15-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्हाला खरेखुरे वैष्णव बनायचे आहे,खरे वैष्णव भोजनाचे पथ्य पालन करतात,त्या सोबत पवित्र पण राहतात"

प्रश्न:-
कोणता अवगुण,जर गुणा मध्ये परिवर्तन झाला तर,नाव भवसागरातून किनाऱ्याला लागू शकते?

उत्तर:-
सर्वात मोठा अवगुण मोह आहे.मोहामुळे नातेवाईकांची आठवण येत राहते.(माकडाचे उदाहरण आहे )कोणाच्या नातेवाईकाचा मृत्यू होतो,तर बारा महिने त्याची आठवण करत राहतात. तोंड झाकून रडत राहतात,आठवण येत राहते.अशाप्रकारे जर बाबाची दिवस-रात्र आठवण केली तर तुमची नाव भवसागरातून पार होईल.जसे नातेवाईकाची आठवण करतात,तशी बाबांची आठवण करत राहा,तर अहो सौभाग्य.

ओम शांती।
ाबा रोज रोज मुलांना समजवतात की,स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत राहा. आज त्याच्यामध्ये भर घालतात, फक्त शिवपिता नाही दुसरे पण समजायचे आहे.मुख्य गोष्ट ही आहे परमपिता परमात्मा त्यांना ईश्वरीत पिता पण म्हणतात,ज्ञानसागर पण म्हणतात.ज्ञानाचा सागर झाल्यामुळे शिक्षक पण आहेत,राजयोग शिकवतात.हे समजून सांगितल्यामुळे समजतील की,सत्य पिता यांना शिकवत आहेत. हे वास्तविक गोष्टी ऐकवत आहेत.ते सर्वांचे पिता आहेत, शिक्षक पण आहेत,सदगती दाता पण आहेत आणि परत त्यांना ज्ञानसंपन्न पण म्हटले जाते.पिता,शिक्षक, पतित-पावन ज्ञानाचे सागर पण आहेत.प्रथम तर त्याची महिमा करायला पाहिजे.ते आम्हाला शिकवत आहेत.आम्ही ब्रह्माकुमार कुमारी आहोत.ब्रह्मा पण शिवबाबांची रचना आहे.आता हे संगमयुग आहे.मुख्य उद्देश पण राजयोगाचा आहे.आम्हाला राजयोग शिकवत आहेत,तर शिक्षक पण झाले आणि हे शिक्षण नवीन दुनियासाठी आहे.येथे बसून हे पक्के करायचे आहे,आम्हाला काय काय समजून घ्यायचे आहे.याची धारणा व्हायला पाहिजे.कोणाला जास्त धारणा होते कोणाला कमी होते.ते पण,जे ज्ञानामध्ये जास्त हुशार असतात, त्यांचे नाव प्रसिद्ध होते,पद पण उच्च मिळते.बाबा पथ्य पण सांगत राहतात.तुम्ही पूर्ण वैष्णव बनतात, वैष्णव शाकाहारी असतात.दारू मटण इत्यादी खात नाहीत परंतु विकारांमध्ये जात राहतात.तर बाकी वैष्णव बनले म्हणजे काय झाले? वैष्णव कुळाचे म्हणतात,कांदा इत्यादी तमोगुणी गोष्टी खात नाहीत. तुम्ही मुलं जाणतात,तमोगुणी गोष्टी काय काय आहेत.काही चांगले मनुष्य असतात,ज्यांना धार्मिक मनाचे किंवा भक्त म्हटले जाते.संन्याशाला पवित्र आत्मा म्हणले जाते आणि जे दान करतात त्यांना पुण्यात्मा म्हणतात.याद्वारे पण सिद्ध होते आत्मा दान-पुण्य करते म्हणून पुन्हा पुण्य आत्मा,पवित्र आत्मा म्हटले जाते.आत्म काही निर्लेप नाही.