19-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, ज्यांनी सुरुवाती पासून भक्ती केली आहे,त्यांचेच 84 जन्म आहेत,ते तुमचे ज्ञान खूप आवडीने ऐकतील,इशाऱ्या द्वारे समजतील.

प्रश्न:-
देवी-देवता घराण्याच्या जवळ येणारे आत्मे किंवा दूर असणारे,त्यांची लक्षणे काय असतील?

उत्तर:-
जे तुमच्या देवता घराण्याचे आत्मे असतील त्यांना,ज्ञानाच्या सर्व गोष्टी ऐकताच पटतील,ते संभ्रमित होणार नाहीत.जेवढी भक्ती जास्त केली असेल तेवढे ज्ञान जास्त ऐकण्याचे प्रयत्न करतील.तर मुलांना नाडी पाहून म्हणजे आवड पाहुन सेवा करायची आहे.

ओम शांती।
आत्मिक पिता,आत्मिक मुलांना समजावत आहेत.हे तर मुलं समजले आहेत,आत्मिक पिता निराकार आहेत,या शरीराद्वारे सन्मुख समजावत आहेत.आम्ही आत्मा पण निराकार आहोत,या शरीरा द्वारे एकतो.तर आता दोन पिता एकत्र आहेत.मुलं जाणतात दोन्ही बाबा येथे आहेत.तिसऱ्या पित्याला जाणतात परंतू त्यांच्यापेक्षा हे चांगले आहेत.क्रमानुसार तर आहेत.तर त्या लौकिक मधुन संबंध काढून बाकी या दोघांशी संबंध होतो.बाप बसून समजतात मनुष्यांना कसे समजावयला पाहिजे. तुमच्या जवळ मेळ्यामध्ये,प्रदर्शनी मध्ये अनेक येतात.हे पण तुम्ही जाणतात,८४ जन्म सर्वच घेत नाहीत.ते कसे माहिती होईल,ते ८४ जन्म घेणारे आहेत,की १०जन्म घेणारे आहेत,की२०जन्म घेणारे आहेत.आता तुम्ही मुलं समजतात,ज्यांनी सुरुवाती पासून खूप भक्ती केली असेल त्यांना फळ पण तेवढेच लवकर आणि चांगले मिळेल.थोडी भक्ती केली असेल आणि उशिरा सुरु केली असेल तर फळ पण थोडेच आणि उशिरा मिळेल.बाबा सेवा करणाऱ्या मुलांना हे समजवतात. तुम्ही भारतवासी आहात,तर सांगा की देवी-देवतांना मानतात का?भारतामध्ये या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना.जे ८४जन्म घेणारे असतील,सुरुवाती पासून भक्ती केली असेल,तर ते लगेच समजतील,बरोबर आदी सनातन देवी-देवता धर्म होता,आवडीने ऐकायला लागतील.काही तर असेच पाहून चालले जातात,काही विचारत पण नाहीत.त्याच्या बुद्धीमध्ये काहीच बसत नाही,तर त्यांच्यासाठी समजायला पाहिजे हे आजपर्यंत येथे येणारे नाहीत,पुढे चालून समजू शकतील.कोणाला समजवल्या मुळे लगेच त्यांचा खांदा हालेल,म्हणजेच होय, होय म्हणतील.बरोबर या हिशाबा द्वारे ८४ जन्म ठीक आहेत.जर विचारतील,आम्ही कसे समजू ८४ जन्म घेतले आहेत?अच्छा ८४ नाही तर ८२ जन्म,देवता धर्मात तर आले असतील.पहा इतके बुद्धीमध्ये पटत नाहीत तर समजा,८४ जन्म घेणारे नाहीत. ज्यांनी खूप भक्ती केली असेल तर,हे ज्ञान जास्त ऐकण्याचा प्रयत्न करतील आणि लगेच समजून जातील.जर कोणी कमी समजत असतील तर ते,सृष्टिचक्रा मध्ये उशिरा येणारे असतील.