16.11.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही या विद्यापीठाचे विद्यार्थी आहात, तुमचे काम आहे संपुर्ण विश्वाला बाबांचा संदेश देणे"

प्रश्न:-

आत्ता तुम्ही मुलं कोणती दवंडी देतात आणि कोणती गोष्ट समजावून सांगतात?

उत्तर:-

तुम्ही दवंडी देतात की, या नवीन दैवी राजधानीची परत स्थापन होत आहे. अनेक धर्माचा विनाश होणार आहे. तुम्ही सर्वांना समजावून सांगतात की, सर्व बेफ्रिक रहा. आंतरराष्ट्रीय गोंधळ चालू आहे, लढाई जरूर लागणार आहे. यानंतर दैवी राजधानी येईल.

ओम शांती:- हे आत्मिक विद्यापीठ आहे. संपूर्ण विश्वाचे जे पण आत्मे आहेत, विद्यापीठांमध्ये आत्मेच शिक्षण घेतात. आता कायद्यानुसार विद्यापीठ अक्षर तुम्हा मुलांचे आहे. हे आत्मिक विद्यापीठ आहे, शारीरिक विद्यापीठ नसते. हे एकच ईश्वरीय पित्याचे विद्यापीठ आहे. सर्वांना धडा मिळतो, तुमचा हा संदेश कोणत्या ना कोणत्या प्रकारे सर्वांपर्यंत जरूर पोहचायला पाहिजे. संदेश द्यायचा आहे आणि हा संदेश देणे खूपच सहज आहे. मुलं जाणतात, ते आमचे बेहद्द चे पिता आहेत. त्यांची सर्व आठवण करतात. असे पण म्हणाल ते आमचे बेहद्दचे साजन आहेत. जे पण विश्वा मध्ये जीवात्मा आहेत, त्या साजनाची आठवण जरूर करतात. या ज्ञानाच्या गोष्टी चांगल्या रीतीने धारण करायच्या आहेत. ज्यांची बुद्धी चांगली आहे, ते चांगल्या रीतीने धारण करू शकतात. विश्वामध्ये जे पण आत्मे आहेत त्या सर्वांचे पिता एकच आहेत. विद्यापीठांमध्ये तर मनुष्य शिक्षण घेतात. आता तुम्ही मुलं जाणतात, आम्ही ८४ जन्म घेतो. ८४ लाख जन्माची तर गोष्टच नाही. विश्वामध्ये जे पण आत्मा आहेत, यावेळेस सर्व पतित आहेत. ही दुनिया दुःखी आत्म्यीच आहे. त्या सुखधाम मध्ये घेऊन जाणारे एक बाबाच आहेत, त्यांनाच मुक्तिदाता पण म्हटले जाते. तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनतात ना. बाबा सर्वासाठी म्हणतात, हा संदेश द्या. बाबांची आठवण करतात, त्यांना मार्गदर्शक, मुक्तिदाता, दयावान पण म्हणतात. अनेक भाषा आहेत ना. सर्व आत्मे एकालाच बोलवतात, तेच संपूर्ण विश्वाचे शिक्षक पण झाले. पिता तर आहेतच परंतु हे कोणालाही माहिती नाही की, ते आम्हा सर्व आत्म्यांचे शिक्षक आहेत, गुरु पण आहेत. सर्वांना मार्गदर्शन देतात, मार्गदर्शकाला फक्त तुम्ही मुलंच जाणतात. तुम्हा ब्राह्मणां शिवाय दुसरे कोणी जाणत नाहीत. आत्म्याला पण तुम्ही जाणले आहे, की आत्मा काय गोष्ट आहे. दुनिया मध्ये तर एक पण मनुष्य नाही, खास भारत बाकी सर्व दुनिये मध्ये कोणालाही माहिती नाही की, आत्मा काय गोष्ट आहे. जरी म्हणतात भुकटीच्या मध्ये चमकतो अजब सितारा, परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. आता तुम्ही जाणतात, आत्मा तर अविनाशी आहे. ती कधी लहान-मोठी होत नाही. जशी तुमची आत्मा आहे, बाबा पण बिंदू आहेत, लहान-मोठे नाहीत. ती पण आत्मा आहे, फक्त परम आत्मा आहे, सर्वोच्च आहे. बरोबर सर्व आत्मे परमधाम मध्ये राहणारे आहेत. येथे भूमिका करण्यासाठी येतात. परत आपल्या परमधामला जाण्यासाठी प्रयत्न करतात. परमपिता परमात्माची सर्व आठवण करतात, कारण आत्म्यांना मुक्ती मध्ये पाठवले होते, तर त्यांची आठवण करत राहतात. आत्माच तमोप्रधान बनली आहे. आठवण का करतात, ते पण माहित नाही‌?