19-07-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   25.02.86  ओम शान्ति   मधुबन


डबल विदेशी बंधू-भगिनी च्या, समर्पण समारंभाचे वेळी, अव्यक्त बापदादाचे महावाक्य


आज बाप दादा, विशेष श्रेष्ठ दिवसाचे, विशेष स्नेहांने अभिनंदन करत आहेत.आज कोणता समारंभ साजरा केला? बाहेरचे दृश्य तर सुंदर होते. परंतु सर्वांचा उमंग उत्साह आणि दृढ संकल्पाचा, मनातील आवाज, दिलाराम बाबा जवळ पोहोचला.तर आजच्या दिवसाला, विशेष उत्साहाने भरलेला,दृढ संकल्पाचा समारंभ म्हणावे. जेंव्हा पासून बाबाचे बनले आहात,तेंव्हा पासून संबंध आहे आणि राहील.परंतु हा विशेष दिवस, विशेष रूपाने, साजरा केला,त्यामुळे त्याला म्हणतात दृढ संकल्प केला. कांही पण झाले, जरी मायेचे वादळ आले,जरी लोकांकडून वेगवेगळ्या गोष्टी आल्या, जरी प्रकृतीचे कोणते पण हालचालीचे दृष्य आले, जरी लौकिक किंवा अलौकिक संबंधा मध्ये कोणत्या पण प्रकारची परिस्थिती आली, मना मध्ये संकल्पाचे फार मोठे वादळ जरी आले, तरीपण एक बाबा दुसरे ना कोणी.एक बल एक भरोसा, असा दृढ संकल्प केला,कां फक्त स्टेजवर बसलात. डबल स्टेजवर बसला होता,की सिंगल स्टेजवर? एक आहे ही स्थूल स्टेज,दुसरी आहे दृढ संकल्पाची स्टेज्.दृढतेची स्टेज. तर डबल स्टेजवर बसले होता ना? षुष्पहार पण चांगले सुंदर घातले होते.फक्त हा हार घातला कि, सफलतेचा हार पण घातला? सफलता गळ्यातील हार आहे. ही दृढताच सफलतेचा आधार आहे. या स्थूल हारा बरोबर,सफलतेचा हार पण गळ्यात पडला होता ना.बापदादा डबल दृष्य पाहात होते. फक्त साकार रूपाचे दृष्य पाहात नाहीत. परंतु साकार दृष्या बरोबर आत्मिक स्टेज, मनातील दृढ संकल्प आणि सफलतेची श्रेष्ठ माळ, हे दोन्ही पाहात होते. डबल माळ आणि डबल स्टेज पाहत होते. सर्वांनी दृढ संकल्प केला. फार चांगले झाले. काहीं पण झाले तरी संबंधाला निभावायचा आहे. परमात्म प्रीतीची रीत, नेहमी निभावून सफलता प्राप्त करायची आहे. निश्चीत आहे की, सफलता गळ्यातील हार आहे. एक बाप दुसरे कोणी नाही, हा दृढ संकल्प आहे? जर एक असेल, तर एकरस स्थिती, स्वतः आणि सहज होते.सर्व संबंधाची अविनाश तार जोडली आहे ना. जरी एक पण संबंधाची कमी असेल,तर हलचल होईल, त्यामुळे सर्व संबंधांचा धागा बांधा.कनेक्शन जोडा.संकल्प केला.सर्व संबंध आहेत की,फक्त मुख्य तीन संबंध आहेत? सर्व संबंध आहेत, तर सर्व प्राप्ती आहेत. सर्व संबंध नाहीत, तर कोणत्या ना कोणत्या,प्राप्तीची कमी राहून जाते.सर्वांचा समारंभ झाला ना.दृढ संकल्प केल्याने पुढे पुरुषार्था मध्ये पण, विशेष रूपाने लिफ्ट मिळून जाते.ही विधी पण विशेष उमंग उत्साह वाढवत आहे. बापदादा पण सर्व मुलांनी दृढ संकल्प केल्याने अभिनंदन करत आहेत,आणि वरदान देत आहेत की, सदा अविनाशी भव.अमर भव.

