15-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,नाजूकपणा पण देह अभिमान आहे,रुसणे-रडणे हे सर्व आसुरी संस्कार तुम्हा मुलांमध्ये असायला नको,दु:ख-सुख मानापमान सर्व सहन करायचे आहे"

प्रश्न:-
सेवे मध्ये दिले ढिल्ले पणा, आळस येण्याचे मुख्य कारण काय आहे?

उत्तर:-
देह अभिमानामुळे एक दोघांचे अवगुण पाहतात,तेव्हा सेवेमध्ये ढिल्ले पणा,म्हणजे आळस येतो.आपसा मध्ये न जमणे,हा पण देह अभिमान आहे.मी आमक्या सोबत चालू शकत नाही.हा सर्व नाजूक पणा आहे.हे बोल मुखाद्वारे काढणे म्हणजे,काट्यासारखे बनणे आहे,आज्ञेचे पालन करत नाहीत. बाबा म्हणतात मुलांनो,तुम्ही आत्मिक सैनिक आहात म्हणून आदेश झाला तर लगेच सेवेसाठी हजर व्हायला पाहिजे.कोणत्या गोष्टींमध्ये चालढकल करू नका.

ओम शांती।
आत्मिक पिता सन्मुख आत्मिक मुलांना समजावत आहेत. मुलांना प्रथम ही समज मिळते की, स्वतःला आत्मा निश्चय करा.देह अभिमान सोडून, देही अभिमानी बना.आम्ही आत्मा आहोत,देही अभिमानी बना तरच बाबाची आठवण करू शकाल.तो अज्ञान काळ होता,हा ज्ञान काळ आहे. ज्ञान तर एकच बाबा देतात,जे सर्वांचे सद्गती करतात आणि ते निराकार आहेत म्हणजेच त्यांचा कोणता मनुष्यांसारखा आकार नाही.ज्यांना मनुष्यां सारखा आकार आहे,त्यांना भगवान म्हणू शकत नाहीत.आत्ता आत्मे तर सर्व निराकारीच आहेत,परंतु देह अभिमानामध्ये आल्यामुळे स्वतःला विसरलेले आहेत.आता बाबा म्हणतात,तुम्हाला परत जायचे आहे.स्वतःला आत्म समजा,आत्मा समजून बाबांची आठवण करा, तेव्हाच जन्म जन्मांतरचे पाप भस्म होतील,दुसरा कोणता उपाय नाही. आत्माच पतित,आत्मच पावन बनते.बाबांनी समजवले आहे, पावन आत्मे सतयुग-त्रेता मध्ये असतात.रावण राज्यांमध्ये परत पतित बनतात.शिडीमध्ये समजवले आहे,जे पावन होते तेच पतित बनले आहेत.पाच हजार वर्षा प्रमाणे,तुम्ही सर्व शांतीधाम मध्ये पावन होते,त्याला निर्वाणधाम म्हटले जाते.परत कलियुगामध्ये पतित बनतात,तेव्हा ओरडतात,हे पतित पावन या.बाबा समजवतात, मुलांनो मी जे तुम्हाला ज्ञान देतो,ते पतिता पासून पावन होण्याचे आहे.ते फक्त मीच देतो,जे परत प्राय:लोप म्हणजे नष्ट होते.बाबांनाच येऊन ज्ञान द्यावे लागते.येथे तर मनुष्यांनी अनेक ग्रंथ बनवले आहेत.सतयुगा मध्ये कोणते ग्रंथ इत्यादी नसतात,तेथे भक्तिमार्ग जरा पण नसतो.

