17-11-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबा निर्विकारी दूनिया बनवण्यासाठी, तुमचे चरित्र सुधारण्यासाठी आले आहेत. तुम्ही भाऊ, भाऊ आहात, तर तुमची दृष्टी फार शुद्ध असली पाहिजे."

प्रश्न:-
तुम्ही मुले बेफिक्र बादशाह आहात, तरी पण तुम्हाला एक मूळ चिंता अवश्य असली पाहिजे, ती कोणती?

उत्तर:-
आम्ही पतिता पासून पावन कसे बनू, ही मूळ चिंता आहे. असे होऊ नये कि, बाबाचे बनून मग बाबा समोर सजा खावी लागेल. शिक्षे पासून वाचण्याची चिंता राहावी, नाही तर त्यावेळी फार लाज वाटेल. तसे तुम्ही बेफिक्र बादशाह आहात, सर्वांना बाबा चा परिचय द्या. कोणी समजून घेईल, तर बेहद चा मालक बनेल, समजून नाही घेतले तर त्याचे नशीब. तुम्ही त्याची काळजी करू नका.

ओम शांती।
आत्मिक पिता ज्यांचे नाव शिव आहे. ते आपल्या मुलाला समजावत आहेत. आत्मिक पिता सर्वांचे एकच आहेत. प्रथम ही गोष्ट समजावयाची आहे, त्या नंतर पुढे समजवणे सोपे होऊल. जर बाबाचा परिचय मिळाला नाही, तर मग प्रश्न विचारीत राहतील. पहिल्या प्रथम तर हा निश्चित करावयाचा आहे. साऱ्या दुनियेला हे माहित नाही कि, गीतेचा भगवान कोण आहे. ते कृष्णाला म्हणतात. आम्ही म्हणतो, परमपिता परमात्मा शिव गीतेचे भगवान आहेत. तेच ज्ञानाचे सागर आहेत. मुख्य सर्व शास्त्र शिरोमणी गीता आहे. भगवाना साठी म्हणतात, हे प्रभू तुमची गत मत वेगळी आहे. कृष्णासाठी असे म्हणत नाहीत. बाबा सत्य आहेत, ते जरूर सत्य सांगतील. दुनिया प्रथम नवी सतोप्रधान होती. आता दुनिया तमोप्रधान जुनी झाली आहे. दुनियेला बदलविणारे एक बाबाच आहेत. बाबा कशी बदलत आहेत, ते पण समजावले पाहिजे. आत्मा जेव्हा सतोप्रधान बनेल, तेव्हा दुनिया पण सतोप्रधान स्थापन होते. पहिल्या प्रथम तुम्हा मुलांना अंतर्मुख व्हायचे आहे, जास्त बडबड करायची नाही. आत येतात, तर अनेक चित्रे पाहून विचारतात. पहिल्या प्रथम ही एक गोष्ट समजावयाची आहे. जास्त विचारण्या साठी संधी देऊ नये. सांगा, प्रथम तर एका गोष्टीवर निश्चय करा. मग पुढे सांगा, त्यानंतर तुम्ही 84 जन्मांचे चक्रा वर समजावू शकता. बाबा म्हणतात, मी अनेक जन्माच्या अंता मध्ये प्रवेश करत आहे. यांना पण बाबा समजावतात, तुम्ही तुमच्या जन्माला ओळखत नाही. बाबा आम्हाला प्रजापिता ब्रह्मा द्वारे समजावत आहेत. पहिल्या प्रथम अल्फवर समजावयाचे आहे. अल्फ समजल्यानंतर मग कांही संशय राहणार नाही. सांगा, बाबा सत्य आहेत, ते कधी असत्य सांगत नाहीत. बेहदचे बाबाच राजयोग शिकवत आहेत. शिवरात्रीचे गायन आहे, तर जरूर शिव इथे आले असतील ना. तसेच श्रीकृष्ण जयंती पण साजरी केली जाते. बाबा सांगतात, मी ब्रम्हा द्वारे स्थापना करत आहे. त्या एकाच निराकार बाबाची सर्व मुले आहेत. तुम्ही पण त्यांची मुले आहात, आणि नंतर