20-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, खुशी सारखी खुराक नाही, तुम्ही खुशीमध्ये चालता-फिरता बाबांची आठवण करा, तर पवित्र बनाल...!!

प्रश्न:-
कोणते पण कर्म विकर्म बनू नये त्यांची युक्ती काय आहे?

उत्तर:-
विकर्मा पासून वाचण्याचे साधन आहे श्रीमत. बाबाची पहिली श्रीमत आहे. स्वत:ला आत्मा समजून बाबाची आठवण करा, या श्रीमतावर चाला, तर तुम्ही विकर्माजीत बनाल.

ओम शांती।
आत्मिक मुलं येथे पण बसली आहेत, आणि सर्व सेंटर वर पण आहेत. सर्व मुले जाणतात कि आता आत्मिक पिता आले आहेत, ते आम्हाला या जुन्या छी छी पतित दुनियेतून आपले घरी घेऊन जातील. बाबा आलेच आहेत पावन बनविण्यासाठी आणि आत्म्याशीच बोलत आहेत. आत्माच कानाद्वारे एैकत आहे, कारण बाबाला स्वत:चे शरीर तर नाही, त्यामुळे बाबा म्हणतात मी शरीराचा आधार घेऊन स्वत:ची ओळख सांगत आहेत. मी या साधारण तनामध्ये येऊन तुम्हा मुलांना पावन बनण्याची युक्ती सांगत आहे. ती पण प्रत्येक कल्पामध्ये येऊन तुम्हाला युक्ती सांगत आहे. या रावण राऱ्यात तुम्ही किती दु:खी बनले आहात. रावणराज्य शौक वाटिकेमध्ये तुम्ही आहात. कलियुगाला म्हटलेच जाते दु:खधाम, सुखधाम आहे कृष्णपुरी स्वर्ग. ती तर आता नाही. मुले चांगल्या प्रकारे जाणतात कि, आता बाबा आले आहेत, आम्हाला शिकविण्यासाठी.

