21-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो :- तुम्हाला नशा राहायला पाहिजे की ज्या शिवाची सर्व जण पूजा करतात, तो आमचा पिता बनला आहे, आम्ही त्याच्या समोर बसलो आहोत"

प्रश्न:-
मनुष्य ईश्वराला क्षमा का मागतात, त्यांना क्षमा मिळते का?

उत्तर:-
मनुष्य समजतात आम्ही जे पापकर्म केले आहेत,त्याची सजा ईश्वर धर्मराजा द्वारे देतील, म्हणून क्षमा मागतात. पण कर्मांची सजा कर्म भोगाच्या रूपामध्ये भोगावीच लागते, ईश्वर त्यांना कोणते औषध देत नाहीत. गर्भ जेल मध्ये ही सजा भोगावी लागते, साक्षात्कार होतो की तु हे -हे केले आहे. ईश्वराच्या मतावर चालले नाही म्हणून ही सजा आहे.

गाणे:-
तू रात्र घालवली झोपुन,दिवस घालवला खाऊन....

ओम शांती।
असे कोण म्हणाले? आत्मिक पिता म्हणाला. तो आहे उच्च ते उच्च. सर्व मनुष्यापेक्षाही, सर्व आत्म्यापेक्षाही उच्च. सर्वांमध्ये आत्मा आहे ना. शरीर तर भूमिका वठण्यासाठी मिळाले आहे.आता तुम्ही पाहत आहात, संन्यासी इत्यादींच्या शरीराचा किती मान असतो. आपल्या गुरु इत्यादींची किती महिमा करतात. हा बेहद चा पिता तर गुप्त आहे. तुम्ही मुले समजता शिवबाबा उच्च ते उच्च आहे, त्याच्यापेक्षा उच्च कोणीही नाही. धर्मराज ही त्याच्यासोबत आहे कारण भक्ती मार्गामध्ये क्षमा मागतात- हे ईश्वरा मला माफ कर. आता ईश्वर काय करणार! इथे सरकार तर तुरुंगामध्ये टाकतात. तो धर्मराज तर गर्भ रुपी तुरूंगामध्ये दंड देतो. भोगणा भोगावीच लागते, ज्याला कर्मभोग असे म्हणतात. आता तुम्ही जाणता कर्मभोग कोण भोगते? काय होते?म्हणतात - हे प्रभू क्षमा कर, दुःख हरुन, सुख दे. आता ईश्वर कुणाला औषध देतो का? तो तर काही करू शकत नाही. मग त्याला ईश्वर असे का म्हणतात? कारण की ईश्वरा सोबत धर्मराज पण आहे. वाईट काम केल्याने जरूर सजा भोगावी लागते. सर्व साक्षात्कार होतात. साक्षात्कारा विना सजा भेटत नाही. गर्भ रुपी तुरूंगामध्ये तर कोणतेही औषध इत्यादी नाही. तिथे सजा भोगावीच लागते. जेव्हा दुःखी होतात तेव्हा म्हणतात, हे ईश्वरा मला या तुरुंगातून बाहेर काढ. आता तुम्ही मुले कोणासमोर बसला आहात? उंच ते उंच पिता आहेत, परंतु आहेत गुप्त. इतर सर्वांचे शरीर पहायला मिळतात, इथे शिवबांना तर आपले हात-पाय इ. नाहीत. फुलं इ. कोण घेणार? यांच्या हातानेच घ्यावे लागेल, जर वाटले तर. परंतु कोणाकडून घेत नाहीत. जसे ते शंकराचार्य म्हणतात मला कोणी स्पर्श करु नका. तर बाबा म्हणतात मी पतितां ची कोणतीही वस्तू कशी घेणार. मला फुलांचीही गरज नाही. भक्ती मार्गामध्ये सोमनाथ इ. ची मंदिरं बनवतात, फुले वाहतात. परंतु मला तर शरीरच नाही. आत्म्याला कोणी कसे शिवणार! म्हणतात मी पतितां कडून फुलं कसे घेऊ! कुणी हातही लावू शकत नाही. पतितांना स्पर्श करु देणार नाही. आज 'बाबा' म्हणतात उद्या जाऊन नर्क वासी बनतात. अशां कडे तर पहायलाही नको. बाबा म्हणतात- मी तर उंच ते उंच आहे. या सर्व संबंधितांचा ही नाटका अनुसार उद्धार करायचा आहे. मला कुणी जाणतच नाही. शिवाची पूजा करतात परंतु त्यांना कुणी थोडेच जाणतात की हा गीतेचा भगवान आहे आणि इथे येऊन ज्ञान देत आहे. गीतेमध्ये कृष्णाचे नाव टाकले आहे. कृष्णा नी ज्ञान दिले मग शिव काय करतात! तर मनुष्य समजतात तो तर येतच नाही. अरे, पतित-पावन कृष्णाला थोडीच म्हणणार. पतित पावन तर मला म्हणतात ना. तुमच्या मध्येही खूप थोडे ओळखतात जे एवढा आदर ठेवतात. राहतात किती साधे, समजावतात ही- मी या साधू इ. चा पिता आहे. जे पण शंकराचार्य इ. आहेत, या सर्वांच्या आत्म्याचा मी पिता आहे. शरीरांचा पिता जो आहे तो तर आहेच, मी आहे सर्व आत्म्यांचा पिता. सर्वजण माझी पूजा करतात.