प्रजापिता ब्रह्माची पण मुले आहात. प्रजापिता ब्रह्मा द्वारे स्थापना होते, त्यावेळी जरूर ब्राह्मण ब्राह्मणी असतात. बहिण भाऊ होतात, यामध्ये पवित्रता राहते. गृहस्थ व्यवहारा मध्ये राहून पवित्र राहण्या साठी ही युक्ती आहे. बहीण-भाऊ आहेत, त्यामुळे कधी विकारी दृष्टी राहत नाही. एकवीस जन्मासाठी दृष्टी सुधारते. बाबा मुलांना शिक्षण देत आहेत, चरित्र सुधारत आहेत. आता साऱ्या दुनियेचे चरित्र सुधरणार आहे. या जुन्या पतित दुनिये मध्ये का़ही चरित्र नाही. सर्वां मध्ये विकार आहेत, ही पतित विकारी दुनिया आहे. मग निर्विकारी दुनिया कशी बनेल? आता बाबा शिवाय कोणी बनवत नाही. आता बाबा पवित्र बनवत आहेत. या सर्व गुप्त गोष्टी आहेत. आम्ही आत्मा आहोत, आत्म्याला परमात्मा पित्याला भेटायचे आहे. सर्व पुरुषार्थ परमेश्वराला भेटण्यासाठीच करतात. भगवान एक निराकार आहे. मुक्तिदाता, मार्गदर्शक पण परमात्म्याला म्हटले जाते. दुसऱ्या धर्मातील कोणाला मुक्तिदाता, मार्गदर्शक म्हणत नाहीत. परमपिता परमात्मा येऊन मुक्त करत आहेत, म्हणजे तमोप्रधान पासून सतोप्रधान बनवत आहेत. मार्गदर्शन करतात, तर पहिल्या प्रथम ही एकच गोष्ट बुद्धी मध्ये बसवा. जर समजत नाहीत, तर सोडून द्या. अल्फ ला समजले नाही, तर बे पासून काय फायदा. जरी ते गेले तरी चालतील. तुम्ही चिंता करू नका. तुम्ही बेफिक्र बादशहा आहात. आसुरांचे विघ्न तर पडतच आहेत. हा रूद्र ज्ञान यज्ञ आहे. तर पहिल्या प्रथम बाबा चा परिचय द्यायचा आहे. बाबा म्हणतात मनमनाभव. जेवढा पुरुषार्थ कराल, त्यानुसार पद मिळेल. आदि सनातन देवी देवता धर्माचे राज्य स्थापन होत आहे. या लक्ष्मी-नारायणा ची राजधानी आहे. इतर धर्म वाले कांही राजधानी स्थापन करत नाहीत. बाबा येऊन तर सर्वांना मुक्त करत आहेत. मग आपापल्या वेळी, इतर धर्मस्थापक येऊन आपला धर्म स्थापन करत आहेत. वृध्दी होणार आहे. पतित बनायचे आहे. पतिताना पावन बनविण्याचे काम तर बाबाचे आहे. ते तर फक्त येऊन धर्म स्थापन करतात. त्या मध्ये मोठेपणाची गोष्ट नाही. महिमा एकाचीच आहे. ते तर क्राइस्ट साठी किती करतात. त्यांना पण सांगितले पाहिजे, मुक्तिदाता, मार्गदर्शक तर ईश्वर पिता आहेत. बाकि क्राइस्टने काय केले? त्यांच्या नंतर ख्रिश्चन धर्माचे आत्मे येत राहतात, खाली उतरत राहतात. दुःखा पासून सोडवणारे तर एकच बाबा आहेत. हे सर्व मुद्दे बुद्धी मध्ये चांगल्या रीतीने धारण करायचे आहेत. एका परमेश्वरालाच दयाळू म्हटले जाते. क्राइस्ट कांही दया करत नाहीत. एक पण मनुष्य कोणावर दया करत नाही. बेहदची दया होत आहे. एक बाबा सर्वा वर दया करत आहेत. सतयुगा मध्ये सर्व सुख शांती मध्ये राहतात. दुःखाची गोष्टच नसते. मुख्य एक गोष्ट, अल्फ वर कोणाचा निश्चय बसवत नाहीत, इतर गोष्टींवर