21.11.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, हे संगमयुग सर्वोत्तम बनण्याची शुभवेळ आहे, कारण याच वेळी बाबा तुम्हाला नरापासून नारायण बनण्याचे शिक्षण देत आहेत'.

प्रश्न:-

तुम्हाच्या जवळ असे कोणते ज्ञान आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्या पण परिस्थिती मध्ये रडत नाहीत?

उत्तर:-

तुमच्या जवळ या पुर्वनियोजीत बनलेल्या वैश्विक नाटकाचे ज्ञान आहे, तुम्ही जाणता कि, त्यामध्ये प्रत्येक आत्म्याचा स्वत:चा अभिनय आहे, बाबा आम्हाला सुखाचा वारसा देत आहेत, मग आम्ही रडायचे कशासाठी. पार ब्रह्म मध्ये राहणाऱ्याची परवाह होती, ते मिळाले आहेत, बाकी काय पाहिजे. नशीबवान मुले कधी रडत नाहीत.

ओम शांती:- आत्मिक बाबा मुलांना एक गोष्ट समजावत आहेत. चित्रांमध्ये पण असे लिहिले पाहिजे कि, त्रिमुर्ती शिवबाबा मुलांना समजावत आहेत. तुम्ही पण कोणाला समजावता तर तुम्ही आत्मा म्हणता कि, शिवबाबा असे म्हणत आहेत. हे बाबा(ब्रह्मा) पण म्हणतात, बाबा तुम्हाला समजावत आहेत. इथे मनुष्य मनुष्याला समजावत नाहीत परंतु परमात्मा आत्म्याला समजावत आहेत किंवा आत्मा आत्म्याला समजावत आहे. ज्ञानसागर तर शिवबाबाच आहेत आणि ते आत्मिक पिता आहेत. यावेळी आत्मिक मुलांना आत्मिक पित्याकडून वारसा मिळत आहे. शरीराचा अहंकार इथे सोडला पाहिजे. यावेळी तुम्हाला आत्मअभिमानी बनून बाबांची आठवण करायची आहे. कर्म पण केले पाहिजे, धंदा दोरी इत्यादी पण करत रहा, बाकी जेवढा वेळ मिळेल स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, तरच विकर्म विनाश होतील. तुम्ही जाणता कि, शिवबाबा यांच्यामध्ये आले आहेत. ते सत्य आहेत, चैतन्य आहेत. सत चित आनंदस्वरूप म्हणतात ना. ब्रह्मा, विष्णू, शंकर किंवा कोणत्या पण मनुष्याची ही महिमा नाही. उंच ते उंच एकच भगवान आहेत, ते सर्वोच्च आत्मा आहेत. हे ज्ञान पण तुम्हाला फक्त आताच मिळत आहे. नंतर कधी मिळणार नाही. दर पाच हजार वर्षा नंतर बाबा येतात, तुम्हाला आत्माभिमानी बनवून, बाबाची आठवण करवितात, त्यामुळे तुम्ही तमोप्रधान पासून सतो प्रधान बनत आहात, आणखीन कोणता उपाय नाही. जरी मनुष्य बोलावतात, हे पतितपावन या, परंतु अर्थ समजत नाहीत. पतित पावन सिताराम म्हटले तरीपण ठीक आहे. तुम्ही सर्व सीता किंवा भक्तीन आहात. ते एक राम भगवान आहेत, तुम्हां भक्तांना भगवंता कडून फळ मिळाले पाहिजे. मुक्ती किंवा जीवन्मुक्ती हे फळ आहे. मुक्ती जीवनमुक्तीचे दाता ते एकच बाबा आहेत .विश्व नाटकांमध्ये उंच ते उंच अभिनय करणारे पण आहेत, तर कनिष्ठ अभिनय करणारे पण आहेत.हे बेहदचे नाटक आहे, याला आणखीन कोणी समजत नाही. तुम्हीं यावेळी तमोप्रधान कनिष्ठ पासून सतोप्रधान पुरुषोत्तम बनत आहात. सतोप्रधानला च सर्वोत्तम म्हटले जाते. यावेळी तुम्ही सर्वोत्तम नाहीत. बाबा तुम्हाला सर्वोत्तम बनवत आहेत. हे नाटकाचे चक्र कसे फिरत आहे, याला कोणी पण जाणत नाही. कलियुग, संगमयुग नंतर सतयुग येत आहे. जुन्याला नवीन कोण बनवत आहे? बाबा शिवाय कोणी बनवू शकत नाही. बाबाच संगमयुगावर येऊन शिकवत आहेत. बाबा ना सतयुगा मध्ये येतात,ना कलियुगा मध्ये येतात. बाबा म्हणतात, माझा अभिनयच संगमयुगावर आहे, त्यामुळे संगम युग कल्याणकारी युग म्हटले जाते, हे शुभ युग आहे, फार उंच शुभवेळ संगमयुगाची आहे. जेव्हा बाबा येऊन तुम्हा मुलांना नरापासून नारायण बनवत आहेत. मनुष्य तर मनुष्यच आहेत परंतु दैवीगुण वाले बनतात, त्याला आदि सनातन देवी देवता धर्म म्हटले जाते. बाबा म्हणतात, मी हा धर्म स्थापन करत आहे, त्यासाठी पवित्र जरूर बनायचे आहे. पतित पावन एकच बाबा आहेत. बाकी सर्व सजनी, भक्तीन आहेत. पतित पावन सिताराम म्हणणे, हे पण बरोबर आहे, परंतु शेवटी जे रघुपती राघव राजाराम म्हणतात, ते चुकीचे आहे. मनुष्य बिगर अर्थ जे येते, ते बोलत