16-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हाला ज्ञानामुळे चांगली जागृती आलेली आहे. तुम्ही आपल्या ८४ जन्माला, निराकारी आणि साकारी पित्याला ओळखले आहे, तुमचे भटकणे बंद झाले आहे.

प्रश्न:-
ईश्वराची गत आणि मत वेगळी का आहे?

उत्तर:-
1) कारण की ते अशी मत देतात ज्यामुळे तुम्ही ब्राह्मण सर्वांपासून वेगळे बनता. तुम्हा सर्वांची एकच मत होते.
2) ईश्वरच आहे जे सर्वांची सदगती करतात. पुजारी पासून पुज्य बनवतात, त्यामुळे त्यांची गत आणि मत वेगळी आहे, या ईश्वरीय मताला तुम्हा मुलांशिवाय दुसरे कोणीच ओळखू शकत नाही.

ओम शांती।
तुम्ही मुले जाणता मुलांची तब्येत जर चांगली नसेल तर बाबा म्हणतील खुशाल येथे झोपी जा. यामध्ये काही हरकत नाही कारण की, खूप वर्षांनी भेटलेले म्हणजे पाच हजार वर्षानंतर पुन्हा येऊन भेटले आहात. कोणाला भेटले? बेहद च्या पित्याला. हेसुद्धा तुम्ही मुले जाणता, ज्यांना निश्चय आहे, बरोबर आम्ही बेहादच्या पित्याला भेटलो आहोत. कारण एक हद्दचे आणि दुसरे बेहद्दचे असे दोन पिता आहेत. दुःखामध्ये सर्वजण बेहद्दच्या पित्याला आठवण करतात. सतयुगामध्ये एकच लौकिक पित्याला आठवण करतात, कारण ते सुखधाम आहे. लौकिक पिता त्यांना म्हणले जाते जे या साकारी लोकांमध्ये जन्म देतात. पारलौकिक पिता एकदाच येऊन तुम्हाला आपले बनवतात. तुम्ही पण बाबांसोबत अमरलोक मध्ये राहणारे आहात, ज्याला परलोक, परमधाम म्हणले जाते. ते दूर ते दूर धाम आहे. स्वर्गाला दूर म्हणता येणार नाही. नवीन दुनियेला स्वर्ग आणि जुन्या दुनियेला नर्क म्हणले जाते. आता पतित दुनिया आहे, म्हणून बोलवतात हे पतित-पावन या. सतयुगा मध्ये असे बोलवत नाहीत. जेव्हा पासून रावण राज्य सुरू होते तेव्हा पतित बनतात.याला पाच विकारांचे राज्य म्हणले जाते. सतयुगा मध्ये निर्विकारी राज्य आहे. भारताची किती मोठी महिमा आहे. परंतु विकारी असल्यामुळे भारताचे महत्व जाणत नाहीत. भारत संपूर्ण निर्विकार होता, जेव्हा लक्ष्मी नारायण राज्य करत होते. आता ते राज्य नाही. ते राज्य कोठे गेले, हे अल्प बुद्धीना माहित नाही. दुसरे सर्व आपापल्या धर्म संस्थापकांना जाणतात. एकच भारतवासीय असे आहेत जे आपल्या धर्माला आणि आपल्या धर्म संस्थापकाला जाणत नाहीत. अन्य धर्मातील आपल्या धर्माला तर जाणतात परंतु ते पुन्हा केव्हा स्थापन करण्यासाठी येतील हे जाणत नाहीत. शिख लोकांना सुद्धा हे माहीत नाही, की आमचा सिख धर्म पूर्वी नव्हता. गुरुनानकांनी येऊन स्थापन केला तर मग जरूर सतयुगामध्ये राहणार नाही. तेव्हा तर गुरुनानक येऊन पुन्हा स्थापना करतील कारण की विश्वचा इतिहास भूगोल पुनरावृत्त होतो. ख्रिश्चन धर्म सुद्धा नव्हता नंतर स्थापन झाला. पहिल्यांदा नवीन दुनिया होती, एक धर्म होता. फक्त तुम्ही भारतवासी होता, एक धर्म होता, पुन्हा आपणच 84 जन्म घेत घेत हे विसरून जाता की आपणच देवता होतो.पुन्हा आपणच 84 जन्म घेतो,तेव्हा बाबा म्हणतात तुम्ही तुमच्या जन्माला जाणत नाही, मी येऊन सांगतो. अर्धा कल्प रामराज्य होते, परत रावण राज्य झाले. प्रथम सूर्यवंशी घराना आहे, नंतर चंद्रवंशी घराना रामराज्य. सूर्यवंशी लक्ष्मी नारायणाच्या घराण्याचे राज्य होते. जे सूर्यवंशी लक्ष्मी नारायणाच्या घराण्याचे होते,ते ८४ जन्म घेऊन आता रावणाच्या घराण्याचे बनले आहेत. प्रथम पुण्य आत्म्याच्या घराण्याचे होते, आता पाप आत्म्याच्या घराण्याचे बनले आहेत. ८४ जन्म घेतले आहे, ते तर ८४ लाख म्हणतात. आता ८४ लाखाचा कोण बसून विचार करेल, त्यामुळे कोणाचे विचार चालत नाही. आता तुम्हाला बाबांनी समजावले आहे. तुम्ही बाबांच्या समोर बसले आहात. निराकार बाबा आणि साकार बाबा दोन्ही भारतामध्ये नावाजलेले आहेत. महिमा पण करतात परंतु बाबांना जाणत नाहीत, अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेले आहेत. ज्ञानामुळे जागृती येते. प्रकाशा मध्ये मनुष्य कधी धक्के खात नाही. अंधारामध्ये धक्के खातात. भारतवासी पूज्य होते, आता पुजारी बनले आहे. लक्ष्मी नारायण पूज्य होते ना, ते कोणाची पूजा करतील. स्वतःचे चित्र बनवून स्वतःची पूजा तर नाही करणार ना. हे होऊ शकत नाही. तुम्ही मुलं जाणता आपणच पूज्य तेच पुन्हा पुजारी कसे बनतात. ह्या गोष्टी दुसरे कोणी जाणू शकत नाही. बाबाच समजवतात त्यामुळे म्हणले जाते ईश्वराची गत मत वेगळी आहे.

