21-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबा तुम्हाला शिकवत आहेत, सुंदर देवी-देवता, बनविण्यासाठी, सुंदरतेचा आधार आहे पवित्रता"

प्रश्न:-
परमेश्वरा वर जे आत्मे समर्पित होतात, त्या आत्म्यांची लक्षणे काय आहेत?.

उत्तर:-
समर्पित होणारे परवाने(आत्मे) ते आहेत (१) परमेश्वर जो आहे ,जसा आहे ,त्या रूपामध्ये अर्थ सहीत ओळखून, त्यांची आठवण करतात. (२) समर्पित होणे, म्हणजे बाबा सारखे बनणे. (३) समर्पित होणे, म्हणजे बाबा पेक्षाही, उच्च राज्यपदाचे अधिकारी बनणे.

गीत:-
महफिल मे जल उठी शमा

ओम शांती।
आत्मिक मुलांनी या गीताची ओळ ऐकली. हे कोण समजावत आहे ? आत्मिक पिता .ते ज्योतीरुप पण आहेत. नावं तर अनेक आहेत, बाबा ची स्तुती पण खूप करतात. ही पण परमपिता परमात्मा ची स्तुती आहे ना. बाबा ज्योती बनून आले आहेत, परवाण्यासाठी . पतंग जेव्हा ज्योती ला पाहतात तर त्यावर, समर्पित होऊन शरीर सोडून देतात. अनेक परवाने आहेत जे ज्योती, वर प्राण देतात. त्यामध्ये पण खास, ज्या वेळी दिवाळी असते, दिवे फार जाळतात ,त्यावेळी लहान लहान अनेक जीव रात्रीला मरून जातात . आता तुम्ही मुले जाणता की बाबा सर्वोच्च आत्मा आहेत. त्यांना हुसेन पण म्हटले जाते. फार सुंदर आहेत ,कारण ते नेहमीच पवित्र आहेत .आत्मा पवित्र बनते तर,त्याला शरीर पण पवित्र, नैसर्गिक सुंदर मिळते. शांतीधाम मध्ये आत्मे पवित्र राहतात, मग जेव्हा इथे अभिनय करण्यासाठी येतात ,त्यावेळी सतो प्रधान पासून सतो, रजो ,तमो मध्ये येतात. मग आत्मा सुंदर पासून काळी म्हणजे अपवित्र बनते. आत्मा पवित्र असते, त्यावेळी सोन्यासारखी असते ,त्यांना शरीर पण सोन्यासारखे मिळते .जग पण जुने आणि नवे होते. ते सुंदर परमपिता परमात्मा, ज्याना भक्ती मार्गामध्ये बोलावतात की, हे शिवबाबा ,ते निराकार परमपिता परमात्मा आले आहेत. आत्म्याला अपवित्र पासून ,पवित्र सुंदर बनविण्यासाठी .असे नाही की, आज काल जे फार सुंदर आहेत, त्यांची आत्मा पवित्र आहे, नाही .जरी शरीर सुंदर असले ,तरी पण आत्मा तर अपवित्रच आहे ना. विलायत मध्ये किती सुंदर असतात.तुम्ही जाणता की, हे लक्ष्मी नारायण तर आहेत, सत्ययुगातील सुंदर ,आणि इथे नरकातील सुंदर आहेत. मनुष्य या गोष्टीला ओळखत नाहीत. मुलांना पण समजावले जाते की, ही आहे नरकातील सुंदरता. आम्ही आता स्वर्गा साठी नैसर्गिक सुंदर बनत आहोत ,तेही २१ जन्मासाठी सुंदर बनतो. येथील सुंदरता तर एका जन्मासाठी आहे. इथे बाबा आले आहेत ,साऱ्या दुनियेतील मनुष्यमात्राला च काय, तर साऱ्या दुनिये ला पण सुंदर बनविण्यासाठी. सत्ययुगी दुनिये मध्ये होते,सुंदर देवी-देवता, ते बनण्यासाठी तुम्ही आता शिकत आहात. बाबाला ज्योती, पण म्हणतात, परंतु ते आहेत परमात्मा, जसे तुम्हाला आत्मा म्हणतात, तसे त्यांना परमात्मा म्हणतात .