राहतात, धुन लावत राहतात. तुम्ही जाणता चंद्रवंशी धर्माची आता स्थापना होत आहे. बाबा येऊन ब्राह्मण कुल स्थापन करत आहेत, याला राजधानी म्हणत नाहीत. हा परिवार आहे, येथे ना तुम्हा पांडवाची, ना कौरवा ची राजधानी आहे. गीता ज्यांनी वाचली आहे, त्यांना या गोष्टी लवकर समजून येतील. ही पण गीता आहे. कोण सांगत आहे? भगवान. तुम्हा मुलांना पहिल्या प्रथम हे समजावयाचे आहे कि, गीतेचा भगवान कोण? ते म्हणतात, कृष्ण भगवानुवाच आहे. आता कृष्ण तर सत युगामध्ये असतात. त्यांच्या मध्ये जी आत्मा आहे,ती तर अविनाशी आहे. शरीराचे नाव बदलत राहते. आत्म्याचे नाव कधी बदलत नाही. श्रीकृष्णाच्या आत्म्याचे शरीर सतयुगा मध्येच असते. नंबर एक मध्ये तर तेच जात आहेत. लक्ष्मी नारायण नंबर एक, नंतर दुसऱ्या क्रमांकाचे, मग तिसर्‍या क्रमांकाचे. तर त्यांचे मार्क पण तेवढे कमी होतात. ही माळा बनत आहे ना. बाबाने समजावले आहे रुण्ड माला पण असते आणि रुद्र माळा पण असते. विष्णुच्या गळ्यामध्ये रूण्ड माळा दाखवतात. तुम्ही मुले विष्णुपुरी चे मालक नंबरवार बनत आहात. तर तुम्ही जसे विष्णूच्या गळ्यातील हार बनता. पहिल्या प्रथम शिवाच्या गळ्यातील हार बनता. त्याला रुद्र माळा म्हटले जाते, जे जपतात. माळेची पूजा करत नाहीत, स्मरण करतात. माळेचा मणका तेच बनतात, जे विष्णुपुरी च्या राजधानी मध्ये क्रमाक्रमाने येतात. माळेमध्ये सर्वात प्रथम फूल असते, त्यानंतर युगलमणी. प्रवृत्ती मार्ग आहे ना.प्रवृत्ती मार्ग सुरू होत आहे, ब्रह्मा सरस्वती आणि मुले. तेच मग देवता बनतात. लक्ष्मी नारायण प्रथम आहेत. त्यांच्यावर फुल शिवबाबा आहेत. माळा फिरवत फिरवत शेवटी फुलाला माथा टेकवतात. शिवबाबा फुल आहेत, ते पुनर्जन्म घेत नाहीत, यांच्यामध्ये प्रवेश करतात. तेच तुम्हाला समजावत आहेत, यांची आत्मा तर स्वतःची आहे. ते आपला शरीर निर्वाह करतात, शिवबाबा चे काम फक्त ज्ञान देण्याचे आहे. जसे कोणाची स्त्री किंवा पिता इ. मरतात तर त्यांच्या आत्म्याला ब्राह्मणाच्या शरीरामध्ये बोलवतात, पूर्वी येत होती. आता ती काही शरीर सोडून तर येऊ शकत नाही. हे विश्व नाटकांमध्ये पहिल्या पासूनच नोंदलेले आहे. तो सर्व भक्ती मार्ग आहे. ती आत्मा तर गेली, जाऊन दुसरे शरीर घेतले. तुम्हा मुलांना आता हे सारे ज्ञान मिळाले आहे, त्यामुळे कोणी मेले तरी पण तुम्हाला काहीच चिंता नाही. आई मेली तरी हलवा खावा. (शांताबेहन चे उदाहरण) मुलीने जाऊन त्यांना समजावले कि, तुम्ही कशासाठी रडत आहात? त्यांनी तर जाऊन दुसरे शरीर घेतले, रडल्यामुळे तर ते परत येणार नाहीत. नशीबवान थोडेच रडतात. तर तिने सर्वांचे रडणे बंद करून, समजावून सांगितले. अशा अनेक मुली जाऊन समजावतात. आता रडणे बंद करा. खोट्या ब्राह्मणांना खाऊ घालू नका. आम्ही खऱ्या ब्राह्मणांना घेऊन येत आहोत, मग ज्ञान ऐकण्यास सुरुवात करतात. समजतात कि, ही गोष्ट तर बरोबर सांगत आहेत. ज्ञान ऐकून ऐकून शांत होऊन जातात. सात दिवसासाठी कोणी भागवत इ. ठेवतात, तरीपण मनुष्याचे दुःख दूर होते? या मुली सर्वांचे दुःख दूर करणाऱ्या आहेत. तुम्ही समजता कि, रडण्याची तर आवश्यकताच नाही. हे तर पूर्वनियोजित बनलेले नाटक आहे. प्रत्येकाला आपला अभिनय करायचा आहे. कोणत्या पण परिस्थिती मध्ये रडायचे नाही. बेहदचे पिता शिक्षक गुरु मिळाले आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही एवढे धक्के खाल्ले. पार ब्रह्म मध्ये राहणारे परमपिता परमात्मा मिळाले आहेत, तर बाकी काय पाहिजे. बाबा सुखाचा वारसा देत आहेत. तुम्ही बाबा ला विसरता तेंव्हा रडावे लागते. बाबांची आठवण केल्याने तुम्हाला खुशी होईल. ओहो! आम्ही तर विश्वाचे मालक बनत आहोत. मग 21 जन्म कधी रडणार नाहीत. 21 जन्म म्हणजे म्हातारे होईपर्यंत अकाली मृत्यु होत नाही. तर मनातून किती गुप्त खुशी झाली पाहिजे.