आता तुम्ही जाणता बाबांनी आपली गत मत संपूर्ण दुनिया पासून वेगळी बनवली आहे. संपूर्ण दुनियेमध्ये अनेक मत-मतांतर आहेत. येथे तुम्हा ब्राह्मणांची एक मत आहे. ईश्वराची मत आणि गत. गत म्हणजे सद्गती. सद्गती दाता एकच बाबा आहेत.असे म्हणतात सुध्दि सर्वांचे सद्गती दाता राम आहेत. परंतु समजत नाहीत, की राम कोणाला म्हटले जाते. असे म्हणतात जेथे पाहु तेथे रामच राम आहे. याला अज्ञान अंधकार म्हणले जाते. अंधारामध्ये दुःख आहे, प्रकाशामध्ये सुख आहे. अंधकाराचा मध्येच बोलवतात ना. प्रार्थना करणे म्हणजेच बाबांना बोलवणे, भीक मागतात ना. देवतांच्या मंदिरामध्ये जाऊन भीक मागतात ना. सतयुगा मध्ये भीक मागण्याची गरज नाही. भिकारी ला दिवाळखोर म्हणले जाते. सतयुगा मध्ये तुम्ही किती श्रीमंत होता, त्याला धनवान म्हणले जाते. भारताच दिवाळखोर आहे, हे सुध्दा कोणी समजत नाहीत. कल्पाचे आयुष्य उलट-सुलट लिहिल्या मुळे मनुष्यांना काही समजत नाही. बाबा खूप प्रेमाने बसून सजवितात. कल्पा पूर्वी सुद्धा मुलांना समजवले होते की, मज पतित-पावन पित्याला आठवण करा तर तुम्ही पवित्र बनाल. पतित कसे बनले, विकारांची खाद पडली. सर्व मनुष्य पतित बनले आहेत. आता ते पवित्र कसे बनतील? मला आठवण करा. देह अभिमान सोडून देही अभिमान बना. स्वतःला आत्मा समजा.तुम्ही आत्मा आहात नंतर शरीर धारण करता. आत्म तर अमर आहे शरीराचा मृत्यू होतो. सतयुगाला अमरलोक म्हणले जाते. कलियुगाला मृत्यूलोक म्हणतात. दुनियेमध्ये हे कोणाला माहित नाही की अमरलोक होते, नंतर मृत्यु लोक कसे बनले? अमरलोक म्हणजे अचानक मृत्यु होत नाही. तेथे आयुष्य सुध्दा मोठे असते. ती पवित्र दुनिया आहे.