भक्ती पण उशिरा सुरू केली असेल.खूप भक्ती करणारे तर इशाऱ्या द्वारे पण समजतील.सृष्टिचक्र ची पुर्नावृत्ती तर होते होते ना.सर्व भक्ती वरती आधारित आहे.या बाबाने सर्वात नंबर एक भक्ती केली आहे ना.कमी भक्ती केली असेल तर,फळ पण कमी मिळेल.या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.मोठी बुद्धी असणारे धारणा करू शकत नाहीत.हे मेळे प्रदर्शनी तर होत राहतील.सर्व भाषांमध्ये निघतील.सर्व दुनियेला समजावयाचे आहे. तुम्ही खरे खरे पैगंबर आणि संदेश वाहक आहात.ते धर्म संस्थापक तर काहीच करत नाहीत,न ते गुरु आहेत.गुरु म्हणतात परंतु ते काही सदगती दाता थोडेच आहेत.ते जेव्हा येतात,तेव्हा त्यांची संस्थाच नाहीतर कोणाची सदगती कसे करतील.गुरु तेच आहेत जे सद्गती देऊ शकतील,दुःखाच्या दुनिया पासून शांतीधाम मध्ये घेऊन जातील.येशु ख्रिस्त इ.गुरू नाहीत फक्त,ते धर्म संस्थापक आहेत.त्यांचे दुसरे काही पद नाही. पद तर त्यांचेच आहे,जे प्रथम सतो प्रधान मध्ये येतात परत,सतो रजो तमो मध्ये येतात.ते तर फक्त आपला धर्म स्थापन करून पुनर्जन्म घेत राहतात.जेव्हा सर्वांची तमोप्रधान अवस्था होते,तेव्हा बाबा येऊन सर्वांना पवित्र बनवून,घेऊन जातात. पावन बनले तर परत पतित दुनिये मध्ये राहू शकत नाहीत.पवित्र आत्मा मुक्ती मध्ये चालले जातील परत जीवन मुक्ती मध्ये येतील.असे म्हणतात,ते मुक्तीदाता आहेत, मार्गदर्शक आहेत परंतु याचा अर्थ पण समजत नाहीत.अर्थ समजतील तर त्यांना मानतील.सतयुगा मध्ये भक्ती मार्गातील अक्षरं पण बंद होतात.त्याची पण नाटकांमध्ये नोंद आहे,जे सर्व आप आपली भूमिका वठवत राहतात.सदगतीला एक ही प्राप्त करू शकत नाही.आता तुम्हाला हे ज्ञान मिळत आहे.बाबा पण म्हणतात,मी कल्प कल्पच्या संगमयुगात येतो. याला म्हटले जाते कल्याणकारी संगम युग,दुसरे कोणतेच कल्याणकारी युग नसते.सतयुग त्रेताच्या संगमचे काहीच महत्त्व नाही. सूर्यवंशी होऊन गेले परत चंद्रवंशी राज्य चालते,परत चंद्रवंशी पासून वैश्यवंशी बनतील,तर चंद्रवशीचा भूतकाळ झाला. त्यांच्यानंतर काय बनतील,ते माहिती च राहत नाही.चित्र इत्यादी राहतात तर समजतात सूर्यवंशी आमचे पुर्वज होते,हे चंद्रवंशी होते.ते महाराजा,ते राजा,ते खूप धनवान होते,तरीही नापास झाले ना.या गोष्टी कोणत्या ग्रंथांमध्ये नाहीत,आता बाबा सन्मुख समजवतात.सर्वजण म्हणतात आम्हाला मुक्त करा,पतीत पासून पावन बनवा.सुखासाठी म्हणणार नाहीत, कारण सुखासाठी ग्रंथा मध्ये निंदा केली आहे.सर्वजण असे म्हणतात,मनाला शांती कशी मिळेल?आता तुम्ही मुलं समजतात तुम्हाला सुख शांती दोन्ही मिळते.जिथे शांती आहे तेथे सुख आहे.जिथे अशांती आहेत तिथे दुःख आहे.