17-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्हाला एका-एकाला परीस्थानी बनवायचे आहे,तुम्ही सर्वांचे कल्याण करणारे आहात, तुमचे कर्तव्य आहे गरिबांना सावकार बनवणे"

प्रश्न:-
बाबांचे कोणते नाव,जरी साधारण असले तरी,कर्तव्य खूप महान आहे?

उत्तर:-
बाबांना भगवान,नावाडी म्हणतात,हे नाव किती साधारण आहे,परंतु बुडणार्यांना किनाऱ्याला लावणारे आहे,हे खूप महान कर्तव्य आहे.जसे चांगले पोहणारे असतात, एक-दोघांना हातामध्ये हात देऊन, किनाऱ्याला घेऊन येतात.असेच बाबांचा हात मिळाल्याने,तुम्ही सर्व स्वर्गवासी बनतात.आता तुम्ही पण मास्टर नावाडी बनत आहात.तुम्ही प्रत्येकाचे नाव किनाऱ्याला लावण्याचा रास्ता सांगतात.

ओम शांती।
आठवणीमध्ये तर मुलं बसलेले असतील,स्वतःला आत्मा समजायचे आहे,असे नाही की देहा शिवाय बसले आहात,परंतु बाबा म्हणतात,देह अभिमान सोडून देही अभिमानी बनून बसा.देही म्हणजे आत्म अभिमान शुद्ध आहे आणि देहअभिमान अशुद्ध आहे.तुम्ही जाणता देही अभिमानी बनल्यामुळे आम्ही शुद्ध पवित्र बनत आहोत.देह अभिमानी बनल्यामुळे शुद्ध पवित्र बनले होते.तुम्ही बोलवत पण होते, हे पतित पावन या,दुनिया पण पावन होती,आता पतित आहे,परत पावन दुनिया होईल.सृष्टीचे चक्र तर फिरत राहते.जे या सृष्टीच्या चक्राला जाणतात,त्यांना स्वदर्शन चक्रधारी म्हटले जाते.तुम्ही प्रत्येक जण स्वदर्शन चक्रधारी आहात.स्व आत्म्याला सृष्टी चक्राचे ज्ञान मिळाले आहे जरूर.ज्ञान कोणी दिले? ते पण जरुर स्वदर्शन चक्रधारी असतील.बाबांच्या शिवाय दुसरे कोणते मनुष्य शिकवू शकत नाहीत.सतयुगा मध्ये मुलांना ज्ञान किंवा शिक्षण देण्याची आवश्यकता नसते,न तेथे भक्ती आहे.ज्ञानाद्वारे वारसा मिळतो.बाबा श्रीमत देतात, तुम्ही असे श्रेष्ठ बना.तुम्ही जाणतात आम्ही कब्रस्तानी होतो,आता परीस्थानी होणार आहे.मृत्युलोक ला परीस्थानी म्हणाल.परिस्थान नवीन दुनियेला म्हटले जाते.बाबा वैश्विक नाटकाचे रहस्य समजून सांगतात.या संपूर्ण सृष्टीला भंभोर म्हटले जाते.

