15-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलानो कर्म करत स्वतःला सजनी समजून एक मज साजन ची आठवण करा, आठवणीनेच तुम्ही पावन बनून पावन दुनियेमध्ये जाल."

प्रश्न:-
महाभारत लढाई च्या वेळी तुम्हा मुलांना बाबा कडून कोणती आज्ञा किंवा हुकुम मिळालेला आहे?

उत्तर:-
मुलांनो बाबांची आज्ञा आहे देही अभिमानी बना. सर्वांना संदेश द्या की आता बाबा आणि राजधानीची आठवण करा. आपली चाल चलन सुधारा. खूप- खूप गोड बना. कुणाला दुःख देऊ नका. बाबाच्या आठवणीमध्ये राहण्याची सवय लावा, आणि स्व दर्शन चक्रधारी बना. (पाऊल पुढे ठेवण्याचा पुरुषार्थ करा) प्रगती करण्याचा पुरुषार्थ करा.

ओम शांती।
मुलं बाबांच्या आठवणी मध्ये बसलेली आहेत. असा कोणताही सत्संग नाही जेथे कोणी समोर बसेल आणि म्हणेल ही सर्व मुलं एक बाबांच्या आठवणीमध्ये बसली आहेत. हे एकच ठिकाण आहे . मुले जाणतात बाबांनी दिशानिर्देश दिलेले आहेत की जोपर्यंत जगायचे आहे,तोपर्यंत बाबांची आठवण करायची आहे. हे पारलौकिक बाबाच म्हणतात- हे मुलांनो. सर्व मुले ऐकत आहेत. फक्त तुम्हीच मुले नाही परंतु सर्वांना म्हणतात. मुलांनो बाबांच्या आठवणीमध्ये रहा तर तुमचे जन्म-जन्मांतरची जी पापं आहेत, ज्यामुळे गंज चढलेला आहे, तो सर्व निघून जाईल, आणि तुमची आत्मा सतोप्रधान बनेल. तुमची आत्मा मुळातच सतोप्रधान होती पुन्हा भूमिका करत करत तमोप्रधान बनलेली आहे. हे महावाक्य बाबा शिवाय दुसरे कोणी म्हणू शकत नाही. लौकिक पित्याशी जर तीन-चार मुले असतील, त्यांना म्हणतील राम-राम म्हणा किंवा पतित पावन सिताराम म्हणा किंवा म्हणतील श्रीकृष्णाची आठवण करा . असे म्हणणार नाहीत की हे मुलांनो मज पित्याची आठवण करा. पिता तर घरामध्ये असतो ना. आठवण करण्याचा प्रश्नच येत नाही. बेहद्दचे पिता म्हणतात हे जीवात्म्यांनो ,आत्माच बाबांच्या समोर बसलेली आहेत .आत्म्यांचा पिता एकदाच येतात, 5000 वर्षानंतर आत्मा आणि परमात्म्याची भेट होते. बाबा म्हणतात मी कल्प कल्प येऊन हा पाठ शिकवतो. हे मुलांनो तुम्ही माझी आठवण करत आलेला आहात, हे पतित-पावन या,मी येतो जरूर, नाहीतर कुठपर्यंत आठवण करत राहणार . मर्यादा तर असणार ना. जरूर मनुष्यांना हे माहित नाही की कलियुगाची मर्यादा केव्हा पूर्ण होते. हे पण बाबांनाच सांगावे लागते. बाबा शिवाय तर कोणी म्हणणार नाही, की हे मुलांनो माझी आठवण करा. मुख्य आहे आठवण. रचनेच्या चक्राची आठवण करणे कोणती मोठी गोष्ट नाही .फक्त बाबांची आठवण करण्यामध्ये मेहनत लागते. बाबा म्हणतात अर्धा कल्पा आहे भक्तीमार्ग, अर्धा कल्प आहे ज्ञानमार्ग. ज्ञानाची प्रालब्ध तुम्ही अर्धा कल्प प्राप्त केलेली आहे. पुन्हा अर्धा कल्प आहे भक्तीची प्रालब्ध. ती आहे सुखाची प्रालब्ध. ही आहे दुःखाचे प्रालब्ध. दु:ख सुखाचा खेळ बनलेला आहे. नवीन दुनियेमध्ये आहे सुख. जुन्या दुनियेमध्ये आहे दुःख . मनुष्यांना ह्या गोष्टींचे ज्ञान नाही, म्हणतात पण की आमचे दुःख हरा, सुख द्या .अर्धा कल्प रावण राज्य चालते हे पण कोणाला माहित नाही. फक्त एक बाबाशिवाय कोणीही दुःख मिटवू शकत नाही. शरीराचा आजार डॉक्टर मिटवतात. ते झाले अल्पकाळा साठी. हे तर आहे स्थाई, अर्ध्या कल्पा साठी. नवीन दुनियेला स्वर्ग म्हटले जाते, तर जरूर तेथे सुखच असणार. मग एवढे सर्व आत्मा कुठे असतील ? हे कोणाच्याही लक्षात येत नाही. तुम्ही जाणता हे आहे नवीन ज्ञान, शिकवणारा पण नवीन आहे. भगवानुवाच मी तुम्हाला राजांचा पण राजा बनवतो. हे पण बरोबर आहे की सतयुगामध्ये एकच धर्म होता, जरूर बाकी सर्व विनाश होऊन जातील. नवीन दुनिया आणि जनी दुनिया कोणाला म्हटले जाते ? सतयुगामध्ये कोण राहतात ? हे पण तुम्ही आता जाणता. सतयुगामध्ये एक आदी सनातन देवी देवता धर्माचे राज्य होते. कालचीच गोष्ट आहे. ही कहाणी आहे पाच हजार वर्षाची. बाबा सांगतात पाच हजार वर्षापूर्वी भारतामध्ये ह्या देवी-देवतांचे राज्य होते. ते 84 जन्म घेत घेत आता पतित बनलेले आहेत , आणि म्हणून बोलवतात की हे पतित-पावन या. निराकारी दुनियेमध्ये सर्व पावन आत्मा राहतात. पुन्हा खाली येऊन भूमिका करतात तेव्हा सतो, रजो, तमो मध्ये येतात. सतोप्रधानाला निर्विकारी म्हटले जाते.तमोप्रधान स्वतःला विकारी म्हणतात. समजतात, की ह्या देवी-देवता निर्विकारी होत्या. आम्ही विकारी आहोत. म्हणून बाबा म्हणतात- देवतांचे जे पुजारी आहेत त्यांना हे ज्ञान पटकन बुद्धीमध्ये बसेल, कारण देवता धर्म वाले आहेत . आता तुम्ही जाणता जे आम्ही पूज्य होतो तेच पुजारी बनले आहेत . जसे ख्रिश्चन क्राइस्टची पूजा करतात, कारण त्या धर्माचे आहेत. तुम्ही पण देवतांचे पुजारी आहात, तर त्या धर्माचे झालात. देवता निर्विकारी होते, आता विकारी बनले आहेत. विकारासाठी किती अत्याचार होतात .