असे चांगले चांगले वाक्य आठवणीत ठेवायला पाहिजेत.साधुंना पण महान म्हणतात.महान परमात्मा म्हटले जात नाही.तर सर्वव्यापी म्हणणे चुकीचे आहे.सर्व आत्मे आहेत,जे पण आहेत सर्वांमध्ये आत्मा आहे.जे शिकलेले आहेत,ते पुरावा देऊन सांगू शकतात, झाडांमध्ये पण आत्मा आहे.असे म्हणतात 84 लाख योनी आहेत, त्यांच्यामध्ये पण आत्मा आहे.आत्मा नसेल तर वृध्दी कशी होईल. मनुष्याची जी आत्मा आहे,ती जड मध्ये जाऊ शकत नाही.ग्रंथांमध्ये अशा गोष्टी लिहिल्या आहेत,इंद्रप्रस्थ मधून धक्का दिला,तर दगड बनले. आत्ता बाबा समजवतात,देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला आत्मा समजा. आत्मा समजून माझी आठवण करा. बस,तुमचे आता ८४ जन्म पूर्ण होत आहेत.आता तर तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे.दुःखधाम अपवित्र धाम आहे.शांतीधाम आणि सुखधाम पवित्र धाम आहे,हे तर समजतात ना.कलियुगा मध्ये राहणारे, देवतांच्या पुढे डोके टेकवतात,तर हे सिद्ध होते भारतामध्ये नवीन दुनिया मध्ये,पवित्र आत्मा होते,उच्च पद मिळवणारे होते.आत्ता गायन करतात,मज निर्गुण मध्ये काहीच गुण नाहीत.असे आहेत पण.कोणते गुण नाहीत.मनुष्यामध्ये मोह खूप असतो,मृत व्यक्तीची पण आठवण येत राहते.बुद्धीमध्ये येते,ही माझी मुलं आहेत.पती किंवा मुलाचा मृत्यू झाला तर त्यांची खुप आठवण करतात.पत्नी तर बारा महिन्यापर्यंत चांगल्या रीतीने आठवण करते,तोंड झाकून पण रडत राहते.असे तोंड झाकून जर,तुम्ही बाबांची रात्रंदिवस आठवण कराल,तर भवसागर पार होईल.बाबा म्हणतात,जसे तुम्ही पतीची आठवण करता,अशीच माझी प्रेमाने आठवण करा,तर तुमचे विकर्म विनाश होतील.बाबा सांगत राहतात असे-असे करा.व्यापारी जमाखर्च पाहतात,आज इतका खर्च झाला, इतका फायदा झाला,दररोज हिशेब तपासतात.काही महिन्याला पण हिशोब पहात राहतात.येथे तर हे खूप आवश्यक आहे.बाबांनी अनेक वेळेस समजवले आहे,तुम्ही खूप भाग्यशाली,हजार भाग्यशाली,करोड भाग्यशाली,अरब,खरब,पदम भाग्यशाली आहात.जी मुलं स्वतःला भाग्यशाली समजतात,ते जरूर चांगल्याप्रकारे बाबांची आठवण करत राहतात.ते गुलाबाच्या फुलासारखे बनतात.हे तर सविस्तर समजायला पाहिजे.सुगंधित फूल बनायचे आहे.मुख्य आठवणीची गोष्ट आहे.संन्याशांनी योग अक्षर म्हटले आहे.लौकिक पिताजी तर असे कधी म्हणत नाहीत,माझी आठवण करा किंवा विचारात नाहीत माझी आठवण करता का? पिता मुलांची, मुलांना पित्याची आठवण राहतेच, हा तर नियम आहे,पण येथे विचारावे लागते,कारण माया विसरायला लावते.येथे येतात तर समजता, आम्ही पित्याच्या जवळ आलो आहोत,तर शिवपित्याची आठवण राहायला पाहिजे,म्हणून बाबा चित्र पण बनवतात.