जसे मुलगा म्हणतो बाबा, बस त्याला काहीच माहिती होत नाही. तुम्ही पण बाबा म्हणतात, जाणत काहीच नाहीत. भारतामध्ये एकच राष्ट्रीयत्व होते, त्यांना दैवी राष्ट्रीयत्व म्हटले जाते, नंतर दुसरे पण येतात. आता तर असंख्य झाले आहेत, म्हणून भांडण इत्यादी होत राहतात. जेथे तेथे घुसले आहेत, त्यांना तेथून काढून टाकण्याचा प्रयत्न करतात, खूप भांडण करत राहतात. अज्ञानाचा अंधकार पण खूप आहे. काही तरी मर्यादित संख्या पण व्हायला पाहिजे ना. कलाकारांची पण मर्यादा असते‌. हा पण पूर्वनियोजित खेळ आहे. यामध्ये जितके कलाकार आहेत, त्यापेक्षा कमी जास्त होऊ शकत नाहीत. जेव्हा सर्व कलाकार रंगमंचावर येतात, परत त्यांना वापस जायचे आहे. जे पण कलाकार राहिले आहेत, ते पण येत राहतील. नियंत्रण करण्यासाठी माथा मारत राहतात, परंतु करू शकत नाहीत. तुम्ही सांगा आम्ही ब्रह्मकुमार कुमारी, असे परिवार नियोजन करतो, जे संपूर्ण विश्वामध्ये नऊ लाख लोकसंख्याच राहील, परत लोकसंख्या कमी होईल. आम्ही आपल्याला सत्य गोष्टी सांगत आहोत, आता स्थापना होत आहे. नवीन दुनिया, नवीन झाड जरूर लहान असेल. येथे तर नियंत्रण करू शकत नाहीत, कारण तमोप्रधानता वाढतच जाते, वृद्धी होत जाते. कलाकार जे पण येथे येणारे आहेत, येथे येऊनच शरीर धारण करतील. या गोष्टींना कोणी समजत नाहीत. हुशार मुलं च समजतील. राजधानीमध्ये तर प्रत्येक प्रकारचे कलाकार असतात. सतयुगा मध्ये जी राजधानी होती, त्याची परत स्थापना होत आहे. परिवर्तन होत जाईल. तुम्ही आता तमोप्रधान पासून सतोप्रधान वर्गामध्ये परिवर्तन होतात. जुन्या दुनिये पासून नवीन दुनिया मध्ये जातात. तुमचे हे शिक्षण या दुनिया साठी नाही. असे विद्यापीठ दुसरे कोणते होऊ शकत नाही. ईश्वरीय पिता म्हणतात, मी तुम्हाला अमर लोकसाठी शिकवत आहे. हा मृत्युलोक नष्ट होणार आहे. सतयुगा मध्ये या लक्ष्मीनारायणची राजधानी होती. ही स्थापना कशी झाली, हे कोणालाही माहिती नाही. बाबा नेहमी म्हणतात, जेथे तुम्ही भाषण करतात तर लक्ष्मीनारायण चे चित्र जरूर ठेवा. यामध्ये तारीख पण जरूर लिहिलेली असावी. तुम्ही समजावू शकता की, नवीन विश्वाच्या सुरुवाती पासून१२५० वर्षापर्यंत यांचे राज्य होते. जसे म्हणतात क्रिश्चनांचे राज्य होते, एक दोघांच्या नंतर येत राहतात. तर जेव्हा या देवता घराण्याचे राज्य होते, तर दुसरी कोणतीच राजाई नव्हती. आता परत दैवी घराण्याची दैवी राजधानी स्थापन होत आहे, बाकी सर्वांचा विनाश होईल. लढाई पण समोर आहे. भागवत इत्यादी मध्ये पण अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. लहानपणी या गोष्टी ऐकत राहतात. आता तुम्ही जाणतात, ही राजाई कशी स्थापन होते. जरूर बाबांनीच राजयोग शिकवला असेल, जे पास होतात, ते विजयी माळेचा दाणा बनतात, दुसरे कोणी या माळेला जाणत नाहीत, तुम्हीच जाणतात. हा तुमचा प्रवृत्ती मार्ग आहे, वरती बाबा उभे आहेत, त्यांना स्वतःचे शरीर नाही. परत ब्रह्मा-सरस्वतीच लक्ष्मीनारायण बनतात. प्रथम पिता पाहिजेत, नंतर जोडी. रुद्राक्षाचे मणी पण असतात ना. नेपाळमध्ये वृक्ष आहे तेथून रुद्राक्षाचे मणी घेऊन येतात, त्यामध्ये खरे पण असतात. जितके लहान तेवढी किंमत जास्त असते. आता तुम्ही त्याच्या अर्थाला समजले आहात. ही विष्णूची विजय माळ किंवा रुंड माळ बनते. ते लोक तर फक्त