21-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हा मुलांना सुख व आरामाच्या दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी, आराम आहेच शांतीधाम आणि सुखधाममध्ये...!!

प्रश्न:-
या युध्दाचे मैदानामध्ये माया सर्वांत पहिला वार कोणत्या गोष्टीवर करत आहे?

उत्तर:-
निश्चयावर, चालता-चालता निश्चय तोडून टाकते त्यामुळे हार खातात. जर पक्का निश्चय राहिला की, बाबा जे सर्वांचे दु:ख नष्ट करुन, सुख देणारे आहेत, तेच आम्हाला श्रीमत देत आहेत, आदि मध्य-अंताचे ज्ञान सांगत आहेत, तर कधीच मायेपासून हार होणार नाही.

गीत:-
या पापाचे दुनियेपासून दूर घेऊन चल, जिथे सुख व आराम असेल...

ओम शांती।
कोणासाठी म्हणतात, कोठे घेऊन चला, कसे घेऊन चला---हे दुनियेमध्ये कोणी पण समजत नाही. तुम्ही ब्राह्मण कुलभुषण नंबरवार पुरुषार्थानुसार जाणत आहात. तुम्ही मुले जाणता कि, यांच्यामध्ये ज्यांनी प्रवेश केला आहे, ते आम्हाला स्वत:चे आणि रचनेच्या आदि मध्य अंताचे ज्ञान सांगत आहेत, ते सर्वांचे दु:ख नष्ट करुन सर्वांना सुखदाई बनवत आहेत. ही काही नविन गोष्ट नाही. बाबा कल्प कल्प येत आहेत, सर्वांना श्रीमत देत आहेत. मुले जाणातात कि बाबा पण तेच आहेत, आम्ही पण तेच आहोत. तुम्हा मुलांना हा निश्चय झाला पाहिजे. बाबा म्हणतात कि, मी आलो आहे मुलांना सुखधाम, शांतीधाम घेऊन जाण्यासाठी. परंतू माया निश्चय बसू देत नाही. सुखधामकडे जाता जाता मग हारवून टाकते. हे युध्दाचे मैदान आहे ना. ते युध्द होते बाहुबळाचे, हे आहे योगबळाचे. योगबळ फार प्रसिध्द आहे, त्यामुळे सर्व योग योग म्हणत राहतात. तुम्ही हा योग एकच वेळ शिकत आहात. बाकी ते सर्व अनेक प्रकारचे हठयोग शिकवत आहेत. ते त्यांना माहित नाही की, बाबा कसे येऊन योग शिकवित आहेत. ते तर प्राचीन योग शिकवू शकत नाहीत. तुम्ही मुले चांगल्याप्रकारे जाणता कि, हे तेच बाबा आहेत जे राजयोग शिकवित आहेत. ज्यांची आठवण करतात कि, हे पतित पावन या. अशा ठिकाणी घेऊन चला जेथे चैन असेल. चैन आहेच शांतीधाम, सुखधाममध्ये, दु:खधाममध्ये चैन कोठून मिळणार? चैन नसल्यामुळे, विश्वनाटकानुसार बाबा आले आहेत, हे आहे दु:ख