15-11-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   18.01.87  ओम शान्ति   मधुबन


कर्मातीत स्थितीची लक्षण


आज अव्यक्त बापदादा आपल्या 'अव्यक्त स्थिती भव' च्या वरदानी मुलांना किंवा अव्यक्त फरिश्त्यांना भेटण्यासाठी आले आहेत. हे अव्यक्त मिलन, भेट, साऱ्या कल्पा मध्ये आता एकाच वेळेत संगम युगामध्ये होते. सतयुगा मध्ये देव मिलन असेल परंतु फरिश्त्यांचे' मिलन, यावेळेत च होते. निराकार पिता पण अव्यक्त ब्रह्मा पित्या द्वारे भेटतात. निराकारला पण हे फरिश्त्त्यांचे संमेलन अति प्रिय वाटते, म्हणून आपले धाम सोडून साकारी किंवा आकारी दुनिये मध्ये भेटण्यासाठी आले आहेत. फरिशता मुलांच्या स्नेहाच्या आकर्षणा मुळे, बाबांना पण रूप बदलून, मुलांच्या संसारांमध्ये यावे लागते. हे संगमयुग बाबां आणि मुलांचा अति प्रिय आणि वेगळा संसार आहे. स्नेह सर्वात मोठे आकर्षित करण्याची शक्ती आहे, जे परमात्मा बंधन मुक्त आहेत, त्यांना पण शरीरापासून मुक्त असणाऱ्यांना, पण स्नेहाच्या बंधनांमध्ये बांधते. अशरीरीला पण भाड्याचे शरीरधारी बनवते. हेच मुलांच्या स्नेहाचे प्रत्यक्ष प्रमाण आहे.

आजच्या दिवशी अनेक, चोहूबाजूच्या मुलांच्या स्नेहाच्या धारा, स्नेहाच्या सागरामध्ये सामवण्याचा दिवस आहे. मुलं म्हणतात, आम्ही बापदादांना भेटण्यासाठी आलो आहोत. मुलं भेटण्यासाठी आले आहेत की मुलांना बाबा भेटण्यासाठी आले आहेत की, दोघेही मधुबन मध्ये एकमेकांना भेटण्यासाठी आले आहेत. मुलांच्या स्नेहाच्या सागरामध्ये सामावण्यासाठी आले आहेत परंतु बाबा हजारो गंगेमध्ये स्नान करण्यासाठी येतात, म्हणून गंगासागर चा मेळा विचित्र मेळा आहे. स्नेहाच्या सागरामध्ये सामावून सागरा समान बनतात. आजच्या दिवसाला समान बनवण्याची स्मृती म्हणजे समर्थ दिवस म्हणतात, कारण आजचा दिवस ब्रह्मा पित्याचा संपन्न आणि संपूर्ण बाप समान बनण्याचा, स्मृति दिवस आहे. ब्रह्मा मुलगा सो पिता, ब्रह्मा मुलगा पण आहे, पिता पण आहे. आजच्या दिवशी ब्रह्माने, मुलांच्या रुपामध्ये, सुपात्र बनण्याचा पुरावा दिला, स्नेहाच्या स्वरूपला, समान बनण्याचा पुरावा दिला. अतिप्रिय आणि अती अनासक्तचा पुरावा दिला. बापसमान कर्मातीत अर्थात कर्माच्या बंधनापासून मुक्त, अनासक्त बनण्याचा पुरावा दिला. सर्व कल्पाच्या कर्माच्या हिशोबा द्वारे, मुक्त होण्याचा पुरावा दिला, शिवाय सेवेच्या स्नेहाच्या, दुसरे कोणतेच बंधन नाही. सेवेमध्ये पण सेवेच्या बंधनांमध्ये बांधणारे सेवाधारी नाहीत कारण सेवेमध्ये कोणी बंधनमुक्त बनून सेवा करतात आणि कोणी बंधनयुक्त बनून सेवा करतात. सेवाधारी ब्रह्मा पिता पण आहेत परंतु सेवा द्वारे हद्दच्या श्रेष्ठ इच्छा, पण सेवेच्या हिशेबाच्या बंधनांमध्ये बांधतात, परंतु खरी सेवा या हिशोबा पासून पण मुक्त आहे, यालाच कर्मातीत स्थिति म्हटले जाते. जसे देहाचे बंधन, देहाच्या संबंधाचे बंधन, अशा सेवांमध्ये स्वार्थ, हे पण बंधन कर्मातीत बनण्यांमध्ये विघ्न घालते. कर्मातीत बनणे म्हणजेच या श्रेष्ठ हिशोबापासून मुक्त.

