16-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्हाला संगम युगामध्ये सेवा करून गायन लायक बनायचे आहे,परत भविष्यामध्ये पुरुषोत्तम बनण्यासाठी तुम्ही पूजा लायक बनाल"

प्रश्न:-
कोणता रोग मुळापासून समाप्त होईल,तेव्हाच बाबांचे हृदयासिन बनू शकतात?

उत्तर:-
देह अभिमानाचा रोग.या देह अभिमानामुळे,सर्व विकारांनी महारोगी बनवले आहे.हा देह अभिमान जेव्हां समाप्त होईल, तेव्हाच तुम्ही बाबांच्या ह्रदयासीन बनू शकता.२) बाबांच्या मनावरती राज्य तेव्हाच कराल,जेव्हा विशाल बुद्धी बनाल,ज्ञान चिते वरती बसाल.आत्मिक सेवेमध्ये तत्पर रहा आणि वाणी सोबतच बाबांची चांगल्या प्रकरे आठवण पण करा.

गीत:-
जाग सजनिया जाग,नव युग आया की आया

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी गित ऐकले-आत्मिक पित्याने या साधारण जुन्या तनाच्या मुखाद्वारे म्हटले.बाबा म्हणतात मला जुन्या तना मध्ये जुन्या राजधानी मध्ये यावे लागते.आता ही रावणाची राजधानी आहे.तन पण दुसऱ्यांचे आहे,कारण या शरीरांमध्ये अगोदरच आत्मा आहे.मी दुसऱ्याच्या तना मध्येे प्रवेश करतो.आपले तन असते तर त्याचे नाव पडले असते.माझे नाव तर बदलत नाही.मला परत म्हणतात शिवबाबा.गीत तर मुलं दररोज ऐकतात.नवयुग म्हणजे नवीन दुनिया,सतयुग आले की आले.आत्ता कोणाला म्हणतात नवयुग आले जागे व्हा.आत्म्यांना, कारण आत्मेच अंधारामध्ये झोपलेले आहेत,काहीच समजत नाहीत.बाबांनाच जाणत नाहीत.आता बाबा जागृत करण्यासाठी आले आहेत.आता तुम्ही त्यांना जाणतात. त्यांच्याद्वारे नवीन युगामध्ये बेहद्दचे सुख मिळणार आहे.सतयुगाला नवीन म्हटले जाते आणि कलियुगाला जुने म्हटले जाते.विद्वान पंडित इत्यादी,कोणी पण जाणत नाहीत.कोणालाही विचारा नवीन युग,परत जुने कसे होते? तर कोणी सांगू शकणार नाहीत.कोणी म्हणतील ही तर लाखो वर्षाची गोष्ट आहे.आता तुम्ही जाणता आम्ही नवीन युगा मधून परत जुन्या युगा मध्ये कसे आलो,म्हणजे स्वर्गवासी पासून नर्कवासी कसे बनलो.मनुष्य तर काहीच जाणत नाहीत,ज्यांची पूजा करतात त्यांचे चरित्र पण जाणत नाहीत.जसे जगदंबाची पूजा करतात,आता अंबा कोण आहे,जाणत नाहीत.अंबा वास्तव मध्ये मातांना म्हटले जाते, परंतू पूजा तर एकाची व्हायला पाहिजे.शिवबाबांचे पण एकच अव्यभिचारी स्मृतीस्थळ आहे.अंबा पण एकच आहे,परंतू जगत अंबाला जाणत नाहीत.ही जगत अंबा आहे आणि लक्ष्मी जगतची महाराणी आहे.तुम्हाला माहिती आहे,जगत अम्बा कोण आहे आणि जगत महाराणी कोण आहे? या गोष्टीला कोणी जाणत नाहीत. लक्ष्मी ला देवी आणि जगदंबा ला ब्राह्मणी म्हणतात.