19.11.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


गोड मुलांनो, ही सारी दुनिया रोग्यांचे मोठा दवाखाना आहे, बाबा आले आहेत साऱ्या दुनियेला निरोगी बनविण्यासाठी.

प्रश्न:-

कोणतीही स्मृती राहिली तर कधीपण उदासी किंवा दुःखाची लहर येणार नाही?

उत्तर:-

आता आम्ही ही जुनी दुनिया, जुन्या शरीराला सोडून घरी जाऊ, मग नवीन दुनियेमध्ये पुनर्जन्म घेऊ. आता आम्ही राजयोग राजाई मध्ये जाण्यासाठी शिकत आहोत. बाबा आम्हां मुलासाठी आत्मिक राजस्थान स्थापन करत आहेत,ही स्मृती राहिली तर दु:खाची लहर येणार नाही.

गीत:-

तुम्ही हो माता....

ओम शांती:- गीत कांही तुम्हा मुलासाठी नाही, नवीन येणाऱ्यांना समजावण्यासाठी आहे. असे पण नाही कि, इथे सर्व समजदारच आहेत. नाही, बेसमजला समजदार बनवले जात आहे. मुले समजतात कि, आम्ही किती बेसमज बनले होतो. आता बाबा आम्हाला समजदार बनवत आहेत. जसे शाळेमध्ये शिकून मुले किती समजदार बनतात. प्रत्येक जण आपापल्या समजुती नुसार बॅरिस्टर इंजिनियर इत्यादी बनतात.इथे तर आत्म्याला समजदार बनवायचे आहे. आत्माच शरीराद्वारे शिकत आहे. परंतु बाहेर जे शिक्षण मिळत आहे ते अल्पकाळासाठी शरीर निर्वाहासाठी आहे. जरी कोणी धर्मांतर पण करतात, हिंदुना ख्रिश्चन बनवत आहेत, कशासाठी? थोडे सुख प्राप्त करण्यासाठी. पैसे नोकरी इत्यादी सहज मिळण्यासाठी, जीवन निर्वाहासाठी. आता तुम्हीं मुले जाणता कि, आम्हाला पहिल्या प्रथम तर आत्माभिमान बनायचे आहे. ही मुख्य गोष्ट आहे, कारण ही रोगी दुनिया आहे. असा कोणी मनुष्य नाही, जो रोगी बनत नाही. कांही ना कांही जरूर होत राहते. ही सारी दुनिया मोठ्यातील मोठा दवाखाना आहे, यामध्ये सर्व मनुष्य पतित रोगी आहेत. आयुष्य पण फारच कमी होत आहे. अचानक मृत्यू होत आहे. काळाच्या कचाट्यांमध्ये सापडतात. हे पण तुम्ही मुले जाणत आहात. तुम्ही मुले फक्त भारताचीच नाही, साऱ्या विश्वाची सेवा गुप्त रितीने करत आहात‌. मूळ गोष्ट आहे कि, बाबाला कोणी जाणत नाहीत. मनुष्य असून पारलौकिक पित्याला जाणत नाहीत, त्यांच्याशी प्रेम ठेवत नाहीत. आता बाबा म्हणतात कि, माझ्याबरोबर प्रेम ठेवा. माझ्याबरोबर प्रेम ठेवून ठेवून तुम्हाला माझ्याबरोबर परत घरी यायचे आहे. जोपर्यंत परत जात नाहीत, तोपर्यंत या छी छी दुनिये मध्येच राहावे लागते. पहिल्या प्रथम तर देहअभिमाना पासून देहीअभिमानी बना, तेंव्हा तुम्ही धारणा करू शकता आणि बाबाची आठवण करू शकता जर देहीअभिमानी बनले नाहीत तर कांही कामाचे नाहीत.