आज आशियाचा ग्रुप बसला आहे. आशिया ची विशेषता काय आहे?विदेश सेवेसाठी पहिला ग्रुप जपानला गेला, ही विशेषता झाली ना. साकार बाबाच्या प्रेरणे प्रमाणे विशेष विदेश सेवेचे निमंत्रण आणि सेवेचा प्रारंभ जपान पासून झाला. तर आशिया चा नंबर स्थापने मध्ये प्रथम आहे ना. प्रथम विदेशचे निमंत्रण मिळाले. इतर धर्म वाले निमंत्रण देऊन बोलावतात, त्याचा आरंभ आशिया पासून झाला. तर आशिया किती भाग्यवान आहे! आणि दुसरी विशेषता - आशिया भारता पासून सर्वांत जवळ आहे. जो जवळ असतो त्याला अतिप्रिय म्हटले जाते.अतिप्रिय मुले लपलेली आहेत,प्रत्येक ठिकाणावरून किती चांगले चांगले रत्न निघत आहेत.संख्या जरी कमी आहे. परंतु गुणवत्ता चांगली आहे. मेहनतीचे फळ चांगले आहे. या बाजूला हळू हळू, आता संख्या वाढत आहे. सर्व स्नेही आहेत. सर्व प्रेमळ आहेत.प्रत्येक जण एक दोघां पेक्षा जास्तच स्नेही आहे. हीच ब्राह्मण परिवाराची विशेषता आहे. प्रत्येक जण हा अनुभव करत आहे की, माझे बाबांशी सर्वात जास्त स्नेह आहे, आणि बाबांचे पण माझ्यावर जास्त स्नेह आहे. मलाच बापदादा पुढे घेऊन जात आहेत, त्यामुळे भक्तिमार्ग वाल्यांनी पण फार चांगले, एक चित्र अर्थपूर्ण बनवले आहे.प्रत्येक गोपी बरोबर वल्लभ आहे. फक्त एका राधे बरोबर किंवा आठ पटराणी बरोबर नाही. प्रत्येक गोपी बरोबर गोपी वल्लभ आहे. जसे दिलवाडा मंदिरा मध्ये गेल्यावर असे वाटते की, हे माझे चित्र आहे, किंवा माझी कोठी आहे. तर या रास मंडळा मध्ये पण तुम्हां सर्वांचे चित्र आहे? याला म्हटले जाते महारास.या महारास चे फार मोठे गायन आहे्. बापदादा चे प्रत्येका वर,एक दोघा पेक्षा जास्त प्रेम आहे. बापदादा प्रत्येक मुलाचे श्रेष्ठ भाग्य पाहून हर्षित होत आहेत. जे पण आहेत ते कोटी मध्ये कोणी आहेत. पद्मापदम भाग्यवान आहेत. दुनियेच्या हिशोबाने पहा, तर एवढ्या कोटी मधून कांही आहात ना. जपान तर किती मोठा आहे,परंतु बाबाची मुलं किती आहेत! तर कोटी मध्ये कोणी झालात ना.बापदादा प्रत्येकाची विशेषता, भाग्य पाहत आहेत. कोटीं मध्ये कोणी अतिप्रिय आहेत.बाबासाठी सर्व विशेष आत्मे आहेत. बाबा कोणाला साधारण. कोणाला विशेष समजत नाहीत. सर्व विशेष आहेत.या बाजूला आणखीन ज्यादा वृध्दी होणार आहे, कारण या पूर्ण बाजूला, डबल सेवा विशेष होणार आहे. एक तर अनेक वेगवेगळ्या धर्माचे आहेत. आणि या बाजूला सिंध मधून आलेले आत्मे पण फार आहेत.त्यांची सेवा पण चांगल्या प्रकारे करू शकता.त्यांना जवळ आणले, तर त्यांच्या सहयोगाने, इतर धर्मा कडे सहज जाऊ शकाल. डबल सेवेद्वारे,डबल वृध्दी करू शकाल. त्यांच्या मध्ये कोणत्या ना कोणत्या रितीने, उलट्या रुपामध्ये किंवा सुलट्या रूपामध्ये बीज पडलेले आहे. परिचय असल्यामुळे, सहज संबंधां मध्ये येऊ शकतात. फार सेवा करू शकता,कारण सर्व आत्म्याचा परिवार आहे. ब्राह्मण सर्व धर्मां मध्ये विखरून गेले आहेत. असा कोणता धर्म नाही, ज्यामध्ये ब्राह्मण पोहचले नाहीत. आता सर्व धर्मा मधून निघून परत येत आहेत. आणि जे ब्राह्मण परिवाराचे आहेत, त्यांना पाहून आपलेपण वाटत आहे. जसे कोणत्या कर्माच्या हिसाब किताबा मुळे गेले आहेत परंतु आपल्या परिवारामध्ये आले आहेत.कुठून कुठून येऊन, आपले सेवेचे भाग्य घेण्यासाठी,निमित्त बनले आहेत. हे कांही कमी भाग्य नाही. फार श्रेष्ठ भाग्य आहे. मोठ्यातील मोठे पुण्यात्मा बनत आहेत. महादानी महान सेवाधारी च्या यादीमध्ये येतात. तर निमित्त बनणे पण एक विशेष भेट आहे.आणि डबल विदेशींना ही भेट मिळाली आहे. थोडा पण अनुभव केला आणि निमित्त बनून, सेवाकेंद्राची स्थापना करतात. तर ही पण शेवटी येऊन, पुढे जाण्याची विशेष भेट आहे. सेवा करताना अनेकांना ही स्मृति राहते की, आम्ही निमित्त बनून करू किंवा चालू, तर आम्हांला पाहून इतर करतील.तर हे डबल लक्ष्य होऊन जाते. डबल लक्ष्य असल्यामुळे डबल संधी पण मिळून जाते,समजले. डबल विदेशींना डबल संधी आहे. आता सर्वत्र वातावरण चांगले झाले आहे.नांगरट केल्यानंतर, जमीन चांगली होऊन जाते ना. आणि नंतर फळ पण चांगले आणि सहज निघते. अच्छा.आशिया मधील मोठ्या वक्त्याचा आवाज भारता मध्ये लवकरच पोहोचेल, त्यामुळे असे वक्ते तयार करा. अच्छा

