17-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुमच्या बुद्धीमध्ये आता सर्व ज्ञानाचे रहस्य आहे,म्हणून तुम्हाला चित्राची पण आवश्यकता नाही.तुम्ही बाबांची आठवण करा आणि दुसर्यांना पण आठवण करण्यास सांगा"

प्रश्न:-
अंतिम काळामध्ये तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये कोणते ज्ञान राहील?

उत्तर:-
त्यावेळेत बुद्धीमध्ये हेच राहील की,आता आमही वापस घरी जात आहोत परत चक्रामध्ये येऊ.हळू हळू शिडी उतरू,परत बाबा चढती कलांमध्ये घेऊन जाण्यासाठी येतील.आता तुम्ही जाणता,प्रथम आम्ही सूर्यवंशी होतो परत चंद्रवंशी बनलो,यामध्ये चित्राची आवश्यकता नाही.

ओम शांती।
मुलांनो,आत्म अभिमानी होऊन बसले आहात?८४ चे चक्र बुद्धीमध्ये आहे,म्हणजे आपल्या अनेक जन्माचे ज्ञान आहे. विराट रुपाचे पण चित्र आहे ना.आम्ही कसे 84 जन्म घेतो,हे पण ज्ञान मुलांमध्ये आहे.मूळ वतनमध्ये प्रथम देवी-देवता धर्म येतात.हे ज्ञान बुद्धी मध्ये आहे,यामध्ये चित्राची काही आवश्यकता नाही.आम्हाला कोणत्या चित्राच्या आठवण करायची नाही.अंत काळामध्ये फक्त हे आठवणीत राहील की,आम्ही आत्मा आहोत. मुळवतन मध्ये राहणारे आहोत.तेथे आमची भूमिका आहे.हे विसरायला नाही पाहिजे.ही मनुष्य सृष्टीच्या चक्रा ची गोष्ट आहे आणि खूप सहज आहे.यामध्ये चित्राची बिलकुलच आवश्यकता नाही कारण हे चित्र इत्यादी सर्व भक्ती मार्गातील गोष्टी आहेत.ज्ञान मार्गांमध्ये तर शिक्षण आहे.शिक्षणामध्ये चित्राची आवश्यकता नाही.या चित्रांना फक्त दुरुस्त केले जाते.ते म्हणतात भगवान कृष्ण आहेत,आम्ही म्हणतो शिव आहेत.हे पण बुद्धीद्वारे समजण्याची गोष्ट आहे.बुद्धीमध्ये हे ज्ञान राहते, आम्ही ८४चे चक्र लावले.आत्ता आम्हाला पवित्र बनायचे आहे.पवित्र बनून परत नवीन चक्रा मध्ये यायचे आहे.हे सर्व रहस्य बुद्धीमध्ये ठेवायचे आहे.जसे बाबांच्या बुद्धीमध्ये आहे,विश्वाचा इतिहास भूगोल किंवा 84 जन्माचे चक्र कसे फिरते,तसे तुमच्या बुद्धीमध्ये आहे,प्रथम आम्ही सूर्यवंशी चंद्रवंशी बनतो.चित्राची आवश्यकता नाही,फक्त मनुष्याला समजवण्यासाठी हे बनवले आहेत. ज्ञानमार्ग मध्ये बाबा म्हणतात, मनमनाभव.जसे चतुर्भुज विष्णूचे चित्र आहे,रावणाचे चित्र आहे,हे सर्व समजून सांगण्यासाठी दाखवावे लागते.तुमच्या बुद्धीमध्ये तर ज्ञान आहे.तुम्ही चित्रा शिवाय पण समजावू शकता.तुमच्या बुद्धीमध्ये 84 चे चक्र आहे.चित्राद्वारे फक्त सहज करून समजवले जाते,याची आवश्यकता नाही.बुद्धीमध्ये आहे आम्ही सूर्यवंशी घराण्याचे होतो, परत चंद्रवंशी घराण्याचे बनलो,तेथे खूप सुख आहे.त्याला स्वर्ग म्हटले जाते.या चित्रावरती समजवले जाते. अंतकाळात बुद्धीमध्ये,हे ज्ञान राहिल. आता आम्ही जात आहोत,परत चक्रा मध्ये येऊ.शिडी वरती समजवले जाते,जेणेकरून मनुष्याला समजवणे सहज होईल.तुमच्या बुद्धीमध्ये हे सर्व ज्ञान आहे,कसे आम्ही शिडी उतरतो, परत बाबा चढती कलांमध्ये घेऊन जातात.बाबा म्हणतात,मी तुम्हाला या चित्रावरती समजावतो.जसे गोळ्याचे चित्र आहे,त्यावरती समजावून सांगायचे आहे.हे पाच हजार वर्षाचे चक्र आहे.जर लाखो वर्षाचे असते, तर खूप संख्या झाली असती.असे दाखवतात,दोन हजार वर्षापूर्वी ख्रिश्चन होते,त्यामध्ये किती मनुष्य असतील.पाच हजार वर्षांमध्ये किती मनुष्य होतात.हे सर्व हिशोब तुम्ही सांगतात.सतयुगा मध्ये पवित्र असल्यामुळे,थोडे मनुष्य असतात. आता तर खूप आहेत.लाखो वर्षाचे आयुष्य असते,तर लोकसंख्या पण अगणित झाली असते.क्रिश्चनच्या तुलनेमध्ये लोकसंख्येचा हिशेब ही काढत राहतात ना.हिंदूंची लोकसंख्या कमी दाखवतात.ख्रिश्चन तर खूप झाले आहेत.जे चांगले समजदार मुलं आहेत,ते चित्रा शिवाय पण समजावू शकतात.विचार करा या वेळेत,अनेक मनुष्य आहेत.नवीन दुनिये मध्ये खूप थोडे मनुष्य असतील.आता तर जुनी दुनिया आहे,ज्यामध्ये असंख्य मनुष्य आहेत,परत नवीन दुनिया कशी स्थापन होते,कोण स्थापन करते,हे बाबाच समजवतात.तेच ज्ञानाचे सागर आहेत.तुम्हा मुलांना फक्त ८४चे चक्र बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. आता आम्ही नर्कापासून स्वर्गामध्ये जात आहोत,तर खुशी राहायला पाहिजे ना.सतयुगा मध्ये दुःखाची कोणती गोष्ट राहत नाही.अशी कोणती अप्राप्त वस्तू नाही,ज्याच्या प्राप्तीसाठी पुरूषार्थ करावा लागेल. येथे पुरुषार्थ करावा लागतो.ही मशीन पाहिजे,हे पाहिजे,तेथे सर्व सुख उपस्थित असतात.जसे कोणी महाराजा असतात,त्यांच्याजवळ सर्व सुख असतात.गरिबाच्या जवळ सर्व सुख नसतात.परंतु हे कलियुग आहे, अनेक रोग इत्यादी सर्व काही आहे. आता तुम्ही नवीन दुनिये मध्ये जाण्यासाठी पुरूषार्थ करतात. स्वर्ग-नरक येथेच असतो.