तेपण सोबत पाहिजेत. प्रथम नेहमी त्याची महिमा करा.हे आमचे बाबा आहेत,तसे तर ते सर्वांचे पिता आहेत,सर्वांचे सद्गती दाता, ज्ञानाचे सागर ज्ञानसंपन्न आहेत.बाबा आम्हाला सृष्टीच्या चक्राच्या आदी मध्य अंताचे ज्ञान देतात,ज्याद्वारे आम्ही त्रिकालदर्शी बनतो.या सृष्टी वरती कोणते मनुष्य त्रिकालदर्शी होऊ शकत नाहीत.बाबा म्हणतात हे लक्ष्मी नारायण पण त्रिकालदर्शी नाहीत,हे त्रिकालदर्शी बनून काय करतील.तुम्ही बनता आणि बनवतात पण.या लक्ष्मी नारायण मध्ये ज्ञान असते,तर ते परंपरेनुसार चालत आले असते.त्रेताच्या अंतला आणि द्वापरच्या संगमा मध्ये विनाश होतो, म्हणून ज्ञान परंपरा द्वारे चालत येत नाही.तर मुलांना या राजयोगाचा चांगल्या रीतीने अभ्यास करायचा आहे.तुमचे पण उच्च ते उच्च शिक्षण संगमयुगा मध्ये होते.तुम्ही आठवण करत नाहीत,देह अभिमाना मध्ये येतात,तर माया चापट मारते.सोळा कला संपूर्ण बनाल,तेव्हा विनाशाची तयारी पण होईल.ते विनाशासाठी आणि तुम्ही अविनाशी पदासाठी तयारी करत आहात.कौरव आणि पांडव ची लढाई झाली नाही,कौरव आणि यादवाची लढाई लागते.या वैश्विट नाटका नुसार पाकिस्तानची स्थापना झाली.ते पण तेव्हाच झाली,जेव्हा तुमचा जन्म झाला. आता बाबा आले आहेत,तर सर्व प्रत्यक्षात व्हायला पाहिजे ना. भारतासाठी म्हणतात,येथे तर रक्ताच्या नद्या वाहतील,परत दुधा तुपाच्या नद्या वाहतील.आता पण पहा लढत राहतात.अमके शहर द्या, नाहीतर लढाई करू.येथून जाऊ नका आमचा रस्ता आहे.आता ते काय करतील,जाहज कसे जातील,परत आपसात चर्चा करतात.जरूर मत विचारत असतील.मदत करण्याची आशा मिळाली असेल.ते आपसा मध्येच नष्ट करतील.येथे परतगृहयुद्धाची वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.आता बाबा म्हणतात,गोड मुलांनो खूप समजदार बना.येथून बाहेर गेल्यानंतर,परत विसरू नका. येथे तुम्ही कमाई करण्यासाठी येतात, लहान लहान मुलांना घेऊन येतात,तर त्यांच्याच बंधनांमध्ये राहावे लागते. येथे तर सागराच्या किनाऱ्यावर येतात,जितकी कमाई कराल तेवढे चांगलेच आहे.ही कमाई तर नेहमी करायला पाहिजे.तुम्ही अविनाशी ज्ञान रत्नाची झोळी भरण्यासाठी येतात.गायन पण आहे ना,भोलानाथ भर दे झोळी.भक्त तर शंकराच्या पुढे जाऊन म्हणतात,झोळी भरा.ते परत शिव-शंकरला एकच समजतात. शिव-शंकर महादेव म्हणतात,तर महादेव मोठे झाले ना.अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप समजण्याच्या आहेत. तुम्हा मुलांना समजवले जाते, आता तुम्ही ब्राह्मण आहात,ज्ञान मिळत आहे.शिक्षणाद्वारे मनुष्य सुधारतात,चाल चलन पण चांगली होते.आता तुम्ही शिकत आहात.