15-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,आता तुम्ही अमरलोक च्या यात्रेवर आहात, तुमची ही बुध्दीची आत्मिक यात्रा आहे, जे तुम्ही खरे खुरे ब्राह्मणच करू शकता"

प्रश्न:-
स्वत:शी किंवा आपापसात कोणती चर्चा करणे शुभ संमेलन आहे?

उत्तर:-
स्वता:शी गोष्टी करा की,मी आत्मा या जीर्ण शरीराला सोडून वापस घरी जात आहे. आता हे शरीर कांहीं कामाचे राहिले नाही. आता तर बाबांच्या बरोबर जायचे. जेव्हा आप आपसात भेटता तेंव्हा ही चर्चा करा की, सेवा कशा प्रकारे वाढू शकेल. सर्वांचे कल्याण कशा प्रकारे होईल? सर्वांना मार्ग कसा काय दाखवता येईल? हेच खरे शुभ संम्मेलन आहे.

गीत:-
दिल का सहारा टूट न जाए. . . . .

ओम शांती।
गोड गोड आत्मीक मुलं,सर्व सेवा केंद्रांचे ब्रह्मा मुख वंशावली सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण, आपल्या कुळाला जाणता. जे ज्या कुळातील असतात ते आपल्या कुळाला जाणतात. मग ते हलक्या कुळातील असो वा उच्च कुळातील असो. प्रत्येक जण आपल्या कुळाला ओळखतात आणि समजतात यांचे कुळ श्रेष्ठ आहे. कुळ म्हणा किंवा जात म्हणा. विश्वामध्ये तुम्हा मुलांच्या शिवाय दुसरे कोणीही जाणत नाही की, ब्राह्मणांचेच सर्वोत्तम कुळ आहे. पहिल्या क्रमांकाचे कूळ तुम्हा ब्राह्मणांचे आहे. ब्राह्मण कुळ अर्थात ईश्वर्य कुळ. पहिले आहे निराकारी कुळ, पुन्हा येतात साकारी सृष्टीमध्ये. सूक्ष्म वतनमध्ये तर कुळ असतच नाही. सर्वात उच्च साकारमध्ये आहे. तुम्हा ब्राह्मणांचे कुळ. तुम्ही ब्राह्मण आपापसात बहीण-भाऊ आहात. बहिण भाऊ झाल्यामुळे तुम्ही विकारांमध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही अनुभवामुळे म्हणू शकता की पवित्र राहण्यासाठी ही सर्वोत्तम युक्ती आहे. प्रत्येक जण म्हणतात की आम्ही ब्रह्मकुमार कुमारी आहोत. शिव वंशी तर सर्व आहेत. पुन्हा जेंव्हा साकार मध्ये येतात, तेंव्हा प्रजापित्याचे नाव घेतल्यामुळे भाऊ बहीण होतात. प्रजापिता ब्रह्मा आहेत, तर जरूर रचनाकार आहेत,दत्तक घेतात. तुम्ही कुख वंशावली नाहीत, मूखवंशावली आहात. मनुष्य तर कुख वंशावली आणि मुख वंशावली याचा अर्थ पण समजत नाहीत. मुखवंशावली अर्थात दत्तक मुलं. कुख वंशावली अर्थात जन्म घेणारे. तुमचा हा जन्म अलौकिक आहे. बाबांना लौकिक,अलौकिक आणि पारलौकीक म्हटलं जातं. प्रजापिता ब्रह्माला अलौकिक पिता म्हंटले जाते.