आता तो इथे समोर बसलेला आहे. परंतु सर्वांना थोडेच समजते की आम्ही कोणासमोर बसलो आहोत.सर्व आत्मे अनेक जन्मापासून देह भानावर प्रभावित झाले आहेत. म्हणुन बाबांची आठवण करू शकत नाहीत. देहा कडेच पहात राहतात. देही - अभिमानी असतील तर त्या बाबांची आठवण करतील आणि बाबांच्या श्रीमता वर चालतील. बाबा म्हणतात मला ओळखण्याचा सर्वजण पुरुषार्थ करत आहेत. शेवटी पूर्ण देही - अभिमानी बनणारे पास होणार आहेत. बाकी सर्वांमध्ये थोडा- थोडा देह अभिमान राहील. बाबा तर आहेत गुप्त. त्यांना काही देऊ शकत नाही. मुली शिवाच्या मंदिरां मध्येही समजावून सांगू शकतात. कुमारीनींच शिवबाबां चा परिचय दिला आहे. आहेत तर कुमार आणि कुमारी. कुमारांनी ही परिचय दिला असेल. मातांना ही खास सांगितले जाते. कारण की त्यांनी पुरुषांपेक्षा जास्त सेवा केली आहे. तर मुलांना सेवेची आवड असायला पाहिजे. ज्याप्रमाणे त्या शिक्षणाची आवड असते ना. ते आहे शारीरिक शिक्षण, हे आहे आत्मिक शिक्षण. शरीराचे शिक्षण घेतील, योगासने वगैरे शिकतील, मिळणार काहीच नाही. समजा एखाद्याला मुलगा झाला तर खूप धूमधडाक्यात त्याची पाचवी इ. साजरी करतात, परंतु त्यांना मिळणार काय! एवढा वेळच नाही जे काही मिळू शकतील. इथून जाणारे ही जन्म घेतात परंतु त्यांना समजत काहीच नाही. इथून दूर झालेला असेल तर इथे जे शिकलेला आहे त्यानुसार लहानपणीच शिव बाबांची आठवण करत असेल. हा तर मंत्र आहे ना. लहान मुलांना शिकवतील, तो बिंदू इ. तर समजू शकत नाही. फक्त शिव बाबा - शिवबाबा म्हणत राहतील. शिव बाबांची आठवण करा तर स्वर्गाचा वारसा मिळेल. असे त्यांना समजावले तर तेही स्वर्गामध्ये येतील. परंतु उच्चपद प्राप्त करू शकणार नाहीत. अशी खूप मुले येतात, शिवबाबा- शिवबाबा म्हणत राहतात. नंतर अंत मती सो गती होईल . ही राजधानी स्थापन होत आहे. आता मनुष्य शिवाची पूजा करतात, परंतु जाणतात थोडीच ज्याप्रमाणे छोटा मुलगा शिव - शिव म्हणतो, समजत काहीच नाही. इथे ही पूजा करतात परंतु ओळख काहीच नाही. तर त्यांना सांगायला हवे, तुम्ही ज्याची पूजा करत आहात, तोच ज्ञानाचा सागर, गीतेचा भगवान आहे. तो आम्हाला शिकवत आहे. या दुनियेमध्ये असा कोणताही मनुष्य नाही की जो असे म्हणू शकतो की शिव बाबा आम्हाला राज योग शिकवत आहेत. हे फक्त तुम्हालाच माहिती आहे,तरीही तुम्ही विसरता. भगवानुवाच मी तुम्हाला राज योग शिकवत आहे.कोण म्हणाले-भगवानुवाच, काम महा शत्रू आहे, याच्यावर विजय मिळवा. जुन्या दुनियेचा संन्यास करा. तुम्ही हटयोगी हदचे संन्यासी आहात. ते आहेत शंकराचार्य, हे आहेत शिवाचार्य. ते आम्हाला शिकवत आहेत. कृष्णाचार्य म्हणू शकत नाही. तो तर लहान मुलगा आहे. सतयुगामध्ये ज्ञानाची गरजच राहत नाही. जिथे जिथे शिव मंदिरे आहेत तिथे तुम्ही मुले खूप चांगली सेवा करू शकता. शिवाच्या मंदिरामध्ये जा, मातांनी गेलेले चांगले आहे, कन्यांनी गेले तर त्याहीपेक्षा चांगले आहे. आता तर आम्हाला बाबांकडून राज्य भाग्य घ्यायचे आहे. बाबा आम्हाला शिकवत आहेत नंतर आम्ही महाराजा महारानी बनणार आहोत. उंच ते उंच पिता आहे, असे शिक्षण कोणी मनुष्य देऊ शकत नाही. हे आहे कलियुग. सतयुगामध्ये यांचे राज्य होते. हे राजा - राणी कसे बनले, कुणी राज योग शिकवला, जे सतयुगाचे मालक बनले? ज्याची तुम्ही पूजा करत आहात, तो आम्हाला शिकवून सतयुगाचे मालक बनवत आहे. ब्रम्हा द्वारे स्थापना, विष्णू द्वारे पालना...... पतित