ब्राह्मण संगम युगामध्येच असतात.या सगमयुगाला कोणी जाणत नाहीत.प्रजापिता ब्रह्मा द्वारे नवीन पुरुषोत्तम सृष्टीची स्थापना केली जाते.पुरुषोत्तम तुम्हाला तेथे दिसून येतील.या वेळेत तुम्ही ब्राह्मण गायन लायक आहात,सेवा करत आहात, परत तुम्ही पूजा लायक बनाल. ब्रह्माला इतक्या भुजा दिल्या आहेत तर अंबाला का देणार नाहीत.त्यांची पण सर्व मुलं आहेत ना.माता-पिता च प्रजापिता बनतात. मुलांना प्रजापिता म्हणणार नाहीत. लक्ष्मीनारायण ला कधी सतयुगा मध्ये जगत पिता,जगत माता म्हणणार नाहीत.प्रजा पित्याचे नाव प्रसिद्ध आहे.जगत पिता आणि जगत माता एकच आहेत,बाकी त्यांची मुलं आहेत.अजमेरमध्ये प्रजापिता ब्रह्माच्या मंदिरा मध्ये जाल,तर म्हणाल बाबा,कारण प्रजापिता आहेत.हद्दचे पिता मुलाची उत्पत्ती करतात,तर ते हद्दचे प्रजापिता झाले, हे तर बेहद्दचे आहेत. शिवबाबा सर्व आत्म्याचे बेहद्द चे पिता आहेत. तुम्हा मुलांना फरक लिहायचा आहे.जगदंबा सरस्वती एकच आहे, तरीही अनेक नावं ठेवली आहेत,जसे दुर्गा,काली, अंबा इत्यादी.अंबा आणि बाबांचे तुम्ही सर्व मुलं आहात.ही रचना आहे ना.प्रजापिता ब्रह्मा ची मुलगी सरस्वती आहे,त्यांना अंबा पण म्हणतात.बाकी सर्व मुलं आणि मुली आहेत.सर्व दत्तक घेतलेले आहेत.इतकी सर्व मुलं कुठून येऊ शकतात?ही सर्व मुख वंशावळ आहेत.मुखा द्वारे स्त्रीची रचना केली जाते,तर रचनाकार झाले ना.असे म्हणतात ही माझी आहे.मी यांच्याद्वारे मुलांची उत्पत्ती केली आहे. हे सर्व दत्तक घेतलेले आहेत.हे परत ईश्वरीय आहेत, मुखाद्वारे केलेली रचना आहे.आत्मे तर आहेतच,त्यांना दत्तक घेतले जात नाही.बाबा म्हणतात तुम्ही नेहमी माझी मुलं तर आहातच.तरीही आता मी येऊन प्रजापिता ब्रह्मा द्वारे,मुलांना दत्तक घेतो.आत्म्यांना दत्तक घेत नाही.मुलांना आणि मुलींना दत्तक घेतो.या खूप सूक्ष्म समजण्याच्या गोष्टी आहेत.या गोष्टींना समजल्यामुळे तुम्ही लक्ष्मीनारायण बनतात.कसे बनले, हे आम्ही समजावू शकतो.कोणते असे श्रेष्ठ काम केले,ज्यामुळे हे विश्वाचे मालक बनले.तुम्ही प्रदर्शनी इत्यादीमध्ये विचारू शकता. तुम्हाला माहित आहे की,त्यांनी ही स्वर्गाची राजधानी कशी घेतली. तुमच्यामध्ये पण अर्थ सहित प्रत्येक जण समजावू शकत नाहीत. ज्यांच्यामध्ये दैवी गुण असतील,ते आत्मिक सेवेमध्ये तत्पर राहतील. ते समजावू शकतात,बाकी तर मायेच्या रोगांमध्ये फसलेले आहेत. अनेक प्रकारचे रोग आहेत.देह अभिमानाचा पण रोग आहे.या विकाराने तुम्हाला रोगी बनवले आहे.