देहअभिमानी इतर सर्वच आहेत. तुम्हीं समजता कि, आम्ही आत्माभिमानी बनत नाही, बाबा ची आठवण करत नाही, तर आम्ही तसेच आहोत जसे पूर्वी होतो. मूळ गोष्टच आहे, देहीअभिमानी बनण्याची,ना कि रचनेला जानण्याची. गायन पण आहे कि, रचता आणि रचनेचे ज्ञान. असे नाही कि, प्रथम रचनेचे, मग रचनाकाराचे ज्ञान म्हणतात. नाही, प्रथम रचनाकार, तेच पिता आहेत. असे म्हटले पण जाते, हे गॉड फादर. ते येऊन तुम्हां मुलांना आपल्यासारखे बनवत आहेत. बाबा तर नेहमीच आत्मअभिमानी आहेत, त्यामुळे ते सर्वोच्च आहेत. बाबा म्हणतात कि, मी तर आत्मअभिमानी आहे. ज्यांच्या मध्ये प्रवेश केला आहे त्यांना पण आत्माभिमानी बनवत आहे. ब्रह्मा मध्ये प्रवेश करत आहे, त्यांच्यात बदल करत आहे, कारण ते पण देहअभिमानी होते, त्यांना पण सांगतो कि, स्वतःला आत्मा समजून मला यथार्थ रीतीने आठवण करा. असे फार मनुष्य आहेत, जे समजतात कि, आत्मा वेगळा आहे, जीव वेगळा आहे. आत्मा देहातून निघून जाते, तर दोन वस्तू झाल्या ना. बाबा समजावतात कि, तुम्हीं आत्मा आहात. आत्माच पुनर्जन्म घेत आहे. आत्मा शरीर धारण करून अभिनय करत आहे. बाबा वारंवार सांगतात कि, स्वतःला आत्मा समजा, यामध्ये फार मेहनत आहे. जसे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी एकांतामध्ये, बागेत इ. ठिकाणी जाऊन अभ्यास करतात. पादरी लोक पण फिरायला जातात, तर एकदम शांत राहतात‌. ते कांही आत्माभिमानी राहत नाहीत. क्राइस्टच्या आठवणी मध्ये राहतात. घरामध्ये बसून पण आठवण तर करू शकतात परंतु खास एकांतामध्ये जाऊन आठवण करतात, आणखीन कोणीकडे पाहत पण नाहीत. जे चांगले आहेत ते समजतात कि, आम्ही क्राइस्टची आठवण करत करत त्यांच्याजवळ निघून जाऊ. क्राइस्ट स्वर्गामध्ये बसले आहेत, आम्ही पण स्वर्गामध्ये निघून जाऊ. ते पण समजतात कि, क्राइस्ट स्वर्गातील पित्या जवळ गेले आहेत. आम्ही पण त्यांची आठवण करत त्यांचे जवळ जाऊ. सर्व ख्रिश्चन त्या एकाची मुले आहेत. त्यांच्या मध्ये थोडे ज्ञान बरोबर आहे. परंतु तुम्ही म्हणता कि,ती त्यांची समज पण चुकीची आहे, कारण क्राइस्टची आत्मा तर वर गेलीच नाही. क्राइस्ट नाव तर शरीराचे आहे. ज्यांना फाशीवर चढवले. आत्मा तर फासावर चढत नाही. तर क्राइस्टची आत्मा तर गॉडफादर जवळ गेली असे म्हणणे पण चुकीचे आहे. परत कोणी कसे जाईल? प्रत्येकाला स्थापना मग पालना जरूर करायचे आहे. घराला पोतारा इत्यादी केला जातो, ही पण पालना आहे ना.