लौकिक बाप तर सर्वानाच असतो. तो तर कॉमन आहे. पारलौकिक पिता सुध्दा सर्वांचा आहे. भक्ती मार्गामध्ये तर हे भगवान; हे परमपिता सर्व म्हणत असतात. परंतु या प्रजापिता ब्रह्माला कधी कोणी बोलवत नाही. हा बाबा पण असतो ब्राह्मण मुलांचा. त्या दोघांना तरसर्व जाणतात. बाकी ब्रह्मा ला। पाहिल्यानंतर संभ्रमित होतात, कारण ब्रह्मा तर आहेच सूक्ष्म वतनवासी. इथे तर दाखवत नाहीत. चित्रांमध्येब्रह्माला दाढी मिशा दाखवतात, कारण प्रजापिता ब्रम्हा येथे या साकार सृष्टीमध्ये आहेत. सुक्ष्मवतन मध्ये तर प्रजा रचता येत नाही. हे पण कोणाच्या बुध्दीमध्ये येत नाही. या सर्व गोष्टी बाबा समजावतात. यालाच आत्मिक यात्रा पण म्हणतात. रुहानी यात्रा ती जिथून परत येता येत नाही. दुसऱ्या यात्रा तर सर्व जन्मजन्मांतर करतच असतात, जातात व परत येतात. त्या आहेत शरीराच्या यात्रा. ही तुमची आहे आत्मीक यात्रा. ही आत्मिक यात्रा केल्यामुळे तुम्ही मृत्यु लोकात परत येत नाही. बाबा तुम्हाला अमर लोकांची यात्रा शिकवितात. ते काश्मीरकडे अमरनाथ च्या यात्रेला जातात. ते काही अमर लोक नाही. अमर लोक एक आहे आत्म्यांचा, दुसरा आहे मनुष्याचा. ज्याला स्वर्ग किंवा अमर लोक म्हणतात. आत्म्यांचे आहे निर्वाण धाम. बाकी अमरलोक आहे सत्तयुग आणि मृत्युलोक आहे कलियुग. आणि निर्वाण धाम आहे शांती लोक,जिथे आत्मे राहतात. बाबा म्हणतात तुम्ही अमर पुरीच्या यात्रेवर आहात. पायी चालत जाण्याची ही शारीरिक यात्रा आहे. ही आहे आत्मिक यात्रा. जे शिकविणारे एकच आत्मिक पिता आहेत. आणि एकदाच येऊन शिकवतात. ही तर जन्मजन्मांतरीची गोष्ट आहे. ही आहे मृत्यू लोकातील शेवटची यात्रा. हे तुम्ही ब्राह्मण कुलभूषणच जाणता. आत्मिक यात्रा अर्थात आठवणीत असणे. गायन पण आहे अंत मती सो गती. तुम्हाला आठवण येते पित्याच्या घराची. तुम्ही समजता की आता नाटक पूर्ण होणार आहे. हे जीर्ण कपडा म्हणजे जीर्ण शरीर आहे. आत्म्यामध्ये खाद,भेसळ पडल्यामुळे शरीरात देखील खाद पडते. जेंव्हा आत्मा पवित्र बनते तेंव्हा आम्हाला शरीर पण पवित्र मिळते. हे पण तुम्ही मुलंच जाणता,दुसरे काहीच समजत नाहीत. तुम्ही पाहता काही जण समजतात पण. काहींच्या बुध्दीमध्ये हे ज्ञान बसत नाही,चांगला समजावणारा असल्यास जरूर एखाद्याला समजावेल. मनुष्य जेंव्हा यात्रेवर जातात तेंव्हा पवित्र राहतात. पुन्हा घरी येऊन अपवित्र बनतात. महिना-दोन महिने पवित्र राहतात. यात्रेचा पन मोसमअसतो. नेहमीच यात्रेवर तर जाऊ शकत नाही. थंडी वा पावसाळ्यामध्ये कोणी जाऊ शकत नाही. तुमच्या यात्रेमध्ये थंडी वा गर्मीची गोष्टच नाही. बुध्दी द्वारे स्वतः समजू शकता आम्ही जात आहोत बाबांच्या घरी. जितकं आम्ही आठवण करतो तितका विकर्म विनाश होतो. बाबांच्या घरी जाऊन पुन्हा आम्ही नवीन दुनियेत येणार आहोत. हे बाबा समजावतात. इथे मुले पण नंबरवार आहेत. वास्तविक यात्रा विसरता कामा नये. परंतु माया विसर पाडते. यासाठी मुले बाबांना लिहितात, बाबा आपली आठवण विसरली जाते. अरे ही आठवणीची यात्रा ज्यामुळे तुम्ही सदैव आरोग्यसंपन्न व धनसंपन्न बनता, अशा औषधाला तुम्ही कसे काय विसरता. ते, हे पण म्हणतात की, बाबांची आठवण करणे खूपच सहज आहे. आपल्याबरोबर आत्मिक संवाद करायला हवा की, आम्ही आत्मा पूर्वी सतोप्रधान होतो. आता तुमोप्रधान बनलेलो आहोत. आता शिव भगवान तर आम्हाला युक्ती खूप श्रेष्ठ व सुंदर सांगतात. बाकी अभ्यास करायला हवा . डोळे झाकून विचार केला जात नाही. (बाबांनी कृती करून दाखविली) अशाप्रकारे आपल्याबरोबर गोष्टी करा. आम्ही सतोप्रधान होतो,आम्हीच राज्य करत होतो. ती