तुम्ही मुले बाबा ची महिमा गाता ,बाबा मग तुमची महिमा गातात, तुम्हाला असे बनवित आहे ,जे माझ्यापेक्षाही तुमचे पद उंच होते.मी जो आहे, जसा आहे ,जशी मी भूमिका बजावत आहे ,हे आणखीन कोणी जाणत नाही. आता तुम्ही मुले जाणता की ,जसे आम्ही आत्मे ,भूमिका करण्यासाठी परमधाम वरून येतो, आम्ही शुद्रकळाचे होतो ,मग आता ब्राह्मण कुळाचे झाले आहोत हा पण तुमचा वर्ण आहे. आणखीन कोणत्या धर्म वाल्या साठी हे वर्ण नाहीत. त्यांचे वर्ण होत नाहीत .त्यांचा तर एकच वर्ण आहे. ख्रिश्चन पण येतात. होय, त्यांच्या मध्ये पण सतो- रजो -तमो मध्ये येतात .बाकी हे वर्ण तुमच्यासाठी आहेत .सृष्टी पण सतो, रजो तमो मध्ये येते . हे सृष्टिचक्र बेहदचे बाबा बसून समजावत आहेत. जे बाबा ज्ञानाचे सागर, पवित्रतेचे सागर आहेत .स्वतः सांगतात की मी पुनर्जन्म घेत नाही. जरी शिवजयंती पण साजरी करतात, परंतु मनुष्यांना हे माहीत नाही की, ते कधी येतात, त्यांची जीवन काहाणी पण जाणत नाहीत .बाबा म्हणतात की ,मी जसा आहे ,जो आहे, माझ्या मध्ये कोणती भूमिका आहे, सुष्टी चक्र कसे फिरत आहे .हे तुम्हा मुलांना मी कल्प कल्प समजावून सांगतो .तुम्ही जाणता की ,आम्ही शिडी उतरत, उतरत तमोप्रधान बनले आहोत ,84 जन्म पण तुम्ही घेता .शेवटी जे आत्मे येतात ते पण सतो, रजो, तमो मध्ये येतात. तुम्ही तमोप्रधान बनता ,तर सारी दुनिया तमोप्रधान बनून जाते .मग तुम्हाला तमोप्रधान पासून सतो प्रधान जरूर बनायचे आहे. हे सृष्टिचक्र फिरत राहते.आता आहे कलीयुग, त्यानंतर मग सतयुग येईल.कलियुगाचे आयुष्य पूर्ण होत आहे. बाबा म्हणतात, मी साधारण तना मध्ये हुबेहूब कल्पा पूर्वी प्रमाणे प्रवेश केला आहे. तुम्हाला परत राजयोग शिकवत आहे .योग तर आजकाल फार आहेत .वकिली योग, इंजिनीयर योग, वकील बनण्यासाठी वकिलाच्या बरोबर, बुद्धीचा योग लावला जातो .आम्ही वकील बनत आहे ,तर शिकवणाऱ्याची आठवण येते. त्यांना तर पिता वेगळा आहे ,गुरु पण असेल तर त्याची आठवण करतात. तो पण वकिला बरोबर बुद्धीचा योग लागतो. आत्माच शिकत आहे ,आत्माच शरीर घेऊन न्यायधीश,, वकील इत्यादी, बनत आहे.

