16-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बेहदचा बाबा या महफिल मध्ये,संगठन मध्ये,गरीब मुलांना दत्तक घेण्यासाठी आलेले आहेत,त्यांना देवतांच्या महफिल मध्ये येण्याची गरज नाही "

प्रश्न:-
मुलांना कोणता दिवस मोठ्या धूम धडाक्याने साजरा केला पाहिजे.

उत्तर:-
ज्या दिवशी मरजीवा जन्म झाला,बाबांच्या बद्दल निश्चय झाला. तो दिवस मोठ्या धूमधडाक्याने साजर केला पाहिजे,हीच तुमच्यासाठी जन्माष्टमी आहे,जर मरजीवा जन्मदिवस साजरा केला तर बुद्धीमध्ये आठवण राहील की, आम्ही जुन्या दुनियेचा किनारा केला. मी बाबाचा बनलो अर्थात वारशाचे अधिकारी बनलो.

गीत:-
महफिलमे जल उठी शमा

ओम शांती।
गीत,कविता,भजन, वेद--शास्त्र, उपनिषद, देवतांची महिमा इत्यादी तुम्ही भारतवासी मुले खूपच ऐकत आले आहात. आता तुम्हाला समज मिळालेली आहे की, सृष्टिचक्र कसे फिरते. भूतकाळाला पण मुलांनी जाणले आहे. वर्तमान काळ तुम्ही पहातच आहात. प्रत्यक्षात अनुभवत आहात. बाकी जे कांहीं व्हायचे आहे ते अद्याप प्रत्यक्षात अनुभवलेले नाही. पाठीमागे जे झालेले आहे याचा अनुभव घेतलेला आहे. हे बाबाच समजावतात,बाबा शिवाय कोणी समजाऊ शकणार नाही. अनेक मनुष्य आहेत परंतु ते काहीच जाणत नाहीत. रचनाकार आणि रचनेच्या आदि मध्य अंताला काहीच जाणत नाहीत. आता कलियुगाचा अंतकाळ आहे,हे सुद्धा मनुष्य जाणत नाहीत. होय,पुढे चालून जाणतील,मूळ जाणतील. बाकी सर्व ज्ञान जाणनार नाहीत. अभ्यास करणारे विद्यार्थीच जाणतात. हे आहे मनुष्यापासून राजांचे राजा बनणे. ते पण आसुरी राजा नाही, परंतू दैवी राजे. ज्यांना आसुरी राजे पुजतात. या सर्व गोष्टी तुम्ही मुलेच जाणता. विद्वान आचार्य जरा सुद्धा जाणत नाहीत. भगवान, ज्यांना शमा म्हणून बोलावतात त्यांना जाणत नाहीत. गीत गाणारे पण काहीच जाणत नाहीत,फक्त महिमा गातात. भगवान सुद्धा काही काळासाठी या दुनियेच्या महफिलमध्ये आले होते. महफिल अर्थात जिथे बरेच एकत्र जमतात. महफिल मध्ये खाणे-पिणे इत्यादी मिळते. आता या महफिलीमध्ये तुम्हाला बाबांच्याकडून ज्ञानरत्नाचा खजाना मिळत आहे किंवा असे म्हणा की आम्हाला वैकुंठाची बादशाही,बाबा कडून मिळतआहे. या साऱ्या महफिलमध्ये मुलेच बाबांना जानतात की,बाबा आम्हाला सौगात,भेट देण्यासाठी आले आहेत. बाबा महफिल मध्ये काय देतात. मनुष्य महफिल मध्ये एक दोघांना कय काय देतात, रात्रंदिवसाचा फरक आहे. बाबा जसा हलवा खाऊ घालतात आणि ते सर्वात स्वस्त वस्तू चने खाऊ घालतात. हलवा आणि चने, दोघा मध्ये खुप फर्क आहे. एक दुसऱ्याला चने खाऊ घालतात. कोणी काही कमवत नसल्यास म्हटलें जाते,हे तर चणे खात आहेत.