बहुतांश निमित्त गीता पाठशालाचे सेवाधारी आले आहेत ना. तर सेवा म्हणजेच दुसर्यांना पण मुक्त बनवणे. दुसऱ्यांना मुक्त बनवत स्वतःला बंधनामध्ये बांधत तर नाहीत ना. नष्टोमोहा बनण्याच्या ऐवजी, लौकिक मुलं इत्यादी सर्वांचा मोह त्याग करून, विद्यार्थ्याशी मोह तर ठेवत नाही ना. हा फार चांगला आहे, चांगला आहे, चांगला समजत माझ्या पणाच्या इच्छा मध्ये बांधुन घेत तर नाही ना. सोन्याच्या साखळ्या तर चांगल्या वाटत नाही ना. आजचा दिवस, हद्दच्या, माझे-माझे पणा पासून मुक्त होण्याचा म्हणजेच कर्मातीत होण्याचा अव्यक्त दिवस साजरा करा, यालाच स्नेहाचा पुरावा म्हटले जाते. कर्मातीत बनणे हे लक्ष तर सर्वांचे चांगले आहे. आत्ता तपासा किती, कर्माच्या बंधनापासून अनासक्त बनलो आहोत. प्रथम गोष्ट लौकिक आणि अलौकिक, कर्म आणि सबंध, दोघांच्या स्वार्थ भावापासून मुक्त. दुसरी गोष्ट पूर्व जन्माच्या कर्माचे कर्मभोग किंवा वर्तमान पुरूषार्थाच्या कमजोरी मुळे, कोणत्याही व्यर्थ स्वभाव संस्काराच्या वश होण्यापासून मुक्त बनले आहात. कधीही कोणता कमजोर स्वभाव संस्कार किंवा पाठीमागचा संस्कार स्वभाव वशीभूत बनवतो तर बंधनयुक्त आहात, बंधन मुक्त नाहीत. असा विचार करू नका की, इच्छा नाही परंतु स्वभाव किंवा संस्कार वश करतो, ही लक्षणं पण बंधन मुक्तची नाहीत परंतु बंधनयुक्त ची आहेत. दुसरी गोष्ट कधीपण सेवेची, संघटनची, प्रकृतीची परिस्थिती, स्वस्थितीला किंवा श्रेष्ठ स्थितीला डगमग करत असेल, तर ही पण बंधनमुक्त स्थिती नाही. या बंधनापासून पण मुक्त बना. तिसरी गोष्ट जुन्या दुनिया मध्ये, जुन्या अंतिम शरीरांमध्ये कोणत्याही प्रकारची व्याधी, आपल्या श्रेष्ठ स्थितीला हलचल मध्ये घेऊन येणे, यापासून पण मुक्त बनायचे आहे. एक आहे व्याधी येणे आणि दुसरे म्हणजे व्याधी पासून डगमग होणे. व्याधी येणे ही भावी आहे परंतु स्थिती हलचल मध्ये येणे, ही बंधनयक्त ची लक्षणं आहेत. स्वचिंतन, ज्ञानचिंतन, शुभचिंतक बनण्याचे चिंतन बदलून शारीरिक व्याधीचे चिंतन चालणे, कारण जास्त व्याधीपासून मुक्त‌ कारण जास्त प्रकृतीचे चिंतन, चिंताच्या रूपामध्ये बदलते. तर यापासून मुक्त होणे यालाच कर्मातीत म्हटले जाते. या सर्व बंधनांना सोडणे, हे कर्मातीत स्थितीची लक्षणं आहेत. ब्रह्मा बाबांनी सर्व बंधनापासून मुक्त होऊन, कर्मातीत स्थिती प्राप्त केली. तर आजचा दिवस ब्रह्मा बाप समान कर्मातीत बनण्याचा दिवस आहे. तर आजच्या दिवसाचे महत्त्व समजले? अच्छा.