आता तुम्ही मुले, आत्माभिमान बनण्याचे संस्कार स्वतःमध्ये भरत आहात. अर्धा कल्प देह अभिमानी राहिलात, आता बाबा म्हणतात की, आत्मा अभिमानी बना. आत्म्यामध्ये शिक्षणाचे संस्कार आहेत. मनुष्य आत्माच न्यायाधीश बनते. आता आम्ही विश्वाचे मालक देवता बनत आहोत . शिकवणारे आहेत शिवबाबा,परमात्मा .तेच ज्ञानाचे सागर, शांती, संपत्तीचे सागर आहेत. हे पण दाखवतात की, सागरातून रत्नांच्या थाळ्या निघाल्या .या आहेत भक्तिमार्गाच्या गोष्टी. बाबा तर उदाहरण देतात ना . बाबा तर समजावतात की,हे आहेत अविनाश ज्ञान रत्न. या ज्ञान रत्ना पासून तुम्ही फार सावकार बनत आहात, आणि मग हिरे जवाहरात पण तुम्हाला भरपूर मिळतील .हे एकेक रत्न लाखो रुपयाचे आहे ,जे तुम्हाला एवढे सावकार बनवत आहेत. तुम्ही ओळखता की, भारतातच निर्विकारी जग होते ,त्यामध्ये पवित्र देवता राहत होते. आता काळे अपवित्र बनले आहेत. आत्मा आणि परमात्म्याचा मेळावा होत आहे.आत्मा शरीरा मध्ये असते, तेंव्हाच ऐकू शकते . परमात्मा पण शरीरा मध्ये येतात. आत्माचे आणि परमात्म्याचे घर शांतीधाम आहे. तेथे कसलीच हालचाल होत नाही .इथे परमात्मा पिता येऊन मुलांना भेटतात.शरीरा सहित भेटत आहेत. ते तर घर आहे, तिथे विश्रांती मिळते .आता तुम्ही मुले, पुरुषोत्तम संगमयुगावर आहात, बाकी दुनिया कलियुगा मध्ये आहे .बाबा बसून समजावतात की , भक्ति मार्गामध्ये खर्च फार करतात .चित्र पण फार बनवतात. मोठे मंदिर बांधतात .नाहीतर कृष्णाचे चित्र घरांमध्ये पण ठेवू शकतात ,फार स्वस्त चित्र आहेत. मग एवढे दूर दूर मंदिरांमध्ये का जाता ? हा आहे भक्तिमार्ग .सतयुगा मध्ये काही मंदीर इ.नसते .तेथे तर आहेत च पूज्य . कलियुगा मध्ये पुजारी आहेत. तुम्ही आता संगमयुगा वर पूज्य देवता बनत आहात .आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात .यावेळी तुमचे हे, अंतिम पुरुषार्थी शरीर, फार फार बहुमूल्य आहे. याद्वारे तुम्ही फार कमाई करू शकता .बेहद च्या पित्या बरोबर तुम्ही खात, पीत आहात,बोलावतात पण त्यांना .असे म्हणत नाहीत, कृष्णा बरोबर खाऊ.बाबा ची आठवण करतात की, तुम्ही माता-पिता , तर बाबा बरोबर खेळत राहतात.कृष्णाची आम्ही सर्व मुलं आहोत, असे म्हणत नाहीत . सर्व आत्मे परमपिता परमात्मा ची मुलं आहेत . आत्मा शरीरा व्दारे म्हणते की, तुम्ही आलात तर, आम्ही तुमच्या बरोबर खेळू, खाऊ ,सर्वकांही करू. तुम्ही म्हणतातच की , बाप दादा.तर जसे घर झाले. बाप दादा आणि मुलं .हे ब्रह्मा आहेतच बेहद्दचे रचियता.बाबा त्यांच्या मध्ये प्रवेश करून, त्यांना दत्तक घेतात. त्यांना म्हणतात तुम्ही माझे आहात.ही आहे मुखवंशावली. जसे स्त्रीला दत्तक घेतात ना. ती पण मुखवंशावली च झाली. म्हणतात, तू माझी आहे .मग तिच्या द्वारे कुखवंशावली मुलांना जन्म देतात .हा रिवाज कुठून चालत आला? बाबा म्हणतात की, मी यांना दत्तक घेतले आहे. त्यांच्या द्वारे तुम्हाला दत्तक घेतो. तुम्ही माझी मुले आहात .परंतु हे आहेत पुरुष तुम्हा सर्वांना सांभाळण्यासाठी ,मग सरस्वतीला, दत्तक घेतात, त्यांना मातेचे नावे देतात. सरस्वती नदी. ही नदी माता झाली ना.बाप सागर आहेत .ही पण सागरापासून निघाली आहे. ब्रह्मपुत्रा नदी आणि सागराचा फार मोठा मेळा होत आहे. असा मेळावा आणखीन कोठे होत नाही .तो आहे नदीचा मेळा, हा आहे आत्मा आणि परमात्म्याचा मेळा .तो पण जेव्हा शरीरामध्ये येतात, तेव्हा मेळा लागतो .बाबा म्हणतात की मी हुसेन आहे .मी यांच्या मध्ये कल्प कल्प प्रवेश करतो . हे विश्व नाटकांमध्ये नोंदलेले आहे.तुमच्या बुद्धीमध्ये सारे सृष्टीचक्र आहे .