15-05-22 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
18.01.91 ओम शान्ति
मधुबन
विश्व कल्याणकारी
बनण्यासाठी सर्व स्मृतीने संपन्न बनून सर्वांना सहयोग द्या
आज समर्थ बाप आपल्या
स्मृती स्वरूप मुलांना बघून हर्षित होत आहेत. विश्वातील देश विदेशातील सर्व मुले
स्मृती दिवस साजरा करत आहेत. आजचा स्मृती दिवस मुलांना आपले ब्राह्मण जीवन अर्थात
समर्थ जीवनाची आठवण करून देतो, कारण ब्रम्हा बाबांच्या जीवन कहानी बरोबर ब्राह्मण
मुलांची पण जीवन कहाणी आहे. निराकार बाबाने साकार ब्रह्मा बरोबर ब्राह्मण रचले.
तेव्हाच ब्राह्मणांच्या द्वारे अविनाशी यज्ञाची रचना झाली. ब्रह्मा बाबा तुम्हा
ब्राह्मणांच्या बरोबर संस्थापनेच्या निमित्त बनले, तर ब्रह्मा बाबाच्या बरोबर आदि
ब्राह्मणांची पण जीवन कहाणी आहे. आदि देव ब्रह्मा आणि आधी ब्राह्मण दोघांचे महत्त्व
यज्ञ स्थापनेमध्ये आहे. अनादी बाबाने आदि देव ब्रह्मा द्वारे ब्राह्मणांची रचना केली.
आणि आदि ब्राह्मणांनी अनेक ब्राह्मणांची वृद्धी केली. या स्थापनेची ब्रह्मा बाबाची
कहाणी आजच्या स्मृती दिवसावर वर्णन करता. स्मृति दिवस म्हणता तर फक्त ब्रह्मा बाबाची
आठवण केली किंवा ब्रह्मा बाबाद्वारे बाबांनी ज्या स्मृती दिलेल्या आहेत, त्या सर्व
स्मृती पण आठवणीत आल्या ? आदी पासून आत्तापर्यंत कोणकोणत्या आणि किती स्मृति
दिलेल्या आहेत, या आठवणीत आहेत? अमृत वेळेपासून रात्रीपर्यंत सर्व स्मृतींना समोर
आणा - एका दिवसांमध्ये पूर्ण होऊन जाईल ? लांब लचक यादी आहे ना . स्मृती सप्ताह पण
साजरा केला तरी विस्तार जास्त आहे, कारण फक्त रिवाईज नाही करायची परंतु, अनुभूती पण
करता, म्हणून म्हटले जाते स्मृती स्वरूप. स्वरूप म्हणजे प्रत्येक स्मृतीची अनुभूती.
तुम्ही स्मृति स्वरूप बनता आणि भक्त फक्त स्मरण करतात. तर कोणकोणत्या स्मृती
अनुभवल्या आहेत– याचा विस्तार खूप मोठा आहे. जसे बाबाचा परिचय किती मोठा आहे, परंतु
तुम्ही लोक सार रूपामध्ये पाच गोष्टींचा परीचय देता. असे स्मृतींच्या विस्ताराला पण
पाच गोष्टीमध्ये सार रूपामध्ये आणा की, आदि पासून आत्तापर्यंत बाप दादाने किती नावे
स्मृतीमध्ये दिलेली आहेत. किती नावे असतील. विस्तार तर आहे ना. एकेक नावाला
स्मृतीमध्ये आणा आणि स्वरूप बनून अनुभव करा, फक्त रिपीट करू नका. स्मृति स्वरूप
बनण्याचा आनंद खुप वेगळा आणि प्रिय आहे. जसे बाबा तुम्हा मुलांना नुरे रत्न नावाची
स्मृती देतात. बाबाच्या डोळ्यातील (नूर), प्रकाश आहात. प्रकाशाची विशेषता काय असते,
त्याचे कर्तव्य काय असते, शक्ती काय असते? अशी अनुभूती करा अर्थात स्मृती स्वरूप बना.