जे जास्त शिकतात आणि शिकवतात त्यांची चाल चलन पण चांगली होते. तुम्ही म्हणाल सर्वात चांगले मम्मा बाबांचे चरित्र आहे.ही परत मोठी मम्मा झाली,ज्यामध्ये प्रवेश करून मुलांची रचना करतात.मात पिता एकत्रित आहेत ना.खूप गुप्त गोष्टी आहेत.जसे तुम्ही शिकता,तसेच मम्मा पण शिकत होते.त्यांना पण दत्तक घेतले,समजदार होते तर वैश्विक नाटका नुसार सरस्वती नाव दिले.ब्रह्मपुत्रा मोठी नदी आहे, सागर आणि ब्रह्मपुत्राची मोठी यात्रा भरते. हे मोठी नदी झाले,तर माता पण आहे ना. तुम्हा गोड गोड मुलांना खूप उच्च बनवतात.बाबा तुम्हा मुलांनाच पाहतात,त्यांना तर कोणाची आठवण करायची नाही.यांच्या आत्म्याला तर शिवपित्याची आठवण करायची आहे.बाबा म्हणतात आम्ही दोघे मुलांना पाहतो.मज आत्म्याला तर साक्षी होऊन पाहिचे नाही,परंतु पित्याच्या संगती मध्ये मी पण असेच पाहतो.पित्याच्या सोबत तर राहतो ना,त्यांचा मुलगा आहेत,तर सोबत पाहतो.मी विश्वाचे मालक बनून फिरतो,जसे की मी हे करतो,मी दृष्टी देतो.देहासहीत सर्वकाही विसरायचे आहे.बाकी मुलगा आणि पिता एक सारखेच होतात.तर बाबा म्हणतात, खूप पुरुषार्थ करा.बाबा बरोबर सर्वात जास्त सेवा करतात.घरामध्ये पण मातपिता तर खूप सेवा करतात ना. सेवा करणाऱ्यांना जरूर उच्च पद मिळते,परत अनुकरण करायला पाहिजे.जसे बाबा अपकारी वरती पण उपकार करतात,असेच तुम्ही बाबांचे अनुकरण करा,याचा अर्थ समजायचा आहे.बाबा म्हणतात माझी आठवण करा आणि दुसर्‍या कुणाचे ऐकू नका.कोणी काही बोलले,तर ऐकून न ऐकल्यासारखे करा.तुम्ही हसत राहा,तर ते आपोआप शीतल बनतील.बाबांनी म्हटले होते,कोणी क्रोध केला तर,तुम्ही त्यांच्यावरती फुलं अर्पण करा,बोला तुम्ही अपकार करतात,आम्ही उपकार करतो.बाबा स्वतः म्हणतात,सारी दुनिया चे मनुष्य माझ्यावर उपकार करतात,मला सर्वव्यापी समजून,खूप निंदा करतात. मी तर सर्वांचा उपकारी आहे ना. तुम्ही मुल पण सर्वावरती उपकार करणारे आहात.तुम्ही विचार करा आम्ही काय होतो आणि आता काय बनत आहोत.विश्वाचे मालक बनतो,कधी स्वप्नामध्ये पण नव्हते.अनेकांना घर बसल्या सखक्षात्कार झाला आहे,परंतू साक्षात्कारा द्वारे काही होते थोडेच.हळू-हळू झाड वृध्दी होत राहते.या नवीन झाडाची स्थापना होत आहे ना.मुलं जाणतात,आपली दैवी फुलांची बाग बनत आहे.सतयुगा मध्ये देवता राहतात,परत येतील.चक्र फिरत राहते.८४ जन्म पण तेच घेतील.दुसरे आत्मे परत कुठून येतील?वैश्विक नाटकांमध्ये जे पण आत्मे आहेत,कोणीही त्यांच्या भूमिकेपासून मुक्त होऊ शकत नाही.हे चक्र फिरत राहते.आत्मे कधी कमी होत नाहीत किंवा लहान मोठे होत नाहीत.बाबा सन्मुख गोड मुलांना समजवतात,मुलांनो सुखदाई बना.