19-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हाला आता फार साधारण राहायचे आहे, फॅशनेबल कपडे घातल्याने पण देहअभिमान येतो."

प्रश्न:-
नशिबामध्ये उंच पद नसेल, तर कोणत्या गोष्टींमध्ये मुले सुस्त राहतात?

उत्तर:-
बाबा म्हणतात की, मुलांनो स्वतःमध्ये सुधारणा करायची असेल तर चार्ट, दिनचर्या ठेवा. आठवणीचा चार्ट ठेवल्यामुळे फार फायदा होतो. नोंदवही नेहमी हातामध्ये ठेवा. तपासून पहा कि, किती वेळ बाबाची आठवण केली? आमचे रजिस्टर कसे आहे? दैवी चरित्र आहे? कर्म करताना बाबाची आठवण राहते? आठवणीनेच गंज नाहीसा होईल, नशीब उंच बनेल.

गीत:-
भोलेनाथ पासून वेगळा. . . .

ओम शांती।
गोड मुला जवळ हे लक्ष्मीनारायणाचे चित्र घरामध्ये जरूर असले पाहिजे. यांना( लक्ष्मी नारायणाला) पाहून फार खुशी झाली पाहिजे, कारण तुमचे हे शिक्षणाचे मुख्य लक्ष्य आहे.तुम्ही जाणता की, आम्ही विद्यार्थी आहोत आणि ईश्वर शिकवत आहेत. ईश्वरीय विद्यार्थी आहोत, आम्ही हे शिकत आहोत. सर्वांसाठी एकच उद्देश आहे. त्यांना पाहून फार खुशी झाली पाहिजे. गीत पण मुलानी ऐकले. फार भोलेनाथ आहेत. कोणी तर शंकराला भोलानाथ समजतात,परत शिव आणि शंकराला एकत्र केले आहे. आता तुम्ही जाणता की, ते शिव सर्वोच भगवान आणि शंकर देवता,ते दोन्ही एक कसे होऊ शकतात. हे पण गीता मध्ये ऐकले की, भक्तांचा रक्षण करणारा, तर जरूर भक्तावर कोणते संकट आहे. पाच विकारांचे संकट सर्वा वर आहे. भक्त पण सर्व आहेत. ज्ञानी कोणाला पण म्हटले जाऊ शकत नाही. ज्ञान आणि भक्ती फार वेगळी गोष्ट आहे. जसे शिव आणि शंकर वेगळे आहेत. जेंव्हा ज्ञान मिळते तेंव्हा भक्ती राहत नाही. तुम्हीं सुखधामचे मालक बनत आहात. अर्ध्या कल्पासाठी सद्गती मिळत आहे. एकाच इशाऱ्या द्वारे तुम्ही अर्धाकल्पाचा वारसा प्राप्त करत आहात. पाहता की, भक्तां वर किती संकटे आहेत. ज्ञानामुळे तुम्ही देवता बनत आहात. जेव्हा भक्ता वर संकटे येते, म्हणजे दुःख होते, तेंव्हा बाबा येतात. बाबा समजावतात की, विश्वनाटकानुसार जे होऊन गेले आहे, ते पुन्हा पुनरावृत्त होणार आहे. परत भक्ती सुरू होते, तेंव्हा वाममार्ग म्हणजे पतित बनण्याचा मार्ग सुरू होतो.त्यामध्ये पण क्रमांक एक काम विकार आहे, त्यासाठी म्हटले जाते, काम विकारावर विजय प्राप्त केल्याने, तुम्हीं जगतजीत बनाल. ते कांही विजय थोडाच प्राप्त करतात. रावण राज्यांमध्ये विकारा शिवाय कोणाचेही शरीर निर्माण होत नाही, सत्ययुगा मध्ये रावणराज्य नसते.तेथे पण जर रावण असेल, तर बाकी भगवंताने रामराज्य स्थापन करून काय केले? लौकिक पित्याला किती काळजी वाटते,माझी मुले सुखी राहावीत.धन एकत्र करून मुलांना देतात की, सुखी राहावीत.परंतु इथे तर असे होत नाही. ही आहेच दुःखाची दुनिया. हे बेहदचे बाबा म्हणत आहेत की, तुम्हीं तेथे जन्मजन्मांतर सुख भोगत आले आहात. अथाह धन मिळते, 21 जन्म तेथे कोणते दु:ख असत नाही. दिवाळे निघत नाही. या गोष्टी बुद्धीमध्ये धारण करून, मनातून फार खुशी झाली पाहिजे. तुमचे ज्ञान आणि योग सारे गुप्त आहे.स्थूल हत्यार इत्यादी कांही पण नाही. बाबा समजावतात की, ही ज्ञान तलवार आहे. त्यांनी मग स्थूल हत्यारे इत्यादी निशाणी देवतांना दिल्या आहेत. ग्रंथ इत्यादी जे वाचत आहेत, ते लोक असे कधी म्हणत नाहीत की, ही ज्ञान तलवार आहे, हे ज्ञान खॾग आहे. हे बेहदचे बाबा समजावत आहेत. ते समजतात की,शक्ती सेनेने विजय प्राप्त केला आहे, तर जरूर कोणते हत्यार असेल. बाबा येऊन या सर्व चुकलेल्या गोष्टी सुधारत आहेत. या तुमच्या गोष्टी, फार लोक ऐकतील. विद्वान इत्यादी पण एके दिवशी येतील. बेहदचे बाबा आहेत ना. तुम्हां मुलांचे श्रीमतावर चालण्या मध्येच कल्याण आहे, तेंव्हा देहअभिमान नष्ट होईल, त्यामुळे सावकार लोक येत नाहीत. बाबा म्हणतात की, देहअहंकार सोडा. चांगले कपडे इत्यादी चा पण नशा राहतो. तुम्ही आता वनवासा मध्ये आहात ना.आता सासरी जाणार आहात. तेथे तुम्हाला खूप अलंकार घातले जातील. येथे भारी कपडे घालायचे नाहीत. बाबा म्हणतात की, बिल्कुल साधारण राहायचे आहे. जसे कर्म मी करत आहे, तसे मुलांना पण साधारण राहायचे आहे. नाही तर देहाचा अभिमान येतो. तो फार नुकसान करतो. तुम्ही जाणता की, आम्ही सासरी जात आहोत. तिथे आम्हाला फार आलंकार मिळतील. इथे तुम्हाला अलंकार इत्यादी घालायचे नाहीत. आजकाल चोरी इत्यादी किती होत आहे. रस्त्यामध्येच डाकू लुटत आहेत. दिवसें दिवस हा गोंधळ इत्यादी जास्त वाढत जाईल, त्यामुळे बाबा म्हणतात की, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा.देह अभिमाना मध्ये आल्यामुळे बाबा ला विसरून जाता.ही मेहनत आताच करायची आहे. मग कधी भक्तिमार्गामध्ये ही मेहनत करावी लागत नाही.