मोठ्या दादी बरोबर:- तुम्हां लोकांची महिमा तर काय करावी! जसे बाबासाठी म्हणतात की, सागराला शाई बनवा,जमिनीला कागद बनवा. . . . तशीच तुम्हां सर्व दादींची महिमा आहे.जर महिमा सुरू केली, तर दिवस-रात्र एक आठवड्याचा कोर्स होऊन जाईल. चांगले आहात, सर्वांची रास चांगली आहे. सर्वांच्या राशी मिळत आहेत,आणि सर्व रास पण चांगल्या करत आहात. हाता मध्ये हात मिळवणे म्हणजे विचार मिळवणे, हीच रास आहे. तर बापदादा, दादींची हीच रास पाहात आहे. अष्ट रत्नांची पण हीच रास आहे. तुम्ही दादीं परिवाराच्या विशेष श्रृंगार आहात. जर श्रंगार नसेल,तर शोभाच राहत नाही. तर सर्व त्या दृष्टीने पाहत आहेत.

ब्रजइंद्रा दादी बरोबर:-लहानपणा पासून लौकिक मध्ये आणि अलौकिक मध्ये श्रृंगार करत आले आहात, श्रृंगार करत-करत श्रृंगारीत बनले आहात. असे आहे नां! बापदादा महावीर महारथी मुलांची नेहमी आठवण तर काय, परंतु हृदयामध्ये समाऊन ठेवत आहेत. जे समावलेले आहेत, त्यांना आठवण करण्याची पण जरुर नाही.बापदादा नेहमीच प्रत्येक विशेष रत्नाला, विश्वा समोर प्रत्यक्ष करत आहेत. तर विश्‍वा समोर प्रत्यक्ष होणारे विशेष रत्न आहांत. त्यांना सर्वांच्या खुशीची मदत आहे्. तुमच्या खुशी ला पाहून सर्वांना खुशीची खुराक मिळत आहे, त्यामुळे तुम्हां सर्वांचे आयुष्य वाढत आहे, कारण सर्वांचे स्नेहांचे आशीर्वाद मिळत आहेत. आता पण फार कार्य करायचे आहे, त्यामुळे परिवाराचे शृंगार आहात. सर्व किती प्रेमाने पाहत आहेत. जसे कोणाचे छत्र निघून गेले, तर माथा कसा वाटतो. छत्र घालणाराने जर छत्र घातले नाही तर कसे वाटेल. तर तुम्ही सर्व परिवाराचे छत्र आहात..

निर्मलशांता दादी बरोबर:- तुमचे स्मृतिस्थळ नेहमीच मधुबन मध्ये पाहत आहात ना. स्मृतिस्थळे असतातच आठवण करण्यासाठी. परंतु तुमची आठवण स्मृतिस्थळ बनुन जाते.चालता-फिरता सर्व परिवाराला, निमित्त बनलेल्या आधार मुर्ताची आठवण येत राहते. तर आधार मूर्त आहात.स्थापनेच्या कार्यामध्ये आधार मुर्त मजबूत असल्यामुळे,ही वृद्धी झाली,उन्नतीची इमारत किती मजबूत होत आहे. कारण? आधार मजबूत आहे. अच्छा.