या पद्धतीने प्रत्येक नावाच्या स्मृतीचा अनुभव करत रहा. हे एक उदाहरण म्हणून
सांगितले. अशाच श्रेष्ठ स्वरूपाच्या स्मृती किती आहेत? तुम्हा ब्राह्मणांची किती
रूप आहेत. जी बाबाची रूपे ती ब्राह्मणांची रूपे आहेत. त्या सर्व रुपांच्या स्मृतींची
अनुभूती करा. नाव, रुप, गुण, – अनादि, आदि आणि आता ब्राह्मण जीवनाच्या सर्व गुणांनी
स्मृती स्वरूप बना. असे किती श्रेष्ठ कर्तव्याच्या निमित्त बनलेला आहात. त्या
कर्तव्यांच्या स्मृतीला उजाळा द्या. पाचवी गोष्ट बाप दादाने अनादि -आदि देशाची
स्मृती दिली आहे. देशाच्या स्मृतीने परत घरी जाण्याची शक्ती आली. आपल्या राज्यामध्ये
राज्य अधिकारी बनण्याची हिम्मत आली, आणि वर्तमान संगमयुगी ब्राह्मणांच्या जगामध्ये
खुशी युक्त जीवन जगण्याची कला स्मृतीमध्ये आली. जगण्याची कला चांगल्या रितीने आली
ना ? जग मरण्याच्या कलेमध्ये प्रगतीवर आहे आणि तुम्ही ब्राह्मण सुखमय खुशी युक्त
जीवनाच्या कलेमध्ये प्रगती करत आहात किती अंतर आहे. स्मृती दिवस म्हणजे सर्व
स्मृतींच्या आत्मिक नशेचा अनुभव करणे. या स्मृती दिवसाच्या निमित्ताने दुनिया
वाल्यांच्या सारखे तुम्ही हे शब्द म्हणू शकत नाही की असे आमचे ब्रह्मा बाबा होते.
त्यांनी असे म्हटले होते, हे केले होते, असे केले होते. तुम्हा ब्राह्मणांची ही
विशेषता आहे – तुम्ही म्हणाल आत्ताही बरोबर आहेत. बरोबर असल्याचा अनुभव करता. तर
तुमच्या मध्ये ही विशेषता आहे. तुम्ही असे म्हणू शकणार नाही की, ब्रह्मा बाबांनी
शरीर स़ोडले. जी प्रतिज्ञा केलेली आहे – बरोबर राहू , बरोबर जाऊ. जर आदि आत्मा
प्रतिज्ञेचे पालन करणार नाही तर कोण करणार ? फक्त रूप आणि सेवेची विधी बदललेली आहे.
तुम्हा सर्वांचे लक्ष आहे फरिश्ता सो देवता बनण्याचे. फरीश्ता रूपा चे उदाहरण
ब्रह्मा बनलेले आहेत. सर्व मुलांची पालना आताही ब्रह्मा द्वारा होत आहे. म्हणून
ब्रह्माकुमार आणि ब्रम्हाकुमारी म्हटले जाते. समजले? स्मृती दिवसाचे महत्त्व काय आहे?
या स्मृतीमध्ये सदैव लवलीन राहा. यालाच म्हटले जाते- बाप समान बनण्याची अनुभूती.
तुम्हीच बाप समान अनुभव केलेला आहे. या समान शब्दांना लोकांनी सामावणे म्हटले आहे.
आत्मा-परमात्म्या मध्ये सामावली जात नाही , परंतु बाप समान बनते. प्रत्येक मुलांनी
आपापल्या नावाने स्मृती दिवसाची आठवण पाठवलेली आहे. काहीजण संदेशी बनून आठवण घेऊन
आले, आणि प्रत्येक जण म्हणतो की खास माझी आठवण द्या. तर प्रत्येकाला वेगवेगळे
आठवणीचे पत्र लिहिण्या ऐवजी मनापासून, हृदयापासून पत्र लिहीत आहेत. प्रत्येकाचे
अमृतवेळे पासूनचे प्रेम बाप दादांच्या डोळ्यारुपी हृदयामध्ये सामावलेले आहे आणि आता
तर विशेष सामावलेले आहे. खास आठवण करणाऱ्यांना बाप दादा खास आत्ता पण इमर्ज करून
स्नेह आठवण देत आहेत. प्रत्येकाच्या हृदयाचा उमंग आणि रुहरिहान , हृदयाची हालचाल
दिला राम बाबा जवळ पोहोचलेली आहे. बाप दादा सर्व मुलांना हीच स्मृती देत आहेत, की
सदैव ह्रदया मधे आहात सेवेमध्ये पण सोबत आहात आणि स्थितीमध्ये सदा साक्षी आहात.