बाबानी समजवले आहे, सर्व सृष्टी वरती यावेळेस रावणाचे राज्य आहे. दसरा साजरा करतात,तर खूप खुश होतात.बाबा म्हणतात,सर्व मुलांना दुःखापासून सोडवण्यासाठी मला पण जुन्या दुनियेमध्ये यावे लागते. एक कथा पण आहे,कोण म्हणाले, तुम्हाला सुख पाहिजे की दुःख पाहिजे.तर म्हणाले सुख पाहिजे,जर सुखामध्ये जातील तर तेथे कोणी यमदूत येऊ शकणार नाही.ही पण एक गोष्ट आहे.बाबा म्हणतात,सुखधाम मध्ये कधी काळ येऊ शकत नाही.अमरपुरी बनते.तुम्ही काळा वरती विजय मिळवतात.तुम्ही किती सर्वशक्तिमान बनतात.तेथे कधी असे म्हणणार नाही की,त्याचा मृत्यू झाला.मृत्यूचे नावच नसते.एक शरीर सोडून दुसरे घेतात.साप पण आपली कातडी बदलतो.तुम्हीपण जुने वस्त्र सोडून नवीन कातडी म्हणजे नवीन शरीरांमध्ये घ्याल.तेथे पाच तत्व पण सतोप्रधान बनतात.सर्व गोष्टी सतोप्रधान होतात.प्रत्येक गोष्ट सर्वात्तम असते.सतयुगाला स्वर्ग म्हटले जाते.तेथे खूप धनवान असतात.यांच्यासारखे सुखी विश्वाचे मालक कोणी होऊ शकत नाहीत. आता तुम्ही जाणतात,आम्हीच असे श्रेष्ठ होतो,तर खूप खूश व्हायला पाहिजे.एका-एकाला परिस्थितानी बनवायचे आहे.अनेकांचे कल्याण करायचे आहे.तुम्ही खूप सावकार बनतात,ते सर्व गरीब आहेत. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये हात मिळत नाही,तोपर्यंत स्वर्गवासी बनू शकत नाही.बाबांचा हात तर सर्वांना मिळणार नाही.बाबांचा हात तुम्हाला मिळतो.तुमचा हात परत दुसऱ्यांना मिळतो,दुसऱ्यां कडून परत आणखी दुसऱ्यांना मिळते.जसे कोणी चांगले पोहणारे असतात,तर किनाऱ्यावरती घेऊन येतात.तुम्ही पण मास्टर नावाडी आहात.अनेक नावाडी बनत आहेत. तुमचा धंदाच हा आहे.आम्ही प्रत्येकाची नाव किनार्याला लावण्याचा रस्ता दाखवत आहोत. तुम्हीपण नावडे आहात.नावाड्याची मुलं नावाडी बनायचे आहे.नाव किती हल्के आहे, बागवान, नावाडी.आता तुम्ही प्रत्यक्षात पाहत आहात.तुम्ही परिस्थानाची स्थापना करत आहात.तुमचे स्मृतिस्थळ समोर उभे आहे.खाली तपस्या करत आहात,वरती राजाई आहे.नाव पण दिलवाडा खूप चांगले आहे.बाबा सर्वांचे ह्रदय जिंकणारे आहेत.सर्वांची सद्गती करतात.ह्रदय जिंकणारे कोण आहेत?हे थोडेच कुणाला माहिती आहे.ब्रह्माचे पिता पण शिवबाबा आहेत.सर्वांचे हृदय जिंकणारे तर बेहद्द चे बाबाच असतील.तत्व इ. सर्वांचे कल्याण करतात.हे पण मुलांना समजले आहे,दुसऱ्या धर्माचे ग्रंथ इत्यादी कायम आहेत. तुम्हाला संगमावरती ज्ञान मिळते,परत विनाश होतो,तर कोणते ग्रंथ राहत नाहीत.ग्रंथ भक्तीमार्गाच्या आठवणी आहेत. हे ज्ञान आहे.फर्क पहा ना.भक्ती खूप आहे.देवींच्या पुजे मध्ये किती खर्च करतात.बाबा म्हणतात यांच्याद्वारे अल्पकाळाचे सुख आहे.जशी-जशी भावना ठेवतात,ती पूर्ण होते.देवींचा खूप शृंगार करतात,शृगांर करत,कोणाला साक्षात्कार झाला,तर खूप खुश होतात.फायदा तर काहीच होत नाही.मीरा चे नाव गायन होत आले आहे.भक्तांची माळ आहे ना.स्त्रियांमध्ये मीरा आणि पुरुषामध्ये नारद शिरोमणी भक्तांचे गायन केले जाते.तुम्हा मुलांमध्ये पण क्रमानुसार आहेत. माळेचे मणी तर खूप आहेत.वरती बाबा फुल आहेत,परत युगल मेरू आहे.फुलाला सर्व नमस्ते करतात. एक-एक माळेच्या मण्याला पण नमस्ते करतात.रुद्र यज्ञाची स्थापना करतात.तर त्यामध्ये पण शिवाची जास्ती पूजा करतात.शाळीग्रामची एवढी करत नाहीत.सर्व लक्ष शिवाकडे राहते,कारण शिवबाबा द्वारेच शाळीग्राम असे श्रेष्ठ बनले आहेत.जसे आत्ता तुम्ही पावन बनत आहात,पतित-पावन बाबांची मुलं तुम्ही पण मास्टर पतित-पावन आहात.जर कोणाला रस्ता दाखवत नाहीत,तर पाई पैशाचे पद मिळेल. तरीही बाबांना तर भेटले ना,ते पण कमी थोडेच आहे.सर्वांचे पिता एकच आहेत.कृष्णासाठी थोडेच असे म्हणणार.कृष्णाला पिता म्हणणार नाहीत.मुलांना पिता थोडेच म्हणू शकतो.पिता तर तेव्हाच म्हटले जाते,जेव्हा पती-पत्नी बनतील,मुलं होतील. परत ती मुलं पिता म्हणतील,दुसरे कोणी म्हणू शकणार नाही.बाकी तसे तर कोणत्याही वयस्कर लोकांना बापूजी म्हणतात.हे शिवबाबा तर सर्वांचे पिता आहेत. गायन पण बंधुत्वभावा चे आहे. ईश्वराला सर्वव्यापी म्हटल्यामुळे पितृत्व भाव होतो.

