16-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबा आले आहेत सर्वांचे दुःख दूर करून सुख देण्यासाठी, म्हणून तुम्ही दुखहर्ताचे मुलं कोणालाही दुःख देऊ नका"

प्रश्न:-
उच्च पद मिळवणाऱ्या मुलांची मुख्य लक्षणं कोणती असतील?

उत्तर:-
(१) ते सदा श्रीमतावर चालत राहतील.
(२) ते कधी हट्ट किंवा जिद्द करणार नाहीत.
(३) स्वतःला स्वतःच राजतिलक देण्यासाठी चांगल्या प्रकारे राजयोगाचे शिक्षण घेतील.
(४) स्वतःचे कधीच नुकसान करणार नाहीत.
(५) सर्वांप्रती दयाळू आणि कल्याणकारी बनतील, त्यांना सेवेची खूप आवड असेल.
(६) कोणतेही खराब काम करणार नाहीत. भांडण इत्यादी करणार नाहीत.

गीत:-
तू रात्र घालवली झोपून, दिवस घालवला खाऊन

ओम शांती।
आत्मिक मुलं आत्मिक पित्याच्या समोर बसले आहेत. आता या भाषेला तुम्ही मुलंच समजतात, नवीन कोणी समजू शकत नाही. हे आत्मिक मुलांनो असे कधी कोणी म्हणू शकत नाही. असे कोणालाही म्हणता येणार नाही. तुम्ही जाणतात आम्ही आत्मिक पित्याच्या सन्मुख बसलो आहोत, त्यांना अर्थ सहित कोणीही जाणत नाहीत. जरी स्वतःला भाऊ भाऊ पण समजतात, आम्ही सर्व आत्मे आहोत. पिता एक आहे परंतु अर्थसाहित जाणत नाहीत. जोपर्यंत सन्मुख येऊन समजून घेत नाहीत तोपर्यंत कसे समजतील. तुम्ही जेव्हा सन्मुख येतात, तेव्हाच समजतात. तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणी आहात. तुमचे आडनाव ब्रह्मावंशी ब्रह्मकुमार-कुमारी आहे. तुम्हाला शिवकुमार व शिवकुमारी म्हणणार नाही, हे चुकीचे होते. कुमार आहात तर कुमारी पण आहात. शिवाचे तर सर्व आत्मे आहेत. कुमार कुमारी तेव्हाच म्हटले जाते जेव्हा मनुष्याचे मुलं बनतात. शिवाची मुलं तर निराकार आहेत. मुळवतन मध्ये तर सर्व आत्मे राहतात, त्यांना शाळीग्राम म्हटले जाते. येथे येतात तर, परत शारीरीक कुमार आणि कुमारी बनतात. वास्तव मध्ये तुम्हीच कुमार, शिवबाबांची मुलं आहात. कुमार-कुमारी तेव्हाच बनतात, जेव्हा शरीरामध्ये येतात. तुम्ही ब्रह्मकुमार कुमारी आहात, म्हणून भाऊ बहीण म्हणतात. आता या वेळेत तुम्हाला ज्ञान मिळाले आहे, तुम्ही जाणतात बाबा आम्हाला पावन बनवून घेऊन जातील. आत्मा जितकी बाबांची आठवण करेल, तेवढी पवित्र बनेल. आत्मे ब्रह्मा मुखा द्वारा हे ज्ञान घेत आहेत. चित्रांमध्ये पण बाबांचे ज्ञान स्पष्ट आहे. शिव बाबा आम्हाला शिकवत आहेत. न कृष्ण शिकवू शकतात, ना कृष्णा द्वारा बाबा शिकवू शकतात. कृष्ण वैकुंठाचे राजकुमार आहेत. हे पण तुम्हा मुलांना समजून सांगायचे आहे. कृष्ण तर स्वर्गामध्ये आपल्या माता पित्याचा मुलगा असेल. स्वर्गवासी पित्याचा मुलगा असेल, तो वैकुंठाचा राजकुमार आहे. त्यांना कोणीही जाणत नाहीत. कृष्ण जयंतीला आपल्या घरामध्ये कृष्णासाठी झोके बनवतात किंवा मंदिरामध्ये पाळण्यामध्ये झोका देतात. माता जाऊन गोलक मध्ये पैसे टाकतात, पूजा करतात. आजकाल तर ख्रिस्ताला पण कृष्णा सारखेच बनवतात. मुकुट इत्यादी घालून माताच्या गोदीमध्ये देतात. जसे कृष्णाला दाखवतात. आता कृष्ण आणि ख्रिस्त राशी तर एकच आहे. ते लोक कॉपी करतात, नाहीतर कृष्णाचा जन्म आणि ख्रिस्ताच्या जन्मा मध्ये खूप फरक आहे. ख्रिस्ताचा जन्म काही लहान मुलाच्या रूपामध्ये होत नाही. ख्रिस्ताची आत्मा तर कोणा मध्ये जाऊन प्रवेश करते. त्यांचा जन्म कामरुपी विषा द्वारे होत नाही. जसे त्याला कधी लहान मुलगा दाखवत नाहीत, नेहमी क्रॉस वरती दाखवतात. हे आत्ताच दाखवतात. मुलं जाणतात धर्म स्थापकाला, कोणी असे मारू शकत नाहीत, तर कोणाला मारले?ज्यांच्या मध्ये प्रवेश केला त्याला दुःख मिळाले. सतो प्रधान आत्म्याला दुःख कसे मिळू शकते?त्यांनी असे कोणते कार्य केले, त्यामुळे त्यांना दुःख मिळेल. आत्माच तमोप्रधान अवस्थांमध्ये येते. सर्वांचे कर्मभोग चुक्तू होतात. या वेळेत बाबा सर्वांना पावन बनवतात. तेथून सतोप्रधान आत्मा येऊन, दुःख भोगू शकत नाही. आत्माच दुःखी होते ना. आत्मा शरीरांमध्ये आहे, तर दुःख होते. मला दुःख आहे, असे कोणी म्हटले?या शरीरांमध्ये कोणी तरी राहणारे आहेत. ते म्हणतात, परमात्मा शरीरात आहेत, तर असे थोडेच म्हणू शकतील की, आम्हाला दुःख आहे. सर्वांमध्ये परमात्मा विराजमान आहेत, तर परमात्मा कसे दुःख भोगतील. हे तर आत्माच बोलवत राहते. हे परमपिता परमात्मा आमचे दुःख दूर करा. पारलौकिक पित्यालाच आत्मा बोलवते.