आता तुम्ही संगमयुगा वर आहात. तुम्ही जाणता कि, बाबा येतात पुरषोतम संगमयुगावर. युद्ध पण जरूर होईल. ऍटोमिक बॉम्ब इत्यादी फार बनवत राहतात. कोणाला किती पण समजावा कि, हे बंद करा, परंतु असे होऊ शकत नाही. विश्वनाटका मध्ये नोंदलेले आहे. समजावले तरी समजणार नाहीत. मृत्यू होणारच आहे, तर बंद कसे होईल. समजतात तरी पण बंद करणार नाहीत. नाटकांमध्ये नोंदलेले आहे. यादव आणि कौरवांना नाहीसे व्हायचेच आहे. यादव युरोपावासी आहेत. त्यांचा विज्ञानाचा अहंकार आहे, ज्यामुळे विनाश होत आहे. परत विजय शांती मुळे होईल. तुम्हाला शांती मध्ये राहायचे( शांत स्वरूप राहणे) शिकवले जात आहे. बाबाची आठवण करा. मृत्यूनंतर ची शांती. आम्ही आत्मा शरीरापासून वेगळी आहे. शरीर सोडण्यासाठी जसे कि, आम्ही पुरुषार्थ करत आहोत, असे कधी कोणी शरीर सोडण्यासाठी पुरुषार्थ करतात कां? सारी दुनिया शोधून पहा, जो कोणी बोलेल की, हे आत्मा, आता तुम्हाला शरीर सोडून जायचे आहे. पवित्र बना. नाहीतर मग सजा खावी लागेल. सजा कोण खात आहे? आत्मा. त्यावेळी साक्षात्कार होत आहे. तुम्ही ही पापे केली आहेत, आता सजा खावा. त्यावेळी भासना होते. जसे जन्मजन्मांतर ची शिक्षा भोगत आहे. एवढे दुःख भोगायचे, मग सुखाची प्राप्ती काय राहिली. बाबा म्हणतात कि, आता कोणते पाप कर्म करू नका. स्वतःचे रजिस्टर ठेवा. प्रत्येक शाळेमध्ये वागण्या बोलण्याचे रजिस्टर ठेवतात ना. शिक्षणमंत्री पण म्हणतात, भारताचे चरित्र ठीक नाही. त्यांना सांगा, आम्ही या (लक्ष्मीनारायण)सारखे चरित्र बनवत आहोत. हे लक्ष्मीनारायणा चे चित्र तर नेहमी जवळ ठेवले पाहिजे. हे मुख्य लक्ष्य आहे. आम्ही असे बनत आहोत. या आदी सनातन देवी-देवता धर्माची आम्ही स्थापना करत आहोत, श्रीमतावर. इथे वागणे-बोलणे सुधारले जाते. तुमची इथे कचेरी पण होत आहे. सर्व सेवाकेंद्रात मुलांची कचेरी केली पाहिजे. रोज सांगा, चार्ट ठेवा, तर सुधारणा होईल. कोणाच्या नशिबामध्ये नसेल तर आळस करतात.चार्ट ठेवणे फार चांगले आहे.

