17-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो- प्रित आणि विपरीत हे प्रवृत्ती मार्गाचे अक्षर आहेत, आता तुमचे प्रेम एका बाबांसोबत आहे, तुम्ही मुलं नेहमी बाबांच्या आठवणीमध्ये राहतात".

प्रश्न:-
आठवणीच्या यात्रेला दुसरे कोणते नाव देता येईल?

उत्तर:-
आठवणीची यात्रा, प्रेमाची यात्रा आहे. विपरीत बुद्धी असणारे नावा-रूपामध्ये फसतात.त्यांची बुद्धी तमोप्रधान होते. ज्यांचे प्रेम एका बाबांवर आहे ते ज्ञानाचे दान देत राहतील. कोणत्याही देहधारी सोबत त्यांचे प्रेम होऊ शकत नाही.

गीत:-
ही पुरुषार्थ करण्याची वेळ निघून चालली आहे..

ओम शांती।
बाबा मुलांना समजवतात, आता याला आठवणीची यात्रा पण म्हणता येईल, आणि प्रेमाची यात्रा पण म्हणता येईल. मनुष्य तर त्या तीर्थयात्रेला जातात, ही तर त्यांची रचना आहे त्या यात्रेला जातात, वेग वेगळी रचना आहेना. रचनाकाराला तर कोणीच जाणत नाही.आता तुम्ही रचनाकार बाबांना ओळखता. त्यांच्या आठवणी मध्ये कधी थांबायचे नाही. तुम्हाला आठवणीची यात्रा मिळालेली आहे. याला आठवणीची यात्रा किंवा प्रेमाची यात्रा म्हणले जाते. ज्यांचे जेवढे प्रेम असेल ते आठवणीची यात्रा पण तेवढीच चांगली करतील. जेवढे प्रेमाने आठवणीच्या यात्रेमध्ये राहतील, तेवढे पवित्र सुध्दा बनतील. शिव भगवानूवाच आहे ना. विनाशकाले विपरीत बुद्धी आणि विनाशकाले प्रीत बुद्धी. तुम्ही मुलं जाणता आता विनाशकाळ आहे.हा गीता भाग चालत आहे. बाबांनी श्रीकृष्णाची गीता आणि त्रिमूर्ती शिवाची गीता यांच्यातील फरक सांगितला आहे. आता गीतेचे भगवान कोण? परमपिता शिव भगवानवुवाच. फक्त शिव अक्षर लिहायचे नाही, कारण की शिव नाव खूप जणांचे असते त्यामुळे परमपिता परमात्मा लिहिल्याने ते सुप्रीम सिद्ध होतात. परमपिता तर कोणी स्वतःला म्हणू शकत नाही. संन्यासी लोक तर शिवोहम म्हणतात, ते तर बाबांच्या आठवण सुद्धा करू शकत नाहीत.बाबांना ओळखतच नाहीत. बाबां सोबत प्रितच नाही. प्रित आणि विप्रित हे प्रवृत्ती मार्गासाठी आहे. काही मुलांची बाबां सोबत प्रीत बुद्धी आहे, तर काही मुलांची विपरीत बुद्धी पण असते. तुमच्यामध्ये पण असे आहेत. बाबांसोबत प्रेम त्यांचे आहे, जे बाबांच्या सेवेमध्ये तत्पर आहेत. बाबांशिवाय अजून कोणावर प्रीत नाही. शिवबाबांना म्हणतात, बाबा आम्ही तर तुमचे च मदतगार आहोत. ब्रह्माचा यामध्ये संबंध नाही. शिव बाबां सोबत ज्या आत्म्यांचे प्रेम असेल तर ते जरुर मदतगार असतील. शिव बाबां सोबत ते सेवा करत राहतील. प्रित नाही तर विपरीत बनतात, विपरीत बुध्दी विनशंती. ज्यांचे बाबांसोबत प्रेम असेल तर मदतगार पण बनतील. जेवढे प्रेम तेवढे सेवेमध्ये मदतगार बनतील. आठवणच करत नाही म्हणजे प्रेम नाही. मग देहधारी सोबत प्रेम राहते. मनुष्य मनुष्यांना आपल्या आठवणीच्या गोष्टी देतात ना. त्यांची जरूर आठवण येते.