तुम्हा मुलांना मोठ मोठ्या सभांमध्ये भाषण करावे लागेल.नेहमी कुठेपण भाषणासाठी जाता तर,ज्या विषयावरती भाषण करायचे आहे,त्या विषयावरती विचार सागर मंथन करायला पाहिजे.बाबांना तर विचार सागर मंथन करायचे नाही.कल्पा पूर्वी जे ऐकवले होते,ते ऐकवून जातील.तुम्हाला तर विषयावरती समजून सांगायचे आहे.प्रथम लिहून परत वाचायला पाहिजे.भाषण केल्यानंतर स्मृतीमध्ये येते,हे ज्ञानाचे मुद्दे सांगितले नाहीत,ते स्पष्ट केले असते,तर चांगले झाले असते.असे होत राहते.काही ना काही मुद्दे विसरतात.प्रथम तर बोलायला पाहिजे,बंधू-भगिनींनो,आत्म अभिमानी बनून बसा.हे तर कधीच विसरले नाही पाहिजे.असे कोणी समाचार लिहीत नाहीत.प्रथम तर सर्वांना सांगायचे आहे.आत्मा अभिमानी होऊन बसा.तुम्ही आत्मा अविनाशी आहात.आता बाबा येऊन ज्ञान देत आहेत.बाबा म्हणतात,माझी आठवण केल्यामुळेच विकर्म विनाश होतील. कोणत्याही देहधारींची आठवण करू नका.स्वतःला आत्मा समजा. आम्ही तेथील राहणारे आहोत.

आमचे बाबा कल्याणकारी शिव आहेत.आम्ही आत्मे त्यांची मुलं आहोत.बाबा म्हणतात, आत्माभिमान बना.मी आत्मा आहे. बाबाच्या आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतील.गंगास्नान इत्यादीमुळे विकर्म विनाश होणार नाहीत.बाबांच्या सुचना आहेत, तुम्ही माझी आठवण करा.ते लोक गीता वाचतात,यदा यदा ही धर्मस्य.. म्हणतात परंतु अर्थ काहीच जाणत नाहीत.तर बाबा सेवा करण्यासाठी मत देतात.बाबा म्हणतात,स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा.ते समजतात कृष्णाने म्हटले आहे,तुम्ही म्हणाल शिवबाबा,आम्हा मुलांना समजत आहेत,माझी आठवण करा.माझी आठवण कराल,तेवढे सतोप्रधान बनून उच्चपद मिळवाल.मुख्य लक्ष पण समोर आहे.पुरुषार्थ द्वारे उच्चपद मिळवायचे आहे.यामुळे आपल्या धर्मामध्ये पण उच्चपद मिळवतील.आम्ही दुसऱ्याच्या धर्मामध्ये जात नाहीत.ते तर नंतर येतात.ते पण जाणतात,आमच्या अगोदर स्वर्ग होता.भारत सर्वात प्राचीन आहे,परंतु कधी होता ते कोणी जाणत नाहीत.त्यांना भगवान भगवती पण म्हणतात,परंतु बाबा म्हणतात,भगवान भगवती म्हणू शकत नाहीत.भगवान तर एकच मी आहे.आम्ही ब्राह्मण आहोत.शिव पित्याला तर ब्राह्मण म्हणणार नाहीत.ते उच्च ते उच्च भगवान आहेत,त्यांच्या शरीराचे नाव तर नाही.तुमच्या सर्वांच्या शरीराचे नाव पडते.आत्मा तर आत्माच आहे.

