20.11.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही आता फारच किनाऱ्यावर उभे आहात, तुम्हाला आता या तीरावरून त्या तीराकडे जायचे आहे. घरी जाण्याची तयारी करायची आहे."

प्रश्न:-

कोणती एक गोष्ट आठवणीत ठेवा तर अवस्था, अचल अडोल बनून जाईल?

उत्तर:-

झाले ते झाले. झालेल्याचे चिंतन करू नका, पुढे चालत राहा. नेहमी एकीकडेच पाहत राहा, तर अवस्था अचल अडोल होऊन जाईल. तुम्ही आता कलियुगाची हद्द सोडली आहे, मग शेवटी कां पाहता? त्यामध्ये बुद्धी जरा पण गेली नाही पाहिजे, हेच सूक्ष्म शिक्षण आहे.

ओम शांती:- दिवस बदलत जात आहेत, वेळ निघून जात आहे. विचार करा, सतयुगा पासून वेळ हळूहळू निघून गेली, आता येऊन कलियुगाच्या किनार्‍यावर उभे आहात. हे सत युग, त्रेता, द्वापार, कलियुगाचे चक्र जसे एक मॉडेल आहे. सृष्टी तर मोठी लांबलचक आहे, तिच्या मॉडेल रूपाला मुलांनी ओळखले आहे. पूर्वी हे माहीत नव्हते कि, आता कलियुग संपले आहे. आता माहीत झाले आहे, तर मुलांनी पण बुद्धीव्दारे, सतयुगा पासून चक्कर मारत, कलियुगाच्या अंताच्या किनाऱ्यावर येऊन उभे राहिले पाहिजे. समजले पाहिजे कि, टिकटिक होत राहते, विश्व नाटक फिरत राहते. बाकी किती हिशोब राहिला असेल? जरासा राहिला असेल. पूर्वी माहीत नव्हते. आता बाबांनी सांगितले आहे, बाकी थोडी कोर राहिली आहे. या दुनियेतून त्या दुनियेमध्ये जाण्यासाठी, आता बाकी थोडा वेळ राहिला आहे. हे ज्ञान पण आता मिळाले आहे. आम्ही सतयुगा पासून चक्कर मारत मारत आता कलियुगाच्या अंताला येऊन पोहोचलो आहोत. आता परत माघारी जायचे आहे. जाण्याचे आणि येण्याचे गेट असते ना. इथे पण तसे आहे. मुलांनी समजले पाहिजे, बाकी थोडा किनारा आहे. हे पुरुषोत्तम संगमयुग आहे ना.आता आम्ही किनार्‍यावर आहोत. फार थोडा वेळ राहिला आहे. आता या जुन्या दुनिया पासून ममत्व काढले पाहिजे. आता तर नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. समजून घेणे तर फार सोपे आहे. हे बुद्धीमध्ये ठेवले पाहिजे. चक्र बुद्धीमध्ये फिरले पाहिजे. आता तुम्ही कलियुगा मध्ये नाहीत. तुम्ही या हदला सोडले आहे, मग त्या कडेची आठवण कां केली पाहिजे? जेंव्हा कि, जुन्या दुनियेला सोडून दिले आहे.आम्ही पुरुषोत्तम संगमयुगावर आहोत, मग शेवटच्या बाजूला पाहायचे तरी कशासाठी? बुद्धीयोग विकारी दुनियेमध्ये का लावायचा? या फार सूक्ष्म गोष्टी आहेत. बाबा जाणतात कि, कोणी तर रुपया मधील एक आना पण समजत नाहीत. ऐकतात आणि विसरून जातात. तुम्हाला शेवटच्या बाजूला पाहायचे नाही. बुद्धी द्वारे काम घ्यायचे आहे ना. आम्ही किनारा सोडला आहे, मग शेवटाला पाहायचे कशासाठी? झाले ते झाले. बाबा किती सूक्ष्म गोष्टी समजावत आहे. तरीपण मुलांचा खांदा शेवटच्या गोष्टीमध्ये कां लटकत आहे. कलियुगा मध्ये लटकलेला आहे. बाबा म्हणतात कि, खांदे इकडे करा. ही जुनी दुनिया तुमच्या कामाची वस्तू नाही. बाबा जुने दुनिये पासून वैराग्य आणत आहेत, नवीन दुनिया समोर उभी आहे, त्यामुळे जुन्या दुनिये पासून वैराग्य. विचार करा, अशी माझी अवस्था आहे? बाबा म्हणतात, झाले ते झाले. झालेल्या गोष्टीचे चिंतन करू नका. जुन्या दुनिया मध्ये कोणती इच्छा ठेवू नका. आता तर एकच उंच इच्छा ठेवायची आहे, आम्हांला सुखधामला जायचे आहे. बुद्धीमध्ये सुखधामची आठवण राहिली पाहिजे. शेवटच्या बाजूकडे कां फिरायचे आहे. परंतु आनेकाचे तोंड त्या बाजूकडे आहे. तुम्ही आता पुरुषोत्तम संगमयुगावर आहात. जुन्या दुनिये पासून किनारा केला आहे. हे समजून घेण्याची गोष्ट आहे ना. कुठे थांबायचे नाही. कांही पाहायचे पण नाही. झालेल्या गोष्टीची आठवण करायची नाही. बाबा म्हणतात, पुढे चालत राहा, शेवटाला पाहू नका. एकीकडेच पाहत रहा, तेंव्हाच अचल, स्थिर,अडोल अवस्था राहू शकेल. त्या बाजूला पाहात राहाल तर जुन्या दुनियेतील मित्र संबंधी इ.ची आठवण येत राहील. क्रमवारीने तर आहेत ना. आज पाहिले तर फार चांगले चालत आहेत, उद्या खाली पडले तर मन एकदम हटून जाते. अशी ग्रहचारी बसते, त्यामुळे मुरली ऐकण्यासाठी पण मन होत नाही. विचार करा, असे होत आहे ना?