आता बाबा म्हणतात,तुम्ही माझ्या द्वारेच पतिता पासून पावन बनू शकतात.पावन दुनिया जरूर बनाणार आहे.मी येऊन मुलांनाच राजयोग शिकवतो. दैवीगुण पण धारण करायचे आहेत.रडणे-रुसणे हे सर्व आसुरी स्वभाव आहेत.बाबा म्हणतात दु:ख सुख,मान-अपमान सर्व मुलांना सहन करायचे आहे. जरापण नाजूकपणा नको.मी आमक्या स्थानावरती राहू शकत नाही,हा पण नाजूकपणा आहे. त्यांचा स्वभाव असा आहे,हे असे आहेत,असे काहीच म्हणायचे नाही. मुखाद्वारे नेहमी फुला सारखे बोल निघावेत,काट्यासारखे निघायला नकोत.अनेक मुलं मुखाद्वारे काटे म्हणजे कडवे शब्द बोलतात. कोणाला रागवणे पण दुःख देणे आहे. दोघांमध्ये मुलांचे पटत नाही, देह अभिमानी बनल्यामुळे एक दोघांचे अवगुण पाहत,स्वतःमध्ये अनेक प्रकारचे अवगुण तसेच राहतात,म्हणून परत सेवेमध्ये ढिल्ले,आळशी बनतात.बाबा समजवतात,हे पण अविनाशी नाटका नुसार होणार आहे, सुधरायचे पण जरुर आहे.मिलिटरी चे लोक जेव्हा लढाईमध्ये जातात, तर त्यांचे काम आहे,दुश्मनां बरोबर लढाई करणे.महापुर येतो,दगंल इ.होते तर मिलिटरी ला बोलवतात. परत मिलिटरीच्या लोकांना मजदूर इत्यादीचे पण काम करावे लागते. शासन आदेश देते,हे सर्व माती भरा. जर कोणी आले नाही तर गोळीच्या तोंडामध्ये जावे लागेल.शासनाचा आदेश तर मानावाच लागेल ना. बाबा म्हणतात तुम्ही पण सेवेसाठी बांधलेले आहात.बाबा जिथे पण सेवेसाठी जाण्यासाठी सांगतील, लगेच हजर व्हायला पाहिजे. मानणार नाही तर मिलिटरी कसे म्हणू शकाल.ते परत ह्रदयावरती चढू शकत नाहीत.तुम्ही सर्व संदेश देण्यासाठी बाबाचे मदतगार आहात. आता समजा कुठे संग्रहालय उघडतात,ते म्हणतात दहा मैल दूर आहे,सेवेसाठी तर जावे लागेल ना. खर्चाचा विचार थोडाच करायचा आहे.मोठ्यात मोठे शासन,बाबांचा आदेश मिळतो,ज्यांचा उजवा हात परत धर्मराज आहे.त्यांच्या श्रीमता वरती न चालल्यामुळे परत विकारांमध्ये जातात.श्रीमत म्हणते,आपल्या डोळ्यांना पवित्र बनवा.काम विकाराला जिंकण्याची हिम्मत ठेवायला पाहिजे.बाबांचा आदेश आहे,तो मानणार नाही तर, एकदम चकनाचूर व्हाल.२१ जन्माच्या राजाईमध्ये गडबड होईल.बाबा म्हणतात मला मुलांशिवाय तर कोणीच जाणू शकत नाही.कल्प पूर्वीचे हळूहळू ज्ञान घेण्यासाठी येत राहतील.या अगदीच नवीन गोष्टी आहेत.हे गीताचे युग आहे परंतु ग्रंथांमध्ये या संगमयुगाचे वर्णन नाही.गीतेलाच द्वापर युगामध्ये घेऊन गेले आहेत परंतु जेव्हा राजयोग शिकवला असेल,त्या वेळेस जरूर संगमयुग असेल,परंतु कोणाच्या बुद्धीमध्ये या गोष्टी येत नाहीत.आता तुम्हाला ज्ञानाचा नशा चढलेला आहे. मनुष्याला भक्तिमार्गाचा नशा आहे.असे म्हणतात भगवान जरी आले तरी,आम्ही भक्ती सोडणार नाही.ही प्रगती आणि अधोगती ची शिडी खूप चांगली आहे,तरीही मनुष्याचे मनुष्याचे डोळे उघडत नाहीत. मायेच्या नशेमध्ये एकदम चकनाचूर आहेत.ज्ञानाचा नशा खूप उशिराने चढतो.त्यासाठी प्रथम दैवी गुण पाहिजेत.बाबांनी कोणताही आदेश दिला तर,त्याचे पालन करायचे आहे. हे मी करू शकत नाही,याला आज्ञाधारक म्हणत नाहीत.बाबांची श्रीमत मिळते,असे करायचे,तर समजायला पाहिजे,शिवबाबा ची श्रेष्ठमत आहे.तेच सद्गती दाता आहेत.दाता कधी उल्टीमत देत नाहीत.बाबा म्हणतात,मी यांच्या अनेक जन्माच्या अंत मध्ये प्रवेश करतो.यांच्यापेक्षा पण लक्ष्मी श्रेष्ठ बनते.गायन पण आहे स्त्रियांचा मान केला जातो.प्रथम लक्ष्मी परत नारायण,यथा राजा राणी तथा प्रजा होते.तुम्हाला पण असे श्रेष्ठ बनायचे आहे.या वेळेत तर सर्व दुनिया मध्ये रावण राज्य आहे.सर्वजण म्हणतात रामराज्य पाहिजे.आत्ता संगम युग आहे.जेव्हा लक्ष्मीनारायणाचे राज्य होते,परत परिवर्तन कसे होते,हे कोणीही जाणत नाहीत.सर्व अज्ञान अंधारामध्ये आहेत.ते समजतात कलियुग तर लहान मुलगा आहे.तर मनुष्य घोर अंधकारा मध्ये झोपलेले आहेत.हे आत्मिक ज्ञान,आत्मिक पिताच,आत्म्यांना शिकवतात. असे म्हणणार नाहीत की,हे आत्मिक मुलांनो,हे पण लिहायला पाहिजे,आत्मिक ज्ञानसंपन्न पिता, अध्यात्मिक ज्ञान,आत्म्यांना देत आहेत.