सांगतात, आणि मग म्हणतात, सांगून सांगून गळाच खराब झाला. पहिल्या प्रथम बाबाचा परिचय द्यायचा आहे. तुम्ही इतर गोष्टीं मध्ये जाऊच नका. त्यांना सांगा, बाबा तर सत्य बोलतात ना. आम्हाला बी. के. ना बाबा सांगत आहेत. ही चित्रे सर्व त्यांनी बनविली आहेत. यामध्ये संशय येऊ नये. संशय बुद्धी विनश्यंती. प्रथम तुम्ही स्वतःला आत्मा समजून, बाबाची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. आणखीन कोणता उपाय नाही. पतित-पावन तर एकच आहेत ना. बाबा म्हणतात देहाचे सर्व संबध सोडून, माझी एकाची आठवण करा. बाबा ज्यांच्या मध्ये प्रवेश करतात, मग त्यांना पण पुरुषार्थ करून सतोप्रधान बनायचे आहे. पुरुषार्थाने बनतील, त्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू चा काय संबंध आहे, ते सांगातात. बाबा तुम्हा मुलांना राजयोग शिकवत आहेत. त्यामुळे तुम्ही विष्णुपुरी चे मालक बनता. मग तुम्ही 84 जन्म घेऊन, अंत काळात शुद्र बनता, परत बाबा येऊन शुद्राला ब्राह्मण बनवतात. असे आणखीन कोणी सांगू शकत नाही. पहिली गोष्ट आहे, बाबाचा परिचय देणे. बाबा म्हणतात, मला पतिताना पावन बनवण्यासाठी येथे यावे लागते. असे नाही कि, वरुन प्रेरणा देतो. यांचेच नाव भगीरथ आहे. जरूर त्यांच्या मध्ये प्रवेश करतात. हा अनेक जन्मातील शेवटचा जन्म आहे. मग सतोप्रधान बनत आहेत. त्यासाठी बाबा युक्ती सांगत आहेत कि, स्वतःला आत्मा समजून माझी एकाची आठवण करा. मीच सर्वशक्तिमान आहे. माझी आठवण केल्याने, तुमच्या मध्ये शक्ती येईल. तुम्ही विश्वाचे मालक बनाल. हा लक्ष्मी नारायणा चा वारसा यांना बाबा कडून मिळाला आहे. कसा मिळाला ते सांगत आहेत. प्रदर्शनी, संग्रहालय इत्यादीं मध्ये पण तुम्ही सांगू शकता कि, प्रथम एका गोष्टी मध्ये समजावा, मग इतर गोष्टीं मध्ये समजून सांगा. हे समजणे फार जरुरीचे आहे, नाहीतर तुम्ही दुःखा पासून मुक्त होणार नाहीत. प्रथम जोपर्यंत निश्चय केला नाही, तोपर्यंत तुम्ही काही समजू शकणार नाहीत. यावेळी भ्रष्टाचारी दुनिया आहे. देवी देवतांची दुनिया श्रेष्ठाचारी होती. असे असे समजावयाचे आहे. मनुष्याची नाडी पण पाहिली पाहिजे. कांही समजतात कि, वेडगळ आहे. जर वेडगळ असेल तर त्याला सोडून द्या. वेळ वाया घालवायचा नाही. चात्रक, पात्रला पारखण्या ची पण बुद्धी पाहिजे. जो समजून घेणारा असेल, त्याचा चेहरा बदलून जातो. पहिल्या प्रथम तर खुशी ची गोष्ट सांगायची आहे. बेहच्या बाबा कडून बेहदचा वरसा मिळत आहे. बाबा जाणतात कि, आठवणीच्या यात्रेमध्ये मुले फार ढिल्ली आहेत. बाबाला आठवण करण्याची मेहनत आहे. त्यामध्येच माया फार विघ्न घालते. हा खेळ पूर्वनियोजित बनलेला आहे. बाबा सांगत आहेत, कसा हा खेळ पूर्वनियोजित बनलेला आहे. दुनियेतील मनुष्य तर थोडे पण जाणत नाहीत.