बाबा म्हणतात, तुम्हीं आता संगमयुगावर उभे आहात, तर नजर पुढे ठेवली पाहिजे. पुढे आहे नवी दुनिया, तेंव्हाच खुशी होईल. आता तुम्ही किनार्‍यावर आहात. म्हणतात पण की, आता तर आमच्या देशातील झाडे दिसून येत आहेत. आवाज केला तर चटकन ते ऐकतील. शडपंथ म्हणजे बिल्कुल समोर आहे. तुम्ही आठवण करता, आणि देवता येतात. पूर्वी थोडेसे येत होते. सूक्ष्मवतन मध्ये सासरचे येत होते कां? आता तर माहेरघरचे आणि सासरघरातील येऊन भेटत आहेत. तरीपण मुले चालता चालता विसरून जातात. बुद्धीयोग शेवटच्या गोष्टीपासून हटत आहे. बाबा म्हणतात, तुम्हां सर्वांचा हा अंतिम जन्म आहे. तुम्हांला मागे सरकायचे नाही. आता पलीकडे जायचे आहे. या तीराकडून त्या तीराकडे जायचे आहे .मृत्यू पण जवळ आला आहे. बाकी थोडी पावले चालायची आहेत, नाव किनाऱ्याला येते तर तिकडे पावले टाकली पाहिजेत ना. तुम्हां मुलांना किनाऱ्यावर उभे राहायचे आहे. तुमच्या बुद्धी मध्ये आहे, आत्मे आपल्या गोड घरी जात आहेत. ही आठवण राहिली तरी पण ती खुशी तुम्हाला अचल अडोल बनवेल. हेच विचार सागर मंथन करत राहिले पाहिजे. ही बुद्धीची गोष्ट आहे. आम्ही आत्मे जात आहोत. आता बाकी थोड्या किनार्‍यावर आहोत. बाकी थोडा वेळ आहे. यालाच आठवणीची यात्रा म्हटले जाते. हे पण विसरुन जात आहेत. चार्ट, दिनचर्या लिहणे पण विसरून जातात. आपल्या हृदयावर हात ठेवून पहा, बाबा जे सांगत आहेत, तसे स्वतःला समजता. आता जवळच किनार्‍यावर उभे आहात, तशी आमची अवस्था आहे? बुद्धीमध्ये एका बाबाची आठवण राहावी. बाबा आठवणी ची यात्रा वेगवेगळ्या प्रकारे शिकवत आहेत. या आठवणीच्या यात्रेमध्येच मस्त राहायचे आहे. बसं, आता आम्हाला जायचे आहे. इथे सर्व खोटे संबंध आहेत. खरे सत्ययुगा तील संबंध आहेत. स्वतःला पहा आम्ही कुठे उभे आहोत?सतयुगा पासून बुद्धीमध्ये हे चक्र आठवण करा. तुम्ही स्वदर्शन चक्रधारी आहात ना.सतयुगा पासून चक्कर मारत आता किनाऱ्यावर उभे राहिले आहात. किनाऱ्यावर आले आहात. कांहीजण तर आपला वेळ फार व्यर्थ घालवत राहतात. पाच दहा मिनिटे पण मुश्किलीने आठवण करतात. स्वदर्शन चक्रधारी तर सर्व दिवसभर बनले पाहिजे. तसे तर कांही नाही. बाबा वेगवेगळ्या प्रकाराने समजावत आहेत. आत्म्याची च गोष्ट आहे. तुमच्या बुद्धीमध्ये चक्र फिरत राहिले पाहिजे. बुद्धीमध्ये ही आठवण कां राहत नाही. आता आम्ही किनार्‍यावर उभे आहोत. हा किनारा बुद्धीमध्ये कां