डबल लाइट बना.(अव्यक्त मुरली मधून निवडलेले अनमोल रतन)
डबल लाइट म्हणजे आत्मिक स्वरूपामध्ये, स्थित झाल्यामुळे हलकेपण आपोआप येतो.अशा डबल लाइटलाच फरिश्ता,देवदूत म्हटले जाते. फरिश्ता कधी कोणत्या पण बंधनांमध्ये आडकत नाही. या जुन्या दुनियेच्या, जुन्या देहाच्या आकर्षणा मध्ये येत नाहीत, कारण ते आहेतच डबल लाइट.

डबल लाइट म्हणजे नेहमी उडती कलेचा अनुभव करणारे,कारण जो हलका असतो,तो नेहमी उंच उडत राहतो,ओझेवाला खाली जात राहतो. तर डबल लाइट आत्मे म्हणजे कोणते पण ओझे नाही. कारण कोणते पण ओझे असेल, तर ते उच्च स्थितीमध्ये उडू देणार नाही. डबल जबाबदारी असून सुद्धा, डबल लाइट राहिल्यामुळे,लौकिक जबाबदारी कधी थकवणार नाही, कारण विश्वस्त आहात. विश्वस्ताला कसला थकवा. आपली ग्रहस्थी, आपली प्रवृत्ती, समजाल तर ओझे आहे. आपले काहींच नाही तर ओझे कोणत्या गोष्टीचे.बिलकुल न्यारे आणि प्यारे. बालक आणि मालक.

नेहमी स्वतःला बाबाचे हवाली करून टाका, तर नेहमी हलके राहाल.आपली जबाबदारी बाबाला द्या, म्हणजे आपले ओझे बाबा ला देऊन टाका, तर स्वतः हलके होऊन राहाल. बुद्धी द्वारे पण समर्पित होऊन जा.जर बुद्धी द्वारे समर्पित झाला, तर इतर कोणतीही गोष्ट बुद्धीमध्ये येणार नाही.बसं, सर्वकांही बाबाचे आहे,सर्वकांही बाबा मध्ये आहे, तर आणखीन कांही राहिलेच नाही. डबल लाइट म्हणजे संस्कार,स्वभावाचे पण ओझे नाही, व्यर्थ संकल्पाचे पण ओझे नाही,याला म्हटले जाते हलके.जेवढे हलके राहाल, तेवढे सहजच उडती कलेचा अनुभव कराल. जर आठवणीमध्ये थोडी पण मेहनत करावी लागते, तर जरुर कोणते तरी ओझे आहे. तर बाबा चा आधार घेऊन, उडत रहा.

नेहमी हे लक्ष्य आठवणीत ठेवा कि, आम्हांला बाबा सारखे बनायचे आहे,तर जसे बाबा लाइट आहेत, तसे डबल लाइट बना. इतरांना पाहिले तर कमजोर होऊन जाल, त्यामुळे बाबाला पहा, बाबाचे अनुकरण करा. उडती कलेचे श्रेष्ठ साधन, फक्त एक शब्द आहे, "सर्व कांही तुमचे". "माझा' शब्द बदलून 'तुमचे" करून टाका. तुमचा आहे, तर आत्मा हलकी होते. आणि जेंव्हा सर्वकांही तुमचे आहे, तर हलके बनता. जसे सुरुवातीला अभ्यास करत होता, चालत होता, परंतु स्थिती अशी होती, जे दुसरे समजत होते की, ही कोणी लाईट जात आहे. त्यांना शरीर दिसून येत नव्हते, या अभ्यासामुळे प्रत्येक प्रकारच्या पेपरमध्ये पास झाला. तर आता जेव्हा, वेळ फारच खराब आला आहे, त्यामुळे डबल लाइट राहण्या चा अभ्यास वाढवा. दुसऱ्यांना नेहमी तुमचे प्रकाशरूप दिसून येईल. हीच सुरक्षितता आहे.आत येतील आणि प्रकाशा चा किल्ला पाहतील.

