17-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हाला या पुरुषोत्तम संगमयुगा मध्येच उत्तम ते उत्तम पुरुष बनायचे आहे, सर्वात उत्तम ते उत्तम पुरुष लक्ष्मी नारायण आहेत"

प्रश्न:-
तुम्ही मुलं बाबांच्या सोबत कोणते एक गुप्त कार्य करत आहात?

उत्तर:-
आदी सनातन देवी देवता धर्म आणि दैवी राजधानीची स्थापना, तुम्ही बाबांच्या सोबत गुप्त रूपांमध्ये करत आहात. बाबा बागवान आहेत, जे येऊन काट्याच्या जंगलाला फुलांची बाग बनवत आहेत. त्या बागेमध्ये कोणत्याही भयानक, दुःख देणाऱ्या गोष्टी नसतात.

गीत:-
आखिर वह दिन आया आज. . ( बाबांना भेटण्याचा दिवस आला आज. . .

ओम शांती।
आत्मिक पिता सन्मुख आत्मिक मुलांना समजवत आहेत, शरीराद्वारे च समजवतील. आत्मा शरीरा शिवाय कोणतेही कार्य करू शकत नाही. आत्मिक पित्याला पण एकाच वेळेस पुरुषोत्तम संगम युगावरती शरीराचा आधार घ्यावा लागतो. याला पुरुषोत्तम युग पण म्हणतात, कारण या सगंमयुगाच्या नंतर सतयुग येते. सतयुगाला पण पुरुषोत्तम युगच म्हनणार. बाबा येऊन पुरुषोत्तम युगाची स्थापना करतात. संगमयुगा मध्ये येतात, तर जरूर ते पुरुषोत्तम युगच झाले ना. येथेच मुलांना पुरुषोत्तम बनवतात परत तुम्ही पुरुषोत्तम नवीन दुनिया मध्ये जातात. पुरुषोत्तम म्हणजे उत्तम ते उत्तम पुरुष, हे राधाकृष्ण किंवा लक्ष्मी नारायण आहेत. हे ज्ञान पण तुम्हाला आहे. दुसऱ्या धर्मातील पण मानतील की, बरोबर हे स्वर्गाचे मालक आहेत. भारताची खूप महिमा आहे परंतु भारतवासी स्वतः जाणत नाहीत. असे म्हणतात पण अमका स्वर्गवासी झाला परंतु स्वर्ग कुठे आहे, कसा आहे, हे समजत नाहीत. स्वतःच सिद्ध करतात हा स्वर्गवासी झाला, याचा अर्थ नरकामध्ये होता. स्वर्ग तर जेव्हा बाबा स्थापन करतील, ते तर नवीन दुनियेला म्हटले जाते. दोन गोष्टी आहेत ना स्वर्ग आणि नर्क. मनुष्य तर स्वर्गाला लाखो वर्ष म्हणतात. तुम्ही मुलं समजतात काल स्वर्ग होता, यांचे राज्य होते, परत बाबा पासून वारसा घेत आहात. बाबा म्हणतात लाडक्या मुलांनो, तुमची आत्मा पतित आहे म्हणून नरकामध्ये आहे. असे म्हणतात कलियुगाचे आणखी चाळीस हजार वर्ष बाकी आहेत, तर जरूर कलियुग वासी म्हणणार ना. जुनी दुनिया तर आहे ना. मनुष्य बिचारे घोर अंधकारा मध्ये आहेत. अंत काळात जेव्हा आग लागेल, तेव्हा हे सर्व नष्ट होईल. तुमची प्रीत बुद्धि आहे, तेही क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे आहे. जितकी प्रीत बुद्धी असेल तेवढे उच्चपद मिळेल. सकाळी उठून खूप प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे. खुशाल प्रेमाचे आश्रू येऊद्या, कारण बऱ्याच वर्षानंतर बाबा भेटले आहेत. बाबा तुम्ही येऊन आम्हाला दुःखापासून सोडवतात. आम्ही विषय सागरामध्ये बुडत होतो, तर खूप दुःखी होत आलो. आता रौरव नर्क आहे. आता तुम्हाला, बाबांनी सर्व चक्राचे रहस्य स्पष्ट केले आहे. मूळवतन काय आहे, ते पण सांगितले आहे. प्रथम तुम्ही जाणत नव्हते, याला काट्याचे जंगल पण म्हणतात. स्वर्गाला अल्लाहची बाग, फुलांची बाग म्हटले जाते. बाबांना बागवान पण म्हणतात, तुम्हाला फुलापासून काट्यासारखे कोण बनवते, रावण. तुम्ही मुलं समजतात भारत फुलांची बाग होता. आता जंगल आहे. जंगलामध्ये जनावरं, विंचू इत्यादी राहतात. सतयुगामध्ये असे भयंकर जनावरं इत्यादी नसतात. ग्रंथांमध्ये तर अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. कृष्णाला सापाने दंश