहिती नाही.हे समजतात आता घोर कलियुग आहे.जर कलियुग आणखी चालत राहील, तर घोर काळोख होईल,म्हणून गायन पण आहे कुंभकरण सारखे झोपले आहेत आणि विनाश झाला.थोडे पण ज्ञान ऐकले तर प्रजा मध्ये बनतात.कुठे लक्ष्मीनारायण,कुठे प्रजा,शिकवणारे तर एक बाबतचा आहेत. प्रत्येकाचे आप आपले भाग्य आहे.काही जण तर शिष्यवृत्ती घेतात आणि काहीजण नापास होतात.रामाला बाणाची खून का दाखवली आहे,कारण ते नापास झाले.ही पण गीता पाठशाला आहे.काहीजण तर काहीच गुण घेण्याच्या लायक नाहीत.मी आत्मा बिंदू आहे,बाबा पण बिंदू आहेत, अशा प्रकारे त्यांची आठवण करायची आहे.या गोष्टीला समजत नाहीत,ते कोणते पद प्राप्त करतील.आठवणीमध्ये न राहिल्यामुळे खूप नुकसान होते. आठवणीचे बळ खूपच कमाल करते, कर्मेंद्रिया बिलकुल शांत शीतल होतात. ज्ञानाद्वारे शांत होणार नाहीत,योगाच्या बळा मुळे शांत होतात.भारतवासी बोलवतात,की आम्हाला येऊन गितेचे ज्ञान ऐकवा.आता कोण येतील?कृष्णाची आत्मा तर येथेच आहे.सिंहासना वरती थोडेच बसते,ज्याला बोलवतात.जर कोणी म्हणते आम्ही येशू ख्रिस्ताच्या आत्म्याची आठवण करतो,अरे ते तर येथेच आहेत.त्यांना माहीत नाही की येशू ख्रिस्ताची आत्मा पण येथेच आहे.कोणीही परत जाऊ शकत नाही.लक्ष्मी नारायण जे प्रथम नंबरचे आहेत, तेच 84 जन्म घेतात.तर दुसरे परत कसे जाऊ शकतील? हा पण हिशेब आहे ना.मनुष्य जे काही बोलतात,ते सर्व खोटेच खोटे आहे.अर्धा कल्प खोटी दुनिया अर्धा कल्प खरी दुनिया आहे.आता तर प्रत्येकाला समजायला पाहिजे,यावेळेत सर्व नर्कवासी आहेत,परत स्वर्गवासी भारत वासीच बनतील.मनुष्य अनेक वेद ग्रंथ उपनिषद इत्यादी अभ्यास करत राहतात, काय याद्वारे मुक्तीला प्राप्त करतील. उतरायचे तर आहेच.प्रत्येक गोष्ट सतो,रजो, तमो मध्ये जरूर येते.नवीन दुनिया कशाला म्हटले जाते,कोणालाही हे ज्ञान नाही.हे तर बाबत सन्मुख समजतात.देवी देवता धर्म कधी,कोणी स्थापन केला,हे भारत वासिंना काहीच माहिती नाही.तर बाबा समजवतात ज्ञाना मध्ये जरी किती हुशार असतील परंतु योगा मध्ये अनेक मुलं नापास आहेत.योग नसेल तर विकर्म विनाश होणार नाहीत, उच्च पद मिळणार नाही.जे योगा मध्ये मस्त आहेत,तेच उच्चपद प्राप्त करतील. त्यांच्या कर्मेंद्रिया बिलकुल शीतल होतील. देह सहित सर्वकाही विसरून देही अभिमानी बनतात.आम्ही अशरीरी आहोत, आता घरी जात आहोत.उठता-बसता समजायचे आहे,आता हे शरीर तर सोडायचे आहे.आम्ही भूमिका पूर्ण केली आत्ता घरी जात आहोत.ज्ञान तर मिळाले आहे,जसे बाबा मध्ये ज्ञान आहे,त्यांना तर कोणाची आठवण करायची नाही.आठवण तर तुम्हा मुलांना करायची आहे.बाबांना ज्ञानाचे सागर म्हटले जाते,योगाचे सागर तर बनणार नाही ना.सृष्टिचक्रा चे ज्ञान ऐकवतात आणि स्वतःचा पण परिचय पण देतात.आठवणीला ज्ञान म्हटले जात नाही. आठवण तर मुलांना स्वतः येते.आठवण तर करायचीच आहे,नाहीतर वारसा कसा मिळेल.बाबा आहेत तर जरूर वारसा मिळतो.बाकी ज्ञान आहे.आम्ही ८४ जन्म कसे घेतो,तमोप्रधान पासुन सतोप्रधान,परत सतोप्रधान पासुन तमोप्रधान,कसे बनतो हे बाबाच समजवतात.आता सतोप्रधान बनायचे आहे,बाबांच्या आठवणी द्वारे.तुम्ही आत्मिक मुलं आत्मिक पित्या जवळ आले आहात,त्यांना शरीराचा आधार तर पाहिजे ना.असे म्हणतात मी वृद्ध तना मध्ये प्रवेश करतो. आहे पण वाणप्रस्थ अवस्था.आता बाबा येतात तेव्हा तर साऱ्या सृष्टीचे कल्याण होते.हा भाग्यशाली रथ आहे, यांच्याद्वारे खूप सेवा होते.तर या शरीराचे भान सोडण्यासाठी आठवण पाहिजे. यामध्ये ज्ञानाची गोष्ट नाही.जास्त आठवण शिकवयची आहे.ज्ञान तर सहज आहे. छोटा मुलगा पण ऐकवेल.बाकी आठवणी मध्ये कष्ट आहेत.एकाची आठवण रहावी याला म्हटले जाते,अव्यभिचारी आठवण. कोणाच्या शरीराची आठवण करणे म्हणजे व्यभिचारी आठवण आहे.आठवणीच्या यात्रे द्वारे सर्वांना विसरून अशरीरी बनायचे आहे.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

वरदान:-
लोखंडा सारख्या आत्म्याला पारस बनवणारे मास्टर पारसनाथ भव .

तुम्ही सर्व पारसनाथ ची मुलं मास्टर पारसनाथ आहात.कोणत्या ही प्रकारची लोखंडा सारखी आत्मा असेल परंतु तुमच्या संगती द्वारे लोखंड पण पारस बनेल.हे लोखंडा सारखे आहेत,असे कधीच विचार करायचा नाही.पारस चे काम आहे लोखंडाला पारस बनवणे.हेच लक्ष नेहमी स्मृतीमध्ये ठेवून,प्रत्येक संकल्प प्रत्येक कर्म करा,तेव्हा अनुभव होईल की मज आत्म्याची प्रकाशाचे किरणे अनेक आत्म्यांना सोन्या सारखी बनवण्याची शक्ती देत आहे.

बोधवाक्य:-
प्रत्येक कार्य सहासा द्वारे करा तर,सर्वांचे सन्मान प्राप्त होतील.