आता तुम्ही मुले जाणता बेहदचे बाबा आम्हाला स्वर्गातील राजाईचे वरदान देत आहेत. शिव बाबा या मैफिलमध्ये येतात ना. शिवजयंती पण साजरी करतात ना. परंतु ते येऊन काय करतात हे कोणालाच माहीत नाही,ते बाबा आहेत. बाबा जरूर खायला देतात. आई-वडील मुलांची पालना तर करतात ना. तुम्ही पण जाणता, ते मात पिता येऊन जीवनाचा सांभाळ करतात,दत्तक घेतात. मुलं स्वतः म्हणतात बाबा आम्ही १० दिवसांची मुले आहोत. अर्थात १० दिवसा पासून आपले बनलेले आहोत. तर समजायला हवे की, आम्ही आपल्याकडून स्वर्गाची बादशाही घेण्याचे हकदार बनलो आहोत,दत्तक घेतलेले आहे. दत्तक विधी अंधश्रद्धेने तर केला जात नाही ना. आई वडील सुद्धा मुलाला दत्तक देताना समजतात,आमचा मुलगा त्यांच्याजवळ जास्ती सुखी राहील आणि तेअधिक प्रेमाने सांभाळतील. तुम्ही पण लौकिक पित्याची मुले इथे बेहदच्या बाबांची गोद घेता. बेहदचे बाबा किती तरी प्रेमाने दत्तक घेतात. मुलं पण लिहितात बाबा आम्ही आपले झालो आहोत. फक्त दुरून म्हणणार नाहीत,फ्रत्यक्षात हा सोहळा केला जातो. ज्याप्रमाणे जन्मदिवस साजरा करतात. तर ही पण मुले बनतात,म्हणतात आम्ही आपले आहोत,तर ६-७ दिवसानंतर नामकरण विधी पण करायला हवा, परंतु कोणीही साजरा करत नाही. आपली जन्माष्टमी तर मोठ्या धुम धडाक्याने सादर केली पाहिजे परंतु साजरी करत नाहीत. ज्ञान पण नाही की आम्हाला जयंती साजरी करायची आहे. १२ महिने झाल्यानंतर साजरी करतात. अरे अगोदर साजरी केला नाही,१२ महिन्यानंतर का साजरी करता? ज्ञानच नाही,निश्चय पण नाही. एक वेळा जन्मदिवस साजरा केला, तर ते पक्के झाले,पुन्हा जर जन्मदिवस साजरा करण्यासाठी पळून गेला तर समजले जाइल,हे तर सोडुन गेले. जन्म दिवस तर मोठ्या धूमधडाक्याने साजरा करतात. कोणी गरीब असल्यास गुळ चने पण वाटू शकतात,जास्त पण नाही. मुलांच्या चांगले प्रकारे लक्षात येत नाही म्हणूनच खुशी आनंद होत नाही. जन्मदिन साजरा केला तर आठवणीत निश्चीत राहील परंतु ती बुद्धी नाही. आज पुन्हा एकदा बाबा समजवतात,जे जे नवीन मुलं आहेत, ज्यांना निश्चिय होतो,ते जन्मदिवस साजरा करावा. अमक्या दिवशी आम्हाला निश्चय झाला जिथून जन्माष्टमी सुरू होते. तर मुलांना पिता आणि वारसा हक्क दोन्ही पूर्ण आठवणीत ठेवले पाहिजे. मुलगा थोडेच विसरतो की, मी अमक्याचा मुलगा आहे. इथे म्हणतात बाबा आपली आठवण राहत नाही. असे अज्ञान काळात तर कधीच म्हणणार नाहीत. आठवणीत न राहण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही बाबा ची आठवण करता. बाबा तर सर्वांची आठवण करतात. सर्व आमची मुले काम चितेवर बसून जळून भस्म झाली आहेत. अशाप्रकारे दुसरे कोणी गुरु,महात्मा म्हणू शकणार नाहीत. हे भगवानुवाच आहे. ही माझी सर्व मुले आहेत. भगवंताची तर सर्वच मुले आहेत ना. सर्व आत्मे परमात्म्याची मुले आहेत. बाबा पण जेंव्हा शरिरामध्ये येतात तेंव्हा म्हणतात --हे सर्व आत्मे माझी मुले आहेत. काम चितेवर चढून भस्मीभूत तमोप्रधान झालेली आहेत. भारतवासी कितीतरी (आइरन एजेड) लोहयुगी झालेले आहेत. काम चितेवर बसून सर्व सावळे बनलेले आहेत. जे पूज्य क्रमांक जकचे गोरे होते,ते आता पुजारी सावळे बनले आहेत. सुंदर परत शाम बनतात. यह काम चितेवर चढणे म्हणजे सापावरती बसणे आहे. वैकुंठा मध्ये साप इ. असत नाहीत,जे कोणाला चावतील. ही तर गोष्टच नाही. बाबा म्हणतात ५ विकारांची प्रवेशता झाल्यामुळे तुम्ही तर जंगली काटे झाले आहात. असे म्हणतात,आम्ही मान्य करतो, हे काट्याचे जंगल आहे. एक-दोघांना डसल्यामुळे सर्वच भस्मीभूत झाले आहेत. भगवानुवाच माझी ज्ञानसागराची मुले ज्यांना मी कल्पा पूर्वी देखील येऊन स्वच्छ बनविले होते,तेच आता पतित काळे बनली आहेत. मुलांना माहित आहे की आम्ही गो-याचे काळे कसे बनतो. साऱ्या ८४ जन्माचा इतिहास भूगोल एकत्रीतपणे बुध्दीत आहे. आत्ता तुम्ही जाणता की कोणी ५-६ वर्षापासून आपले जीवन चरित्र जाणतात,तेही क्रमवार बुद्धी अनुसार. प्रत्येक जण आपल्या भूतकाळातील आत्मचरित्राला जाणतात,आम्ही काय काय वाईट काम केले. मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात, आम्ही काय काय केले. पुढील जन्माच्या गोष्टी सांगू शकत नाहीत. जन्मजन्मांतरची जीवन कहाणी तर कोणी सांगू शकणार नाही. बाकी ८४ जन्म कसे घेतात, हे बाबा बसून समजावून सांगतात. ज्यानी ८४ जन्म घेतलेले आहेत, त्याच्याच आठवणीत येईल. घरी जाण्यासाठी मी तुम्हाला मत देतो,म्हणून बाबा म्हणतात हे ज्ञान सर्व धर्मासाठी आहे. जर मुक्तीधाम घरी जायला इच्छूक असाल तर तुम्हाला बाबाच घेऊन जाऊ शकतात. एक बाबांच्या शिवाय दुसरे कोणीही घरी वापस जाऊ शकत नाही. कोणाकडे ही युक्ती नाही कोणाकडे ही युक्ती नाही, जे बाबांची आठवण करुन घरी पोहचतील. पुर्नजन्म तर सर्वांना घ्यावाच लागेल. एकख बाबा शिवाय दुसरे कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. मोक्ष मिळण्याचा विचार तर कधीच करायचा नाही. कायमची मुक्ती तर कोणालाच मिळत नाही. हे होऊ शकत नाही. हे तर पुर्वनियोजीत नाटक आहे,यामधुन कोणाचीही सुटका नाही. सर्वांचा एकच पिता,मार्गदर्शक, मुक्तीदाता आहेत, तेच येऊन युक्ती सांगतात. माझी आठवण कराल तर तुमचे विकर्म विनाश होतील,नाही तर शिक्षा भोगावी लागेल. पुरुषार्थ करत नसल्यास समजावे, हा येथील नाही. मुक्ती जीवनमुक्तीचा रस्ता तुम्ही मुले क्रमवार पुरूषार्थानुसार जाणता. प्रत्येकाची समजावण्याची गती आप आपली आहे. तुम्ही पण म्हणू शकता,ही वेळ पतित दुनियेची आहे. कितीतरी मारामारी इत्यादी होते. सत्तयुगामध्ये हे होत नाही. आत्ता कलियुग आहे. हे सर्व मनुष्य मानतील. सतयुगग त्रेता. सुवर्णयुग,चांदी,ताम्र,लोहयग. इतर भाषेमध्ये देखील दुसरी नावं ठेवलेले असतील. इंग्रजी तर सर्व जाणतात. डिक्शनरी पण इंग्रजी हिंदीची असते. इंग्रज लोक बराच काळ राज्य करून गेले. तर त्यांची इंग्रजी कामाला येते.