ही सूक्ष्मवतनची रमत-गमत आहे.जो पर्यंत कर्मातीत अवस्था होत नाही,तो पर्यंत टाइमपास होण्यासाठी हा खेळपाळ आहे.कर्मातीत आवस्था होईल बस.तुम्हाला हेच आठवणीत राहील,आम्ही आत्म्याने ८४ जन्म पूर्ण केले.आत्ता आम्ही घरी जात आहोत,परत येऊन सतोप्रधान दुनियेत भुमिका वठवू.हे ज्ञान बु्दी मध्ये आहे.यामध्ये चित्राची आवश्यकता नाही.जसे वकील किती शिकतात,वकील बनले,परत जे पाठ शिकले त्याची आवश्यकता नाही. परिणाम निघाला,त्याचे प्रारब्ध मिळाले. तुम्हीपण शिकून परत राज्य कराल.तेथे ज्ञानाची आवश्यकता नाही.या चित्रांमध्ये पण बरोबर काय आणि चुकीचे काय आहे,हे पण तुमच्या बुद्धीमध्ये आहे.बाबा सन्मुख समजवतात,लक्ष्मी नारायण कोण आहेत?हे विष्णू कोण आहेत? विष्णूच्या चित्रांमध्ये पण मनुष्य संभ्रमित होतात.ज्ञाना शिवाय पूजा करत राहतात,समजत काहीच नाहीत.जसे विष्णूला समजत नाहीत, लक्ष्मी नारायणला पण समजत नाहीत. ब्रह्मा विष्णू शंकरला पण समजत नाहीत.ब्रह्मा तर येथे आहेत,हे पवित्र बनून,शरीर सोडून चालले जातील.या जुन्या दुनिये पासून वैराग्य आहे. येथील कर्मबंधन दुःख देणारे आहेत.आता बाबा म्हणतात,आपल्या घरी चला.तेथे दुःखाचे नाव रुप नसेल.प्रथम तुम्ही आपल्या घरामध्ये जाल,परत राजधानीमध्ये याल.आता बाबा परत पावन बनवण्यासाठी आले आहेत.या वेळेत मनुष्याचे खान पण खूपच खराब आहे,काय काय गोष्टी खात राहतात.स्वर्गा मध्ये अशा गोष्टी देवता थोडेच खातात.भक्तिमार्ग पहा कसा आहे,मनुष्याचे पण बळी चढवतात.बाबा म्हणतात हे पण वैश्विक नाटक बनलेले आहे.जुन्या दुनिये पासून परत नवीन जरूर बनणार आहे.आता तुम्ही जाणतात, आम्ही सतोप्रधान बनत आहोत.हे तर बुद्धी द्वारे समजता ना.यामध्ये तर चित्र नसतील,तर चांगलेच आहे, नाहीतर मनुष्य खूप प्रश्न विचारतात.बाबांनी ८४ जन्माचे चित्र पण समजावले आहे.आम्ही असे सूर्यवंशी, चंद्रवंशी,वैश्यवंशी बनतो, इतके जन्म घेतो.हे बुद्धीमध्ये ठेवायचे आहे.तुम्ही मुलं सूक्ष्मवतनचे रहस्य पण समजतात,ध्यान मध्ये पण जातात परंतु यामध्ये न योग आहे न ज्ञान आहे.हा फक्त एक रिवाज बनलेला आहे.आत्म्याला कसे बोलावले जाते,हे समजून सांगितले जाते,परत जेव्हा येते तर रडतात, आम्ही बाबांच्या श्रीमता नुसार चाललो नाही.हे सर्व मुलांना समजवण्यासाठी आहे,जेणेकरुन त्यांनी पुरुषार्थ करावा,गफलत करू नये.तुम्ही नेहमी लक्ष ठेवा की,आम्हाला आपला वेळ सफल करायचा आहे,वाया घालवायचा नाही,तर माया गफलत करू शकणार नाही.बाबा पण समजावत राहतात, मुलांनो वेळ वाया घालू नका. अनेकांना मार्ग दाखवण्यासाठी पुरुषार्थ करा आणि महादानी बना. बाबांची आठवण करा,जे पण येतील त्यांना समजून सांगा, 84 चक्राचे रहस्य पण स्पष्ट करा.विश्वाचा इतिहास भूगोल ची पुर्नवृत्ती कशी होते,हे सविस्तर मध्ये लक्षात राहायला पाहिजे.