केला, असे झाले. कृष्णाला द्वापार मध्ये घेऊन गेले आहेत. बाबांनी समजवले आहे, भक्ती बिलकुल वेगळी गोष्ट आहे, ज्ञानसागर तर एकच बाबा आहेत. असे नाही की, ब्रह्मा-विष्णू-शंकर पण ज्ञानाचे सागर आहेत, नाही. पतित पावन एकाच ज्ञानाच्या सागराला म्हणू शकतो. ज्ञानाद्वारे मनुष्यांची सद्गती होती. सद्गतीचे स्थान दोन आहेत, एक मुक्तीधाम आणि दुसरे जीवनमुक्तीधाम. आता तुम्ही मुलं जाणतात, राजधानी स्थापन होत आहे परंतु गुप्त. बाबा येऊन आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतात. सर्व आप आपल्या मनुष्य शरीरा मध्ये येतात. बाबांना आपले शरीर तर नाही, त्यामुळे त्यांना निराकार ईश्वरीय पिता म्हटले जाते. बाकी सर्व साकारी आहेत. यांना निराकारी ईश्वरीय पिता, निराकारी आत्म्याचे पिता म्हटले जाते. तुम्ही आत्मे पण तेथेच राहतात. बाबा पण तेथेच राहतात परंतु ते गुप्त आहेत. बाबाच येऊन आदी सनातन धर्माची स्थापना करतात. मुळवतन मध्ये कोणतेच दुःख नाही. बाबा म्हणतात, तुमचे कल्याण एकच गोष्टीमध्ये आहे, बाबांची आठवण करा, मनमनाभव. बस बाबांचा मुलगा बनले तर वारसा जरूर मिळतो. अल्लाहची म्हणजे ईश्वराची आठवण केली, तर सतयुगी दुनियेचा वारसा जरूर मिळेल. या पतित दुनियेचा विनाश पण जरूर होणार आहे. अमरपुरी मध्ये जायचे आहे. अमरनाथ तुम्हा पार्वतीला अमर कथा ऐकवत आहेत. तिर्थक्षेत्रा वरती अनेक मनुष्य जातात, अमरनाथला पण अनेक जातात. तेथे तर काहीच नाही, सर्व फसवणूक आहे. खऱ्याचे नाव नाही. गायन पण आहे, खोटी माया, खोटी काया, खोटा सर्व संसार. . याचा पण अर्थ समजायला पाहिजे. येथे सर्व खोटे आहे. या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. असे नाही ग्लासला ग्लास म्हणने खोटे आहे. बाकी बाबाच्या बाबतीत जे काय बोलतात, ते खोटे बोलतात. खरे बोलणारे एकच सत्यम शिवम आहेत. आता तुम्ही जाणतात बाबाच येऊन खरी-खुरी सत्यनारायणाची कथा ऐकवतात. खोटे हिरे-मोती पण असतात ना. आजकल खोट्याचा खूप दिखावा आहे, त्यांची चमक अशी असते, जे खऱ्या पेक्षा पण चांगले दिसतात. हे नकली अगोदर नव्हते, नंतर परदेशातून आले आहेत. खोटे खऱ्या सोबत मिळवतात, तर माहित पण होत नाही. अशा गोष्टी निघाल्या आहेत ज्या द्वारे पारखू पण शकतात. मोती पण असे खोटे निघाले आहेत, काहीच माहिती पडत नाही. आता तुम्हा मुलांना काहीच संशय नाही. संशय घेणारे येत नाहीत. प्रदर्शनीमध्ये अनेक मनुष्य येत असतात. बाबा म्हणतात आता मोठे मोठे दुकान उघडा, सेवाकेंद्र सुरु करा. एकच तुमचे खरे दुकान आहे. तुम्ही खरे दुकान उघडतात. मोठ-मोठ्या संन्यासीचे तर मोठ-मोठे दुकान असतात, तेथे मोठ-मोठे मनुष्य जातात. तुम्ही पण मोठ-मोठे सेवा केंद्र सुरू करा. भक्तिमार्गाची सामग्री अगदीच वेगळी आहे. असे नाही म्हणणार भक्त्ती सुरुवातीपासून चालत आली आहे, नाही. ज्ञानाद्वारे सदगती म्हणजेच दिवस. तेथे संपूर्ण निर्विकारी विश्वाचे मालक होते. मनुष्यांना हे पण माहित नाही, की लक्ष्मी नारायण विश्वाचे मालक होते. सूर्यवंशी आणि चंद्रवंशी दुसरा कोणताही धर्म नव्हता. मुलांनी गीत पण ऐकले, तुम्ही समजतात शेवटी संगमयुगाचा दिवस आला आज, जे आम्ही बेहद्दच्या बाबांना भेटलो आहोत. मनुष्य तर समजतात, खूप धनधान्य होईल, असे होईल. समजतात आम्ही स्वर्गाची स्थापना करत आहोत. ते समजतात विद्यार्थ्यांचे नवीन रक्त आहे, हे खूप मदत करतील म्हणून शासन पण त्यांच्यावरती खूप कष्ट घेते.