आता बेहदच्या बाबाची तुम्ही आठवण करा. हे ज्ञान बेहदच्या बाबा शिवाय कोणी देऊ शकत नाही. स्वतःचे कल्याण करायचे आहे. रोगी पासून निरोगी बनायचे आहे. हा रोग्यांचा फार मोठा दवाखाना आहे. सारे विश्व रोग्यांचा दवाखाना आहे. रोगी जरूर लवकर मरतात, बाबा येऊन या साऱ्या विश्वाला निरोगी बनवत आहेत. असे नाही कि इथेच निरोगी बनतील. बाबा म्हणतात कि, निरोगी असतातच नवीन दुनियेमध्ये. जुन्या दुनियेमध्ये निरोगी असत नाहीत. हे लक्ष्मी नारायण निरोगी, नेहमीच आरोग्यसंपन्न आहेत. तिथे आयुष्य पण जास्त असते. रोगी विकारी असतात. निर्विकारी रोगी असत नाहीत. ते संपूर्ण निर्विकारी आहेत. बाबा स्वतः सांगतात कि, यावेळी सारे विश्व, खास भारत रोगी आहे. तुम्हीं मुले पहिल्याप्रथम निरोगी दुनियेमध्ये येता, निरोगी बनत आहात, आठवणीच्या यात्रे द्वारे. आठवणी मुळे तुम्ही आपल्या गोड घरी जात आहात. ही पण एक यात्रा आहे. आत्म्याची यात्रा आहे, बाबा परमात्मा जवळ जाण्याची. ही आहे आध्यात्मिक यात्रा. हे अक्षर कोणी समजू शकत नाही. तुम्ही पण क्रमवारीने जाणत आहात, परंतु विसरून जात आहात. मूळ गोष्ट ही आहे. समजून सांगणे पण फार सोपे आहे. परंतु समजावतील पण तेच, जे स्वतः आत्मिक यात्रा करतात. स्वतः करत नाहीत आणि दुसऱ्याला सांगतील तर त्यांचा बाण लागणार नाही. खरेपणाची धार पाहिजे. आम्ही बाबाची एवढी आठवण करत आहोत. स्त्री पतीची किती आठवण करते. हे पतींचे पती आहेत, पित्यांचे पिता, गुरूंचे गुरु. गुरु लोक पण त्या पित्याची आठवण करत आहेत. क्राइस्ट पण पित्याची आठवण करत होते. परंतु त्यांना कोणी जाणत नाही‌त. बाबा जेंव्हा येतील, तेंव्हा स्वतःचा परिचय देतात. भारतवासींना त्याचा पत्ता नाही, तर इतरांना कुठून मिळेल. परदेशातून पण येथे योग शिकण्यासाठी येतात. समजतात कि, प्राचीन योग भगवानानी शिकवला. ही भावना आहे. बाबा समजावतात कि, खराखुरा योग तर मीच कल्प कल्प येऊन शिकवत आहे, एकाच वेळी. मुख्य गोष्ट आहे, स्वतःला आत्मा समजून, बाबाची आठवण करणे. यालाच आत्मिक योग म्हटले जाते. बाकी सर्वांचा शारीरिक योग आहे. ब्रह्म बरोबर योग ठेवत आहेत. ते पिता तर नाहीत. ते तर महतत्त्व आहे, राहण्याचे ठिकाण. तर खरे एकच बाबा आहेत. एका बाबाला सत्य म्हटले जाते. हे पण भारतवासीयांना माहित नाही कि, बाबा सत्य कसे आहेत. तेच सत्य खंडाची स्थापना करत आहेत. सचखंड आणि झूठ खंड. तुम्ही जेव्हा सचखंड मध्ये राहत होता, तर तेथे रावण राज्य नसते. अर्ध्या कल्पानंतर रावण राज्य सुरू होत आहे .सत्यखंड पूर्ण सत्ययुगाला म्हटले जाते. मग सत्यखंड पूर्ण कलियुगाचे अंतापर्यंत‌. आता तुम्ही संगमयुगावर बसले आहात. ना इकडे आहात, ना तिकडे आहात. तुम्ही यात्रा करत आहात. आत्मा यात्रा करत आहे, शरीर करत नाही. बाबा येऊन यात्रा करणे शिकवीत आहेत. इथून तिथे जायचे आहे. तुम्हाला हे शिकवत आहेत. ते लोक मग चंद्र-तारे इत्यादी कडे जाण्याची यात्रा करत आहेत. आता तुम्ही जाणता कि, त्यामध्ये कांही फायदा नाही. या वस्तू मुळेच सारा विनाश होत आहे. बाकी जी पण