ते पण परम आत्मा आहेत,त्यांचे नाव शिव आहे,ते निराकार आहेत. न सूक्ष्म,न स्थूल शरीर आहे.असे नाही की,त्यांचा आकार च नाही. ज्यांचे नाव आहे,त्याचा आकर पण जरूर आहे.नावा रूपा शिवाय कोणती गोष्ट असू शकत नाही. परमात्म्या ला नावा रूपापेक्षा वेगळे म्हणने,खूप मोठे अज्ञान आहे.बाबा पण नावारूपा पेक्षा वेगळे,मुलं पण नावारूपा पेक्षा वेगळे,तर सृष्टीच होणार नाही.तुम्ही आता चांगल्या रीतीने समजवू शकतात.गुरु लोक अंत काळात समजतील. आता त्यांची बादशाही आहे.

तुम्ही आता दुहेरी अहिंसक आहात. देवी देवता धर्माचे गायन आहे. कोणाला हात लावणे,दुःख देणे,ही पण हिंसा झाली.बाबा रोज-रोज समजावत राहतात.मनसा वाचा कर्मणा कधी कोणाला दुःख द्यायचे नाही.मन्सामध्ये जरूर येईल. सतयुगामध्ये मन्सामध्ये पण येणार नाही.येथे तर मन्सा, वाचा, कर्मणा मध्ये येते.हे अक्षर तुम्ही तेथे ऐकू शकणार नाहीत.न तेथे कोणता सत्संग इत्यादी असतो.सत्संग सत्य द्वारे होतो,सत्य बनण्यासाठी सत्यम शिवम एकच आहेत.बाबा नारायण बनण्याची कथा ऐकवतात,ज्याद्वारे तुम्ही नारायण बनतात,परत भक्ती मार्गामध्ये सत्यनारायणाची कथा मोठ्या प्रेमाने ऐकतात.दिलवाडा मंदिर खूप चांगले आहे,जरुर संगम युगा वरतीच हृदय जिंकले असेल. आदिदेव आणि देवी बसले आहेत. हे वास्तविक स्मृतिस्थळ आहे, त्यांचा इतिहास भूगोल तुमच्याशिवाय कोणीच जाणत नाहीत.हे तुमचे स्मृती स्थळ आहे.हे पण आश्चर्य आहे.लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये जाता तर,तुम्ही म्हणाल आम्ही असे श्रेष्ठ बनत आहोत.येशू ख्रिस्त पण येथेच आहेत.अनेक जण म्हणतात येशू ख्रिस्त गरिबाच्या रूपांमध्ये आहेत.तमोप्रधान म्हणजेच गरीब झाले ना.पुनर्जन्म तर जरूर घेतील ना.श्रीकृष्ण राजकुमारच आत्ता गरीब आहेत.गोरे आणि सावळे.तुम्ही पण जाणतात,भारत काय होता,आता काय आहे.बाबा तर गरीब निवाज आहेत.मनुष्य गरिबांना दान पुण्य ईश्वरा अर्थ करतात.गरिबांना धान्य मिळत नाही.पुढे चालून तुम्ही पहाल,मोठ्या सावरकरांना पण धान्य मिळणार नाही.गावा गावांमध्ये सावकार राहतात ना,ज्यांना डाकू लोक लुटतात. पदांमध्ये तर फरक राहतो ना.बाबा म्हणतात,पुरुषार्थ असा करा,जे क्रमांक एक मध्ये याल.शिक्षकाचे काम आहे सावधान करणे.चांगल्या मार्काने पास व्हायचे आहे.ही बेहदची ची पाठशाळा आहे.हे राजाई स्थापन करण्यासाठी राज योग आहे.तरीही जुन्या दुनिया चा विनाश होणार आहे.नाही तर राज्य कुठे कराल,ही तर पतित धरणी आहे.