तुम्ही जाणत आहात कि, आम्ही या 84 च्या चक्राला जाणल्यामुळे, चक्रवर्ती राजा बनतो. किती सोपे आहे. आणि मग पवित्र पण बनायचे आहे. आठवणीच्या यात्रेचा चार्र्ट दिनचर्या ठेवा. त्यामुळे तुम्हाला फार फायदा होईल. नोंदवही नाही ठेवली, तर समजा बाबाची आठवण केली नाही. नोंदवही नेहमी हातामध्ये असावी. आपला चार्ट पहा, कितीवेळ बाबाची आठवण केली. आठवणी शिवाय गंज उतरणार नाही, गंज काढण्या साठी ती वस्तू घासलेट मध्ये टाकतात. कर्म करताना पण बाबाची आठवण करायची आहे, तर पुरुषार्था चे फळ मिळेल. मेहनत आहे ना. असा थोडाच मुकूट ठेवतील डोक्यावर. बाबा एवढे उंच पद देत आहेत, कांही तरी मेहनत करायची आहे. यामध्ये हात पाय इत्यादी कांही पण हालवायचे नाहीत. शिक्षण तर फार सोपे आहे. बुद्धीमध्ये आहे, शिवबाबा मुळे, ब्रह्माबाबा द्वारे, आम्ही हे बनत आहोत. कुठे पण गेला तरी बॅज लावला पाहिजे. सांगा, खरे तर कोर्ट ऑफ आर्मस,ब्रिदवाक्य हे आहे. समजावून सांगण्यात फार रायॅल्टी पाहिजे. फार गोडीने समजावयाचे आहे. कोर्ट ऑफ आर्मस वर पण सांगायचे आहे. प्रीतबुद्धी आणि विपरीतबुद्धी कशाला म्हटले जाते? तुम्हीं बाबाला जाणाता? लौकिक पित्याला तर गाॅड म्हणत नाहीत. ते बेहदचे बाबाच पतित पावन, सुखाचे सागर आहेत. त्यांच्या कडूनच सुख अपार मिळत आहे. अज्ञान काळामध्ये समजतात कि, मात-पिता सुख देतात. सासर घरी पाठवतात. आता तुमचे हे आहे बेहदचे सासर घर. ते हदचे आहे. ते मात पिता देऊन, देऊन 5-7 लाख, करोड देतील. तुमचे तर बाबांनी नाव ठेवले आहे, पद्मा पदमपती बनणारी मुले. तिथे तर पैशाची गोष्टच नाही. सर्व कांही मिळते. मोठ मोठे चांगले महल असतात. जन्मजन्मांतरा साठी तुम्हांला महल मिळत आहेत. सुदामा चे उदाहरण आहे ना‌. मुठभर तांदळा चे ऐकले आहे, तर येथे पण घेऊन येतात. आता कोरडा तांदूळ थोडेच खातील. मग त्याबरोबर कांही मसाले इत्यादी पण घेऊन येतात. किती प्रेमाने घेऊन येतात. बाबा तर आम्हाला जन्मो जन्मासाठी देतात, त्यामुळे दाता म्हटले जाते. भक्ती मार्गामध्ये तुम्ही ईश्वर अर्थ देत आहात, तर अल्पकाळा साठी दुसऱ्या जन्मां मध्ये मिळत आहे. कोणी गरीबाला देतात, कॉलेज बनवतात, तर दुसऱ्या जन्मांमध्ये शिक्षणामुळे ज्ञान मिळते.. धर्मशाळा बनवतात तर चांगले घर मिळते, कारण धर्मशाळे मध्ये अनेक जण येऊन सुख प्राप्त करतात. ही तर जन्मो जन्माची गोष्ट आहे. तुम्हीं जाणता कि,शिवबाबा ला जे कांही देतात, ते सर्व आमच्या साठी लावत आहेत‌. शिवबाबा तर स्वतःजवळ ठेवत नाहीत. यांना पण सांगितले कि, सर्व कांही देऊन टाका, तर विश्वाचे मालक बनाल. विनाशाचा साक्षात्कार पण केला, राजाईचा साक्षात्कार पण केला. त्यामुळे नशा चढला. बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवत आहेत. गीतेमध्ये पण आहे, अर्जुनाला साक्षात्कार केला‌ माझी आठवण करा, तर तुम्ही असे बनाल. विनाश आणि स्थापनेचा साक्षात्कार केला. तर यांना पण सुरुवाती ला खुशीचा पारा चढला. विश्वनाटकां मध्ये तशी भूमिका होती. भागीरथ ला पण कोणी जाणत थोडेच आहेत. तर तुम्हां मुलांना, हे मुख्य लक्ष्य बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. आम्ही असे बनत आहोत. जेवढा पुरुषार्थ कराल, तेवढे उंच पद मिळेल. गायन पण आहे कि, ब्रह्माबाबाचे अनुकरण करा. या वेळीची गोष्ट आहे. बेहदचे बाबा सांगत आहेत कि, मी जी मत देत आहे, त्याचे अनुकरण करा. यांनी काय केले ते पण सांगत आहेत. त्यांना सौदागर, रत्नागर ,जादूगर म्हणतात ना. बाबांनी अचानक सर्व कांही सोडून दिले.अगोदर त्या रत्नांचे जवाहरी होते, आता अविनाशी ज्ञान रत्नांचे जवाहरी बनलेत. नरकाला स्वर्ग बनविणे, किती मोठी जादू आहे. सौदागर पण आहेत. मुलांना किती चांगला सौदा देत आहेत. मुठभर तांदूळ घेऊन, महल देत आहेत. किती चांगली कमाई करणारे आहेत. जवाहराच्या व्यापारा मध्ये पण असे होते.कोणी अमेरिकन ग्राहक आला, तर त्यांच्याकडून 100 च्या वस्तूचे ५००- १००० पण घेतात. त्यांच्या कडून फार पैसे घेतात. तुमच्या जवळ तर सर्वात जुनी गोष्ट प्राचीन राजयोग आहे.