तुम्ही राजऋषी आहात. ऋषी पवित्रला म्हणले जाते. तुम्हाला पवित्र कोणी बनविले? सन्यांशाना शंकराचार्य पवित्र बनवतात, तुम्हाला शिवाचार्य पवित्र बनवत आहेत. हे काही शिकलेले नाहीत, यांच्याद्वारे शिवबाबा तुम्हाला येऊन शिकवतात. शंकराचार्यांनी तर गर्भ द्वारे जन्म घेतला, ते काही वरून अवतरीत झाले नाहीत. बाबा तर यांच्या मध्ये प्रवेश करतात, येतात, जातात, मालक आहेत ना. ज्यांच्यामध्ये वाटेल त्यांच्या मध्ये प्रवेश करू शकतात. बाबांनी समजावले आहे की कोणाचे कल्याण करायचे असेल तर मी प्रवेश करतो, पतित शरीरामध्येच येतात ना. खूप जणांचे कल्याण करतात. मुलांना समजवले आहे, माया काही कमी नाही. केव्हाही माया ध्यानामध्ये प्रवेश करून उलट सुलट बोलवते, त्यामुळे मुलांना खूप सावधान राहिले पाहिजे. काही जणांमध्ये जेव्हा माया प्रवेश करते तर म्हणतात, मी शिव आहे, अमका आहे. माया खूप आसुरी आहे. समजदार मुलं चांगल्या पद्धतीने समजतील की यांच्यामध्ये कोण प्रवेश आहेत. शरीर तर त्यांचे हे कायम आहे ना. मग दुसऱ्यांचे आपण का ऐकावे, जर ऐकत असाल तर बाबांना विचारा बाबा,हे सत्य आहे की खोटे आहे? बाबा तर लगेच सांगतील. काही ब्राह्मणी सुद्धा या गोष्टीला समजू शकत नाही की, हे काय आहे. काहींमध्ये तर माया अशी प्रवेश करते की कोणी चापट सुध्दा मारतात, शिव्या सुद्धा देतात. आता बाबा थोडेच शिव्या देतील. या गोष्टींना सुध्दा काही मुलं समजू शकत नाहीत. पहिल्या नंबरचे मुलं सुद्धा विसरतात. सर्व गोष्टी विचारायला पाहिजे, कारण खूप जणांमध्ये माया प्रवेश करते,परत ध्यानामध्ये जाऊन काहीही बोलत राहतात. यामध्ये सुद्धा खूप सांभाळले पाहिजे. बाबांना पूर्ण माहिती दिली पाहिजे. यांच्या मध्ये मम्मा येते, यांच्यामध्ये बाबा येतात, या सर्व गोष्टींना सोडून बाबांची एकच आज्ञा आहे, माझीच आठवण करा. बाबांना आणि सृष्टी चक्राला आठवण करा. रचयिता आणि रचनाची आठवण करणाऱ्या मुलांचा चेहरा नेहमी हर्षित राहील. खूप जण आहेत जे आठवण करीत नाहीत. कर्मबंधन खूप मोठा आहे. बुध्दीने समजले जाते, जर बेहद्दचे बाबा भेटले आहेत, म्हणतात माझी आठवण करा, तर मग का नाही आपण आठवण करायची. काहीही झाले तरी बाबांना विचारा. बाबा समजतील कर्मभोग तर अजून राहिलेला आहे.कर्मातीत अवस्था होईल तर तुम्ही सदैव हर्षित राहाल. तोपर्यंत काही न काही होत राहील. हे सुद्धा जाणता की मिरवा (शिकार) मौत मलुका (फरिश्ते) शिकार. विनाश तर होणार आहे. तुम्ही फरिश्ता बनतात. बाकी काही दिवस या दुनिया मध्ये आहात, मग तुम्हा मुलांना ही स्थूल दुनिया भासणार नाही. सूक्ष्मवतन आणि मूळवतन भासतील. सूक्ष्मवतन वासियांना फरिश्ते म्हणले जाते. ते थोड्या वेळासाठी बनतात, जेव्हा की तुम्ही कर्मातीत अवस्थेला प्राप्त होता. सूक्ष्मवतन मध्ये हड्डी मास नसतात. हड्डी मास नाही तर बाकी काय राहिले? फक्त सूक्ष्म शरीर राहते. असे नाही की निराकारी बनता. नाही, सूक्ष्म आकार राहतो. तेथील भाषा इशाऱ्याची चालते. आत्मा आवाजा पासून दूर आहे.