आठवणीत राहत नाही, जेंव्हा तुम्ही जाणता कि, आम्ही पुरुषोत्तम बनत आहोत, तर किनार्‍यावर जाऊन उभे राहा. जूॅ सारखे चालतच राहा. असा अभ्यास कां करत नाही? कां बुद्धीमध्ये चक्र येत नाही? हे स्वदर्शन चक्र आहे ना. बाबा सुरुवाती पासून सारे चक्र समजावत आहेत. तुमची बुद्धी सर्व चक्र मारून, किनाऱ्यावर येऊन उभी राहिली पाहिजे. आणखीन कोणते पण बाहेरचे वातावरण, झंझट राहू नये. दिवसेंदिवस तुम्हां मुलांना शांती मध्ये जायचे आहे. वेळ वाया घालवायची नाही. जुन्या दुनियेला सोडून, नवीन संबंधांमध्ये आपला बुद्धीयोग लावा‌. योग नाही लावला तर पाप कसे नष्ट होतील? तुम्हीं जाणता कि, ही दुनिया तर नष्ट होणार आहे, याचे मॉडेल किती लहान आहे‌ पाच हजार वर्षाची दुनिया आहे. आजमेर मध्ये स्वर्गाचे मॉडेल आहे, परंतु कोणाला स्वर्गाची आठवण येईल कां? ते स्वर्गाला काय जाणतात. समजतात कि, स्वर्ग तर चाळीस हजार वर्षानंतर येईल. बाबा तुम्हां मुलांना समजावत आहेत, या दुनिया मध्ये हे कामकाज करत असताना, बुद्धीमध्ये हे आठवणीत ठेवा कि, ही दुनिया तर नष्ट होणार आहे.आता जायचे आहे, आम्ही शेवटी उभे आहोत. पावलो पावली जूॅ सारखे चालायचे आहे. लक्ष्य किती उंच आहे. बाबा तर लक्ष्याला जाणत आहेत ना. बाबा बरोबर दादा पण सोबत आहेत. ते समजावू शकतात, तर हे सांगू शकणार नाहीत काय? हे पण ऐकत तर आहेत ना. काय हे पण असे विचार सागर मंथन करत नसतील? बाबा तुम्हाला विचार सागर मंथन करण्याचे मुद्दे सांगत आहेत. असे नाही कि, बाबा फार शेवटी आहेत. अरे, हे तर शेपूट लागलेले आहे, मग शेवटी कसे राहतील. या सर्व रहस्ययुक्त गोष्टी धारण करायच्या आहेत. दुर्लक्ष करायच्या नाहीत. बाबा जवळ दोन दोन वर्षानंतर येतात. काय हे लक्षात राहते कि, आम्ही जवळ किनाऱ्यावर उभे आहोत? आता जायचे आहे. अशी अवस्था बनली तर बाकी काय पाहिजे? बाबांनी हे पण समजावले आहे, दुहेरी मुकुटधारी... हे फक्त नाव आहे, बाकी लाईटचा ताज कांही तेथे राहत नाही. ही तर पवित्रतेची निशाणी आहे. जे पण धर्मस्थापक आहेत, त्यांच्या चित्रांमध्ये लाईट जरूर दाखवतात, कारण ते निर्विकारी सतोप्रधान आहेत, नंतर रजो, तमो मध्ये येतात. तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले आहे, त्यामध्ये मस्त राहिले पाहिजे. जरी तुम्हीं या दुनिया मध्ये आहात, परंतु बुद्धीचा योग तिकडे लागला पाहिजे, यांच्याशी पण तोड निभावयाची आहे, जे