आता तुम्ही जाणतात बाबा आले आहेत आणि दुःख दूर करण्याचे उपाय सांगत आहोत. आत्मा शरीराच्या सोबतच सदा निरोगी संपत्तीवान बनते. मूळ वतन मध्ये तर निरोगी, संपत्तीवान म्हणणार नाहीत. तेथे सृष्टी थोडेच आहे. तेथे तर शांती आहे, शांती मध्ये स्थिर आहेत. आता बाबा सर्वांचे दुःख दूर करून सुख देण्यासाठी आले आहेत. तर मुलांना पण म्हणतात तुम्ही माझे बना, कोणालाही दुःख देऊ नका. हे लढाई चे मैदान आहे, परंतू गुप्त आहे. ते प्रत्यक्ष आहे. गायन आहे युद्धाच्या मैदानामध्ये मरतील तर स्वर्गामध्ये जातील, याचा अर्थ पण समजून घ्यावा लागेल. या अहिंसक लढाईचे महत्त्व खूप आहे. मुलं जाणतात त्या लढाईमध्ये मेल्यामुळे कोणी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाहीत परंतु गीतेमध्ये भगवानुवाच आहे, तर त्याला मानतात तर खरे ना. भगवंताने कोणाला म्हटले, त्या लढाई करणाऱ्यांना, की तुम्हाला? दोघांना म्हटले जाते. त्यांना पण समजावले जाते, स्वतःला आत्मा समजून शिव पित्याची आठवण करा. ही सेवा करायची आहे. आता तुम्ही स्वर्गामध्ये जाऊ इच्छितात, तर पुरुषार्थ करा. लढाईमध्ये तर सर्व धर्माचे असतात, शिख पण असतात. ते तर शिख धर्मा मध्ये जातील. स्वर्गामध्ये तर तेव्हाच येतील, जेव्हा तुम्हा ब्राह्मणांकडे येऊन ज्ञान घेतील. जसे बाबांच्या जवळ येत होते, तर बाबा समजावत होते, तुम्ही लढाई करत शिवबाबाच्या आठवणीमध्ये रहाल, तर स्वर्गामध्ये येऊ शकाल. बाकी असे नाही की स्वर्गामध्ये राजा बनाल, नाही. त्यांना जास्त समजावून पण सांगू शकत नाही, त्यांना थोडेच ज्ञान समजावले जाते. लढाईमध्ये आपल्या इष्ट दैवताची आठवण जरूर करत असतील. तर गुरुगोविंद की जय म्हणतील. असे कोणीच नाही जे स्वतःला आत्मा समजून परमात्म्याची आठवण करतील. बाकी बाबांचा परिचय घेतील, ते स्वर्गामध्ये येतील. सर्वांचा पिता तर एकच पतितपावन आहे. ते पितांना म्हणतात, माझी आठवण केल्यामुळे तुमचे पाप नष्ट होतील आणि मी जर सुखधाम स्थापन करतो, त्यामध्ये तुम्ही येऊ शकाल. लढाईमध्ये शिवबाबांची आठवण कराल, तर स्वर्गामध्ये येऊ शकाल. त्या युद्धाच्या मैदानाची गोष्ट दुसरी आहे, येथे दुसरी आहे. बाबा म्हणतात ज्ञानाचा विनाश होत नाही. शिव बाबाची मुलं तर सर्वच आहेत. आता शिवबाबा म्हणतात माझीच आठवण केल्यामुळे, तुम्ही माझ्याजवळ मुक्तीधाम मध्ये येऊ शकाल. परत जे