आई म्हणते ना,आपसामध्ये भांडण करू नका.बेहदचे पिता पण मुलांना म्हणतात,आठवणी ची यात्रा खूप सहज आहे.ती यात्रा तर जन्म जन्मांतर करत,शिडी खाली उतरत आले. बाबा म्हणतात ही आत्मिक यात्रा आहे.तुम्हाला या मृत्युलोक मध्ये परत यायचे नाही. त्या यात्रेमध्ये तर परत येतात,आणि तसेच बनतात. तुम्ही जाणता,आम्ही स्वर्गामध्ये जात आहोत.सर्व होता परत असेल,हे चक्र फिरत राहते.दुनिया एकच आहे, बाकी वरती ताऱ्यांमध्ये, आकाशामध्ये मध्ये कोणती दुनिया नाही.वरती जाऊन पाहतात,खूप कष्ट घेतात,कष्ट करत करत मृत्यू समोर येईल.हे सर्व विज्ञान आहे. आकाशामध्ये जातील परत काय होईल?मृत्यू समोर उभा आहे.एकीकडे संशोधन करत राहतात, तर दुसरीकडे विनाशासाठी बॉम्बस बनवत राहतात.मनुष्याची बुद्धी कशी आहे? ते समजतात कोणी प्रेरक आहे.स्वतः म्हणतात वैश्विक युद्ध जरूर होईल.ही तीच महाभारत लढाई आहे.आता तुम्ही मुलं पण जितका,पुरुषार्थ कराल तेवढेच कल्याण कराल.ईश्वराची मुलं तर आहातच.भगवान आपला मुलगा बनवतात,तर तुम्ही भगवान भगवती बनतात.लक्ष्मीनारायण ला भगवान भगवती म्हणतात ना.कृष्णाला ईश्वर मानतात,राधेला इतके मानत नाहीत. सरस्वतीचे नाव आहे,राधे चे नाव नाही.लक्ष्मीला कलश देतात,ही पण चूक केली आहे.सरस्वतीची पण अनेक नावं ठेवली आहेत.त्या तर तुम्हीच देवी आहात.देवीची पूजा पण होते,तर आत्म्यांची पण पूजा होते. बाबा मुलांना प्रत्येक गोष्ट समजवत राहतात,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मात-पिता,बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)जसे बाबा अपकारीवरती उपकार करतात असे पित्याचे अनुकरण करायचे आहे.कोणी काही बोलले तर ऐकून न ऐकल्यासारखे करत हर्षित राहायचे आहे.एका बाबा द्वारे ऐकायचे आहे.

(२) सुखदाई बनून सर्वांना सुख द्यायचे आहे. आपसामध्ये भांडण करायचे नाही.समजदार बनून आपली झोळी अविनाश ज्ञान रत्नाद्वारे भरपूर करायची आहे.

वरदान:-
शुद्ध संकल्पाच्या व्रतद्वारा वृत्तीचे परिवर्तन करणारे ह्रदयासीन भव.

बापदादाच्या ह्रदयामध्ये इतके प्रेम आहे जे,या आसनावरती नेहमी पवित्र आत्मेच बसू शकतात.ज्यांच्या संकल्प मध्ये पणा अपवित्रता किंवा अमर्यादा येते,ते हृदयासीनच्या ऐवजी उतरती कला मध्ये खाली येतात, म्हणून प्रथम शुद्ध संकल्पाच्यावृतद्वारा आपल्या वृत्तीला परिवर्तन करा.वृत्ती परीवर्तना द्वारे भविष्य जीवन रूपी दृष्टी बदलेल.शुद्ध संकल्प आणि दृढ संकल्पाच्या व्रताचे प्रत्यक्ष फळ आहे,सदा काळासाठी बापदादाचे हृदय आसन.

बोधवाक्य:-
जेथे सर्वशक्ती सोबत आहेत,तेथे निर्विघ्न सफलता आहेच.