बाबा सांगतात कि, तुम्ही घरी पण शाळा काढू शकता. पावन बनायचे आहे आणि बनवायचे आहे. तुम्ही पावन बनाल तर मग दुनिया पण पावन बनेल. आता ही तर भ्रष्टाचारी पतित दुनिया आहे. आता रावणाची राजधानी आहे. या गोष्टी जे चांगल्याप्रकारे समजतात ते मग इतरांना पण समजावतात. बाबा तर फक्त सांगतात कि, मुलांनो, स्वत:ला आत्मा समजून माझी आठवण करा, इतरांना पण असे सांगा. बाबा आले आहेत, म्हणतात कि, माझी आठवण करा, तर तुम्ही पावन बनाल. कोणते पण आसुरी कर्म करु नका. माया तुमच्याकडून जे छी छी कर्म करेल, ते कर्म जरुर विकर्मच बनेल. प्रथम नंबरला तर म्हणतात, ईश्वर सर्वव्यापी आहे, हे पण मायेनेच म्हटले ना. माया तुमच्याकडून प्रत्येक गोष्टीत विकर्मच करविते. कर्म-अकर्म विकर्माचे रहस्य पण समजावले आहे. श्रीमतावर अर्धाकल्प तुम्ही सुख भोगत आहात, आर्धाकल्प मग रावणाचे मतावर दु:ख भोगतात. या रावण राऱ्यामध्ये तुम्ही जी भक्ती करता, खालीच उतरत आले आहात. तुम्ही या गोष्टीला ओळखत नव्हता, फारच पत्थरबुध्दी होता. पत्थरबुध्दी आणि पारसबुध्दी असे तर म्हणतात ना. भक्तीमार्गा मध्ये म्हणतात पण कि, हे ईश्वर, यांना चांगला बुध्दी दया, त्यामुळे ही लढाई इ. बंद करतील. तुम्ही मुले जाणता कि, बाबा फार चांगली बुध्दी आता देत आहेत. बाबा म्हणतात कि, गोड मुलांनो, तुमची आत्मा जी पतित बनली आहे, त्याला पावन बनवायचे आहे, आठवणीच्या यात्रेद्वारे भले चाला, फिरा, बाबांच्या आठवणीत तुम्ही किती पण पायपीट करत राहाल, तुम्हाला शरीराची पण आठवण राहणार नाही. गायन पण केले जाते कि, खुशी सारखी खुराक नाही. मनुष्य धन कमविण्यासाठी किती दुर दूर खुशीने जातात. येथे तुम्ही किती धनवान, संपत्तीवान बनत आहात. बाबा म्हणतात कि, मी कल्प कल्प तुम्हा आत्म्यांना माझा परिचय देत आहे. यावेळी सर्व पतित आहेत, ऱ्यामुळे बोलावतात कि, पावन बनविण्यासाठी या. आत्माच बाबाला बोलावते. रावण राऱ्यामध्ये शोकवाटीके मध्ये सर्व दु:खी आहेत. रावणराज्य साऱ्या जगामध्ये आहे. यावेळी तमोप्रधान सुष्टी आहे. सतोप्रधान देवतांची चित्र आहेत. महिमा पण त्यांची आहे. शांतीधाम, सुखधाम जाण्यासाठी मनुष्य किती प्रयत्न करतात, हे थोडेच कोणी जाणतात कि, भगवान कसे येऊन भक्तीचे फळ आम्हाला देतील. तुम्ही आता समजता कि, आम्हाला भगवानाकडून भक्तीचे फळ मिळत आहे. भक्तीची दोन फळ आहेत. एक मुक्ती, दुसरे जीवनमुक्ती. या समजण्याच्या मोठ्या रहस्य युक्त गोष्टी आहेत. ज्यांनी सुरुवातीपासून, फार भक्ती केल असेल, ते ज्ञान चांगले प्रकारे घेतील व फळ पण चांगले प्राप्त करतील. भक्ती कमी केली असेल तर ज्ञान पण कमी घेतील, फळ पण कमी प्राप्त करतील. हिशोब आहे ना. नंबरवार पद आहे ना. बाबा म्हणतात कि, माझे बनून विकारात गेलात, म्हणजे मला सोडले. एकदम खाली जावून पडतील. कोणी तर पडल्यानंतर परत उठून उभे राहतात. कोणी तर फारच गटरमध्ये पडतात, बुध्दी बिल्कुल सुधारतच नाही. कोणाचे मन आतले आत, खात, दु:ख होते, आम्ही भगवानाबरोबर प्रतिज्ञा केली आणि परत त्यांना धोका दिला, विकारामध्ये पडलो बाबाचा हात सोडला, मायेचे बनलो. ते मग वायुमंडळच खराब करुन टाकतात, शापीत होऊन जातात. बाबा बरोबर धर्मराज पण आहेत ना. त्यावेळी माहित पडत नाही कि, आम्ही काय करत आहे, नंतर पश्चात्ताप होतो. असे अनेक आहेत, कोणाचा खुण इत्यादी करतात, तर जे तुरुंगात जावू लागते, मग पश्चात्ताप होतो कि, उगीचच त्याला मारले. रागात येऊन अनेक मारतात पण. पुष्कळ समाचार वर्तमानपत्रात येतात. तुम्ही तर वर्तमानपत्र वाचत नाहीत. जगामध्ये काय काय होत आहे. तुम्हाला माहित पडत नाही. दिवसेंदिवस वातावरण खराब होत चालले आहे. शिडी, खाली उतरावयाचीच आहे. तुम्ही या नाटकाच्या रहस्याला जाणत आहात. बुध्दीमध्ये ही गोष्ट आहे कि, आम्ही बाबाचीच आठवण करु. कोणते पण असे छी छी कर्तव्य होऊ नये ऱ्यामुळे रजिस्टर खराब होईल. बाबा म्हणतात कि मी तुमचा शिक्षक आहे ना. शिक्षकाजवळ विद्यार्थांचे अभ्यासाची आणि वर्तणुकीचे नोंदवही असते ना. कोणाचे वागणे फारच चांगले, कोणाचे कसे, कोणाचे तर फारच खराब असते. क्रमवारीने तर असतात ना. सर्वोच्च बाबा किती उंच शिकवत आहेत. ते पण प्रत्येकाच्या बोलण्या वागण्याला जाणत आहेत. तुम्ही स्वत: पण ओळखू शकता कि, माझ्यामध्ये ही सवय आहे, त्यामुळे मी नापास होईल. बाबा प्रत्येक गोष्ट स्पष्ट करुन सांगत आहेत. पुर्णपणे अभ्यास करणार नाही, कोणाला दु:ख दयाल तर दु:खी होऊन मराल. पद पण भ्रष्ट होईल. सजा पण खुप मिळेल.