या कुळातील असतील ते निघून येतील. कलम लागत आहे. आदि सनातन देवी-देवता धर्माचे जे असतील ते जरूर मागे पुढे येतील. शेवटी येणारे पण अगोदर येणाऱ्या पेक्षा पुढे जातील. हे शेवटपर्यंत होत राहील. ते जुन्या पेक्षा तीव्र पुरुषार्थ करतील. सारी परीक्षा आठवणीच्या यात्रेची आहे. जरी उशीरा आले तरी आठवणीच्या यात्रेमध्ये राहिले, आणि सर्व धंदादोरी सोडून या यात्रेमध्ये बसले,भोजन तर करायचे आहे. चांगल्या प्रकारे आठवणी मध्ये राहिले तर या खुशी सारखी खुराक नाही. हीच ओढ लागली पाहिजे, आता आम्ही जात आहोत, 21 जन्माचे राज्य भाग्य मिळत आहे. लॉटरी मिळाल्यांना खुशीचा पारा चढत आहे ना. तुम्हाला फार मेहनत करायची आहे. यालाच अंतीम अमुल्य जीवन म्हटले जाते. आठवणीच्या यात्रेमध्ये फार मजा आहे. हनुमान पण पुरुषार्थ करून करून अचल बनले ना. भंभोरला आग लागली, रावणाचे राज्य जळून गेले. ही एक गोष्ट बनविली आहे. बाबा यथार्थ गोष्ट समजावत आहेत. रावण राज्य खलास होऊन जाईल. स्थिर बुद्धी याला म्हटले जाते. आता किनार्‍यावर आहोत, आम्ही जाणार आहोत. या आठवणी.मध्ये राहण्याचा पुरुषार्थ करा, तेंव्हा खुशीचा पारा चढेल, आयुष्य पण योगबळाने वाढत आहे. तुम्ही आता दैवीगुण धारण करत आहात, मग ते अर्धाकल्प चालेल. या एका जन्मांमध्ये तुम्ही एवढा पुरुषार्थ करत आहात. जे तुम्ही जाऊन हे लक्ष्मीनारायण बनता.तर किती पुरुषार्थ केला पाहिजे. यामध्ये चुका किंवा वेळ वाया घालवायचा नाही. जो करील तो प्राप्त करेल. बाबा उपदेश करतात. तुम्ही समजता कि, कल्प कल्प आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत, एवढ्या कमी वेळेमध्ये कमाल होत आहे. साऱ्या दुनियेला बदलत आहोत. बाबासाठी कांही मोठी गोष्ट नाही. कल्प कल्प करत आहेत. बाबा समजावतात, चालताना फिरताना खाताना पिताना आपला बुद्धीयोग बाबाशी लावा. ही गुप्त गोष्ट बाबाच मुलांना समजावत आहेत. आपल्या अवस्थेला चांगल्या प्रकारे जमवत राहा. नाही तर उंच पद मिळणार नाही. तुम्ही मुले नंबरवार पुरुषार्था नुसार मेहनत करत आहात. समजत आहात कि, आता आम्ही किनार्‍यावर उभे आहोत.