माळ जपत, राम-राम करत राहतात. अर्थ काहीच समजत नाहीत. माळेचा जप करतात. येथे तर बाबा म्हणतात, माझी आठवण करा. हा अजपाजाप आहे, मुखाद्वारे काहीच बोलायचे नाही. गीत पण स्थूल होते, मुलांना तर फक्त बाबांची आठवण करायची आहे. नाहीतर गीत इत्यादी आठवण येत राहतात. येथे मुख्य गोष्ट आठवणीची आहे. तुम्हाला आवाजापासून दूर जायचे आहे. बाबांच्या सूचना आहेत. बाबा थोडेच म्हणतात, गीत गा, आवाज करा. माझ्या महिमाचे गायन करण्याची पण आवश्यकता नाही. येथे तर तुम्ही जाणतात, ते ज्ञानाचे सागर, सुख शांतीचे सागर आहेत. श्रीमतानुसार मनुष्य जाणत नाहीत, असेच गायन करतात. तुमच्या शिवाय कोणीही जाणत नाहीत. बाबाच आपले नाव रूप इत्यादी सांगतात की, मी कसा आहे, तुम्ही आत्मा कसे आहात. तुम्ही भूमिका वठवण्यासाठी खूप कष्ट करतात. अर्धा कल्प भक्ती केली आहे, मी तर अशी भूमिका वठवत नाही. मी सुखदुःखा पासून वेगळा आहे. तुम्ही दुःख परत तुम्हीच सुख सतयुगा मध्ये भोगतात. तुमची भूमिका माझ्यापेक्षा उच्च आहे. मी तर अर्धा कल्प तेथेच आरामशीर वानप्रस्थ मध्ये बसून राहतो. तुम्ही मला बोलवत राहतात. असे नाही की मी तेथे बसून तुमचे पुकार ऐकतो. माझी भूमिका या वेळेतील आहे, या नाटकातील भूमिकेला मी जाणतो. आता हे नाटक पूर्ण झाले आहे, मलाच जाऊन पतितांना पावन बनवण्याची भूमिका वठवायची आहे. दुसरी कोणतीच गोष्ट नाही. मनुष्य समजतात परमात्मा सर्वशक्तिमान आहे, अंतर्यामी आहे, सर्वांच्या मनामध्ये काय काय चालते ते जाणतात. बाबा म्हणतात असे नाही, तुम्ही जेव्हा अगदी तमोप्रधान बनतात, तेव्हा अचूक वेळेत मला यावे लागते. साधारण तना मध्ये येऊन, तुम्हा मुलांना दुःखापासून सोडवतो. एका धर्माची स्थापना ब्रह्मा द्वारे, अनेक धर्माचा विनाश शंकरा द्वारे. . . हाहाकार नंतर जयजयकार होईल. खूप हाहाकार होईल, संकटांमध्ये मरत राहतील. नैसर्गिक आपत्तीची पण खूप मदत होत राहते, नाही तर मनुष्य खूप रोगी दुःख होतील. बाबा म्हणतात मुलं दुःखी होऊ नये, यासाठी नैसर्गिक आपत्ती पण खूप होतात, जे सर्वांना नष्ट करतात. बाॅम्बस तर काहीच नाहीत. नैसर्गिक आपत्ती खूप मदत करते. भूकंपा मध्ये असंख्य नष्ट होतात. पाण्याच्या लाटा आल्या की सर्व नष्ट होईल. समुद्राला पण खूप भरती येईल, धरतीला हप करेल, १०० फूट समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली, तर काय होईल. हे हाहाकार चे दृष्य आहेत. असे दृश्य पाहण्यासाठी पण हिम्मत पाहिजे. कष्ट पण करायचे आहेत. निर्भय पण बनायचे आहे. तुम्हा मुलांमध्ये बिलकुल अहंकार असायला नको. देही अभिमानी बना. देहीअभिमानी राहणारे खूप गोड असतात. बाबा म्हणतात मी तर निराकार आणि विचित्र आहे. येथे सेवा करण्यासाठी येतो. माझी महिमा खूप करत राहतात. ज्ञानाचे सागर, सुख शांतीचे सागर . . हे बाबा आणि परत म्हणतात पतित दुनिया मध्ये या. निमंत्रण तर खूप चांगले देतात. असे पण म्हणत नाही कि, स्वर्गामध्ये येऊन सुख तर पहा. असे म्हणतात, हे पतित पावन-आम्ही पतित आहोत, आम्हाला पावन बनवण्यासाठी या. निमंत्रण पण पहा कसे आहे. एकदम पतित दुनिया आणि पतित शरीरामध्ये बोलवतात. भारत वासी खूप चांगले निमंत्रण देतात. वैश्विक नाटकांमधील रहस्य असे आहे. यांना पण काहीच माहिती नव्हते की, माझा अनेक जन्मातील अंतिम जन्म आहे.