धाम. येथे दु:खच दु:ख आहे. दु:खाचे डोंगर येणार आहेत. जरी कितीही धनवान असो, किंवा काहीही असला, कोणते ना कोणते दु:ख जरुर होत आहे. तुम्ही मुले जाणता कि, आम्ही गोड बाबा बरोबर बसलो आहे, जे बाबा आता आले आहेत. नाटकातील रहस्याला पण तुम्ही ओळखले आहे. बाबा आता आले आहेत, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी. बाबा आम्हा आत्म्यांना सांगतात, कारण ते आम्हा आत्म्याचे पिता आहेत ना. ज्यासाठी गायले जाते कि, आत्मा परमात्मा वेगळे राहिले फार काळ --- शांतीधाममध्ये सर्व आत्मे बरोबर राहतात. आता बाबा तर आले आहेत, बाकी जे थोडे तेथे राहिले आहेत, ते पण वरुन खाली येत राहतात. येथे बाबा तुम्हाला किती गोष्टी समजावत आहेत. घरी गेल्यावर तुम्ही विसरुन जाता. आहे फार सोपी गोष्ट आणि बाबा जे सर्वांचे सुखदाता शांतीदाता आहेत, ते मुलांना बसून समजावत आहेत. तुम्ही किती थोडे आहात. हळू हळू वाढ होत राहिल. तुमचे बाबा बरोबर गुप्त प्रेम आहे. कोठे पण राहा, तुमच्या बुध्दीमध्ये आहे, बाबा मधुबनमध्ये बसले आहेत. बाबा म्हणतात मला तेथे (मुलवतनमध्ये) आठवण करा. तुमचे पण निवास स्थान तेच आहे, तर जरुर बाबाची आठवण होईल, ज्यांना म्हटले जाते, तुम्ही मात पिता. ते बरोबर आता तुमच्याजवळ आले आहेत. बाबा म्हणतात कि, मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. रावणाने तुम्हाला पतित तमोप्रधान बनविले आहे, आता सतोप्रधान पावन बनायचे आहे. पतित कसे जावू शकतील. पवित्र तर जरुर बनायचे आहे. आता एक पण मनुष्य सतोप्रधन नाही. ही आहे तमोप्रधान दुनिया. पतित कसे जावू शकतील. पवित्र तर जरुर बनायचे आहे. आता एक पण मनुष्य सतोप्रधान नाही. ही आहे तमोप्रधान दुनिया. ही मनुष्यांचीच गोष्ट आहे. मनुष्यासाठीच सतोप्रधान, सतो रजो तमोचे रहस्य समजावले जाते. बाबा मुलांनाच समजावत आहेत. हे तर फार सोपे आहे. तुम्ही आत्मे आपले घरी होता. तेथे तर सर्व पावन आत्मे राहतात. अपवित्र तर राहत नाहीत. त्यांचे नावच आहे मुक्तीधाम. आता बाबा तुम्हाला पावन बनवून पाठवत आहेत. नंतर तुम्ही अभिनय करण्यासाठी सुखधाममध्ये जाता. सतो, रजो, तमो मध्ये तुम्ही आहात.