आता तुम्हा मुलांना बाबा अविनाश ज्ञान रत्नांची भेट देतात, ज्यामुळे तुम्ही राजाई प्राप्त करता. अविनाश ज्ञान रत्नांचे दान करता म्हणजे प्रित बुद्धी आहे. जाणतात की बाबा सर्वांचे कल्याण करण्यासाठी आले आहेत, आम्हाला सुद्धा मदतगार बनले पाहिजे. अशी प्रीत बुद्धी विजयंती होतात. जे आठवणच करत नाही ते प्रित बुद्धी पण नाहीत. बाबांसोबत प्रेम असेल, आठवण करतील तर विकर्म विनाश होतील आणि दुसऱ्यांना सुद्धा कल्याणाचा मार्ग दाखवतील. तुम्हा ब्राह्मण मुलांमध्ये सुध्दा प्रित आणि विपरीत वरती आधार आहे. बाबांना जे जास्त आठवण करतात ते प्रित बुद्धी आहेत. बाबा म्हणतात, मला सतत आठवण करा, माझ्या कार्यात मदतगार बना. रचनेला एका बाबांचीच आठवण राहिली पाहिजे. कोणत्याच रचनेची आठवण करायची नाही. दुनियेमध्ये रचनकाराला कोणी ओळखत नाही, न आठवण करतात. संन्यासी सुध्दा ब्रह्माची आठवण करतात, ती पण रचना आहे. रचनाकार तर सर्वांचा एकच आहे,आणि ज्या पण गोष्टी या डोळ्यांनी पाहता, त्या तर सर्व रचना आहे. जे दिसू शकत नाही ते रचनाकार बाबा आहेत. ब्रम्हा विष्णु शंकर चे पण चित्र आहेत. ती पण रचना आहे. बाबांनी जे चित्र बनविण्यासाठी सांगितले आहे, वर परमपिता परमात्मा त्रिमूर्ती शिव भगवानवुवाच लिहायचे आहे. जरी कोणी स्वतःला ईश्वर म्हणतील परंतु परमपिता म्हणू शकत नाही. तुमचा बुद्धीयोग शिव बाबांसोबत आहे, शरीरासोबत नाही. बाबांनी समजवले आहे, स्वतःला अशरीरी आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. प्रित आणि विपरीतचा संपूर्ण आधार सेवेवर आहे. खूप प्रेम असेल तर बाबांची सेवा पण चांगली करतील, तेव्हा विजयंती म्हणता येईल. प्रेम नाहीतर सेवा पण नाही करणार. मग पद सुद्धा कमी मिळेल. कमी पदाला म्हटले जाते उंच पदा मधून विनशंती. तसे तर विनाश सर्वांचा होणार आहे, परंतु हे खास प्रित आणि विपरितच्या गोष्टी आहेत. रचनाकार बाबा तर एकच आहेत, त्यांना शिव परमात्माए नमः म्हणतात. शिवजयंती पण साजरी करतात ना. शंकर जयंती कधी ऐकले नाही. प्रजापिता ब्रम्हाची महिमा सुध्दा आहे, विष्णूची जयंती साजरी करीत नाहीत, कृष्णाची जयंती साजरी करतात. हे कोणाला माहीत नाही कृष्ण आणि विष्णू मध्ये काय फरक आहे? मनुष्यांची विनाशकाले विपरीत बुध्दी आहे, तर तुमच्या मध्येही प्रीत आणि विपरीत बुध्दी आहेत ना. बाबा म्हणतात, तुमचा हा आत्मिक धंदा खूप छान आहे. सकाळी आणि संध्याकाळी या ईश्वरीय सेवेमध्ये वेळ द्या. संध्याकाळी सहा ते सात ची वेळ चांगली म्हणतात. सत्संग वगैरे संध्याकाळी आणि सकाळी करतात. रात्रीचे वातावरण हे तामसिक असते. रात्री आत्मा स्वतः शांती मध्ये लीन होते, ज्याला झोप असे म्हणतात. मग सकाळी ती जागृत होते. असे म्हणले जाते राम सिमर प्रभात मोरे मन... आता बाबा मुलांना म्हणतात, मज पित्याला आठवण करा. शुभ बाबा शरीरामध्ये प्रवेश करतात त्याच वेळेस म्हणू शकतात की, माझी आठवण केल्याने विकर्म विनाश होतील. तुम्ही मुले जाणत, की आपण बाबांना किती आठवण करतो, आणि किती सेवा करतो. सर्वांना हाच परिचय द्यायचा आहे, स्वतःला आत्म समजून बाबांची आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनाल. कचरा निघून जाईल. प्रित बुद्धीमध्ये सुद्धा टक्केवारी आहे. बाबांशी प्रीत नाही, याचा अर्थ जरूर देह किंवा देह संबंधांमध्ये प्रीत आहे. बाबांशी प्रीत असेल तर सेवेमध्ये लागतील. बाबांसोबत प्रेम नाही तर सेवेमध्ये सुध्दा लागणार नाही. प्रत्येकाला फक्त अल्हा आणि बादशही याचे रहस्य समजवणे खुप सहज आहे. हे परमात्मा, हे भगवान, असे म्हणून आठवण करतात परंतु बिलकुल ओळखत नाही. बाबांनी सांगितलेले आहे की प्रत्येक चित्राच्या वरती परमपिता त्रिमूर्ती शिव भगवानुवाच जरूर लिहायचे आहे. आता तुम्ही मुलं देवी-देवता धर्माचे कलम लावत आहात. सर्वांना हा मार्ग सांगा, बाबांकडून येऊन वारसा घ्या. बाबांना ओळखत नाही त्यामुळे प्रित बुद्धी नाहीत. पाप वाढता वाढता एकदम तमोप्रधान बनले