तुम्हा मुलांना खूप खुशी राहायला पाहिजे की,आत्ता आम्ही या खराब दुनिये पासून मुक्त होत आहोत. मनुष्य समजतात स्वर्ग नर्क येथेच आहे.ज्यांना खूप धन आहे,तर समजतात,आम्ही तर स्वर्गामध्ये आहोत.चांगले काम केले आहे, म्हणून सुख मिळाले.तुम्ही खूप चांगले काम करतात,ज्यामुळे तुम्हाला २१ जन्म सुख मिळते.येथे तर एका जन्मासाठी,समजतात आम्ही स्वर्गा मध्ये आहोत.बाबा म्हणतात,हे तर अल्पकाळचे सुख आहे,तुमचे तर २१ जन्माचे सुख आहे.यासाठी बाबा म्हणतात,सर्वांना मार्ग दाखवा.बाबांच्या आठवणी द्वारेच निरोगी आणि स्वर्गाचे मालक बनाल. स्वर्गांमध्ये राजाई आहे,त्यांची पण आठवण करा.राजाई होती आता नाही.भारताची गोष्ट आहे,बाकी तर अनेक शाखा आहेत.अंतिम काळात सर्व आपल्या घरी परत जातील आणि तुम्ही स्वर्गामध्ये जाल.आता हे समजवण्यासाठी चित्राची आवश्यकता नाही.हे फक्त समजण्यासाठी,मूळवतन सूक्ष्मवतन दाखवतात.बाकी हे चित्र भक्तिमार्गातील लोकांनी बनवले आहेत.तर आम्हाला पण त्यामध्ये दुरुस्ती करुन बनवावे लागतात. नाहीतर म्हणतील तुम्ही पण नास्तिक आहात,म्हणून दुरुस्त करून बनवले जातात.ब्रह्मा द्वारे स्थापना,शंकर द्वारे विनाश,विष्णू द्वारे पालना,वास्तव मध्ये हे पण नाटकांमध्ये नोंद आहे.कोणी काय करतात थोडेच.वैज्ञानिक आपल्या बुद्धी द्वारे हे सर्व बनवतात.जरी कोणी कितीही म्हटलं बॉम्ब बनवू नका परंतु ज्यांच्याजवळ खूप आहेत, त्यांनी समुद्रामध्ये टाकले तर, दुसरे कोणी बनवणार नाहीत. त्यांनी ठेवले आहेत,तर जरूर दुसरे पण बनवतील ना.आता तुम्ही मुलं जाणता,सृष्टीचा विनाश होणार आहे,लढाई पण जरूर लागेल.विनाश होईल,परत तुम्ही आपले राज्य घ्याल.आता बाबा म्हणतात मुलांनो,सर्वांचे कल्याणकारी बना.