विद्यार्थी परत गोंधळ घालून दगड इत्यादी मारत राहतात. गोंधळ करण्यामध्ये विद्यार्थीच पुढे राहतात. खूप हुशार असतात त्यांना परत नवीन रक्त म्हटले जाते. आता नवीन रक्ताची तर गोष्टच नाही. ते रक्ताचे संबंध आहेत. येथे तुमचे आत्मिक संबंध आहेत. असे म्हणतात बाबा, मी आपला दोन महिन्याचा मुलगा आहे. काही मुलं आत्मिक वाढदिवस साजरा करतात. ईश्वरीय जन्मदिवस तर साजरा करायला पाहिजे ना. तो शरीराचा वाढदिवस तर कॅन्सल करायला पाहिजे. आम्ही ब्राह्मणच खाऊ घालणार, साजरा तर करायला पाहिजे ना. तो आसुरी जन्म, हा ईश्वरीय जन्म आहे. रात्रं दिवसाचा फरक आहे परंतु जेव्हा निश्चय बसेल. असे नाही ईश्वरीय जन्म साजरा करून, परत असुरी जन्मांमध्ये जातील. असे पण होते, ईश्वरी जन्म साजरा करून परत रफू-चक्कर होतात. आजकाल तर लग्नाचा दिवस पण साजरा करतात. लग्नाला जसे की शुभकार्य समजतात. नरकामध्ये जाण्याचा दिवस साजरा करतात, आश्चर्य आहे ना. बाबाच या गोष्टी सन्मुख समजवतात. आता तुम्हाला ईश्वरीय जन्मदिवस ब्राह्मणांच्या सोबतच साजरा करायचा आहे. आम्ही शिवबाबाची मुलं आहोत, आम्ही वाढदिवस साजरा करतो, तर शिव बाबांची आठवण राहील. जे मुलं निश्चयबुध्दी आहेत, त्यांना जन्मदिवस साजरा करायला पाहिजे. तो आसुरी जन्म विसरायला पाहिजे. बाबा मत देत राहतात. जर पक्के निश्चय बुद्धी आहेत, तर बस आम्ही तर बाबा चे बनलो, दुसरे कोणी नाही, परत अंत मती सो गती होईल. बाबाच्या आठवणी मध्ये मृत्यू झाला तर दुसरा जन्म पण चांगलाच मिळेल, नाहीतर जे अंतकाळात पण पत्नीची आठवण करतात, त्यांचा जन्म पण तसाच होतो. ते परत म्हणतात अंत काळात गंगा चा किनारा हवा, या सर्व भक्तिमार्गाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला बाबा म्हणतात शरीर सुटले तरी, स्वदर्शन चक्रधारी हवे. बुद्धीमध्ये बाबा आणि चक्र आठवणीत राहावे. ते पण जरूर, जेव्हा पुरुषार्थ करत रहाल, तर अंतकाळी पण आठवण येईल. स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा, कारण तुम्हा मुलांना आता परत अशरीरी होऊन जायचे आहे. येथे भूमिका वठवत सतोप्रधान पासून तमोप्रधान बनले आहात. आता परत सतोप्रधान बनायचे आहे. या वेळेत आत्माच अपवित्र आहे, तर परत शरीर पवित्र कसे मिळू शकेल? बाबांनी अनेक उदाहरण देऊन समजावले आहे, हिऱ्यांचे व्यापारी होते ना. भेसळ दागिन्यांमध्ये नाही, तर सोन्यामध्ये होते. २४ कॅरेट पासून २२ कॅरेट बनवायचे असेल तर जरूर चांदी घालावी लागणार. आता तर सोने नाहीच. सर्वा कडून घेत राहतात. आज-काल नोटा पण कशा बनवत राहतात, कागद पण नाहीत. मुलं समजतात कल्प-कल्प असेच होत आले आहे. पूर्ण तपासणी करतात, लॉकर्स इत्यादी पण चेक करतात. जसे कुणाची तपासणी इत्यादी घेतली जाते. गायन पण आहे, कोणाची मातीमध्ये राहील, कोणाचे शासन घेईल, कुणाचे अग्नी जाळेल, सफल त्यांचीच होईल, जे ईश्वराच्या नावे करतील. तुम्ही मुलं जाणता हे सर्व होणार आहे, म्हणून तुम्ही भविष्यासाठी जमा करत आहात. दुसऱ्या कोणाला माहिती थोडेच आहे की, तुम्हाला २१जन्मासाठी वारसा मिळत आहे. तुमच्याच पैशाने भारताला स्वर्ग बनवत आहेत, ज्यामध्ये तुम्ही निवास कराल.