आजची सभा विशेष सेवाधारी, पुण्यात्मा बनणाऱ्यांची सभा आहे. गीता पाठशाळा सुरू करणे म्हणजेच पुण्य आत्मा बनणे आहे. सर्वात मोठ्यात मोठे पुण्य प्रत्येक आत्म्यांना नेहमीसाठी, म्हणजे अनेक जन्मासाठी पापापासून मुक्त करणे, हेच पुण्य आहे. नाव खूप चांगले आहे, 'गीता पाठशाला'. तर गीता पाठशाला म्हणजेच नेहमी स्वतः गीतेचा पाठ शिकणे आणि शिकवणे. गीता ज्ञानाचा प्रथम पाठ अशरीरी आत्मा बनणे आणि अंतिम पाठ नष्टोमोहा स्मृतीस्वरुप बनणे. तर प्रथम पाठ विधि आहे आणि अंतिम पाठ विधीद्वारे सिध्दी आहे. तर गीता पाठशाला चालवणारे प्रत्येक वेळेस हा पाठ शिकतात की फक्त मुरली ऐकवतात, कारण खऱ्या गीता पाठशाला ची विधी आहे, प्रथम स्वतः शिकणे म्हणजेच बनणे, परत दुसऱ्यांना निमित्त बनवून शिकवणे. तर सर्व गीता पाठशाला चालवणारे या विधीद्वारे सेवा करत आहात? कारण तुम्ही सर्व या विश्वाच्या पुढे परमात्मा शिक्षणाचे उदाहरण मुर्त आहात. तर उदाहरण मूर्ताचे महत्त्व असते. उदाहरण मुर्त अनेक आत्म्याला असे बनण्याची प्रेरणा देते. तर गीता पाठशाला चालवणाऱ्यांच्या वरती खूप मोठी जिम्मेदारी आहे. जर जरापण उदाहरण बनणाऱ्या मध्ये कमी दिसून यते तर, अनेक आत्म्यांना भाग्य बनवण्याच्या ऐवजी भाग्य बनण्यापासून वंचित करण्याचे निमित्त पण बनतात, कारण पाहणारे, ऐकणारे, साकार रूपामध्ये तुम्हा निमित्त आत्म्यांना पाहतात. बाबा तर गुप्त आहेत ना, म्हणून असे श्रेष्ठ कर्म करून दाखवा. आपल्या श्रेष्ठ कर्माला पाहून, अनेक आत्मे श्रेष्ठ कर्म करून, आपल्या भाग्याची रेषा श्रेष्ठ बनवू शकतात. एक तर स्वत:ला नेहमी उदाहरणमुर्त समजा, दुसरे म्हणजे सिम्बाॅल(चिन्ह) समजा. गीता पाठशाला चालवणाऱ्यांचा सिम्बॉल कोणता आहे, तुम्ही जाणतात कमळपुष्प. बापदादांनी ऐकवले आहे की, कमळ बना आणि अम्मल करा. कमळ बनण्याचे साधनच आहे अमल करणे, जर करत नाही तर कमळासारखे बनु शकत नाहीत, म्हणून सॅम्पल म्हणजे उदाहरण मूर्त आहात आणि कमळ पुष्पाचे सिम्बॉल नेहमी बुद्धीमध्ये ठेवा. सेवा किती पण वृध्दीला प्राप्त होवो परंतु सेवा करत अनासक्त बनून, प्रिय बना. फक्त प्रिय बनू नका, अनासक्त बनून, प्रिय बना, कारण सेवेशी स्नेह चांगली गोष्ट आहे परंतु सेवा नावाच्या रूपामध्ये बदलायला नको. यालाच म्हणतात अनासक्त बनून प्रिय बनणे. सेवेच्या निमित्त बनणे तर खूप चांगले केले. पुण्य आत्म्यांची पदवी तर मिळाली, म्हणून पहा खास निमंत्रण दिले आहे, कारण पुण्यांचे काम केले ना. आता जो सिद्धीचा पाठ शिकवला, तर सिद्धीची स्थिती, वृध्दीला प्राप्त करत राहणे. समजले, पुढे काय करायचे आहे? अच्छा.