आहेत. बाबांसोबत त्यांची प्रीत असेल ते बाबांना खुप आठवण करतात. त्यांची बुध्दी सोन्यासारखी असेल. जर दुसरीकडे बुद्धी भटकत असेल, तर तमोप्रधानच राहणार. जरी समोर बसले असतील परंतु प्रित बुध्दी नाही, कारण आठवणच करत नाहीत. प्रित बुध्दीची निशाणी आठवण आहे, ते धारणा सुध्दा करतील. सर्वांवर दया करतील. की तुम्हीही बाबांची आठवण करा तर पवित्र बनाल. हे समजविने अती सहज आहे. बाबा स्वर्गाच्या बादशाही चा वारसा मुलांना देतात. जरूर शिव बाबा आले होते म्हणून शिवजयंती साजरी करतात. कृष्ण राम इत्यादी हेसुद्धा येऊन गेले, त्यामुळे त्यांची जयंती साजरी करतात ना. बाबाची आठवण करतात कारण बाबा वारसा देतात. नवीन कोणी या गोष्टीना समजू शकत नाही. ईश्वर कसे येऊन वारसा देतात. बिलकुल दगडा समान बुद्धी आहे. आठवण करण्याची बुद्धी नाही. बाबा स्वतः सांगतात कि तुम्ही अर्ध्या कल्पाचे माझे आशिक आहात. भक्ती मार्गात तुम्ही खूप धक्के खाल्लेत. परंतु भगवान काही कोणास भेटू शकले नाही. आता तुम्हाला समजलं आहे कि भारत देशात भगवंत आले होते आणि मुक्ती जीवनमुक्ती चा मार्ग सांगितला होता. परमात्मा बरोबर बुध्दीची प्रित कशी जुटेल.. ते बाबा सांगत आहेत. येतात ही भारत देशी. तुम्ही मुलं समजू शकता कि उच्चं ते उच्च एक भगवान आहे. ज्यांना शिव.. म्हंटल जाते. म्हणून लिहिले जाते कि शिव जयंती ही हिरेतुल्य आहे. बाकी कौडी तुल्य.. पण असं लिहिले तर मनुष्य बिगडू शकतो. म्हणून चित्रात जर शिव भगवानुवाच.. असं लिहिले तर तुम्ही सुरक्षित राहू शकता. काही मुलं पूर्ण समजू शकले नाही तर नाराज ही होतात. माया ची ग्रहचारी चा पहिला वार हा बुद्धी वर होतो. परमात्मा शी बुद्धियोग तोडला जातो. त्यामुळे एकदम अधोगती होते. देहधारी शी बुद्धी अडकली तर बाबा शी विपरीत बुद्धी होणारच ना. तुम्हाला प्रीत बुद्धी बणुन राहायचं आहे, एक विचित्र बाबा बरोबर. देहधारीत बुद्धी अडकणे नुकसान कारक आहे. बुद्धी उच्च अवस्थेतून अधोगती ला पोहोचते. जरी हा ड्रामा निश्चित असला तरी बाबा समजून सांगतात ना. विपरीत बुध्दी असणाऱ्या कडून नाम रूपात फसण्याचा दुर्गन्ध येतो. नाही तर सेवेत उभे रहायला हवं. बाबानी काल ही समजावून सांगितलं कि मुख्य बिंदू आहे. गीतेचा भगवान कोण.. यातच तुमचा विजय होणार आहे. तुम्ही विचारता कि गीतेचा भगवान शिव कि कृष्ण...सुखदाता कोण.. सुखदाता तर शिव आहे तर, मत ही त्यांना द्यायला पाहिजे. हे खूप अलौकिक निवडणूक आहे. या सर्व युक्त्या त्यांना सुचत राहतील जे दिवस भर विचार सागर मंथन करतात. काही मुलं चालता चालता नाराज होतात. आता बघाल तर प्रीत आहे आता बघाल तर बुद्धी विपरीत.. कोणत्या कारणाने नाराज झाले तर आठवण करणार नाहीत. पत्र ही लिहिणार नाही,म्हणजे प्रितच नाही. मग बाबा ही पाच सहा महिने चिठी लिहिणार नाहीत. बाबा महाकाल आहेत तर धर्मराज ही आहेत. बाबाना आठवण करण्याची वेळ नाही तर पद काय प्राप्त करणार. पद भ्रष्ट होणार. सुरुवातीला बाबानी युक्तीने काही पद सांगितले होते.. आता ते ही नाहीत. आता पुन्हा माळ बनेल. सेवाधारीची महिमा स्वतः बाबा करतात. जे स्वतः बादशाह बनतात ते स्वतः समान दुसऱ्याला ही बनवतात. त्यांची इच्छा असते कि त्यांनी ही राजा बनावं. राजाला अन्नदाता, माता पिता म्हंटल जाते. आता माता आहेत जगदंबा.. त्यांच्या द्वारे तुम्हाला खूप सुख प्राप्त होते. तुम्हाला पुरुषार्थ करून उच्च पदाची प्राप्ती करायची आहे . दिवसेंदिवस तुम्हाला माहित पडत जाईल कि कोण काय पद मिळवणार आहेत. सेवा जे करतात त्याचे स्मरण स्वतः बाबा करतात. सेवाच करत नसतील तर बाबा ही कसे आठवण करतील. बाबा त्यांची आठवण करतात जे प्रीत बुद्धी आहेत. बाबानी हे ही समजून सांगितलं आहे कि कोणी दिलेली वस्तू वापरली किंवा घातली तर त्यांचीच आठवण येत राहणार.बाबांचा भंडाऱ्या तुन घेतले तर शिवबाबा आठवेल. बाबा स्वतः अनुभव सांगतात. आठवण जरूर येणार. म्हणून कोणी दिलेली कोणती ही वस्तू ठेवून घेऊ नये. अच्छा,