बाबा म्हणतात मी तुम्हाला पवित्र देवता बनवतो.तुम्ही सर्व गुण संपन्न,१६ कला संपन्न,संपूर्ण निर्विकारी,पवित्र होते.आता पतित बनले आहात.बेहद्दचे बाबा असे म्हणतात,यामध्ये निंदेची गोष्ट नाही. या समजण्याच्या गोष्टी आहेत. भारतवासींना बाबा म्हणतात,मी येथे भारतामध्येच येतो.भारताची महिमा तर अपरंपार आहे.येथे येऊन नर्काला स्वर्ग बनवतो.सर्वांना शांती देतो.बाबांची महिमा अपरंपार आहे,पारावार नाही.जगदांबा आणि त्यांच्या महिमाला कोणी जाणत नाही.त्यांचा पण फरक तुम्ही सांगू शकता.हे जगदंबा चे चरित्र,हे लक्ष्मी चे चरित्र.ही जगदंबाच परत लक्ष्मी बनते.परत लक्ष्मी ८४ जन्माच्या नंतर जगदंबा बनेल.चित्र पण वेगवेगळे ठेवायला पाहिजेत.असे दाखवतात लक्ष्मीला कलष दिला, परंतु लक्ष्मी परत संगम युगामध्ये कुठून आली?ती तर सतयुगा मध्ये असते.या सर्व गोष्टी बाबाच समजवतात.चित्र बनवण्यासाठी जे निमित्त आहेत,त्यांना विचार सागर मंथन करायला पाहिजे, ज्यामुळे समजावणे सहज होईल.इतकी विशाल बुद्धी पाहिजे, तर हृदयासीन बनू शकतात.जेव्हा बाबांची चांगल्या प्रकारे आठवण कराल, तेव्हाच मनावरती अधिराज्य कराल.असे नाही की जे खूप चांगले भाषण करतात,तेच हृदयासीन बनतात.बाबा म्हणतात, हृदयासीन तर अंतकाळात बनतील.क्रमानुसार पुरुषार्थानुसार देह अभिमान नष्ट होईल.