तुम्ही जाणत आहात, आम्ही मायेवर विजय प्राप्त करून, जगतजीत बनू. हत्यार इ.ची कोणती गोष्ट नाही. तुम्ही शिवशक्ती आहात. तुमच्या जवळ ज्ञानाची कट्यार ज्ञानबाण आहेत. त्यांनी मग भक्तीमार्गा मध्ये देवींना स्थूल बाण,तलवार इत्यादी दिले आहेत. बाबा म्हणतात ज्ञान तलवारीने विकारांना जिंकायचे आहे, बाकी देवी थोड्याच हिंसक असतात. हा सर्व भक्तीमार्ग आहे. साधुसंत इत्यादी निवृत्तीमार्गाचे आहेत, ते प्रवृत्ती मार्गाला मानतच नाहीत. तुम्ही तर साऱ्या जुन्या दुनियेचा संन्यास करत आहात आणि जुन्या शरीराचा पण. आता बाबांची आठवण कराल तर आत्मा पवित्र होऊन जाते. ज्ञानाचे संस्कार घेऊन जातात. त्यानुसार नवीन दुनीये मध्ये जन्म मिळतो. जर इथे पण जन्म घेतला तर कोणत्या चांगल्या राजाच्या घरी किंवा धार्मिक घरांमध्ये चांगले संस्कार घेऊन जातील .सर्वांना प्रिय वाटतील. म्हणतील ही तर देवी आहे. कृष्णाची किती महिमा आहे. लहानपणी दाखवतात लोणी चोरले, मटके फोडले, हे केले... किती कलंक लावले आहेत. बरं, मग कृष्णाला सावळा कां दाखवत आहेत? तिथे तर कृष्ण गोरा असेल ना. मग शरीर बदलत राहते. नाव पण बदलत राहते.श्रीकृष्ण तर सतयुगाचे पहिले राजकुमार होते, त्यांना सावळा कां दाखवले आहे? कधी कोणी सांगू शकणार नाहीत. तिथे साप इ.तर नसतात, ज्यामुळे काळे दाखवले आहे.इथे विष चढल्यामुळे काळे होतात. येथे तर कोणती खरी गोष्ट नाही. तुम्ही आता दैवी संप्रदायाचे बनत आहात. या ब्राह्मण संप्रदायाची तर कोणाला माहिती नाही. पहिल्या प्रथम बाबा ब्रह्मा द्वारे ब्राह्मणांना दत्तक घेत आहेत. प्रजापिता आहेत तर त्यांची प्रजा पण अनेकानेक आहेत. ब्रह्मा ची मुलगी सरस्वती म्हणतात. पत्नी तर नाही. हे कोणाला पण माहित नाही. प्रजापिता ब्रह्माची तर मुखवंशावळ आहे. पत्नीची तर गोष्टच नाही. यांच्यामध्ये बाबा प्रवेश करून म्हणतात, तुम्ही माझी मुले आहात. मी यांचे नाव ब्रह्मा ठेवले आहे, जे पण मुले बनली, सर्वांचे नाव बदलून ठेवले. तुम्ही मुले आता मायेवर विजय प्राप्त करत आहात, याला म्हटले जाते, जय आणि पराजयाचा खेळ. बाबा किती स्वस्त सौदा करत आहेत. तरी पण माया पराजित करते, त्यामुळे पळून जातात. पाच विकार रुपी माया हरवत आहे, ज्यांच्यामध्ये पाच विकार आहेत, त्यांना आसुरी संप्रदाय म्हटले जाते. मंदिरा मध्ये देवीच्या समोर जाऊन महिमा गातात कि, तुम्ही सर्वगुण संपन्न... बाबा तुम्हा मुलांना समजावत आहेत, तुम्हीच पूज्य देवता होता, मग 63 जन्म पुजारी बनलात, आता परत पुज्य बनायचे आहे. बाबा पुज्य बनवित आहेत, रावण पुजारी बनवत आहे. या गोष्टी कोणत्या शास्त्रां मध्ये नाहीत. बाबानी कोणते शास्त्र थोडेच वाचलेले आहे, ते तर ज्ञानाचे सागर आहेत. जगातील सर्वोच्च सत्ता आहेत. ऑलमाइटी म्हणजे सर्वशक्तिमान. बाबा म्हणतात मी सर्व वेद शास्त्र इ.