जसे विजे मुळे, मोठमोठ्या मशनरी चालत राहतात. तुम्हीं सर्व प्रत्येक कर्म करताना, कनेक्शनच्या आधारा वर स्वतः पण डबल लाइट बनून चालत राहा. जेथे डबल लाइट ची स्थिती आहे, तेथे मेहनत आणि मुश्कील शब्द नाहीसा होऊन जातो. आपलेपणा नष्ट करून,विस्वताचे भान आणि ईश्वरीय सेवेची भावना असेल, तर डबल लाइट बनवून जाल. कोणी पण तुमच्या जवळ, संपर्कात आले, तर त्यांना वाटते की,हे आत्मिक आहेत, अलौकिक आहेत. त्यांना तुमचे फरिस्ता रूपच दिसून येईल. फरिश्ते नेहमी उंच राहतात.फरिश्त्यांना चित्र रूपांमध्ये पण दाखविले, तर पंख दाखवितात, कारण ते उडते पक्षी आहेत. नेहमी खुशीच्या झोक्यामध्ये झोका घेणारे, सर्वांचे विघ्नहर्ता किंवा सर्वांच्या अडचणी ला सोपे करणारे,तेंव्हा बनाल, जेंव्हा विचारांमध्ये दृढता असेल आणि स्थितीमध्ये डबल लाईट असाल. माझे कांही नाही, सर्वकांही बाबाचे आहे.जेंव्हा ओझे स्वतःवर घेता, तेंव्हा सर्व प्रकारची विघ्ने येतात.माझे नाही, तर निर्विघ्न. नेहमी स्वतःला डबल लाइट समजून सेवा करत रहा. जेवढे सेवेमध्ये हलकेपण राहील, तेवढे सहज उडत राहाल,आणि इतरांना उडवत राहाल. डबल लाइट बनून सेवा करणे, आठवणी मध्ये राहून सेवा करणे, हाच सफलतेचा आधार आहे.

जबाबदारी ला निभावून नेहणे, हे पण आवश्यक आहे, परंतु जेवढी मोठी जबाबदारी, तेवढे च डबल लाइट. जबाबदारी सांभाळत असताना, जबाबदारीच्या ओझ्या पासून,दूर राहणे, त्याला म्हटले जाते बाबाचे प्रिय. घाबरू नका, काय करू, मग जबाबदारी आहे. हे करू की नको.. . . हे तर फारच अवघड आहे. असे वाटणे म्हणजे च ओझे आहे.डबल लाइट म्हणजे या पासून पण वेगळे. कोणत्या पण जबाबदारीच्या,कर्मा मध्ये हालचालीचे ओझे नसावे.नेहमी डबल लाइट स्थिती मध्ये राहणारे, निश्चयबुद्धि आणि निश्चिंत असतील. उडत्या कलेमध्ये राहतील. उडती कला म्हणजे उंच ते उंच स्थिती. त्यांचा बुध्दी रुपी पाय धरणी वर राहत नाही. धरणी म्हणजे देहभान. जे देहभाना च्या धरणी पासून दूर राहतात, ते नेहमीच फरिश्ते आहेत.

आता डबल लाइट बनून, दिव्य बुद्धी रूपी, विमानाद्वारे सर्वात उंच स्थिती मध्ये स्थित होऊन, विश्वातील सर्व आत्म्यांसाठी, लाइट आणि माइट ची शुभ भावना आणि श्रेष्ठ कामनेच्या सहयोगाची लहर पसरवा. या विमानांमध्ये बापदादाच्या, शुद्ध, श्रेष्ठ मताचे इंधन असावे.त्यामध्ये थोडापण मनमत आणि परमताचा कचरा नसावा.

वरदान:-
प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्पाच्या, महत्वाला ओळखून पुण्याची पुंजी जमा करणारे,पद्मापद्मपती भव:
 

तुम्हां पुण्य आत्म्यांच्या संकल्पा मध्ये एवढी विशेष शक्ती आहे, ज्या शक्तीद्वारे असंभव कार्य पण संभव करू शकता. जसे आज-काल यंत्राद्वारे वाळवंटाला पण हिरवेगार करू शकतात. डोंगरावर फुले लावतात, तसे तुम्ही तुमच्या श्रेष्ठ संकल्पा द्वारे,हिम्मतहीनला हिम्मतवान बनवू शकता. फक्त प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्पाची, किंमत ओळखून संकल्प आणि सेकंदाचा वापर करून, पुण्याची पुंजी जमा करा. तुमची संकल्पाची शक्ती एवढी श्रेष्ठ आहे, जो एक संकल्प पण पद्मापद्ममपती बनवत आहे.

सुविचार:-
प्रत्येक कर्म अधिकारी पणाच्या निश्चयाने आणि नशे मध्ये करा, तर मेहनत समाप्त होऊन जाईल.


सूचना:- आज या महिन्याचा तिसरा रविवार आहे, सर्व राजयोगी तपस्वी बंधू-भगिनी सायंकाळी ६-३० ते ७-३० वाजेपर्यंत, विशेष योग अभ्यासाचे वेळी, भक्तांचा आवाज ऐका आणि आपल्या इष्टदेव, रहमदिल दाता स्वरूपामध्ये स्थित होऊन सर्वांची मनोकामना पूर्ण करण्याची सेवा करा.