बाबांनी समजावले आहे,ब्रह्मज्ञानी ब्रह्ममध्ये विलीन होण्याचे कष्ट घेतात परंतु असे कोणी विलीन होऊ शकत नाहीत.बाकी कष्ट घेतात,तर उत्तम पद मिळवतात. असे महात्मा बनतात,जे त्यांना प्लॅटिनम मध्ये पण वजन करतात, कारण ब्रह्मामध्ये विलीन होण्याचे कष्ट तर करतात ना.तर कष्टाचे फळ मिळते.बाकी मुक्ती जीवनमुक्ती थोडेच मिळू शकते,नाही.आता जुनी दुनिया नष्ट झाली की झाली.हे इतके बॉम्बस ठेवण्यासाठी थोडेच बनवले आहेत?तुम्ही जाणतात,जुन्या दुनियेच्या विनाशासाठी हे बाॅम्बस कामाला येतील.अनेक प्रकारचे बॉम्बस बनवले आहेत.बाबा ज्ञानयोग शिकवतात,परत राज राजेश्वरी दुहेरी मुकुटधारी, देवी देवता बनाल. कोणते उच्च पद आहे.ब्राह्मण शेंडी सर्वात वरती आहे.शेंडी सर्वात वरती असते ना.आता तुम्हा मुलांना, पतिता पासून पावन बनवण्यासाठी बाबा आले आहेत.परत तुम्ही पण पतित-पावनी बनतात.हा नशा आहे?आम्ही सर्वांना पावन बनवून राज राजेश्वर बनवत आहोत.नशा असेल तर खूप आनंदा मध्ये राहाल.आपल्या मनाला विचारायचे आहे,आम्ही किती लोकांना आपल्यासारखे बनवतो.प्रजापिता ब्रह्मा आणि जगदंबा एक सारखे आहेत.ब्राह्मणांची रचना करतात ना.क्षुद्रा पासून ब्राह्मण बनण्याची युक्ती बाबा सांगतात.हे कोणत्या ग्रंथांमध्ये नाही.हे तर गीतेचे युग आहे.महाभारत लढाई पण बरोबर झाली होती.राजयोग एकाला शिकवला असेल का?.मनुष्याची बुद्धी मध्ये परत अर्जुन आणि कृष्णच आहेत.येथे तर अनेक मुलं राजयोग शिकत आहेत.खूप साधारण रित्‍या बसले आहेत. लहान मुलं अल्फ बे शिकतात ना.तुम्ही बसला आहात तर, तुम्हाला पण अल्फ बे शिकवत आहेत.अल्फ आणि बे हा वारसा आहे.बाबा म्हणतात,माझी आठवण करा तर,तुम्ही विश्वाचे मालक बनाल.कोणते ही आसुरी काम करायचे नाही.दैवी गुण धारण करायचे आहेत.माझ्या मध्ये कोणते अवगुण तर नाहीत,हे तपासायचे आहे.मज निर्गण मध्ये कोणते गुण नाहीत.आता निर्गुण आश्रम पण आहे परंतु अर्थ काहीच समजत नाहीत.निर्गुण म्हणजे माझ्या मध्ये कोणते गुण नाहीत. गुणवान बनवणे बाबांचे काम आहे.बाबांच्या पदवीची टोपी परत स्वतःवर ठेवतात.बाबा खूप गोष्टी समजवत राहतात,मार्गदर्शन पण करतात. जगदंबा आणि लक्ष्मी मधील आंतर लिहा.ब्रह्मा-सरस्वती संगम युगाचे आणि लक्ष्मी नारायण सतयुगाचे आहेत.चित्र समजण्यासाठी आहेत. सरस्वती ब्रह्माची मुलगी आहे. मनुष्यापासून देवता बनण्यासाठी तुम्ही शिकत आहात.आता तुम्ही ब्राह्मण आहात.सतयुगी देवता पण मनुष्यच आहेत,परंतु त्यांना देवता म्हणतात.मनुष्य म्हटल्याने जसे त्यांचा अपमान होतो,म्हणून देवी-देवता किंवा भगवान भगवती म्हणतात.राजा-राणीला भगवान भगवती म्हणले,तर परत प्रजेला पण म्हणावे लागेल,म्हणून देवी देवता म्हटले जाते.त्रिमूर्ती चे चित्र पण आहे.सतयुगा मध्ये थोडे मनुष्य आणि कलियुगामध्ये तर खूप मनुष्य आहेत.ते कसे समजायचे यासाठी पण सृष्टीचे चक्र जरूर पाहिजे.प्रदर्शनी मध्ये तुम्ही सर्वांना बोलवतात.कस्टमच्या जिल्हाधिकाऱ्यांना तर कधी कोणी निमंत्रण दिले नाही,तर असे विचार करावे लागतील.यामध्ये मोठी विशाल बुद्धी पाहिजे.

बाबांचा तर आदर करायला पाहिजे.हुसेनच्या घोड्याचा किती शृगांर करतात.पटका किती लहान असतो आणि घोडा किती मोठा असतो.आत्मा पण लहान आहे, त्यांचा शृंगार खूप मोठा आहे.हे अकालमुर्तचे आसन आहे ना.सर्वव्यापी ची गोष्ट गीते मधूनच घेतली आहे.बाबा म्हणतात मी आत्म्यांना राजयोग शिकवतो, परत सर्वव्यापी कसे होऊ शकतो.पिता, शिक्षक, गुरु सर्वव्यापी कसे होऊ शकतात.बाबा म्हणतात मी तर तुमचा पिता आहे,परत ज्ञानसागर आहे.तुम्हाला बेहद्दचा इतिहास-भूगोल समजवल्यामुळे राज्य मिळेल.दैवी गुण पण धारण करायला पाहिजेत.माया एकदम नाकाला पकडते,तर चलन खराब होते,परत मुलं लिहतात,ही चूक झाली,आम्ही काळे तोंड केले.येथे तर पवित्रता शिकवली जाते,तरीही जर कोणी विकारात जातील,परत त्यामध्ये बाबा काय करू शकतात? घरामध्ये कोणता मुलगा,काळे तोंड करतात,तर पिता म्हणतील,तू मेला असता तर चांगले झाले असते.बेहद्दचे बाबा अविनाश नाटकाला जाणतात,तरीही असेच म्हणणार तर खरे ना.तुम्ही दुसऱ्यांना ज्ञान देऊन स्वतः विकारांमध्ये जातात,तर हजारपटीने पाप लागते.असे म्हणतात मायाने चापट मारली,माया एकदम नष्ट करते.