प्रवृत्ती मार्ग वालेच पावन प्रवृत्ती मार्गामध्ये जातात. असे म्हणतात,बाबा आम्हाला पतिता पासुन पावन बनवा. पावन बनवून असे देवता बनवा. तो आहे प्रवृत्ती मार्ग. निवृत्तीमार्ग वाल्यांचे गुरू बनायचे नाही. जे पवित्र बनतात त्यांचा गुरू बनू शकतो. असे खूप एकत्र सोबत राहतात, विकारासाठी लग्न करत नाहीत. तर तुम्ही मुले अशा प्रकारे सेवा करू शकता. मनापासून आवड असली पाहिजे. आम्ही बाबांची सुपुत्र बनुन का नाही सेवा करायची. जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे. आता शिव बाबा सांगतात कृष्ण तर असू शकत नाही. तो तर एकदाच सत युगा मध्ये असेल. दुसऱ्या जन्मामध्ये तोच चेहरा तेच नाव थोडीच असतील? ८४जन्मामध्ये ८४ चेहरे. कृष्ण हे ज्ञान कोणाला शिकवु शकत नाही. तो कृष्ण इथे कसा येणार. आता तुम्ही या गोष्टी समजू शकता. अर्धा कल्प चांगले जन्म होतात नंतर रावण राज्य सुरू होते. मनुष्य हुबेहूब जनावरासारखे बनतात. एक दुसऱ्याशी भांडत राहतात. तर रावणाचा जन्म झाला ना. बाकी ८४ लाख जन्म तर नाहीत. एवढी विविधता आहे. जन्म थोडेच येवढे घेतात. तर हे बाबा बसून समजावतात. तो तर आहे उंच ते उंच भगवान. तो शिकवत आहे, त्यांच्यानंतर हा पण (ब्रह्मा) आहे ना. शिकलो नाहीतर कोणाजवळ तरी जाऊन दास-दासी बनावे लागेल. काय शिव बाबांजवळ दास-दासी बनाल? बाबा तर समजावतात शिकत नाही तर सत्य युगामध्ये जाऊन दास-दासी बनावे लागेल. जे काहीच सेवा करत नाहीत, खाल्ले - पिल्ले आणि झोपले ते काय बनतील! बुद्धी मध्ये तर येते ना काय बनणार आहे! मी तर महाराजा बनणार. आमच्या समोरही येणार नाहीत. स्वतःही समजू शकतात- आम्ही असे बनू. परंतु तरीही लाज वाटत नाही. आम्ही स्वतःची उन्नती करून काहीतरी प्राप्त करू, एवढेही समजत नाहीत. तर बाबा म्हणतात असे समजू नका की हे सर्व ब्रह्मा सांगत आहे, नेहमी असे समजा शिवबाबा मला समजावत आहेत. शिव बाबांचा आदर ठेवायचा आहे. त्यांच्यासोबत धर्मराज ही आहे. नाहीतर धर्मराजाचे दंडे सुद्धा खूप खावे लागतील. कुमारी नी तर खूप हुशार व्हायला पाहिजे. असे थोडेच करायचे आहे इथे ऐकले, बाहेर गेले आणि संपले. भक्तीमार्गाची किती सामग्री आहे. आता बाबा म्हणतात विष सोडून द्या. स्वर्गवासी बना. असे असे घोषवाक्य (सुविचार) तयार करा. बहादुर वाघीन बना. बेहद्द चा पिता भेटला आहे मग पर्वा कशाची. शासन धर्माला मानत नाही तर ते मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी कसे येतील. ते म्हणतात आम्ही कोणत्याही धर्माला मानत नाही. आम्ही सर्वांना एकच मानतो मग भांडण का करतात? खुपच खोटे बोलतात तिळ मात्रही खरे नाही. प्रथम ईश्वराला सर्वव्यापी मानतात इथूनच खोटे सुरू होते. हिंदू तर धर्मच नाही. ख्रिश्चनांचा आपला धर्म चालत आलेला आहे. ते स्वतःला बदलत नाहीत. हा एकच धर्म असा आहे जे स्वतःच्या धर्माला विसरून हिंदू असे म्हणतात आणि मग नावे कशी- कशी ठेवतात, श्री श्री आमका....... आता श्री अर्थात श्रेष्ठ आहेत कुठे. श्रीमत ही कोणाचे नाही. ते तर त्यांचे लोखंडासारखे ( गंजलेले) मत आहे. त्यांचे श्रीमत कसे म्हणू शकतो. आता तुम्ही कुमारी उभ्या राहिल्या, तर कोणालाही समजावून सांगू शकता. परंतु योग युक्त चांगल्या हुशार मुली पाहिजेत. अच्छा. गोड - गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात - पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आपली प्रगती करण्यासाठी बाबांच्या सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे. फक्त खाणे, पिणे, झोपणे, हे पद गमावणे आहे.