बाबांनी प्रवेश केला आहे, तेव्हा तर सांगतात. बाबांनी प्रत्येक गोष्टीचे रहस्य समजवले आहे. ब्रह्मालाच पत्नी बनवायचे आहे. बाबा स्वत: म्हणतात, ही माझी पत्नी आहे. मी यांच्यामध्ये प्रवेश करून, यांच्याद्वारे तुम्हाला आपले बनवतो. ही खरीखुरी मोठी माता झाली, आणि ती दत्तक आहे. मात पिता तुम्ही यांना म्हणू शकता. शिवबाबा ना फक्त पिताच म्हणू शकता. हे ब्रह्मा बाबा आहेत, माता गुप्त आहे. ब्रह्मा माता आहे परंतु तन पुरुषाचे आहे. हे तर सांभाळ करू शकत नाही, म्हणून मुलीला दत्तक घेतले आहे, आणि तिचे नाव मातेश्वरी ठेवले आहे. मुख्य झाली ना. वैश्विक नाटका नुसार एकच सरस्वती आहे, बाकी दुर्गा काली इत्यादी अनेक नावं आहेत. मात-पिता तर एकच असतात ना. तुम्ही सर्व मुल आहात, गायन पण आहे ब्रह्माची मुलगी सरस्वती. तुम्ही ब्रह्मकुमार कुमारी आहात ना. तुमच्यावरती अनेक नावं आहेत. या सर्व गोष्टी तुमच्यामध्ये पण क्रमानुसार समजतील. अभ्यासामध्ये क्रमानुसार असतात ना. एक दुसऱ्याशी मिळू शकत नाही. ही राजधानी स्थापन होत आहे. हे पूर्वनियोजित नाटक आहे, याला विस्ताराने समजायचे आहे. अनेक ज्ञानाच्या गोष्टी आहेत. कायद्याचा अभ्यास करतात तर त्यांच्यामध्ये पण क्रमानुसार असतात. कोणी वकील दोन तीन लाख रुपये कमावतात, काहींना पाहा, तर कोट पण फाटलेला असतो. यामध्ये पण असेच आहे. तुम्हा मुलांना समजवले आहे की, ही आंतरराष्ट्रीय गोंधळ चालू आहे. आता तुम्ही समजवता की बेफिक्र राहा. लढाई तर जरुर लागणार आहे. तुम्ही दवंडी देतात की, नवीन दैवी राजधानी स्थापना होत आहे. अनेक धर्माचा विनाश होतो. खूप स्पष्ट आहे. प्रजापिता ब्रह्मा द्वारे प्रजेची रचना केली जाते. असे म्हणतात ही माझी मुख वंशावळ आहे. तुम्ही मुख वंशावळ ब्राह्मण आहात. ते कुख वंशावळ ब्राह्मण आहेत. ते पुजारी, तुम्ही आता पूज्य बनत आहात. तुम्ही जाणता आम्हीच देवता, पूजन लायक बनत आहोत. तुमच्यावरती प्रकाशाचा ताज नाही. तुमची आत्मा जेव्हा पवित्र बनेल, तेव्हा हे शरीर सोडून देईल. ह्या शरीरावरती तुम्हाला प्रकाशाचा ताज देऊ शकत नाही, शोभणार पण नाही. आमची आत्मा जेव्हा पवित्र बनेल, तेव्हा हे शरीर सोडून देईल. या शरीरावरती तुम्हाला प्रकाशाचा त्रास देऊ शकत नाही. या वेळेत तुम्ही गायन लायक आहात. या वेळेत कोणते आत्मे पवित्र नाहीत, म्हणून कोणाच्या वरती प्रकाशाचा ताज देऊ शकत नाही. प्रकाशाचा ताज सतयुगामध्ये असतो. दोन