सर्व विशेष एका गोष्टीचे आतुरतेने वाट पाहत आहेत, ती कोणती? परिणाम सांगू का? परिणाम तुम्ही ऐकवणार की बाबा ऐकवू देत. बापदादानी काय म्हटले होते, परिणाम घ्याल की, तुम्ही द्याल. वैश्विक नाटकानुसार जे चाललंय, जसे चालले, त्याला चांगलेच म्हणनार. लक्ष सर्वांनी चांगले ठेवले आहे, लक्षणं यथाशक्ती कर्मामध्ये दाखवले. खूप वर्षाचे वरदान क्रमानुसार धारण केले पण आहे आणि आत्ताचे पण वरदान मिळवले आहे, ते वरदानी मूर्ती म्हणून बाप समान वरदान दाता बनत रहा. आता बापदादा काय करू इच्छितात? वरदान तर मिळाले, आता अनेक वर्षापासून बंधनमुक्त म्हणजे बाप समान कर्मातीत स्थितीचा, विशेष अभ्यास करत, दुनियाला अनासक्त आणि स्नेही पणाचा अनुभव करत चला. कधी कधी अनुभव करणे, आत्ता या विधीला बदलून अनेक वर्षाचा अनुभव अचल, निर्विकल्प, निबंधन निर्विकर म्हणजेच निराकारी, निर्विकारी, निरंकारी या स्थितीला दुनियाच्या पुढे प्रत्यक्ष रूपामध्ये घेऊन या, यालाच म्हणतात बाप समान बनणे, समजले. पुरुषार्थाच्या परिणामा मध्ये प्रथम स्वतः पासून संतुष्ट किती राहिले? कारण एक आहे, स्वतःची संतुष्टता, दुसरी आहे ब्राह्मण परिवाराची संतुष्टता, तिसरी आहे बाबांची संतुष्टता. तिघांच्या परिणामांमध्ये आता जास्त मार्क घ्यायचे आहेत, तर संतुष्ट बना, संतुष्ट करा. बाबांचे संतुष्टमणी बनुन नेहमी चमकत रहा. बापदादा मुलांचा आदर ठेवतात म्हणून गुप्त रेकॉर्ड सांगतात.