दुनिया सुवर्णयुग होती,पुढे चांदी, तांबेव लोखंडाच्या दुनियेत आलो. आता लोखंडी दुनियेचा पण अंतकाळ आहे,म्हणून च बाबा आलेले आहेत. बाबा आम्हा आत्म्यांना म्हणतात की माझी आठवण करा आणि आपल्या घराची आठवण करा, जिथून आलेले आहात. तर शेवटी जी गती होईल त्यानुसार जन्म होईल. तुम्हाला तिथेच जायचे आहे. ही युक्ती बाबा सांगतात की सकाळी लवकर उठून स्वता:शी आत्मिक संवाद करा. बाबा कृती करून दाखवतात की मी पण लवकर उठून विचारसागर मंथन करतो. खरी कमाई करायला हवी ना ? सुबहका साई. . तर त्या साईची शिवबाबाची आठवण केल्यानंतर तुमची नाव किनाऱ्याला लागेल. बाबा जे करतात, ज्या प्रकारे करतात. ते मुलांना सुध्दा समजवतात. यामध्ये खिटपिटची गोष्ट नाही. ही कमाईच खूप सुंदर युक्ती आहे. अल्फ अल्लाह म्हणजे शिवबाबाची आठवण केल्यामुळे बादशाही निश्चितच मिळेल. मुलं जाणतात की आम्ही, राजयोग शिकत आहोत. बाबा बीजरूप ज्ञानसंपन्न आहेत, तर आम्हीपण झाडाविषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे. हे पण स्थूल रूपामध्ये ज्ञान आहे. सुरुवातीला हे झाड कशाप्रकारे वाढते, पुढे कशाप्रकारे त्याचे आयुष्य पूर्ण होते. इतर झाडे वादळ आदि आल्यानंतर उन्मळून पडतात. परंतु या मनुष्य सृष्टी रुपी झाडाचे प्रथम पाया देवी देवता धर्म. कदाचित (प्राय:) लोप पावत असावा. हे पण होणारच आहे. हे जेव्हा नष्ट होईल तेव्हा म्हटले जाईल की--एका धर्माची पुन्हा स्थापना; आणि अनेक धर्माचा विनाश. कल्प कल्प(प्राय:) हा धर्म लोप पावतो. आत्मरुपी सोन्यामध्ये खाद पडल्यामुळे, दागिने म्हणजे शरीर रोगी मिळते. मुले समजतात आमच्यामध्ये खाद,भेसळ होती. आता आम्ही स्वच्छ बनत आहोत म्हणून इतरांना रस्ता दाखवतो. दुनिया तर तमोप्रधान आहे. पूर्वी सतो प्रधान स्वर्ग होती. तर मुलांना सकाळी सकाळी लवकर उठून आत्मिक संवाद केला पाहिजे, विचार सागर मंथन केले पाहिजे. परत एखाद्याला समजावून सांगा हे ८४ जन्माचे चक्र आहे, ८४ जन्म कोण घेतात, कसे घेतात. जरूर जे पहिले येतीलतेच घेतील. बाबा पण भारतामध्ये येतात. येऊन ८४ चे चक्र समजावून सांगतात. बाबा कुठे आलेले आहेत हे पण जाणत नाहीत. बाबा येऊन आपला परिचय स्वतः देतात. ते म्हणतात की मी तुम्हाला राजयोग शिकवितो. मनमनाभव. माझी आठवण कराल तर विकर्म विनाश होतील. असे ज्ञान कोणी देऊ शकत नाहीत. जरी गिता इत्यादी ऐकवतात, तिथे पण लोक जात असतात. परंतु भगवान कधीतरी आलेले असतील, ज्ञान ऐकवलेले असेल. पुन्हा जेंव्हा येतील तेंव्हा ऐकवतील ना. ते लोक तर गीता पुस्तक हातात घेऊन बसून ऐकवतात. इथे तर भगवान ज्ञानाचे सागर आहेत. त्यांना इथे कांही हातामध्ये कोणता ग्रंथ घेऊन वाचायचा नाही,त्यांना तर शिकायची आवश्यकतानाही. कल्पा पूर्वी पण येऊन तुम्हा मुलांना संगमवर शिकविले होते. बाबाच येऊन राजयोग शिकवितात. ही आहे आठवणीची यात्रा. तुमची बुध्दी जाणते, शिवाय ब्रम्हामुखवंशावली ब्राम्हणा शिवाय विश्वामध्ये असा कोणताही मनुष्य नसेल की, ज्याच्या जवळ हे ज्ञान आहे. सर्वांमध्ये सर्वव्यापीचे ज्ञान भरलेले आहे. हे कोणीच जाणत नाहीत की, परमात्मा बिंदी आहे. ज्ञानसागर पतित-पावन आहेत. फक्त असेच गात असतात. गुरु लोक जे सांगतात,ते सतवचनकरत राहतात. अर्थ काहीच समजत नाहीत. न कधी त्याच्यावर विचार करत की, हे सत्य आहे किंवा नाही. बाबा समजावतात की तुम्हा मुलांना हिंडता फिरता आठवणीच्या यात्रेवर जरूर राहायचे आहे. नाहीतर विकर्म विनाश होत नाहीत. कोणतेही काम करत राहा परंतु बुध्दीमध्ये बाबांची आठवण असायला हवी. श्रीनाथच्या मंदिरात जेव्हा भोजन बनवितात, तेंव्हा बुध्दीमध्ये