याचे आयुष्य पाच हजार वर्षे आहे. या बेहदच्या सिनेमां मधून ,मग इतर हदचे सिनेमा बनवतात .जो भूतकाळ झाला ,तो वर्तमान काळ होतो. हे वर्तमान मग भविष्य होत आहे. त्याला मग भूतकाळ म्हटले जाते. भूतकाळ होण्यासाठी किती वेळ लागतो. नवीन दुनिये मधून येऊन किती वेळ झाला. पाच हजार वर्ष. तुम्ही प्रत्येक जण आता सुदर्शन चक्रधारी आहात. तुम्ही समजता की अगोदर आम्ही ब्राह्मण होतो ,मग देवता बनतो. तुम्हा मुलांना, आता बाबा द्वारे शांतीधाम व सुखधाम चा वरसा मिळत आहे. बाबा येऊन तीन धर्म एकत्र स्थापन करत आहेत, बाकी सर्वांचा विनाश होत आहे. घरी घेऊन जाणारे, तुम्हाला सद्गुरु , बाबा मिळाले आहेत. बोलतात पण की, आम्हाला सदगती मध्ये घेऊन जावा. शरीराला नाहीसे करा.अशी युक्ती सांगा ज्यामुळे, आम्ही शरीर सोडून ,शांतीधाम मध्ये निघून जाऊ .गुरू जवळ पण मनुष्य त्यासाठी जातात, परंतु ते गुरु तर शरीरा पासून सोडून, बरोबर घेऊन जाऊ शकत नाहीत. पतित-पावन तर एकच बाबा आहेत, तर ते जेव्हा येतात, तर पावन जरुर बनायचे आहे. बाबाला म्हटले जाते काळा चे काळ, महाकाळ. सर्वांना शरीरापासून मुक्त करून ,बरोबर घेऊन जातात . ते आहेतच सर्वोच्च मार्गदर्शक .सर्व आत्म्यांना घरी घेऊन जातात .हे छी छी शरीर आहे, याच्या बंधना पासून सुटायचे आहे. जर शरीरा पासून सुटला, तर बंधना पासून सुटला. आता तुम्हाला या सर्व आसुरी बंधना पासून सोडून, सुखाच्या दैवी संबंधां मध्ये घेऊन जात आहेत. तुम्ही जाणता की, आम्ही सुखधाम मध्ये जाऊ , द्वारा शांतीधाम. मग दुःखधाम मध्ये कसे येतात ,हे पण तुम्ही जाणता.बाबा येतातच श्याम पासून सुंदर बनवण्यासाठी. बाबा म्हणतात की ,मी तुमचा आज्ञाकारी खरा पिता आहे.पिता नेहमीच आज्ञाकारी असतात ना .सेवा फार करतात. खर्च करून शिकवतात, मग सर्व धन, दौलत मुलांना देऊन ,स्वतः साधु संतांच्या संगतीत जातात. स्वतःपेक्षा मुलाला उंच बनवतात. हे बाबा पण म्हणतात की, मी तुम्हाला डबल मालक बनवतो, तुम्ही विश्वाचे मालक पण बनता, आणि ब्रह्मांडाचे मालक पण बनता.तुमची पूजा पण डबल होते ,आत्म्याची पण पूजा होत आहे ,देवता वर्णांमध्ये पण पूजा केली जाते. माझी तर फक्त शिवलिंगाच्या रुपांमध्ये पूजा होते .मी राजा तर बनत नाही. तुमची किती सेवा करत आहे. अशा बाबाला मग, तुम्ही विसरता का? हे आत्मा, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा, तर तुमचे विकर्म नष्ट होतील .तुम्ही कोणा जवळ आले आहात? प्रथम बाबा मग दादा जवळ.आता पिता ,मग ग्रेट ग्रेट ग्रँड फादर आदिदेव, एडम ,कारण फार वंशावळी बनत आहेत .शिवबाबा ला कोणी ,ग्रेट ग्रेट ग्रँड फादर म्हणतात का?प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्हाला फार उच्च बनवत आहेत. असे बाबा मिळाले आहेत, मग त्यांना तुम्ही का विसरता? विसराल तर पावन कसे बनाल! बाबा पावन बनण्या च्या युक्ती सांगता आहेत .या आठवणी द्वारे तुमच्यातील कचरा निघेल. बाबा म्हणतात गोड गोड , प्रिय मुलांनो ,देहअभिमान सोडा, आत्माभिमान बना. पवित्र पण बनायचे आहे, काम महाशत्रू आहे.हा एक जन्म माझ्या साठी पवित्र बना्.लोकिक पिता पण म्हणतात की ,कोणते वाईट काम करू नका. माझ्या दाढीची लाज राखा.पारलौकिक बाबा पण म्हणतात की, मी पावन बनवण्यासाठी आलो आहे, आता काळे तोंड करू नका .नाही तर इज्जत जाईल. सर्व ब्राह्मणांची आणि बाबाची पण इज्जत घालवाल. लिहतात पण ,बाबा, आम्ही विकारी बनलो .काळे तोंड झाले. बाबा म्हणतात की, मी तुम्हाला सुंदर बनवण्यासाठी आलो आहे ,मग तुम्ही काळे तोंड का करता? तुम्हाला तर नेहमी सुंदर बनण्याचा पुरुषार्थ करावयाचा आहे .अच्छा