होवनहार आहात, म्हणून बापदादा नेहमी संपन्नतेची स्थिती पाहतात. अच्छा. सर्व संतुष्टमणी आहात ना? वृध्दीला पाहून खुश होत राहा. तुम्ही सर्व वाट पाहतात की, आबूरोड पर्यंत रांग लागावी. आता तर फक्त हॉल भरला आहे, परत काय कराल. परत आराम करणार की अखंड योग करणार? हे पण होणार आहे, म्हणून थोड्या मध्येच खुश रहा. तीन पाऊल पृथ्वीच्या ऐवजी एक पाऊल पृथ्वी मिळाले तरीही खुश रहा. अगोदर असे होत होते, असा विचार करू नका. परिवाराच्या वृद्धीसाठी आनंद साजरा करा. आकाश आणि पृथ्वी तर संपणार नाहीत ना. डोंगर तर खूप आहेत. हे पण व्हायला पाहिजे, हे पण मिळाले पाहिजे, याची मोठी गोष्ट बनवतात, या दादी पण विचारा मध्ये पडतात, काय करावे, कसे करावे. असे पण दिवस येतील, दिवसा ऊना मध्ये विश्राम करावा लागेल, रात्री जागरण करावे लागेल. ते लोक शेकोटी करुन बसतात, गरम होण्यासाठी, तुम्ही योग अग्नी करून बसाल, पसंद आहे ना, की काॅट पाहिजे, बसण्यासाठी खुर्ची पाहिजे. या डोंगरालाच पाट करून बसा. जो पर्यंत साधन आहेत, तो पर्यंत सुख घ्या, नाहीतर डोंगरालाच खुर्ची बनवा. पाठीला आराम पाहिजे ना, बाकी काही नाही. ५००० येतील तर खुर्च्या पण काढाव्या लागतील ना. आणि जेव्हा रांग लागेल तर काॅट पण सोडावे लागतील, त्यासाठी तयार राहा. जर काॅट मिळाले तर ठीक आहे, जमिनी वरती विश्राम करण्याची पाळी आली तरी ठीक आहे. असे सुरुवातीला खूप अभ्यास करवला. पंधरा पंधरा दिवस दवाखाना बंद राहत होता, दम्याच्या पेशंटला पण बाजरीची भाकरी आणि ताक देत होते, परंतु आजारी पडले नाही. सर्व निरोगी बनले. तर हा अभ्यासक्रम सुरुवातीला करून दाखवला, तर अंतकाळात पण होईल, नाहीतर विचार करा दम्याचा पेशंट आणि त्यांना ताक दिले तर अगोदरच घाबरून जाईल. परंतु आशीर्वादाचे औषध सोबत होते, म्हणून मनोरंजन झाले. परीक्षा वाटत नव्हती, कठीण वाटत नव्हते. त्याग नाही परंतु व्यायाम होत होता. तर सर्व तयार आहात ना, की प्रबंध करणाऱ्या शिक्षक जवळ यादी जाईल, म्हणून बोलवत नाहीत ना. वेळ आल्यावर या सर्व साधना पासून दूर साधनाच्या सिद्धी स्वरूपाचा अनुभव करा. आत्मिक सेना आहात ना. सेनेची भूमिका पण वठवायची आहे ना. आता तर स्नेही परिवार आहे, घर पण आहे. हा पण अनुभव करत आहात, परंतु वेळे वरती आत्मिक सेना बनून, जी पण वेळ आली त्याला स्नेहाने पार करणे, ही पण सेनेची विशेषता आहे. अच्छा.

गुजरातला हे विशेष वरदान आहे, की नेहमी तयार राहतात, कारण देत नाहीत. काय करावे, कसे यावे, आरक्षण मिळत नाही, तरी पोहचतात. मधुबन पासून जवळ असल्याचा फायदा होतो. गुजरातला आज्ञाधारक बनण्याचा विशेष आशीर्वाद आहे, कारण सेवेमध्ये होय जी, असे करतात ना. कष्टाची सेवा नेहमी गुजरातला देतात ना. रोटी बनवण्याची सेवा कोण करतात? राहण्याचे स्थान देण्याची सेवा, भागदौड करण्याची सेवा गुजरात करतो ना. बापदादा सर्व पाहतात, असे नाही बापदादांना माहिती होत नाही, कष्ट करणाऱ्यांना विशेष त्याच्या मोबदल्यात स्नेहाची प्राप्ती होते. जवळ भाग्य आहे आणि भाग्याला वृद्धिंगत करण्याचा चांगली पद्धत आहे. भाग्याला वाढवणे, सर्वांना येत नाही. कोणाला भाग्य प्राप्त होते, परंतु तेवढेच राहते. वाढवता येत नाही. परंतु गुजरातचे भाग्य आहे आणि वृद्धी करायला पण येते, म्हणून आपले भाग्य वाढवत आहात. हे पाहून बाप दादा पण खुश आहेत. तर बाबांचा विशेष आशीर्वाद, हे पण एक भाग्याचे लक्षण आहे. समजले?