गोड मुलांनो, स्वत:चे व इतरांचे नशीब बनवायचे असेल तर दयेचा संस्कार धोरण करा. जसे बाबा दयाळू आहेत त्यामुळे शिक्षक बनून तुम्हाला शिकवत आहेत. काही मुले चांगल्या रितीने शिकतात आणि शिकवितात, यामध्ये दयाळू बनावे लागते. शिक्षक दयाळू आहेत ना. प्राप्तीचा रस्ता सांगत आहेत, कसे चांगले पद तुम्ही प्राप्त करु शकता. लौकिक शिक्षणामध्ये तर अनेक प्रकारचे शिक्षक असतात. येथे तर एकच शिक्षक आहे. शिक्षण पण एकच आहे. मनुष्यापासून देवता बनणे. यामध्ये मुख्य आहे. पवित्रतेची गोष्ट. पवित्रताचे सर्वजण मागत आहेत. बाबा तर रस्ता दाखवत आहेत. परंतू ज्यांचे नशीबात नसेल तर पुरुषार्थ तर काय करणार. चांगले गुणच घ्यावयाचे नसतील तर शिक्षक काय प्रयत्न करणार, हे बेहदचे शिक्षक आहेत ना. बाबा सांगतात कि, तुम्हाला आणखीन कोणी सृष्टीच्या आदि मध्य अंताचा इतिहास व भुगोल समजावून सांगणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट बेहदचीच समजावली जाते. तुमचे आहे बेहदचे वैराग्य. हे पण तुम्हाला शिकवतात कि, जेव्हा पतित दुनियेचा विनाश, आणि पावन दुनियेची स्थापना होत आहे. संन्यासी तर आहेत निवृत्ती मार्गवाले, खरे तर त्यांनी जंगलात राहायला पाहिजे. सुरुवातीला ऋषी मुनी इ. सर्व जंगलामध्ये राहत होते, तेव्हा सतोप्रधान ताकद होती, त्यामुळे मनुष्यांना आकर्षित करत होते. कोठे कोठे तर झोपडीमध्ये पण त्यांना भोजन जाऊन देत होते. सन्याशांची कधी मंदीर बांधत नाहीत, मंदीर नेहमी देवी देवतांचे बनवितात. तुम्ही काही भक्ती करत नाही. तुम्ही योगामध्ये राहता. त्यांचे तर ज्ञानच आहे. ब्रह्म तत्वाला आठवण करण्याचे. बसं, ब्रह्मामध्ये लीन होऊन जावू. परंतू बाबा शिवाय तेथे तर कोणी घेऊन जावू शकत नाही. बाबा येतातच संगमयुगावर. येऊन देवी देवता धर्माची स्थापना करत आहेत. बाकी सर्वांचे आत्मे परत निघून जातात, शांतीधामला, कारण तुमच्यासाठी नविन दुनिया पाहिजे ना. जुन्या दुनियेतील कोणी ही राहत नाही. तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनता. हे पण तुम्ही जाणता कि, जेव्हा आमचे राज्य होते, तर साऱ्या विश्वामध्ये आम्हीच होतो. दुसरा कोणता खंड नव्हता. तेथे जमीन तर फार असते. येथे जमीन केवढी आहे, तरी पण समुद्राला बुजवून जमीन करतात, कारण मनुष्य वाढत आहेत. अशी जमीन वाढविणे इ. विलायत वाल्यांकडून शिकले आहेत. मुंबई पुर्वी काय होती, नंतर पण राहणार नाही. बाबा तर अनुभवी आहेत ना. समजा, भुकंप झाला, किंवा मुसळधार पाऊस पडला तर मग काय करणार! बाहेर तर निघू शकणार नाहीत. नैसर्गिक संकटे तर फार येतील. नाही तर एवढा विनाश कसा होणार. सतयुगामध्ये तर फक्त थोडेच भारतवासी राहतात. आज काय आहे, उद्या काय होईल. हे सर्व तुम्ही मुलंच जाणत आहात. हे ज्ञान आणखीन कोणी देऊ शकत नाही. बाबा म्हणतात की, तुम्ही पतित बनले आहात, त्यामुळे मला आता बोलावत आहात, कि येऊन पावन बनवा. तर जरुर येतील, तेव्हा तर पावन दुनिया स्थापन होईल ना. तुम्ही मुले जाणता कि, बाबा आले आहेत. युक्ती किती चांगली सांगत आहेत. भगवानुवाच मनमनाभव. देहासहित देहाचे सर्व संबंधाला सोडून, माझी एकट्याची आठवण करा. यामध्येच मेहनत आहे. ज्ञान तर फार सोपे आहे. लहान मुलं पण झटक्यात आठवण करतील. बाकी स्वत:ला आत्म समजणे आणि बाबाची आठवण करणे, ते अशक्य आहे. मोठ्यांच्या बुध्दीमधेच बसत नाही, तर लहान मग कसे आठवण करु शकतील? जरी शिवबाबा शिवबाबा म्हटले परंतू आहेत तर बेसमज ना. आम्ही पण बिंदू, बाबा पण बिंदू आहेत. हे आठवणीत येणे अवघड वाटते. असेच यर्थात रितीने आठवण करावयाचे आहे. मोठी वस्तू तर नाही. बाबा म्हणतात कि, यथार्थ रुपामध्ये मी बिंदू आहे, त्यामुळे मी जो आहे, जसा आहे, तशी आठवण करणे, ही खरी मेहनत आहे.