सतयुगा मध्ये सुख शांती आहे,येथे दुःख अशांती आहे.हे बाबाच बसून समजवतात.तुम्हाला माया रावणाने खूपच तुच्छ बुद्धी बनवले आहे,हे पण नाटका मध्ये नोंदलेले आहे.बाबा म्हणतात मी पण नाटकाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे.माझी भूमिकाच आता आहे,जो मी वठवत आहे.बाबा तुम्हीच कल्प कल्प येऊन भ्रष्टाचारी पासून श्रेष्ठाचारी पावन बनवतात,असे म्हणत राहतात.रावणा द्वारे भ्रष्टाचारी बनले आहेत.आता बाबा येऊन मनुष्यापासून देवता बनवतात.हे जे गायन आहे,याचा अर्थ पण बाबाचं समजवतात.त्या अकालतख्ता वरती बसणारे पण,याचा अर्थ समजत नाहीत.बाबांनी तुम्हाला समजवले आहे,आत्मेच अकालमुर्त आहेत.आत्म्याचे हे शरीर रथ आहे,यावरती अकाल अर्थात ज्याला काल खात नाही,ती आत्मा विराजमान आहे.सतयुगा मध्ये तुम्हाला काल खाणार नाही,म्हणजे अचानक मृत्यू होणार नाही.तो अमर लोक आहे,हा मृत्यू लोक आहे.अमर लोक,मृत्यू लोक चा अर्थ पण कोणी समजत नाहीत.बाबा म्हणतात मी तुम्हाला खूपच सहज समजावतो,तुम्ही फक्त माझीच आठवण कराल,तर तुम्ही पावन बनाल.साधुसंत इत्यादी पण गायन करतात,पतीत पावण सिताराम.. पतित-पावन बाबांनाच बोलवतात.कुठे पण जावा,हे जरूर म्हणतील,हे पतित पावन.सत्य तर कधी लपू शकत नाही. तुम्ही जाणता आत्ता पतित-पावन बाबा आले आहेत,आम्हाला रस्ता दाखवत आहेत.कल्पा पूर्वी पण म्हटले होते, स्वतःला आत्मा समजून माझीच आठवण करा,तर तुम्ही सतोप्रधान बनाल.तुम्ही सर्व मज साजनच्या सजनी आहात.ते साजन- सजनी तर एका जन्मासाठी असतात.तुम्ही तर जन्म-जन्मांतरच्या सजनी आहात. तुम्ही आठवण करत आले,हे प्रभू.एक बाबाच देणारे आहेत.सर्व मुलं पित्या कडुनच मागतात.आत्मा जेव्हा दुखी होते तेव्हा बाबाची आठवण करते.सुखामध्ये कोणी आठवण करत नाहीत,दुःखामध्ये आठवण करतात,बाबा येऊन सद्गती द्या.जसे गुरुकडे जातात,आम्हाला मुलगा द्या.अच्छा मुलगा मिळाला तर खूप खुश होतात,मुलगा नाही झाला तर म्हणतात ईश्वराची भावी.या नाटकाला तर ते समजत नाहीत.जर ते नाटक म्हणतील,तर परत सर्व माहीत व्हायला पाहिजे.तुम्ही नाटकाला जाणतात,दुसरे तर कोणी जाणत नाहीत,न कोणत्या शास्त्र मध्ये आहे.नाटक म्हणजे नाटक.त्याच्या आदी मध्य अंताची माहिती व्हायला पाहिजे.बाबा म्हणतात मी पाच-पाच हजार वर्षानंतर येतो.हे चार युग अगदी समान आहेत.स्वस्तिकाचे पण महत्व आहे, खाते जे बनवतात,त्यामध्ये पण स्वस्तिक काढतात.हे पण खाते आहे ना.आपला फायदा कशामध्ये आहे परत नुकसान कसे होते.नुकसान होत होत आता खूपच गरीब बनले आहेत.हा हार जीतचा खेळ आहे.पैसे आहेत तर आरोग्य आणि सुख आहे.पैसे आहेत आरोग्य नाही तर सुख नाही.तुम्हाला तर आरोग्य आणि संपत्ती दोन्ही देतो,तर आनंदच आहे.