मनुष्य यावेळेला मानतात की आमच्यात कांहीं गुण नाहीत. बाबा आपण येऊन दया करा. पुन्हा आम्हाला पवित्र बनवा,आम्ही पतित आहोत. आता तुम्ही मुले समजता की पतित आत्मे एकही परत जाऊ शकत नाही. सर्वांनाच सतो,रजो,तमो मध्ये यावेच लागते. आता बाबा या पतीत महफिलमध्ये येतात. किती मोठी महफिल आहे. मी देवतांच्या महफिलमध्ये कधी येतच नाही. जिथे माल-ठाल, ३६ प्रकारचे भोजन मिळू शकते. तिथे मी येतच नाही. जिथे मुलांना रोटी पण मिळत नाही, त्यांच्या जवळ येवून त्यांना गोदीमध्ये घेऊन,मुलगा बनवून वारसा देतो. सावकारांना दत्तक घेत नाही. ते तर आपल्याच नशेमध्ये चूर असतात. ते स्वतःच म्हणतात की, आमच्यासाठी तर स्वर्ग इथेच आहे,मृत्यू झाल्यास म्हणतात की स्वर्गवासी झाला,तर जरूर हा नर्क झाला ना. मग तुम्ही हे समजून सांगायला हवे. आता वर्तमानपत्रा मध्ये देखील कोणी युक्तीयुक्त लिहिलेले नाही. मुलं पण जाणतात. आमच्याकडून पुर्वनियोजीत नाटक पुरुषार्थ करवून घेते. आम्ही जो पुरुषार्थ करतो,त्याची नाटकामध्ये नोंद आहे. पुरुषार्थ करणे पण जरूर आहे. नाटक म्हणून पुरुषार्थहीन बनायचे नाही. प्रत्येक गोष्टीत पुरुषार्थ केलाच पाहिजे. कर्मयोगी राजयोगी आहेत ना. ते आहेत कर्म संन्याशी हटयोगी. तुम्ही तर सर्व कांहीं करता. घरात राहून मुलांची संभाळ करतात. ते तर पळून जातात,ठीक वाटत नाही,परंतु ती पवित्रता पण भारतामध्ये पाहिजे ना. तरीदेखील ठीक आहे. आज काल पवित्र पण राहत नाहीत. असे पण नाही की, ते पवित्र दुनियेमध्ये जाऊ शकतात. एका बाबाशिवाय कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. आता तुम्ही मुले जाणता शांतीधाम आमचे घर आहे. परन्तू जाणार कसे ? भरपूर पाप कर्म केलेली आहेत. ईश्वराला सर्वव्यापी म्हणतात. अब्रू कोणाची घालवतात. ? शिवबाबाची. कुत्री, मांजरे इ. मध्ये कण कण मध्ये भगवंताला मानतात. आता तक्रार कोणाकडे करणार ? बाबा म्हणतात. मीच समर्थ आहे. माझ्याबरोबर धर्मराज पण आहे. ही सर्वांसाठी विनाशाची वेळ आहे. सर्व शिक्षा भोगून परत जाणार आहेत. वैश्विक नाटकाची रचनाच अशी आहे. शिक्षा भोगणार आहेत निश्चित. याचा साक्षात्कार पण होतो. गर्भजेलमध्ये देखील साक्षात्कार होतो. तुम्ही, ही ही कामे केली आहेत,त्याची शिक्षा मिळते. तेंव्हा म्हणतात की या जेलमधून सोडवा. आम्ही हे पाप पुन्हा नाही करणार. बाबा इथे समोर येऊन, या सर्व गोष्टी समजावितात. गर्भामध्ये शिक्षा खातात. तो पण जेल आहे. दुःख अनुभवावे लागते. तिथे सत्तयुगामध्ये दोन्ही जेल असत नाहीत. जिथे शिक्षा मिळेल.