त्याला सूक्ष्म लोक म्हटले जाते. तेथे सूक्ष्म आवाज असतो. येथे आवाज आहे. नंतर सूक्ष्म आवाज आणि नंतर साइलेन्स(शांती). येथे आवाज आहे. हे नाटका नुसार रचलेली भूमिका आहे. तेथे शांती आहे. मग सूक्ष्म आवाज आणि नंतर आवाजाची दुनिया. या तीन लोकाला आठवण करणारे काही थोडेच आहेत. बाबा समजवतात मुलांनो, शिक्षेपासून सुटायचे असेल तर कमीत कमी ८ तास कर्मयोगी बनवून कर्म करा. ८ तास आराम करा आणि ८ तास बाबांची आठवण करा. या अभ्यासाने तुम्ही पवित्र बनाल. झोपे मध्ये काही बाबांची आठवण नसते. असं पण कोणी समजू नका की आम्ही तर बाबांची मुलं आहोत ना, मग आठवण काय करायची. नाही, बाबा तर म्हणतात, मला परमधाम मध्ये आठवण करा. स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. जोपर्यंत तुम्ही पवित्र बनत नाही तोपर्यंत घरी जाऊ शकत नाही. नाहीतर मग शिक्षा भोगून जावं लागेल. सूक्ष्मवतन, मूळवतन मध्ये सुध्दा जायचे आहे,मग स्वर्गामध्ये यायचे आहे. बाबांनी समजवले आहे, पुढे चालून वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतील, अजून तर खूप वेळ आहे. एवढी मोठी राजधानी स्थापन होणार आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ,भारतच किती आहे. आता वर्तमानपत्रां मधूनच आवाज होईल. बाबा म्हणतात, माझी आठवण करा,तर तुमचे पाप नष्ट होतील. बोलवतात कि हे पतित पावन मुक्तिदाता आम्हाला दुःखापासून सोडवा. मुले जाणतात नाटकाच्या नियमानुसार विनाश तर होणार आहे. या युद्धा नंतर मग सर्वत्र शांतीच शांती असेल, सुखधाम येईल. सृष्टीवर विनाश होईल. सतयुगा मध्ये एकच धर्म असतो. कलियुगामध्ये अनेक धर्म आहेत. हे कोणी समजू शकत नाही. सर्वप्रथम आदि सनातन देवी-देवता धर्म होता, जेव्हा सूर्यवंशी होते तेव्हा चंद्रवंशी नव्हते नंतर चंद्रवंशी येतात. नंतर हा देवी देवता धर्म प्राय: लोप होतो. नंतर मग अनेक धर्मातील आत्मे येतात. ते सुद्धा जोपर्यंत त्यांची संस्था वृद्धीला प्राप्त होत नाही तोपर्यंत माहित पडत नाही. आता तुम्ही मुलं सृष्टीच्या आदि मध्य अंतला जाणता. तुम्हाला विचारतील शिडी मध्ये फक्त भारत वासीयांना का दाखविले आहे? तर त्यांना सांगा हा खेळ भारतावर बनलेला आहे. अर्धा कल्प त्यांची भूमिका आहे, नंतर द्वापर आणि कलियुगामध्ये सर्वधर्म येतात. सृष्टीचक्रामध्ये हे संपूर्ण ज्ञान आहे. सृष्टी चक्राचे चित्र खूप चांगले आहे.सतयुग, त्रेता मध्ये श्रेष्ठाचारी दुनिया आहे. द्वापार कलियुगा मध्ये भ्रष्टाचारी दुनिया आहे. आता तुम्ही संगमयुगामध्ये आहात. या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. या चार युगाचे चक्र कसे फिरते हे कोणाला माहित नाही. सतयुगामध्ये या लक्ष्मी नारायणाचे राज्य असते. त्यांना हे थोडच माहीत असते की, सतयुगा नंतर त्रेता येणार आहे. त्रेता नंतर मग द्वापार, कलियुग येईल. येथे सुद्धा मनुष्यांना काहीच माहित नाही. जरी म्हणत असतील, परंतु चक्र कसे फिरते, हे कोणाला माहित नाही. म्हणून बाबांनी समजवले आहे गीतेवर सांगा. सत्य गीता ऐकल्याने स्वर्गवासी बनू शकता. येथे शिव बाबा स्वतः शिकवतात तेथे मनुष्य शिकवितात. गीता सुद्धा सर्वप्रथम तुम्ही वाचता. भक्ती सुद्धा पहिल्यांदा तुम्हीच करता. शिवचे पुजारी पहिल्यांदा तुम्हीच बनतात. तुम्हाला पहिल्यांदा अव्यभिचारी पूजा करायची आहे, एका शिव बाबांची. सोमनाथाचे मंदिर बनवण्याची ताकद दुसऱ्या कोणाची नाही. बोर्डावर किती प्रकारच्या गोष्टी लिहू शकता. हे सुद्धा लिहू शकता भारतवासी सत्य गीता ऐकल्याने सत्यखंडांचे मालक बनू शकता. आता तुम्ही मुले जाणता आम्ही सत्य गीता ऐकून स्वर्गवासी बनत आहोत. ज्यावेळी तुम्ही समजवता त्यावेळेस म्हणतात, होय बरोबर आहे, बाहेर गेले तर विसरून जातात. तिथल्या तिथं राहिले. अच्छा,