तुम्हाला आता भोलानाथ बाबा मिळाले आहेत, किती भोळे आहेत, तुम्हाला काय बनवत आहेत. कखपना च्या बदल्यात तुम्हाला 21 जन्मासाठी काय बनवत आहेत. मनुष्याला तर कांही पण माहित नाही. कधी म्हणतात भोलानाथ ने हे दिले, कधी म्हणतात अंबा ने दिले, गुरू ने दिले. हे तर शिक्षण आहे. तुम्ही ईश्वरीय पाठशाळे मध्ये बसले आहात. ईश्वरीय पाठशाळा गीतेला म्हणतात. गीतेमध्ये भगवानुवाच आहे. परंतु हे कोणाला पण माहित नाही की, भगवान कोणाला म्हटले जाते. कोणाला पण विचारा, परमपिता परमात्म्याला जाणतां? बाबा बागवान आहेत. तुम्हाला काट्या पासून फूल बनवत आहेत. त्यांना गार्डन ऑफ अल्लाह (ईश्वरीय बाग) म्हणतात. युरोपियन लोक पण पॅराडाईज म्हणतात. बरोबर भारत परिस्थान होता, आता कब्रिस्थान आहे. आता तुम्ही परत परिस्थानचे मालक बनत आहात. बाबा येऊन झोपलेल्यांना उठवत आहेत. हे पण तुम्ही जाणता नंबरवार पुरुषार्था नुसार. जे स्वतः जागतात ते दुसऱ्याला पण जागवतात. दुसऱ्याला जागवत नाहीत म्हणजे स्वतः जागे झाले नाहीत. तर बाबा म्हणतात की, या गीतांची पण विश्व नाटकांमध्ये नोंद आहे. कांही फार चांगले गीत आहेत. जेंव्हा तुम्हीं उदास होता, त्यावेळी हे गीत लावा, तर खुशीमध्ये याल. रात्रीच्या प्रवाशांनो थकू नका, हे पण चांगले गीत आहे. आता रात्र पूर्ण होत आहे. मनुष्य समजतात की, जेवढी भक्ती करावी, तेवढे भगवान लवकर भेटतील. हनुमान इत्यादीचा साक्षात्कार झाला, तर समजतात कि, भगवान भेटले. बाबा म्हणतात, हे साक्षात्कार इत्यादीची सर्व नाटकांमध्ये नोंद आहे. जी भावना ठेवतात त्याचा साक्षात्कार होतो. बाकी असे कोणी आसत नाही. बाबांनी सांगितले आहे की, हा बॅज तर सर्वांनी नेहमीच लावला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे बनत आहेत. समजावून सांगण्यासाठी हे फार चांगले आहेत.