आता बाबा समजावतात माझी आठवण कराल तर भेसळ निघून जाइल. तुमचे शब्द खूप मानतील. भगवंताचे नाव तर आहे. फक्त एक चूक केलेली आहे, शिवाच्या ऐवजी कृष्णाचे नाम लिहले आहे. आता बाबा पण मुलांना समजवितात. आता जे ऐकता ते ऐकून वृत्तपत्रात द्या. शिव बाबा या वेळेला सर्वांना म्हणतात-८४ जन्म भोगुन तमोप्रधान बनलेले आहात. आता पुन्हा मी सल्ला देतो " माझी आठवण कराल तर विकर्म विनाश होतील. " पुन्हा तुम्ही मुक्ती जीवन मुक्तिधाममध्ये जाल. बाबांचा हा आदेश आहे--माझी आठवण कराल तर पवित्र बनाल. अच्छा,मुलांना किती समजावून सांगायचे,अच्छा.

फार फार वर्षानंतर भेटलेल्या गोड-गोड मुलांना,मातपिता व बाप दादांचा स्नेहा पूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) प्रत्येक गोष्टीसाठी पुरुषार्थ केलाच पाहिजे. ड्रामा म्हणून बसून राहायचे नाही. कर्मयोगी राजयोगी बनायचं आहे. कर्म संन्याशी हटयोगी नाही.

२) शिक्षा न भोगता,बाबांच्या बरोबर घरी जाण्यासाठी बाबांच्या आठवणी मध्ये राहून आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे. सावळ्या पासून गोरा बनायचे आहे.

वरदान:-
आपल्या श्रेष्ठता द्वारा नवीनतेचा झेंडा फडकविणारे शक्तीस्वरूप भव.

आत्ता वेळेनुसार, समिपते प्रमाण शक्ती रूपाचा प्रभाव जेंव्हा दुसऱ्यावर पाडाल,तेव्हाच अंतिम प्रत्यक्षता जवळ आणू शकाल. ज्याप्रमाणे प्रेम आणि सहयोग प्रत्यक्ष केलेले आहे. अशाप्रकारे सेवेच्या दर्पणामध्ये शक्ती रूपाचा अनुभव करा. जेव्हा आपल्या श्रेष्ठतेद्वारे शक्ती रुपाच्या नवीनतेचा झेंडा फडकवाल तेंव्हा प्रत्यक्षता होईल. आपल्या शक्ती स्वरूपा द्वारे सर्वशक्तिमान बाबांचा साक्षात्कार करवा.

बोधवाक्य:-
मनसा द्वारे शक्तीचे, आणि कर्माद्वारे गुणांचे दान देणे हेच महादान आहे.