गोड गोड फार वर्षांनी ,भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बाप दादाची, प्रेमळ आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) हे शेवटचे पुरुषार्थी शरीर फार बहुमूल्य आहे, याद्वारे फार कमाई करायची आहे.बेहदच्या बाबा बरोबर खाता,पीता सर्व संबंधां चा अनुभव करावयाचा आहे.

(२) कोणते पण ,असे कर्म करायचे नाही की, ज्याद्वारे ब्राह्मण परिवाराची ,बाबाची इज्जत जाईल. आत्माभिमानी बनून संपूर्ण पवित्र बनायचे आहे .आठवणीने तुमच्यातील जुना कचरा निघून जाईल.

वरदान:-
कलियुगी दुनियेमधील दुःख अशांतीचे, देखावे पाहून नेहमी साक्षी व बेहदचे वैरागी भव:

या कलियुगी दुनियेमध्ये कांही पण होत राहील, परंतु तुमची नेहमीच चढती कला आहे. दुनिये मध्ये हाहाकार आहे, आणि तुमच्यासाठी जयजयकार आहे .तुम्ही कोणत्या पण परिस्थिती मध्ये घाबरत नाही, कारण तुम्ही , पहिल्या पासून तयार आहात. साक्षी होऊन प्रत्येक प्रकारचा, खेळ पाहत आहात,कोणी रडत आहे, ओरडत आहे ,साक्षी होऊन पाहण्यात मजा आहे. जे कलियुगी दुनियेतील दु:ख आशांती चे देखावे साक्षी होऊन पाहतात, ते सहज च बेहदचे वैरागी बनून जातात.

बोधवाक्य:-
कसली पण जमीन(वातावरण) तयार करायची असेल, तर वाणी बरोबर, वृत्तीची सेवा करा..