तेव्हा सदैव मायाजीत म्हणून झेंडा फडकत रहावा. सर्व मुलांना "नथिंग न्यू" म्हणजे
नविन काही च नाही, चा धडा प्रत्येक परिस्थितीमध्ये सदैव स्मृती मध्ये रहावा.
ब्राह्मण जीवन म्हणजे प्रश्नचिन्ह आणि आश्चर्याची रेषा होऊ शकत नाही. किती वेळा ही
बातमी पण ऐकलेली असणार ? नवीन बातमी आहे काय ? नाही. म्हणून ब्राह्मण जीवन म्हणजे
प्रत्येक गोष्ट ऐकताना कल्पा पूर्वीच्या स्मृतीने समर्थ राहणे. जे होणार आहे ते होत
आहे , म्हणून काय होईल ? हा प्रश्न निर्माण ह़ोवू शकत नाही. त्रिकालदर्शी आहात,
नाटकाच्या आदि, मध्य अंताला जाणणारे आहात, तर काय वर्तमानला जाणू शकत नाही. घाबरत
तर नाही ना ? ब्राह्मण जीवनामध्ये प्रत्येक पावला मध्ये कल्याण आहे. घाबरण्याची
गोष्ट नाही. तुम्हा सर्वांचे कर्तव्य आहे आपल्या शांतीच्या शक्तीने अशांत आत्म्यांना
शांतीची शक्ती (किरणे) देणे. आपलेच भाई बहीण आहेत, तर आपल्या ईश्वरीय परिवाराच्या
संबंधांनी सहयोगी बना. जेवढी युद्धामध्ये तीव्र गती आहे, तुम्हा योगी आत्म्यांचा
योग त्यांना शांतीचा सहयोग देईल म्हणून विशेष वेळ काढून शांतीचा सहयोग द्या. हे आहे
तुम्हा ब्राह्मण आत्म्यांचे कर्तव्य. अच्छा! सर्व स्मृती स्वरूप श्रेष्ठ आत्म्यांना,
समान बनण्याचे लक्ष आणि लक्षण धारण करणार्या आत्म्यांना, सदैव बाबा बरोबर असलेल्याचा
अनुभव करणारे, अशा समीपच्या (जवळच्या) आत्म्यांना सदैव नथिंग न्यु चा पाठ सहज
स्वरूपामध्ये धारण करणारे, सदैव विश्व कल्याणकारी बनून विश्वातील आत्म्यांना सहयोग
देणारे, अशा सदा विजय रत्नांना स्नेह पुर्वक आठवण आणि नमस्ते.
दादिंच्या बरोबर
अव्यक्त बाप दादांची वार्तालाप :-
आदि ब्राह्मणां ची
माळा ब्रह्मा बाबाच्या बरोबर आदी ब्राह्मण निमित्त बनले ना. आदी ब्राह्मणांचे खूप
मोठे महत्त्व आहे. स्थापना, पालना आणि परिवर्तन. विनाश शब्द थोडा अवघड वाटतो, तर
स्थापना, पालना आणि विश्व परिवर्तन करण्यामध्ये आदी ब्राह्मणांची विशेष भूमिका आहे
. शक्तींची पूजा खूप धूमधडाक्याने होते. निराकार बाबा आणि ब्रह्मा बाबाची पूजा
एवढ्या धूम धूम धडाक्याने होत नाही. ब्रह्माचे मंदिर पण खूप गुप्तच आहे. परंतु शक्ती
सेना भक्तीमध्ये पण प्रसिद्ध आहे, म्हणून अंत पर्यंत स्टेजवर विशेष मुलांची भूमिका
आहे. ब्रह्माची पण गुप्त भूमिका आहे –अव्यक्त रूप म्हणजे गुप्त. ब्राह्मणांना तैयार
केले आणि ब्रह्माची भूमिका गुप्त झाली. सरस्वतीला पण गुप्त दाखवतात, कारण त्यांची
पण नाटकांमध्ये गुप्त भूमिका चाललेली आहे. आदी ब्राह्मण आत्मा सर्व एकमेकाच्या जवळ
आणि शक्तिशाली आहेत. शरीर कमजोर नाही शक्तिशाली आहे. (दादी जानकी बरोबर) हे तर
थोडेसे मध्यंतरी विश्रांती घेण्याचे साधन बनलेले आहे. बाकी काही नाही. तशी तर
विश्रांती घेतच नाही ना. काही कारण बनते विश्रांती घेण्यासाठी. सर्व दादीमध्ये खूप
प्रेम आहे ना. बाबांबरोबर निमित्त आदि ब्राह्मणावर पण प्रेम आहे. तेव्हा तुम्हा
सर्वांच्या प्रेमाचे, आशिर्वाद, शुभ भावना, आदि ब्राह्मण आत्म्यांना निरोगी ठेवते.