बोलावतात पण कि, बाबा आम्हाला तेथे घेऊन चला, जिथे चैन आहे. साधू संत इत्यादींना पण माहित नाही की, चैन कोठे मिळू शकतो? आता तुम्ही मुले जाणता कि, सुख-शांतीची चैन आम्हाला कोठे मिळेल. बाबा आता आम्हाला 21 जन्मासाठी सुख देण्यासाठी आले आहेत. बाकी जे शेवटी येतात. त्या सर्वांना मुक्ती देण्यासाठी आले आहेत. उशीराने जे येतात, त्यांची भुमिकाच थोडी आहे. तुमची भुमिका आहे सर्वांत मोठी. तुम्ही जाणता कि, आम्ही 84 जन्माची भुमिका बजावू. आता पूर्ण होत आहे. आता चक्र पूर्ण होत आहे. साज्या जुन्या झाडाला पूर्ण व्हावयाचे आहे. आता तुमची हे गुप्त सरकार दैवी झाडाचे कलम लावत आहे. ते लोक तर जंगली झाडाचे कलम लावतात. येथे बाबा काट्यांना बदलून दैवी फुलांचे झाड बनवत आहेत. ते पण सरकार आहे, हे पण गुप्त सरकार आहे. ते काय करत आहे, आणि हे काय करत आहेत. फरक तर पहा किती आहे. ते लोक तर काहीच समजत नाहीत. झाडाचे कलम लावत राहतात, जंगली झाडे तर अनेक प्रकारची आहेत. कोणी कशाचे कलम लावते, कोणी कशाचे. आता तुम्हा मुलांना बाबा परत देवता बनवत आहेत. तुम्ही सतोप्रधान देवता होता, मग 84 चे चक्र लावून तमोप्रधान बनले आहात. कोणी नेहमी साठीच सतोप्रधान राहतील, असे होतच नाही. प्रत्येक वस्तू नविन पासून मग जुनी होत आहे. तुम्ही 24 कॅरेट सोने होता, आता 9 कॅरेट सोन्याचा दागिना बनले आहात. मग 84 कॅरेट बनायचे आहे. आत्मेच असे बनले आहेत ना. जसे सोने तसा दागिना असतो. आता सर्व काळे सावळे बनले आहेत. आता परत पवित्र होण्यासाठी बाबा युक्ती पण सांगत आहेत. या योग अग्नीद्वारे तुमची भेसळ निघत आहे. बाबाची आठवण करावयाची आहे. बाबा स्वत: म्हणतात मला अशा प्रकारे आठवण करा. पतित पावन मी आहे. तुम्हाला अनेक वेळा मी पतितापासून पावन बनविले आहे. हे पण तुम्ही जाणत नव्हता. आता तुम्ही समजता कि, आज आम्ही पतित आहे, उद्या परत पावन बनू. त्यांनी तर कल्पाचा कालावधी लाखो वर्ष लिहून मनुष्यांना घोर अंधारामध्ये टाकले आहे. बाबा येऊन चांगले प्रकारे सर्व गोष्टी सांगत आहेत. तुम्ही मुले जाणता कि, आम्हाला कोण शिकवत आहे. ज्ञानाचा सागर पतित पावन बाबा जे सर्वांचे सद्गती आहेत. मनुष्य भक्तीमार्गामध्ये किती महिमा गातात. परंतू त्याचा अर्थ काहीच समजत नाहीत. स्तुती करतात तर सर्वांना मिसळून करतात. जशी एकाची गुडदाणी करतात, ज्यांनी जे शिकविले ते पाठ करतात. आता बाबा म्हणतात कि, जे काही शिकले आहात त्या सर्व गोष्टी विसरुन जावा. जीवंत राहून माझे बना. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पण युक्तीने चला. आठवण एका बाबाची करावयाची आहे. त्यांचा तर आहे हठयोग तुम्ही आहात राजयोगी. घरातील सर्वांना हे शिक्षण द्यावयाचे आहे. तुमच्या वागण्याला पाहून ते अनुकरण करतील. कधी आपसात भांडण करु नका. जर भांडाल तर इतर सर्व काय म्हणतील, यांच्यात तर क्रोध फार आहे. तुमच्यामध्ये कोणता पण विकार राहू नये. मनुष्याच्या बुध्दीला भ्रष्ट करणारा आहे सिनेमा, हे जसे एक नरक आहे. तिथे गेल्यानेच बुध्दी नष्ट होऊन जाते. दुनियेमध्ये किती घाण आहे. एकीकडे सरकार कायदा पास करते कि, 18 वर्षाचे आत कोणी लग्न करावयाचे नाही, तरी पण अनेकानेक लग्न होतच राहतात. काखेमध्ये मुलांना बसवून लग्न करतात. आता तुम्ही जाणता कि, बाबा आम्हाला या छी-छी दुनियेतून घेऊन जात आहेत. आम्हाला स्वर्गाचे मालक बनवत आहेत. बाबा म्हणतात, नष्टोमोहा बना, फक्त माझी आठवण करा. कुटूंब परिवारामध्ये राहून माझी आठवण करा. काही मेहनत कराल तरच विश्वाचे मालक बनाल. बाबा म्हणतात माझी एकट्याची आठवण करा आणि आसुरी गुण सोडा. रोज रात्री आपला जमा खर्च पाहा-हा तुमचा व्यापार आहो. हा विरळाच कोणी व्यापार करेल. एका सेकंदामध्ये कंगाल ला राजा बनवितात, ही जादू आहे ना. गंगाजी कडून कोणी पावन बनू शकत नाही. तुम्हा मुलांमध्ये आग किती ज्ञान आहे. तुम्हाला ओतून खुशी झाली पाहिजे, बाबा परत आले आहेत. देवींचे अनेक चित्र बनवितात. त्यांना शस्त्रे देऊन भयंकर रुप बनवितात. ब्रह्माला पण किती भुजा दाखवितात, आता तुम्ही समजता कि ब्रह्माच्या भुजा तर लाखो आहेत. एवढे सारे ब्रह्माकुमार कुमारी या बाबाच्या निर्मिती आहेत ना, तर प्रजापिता ब्रह्माच्या एवढ्या भुजा आहेत.