गोड-गोड फार-फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. रचनाकार आणि रचना चे ज्ञान स्मरण करून नेहमी हर्षित राहायचे आहे. आठवणीत द्वारे आपले सर्व जुने कर्मबंधन नष्ट करून कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे.

2. ध्यान दीदार मध्ये मायेचा खूप प्रवेश होते, त्यामुळे संभाळ करायची आहे, बाबांना बातमी देऊन सल्ला घ्यायचा आहे कोणतीही चूक करायची नाही.

वरदान:-
मुरलीधराच्या मुरली सोबत प्रेम असणारे नेहमी शक्तिशाली आत्मा भव.
 

ज्या मुलांचे शिक्षणावर म्हणजे मुरलीवर प्रेम आहे, त्यांना नेहमी शक्तिशाली भवचे वरदान प्राप्त होते. त्यांच्यासमोर कोणतेही विघ्न टिकू शकत नाही. मुरलीधरा सोबत प्रेम असणे म्हणजे त्यांच्या मुरली सोबत प्रेम असणे. जर कोणी म्हणत असेल की मुरली धरासोबत माझे खूप प्रेम आहे, परंतु मुरलीसाठी वेळ नाही, तर बाबा ऐकणार नाहीत, कारण जेथे आवड असते तेथे कोणतेही कारण येत नाही. शिक्षण आणि परिवाराचे प्रेम, किल्ला बनवतो जेथे सुरक्षित राहू शकता.

बोधवाक्य:-
प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला सहनशील बनाल तर खऱ्या सोन्या सारखे बनाल.