जेव्हा कोणी शरीर सोडतात,तर मुखाद्वारे म्हणतात अमका स्वर्गवासी झाला परंतु मनामध्ये दुख तर राहते ना.यामध्ये तर खूशी व्हायला पाहिजे,परत त्याच्या आत्म्याला नर्का मध्ये का बोलवतात? काहीच समज नाही.आता बाबा येऊन या सर्व गोष्टी समजवतात.बीज आणि झाडाचे रहस्य समजवतात.असे झाड दुसरे कोणी बनवू शकत नाहीत.हे काही यांनी बनवले नाही.यांचे कोणी गुरू नव्हते,जर असते तर त्यांचे दुसरे शिष्य पण बनले असते ना. मनुष्य समजतात यांना कोणी गुरुंनी शिकवले असेल किंवा म्हणतात परमात्माची शक्ती प्रवेश करते.अरे परमात्म्याची शक्ती कसे प्रवेश करेल? बिचारे काहीच जाणत नाहीत.बाबा स्वतः सन्मुख समजवतात,मी म्हटले होतो,मी साधारण वृद्ध तना मध्ये येतो,येऊन तुम्हाला शिकवतो. हे पण ऐकतात,लक्ष तर आमच्या वरती आहे.हे पण विद्यार्थी आहेत.हे पण स्वतःला दुसरे काही म्हणत नाहीत.प्रजापिता पण विद्यार्थी आहेत.जरी यांनी विनाश पाहिला परंतु काहीच समजले नाही,हळूहळू समजत गेले,जसे तुम्ही समजतात.बाबा तुम्हाला समजावतात, मध्येच हे पण समजतात.अभ्यास करत राहतात.प्रत्येक विद्यार्थी राजयोगाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात.ब्रह्मा विष्णू शंकर सूक्ष्म वतनचे आहेत.त्यांची काय भूमिका आहे,हे पण कोणी जाणत नाहीत.बाबा प्रत्येक गोष्ट स्वतःच समजवतात.तुम्हाला कोणते प्रश्न विचारायची आवश्यकता नाही.वरती शिव परमात्मा आहेत,परत देवता,दोघाना एक कसे करू शकता.आता तुम्ही मुलं जाणता बाबा यांच्या मध्ये प्रवेश करतात म्हणून म्हटले जाते बाप दादा.बाप वेगळे आहेत, दादा वेगळे आहेत.बाप शिव आहेत आणि ब्रह्मा दादा आहेत.वारसा शिवा द्वारे मिळतो ना की ब्रह्मा द्वारे.ब्राह्मण ब्रह्माची मुलं झाली.बाबांनी दत्तक घेतलेआहेत,अविनाश नाटकाच्या नियोजना नुसार.बाबा म्हणतात नंबर एक भक्त हे ब्रह्मा आहेत.चौऱ्यांशी जन्म पण यांनी घेतले आहेत.सावळा आणि गोरा पण यांनाच म्हणतात.कृष्ण सतयुगा मध्ये गोरे होते,कलियुगा मध्ये सावळे आहेत.पतीत आहेत ना,परत पावन बनतात.तुम्ही पण असेच बनतात.ही दुनिया लोहयुगी आहे,ती दुनिया सुर्वण युगी आहे.शिडी बद्दल कुणालाच माहिती नाही.जे उशिरा येतात,ते थोडेच ८४ जन्म घेतील.ते जरुर कमी जन्म घेतील.परत त्यांना शिडी मध्ये कसे दाखवू शकतो? बाबाने समजवले आहे,सर्वात जास्त जन्म कोण घेतात? सर्वात कमी जन्म कोण घेतात?हे ज्ञान आहे.बाबा ज्ञान संपन्न, पतित पावन आहेत.आदी मध्य अंतचे ज्ञान ऐकवत आहेत.ते तर सर्व नेती नेती करतात,म्हणजेच आम्ही जाणत नाहीत,असे म्हणतात.आपल्या आत्म्यालाच जाणत नाहीत तर,पित्याला कसे जाणतील? फक्त असेच म्हणतात आत्मा काय गोष्ट आहे काहीच जाणत नाहीत.तुम्ही आत्ता जाणतात,आत्मा अविनाशी आहे,त्यामध्ये ८४ जन्माची भूमिका नोंदलेली आहे.इतक्या छोट्या आत्म्या मध्ये किती भूमिका नोंदलेली आहे.जे चांगल्या रीतीने ऐकतात आणि समजतात तर,समजले जाते हे परिवारा च्या संबधात येणारे आहेत.