तुम्ही आत्मिक सैनिक आहात ना. सैनिकांना नेहमी निशानी राहते. तुम्हा मुलांनी पण हे लावल्याने नशा राहील. आम्ही हे बनत आहोत. आम्ही विद्यार्थी आहोत. बाबा आम्हाला मनुष्या पासून देवता बनवत आहेत. मनुष्य देवतांची पूजा करतात. देवतां तर देवतांची पूजा करत नाहीत. इथे मनुष्य देवतांची पूजा करतात कारण ते श्रेष्ठ आहेत. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति, मातपिता, बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बुद्धीमध्ये नेहमी मुख्य लक्ष्य आठवणीत ठेवायचे आहे. लक्ष्मी नारायणाचे चित्र नेहमी जवळ ठेवा, या खुशीमध्ये राहा की, आम्ही असे बनण्यासाठी शिकत आहोत. आता आम्ही ईश्वरीय विद्यार्थी आहोत.

(२) आपले जुने कखपन, तांदळाची मुठ्ठी, देऊन महल घ्यायचे आहेत. ब्रह्मा बाबाचे अनुकरण करून, अविनाशी ज्ञान रत्नांचे जवाहरी बनायचे आहे.

वरदान:-
अशरीरी पनाच्या इंजेक्शनद्वारे, मनाला नियंत्रण करणारे, एकाग्रचित्त भव:

जसे आजकाल जर कोणी नियंत्रणा मध्ये येत नसेल, फार तंग करत असेल, उड्या मारत असेल, किंवा वेड्यासारखा करत असेल, तर त्याला असे इंजेक्शन देतात की, त्यामुळे तो शांत होऊन जातो. तसे जर संकल्पशक्ती आपल्या नियंत्रणामध्ये नसेल तर अशरीरी पनाचे इंजेक्शन द्या. मग संकल्पशक्ती व्यर्थ चालणार नाही. सहज एकाग्रचित्त होऊन जाल. परंतु जर बुद्धीचा लगाम बाबाला देऊन परत माघारी घेतला, तर मन व्यर्थच्या मेहनती मध्ये जाईल. आता व्यर्थच्या मेहनती पासून मुक्त व्हा.

बोधवाक्य:-
आपल्या पूर्वज स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहून सर्व आत्म्यावर दया करा.