बाबा समजवतात डोळे खूप धोकेबाज आहेत,कधीही कोणते विकर्म करायचे नाही.विकाराचे वादळ तर खूप येतील,कारण युद्धाच्या मैदानामध्ये आहात ना. माहिती पण होत नाही कि, काय झाले, काय होईल.माया लगेच चापट मारते.आता तुम्ही खूप समजदार बनले आहात.आत्मा समजदार बनते ना.आत्माच बेसमज होती.आता बाबा समजदार बनवत आहेत.अनेक जण देह अभिमानी आहेत,ते समजत नाहीत की,आम्ही आत्मा आहोत.बाबा आम्हा आत्म्यांना शिकवतात.आम्ही आत्मा या कानाद्वारे ऐकत आहोत. आता कोणतीही विकारची गोष्ट या कानाद्वारे ऐकू नका.बाबा तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात.लक्ष खूप मोठे आहे.मृत्यू जेव्हा समोर येईल,तेव्हा तुम्हाला भय वाटेल. मनुष्याला मृत्यूच्या वेळी मित्र संबंधी इत्यादी म्हणतात ना, भगवंताची आठवण करा किंवा कोणी आपल्या गुरूची आठवण करतील.देहधारीची आठवण करण्यासाठी शिकवतात.बाबा तर म्हणतात, आत्मा समजून माझी आठवण करा,हे तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे.बाबा आदेश देतात आत्मा समजून,मज निराकार पित्याची आठवण करा.देहधारीची आठवण करू नका.मात पिता पण देहधारी आहेत ना.मी तर विचित्र आहे,विदेही आहे.यांच्यामध्ये म्हणजे, ब्रह्माच्या तना मध्ये बसून तुम्हाला ज्ञान देतो.तुम्ही आत्ता ज्ञान आणि योग शिकत आहात.तुम्ही म्हणता,ज्ञानसागर बाबा द्वारे आम्ही राजराजेश्वरी बनण्यासाठी ज्ञान घेत आहोत.ज्ञानसागर ज्ञान शिकवतात, राजयोग पण शिकवतात.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) समजदार बनून मायेच्या वादळा कडून कधी हार खायची नाही. डोळे खूप धोका देतात,म्हणून आपली सांभाळ करायची आहे. कोणत्याही विकारी गोष्टी या कानाद्वारे ऐकायच्या नाहीत.

(२) आपल्या मनाला विचारायचे आहे, आम्ही किती लोकांना आपल्यासारखे बनवले आहे. मास्टर पतित पावनी बनून सर्वांना पावन, (राज राजेश्वर) बनवण्याची सेवा करत आहोत?माझ्या मध्ये कोणते अवगुण तर नाहीत? दैवी गुणांची धारणा किती केली आहे.

वरदान:-
सर्वांना ठिकाणा देणारे, दयावान बाबांचे दयाळू भव.

दयावान बाबांचे दयाळू कोणालाही भिकारी रूपामध्ये पाहतील,तर त्यांना दया येईल की, या आत्म्याला पण ठिकाणा मिळावा,यांचे पण कल्याण व्हावे.त्यांच्या संपर्क मध्ये जे पण येतील,त्यांना बाबांचा परिचय जरुर देतील.जर कोणी घरांमध्ये येतात तर,प्रथम त्याला पाणी देतात,असेच चालले जातील, तर खराब समजतात.असेच जे पण संपर्क मध्ये येतात,त्यांना बाबांच्या परिचयाचे पाणी जरुर विचारा, अर्थात दाताचे मुलं बनून त्यांना काही ना काही द्या,ज्यामुळे त्यांना ठिकाणा मिळेल.

बोधवाक्य:-
अर्थ सहित वैराग्य वृत्तीचा सहज अर्थ आहे,जितके अनासक्त तितके प्रिय.