ज्ञान शिकवले जाते, ते शिकल्यामुळे स्वर्गाची राजाई मिळेल. खूप सहज आहे. स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग तर सेकंदांमध्ये मिळतो. आम्ही आत्मा बाबांची आठवण करतो, तर लढाईच्या मैदानात खुशीने जायचे आहे. कर्म तर करायचे आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी सर्वकाही करावे लागते. स्वर्गात तर एकच धर्म असतो, मतभेदाची गोष्टच नसते. येथे तर खूप मतभेद आहेत. जमिनीसाठी, पाण्यासाठी भांडण करत राहतात. कुणाचे पाणी बंद करतात, तर दगड मारायला पण कमी करत नाहीत. एक-दोघांना धान्य देत नाहीत, तर भांडण होते. तुम्ही मुलं जाणता, आम्ही आपले स्वराज्य स्थापन करत आहोत. या राजयोगा मुळे राज्य मिळते. नवीन दुनिया जरूर स्थापन होणार आहे, याची नाटकांमध्ये नोंद आहे. तर खूप खुशी व्हायला पाहिजे. कोणत्याही गोष्टींमध्ये लढाई, भांडण कमरण्याची आवश्यकता नाही. साधारण राहयचे आहे. बाबांनी समजावले आहे, तुम्ही सासरी जातात म्हणून आता वनवाह मध्ये आहात. सर्व आत्मे जातील, शरीर तर जाणार नाही. शरीराचा अभिमान तर सोडून द्यावा लागेल. आम्ही आत्मा आहोत. ८४ जन्म पूर्ण झाले. जे पण भारतवासी आहेत, त्यांना सांगा भारत स्वर्ग होता, आता तर कलियुग आहे. कलियुगामध्ये अनेक धर्म आहेत, सतयुगा मध्ये एकच धर्म होता. भारत परत स्वर्ग बनणार आहे. असे समजतात पण भगवान आले आहेत, पुढेचालून भविष्यवाणी पण करत राहतील, वातावरण पाहतील. तर बाबा मुलांना समजवतात. बाबा तर सर्वांचे आहेत ना, त्यांच्यावर सर्वांचा अधिकार आहे. बाबा म्हणतात मी आलो आहे आणि सर्वांना म्हणतो, माझीच आठवण करा तर, तुमचे विकर्म विनाश होतील. आता तर मनुष्य समजतात, कधी पण लढाई लागू शकते, उद्या पण होऊ शकते. लढाई लागण्या मध्ये उशीर थोडाच लागतो, परंतु तुम्ही मुलं समजता, आणखी आमची राजधानी स्थापन झाली नाही, तर विनाश कसा होऊ शकेल?आणखी बाबांचा संदेश चोहुबाजूला कुठे दिला आहे. पतित-पावन बाबा म्हणतात माझी आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. हा संदेश सर्वांच्या कानात जायला पाहिजे. लढाई लागेल, बॉम्बस पण पडतील, परंतु तुम्हाला निश्चय आहे की, आमची राजधानी जरूर स्थापन होणार आहे. तोपर्यंत विनाश होऊ शकत नाही. विश्वा मध्ये शांती हवी असे म्हणतात ना. विश्वामध्ये युद्ध होईल तर विश्वाला नष्ट करु असे म्हणतात.