एवढी मेहनत करत आहेत, ते सर्व व्यर्थ आहे. तुम्हीं जाणता कि, या सर्व वस्तू ज्या सायन्स मुळे बनत आहेत, त्या भविष्यामध्ये तुमच्याच कामी येतील. हे विश्व नाटक बनलेले आहे. बेहदचे बाबा येऊन शिकवत आहेत, तर किती मान ठेवला पाहिजे. शिक्षकाचा तसा तर फारच मान ठेवतात. शिक्षक उपदेश करतात कि, चांगल्या रीतीने शिकून पास व्हा. जर उपदेशाला मानले नाही तर नापास व्हाल. बाबा पण सांगतात कि, तुम्हाला विश्वाचे मालक बनविण्यासाठी शिकवत आहे. हे लक्ष्मी नारायण मालक आहेत. जरी प्रजा पण मालक असते, परंतु दर्जा तर फार आहे ना. भारतवासी पण सर्व म्हणतात कि, आम्ही मालक आहोत. गरीब पण स्वतःला भारताचे मालक समजतात. परंतु राजा आणि त्यांच्या मध्ये किती फरक आहे. ज्ञानामुळे पण पदा मध्ये फरक पडत आहे. ज्ञानामध्ये पण हुशारी पाहिजे. पवित्रता पण जरुरीची आहे, तर आरोग्य आणि संपत्ती पण पाहिजे. स्वर्गामध्ये सर्व आहे ना. बाबा मुख्य उद्देश समजावत आहेत. दुनियेमध्ये आणखीन कोणाच्या बुद्धीमध्ये हे मुख्य लक्ष्य असत नाही. तुम्ही झटक्यात म्हणता कि, आम्ही हे बनत आहोत. साऱ्या विश्वामध्ये आमची राजधानी असेल. आता तर हे पंचायती राज्य आहे. अगोदर डबल ताजधारी होते नंतर एक ताजवाले, आता तर ताज नाही. बाबा ने मुरली मध्ये सांगितले होते, हे पण चित्र ठेवा, डबल सिरतात राजासमोर सिंगल ताजवाले माथा टेकत आहेत. आता बाबा सांगत आहेत, मी तुम्हाला राजांचा राजा डबल सिरताज बनवत आहे. ते अल्पकाळा साठी आहे, ही 21 जन्माची गोष्ट आहे. पहिली मुख्य गोष्ट पावन बनण्याची आहे. बोलावतात पण कि, येऊन पतितांना पावन बनवा.असे म्हणत नाहीत कि, राजा बनवा. आता तुम्हा मुलांचा बेहदचा संन्यास आहे. या दुनियेतूनच निघून जाल, आपल्या घरी. मग स्वर्गामध्ये याल. आतून खुशी झाली पाहिजे,जेंव्हा समजता कि, आम्ही घरी जात आहोत, मग राजाई मध्ये येऊ, त्यामुळे उदासी दुःख इ. कां झाले पाहिजे. आम्ही आत्मा घरी जाऊन, मग पुनर्जन्म नवीन दुनियेमध्ये घेऊ. मुलांना कायमची खुशी कां राहत नाही? मायेचा विरोध फार आहे, त्यामुळे खुशी कमी होऊन जाते. पतित पावन स्वतः म्हणत आहेत कि माझी आठवण करा, तर तुमचे जन्मो जन्मीचे पाप भस्म होतील. तुम्ही सुदर्शन चक्रधारी बनत आहात. जाणता कि, नंतर आम्ही आपल्या राजस्थान मध्ये जाऊ. इथे वेगवेगळ्या प्रकारचे राजे होऊन गेले आहेत,आता मग आत्मिक राजस्थान बनत आहे. स्वर्गाचे मालक बनत आहात. ख्रिश्चन लोक हेवन चा अर्थ समजत नाहीत. ते मुक्तिधामलाच हेवन म्हणत आहेत. असे नाही कि, हेवनली गॉड फादर, कांही हेवन मध्ये राहतात. ते तर राहतात शांतीधाम मध्ये. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात, स्वर्गा मध्ये जाण्यासाठी. हा फरक सांगायचा आहे. गॉडफादर मुक्तिधाम मध्ये राहणारे आहेत. स्वर्ग नवीन दुनिये ला म्हटले जाते. तिथे तर ख्रिश्चन असत नाहीत. पिताच येऊन स्वर्ग स्थापन करत आहेत. तुम्ही ज्याला शांतीधाम म्हणत आहात त्याला ते लोक हेवन समजत आहेत. या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.