बाबा म्हणतात माझी आठवण करण्याने तुमचे विकर्म विनाश होतील आणि तुम्ही सदासुखी बनाल. येथे आहात सदा दु:खी. अल्प कालचे सुख आहे. तेथे तर सर्वजण सुखी असतात. तरी पण पदांमध्ये फरक आहे ना. सुखाची पण राजधानी आहे . दुःखाची पण राजधानी आहे. बाबा जेव्हा येतात तेव्हा विकारी राज्यांची राजाई पण नष्ट होऊन जाते, कारण येथील प्रालब्ध पूर्ण झालेली असते. आता तुम्ही मुले जाणता की बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात जसा मी शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, तुम्हाला पण असेच बनायचे आहे. ही महिमा फक्त एका बाबांचीच आहे . कोणत्या मनुष्याची महिमा नाही. तुम्ही मुले जाणता बाबा पवित्रतेचा सागर आहे. आम्ही आत्मा पण जेव्हा परमधाम मध्ये राहतो तेव्हा पवित्र असतो. हे ईश्वरीय ज्ञान तुम्हा मुलांच्या जवळच आहे, ईतर कोणी जाणत नाहीत. जसे ईश्वर ज्ञानाचा सागर आहे. स्वर्गाचा वारसा देणारा आहे. त्यांना मुलांना आपल्या समान पण जरूर बनवायचे आहे. प्रथम तुम्हाला बाबाचा परिचय नव्हता. आता तुम्ही जाणता परमात्मा ज्यांची एवढी महिमा आहे, ते आम्हाला असे श्रेष्ठ बनवतात, तर स्वतःला पण असे श्रेष्ठ बनवावे लागेल. असे म्हणतात- ना यांच्यामध्ये दैवी गुण खूप चांगले आहेत जसे देवता. कोणाचा शांत स्वभाव असतो,कोणाची निंदा,शिवीगाळ करत नाहीत, तर त्यांना चांगला व्यक्ती म्हटले जाते. परंतु ते बाबांना स्रुष्टीचक्राला जाणत नाहीत.आता बाबा येऊन तुम्हा मुलांना अमर लोकचे मालक बनवतात. नवीन दुनियेचे मालक बाबा शिवाय कोणी बनवू शकत नाही. ही आहे जुनी दुनिया . ती आहे नवीन दुनिया . तेथे देवीदेवतांची राजधानी असते. कलियुगामध्ये ती राजधानी नाही. बाकी अनेक राजधान्या आहेत. आता पुन्हा अनेक राजधान्यांचा विनाश होऊन एक राजधानी स्थापन होणार आहे. जरूर जेव्हा राजधानी नसेल तेव्हा बाबा येऊन स्थापन करतील. बाबांशिवाय हे कोणी करू शकत नाही. तुम्हा मुलांचे बाबांवर किती प्रेम असले पाहिजे. जे बाबा म्हणतील ते जरूर करायचे आहे. एक तर बाबा म्हणतात माझी आठवण करा आणि दुसऱ्यांना रस्ता दाखवा. देवी देवता धर्माचे जे असतील त्यांच्यावर प्रभाव पडेल. आम्ही महिमा करतोच एक बाबाची. बाबांमध्ये गुण आहेत तर बाबाच येऊन आम्हाला गुणवान बनवतात. बाबा म्हणतात हे मुलांनो खूप गोड बना. प्रेमाने सर्वांना ऐकवा, समजवा. भगवानुवाच माझी आठवण करा तर मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवेन. तुम्हाला आता घरी परत जायचे आहे. जुन्या दुनियेचा महाविनाश समोर उभा आहे. यापूर्वीही महाभारी महाभारत लढाई लागलेली होती . भगवंताने राजयोग शिकवला होता. आता अनेक धर्म आहेत . सतयुगामध्ये एक धर्म होता, जो आता प्राय: लोप झालेला आहे . आता येऊन बाबा अनेक धर्मांचा विनाश करून एक धर्माची स्थापना करतात. बाबा समजवतात मी हा यज्ञ रचतो, अमरपुरीमध्ये घेऊन जाण्यासाठी. तुम्हाला अमर कथा ऐकवतो, अमरलोक मध्ये घेऊन जाण्यासाठी, तर मृत्यू लोकचा विनाश जरूर होईल. बाबा आहेतच नवीन दुनियेचे रचनाकार . तर बाबाला जरूर येथे यावे लागेल. आता तर विनाश ज्वाला समोर उभी आहे. पुन्हा म्हणतील की तुम्ही खरंच सांगत होता, बरोबर आहे, ही तीच महाभारत लढाई आहे. हे प्रसिद्ध आहे, तर जरुर या वेळी भगवान पण आहेत. भगवान कसे येतात हे तुम्ही सांगू शकता . तुम्ही सगळ्यांना सांगा की आम्हाला डायरेक्ट भगवान शिकवतात. ते म्हणतात- तुम्ही माझी आठवण करा. सतयुगामध्ये सर्वजण सतोप्रधान असतात, आता तमोप्रधान आहेत . आता पुन्हा सतोप्रधान बना तेव्हा मुक्ती जीवन मुक्तीमध्ये याल.