गोड-गोड फार-फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. एक विदेही आणि विचित्र बाबा बरोबर प्रीत बुध्दी ठेवायची आहे.
सदा ध्यान असू द्या कि कधी ही मायेची गृहचारी चा वार बुध्दी वर होता कामा नये.

2. बाबा वर नाराज व्हायचे नाही. सेवायोग्य बणुन आपले भविष्य उच्च बनवायचं आहे. कोणी ही दिलेली वस्तू स्वतः कडे ठेवायची नाही.

वरदान:-
सदा स्नेही बनून माया आणि प्रकृती ला दासी बनवणारे कष्ट व कठीणते पासून मुक्त भव.

जे सदा स्नेही आहेत ते स्नेहात तल्लीन असल्यामुळे ते कठिनता आणि कष्टापासून मुक्त असतात त्यांच्या समोर माया आणि प्रकृती दासी समान होतात, म्हणजे सदा स्नेही आत्मा मालक बनते तर प्रकृती, मायेची हिम्मत नाही, जे सदा स्नेहीचा वेळ आणि संकल्प आपल्याकडे लावतील. त्यांचा प्रत्येक वेळ, प्रत्येक विचार बाबांची आठवण आणि सेवेच्या साठी असतो.अशा आत्म्याच्या स्थितीचे गायन आहे, एक बाबा दुसरे कोणी नाही बाबाच संसार आहे. संकल्पना सुद्धा अधीन होऊ शकत नाही.

बोधवाक्य:-
ज्ञानाने भरपूर बना तर समस्या सुद्धा मनोरंजनाचा खेळ अनुभव होईल.