श्रीनाथ असतो ना,ते जाणतात की आम्ही श्रीनाथ साठी भोजन बनवत आहोत,प्रसाद अर्पण केला, परत पत्नी,मुलं इ. आठवत राहतात. तिथे भोजन बनवताना मुख बंद ठेवतात म्हणजे बोलणे बंद ठेवतात. मनसा द्वारे देखील कोणते विकर्म हय नाही. ते तर श्रीनाथाच्या मंदिरात बसतात. इथे तर तुम्ही शिवबाबांच्या जवळ बसला आहात. इथे पण बाबा युक्ती सांगतात, मुलांनो कोणतीही फालतू गोष्ट बोलू नका. सदैव बाबाशी गोड- गोड बोलायला हवे. जसे पिता तसे मुलं. बाबांच्या बुध्दीमध्ये असते की चक्र कसे फिरते. तेंव्हाच तुम्हा मुलांना येवून ऐकवतात. तुम्ही मुले जाणता की, आमचे बाबा, मनुष्य सृष्टीचे बीजरुप ,चैतन्य आहेत. किती सहज गोष्ट आहे परंतु समजत नाहीत, कारण पत्थरबुध्दीआहेत ना. त्या बिजाला आम्ही चैतन्य म्हणनार नाही. हे ज्ञानसंपन्न, चैतन्य आहेत. ते एकच आहेत. ते बीज तर अनेक प्रकारचे असतात. भगवंतालाच म्हंटले जाते मनुष्य सृष्टीचे बीज रूप. म्हणून तर पिता झाले ना. सर्व आत्म्याचे पिता परमात्मा आहेत म्हणून सर्व आपसात भाऊ-भाऊ झाले. बाबा पण तिथेच राहतात, जिथे तुम्ही सर्व आत्मे राहता. निर्वाण धाममध्ये बाबा आणि मुले राहतात. या वेळेला तुम्ही प्रजापिता ब्रह्माची मुले भाऊ बहिणी आहात. यासाठी म्हणतात--शिव वंशी ब्रम्हाकुमार,कुमारी. हे पण तुम्हाला लिहायचे आहे की आम्ही ब्रम्हाकुमार कुमारी भाऊ बहिणी आहोत. बाबा ब्रह्मा द्वारे सृष्टीची रचना करतात म्हणून आप आपसात भाऊ-बहीणझाले ना. कल्प कल्प अशीच रचना करतात, दत्तक घेतात. मनुष्याला प्रजापिता ब्रह्मा म्हटले जात नाही. कदाचित बाबा म्हणतात परंतु तो आहे मर्यादित. यांना प्रजापिता म्हंटले जाते कारण भरपूर प्रजा आहे अर्थात भरपूर मुलं आहेत. तरी बेहदचे बाबा मुलांना बसून सर्व गोष्टी समजावतात. ही दुनिया बिलकुल बिघडलेली, छी छी आहे. आता तुम्हाला वाह वाह च्या दुनयेमध्ये घेऊन जातो. तुमच्या मध्ये ही खूप आहेत,जे विसरून जातात. जर हे आठवणीत राहीले तर पिता आणि गुरु दोघांची आठवण राहील. घरी परत जायचे आहे याची पण आठवण राहील. जुने शरीर सोडून द्यायचे आहे, कारण हे शरीर आता कामाचे राहिले नाही. आत्मा पवित्र बनत जाते, तसे शरीर पण पवित्र मिळते. स्वता:च स्वता:शी आत्मिक संवाद केला पाहिजे. यालाच म्हणतात शुभ संम्मेलन, ज्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी असतील. सेवा कशा प्रकारे वाढेल? कल्याण कशा प्रकारे होईल? त्यांचे तर छी छी संम्मेलन असते, गपोडेमारत असतात. इथे तर गपोडे,थापा इत्यादीची गोष्ट नाही. खरे खरे संम्मेलन याला म्हणतात. तुम्हाला हेसांगितलेले आहे की, हे कलियुग आहे. सत्युगाला स्वर्ग म्हणतात. भारतच स्वर्ग होता. भारतवासीच ८४ जन्म भोगतात. आता शेवट आहे. आत्ता तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता. यामध्ये काही गंगास्नानआदि करायचे नाही. भगवानुवाच की " मी सर्वांचा पिता आहे, कृष्ण सर्वांचे पिता होऊ शकत नाही. एक दोन मुलांचे पिता श्रीनारायण आहेत, न की श्रीकृष्ण. श्रीकृष्ण तर कुमार आहे. या प्रजापिता ब्रम्हाला तर खूप मुले आहेत. कुठे कृष्ण भगवानुवाच, कुठे शिवभगवानुवाच. चूक किती मोठी केली आहे. कुठेही प्रदर्शनी केली तर मुख्य गोष्ट समजावून सांगा की, गीतेचे भगवान कोण आहेत, हा आहे का तो. ? प्रथम प्रथम हे समजवायला हवें कि भगवान फक्त शिवालाच म्हटले जाते. हे बुध्दीत बसायला हवे. यावर प्रयोग व्हायला हवा. गितेच्या भगवानाचे चित्रपण मोठे कायमस्वरुपी असायला हवे. खाली लिहायला हवे, या, पहा, आणि समजून उमजून ठरवा. तसे लिहून घेऊन खाली सही घ्यायला हवी. अच्छा.