बाबाच्या आठवणी मध्ये राहून, तुम्ही कोणाला समजावताना एकरस राहाल. नाहीतर कांही ना कांही कमी कमतरता काढत राहाल. बाबा म्हणतात, तुम्ही जास्त कांही पण त्रास घेऊ नका. स्थापना तर जरूर होणारच आहे. भविष्याला कोणी टाळू शकत नाही. आनंदा मध्ये राहायचे आहे. बाबा कडून आम्ही बेहदचा वरसा घेत आहोत. बाबा म्हणतात, माझी एकट्याची आठवण करा. फार प्रेमाने समजावून सांगायचे आहे. बाबांची आठवण करताना, प्रेमाचे आश्रू आले पाहिजेत. आणि इतर सर्व संबंध कलीयुगी आहेत. हा आत्मिक पित्याचा संबंध आहे. हे तुमचे अश्रूच विजय माळे चे मणका बनवतील. फार थोडे आहेत, जे इतक्या प्रेमाने बाबांची आठवण करतात. प्रयत्न करून जेवढे होईल, तेवढा वेळात वेळ काढून, आपल्या भविष्याला उंच बनवायचे आहे. प्रदर्शनी मध्ये अनेक मुलांची गरज नाही. ना एवढ्या चित्रांची गरज आहे. नंबर एक चे चित्र आहे, गीतेचा भगवान कोण? त्यांच्या बाजूला लक्ष्मीनारायणाचे, शिडीचे, बसं, बाकी कांही कामाची चित्रे नाहीत. तुम्हा मुलांना जेवढे होईल तेवढे आठवणीच्या यात्रेला वाढवायचे आहे. चिंता राहिली पाहिजे कि, पतिता पासून पावन कसे बनायचे. बाबाचे बनून मग बाबा समोर जाऊन, शिक्षा भोगणे ही तर मोठी दुर्गती ची गोष्ट आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये राहिले नाही, तर मग बाबा समोर सजा भोगताना, फार लाज वाटेल. सजा खावी लागणार नाही, याची सर्वात जास्त चिंता राहिली पाहिजे. तुम्ही रूप पण आहात, बसंत पण आहात. बाबा पण म्हणतात, मी रूप पण आहे, वसंत पण आहे. छोटी बिंदू आहे आणि मग ज्ञानाचा सागर पण आहे. तुमच्या आत्म्या मध्ये सारे ज्ञान भरले आहे. 84 जन्मांचे सारे रहस्य तुमच्या बुद्धी मध्ये आहे. तुम्ही ज्ञानाचे स्वरूप बनून, ज्ञानाची वर्षा करत आहात. ज्ञानाचे एक एक रतन किती अमूल्य आहे. याची किंमत इतर कोणी करू शकत नाही. त्यामुळे बाबा म्हणतात, तुम्ही पद्मा पदम भाग्यशाली आहात. तुमच्या पावला मध्ये पद्मा ची खुण पण दाखवतात, याला कोणी समजू शकत नाही. मनुष्य पदमपती नाव ठेवतात. समजतात त्यांच्या जवळ फार धन आहे. पदमपती एक आडनाव पण ठेवतात. बाबा सर्व गोष्टी समजावत आहेत. मग म्हणतात, मूळ गोष्ट ही आहे, बाबा ला आणि 84च्या चक्राची आठवण करा. हे ज्ञान भारत वाशी साठीच आहे. तुम्ही चौऱ्यांशी जन्म घेत आहात, ही पण समजण्याची गोष्ट आहे ना. इतर कोण्या संन्याशांना सुदर्शन चक्रधारी म्हणत नाहीत. देवतांना पण म्हणत नाहीत. देवतां मध्ये तर ज्ञान असतच नाही. तुम्ही म्हणता, आमच्या मध्ये सारे ज्ञान आहे. या लक्ष्मीनारायण मध्ये पण नाही. बाबा तर यथार्थ गोष्ट समजावत आहेत ना.