मग आम्ही शेवटाला काय पाहायचे? पुढे पाऊल टाकायचे आहेत. यामध्ये अंतर्मुखता फार पाहिजे, त्यामुळे कासवाचे उदाहरण पण आहे. हे उदाहरण इत्यादी सर्व तुमच्यासाठी आहेत. संन्यासी तर हठयोगी आहेत, ते राजयोग शिकवू शकत नाहीत. ते लोक ऐकतात तर समजतात कि, हे लोक आमचा अपमान करत आहेत, त्यामुळे हे पण युक्तीने लिहायचे आहे. बाबा शिवाय कोणी राजयोग शिकवू शकत नाही. अप्रत्यक्ष रीतीने बोलले पाहिजे, त्यामुळे विचार येणार नाही. युक्तीने चालले पाहिजे ना, त्यामुळे साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. कुटुंब परिवार इ. सर्वांशी प्रेमाने राहा, परंतु बुद्धीचा योग बाबाशी लावायचा आहे. तुम्ही जाणता कि, आम्ही आता एकाच्या मतावर आहोत. ही देवता बनण्याची मत आहे, यालाच अद्वैत मत म्हटले जाते. मुलांना देवता बनायचे आहे. किती वेळा तुम्ही बनले आहात? अनेक वेळा. आता तुम्ही संगमयुगावर उभे आहात. हा अंतिम जन्म आहे. आता तर जायचे आहे. शेवटाला काय पाहायचे आहे. पाहून पण तुम्ही आपल्या अडोलते मध्ये उभे राहा. लक्ष्या ला विसरायचे नाही. तुम्हींच महावीर आहात, जे मायेवर विजय प्राप्त करतात. आता तुम्ही समजत आहात. विजय आणि पराजयाचे हे चक्र फिरत राहते.बाबांचे खूप आश्चर्यकारक ज्ञान आहे. हे माहीत होते कां कि, स्वतःला बिंदी समजायचे आहे, एवढ्या लहान बिंदीमध्ये सारा अभिनय नोंदलेला आहे, जे चक्र फिरत राहते. फार आश्चर्यकारक आहे. आश्चर्य खाऊन सोडून पण द्यायचे आहे. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. (१) मागे वळून पाहायचे नाही. कोणत्या पण गोष्टी साठी थांबायचे नाही. एका बाबाकडे पाहून, स्वतःच्या अवस्थेला एकरस ठेवायचे आहे.
  2. (२) बुध्दी मध्ये ठेवायचे आहे कि,आता आम्ही किनार्‍यावर उभे आहोत. घरी जायचे आहे, बेसावधपणा सोडायचा आहे. आपली अवस्था जमविण्यासाठी, गुप्त मेहनत करायची आहे.

वरदान:-

विहंग मार्गाच्या सेवेद्वारे, विश्व परिवर्तनाच्या कार्याला संपन्न करणारे, खरे सेवाधारी भव.

विहंग मार्गाची सेवा करण्यासाठी संघटीत रूपांमध्ये" रूप आणि बसंत" या दोन्ही गोष्टी चा समतोल पाहिजे. जसे बसंत रूपा द्वारे एकाच वेळी अनेक आत्म्यांना संदेश देण्याचे कार्य करता, तसेच रूप म्हणजे आठवणीच्या बळाद्वारे श्रेष्ठ संकल्पाच्या बळाद्वारे विहंग मार्गाची सेवा करा. या मध्ये पण शोध करा. त्याच बरोबर संघटीत रूपामध्ये दृढ संकल्पाने जुने संस्कार, स्वभाव व जुन्या वागण्याचे, तीळ आणि जवस यज्ञामध्ये स्वाहा करा, तेंव्हा विश्व परिवर्तनाचे कार्य संपन्न होईल किंवा यज्ञाची समाप्ती होईल.

बोधवाक्य:-

बालक आणि मालक पणाच्या समानते द्वारे योजनेला प्रत्यक्षात आणा.

||| ओम शांती |||

ओम शांती.