हे विश्व विद्यालय आहे, साऱ्या विश्वाला तुम्ही ज्ञान देत आहात. एक बाबाच येऊन संपूर्ण विश्वाला परिवर्तन करतात. ते लोक तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष म्हणतात. तुम्ही जाणतात कल्पाचे आयुष्य पूर्ण पाच हजार वर्ष आहे. असे म्हणतात ख्रिस्तपूर्व ३००० वर्ष स्वर्ग होता. इस्लामी बौद्धी इत्यादी सर्वांचा हिशोब काढतात, त्यांच्या अगोदर दुसऱ्या कोणाचे नाव नव्हते. तुम्ही तिथी तारीख सर्व सांगू शकतात. तर तुम्हाला खूप नशा राहायला पाहिजे. भांडण इत्यादीची गोष्टच नाही. तेच भांडतात जे विना धनीचे असतात. आता तुम्ही जो पुरुषार्थ कराल, २१ जन्मासाठी प्रारब्ध बनेल. भांडण-तंटा करतील तर उच्च पद मिळणार नाही आणि सजा पण खावी लागेल. कोणती पण गोष्ट आहे, काही पाहिजे, तर बाबांना सांगा. शासन पण म्हणते ना, तुम्ही कायदा आपल्या हातामध्ये घेऊ नका. कोणी म्हणतात आम्हाला परदेशी बूट पाहिजेत, बाबा म्हणतात मुलांनो आता तर तुम्ही वनवाह मध्ये आहात. तेथे तुम्हाला खूप चांगले भोजन इत्यादी मिळेल. बाबा तर बरोबर समजतात, की या गोष्टी ठीक नाहीत. येथे तुम्ही ही इच्छा का ठेवतात?येथे तर खूप साधारण राहायचे आहे, नाहीतर देहाभिमान येतो. यामध्ये आपले मत चालवायचे नाही, बाबा जे म्हणतील, आजारपण इत्यादी आहे, तर डॉक्टर इत्यादींना बोलवतात. औषधे इत्यादी द्वारे सांभाळ तर सर्वांची होते. तरीही प्रत्येक गोष्टींमध्ये बाबा आहेत. श्रीमत तर श्रीमतच आहे ना. निश्चययां मध्ये विजय आहे. ते तर सर्व काही समजतात ना. बाबाच्या मतावर चालण्या मध्येच कल्याण आहे. आपले पण कल्याण करायचे आहे. कोणाला हिरे तुल्य बनवू शकत नाही, तर स्वतःच कवडी तुल्य आहेत. हिरे तुल्य बनण्याच्या लायक नाहीत. येथे किंमत नाही, तर तेथे पण किंमत राहणार नाही. सेवाधारी मुलांना तर सेवा करण्याची खूप आवड राहते, सेवेसाठी अनेक ठिकाणी जात राहतात. सेवा करत नाही तर त्यांना दयाळू, कल्याणकारी काहीच म्हणू शकत नाही. बाबांची आठवण करत नाही तर खराब काम करत असतील. तर पद पण तसेच कनिष्ठ मिळेल. असे पण नाही आमचा तर शिवबाबाशी योग आहे. ब्रह्मकुमार कुमारी तर आहेतच ना. शिवबाबा ब्रह्मा द्वारेच ज्ञान देऊ शकतात, फक्त शिवबाबांची आठवण करतील तर मुरली कसे ऐकतील? परत परिणाम काय होईल? ज्ञान योग शिकणार नाहीत, तर कोणते पद मिळेल. हे पण जाणतात, सर्वांचे भाग्य उच्च बनू शकत नाही. स्वर्गामध्ये पण क्रमानुसार पद असतील. पवित्र तर सर्वांना बनायचे आहे. आत्मा पवित्र बनल्याशिवाय शांतीधाम मध्ये जाऊ शकत नाही.