ते तर म्हणतात कि, परमात्म ब्रह्म तत्त्व आहे आणि आम्ही म्हणतो कि, ते तर एकदम बिंदू आहेत. दिवस रात्रीचा फरक आहे ना. आत्मा आहोत, बाबाची मुलं आहोत, या कानाद्वारे ऐकत आहे, बाबा या मुखाद्वारे सांगत आहेत, मी परम आत्मा आहे, परे ते परे राहणारा आहे. तुम्ही पण परे ते परे राहणारे आहात, परंतू जन्म मरणामध्ये येता, मी येत नाही. तुम्ही आता आपल्या 84 जन्माला पण समजले आहे. बाबाच्या अभिनयाला पण समजले आहे. आत्मा काही लहान मोठी असत नाही. बाकी कलियुगामध्ये आल्याने मळकट झाली आहे. एवढ्या सुक्ष्म आत्म्यामध्ये सारे ज्ञान आहे. बाबा पण सुक्ष्म आहेत ना. परंतू त्यांना परम आत्मा म्हटले जाते. ते ज्ञानाचे सागर आहेत, तुम्हाला येऊन समजावत आहेत. यावेळी तुम्ही जे शिकत आहोत ते कल्पापुर्वी पण शिकले होता, ज्यामुळे तुम्ही देवता बनले होता. तुमच्यामध्ये सर्वांत खोटे नशीब त्यांचे आहे, जे पतित बनून आपल्या बुध्दीला मलीन बनवतात, कारण त्यांचे मध्ये धारणा होऊ शकत नाही. मन आतून खात राहते. इतरांना सांगू शकत नाहीत कि, पवित्र बना. मनातून समजतात कि, पावन बनता बनता आम्ही हार खाल्ली, केलेली कमाई सारी नष्ट झाली. मग फार वेळ लागतो. एकच प्रहार, जोराने घायाळ करुन टाकतो, नोंदवही खराब होऊन जाते. बाबा पण म्हणतात, तुम्ही मायाद्वारे हारलात, तुमचे नशीब खोटे आहे. मायाजीत जगतजीत बनावयाचे आहे. जगतजीत महाराजा महाराणीला म्हटले जाते. प्रजेला थोडेच म्हणतात. आता दैवी स्वर्गाची स्थापना होत आहे. स्वत:साठी जो करेल तो प्राप्त करेल. जेवढे पवित्र बनून इतरांना बनवाल, फार दान करणाऱ्याला फळ पण मिळते ना. दान करणाज्यांचे नांव पण होते. दुसऱ्या जन्मात अल्पकाळाचे सुख प्राप्त करतात. ही तर 21 जन्मांची गोष्ट आहे. पावन दुनियेचे मालक बनायचे आहे. जे पावन बनले होते, तेच बनतील, चालता-चालता माया चापट मारुन एकदम खाली पाडते. माया पण कमी प्रतिद्वंदी नाही. 8-10 वर्षे पवित्र राहतात, पवित्रतेसाठी भांडण झाले, दुसऱ्याला पण खाली पाडण्यापासून वाचविले, आणि मग स्वत: खाली पडला. नशीबच म्हणावे ना. बाबाचे बनून मग मायेचे बनतात, तर शत्रू झाला ना. खुदा दोस्ताची पण गोष्ट आहे ना. बाबा येऊन मुलांवर प्रेम करतात, साक्षात्कार करतात. भक्ती करता करता पण साक्षात्कार होतो, तर दोस्त बनविले ना. किती साक्षात्कार होत होते, मग जादू समजून गोंधळ घालू लागले, त्यामुळे बंद केले, नंतर शेवटाला तुम्ही फार साक्षात्कार करत राहाल. पुर्वी किती, मजा होती. ते पाहून पाहून किती निघून गेले. भट्टीमध्ये कोणती इट पक्की निघाली, कोणी कच्चे राहिले. कोणी तर एकदम तुटून पडले, किती निघून गेले. आता ते लखपती, करोडपती बनले आहेत. समजतात, आम्ही तर स्वर्गात बसले आहोत. आता स्वर्ग येथे कसा असू शकेल. स्वर्ग तर असतो नवीन दुनियेमध्ये. अच्छा.

गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आपले नशीब उंच बनविण्यासाठी दयाळू बनून, शिकायचे व शिकवायचे आहे. कधी पण कोणत्या सवयीच्या वश होऊन आपले रजिस्टर खराब करावयाचे नाही.

2. मनुष्यापासून देवता बनण्यासाठी मुख्य पवित्रता आहे. त्यामुळे कधी पण पतित बणून आपल्या बुध्दीला मलीन करु नका. असे कर्म करु नका जे मनाला खाईल, पश्चात्ताप करावा लागेल.

वरदान:-
शांतीचा दूत बनून सर्वांना शांतीचा संदेश देणारे मास्टर शांती शक्ती दाता भव :-

तुम्ही मुले शांतीचे संदेश देणारे शांतीचे दूत आहात. कोठे पण राहून, नेहमी स्वत:ला शांतीचा दूत समजून चला. शांतीचे दूत आहोत. शांतीचा संदेश देणारे आहोत, त्यामुळे स्वत: पण शांत स्वरुप, शक्ती शाली राहाल, आणि इतरांना शांती देत राहाल. ते अशांती, देतील तुम्ही शांती द्या. ते आग लावतील, तुम्ही पाणी टाका. तेच तुम्हा शांतीचे संदेश वाहक, मास्टर शांती, शक्ती दाता मुलांचे कर्तव्य आहे.

बोधवाक्य:-
जसे बोलणे सोपे आहे, तसे न बोलणे, शांत राहणे पण सोपे वाटावे.