बाबा समजवतात,दुनियेमध्ये सर्व मनुष्य देह अभिमानी आहेत.मी आत्मा आहे,हे कोणी जाणत नाहीत.बाबा म्हणतात कोणाचीही आत्मा विलीन होत नाही.आता तुम्हा मुलांना समजवले जाते, दसरा-दिवाळी काय आहे.मनुष्य तर जी पण पूजा इत्यादी करत राहतात सर्व अंधश्रद्धा आहे,ज्याला बाहुल्यांची पूजा म्हटले जाते,पत्थर पूजा म्हटले जाते.आता तुम्ही पारसबुध्दी बनत आहात,तर पत्थर पूजा करू शकत नाहीत.चित्राच्या पुढे जाऊन माथा टेकतात,काहीच समजत नाहीत.असे म्हणतात ज्ञान भक्ती आणि वैराग्य.ज्ञान अर्धाकल्प चालले,परत भक्ती सुरू झाली. आता तुम्हाला ज्ञान मिळत आहे, तर भक्ती पासून वैराग्य येते. ही दुनिया च बदलते.कलियुगामध्ये भक्ती आहे,सतयुगा मध्ये भक्ती नसते.तेथे तर पूज्य आहेत.बाबा म्हणतात मुलांनो,तुम्ही माथा पण घासला,पैसे पण वाया घालवले, मिळाले काहीच नाही.मायेने एकदम डोके फिरवले आहे.गरिब बनवले आहे,परत बाबा येऊन सर्वांचा माथा ठिक करतात.आता हळूहळू काही युरोपियन पण ज्ञान समजू लागले आहेत.बाबांनी समजवले आहे,हे भारतवासी तर बिलकुलच तमोगुणी बनले आहेत.दुसऱ्या धर्माचे तर,शेवटी येतात,त्यांना सुख थोडे तर दुःख पण थोडे मिळते. भारतवासींना सुख पण खूप मिळते,तर दुःख पण खूप मिळते. सुरुवातीला खूप धनवान,विश्वाचे मालक होते.दुसऱ्या धर्माचे प्रथम थोडेच धनवान असतात,नंतर वृद्धी होत-होत आत्ता खूप धनवान बनले आहेत.आता परत सर्वात गरीब पण भारत बनला आहे.अंधश्रद्धाळू पण भारतच आहे.हे पण नाटकामध्ये नोंदलेले आहे.बाबा म्हणतात मी ज्याला स्वर्ग बनवले,तो नर्क बनला आहे.मनुष्य माकडासारखे बनले आहेत,मी येऊन त्यांना मंदिर लायक बनवतो.विकार पण खूप भयकंर असतात.क्रोध पण किती आहे,तुमच्या तुमच्या मध्ये थोडा पण क्रोध असायला नको.बिलकुल गोड, शांत,अतिगोड बनायचे आहे. हे पण जाणतात,राजाई पद मिळवणारे थोडेच असतात.बाबा म्हणतात मी आलो आहे,तुम्हाला नरा पासून नारायण बनवण्यासाठी, त्यामध्ये पण मुख्य अष्ठ रत्न गायन केले जातात.आठ रत्न आणी मध्ये बाबा आहेत.अष्ठ रत्न चांगल्या मार्काने पास होतात,ते पण क्रमानुसार.देह अभिमानाला नष्ट करण्यासाठी खूप कष्ट लागतात. देहाचे भान बिल्कुल निघायला पाहिजे.कोणी कोणी पक्के ब्रह्मज्ञानी असतात,त्यांना पण असे होतं,बसल्या बसल्या देहाचा त्याग करतात.बसल्याबसल्या असे शरीरात सोडतात,तर वातावरण एकदम शांत होते आणि सहसा पहाटेच्या वेळेस शरीर सोडतात. रात्रीला मनुष्य खूप खराब बनतात. सकाळी स्नान इत्यादी करून भगवान,भगवान म्हणतात,पूजा करतात.बाबा सर्व गोष्टी समजवत राहतात.प्रदर्शन इत्यादीमध्ये पण प्रथम तुम्ही अल्लाह म्हणजे ईश्वराचा परिचय द्या.प्रथम अलल्लाह आणि बादशाही.बाबा तर एकच निराकार आहेत.बाबा रचनाकार सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान समजावतात.ते बाबा म्हणतात,माझी आठवण करा.देहाचे सर्व संबंध सोडून,स्वतःला आत्मा समजून माझीच आठवण करा.देहाचे सर्व संबंध सोडून,स्वत:ला,आत्मा समजून बाबाची आठवण करा.परत तुम्ही बाबांचा परिचय द्याल,तर कोणाची प्रश्न उत्तर करण्याची हिंमत राहणार नाही.प्रथम बाबा वरती पक्का निश्चय झाला पाहिजे,तेव्हा बोला ८४ जन्म कसे घेतले जातात. चक्राला समजले आहे,बाबांना समजले,परत कोणता प्रश्न येणार नाही.बाबांचा परिचय देण्या शिवाय बाकी तुम्ही जे तीक-तीक करतात, तर त्यामध्ये तुमचा खूप वेळ वाया जातो.गळाच बसतो.प्रथम तर अल्लाह ची गोष्ट घ्या.तीक-तीक केल्यामुळे थोडेच समजू शकतात. सहज आणि हळुवारपणे समजावयायला पाहिजे.जे देही अभिमानी असतील,ते चांगल्या प्रकारे समजावू शकतील. मोठ-मोठ्या संग्रहालयामध्ये चांगले समजवणाऱ्यांना मदत द्यायला पाहिजे.थोडे दिवस आपले सेवा केंद्र सोडून,मदत देण्यासाठी जायला हवे,त्यांच्या जागी सेवाकेंद्र संभाळणाऱ्यांना बसवायला पाहिजे. जर सेवा केंद्र संभाळणे लायक, कोणाला बनवले नाही,तर बाबा समजतील काय कामाचे नाहीत, सेवा केली नाही.बाबांना मुलं म्हणतात,सेवाकेंद सोडून कसे जायचे?अरे बाबा आदेश देतात. प्रदर्शनी आहे सेवेसाठी जावा,तर लगेच जायला पाहिजे. महारथी ब्राह्मणी त्यांनाच म्हटले जाते.बाकी तर सर्व घोडेस्वार प्यादे आहेत. सर्वांना सेवेमध्ये मदत द्यायची आहे. इतक्या वर्षांमध्ये तुम्ही कोणालाही आपल्यासारखे बनवले नाही,तर काय करत होते.इतक्या वेळेत संदेश देणारे बनवले नाहीत,जे सेवा केंद्र सांभाळू शकतील.अनेक प्रकारचे मनुष्य असतात,त्यांच्याशी ज्ञानाच्या गोष्टी करण्याची पण समज,अक्कल पाहिजे.मुरली पण दररोज वाचायची आहे किंवा ऐकायची आहे,नाही वाचली म्हणजे अनुपस्थित राहिले.तुम्हा मुलांना तर संपूर्ण विश्वाला घेराव घालायचा आहे.तुम्ही संपुर्ण विश्वाची सेवा करतात ना,पतित दुनियेला पावन बनवणे म्हणजे, घेराव घालणे आहे ना.सर्वांना मुक्ती जीवनमुक्ती धामचा रस्ता सांगायचा आहे,दुःखापासून सोडवायचे आहे, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) खूप गोड, शांत,अति गोड स्वभावाचे बनायचे आहे.कधीच क्रोध करायचा नाही.आपल्या डोळ्याला शीतल, पवित्र बनवायचे आहे.