हे ज्ञान फार आश्चर्यकारक आहे. तुम्ही किती गुप्त विद्यार्थी आहात. तुम्ही म्हणता आम्ही पाठशाळे मध्ये जात आहोत. भगवान आम्हाला शिकवत आहे. मुख्य लक्ष्य काय आहे? आम्ही लक्ष्मीनारायण बनू. मनुष्य ऐकून आश्चर्य करतील. आम्ही आमच्या मुख्यालया ला जात आहोत. काय शिकत आहोत? मनुष्या पासून देवता, बेगर पासून राजकुमार बनण्याचे शिक्षण घेत आहोत. तुमचे चित्र पण खूप आहेत. धन दान पण नेहमी पात्रला च दिले जाते. पात्र तुम्हाला कुठे भेटतील? शिवाच्या, लक्ष्मीनारायणाच्या, राम सीतेच्या मंदिरांमध्ये. तिथे जाऊन तुम्ही त्यांची सेवा करा. आपला वेळ वाया घालवू नका. गंगा नदी वर पण जाऊन तुम्ही समजावू शकता, पतित पावनी गंगा आहे कां परमपिता परमात्मा आहेत? सर्वांची सद्गती हे पाणी करेल, का बेहदचे बाबा करतील? तुम्ही यावर चांगल्या प्रकारे समजावू शकता. विश्वाचा मालक बनण्याचा रस्ता सांगत आहात. दान करत आहात, कवडी सारख्या मनुष्याला हिऱ्या सारखे विश्वाचे मालक बनवता. भारत विश्वाचा मालक होता ना. तुम्हा ब्राह्मणांचे देवता पेक्षा पण उत्तम कुळ आहे. हे बाबा तर समजतात कि, मी बाबाचा एकच अति प्रिय मुलगा आहे. बाबांनी माझे शरीर भाड्याने घेतले आहे. तुमच्या शिवाय कोणी पण या गोष्टी समजू शकत नाही. बाबांनी माझ्यावर सवारी केली आहे. मी बाबाला खांद्यावर बसवले आहे म्हणजे शरीर दिले आहे, सेवेसाठी. त्या बदल्यात मग बाबा किती देतात. आम्हाला सर्वात उंच, खांद्यावर चढवत आहेत. नंबर एक ला घेऊन जात आहेत. पित्याला मुले प्रिय वाटतात, तर त्यांना खांद्यावर घेतात ना. आई मुलांना फक्त कमरेवरच घेते. पिता तर खांद्यावर बसवतात. पाठशाळे ला कधी कल्पना म्हणत नाहीत. शाळे मध्ये इतिहास भूगोल शिकवतात, तर काय ती कल्पना आहे? इथे पण जगाचा इतिहास भूगोल आहे ना. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात‌ आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) फार प्रेमाने बसून आत्मिक पित्याची आठवण करायची आहे. आठवणी मध्ये प्रेमाचे अश्रू आले पाहिजेत, तर ते अश्रू विजयमाळेचे मणी बनवतील. आपला वेळ भविष्य प्रालब्ध बनविण्या मध्ये सफल करावयाचा आहे.

(२) अंतर्मुखी बनून सर्वांना बाबाचा परिचय द्यायचा आहे, जास्त बडबड करायची नाही. एकच चिंता राहिली पाहिजे कि, असे कोणते कर्तव्य होऊ नये, ज्याची सजा खावी लागेल.

वरदान:-
शुभ भावनेने सेवा करणारे, बाबा सारखे अपकारी वर पण उपकारी भव.

जसे बाबा अपकारी वर उपकार करत आहेत, तसे तुमच्या समोर कोणती पण आत्मा आली, परंतु तुमच्या दयेच्या वृत्तीने, शुभभावनेने त्यांना परिवर्तन करा, ही खरी सेवा आहे. जसे वैज्ञानिक वाळूमध्ये पण शेती करतात, तसे शांती च्या शक्तीने दयाळू बनून, अपकारी वर पण उपकार करून, धरणीला परिवर्तन करा. स्वपरिवर्तनाने, शुभभावनेने, कोणत्याही आत्म्याचे परिवर्तन होईल. कारण शुभ भावना सफलता अवश्य प्राप्त करून देते.

बोधवाक्य:-
ज्ञानाचे स्मरण करणेच, नेहमी आनंदी राहण्याचा आधार आहे.