बाबा म्हणतात- फक्त माझ्या आठवणीनेच तुम्ही सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनियेचे मालक बनाल. आम्ही आत्मिक वाटाड्या आहात,यात्रा करता मनमनाभवची. बाबा येऊन ब्राह्मण धर्म, सूर्यवंशी, चंद्रवंशी धर्म स्थापन करतात. बाबा म्हणतात माझी आठवण नाही केली तर जन्मजन्मांतर पापांचा बोझा उतरणार नाही. हा मोठ्यात मोठा नशा असला पाहिजे. कर्म करत असताना, धंदा करत असताना "हे सजनी मला साजन समजून आठवण करा" प्रत्येकाला स्वतः ची संभाळ करायची आहे. बाबांची आठवण करा कोणतेही पतित काम करू नका. घराघरांमध्ये बाबांचा संदेश देत राहा, की भारत स्वर्ग होता. लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. आता नर्क आहे. नर्काच्या विनाशासाठीच ही महाभारत लढाई आहे . आता देही अभिमानी बना. बाबांचा हुकूम आहे माना किंवा न माना. आम्ही तर आलेलो आहोत तुम्हाला संदेश देण्यासाठी. बाबाचा हुकुम आहे सर्वांना संदेश ऐकवा. बाबांना विचारतात कोणती सेवा करू, बाबा म्हणतात संदेश देत राहा, बाबांची आठवण करा, राजधानीची आठवण करा,तर अंत मती सो गती होईल. मंदिरामध्ये जावा, गीता पाठशाला मध्ये जावा. पुढे जाऊन तुम्हाला खूप भेटतील. तुम्हाला देवी देवता धर्मातील लोकांना ज्ञान द्यायचे आहे.