कला कमी असणाऱ्यांना पण ताज द्यायला नाही पाहिजे, अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. (१) आपली स्थिती अशी अचल आणि निर्भय बनवायची आहे, जे अंतिम विनाशाचे दृश्य पाहू शकू. देही अभिमानी बनण्यासाठी कष्ट घ्यायचे आहेत.
  2. (२) नवीन राजधानीमध्ये उच्च पद मिळवण्यासाठी राजयोगाच्या अभ्यासावरती पूर्ण लक्ष द्यायचे आहे. पास होऊन विजय माळेचा मणी बनायचे आहे.

वरदान:-

निर्बल, संभ्रमित, असमर्थ आत्म्याला जास्तीत जास्त बळ देणारे आत्मिक दयावान भव.

जे आत्मिक दयावान मुलं आहेत, ते महादानी बनून, अगदीच निराशवादी आत्म्या मध्ये पण आशा निर्माण करतात. निर्बल ला बलवान बनवतात. दान नेहमी गरिबाला, सहारा नसलेल्या आत्म्याला दिले जाते. तर जे निर्बल, असमर्थ, संभ्रमित, प्रजा बनणारे आत्मे आहेत, त्यांच्याप्रती आत्मिक दयावान बनून, महादानी बना. आपसमध्ये एक दुसऱ्याच्या प्रति महादानी नाही. ते तर सहयोगी सोबती आहेत, भाऊ भाऊ आहेत, समवयस्क पुरुषार्थी आहेत. सहयोग द्या, दान नाही.

बोधवाक्य:-

नेहमी एक बाबांच्या श्रेष्ठ संगती मध्ये या, तर दुसऱ्या कोणाच्या संगतीच्या रंगाचा प्रभाव पडू शकणार नाही.

||| ओम शांती |||

ओम शांती.