चांगले आहे, शांतीच्या सेवेची चांगली भूमिका मिळाली आहे. किती अशांत आत्मा आहेत.
किती प्रार्थना करत आहेत. त्यांना काही ना काही तरी अंचली देणार ना ? देवींच्या
समोर जाऊन शक्ती मागतात ना. तेव्हा शक्ती देणे तुम्हा विशेष आत्म्यांचे कर्तव्य आहे
ना ? दिवसेंदिवस हा अनुभव करतील की कोठून तरी शांतीची किरणे येत आहेत. पुन्हा
शोधतील, सर्वांची नजर भारत भुमीकडे कडे वळेल. अच्छा!
अव्यक्त महावाक्य -
पार्टी बरोबर
१– निश्चय बुद्धी
विजयी आत्मा आहात असा अनुभव करताना? सदैव निश्चय अटल राहतो का कधी डगमग होतो ?
निश्चय बुद्धीची लक्षणं आहेत -ते प्रत्येक कार्यामध्ये, मग ते व्यावहारिक असेल किंवा
परमार्थी असेल, परंतु प्रत्येक कार्यामध्ये विजयाचा अनुभव करेल. कोणतेही साधारण
कर्म असेल, परंतु विजयाचा अधिकार त्याला अवश्य प्राप्त होईल, कारण ब्राह्मण जीवनाचा
विशेष जन्मसिद्ध अधिकार विजय आहे. कोणत्याही कार्यामध्ये स्वतः गोंधळणार नाहीत,
कारण त्याला निश्चय आहे की विजय जन्मसिद्ध अधिकार आहे. तेव्हा एवढा अधिकाराचा नशा
राहतो. ज्याचा भगवान मदत गार आहे त्यांचा विजय नाही होणार, तर कोणाचा होणार. कल्पा
पूर्वीची यादगार पण दाखवतात, की जेथे भगवान आहेत, तेथे विजय आहे. भले पाच पांडव
दाखवतात, परंतु विजय का झाली तर भगवान बरोबर होते म्हणून. तर जेव्हा कल्पा
पूर्वीच्या यादगार मध्ये विजयी बनलेला आहात, तर आत्ता पण विजयी होणार ना ? कोणत्याही
कार्यामध्ये संकल्प करायचा नाही की, हे होईल का नाही होणार ? विजय होईल का नाही… हा
प्रश्न येवू नये. कधीही ज्याच्या बरोबर बाबा आहे त्याची हार होऊ शकत नाही. ही कल्पा
कल्पा ची नोंद आहे. या भावीला कोणी ही टाळू शकत नाही. हा दृढनिश्चय सदैव पुढे नेत
राहील. तेव्हा सदैव विजयाच्या आनंदामध्ये नाचत-गात रहा.
२- सदा स्वतःला
भाग्यविधात्याची भाग्यवान मुले आहोत असा अनुभव करता. पद्मा पदम भाग्यवान आहात का,
सौभाग्यवान आहात ? ज्याचे एवढे श्रेष्ठ भाग्य आहे तो सदैव हर्षित राहील. कारण
भाग्यवान आत्म्याला कोणतीच अप्राप्ती असत नाही. जेथे सर्व शक्तींची प्राप्ती असेल,
ते सदैव हर्षित असतील . कोणाला अल्प कालची लॉटरी मिळाली तरी त्यांचा चेहरा पण सांगतो
की काहीतरी मिळालेले आहे. तर ज्यांना पद्मा पदम भाग्य प्राप्त झालेले आहे, तर ते कसे
असतील. सदैव हर्षित. असेच हर्षित राहा जे कोणी पण बघितले तर विचारावे की एवढे काय
मिळालेले आहे. जेवढे जेवढे पुरुषार्था मध्ये पुढे जात राहाल, तेवढे तुम्हाला
बोलण्याची पण गरज वाटणार नाही. तुमचा चेहरा सांगेल की, त्यांना काय मिळालेले आहे?