जे पण चोहोबाजूचे स्नेही मुलं पोहोचले आहेत, बापदादा पण सर्व देश, परदेश दोघां स्नेही मुलांना, स्नेहाच्या मोबदल्यात नेहमी अविनाशी स्नेही भवचे वरदान देत आहेत. स्नेहा मध्ये जसे दूर-दूर वरून पोहोचले आहेत, असेच जसे स्थुल मध्ये दौड लावली, जवळ पोहोचले, सन्मुख पोहोचले. असेच पुरुषार्था मध्ये पण विशेष उडती कला द्वारे बाबांच्या जवळच राहायचे आहे. समजले काय करायचे आहे? हा स्नेह, हृदयापासूनचा स्नेह, दिला राम बाबा जवळ, तुम्ही येण्याच्या अगोदरच पोहोचला. मग ते समोर असतील किंवा आजच्या दिवशी देश परदेशामध्ये शरीरापासून दूर आहेत. परंतु दूर असताना पण सर्व मुलं खूपच जवळ, म्हणजे ह्रदयासीन आहेत. सर्वांचे जवळचे स्थान ह्रदय आहे. तर विदेशामध्ये किंवा देशांमध्ये बसले नाहीत परंतु हृदयासीन आहेत, तर जवळ झाले ना. सर्व मुलांची प्रेमपूर्वक आठवण, गोड तक्रारी, गोड गोड आत्मिक संवाद, भेटी, सर्व बाबांच्या जवळ पोहोचले. स्नेही मुलांना नेहमी कष्टा पासून मुक्त आणि प्रेमामध्ये मग्न रहा, हे वरदान देत आहेत. तर सर्वांना मोबदला मिळाला ना, अच्छा.

सर्व स्नेही आत्म्यांना, नेहमी समीप राहणाऱ्या आत्म्यांना, सदा बंधनमुक्त, कर्मातीत स्थितीचा अनेक वर्षांपासून अनुभव करणाऱ्या विशेष आत्म्यांना, सर्व ह्रदयासीन संतुष्टमणींना बापदादाचा 'अव्यक्त स्थिती भव'चे वरदान, सोबत प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ रात्री आणि सुप्रभात.

वरदान:-
जुन्या खात्याला समाप्त करून, नवीन संस्कार रुपी, नवे वस्त्र धारण करणारे, बाप समान संपन्न भव.

जसे दिवाळी वरती नवीन वस्त्र परिधान करतात, असे तुम्ही मुलं या नवीन संस्कार रूपी, वस्त्र धारण करून, नवीन वर्ष साजरे करा. आपल्या कमजोरी, कमी, निर्बलता, कोमलता, इत्यादीचे जे पण जुने . खाते राहिले आहेत, त्यांना समाप्त करून खरी दिवाळी साजरी करा. या नवीन जन्मांमध्ये नवीन संस्कार धारण करा, तर बाप समान संपन्न बनाल.

सुविचार:-
शुद्ध संकल्पाचा खजाना जमा करा, तर व्यर्थ संकल्पामध्ये वेळ जाणार नाही.


सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार आहे, सर्व राजयोगी तपस्वी भाऊ बहिणी, सायंकाळी ६-३० ते ७-३० वाजेपर्यंत, विशेष योगा अभ्यासाच्या वेळेत, आपल्या शुभ भावनाच्या श्रेष्ठ वृत्ती द्वारे, महादानी बनून, सर्वांना निर्भयताचे वरदान देण्याची सेवा करा.