मनुष्य म्हणतात,गंगा पतित पावनी आहे.बाबा म्हणतात या वेळेत पाच तत्व तमोप्रधान पतित आहेत.सर्व खराब कचरा इत्यादी तेथे जाऊन पडतात.मासे इत्यादी त्याच्यामध्ये राहतात.पाण्याची पण एक जशी दुनिया आहे.पाण्यामध्ये अनेक जीवजंतू राहतात.मोठ मोठ्या सागरा द्वारे किती भोजन मिळते. तर गाव झाले ना.गावाला परत पतित-पावन कसे म्हणणार?बाबा म्हणतात,गोड मुलांनो पतित-पावन तर एक शिव पिताच आहेत.तुमची आत्मा आणि शरीर पतित झाले आहेत.आता माझी आठवण करा तर तुम्ही पावन पावन बनाल.विश्वा चे मालक खूप सुंदर बनतात,तेथे दुसरा कोणता खंड नसतो. भारताची सर्वांगीण भूमिका आहे. तुम्ही सर्वांगीन भूमिका करणारे आहात.नाटकांमध्ये कलाकार क्रमानुसार येत जातात.येथे पण असे आहे.बाबा म्हणतात तुम्ही सर्वांना समजावून सांगा भगवान आम्हाला शिकवत आहेत.आम्ही पतित-पावन ईश्वरीय पित्याचे विद्यार्थी आहोत,यामध्ये सर्व आले.पतित-पावन पण झाले, गुरु शिक्षक पण झाले. पिता पण झाले. ते पण निराकार आहेत.ईश्वराची खूप महिमा करतात आणि बाकी काय आहे बिंदू.त्यांच्या मध्ये भुमिका किती भरली आहे.आता बाबा म्हणतात,गृहस्थ व्यवहारांमध्ये राहत माझीच आठवण करा. भक्तिमार्गा मध्ये जे नवविध भक्ती करतात,त्याला सतोप्रधान नवविधा भक्ति म्हणतात.खूप कडक भक्ती करतात.आता परत आठवणीच्या यात्रा तिव्र पाहिजे.आठवण करणाऱ्यांणांच उच्चपद मिळेल, विजय माळेचे मणी बनतील.अच्छा.

गोडगोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) नरा पासून नारायण बनण्यासाठी रोज सत्य बाबाकडून ऐकायचे आहे. सत्संग करायचा आहे.कधी मन्सा, वाचा, कर्मणा कोणालाही दुःख द्यायचे नाही.
(2) विजय माळेचा मणी बनण्यासाठी किंवा चांगल्या मार्काने पास होण्यासाठी,आठवणीची यात्रा तीव्र करायची आहे.मास्टर पतित पावन बनून, सर्वांना पावन बनवण्याची सेवा करायची आहे.

वरदान:-
मरजीवा जन्माच्या स्मृती द्वारे,सर्व कर्म बंधनांना समाप्त करणारे कर्मयोगी भव.

हा मरजीवा दिव्य जन्म कर्मबंधनी जन्म नाही,हा कर्मयोगी जन्म आहे. या जन्मामध्ये ब्राह्मण आत्मा स्वतंत्र आहे,ना की परतंत्र्य.हा देह पण भाड्याने मिळालेला आहे.संपुर्ण विश्वामध्ये सेवा करण्यासाठी जुन्या शरीरामध्ये बाबा शक्ती भरून चालवत आहेत.जिम्मेवारी बाबांची आहे,न की तुमची.बाबानी श्रीमत दिली आहे,कर्म करा तुम्ही स्वतंत्र आहात,चालवणारे चालवत आहेत. या विशेष धारणा द्वारे,कर्म बंधनांना समाप्त करून,कर्मयोगी बना.

बोधवाक्य:-
वेळेच्या जवळीकतेचा पाया आहे-बेहद्दची वैराग्य वृत्ती.