तुम्ही मुलंच आपल्या पुरुषार्थ द्वारे स्वतःलाच राजतिलक देत आहात. गरिब निवाज बाबा स्वर्गाचे मालक बनवण्यासाठी आले आहेत, परंतु आपल्या शिक्षणाद्वारेच बनतील, कृपा किंवा आशीर्वाद द्वारे नाही. शिकवणे तर शिक्षकाचा धर्मच आहे. कृपेची गोष्ट नाही. शिक्षकाला शासनाकडून पगार मिळतो, तर जरूर शिकवतील. तुम्हाला तर इतके मोठे बक्षीस मिळते, पद्मापदमपती बनतात. कृष्णाच्या पाऊलामध्ये पदमची लक्षणे दाखवतात. तुम्ही येथे भविष्यामध्ये पद्मापती बनण्यासाठी आले आहात. तुम्ही खूप सुखी सावकार, अमर बनतात. काळावरती विजय मिळवतात, या गोष्टीला मनुष्य समजू शकत नाहीत. तुमचे आयुष्य पूर्ण होते, अमर बनतात. त्यांनी परत पांडवांचे चित्र खूप मोठे बनवले आहेत. ते समजतात पांडव मोठे होते. आता पांडव तर तुम्ही आहात. रात्रंदिवसा चा फरक आहे. मनुष्य काही खूप उंच नसतात, जास्तीत जास्त सहा फुटांचे असतात. भक्ती मार्गामध्ये प्रथम शिवबाबांची भक्ती होते, त्यांना तर मोठे बनवत नाहीत. प्रथम शिवबाबा ची अव्यभिचारी भक्ती करतात, परत देवतांच्या मूर्ती बनवतात. त्यांचे परत मोठ-मोठे चित्र बनवतात, परत पांडवांचे पण मोठ- मोठे चित्र बनवतात. हे सर्व पूजेसाठी चित्र बनवतात. लक्ष्मीची पूजा तर बारा महिन्यांमध्ये एकाच वेळेत करतात, जगदंबाची तर दररोज पूजा करत राहतात. हे पण बाबांनी समजवले आहे, तुमची डबल पूजा होते, माझी तर फक्त आत्म्याची म्हणजे लिंगाची पूजा होते. तुमची तर शाळीग्रामच्या रुपामध्ये पूजा होते आणि परत देवतांच्या रूपामध्ये पण पूजा होते. रुद्र यज्ञाची स्थापना करतात, तर अनेक शाळीग्राम बनवतात. तर मोठे कोण झाले. तेव्हा बाबा पण मुलांना नमस्ते करतात. खूप उच्चपद प्राप्त करवतात. बाबा अनेक रहस्ययुक्त गोष्टी ऐकवतात तर मुलांना खूप आनंद व्हायला पाहिजे. आम्हाला भगवान- भगवती बनवण्यासाठी स्वयम् भगवान शिकवत आहेत, तर किती धन्यवाद मानायला पाहिजेत. बाबाच्या आठवणी मध्ये राहिल्यामुळे स्वप्न पण चांगले पडतील, साक्षात्कार पण होईल, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) ईश्वरीय आत्मिक वाढदिवस साजरा करायचा आहे, आत्मिक संबंध ठेवायचे आहेत, रक्ताचे संबंध नाही. आसुरी वाढदिवस कॅन्सल करायचा आहे, त्याची परत आठवण पण यायला नको.