बाबा समजवतात, तुम्ही सर्वांना हे ज्ञान ऐकवत चला, कोणी आत्ता जरी ज्ञान ऐकले नाही, तर पुढे चालून जरूर ऐकतील. जरी आता कितीही विघ्नं, वादळ जोरात आले तरी, तुम्हाला घाबरायचे नाही, कारण नवीन धर्माची स्थापना होत आहे ना. तुम्ही गुप्त राजधानी स्थापन करत आहात. बाबा सेवाधारी मुलांना पाहून खुश होतात. तुम्ही स्वतःला, स्वतःच राजतिलक द्यायचा आहे. श्रीमतावर चालायचे आहे. यामध्ये आपला हट्ट चालू शकत नाही. स्वतःचे नुकसान करायचे नाही. बाबा म्हणतात मुलांनो सेवाधारी आणि कल्याणकारी बना. विद्यार्थ्यांना शिक्षक तर म्हणतील ना, चांगल्या प्रकारे अभ्यास करा. तुम्हाला एकवीस जन्मासाठी स्वर्गाची शिष्यवृत्ती मिळत आहे. राजाई घराण्यामध्ये जाणे ही मोठी शिष्यवृत्ती आहे ना, अच्छा.

गोड गोड, फार वर्षांनंतर भेटलेल्या, मुलांप्रति मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) संगम युगामध्ये खूप साधारण राहायचे आहे, कारण ही वनवाह मध्ये राहण्याची वेळ आहे. येथे कोणतीही इच्छा ठेवायची नाही. कधी आपल्या हातामध्ये कायदा घ्यायचा नाही. भांडण इत्यादी करायचे नाही.

(२) विनाशाच्या अगोदर नवीन राजधानी स्थापन करण्यासाठी सर्वांना बाबांचा संदेश द्यायचा आहे, कि बाबा म्हणतात माझी आठवण करा तर, विकर्म विनाश होतील आणि तुम्ही पावन बनाल.

वरदान:-
बाबा द्वारे सफलतेचे तिलक प्राप्त करणारे नेहमी आज्ञाधारक हृदयासीन भव.

भाग्यविधाता बाबा रोज अमृत वेळेला आपल्या आज्ञाधारक मुलांना सफलतेचा तिलक देतात, आज्ञाकारी ब्राह्मण मुलं कधीच मेहनत किंवा कठीण शब्द मुखाद्वारे तर काय, संकल्पा मध्ये पण आणू शकत नाहीत. ते सहज योगी बनतात म्हणून कधीच दिलशिकस्त कमजोर बनू नका, परंतु नेहमी बाबांच्या हृदयासीन बना. अहंकार आणि कमजोर पणाच्या भावाला समाप्त करा.

बोधवाक्य:-
विश्व परिवर्तनाच्या तारखे बद्दल विचार करू नका, तर स्वतःच्या परिवर्तनाची वेळ निश्चित करा.