फार फार वर्षानंतर भेटलेल्या गोड-गोड मुलांना, मातपिता व बाप दादांची स्नेह पूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आप आपसात शुभ संम्मेलन करून सेवेच्या वृद्धि चे नियोजन करुन आपले व सर्वांचे कल्याण करायची युक्ती रचायची आहे. कधीही व्यर्थ (फालतू) गोष्टी करायच्या नाहीत.

२) सकाळी सकाळी उठून आपणच आपल्याशी रुहरिहान करायची आहे. भोजन बनविताना एका बाबाच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. मनबाहेर भटकणार नाही यावर लक्ष ठेवायचे आहे.

वरदान:-
विनाशाच्या वेळेला परिक्षामध्ये पास होणारे आकार लाईट रुपधारी भव.

विनाशाच्या वेळेला पेपर पास होणारे किंवा सर्व परिस्थितीशी सामना करण्यासाठीआकारी लाईट रुपधारी बना. जेंव्हा हिंडता फिरता लाईट हाऊस व्हाल, तेंव्हा आपले हे रूप (शरीर) दिसणार नाही. ज्याप्रमाणे पार्ट प्ले करण्यासाठी शरीर धारण करता. काम झाले, शरीर सोडले. एका सेकंदात धारण करा एका सेकंदात न्यारे व्हा. जेंव्हा हा अभ्यास होईल तर पाहणारे अनुभव करतील की, हे लाईटचे वस्त्रधारी आहेत. लाईटच यांचा श्रृंगार आहे.

बोधवाक्य:-
उमंग ऊत्साहाचे पंख सदा बरोबर असल्यास प्रत्येक कार्यामध्ये सफलता सहज मिळते.