कारण चेहरा आरसा असतो. जसे आरशामध्ये जी वस्तू जशी असते तशी दिसते, तसा तुमचा चेहरा
आरशाचे काम करेल. एवढ्या आत्म्यांना जो संदेश मिळालेला आहे तर एवढा वेळ कोठून
मिळणार जे तुम्ही बसून ऐकवू शकाल ? वेळ पण नाजूक होत जाईल की कोणाला ऐकवायला पण वेळ
मिळणार नाही. तर मग सेवा कशी कराल ? आपल्या चेहऱ्याने. जसे म्युझियम मध्ये
चित्रांच्या द्वारे सेवा करतात . चित्रे बघून प्रभावित होतात ना. तेव्हा आपले
चैतन्य चित्र सेवेच्या निमित्त बनेल असे तयार आहात ? एवढे चैतन्य चित्र तयार झाले
तर आवाज बुलंद होईल. सदैव चालता-फिरता, उठता-बसता ही स्मृती ठेवा कि मी चैतन्य
चित्र आहे. संपूर्ण विश्वातील आत्म्याची नजर माझ्याकडे आहे. चैतन्य चित्रांमध्ये
सर्वात आकर्षणाची गोष्ट कोणती असते ? सदैव खुशीत असतील. तर सदैव खुश राहता का कधी
गोंधळात पडता? का तेथे जाऊन म्हणाल हे असं झालं त्यामुळे खुशी कमी झाली. काही पण
होऊ द्या, पण खुशी कमी होता कामा नये. असे पक्के आहात? जरी मोठा पेपर आला तरीही पास
व्हाल ? बाप दादा सर्वांचा फोटो काढत आहेत, की कोण कोण "हा' म्हणत आहे. असं नाही
म्हणायचं की त्यावेळी म्हटले होते. मास्टर सर्वशक्तिवाना समोर तशी तर कोणतीच गोष्ट
मोठी नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला निश्चय आहे की, आमचा विजय झालेलीच आहे, म्हणून
कोणतीही मोठी गोष्ट नाही. ज्याच्या जवळ सर्व शक्तींचा खजाना आहे, कोणत्याही शक्तीला
आव्हान करा ती शक्ती मदतगार बनेल. फक्त आव्हान करणारा हिम्मतवाला पाहिजे. तर ऑर्डर
करायला येते की ऑर्डर वर चालता येते ? कधी मायेच्या ऑर्डर वर तर चालत नाही? असं तर
नाही की एखादी गोष्ट आली आणि समाप्त झाली, पुन्हा विचार करता की असं केलं असतं तर
खूप चांगलं झालं असतं. असं तर नाही ना ? वेळेवर सर्व शक्ती उपयोगी येतात का थोडे
मागेपुढे होते ? जर मास्टर सर्वशक्तिवानाच्या सीटवर सेट होऊन कोणत्याही शक्तीला
ऑर्डर केली तर ती मानणार नाही असे होऊच शकत नाही. जेव्हा सीट वरून खाली येता आणि
पुन्हा ऑर्डर करता तर ती ऐकत नाही. लौकिक मध्ये पण कोणी खुर्चीवरून उतरते तर त्याची
ऑर्डर कोणी मानत नाही. जर कोणती शक्ती ऑर्डर मानत नसेल तर अवश्य पोझिशन च्या सीट
वरून खाली आलेले आहात. तर सदा मास्टर सर्वशक्तीवानाच्या सीटवर बसा. सेट राहा . सदैव
अचल, अडोल रहा। हलचल वाले बनू नका. बाप दादा म्हणतात शरीर सुटले तरी खुशी जाऊ नये.