बाबा समवजतात खूप खूप गोड बना, वाईट चाल चलन असेल तर पद भ्रष्ट होईल . कोणाला दुःख देऊ नका. वेळ खूप थोडा आहे . प्रिय बाबाची आठवण करा, ज्यामुळे स्वर्गाचे राज्यभाग्य मिळेल. कोणाची मुरली चालत नसेल तर शीडीच्या चित्रासमोर जाऊन फक्त हा विचार करा- असेच आम्ही जन्म घेतो, असे चक्र फिरत राहते. तर आपोआपच तोंड उघडत जाईल. जी गोष्ट आतमधे असते ती जरूर बाहेर निघते. आठवणीमध्ये राहिल्याने आम्ही पवित्र बनू आणि नवीन दुनियेमध्ये राज्य करू. आमची आत्ता चढती कला आहे . किती खुषी झाली पाहिजे. आम्ही मुक्तीधाम मध्ये जाऊन पुन्हा जीवन मुक्ती मध्ये येऊ. जबरदस्त कमाई आहे. काम, धंदा जरूर करा फक्त बुद्धीने आठवण करा. आठवण करण्याची पण सवय लागली पाहिजे. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. चाल चलन खराब असेल तर धारणा होणार नाही. कोणाला समजवू शकणार नाही . प्रगती करण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. मागे यायचे नाही. प्रदर्शनीमध्ये सेवा करण्याने खुशी होते. फक्त सांगायचे आहे की, बाबा म्हणतात - माझी आठवण करा. देहधार्ऱ्यांची आठवण करण्याने विकर्म बनतील. वारसा देणारा मी आहे. मी सर्वांचा पिता आहे. मी येवून तुम्हाला मुक्ती जीवन मुक्तीमध्ये घेऊन जातो. प्रदर्शनी, मेळ्यामध्ये सेवा करण्याचा खूप छंद असला पाहिजे. सेवा करताना अटेन्शन दिले पाहिजे. स्वतःच मुलांना सेवेचे विचार आले पाहिजेत. अच्छा!

गोड -गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची स्नेह पूर्वक आठवण, आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते .

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. एका बाबांवरच पूर्ण प्रेम ठेवायचे आहे. सर्वांना खराखुरा रस्ता दाखवायचा आहे. काम धंदा करताना स्वतःची पूर्ण संभाळ करायची आहे. एकाच्या आठवणी मध्ये राहायचे आहे.

2. सेवा करण्याचा खूप खूप छंद ठेवायचा आहे . स्वतःची चलन सुधारायची आहे. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे.

वरदान:-
"करन- करावनहार" च्या स्मृती द्वारे सहज योगाचा अनुभव करणारे सफलता मूर्त भव.

कोणतेही कार्य करत असताना ही स्मृती राहू द्या, की या कार्याला निमित्त बनवणारे आधारमुर्त कोण आहेत ? विना आधाराच्या कोणत्याही कार्यामध्ये सफलता मिळू शकत नाही. म्हणून कोणतेही कार्य करत असताना फक्त हा विचार करा, मी निमित्त आहे, करणारा स्वयम् सर्व समर्थ बाबा आहेत, या स्मृतीमध्ये राहुन कर्म करा, तर सहज योगाची अनुभूती होत राहील. हा सहज योग तेथे सहज राज्याचा अनुभव करवेल. येथील संस्कार तेथे घेऊन जाल.

बोधवाक्य:-
इच्छा सावलीच्या समान आहेत, तुम्ही पाठ करा तर त्या तुमच्या पाठीमागे येत राहतील.