आता तुम्ही आहात रुप बसत. तुमच्या मुखातून सदैव रत्न निघाले पाहिजेत. फक्त ज्ञानरत्न आणखीन कोणत्या गोष्टी नाहीत. या रत्नांची कोणी किंमत करु शकत नाही. बाबा म्हणतात मनमनाभव. बाबाची आठवण कराल तर देवता बनाल. अच्छा.

गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

रात्रीचा क्लास - 11-03-1968
तुमच्या कडे प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यासाठी मोठ मोठे लोक येतात, ते फक्त एवढेच समजतात कि, भगवानाला प्राप्त करण्यासाठी यांनी हा चांगला रस्ता काढला आहे. जसे भगवानाला प्राप्त करण्यासाठी सतसंग इ. करतात, वेद वाचतात, तसे हा पण यांनी एक रस्ता काढला आहे. बाकी हे समजत नाहीत कि यांना भगवान शिकवत आहे. फक्त चांगले कर्म करत आहेत, पवित्रता आहे आणि भगवानाशी भेटवितात, या देवींनी चांगला रस्ता काढला आहे बस. ज्यांचेकडून उद्घाटन केले जाते ते तर स्वत:ला फार उंच समजतात. कोणी मोठ मोठे मनुष्य बाबासाठी समजतात कि, कोणी महान पुरुष आहे, त्यांना जावून भेटावे. बाबा तर म्हणतात कि, अगोदर फॉर्म भरुन पाठवा. प्रथम तर तुम्ही मुलांनी त्यांना बाबाचा परिचय द्यावा. परिचया शिवाय येऊन काय करेल. शिवबाबाशी तर तेव्हा भेटू शकेल जेव्हा पूर्ण निश्चय होईल. परिचयाशिवाय भेटून काम करेल. कोणी सावकार येतात, त्यांना वाटते की आम्ही यांना काही तरी देवू कोणी गरीब एक रुपया देतात, सावकार 100 रुपये देतात. गरीबाचा एक रुपया मुल्यवान आहे. ते साहुकार लोक तर कधी आठवणीची यात्रा यथार्थ रितीने करु शकत नाहीत. ते आत्म अभिमानी बनू शकत नाहीत. प्रथम तर पतिता पासून पावन कसे बनायचे आहे, ते लिहून द्यावयाचे आहे. तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे. यामध्ये प्रेरणा इ. ची कोणती गोष्ट नाही. बाबा म्हणतात माझी एकट्याची आठवण करा तर गंज निघून जाईल. प्रदर्शनी इ. पाहण्यासाठी येतात. परंतू त्यानंतर दोन तीन वेळा येऊन समजले. तर कळून येते की, यांना थोडा बाण लगला आहे. देवता धर्माचा आहे, यांनी भक्ती चांगली केली आहे. जरी कोणाला चांगले वाटले. परंतू लक्ष्याला ध्यानात घेतले नाही, तर मग तो काय कामाचा. हे तर तुम्ही मुले जाणता कि नाटक चालत राहत आहे. जे काही चालले आहे ते बुध्दीद्वारे समजते की काय होत आहे. तुमच्या बुध्दीत चक्र चालत राहते, पुरावृत्ती होत राहते. ज्यांनी जे काही केले आहे, ते करत राहताता. बाबा कोणाकडून घेतील, ना घेतील ते त्यांचे हातात आहे. जरी सेंटर इ. उघडताता, पैसे कामी लागतात. जेव्हा तुमचा प्रभाव वाढेल मग पैसे काय करायचे, मुळ गोष्ट आहे, पतितापासून पावन बनण्याची. ते तर फार अवघड आहे, यामध्ये चालणे. आम्हाला तर बाबाची आठवण करावयाची आहे. भाकरी खाणे, आणि बाबाची आठवण करणे. समजतात कि, अगोदर आम्ही बाबाकडून वारसा तर घेऊ. मी आत्मा आहे प्रथम तर हे पक्के केले पाहिजे. असा जेव्हा कोणी निघेल तेव्हा तीव्र पुरुषार्थ करु शकोल. खरे तर तुम्ही मुले साज्या विश्वाला योगबळाने पवित्र बनवत आहात तर मुलांना नशा राहिला पाहिजे. मुळ गोष्ट आहे पवित्रतेची. येथे शिकविले पण जाते आणि पवित्र पण बनायचे आहे. स्वच्छ पण राहायचे आहे. मनामध्ये इतर कोणती गोष्ट आठवली नाही पाहिजे. मुलांना समजावले जाते कि अशरीरी बना. येथे तुम्ही अभिनय करण्यासाठी आले आहात. सर्वांना आप आपला अभिनय करावयाचाच आहे. हे ज्ञान बुध्दीमध्ये राहिले पाहिजे. शिडीवर पण तुम्ही समजावू शकता. रावण राज्य आहेच पतित, रामराज्य आहे पावन. मग पतितापासून पावन कसे बनू, अशा गोष्टी मध्ये रमण केले पाहिजे, यालाच विचार सागर मंथन म्हटले जाते. 84 चे चक्र आठवणीत आले पाहिजे. बाबांनी सांगितले आहे, माझी आठवण करा. ही आहे आत्मिक यात्रा, बाबाच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील. त्या शरीराच्या यात्रेद्वारे तर आणखीनच विकर्म बनतात. सांगा, हे ताबीज आहे. याला समजले तर सर्व दु:ख दूर होईल. तावीज घालतातच दु:ख दूर होण्यासाठी. अच्छा.

गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. नष्टोमोहा बनून बाबाची आठवण करावयाची आहे. कुटूंब परिवामध्ये राहून विश्वाचे मालक बनण्यासाठी मेहनत करावयाची आहे. अवगुणांना सोडत जायचे आहे.

2. आपले वागणे असे ठेवा की जे सर्व पाहून अनुकरण करतील. कोणता पण विकार आत राहू नये, याचा तपास करावयाचा आहे.

वरदान:-
बाबाच्या प्रत्येक श्रीमताचे पालन करणारे, खरे स्नेही आशिक भव :-

जी मुले नेहमी एका बाबाचे स्नेहामध्ये लवलीन राहतात, त्यांना बाबचे प्रत्येक बोल प्रेमळ वाटतात, प्रश्चचिन्ह समाप्त होतात. ब्राह्मण जन्माचा पाया स्नेह आहे. जे स्नेही आशिक आत्मे आहेत. त्यांना बाबाची श्रीमत पालन करण्यासाठी कठीण अनुभव होत नाही. स्नेहामुळे नेहमी हा उमंग राहतो की, बाबांनी जे सांगितले आहे ते माझ्यासाठी सांगितले आहे, मला करावयाचे आहे. स्नेही आत्मे मोठ्या मनाचे असतात, त्यामुळे त्यांचेसाठी प्रत्येक मोठी गोष्ट पण लहान होऊन जाते.

बोधवाक्य:-
कोणत्या पण गोष्टीला मनाला लावून घेणे, हे पण नापास होण्याचे लक्षण आहे.