(२ )आपले बैग बैगेज भविष्यासाठी तयार करायचे आहे. आपले पैसे भारताला स्वर्ग बनवण्याच्या सेवेमध्ये सफल करायचे आहेत. आपल्या पुरुषार्थ द्वारे स्वतःलाच राजतिलक द्यायचा आहे.

वरदान:-
स्मृतीचे बटन चालू करुन, सेकंदांमध्ये अशरीरी स्थितीचा अनुभव करणारे, प्रीत बुद्धि भव.

जेथे प्रभू प्रीत आहे, तेथे अशरीरी बनणे एका सेकंदाच्या खेळासारखे आहे. जसे बटन चालू करताच अंधार दूर होतो, तसेच प्रीत बुद्धी बनून स्मृतीचे बटन चालू करा, तर देह आणि देहाच्या दुनियाच्या स्मृतीचे बटन बंद होईल. हा सेकंदाचा खेळ आहे, मुखाद्वारे बाबा बोलण्यासाठी पण वेळ लागतो परंतु स्मृतीमध्ये येण्यासाठी वेळ लागत नाही. हा बाबा शब्द जुन्या दुनियेला विसरणारा आत्मिक बॉम्ब आहे.

बोधवाक्य:-
देह अभिमानाच्या मातीच्या ओझ्या पासून दूर राहा, तर डबल लाईट फरिश्ता बनाल.