(२)बाबा जो आदेश देतात,त्याचे पालन लगेच करायचे आहे.संपूर्ण विश्वाला पतिता पासून पावन बनवण्याची सेवा करायची आहे,म्हणजेच घेराव घालायचा आहे.

वरदान:-
आपले महत्त्व व कर्तव्याला जानणारे नेहमीच जागृत ज्योती भव.

तुम्ही मुलं जगाचे ज्योती आहात. तुमच्या परिवर्तना द्वारे विश्वाचे परिवर्तन होणार आहे,म्हणून झालेल्या गोष्टींना विसरुन स्वतःचे महत्त्व किंवा कर्तव्याला जाणून नेहमी जागृत जोती बना.तुम्ही सेकंदांमध्ये स्व परिवर्तन, विश्व परिवर्तन करू शकतात,फक्त अभ्यास करा,आत्ता-आत्ता कर्मयोगी,आत्ता आत्ता कर्मातीत अवस्था.जसे तुमचे रचना कासव, सेकंदांमध्ये सर्व अंग समेटून घेते, तसे तुम्ही मास्टर रचनाकार समेटण्याच्या शक्तीच्या आधारे सेकंदामध्ये सर्व संकल्पांना समेटून एका संकल्पा मध्ये,एकाग्र राहा.

बोधवाक्य:-
प्रेमळ अवस्थेचा अनुभव करण्यासाठी,स्मृती विस्मृती चे युद्ध समाप्त करा. ओम शांती.