पैसा तर त्याच्यासमोर काहीच नाही. ज्याच्याजवळ खुशीचा खजाना आहे, त्याच्यासमोर
कोणतीच गोष्ट मोठी नाही. आणि बाप दादा सदैव सहयोगी सेवाधारी म्हणून मुलांच्या बरोबर
आहेत. मुलगा बाबा बरोबर असेल तर कोणती मोठी गोष्ट असते का ? म्हणून घाबरण्याचे कारण
नाही. बाबा बसलेले आहे, तर मुलांनी चिंता का करावी. बाबा तर आहेच मालामाल. कोणत्याही
युक्तीने मुलांची पालना करायचीच आहे. म्हणून बेफिकीर. दु:खधाममध्ये सुखधामची स्थापना
करत आहेत, तर दुःखधाममध्ये हलचल तर होणारच ना ? उन्हाळ्यामध्ये गर्मीचा अनुभव तर
होणार ना . परंतु बाबांची मुले सदैव सुरक्षित आहेत. कारण बाबा साथी आहे. सर्व
मुलांच्या प्रती बापदादाचा संदेश– सर्व तपस्वी मुलांप्रती स्नेहपूर्वक आठवण. हे पहा
मुलांनो, वेळोवेळेच्या बातम्या ऐकत श्रेष्ठ ते श्रेष्ठ साक्षीपणाच्या आणि बेफिकीर
बादशहाच्या सिंहासन वर बसून सर्व खेळ बघत आहात ना? या ब्राह्मण जीवनामध्ये
घाबरण्याचा विचार तर स्वप्नांमध्ये पण येऊ शकत नाही. हा तर तपस्या वर्षांमध्ये
निरंतर आठवणीच्या अग्नीमध्ये बेहद्च्या वैराग्याची वृत्ती प्रज्वलित करण्याचा पंखा
आहे. तुम्ही बाप समान संपन्न बनण्याचि संकल्प केला म्हणजे विजयाचा झेंडा फडकवण्याची
योजना बनवली, तर दुसरीकडे समाप्तीची हलचल सुद्धा बरोबर नोंद झालेली आहे ना ?
रिहर्सलच नाटकाच्या रिळला समाप्त करण्याचे साधन आहे. म्हणून नथिंग न्यु. वेळेच्या
अडचणी अनुसार येण्या जाण्या मध्ये किँवा कोणतीही वस्तू मिळण्यामध्ये जर काही ओढातान
होत असली तरी मनाच्या संकल्पाची ओढाताण होवू नये. जेथे ज्या परिस्थितीमध्ये राहता,
तेथे दिलखुश मिठाई खात रहा. खुशीत राहा. फरिश्ता प्रमाणे उडत राहा. त्याच बरोबर
यावेळी प्रत्येक सेंटरवर विशेष तपस्याचा प्रोग्रॅम पण चालत राहावा. जो जेवढा वेळ
काढू शकतो तेवढा शांतीचा सहयोग द्या. अच्छा! ओम शांती
वरदान:-
सर्व
खजान्यांनी संपन्न बनून प्रत्येक वेळी सेवेमध्ये गुंतून राहणारे विश्व कल्याणकारी
बना .
विश्व कल्याणाच्या
निमित्त बनलेली आत्मा प्रथम स्वतः सर्व खजान्यांनी संपन्न असेल. जर ज्ञानाचा खजाना
आहे तर पूर्ण ज्ञान असावे. कोणतीही कमतरता नसावी, तेव्हा म्हणतील भरपूर. कोणा कोणा
जवळ खजाना भरपूर असूनही वेळेवर कार्यामध्ये लावू शकत नाहीत. वेळ निघून गेल्यानंतर
विचार करतात, तर त्यांना पण संपन्न म्हटले जात नाही. विश्व कल्याणकारी आत्मा मन्सा,
वाचा, कर्मणा, संबंध संपर्कामध्ये प्रत्येक वेळी सेवेमध्ये गुंतून असते.
सुविचार:-
ज्ञान आणि
योगाचा स्वभाव बनवा तर प्रत्येक कर्म स्वभाविक, श्रेष्ठ आणि युक्ती युक्त होईल.
सूचना :-आज महिन्याचा
तिसरा रविवार आहे, सर्व राजयोगी तपस्वी भाऊ-बहिणी सायंकाळी विशेष योगाभ्यासाच्या
वेळी आपल्या पूर्वजपणाच्या स्वमानामध्ये स्थिर होऊन कल्पवृक्षाच्या बुंध्या मध्ये
बसून, पुर्ण वृक्षाला शक्तिशाली योगाचे दान देत आपल्या वंशावळीची दिव्य पालना करा.
ओम शांती.