बुद्धीमध्ये बसत नाही तर उशिरा येणारे असतील. ज्ञान ऐकवताने नाडी पाहिली जाते.समजवणारे क्रमानुसार आहेत ना.तुमचा हा अभ्यास आहे,राजधानी स्थापन होत आहेत. काहीतरी उच्च राजाई पद मिळवतात,काहीतरी प्रजा मध्ये नौकर चाकर बनतात.बाकी होय,सतयुगा मध्ये काहीच दु:ख नसते.त्याला सुखधाम,स्वर्ग म्हटले जाते.भूतकाळात झाले आहे,म्हणुन तर त्याची आठवण करतात.मनुष्य समजतात कदाचित स्वर्ग वरती असेल. दिलवाडा मंदिरा मध्ये तुमचे पूर्ण यादगार आहे ना.आदी देव,आदी देवी आणि मुलं खाली योगा मध्ये बसले आहेत.वरती राजाई आहे.मनुष्य दर्शन करतात तर,ते पैसे ठेवतात.समजत काहीच नाहीत.तुम्हा मुलांना तर ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. तुम्ही सर्वप्रथम बाबांचे जीवन चरित्र जाणले आहे,बाकी काय पाहिजे?बाबांना जाणल्या मुळेच सर्व काही समजून येते.तर आनंद व्हायला पाहिजे.तुम्ही जाणतात आत्ता आम्ही,सतयुगा मध्ये जाऊन सोन्याचे महल बनवू,राज्य करू.जे सेवाधारी मुलं आहेत,त्यांच्या बुद्धीमध्ये राहील हे अध्यात्मिक ज्ञान,अध्यात्मिक पिताच देतात.अध्यात्मिक पिता,आत्म्याच्या पित्याला म्हटले जाते.तेच सद्गती दाता आहेत,सुख शांती चा वारसा देतात.तुम्ही समजावू शकता,ही शिडी भारतवासीं साठी आहे,जे ८४ जन्म घेतात.तुम्ही अर्ध्या कल्पानंतर येतात,तर तुमचे ८४ जन्म कसे होतील.सर्वात जास्त जन्म आम्ही घेतो.या खूप समजण्याच्या गोष्टी आहेत.मुख्य गोष्ट चाहे पतीता पासून पावन बनण्याची, त्यासाठी बुद्धी योग लावायचा आहे.पावन बनण्याची प्रतिज्ञा करून,जर परत बनतात, तर एकदम हाडे तुटून जातात,जसे की पाचव्या मजल्या वरून खाली पडतात. बुद्धीच अशुध्द बनते.मन खात राहते.मुखा द्वारे ज्ञान निघू शकत नाहीत,म्हणून बाबा बनतात खबरदार रहा.अच्छा. गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. या नाटकाला समजून मायेच्या बंधनापासून मुक्त व्हायचे आहे.स्वतःला अकालमुर्त आत्मा समजुन बाबांची आठवण करायची आहे.

2. खरेखुरे पैगंबर आणि संदेश वाहक बणुन सर्वांना शांतीधाम,सुखधाम चा रस्ता सांगायचा आहे.या कल्याणकारी संगमयुगा मध्ये,आत्म्याचे कल्याण करायचे आहे.

वरदान:-
सुदर्शन चक्राच्या स्म्रूती द्वारे सम्पन स्थितीचा अनुभव करणारे मालामाल भव.

जे नेहमी स्वदर्शन चक्रधारी आहेत,ते नेहमी मायेच्या अनेक प्रकारच्या चक्रापासून मुक्त राहतात. एक स्वदर्शन चक्र अनेक व्यर्थच्या चक्राला नष्ट करणारे आहे.मायेला दूर करणारे आहे.त्यांच्यापुढे माया थांबू शकत नाही.स्वदर्शन चक्रधारी मुल,नेहमी संपन्न असल्या मुळे अचल राहतात.स्वता:ला मालामाल अनुभव करतात.माया खाली करण्याचे प्रयत्न करते परंतु खबरदार,सुजाग,जागती ज्योती राहतात, म्हणून माया त्यांचे काहीच करू शकत नाही.ज्याचा लक्ष रुपी चौकीदार जागृत आहे, ते नेहमी सुरक्षित आहेत.

बोधवाक्य:-
तुमचे बोल असे समर्थ हवेत, ज्यामध्ये शुभ व श्रेष्ठ भावना सामावलेली असेल.