मुलांना आपले भाग्य बनवण्यासाठी बाबा श्रीमत देतात गोड मुलांनो, आपले सर्व काही धनीच्या नावे सफल करा.कोणाचे जमिनीमध्ये पडून राहील,कुणाचे राजा खाईल, सफल त्यांचेच होईल जे धनीच्या नावावरती करतील.धनी बाबा स्वतः म्हणतात,मुलांनो यासाठी खर्च करा. हा आत्मिक दवाखाना, विद्यापीठ उघडा,त्याद्वारे अनेकांचे कल्याण होईल.तुम्ही धनीच्या नावे जेवढा खर्च कराल, तेवढे २१ जन्मासाठी तुम्हाला,त्याच्या मोबदल्यात मिळेल. ही दुनिया नष्ट होणार आहे म्हणून धनीच्या नावे जितके शक्य आहे, तेवढे सफल करा.भक्तिमार्गात, धनीच्या नावे करतात ना,आत्ता तर प्रत्यक्ष आले आहेत.धनीच्या नावे मोठ मोठे विद्यापीठ उघडत जावा तर अनेकांचे कल्याण होईल.२१ जन्म राज्य भाग्य मिळेल,नाहीतरी हे धन दौलत इत्यादी सर्व नष्ट होणार आहे. भक्तीमार्गा मध्ये नष्ट होत नाही. आत्ता तर नष्ट होणार आहे.तुम्ही खर्च करा,परत तुम्हालाच त्याचा मोबदला मिळेल.धनीच्या नावे सर्वांचे कल्याण करा,तर २१ जन्माचा वारसा मिळेल. बाबा खूप चांगल्या रीतीने समजवतात,परत ज्यांच्या भाग्या मध्ये आहे,ते खर्च करत राहतात. आपल्या घरदार पण सांभाळायचे आहे.ब्रह्मा बाबांची भूमिकाच अशी होती.एकदम जोरात नशा चढला. बाबा बादशाही देतात,परत गदाई काय करणार?तुम्ही सर्व बादशाही घेण्यासाठी बसले आहात,तर ब्रह्मा बाबांचे अनुकरण करा.तुम्ही जाणता त्यांनी कसे सर्वकाही सोडले,नशा चढला.ओहो,राजाई मिळत आहे तर, गदाई काय कामाची?आत्म्याला ईश्वर मिळाले आणि भागिदाराला राजाई दिली.राजाई काही कमी नव्हती. चांगला धंदा चालत होता.आता तुम्हाला ही राजाई मिळत आहे,तर अनेकांचे कल्याण करा.भट्टी बनणार होती,कोणी त्याच्या मधून पक्के निघाले,कोणी कच्चे पण निघाले.शासन नोटा बनवतात तर काही त्यामधून खराब निघतात,तर त्यांना शासन जाळून टाकते.अगोदर तर चांदीचा रुपया चालत होता.सोने-चांदी खूप होते.आता तर काय काय होत आहे.कोणाचे राजे घेतात,कोणाचे डाकू घेऊन जातात,डाका पण घालत राहतात.दुष्काळ पण होईल,हे रावण राज्य आहे.रामराज्य सतयुगाला म्हटले जाते. बाबा म्हणतात तुम्हाला एवढे श्रेष्ठ बनवले होते,परत गरीब कसे बनले? मुलांना खूप ज्ञान मिळाले आहे,तर खुशी व्हायला पाहिजे. दिवसेंदिवस खुशी वाढत जाईल. जितके यात्रे जवळ जाल तेवढी खूशी होईल.तुम्ही जाणतात शांतीधाम सुखधाम समोर आहे.वैकुंठाचे झाड दिसू लागले आहेत,बस. आत्ता पोहचलो की पोहचलो,अच्छा.

गोड,गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति, मात पिता,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आपला वेळ सफल करण्याचे लक्ष ठेवायचे आहे.माया गफलत करू नये म्हणून महादानी बनून अनेकांना रस्ता दाखवण्या मध्ये व्यस्त रहा.

(२)आपले भाग्य बनवण्यासाठी, धनीच्या नावे सर्व काही सफल करायचे आहे.आत्मिक विद्यापीठ सुरू करायचे आहे.

वरदान:-
कडक नियम आणि दृढ संकल्प द्वारा आळसाला समाप्त करणारे ब्रह्मा बाप समान अथक भव.

ब्रह्मा बाप समान अथक बनण्यासाठी आळसाला समाप्त करा.यासाठी कोणता तरी कडक नियम बनवा,लक्षरुपी चौकीदार नेहमी तत्पर राहावा,तरच समाप्ती होईल.प्रथम स्वतःच्या वरती कष्ट करा,परत सेवेमध्ये,तेव्हाच धरणी परिवर्तन होईल.आता फक्त करू, होऊन जाईल,हे आरामाचे संकल्प सोडायचे आहेत.

बोधवाक्य:-
समर्थ बोलचे लक्षणं आहेत,ज्या बोलमध्ये आत्मिक भाव आणि शुभ भावना आहे.