बाबा सांगतात कि, ज्ञान तर फार सोपे आहे. हे पवित्र बनण्याचे ज्ञान आहे. मुक्ती, जीवनमुक्ती ला जाण्याचे ज्ञान बाबाच देत आहेत. जेंव्हा कोणाला फाशी देतात तर मनात हेच राहते कि, आम्ही भगवाना जवळ जात आहोत. फाशी देणारे पण सांगतात कि, भगवानाची आठवण करा. भगवानाला दोघे पण ओळखत नाहीत. त्यांना तर त्यावेळी मित्र संबंधी इ. ची आठवण येत असेल. गायन पण आहे कि, अंत काळात स्त्रीची आठवण.... कोणाची ना कोणाची आठवण जरूर राहते. सत्ययुगा मध्येच मोहजीत राहतात. तिथे जाणतात कि, एक शरीर सोडून दुसरे घ्यायचे आहे. तिथे आठवण करण्याची गरज नाही, त्यामुळे म्हणतात कि दुःखांमध्ये सर्व आठवण करतात.... येथे दुःख आहे त्यामुळे आठवण करतात, भगवाना कडून कांही तरी मिळेल. तिथे तर सर्वकांही मिळालेलेच असते. तुम्ही सांगू शकता कि, आमचा उद्देश आहे, मनुष्याला आस्तिक बनवणे. धनी चे बनवणे, आता सर्व निधनके आहेत. आम्ही इथे धनके बनवत आहोत. सुख शांती संपत्तीचा वारसा देणारे बाबाच आहेत. या लक्ष्मी-नारायणाची आयुष्य किती जास्त होते. हे पण जाणता कि, भारतवाशीचे पहिल्याप्रथम आयुष्य फार जास्त होते, आता कमी झाले आहे, कां कमी झाले हे कोणी पण ओळखत नाहीत. तुमच्यासाठी तर फार सोपे झाले आहे, समजणे आणि समजावणे. ते पण क्रमवारीचे आहेत. समजावणे प्रत्येकाचे आपापले आहे. जशी धारणा करतात तसेच समजावत आहेत. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. (१) जसे बाबा नेहमी आत्मअभिमानी आहेत, तसे आत्म अभिमानी राहण्याचा पूर्ण पुरषार्थ करायचा आहे. एका बाबाशी हृदयापासून प्रेम करत करत, बाबा बरोबर घरी जायचे आहे.
  2. (२) बेहदच्या बाबाचा पूर्णपणे मान ठेवायचा आहे, म्हणजे बाबाच्या आदेशावर चालायचे आहे. बाबाचा पहिला आदेश आहे, मुलांनो चांगल्या रीतीने शिकून पास व्हा. या आदेशाचे पालन करायचे आहे.

वरदान:-

समज आणि सुगंधा च्या समतोल द्वारे मीपणाला स्वाहा करणारे विश्व परीवर्तक भव.

समज म्हणजे ज्ञानाचे मुद्दे, समजणे, आणि सुगंध म्हणजे सर्व शक्ती स्वरूपाची स्मृती आणि समर्थ स्वरूप. या दोन्हींचा समतोल असेल तर आपलेपणा किंवा जुनेपणा स्वाहा होईल. प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक बोल आणि प्रत्येक कर्म विश्व परिवर्तनाच्या सेवेमध्ये स्वाहा केल्याने, विश्व परिवर्तक स्वतः बनाल.जे स्वतःच्या देहाच्या स्मृती सहित स्वाहा होऊन जातात, त्यांच्या श्रेष्ठ प्रकंपनाद्वारे, वातावरणामध्ये परिवर्तन सहज होऊन जाते.

बोधवाक्य:-

प्राप्तीची आठवण करा तर दु:ख आणि दु:खाच्या गोष्टी विसरून जातील.

||| ओम शांती |||

ओम शांती.