2. बाबांचा आणि ज्ञानाचा आदर ठेवायचा आहे. देही - अभिमानी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. बाबांची शिकवण धारण करून सुपुत्र बनायचं आहे.

वरदान:-
स्वतःला विश्व सेवे प्रती अर्पण करून मायेला दासी बनवणारे सहज संपन्न भव.

आता आपला वेळ, सर्व प्राप्ती, ज्ञान, गुण आणि शक्ती विश्वाच्या सेवेसाठी समर्पित करा. जो संकल्प मनामध्ये येतो तो तपासा की विश्व सेवे प्रती आहे? अशाप्रकारे सेवे प्रती अर्पण झाल्याने स्वतः सहज संपन्न बनाल. सेवेच्या लगन मध्ये छोटे-मोठे पेपर किंवा परीक्षा स्वतः समर्पण होऊन जातील. नंतर मायेला घाबरणार नाही, सदैव विजयी बनण्याच्या खुशी मधे नाचत रहाल. मायेला आपली दासी अनुभव कराल. स्वतः सेवेमध्ये समर्पित व्हाल तर माया स्वतः समर्पित होईल.

बोधवाक्य:-
अंतर्मुखता द्वारे तोंड(मुख)बंद करा तर क्रोध समाप्त होऊन जाईल.