ना जाणत आहे. ही सर्व भक्तीमार्गाची सामग्री आहे. या सर्व गोष्टीला मी जाणत आहे. द्वापर पासूनच तुम्ही पुजारी बनत आहात.सतयुग त्रेता मध्ये तर पूजा होतच नाही. ते पूज्य घराणे आहे, मग पुजारी घराणे होते. यावेळी सर्व पुजारी आहेत. या गोष्टी कोणाला माहित नाहीत. बाबाच घेऊन ८४ जन्माची गोष्ट सांगत आहेत. पूज्य आणि पुजारी हा तुमच्या वरतीच सर्व खेळ बनला आहे. हिंदू धर्म म्हणतात. खरे तर भारतामध्ये आदि सनातन देवी-देवता धर्म होता, ना की हिंदू. किती गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. हे शिक्षण एका सेकंदाचे आहे. तरी पण किती वेळ लागत आहे. म्हणतात समुद्राला शाई बनवा, सारे जंगल कलम बनवा, तरी पण पूर्ण होऊ शकत नाही. अंतापर्यंत तुम्हाला ज्ञान सांगत राहतो. तुम्ही याची पुस्तके किती बनवाल. सुरुवातीला पण बाबा सकाळी उठून लिहीत होते, मग मम्मा सांगत होती, तेंव्हा पासून छपाई चालूच आहे. किती कागद नष्ट झाले असतील. गीता तर एवढी लहान होती. गीता चे लॉकेट पण बनवतात. गीतेचा फार प्रभाव आहे, परंतु गीता ज्ञान दात्याला विसरले आहेत. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति, मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मीक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. (१) ज्ञान तलवारीने विकारांना जिंकायचे आहे. ज्ञानाचे संस्कार भरायचे आहेत. जुनी दुनिया आणि जुने शरीराचा संन्यास करायचा आहे.
  2. (२) भाग्यवान बनण्याच्या खुशीमध्ये राहायचे आहे, कोणत्या पण गोष्टीची चिंता करायची नाही. कोणी शरीर सोडले तरी पण दुःखाचे अश्रू काढायचे नाहीत.

वरदान:-

ताज आणि तख्तला नेहमी कायम ठेवणारे, निरंतर स्वतः योगी भव.

वर्तमान वेळी बाबा द्वारे सर्व मुलांना ताज आणि तख्त मिळाले आहे. आताचे ताज आणि तख्त अनेक जन्मासाठी ताज,तख्त प्राप्त करत आहे. विश्व कल्याणाच्या जबाबदारीचा ताज आणि बापदादाचे दिलतख्त नेहमी कायम ठेवा, तर निरंतर स्वतः योगी बनाल. त्यांना कोणत्या पण प्रकारची मेहनत करण्याची आवश्यकता नाही, कारण एक तर संबंध जवळचा आहे, दुसरे प्राप्ती अखुट आहे. जिथे प्राप्ती होत असते, तिथे स्वतःच आठवण राहते.

बोधवाक्य:-

सरळ बुध्दीने योजनेला प्रत्क्षात आणा, त्या मध्ये विजय समाविष्ठ आहे.

||| ओम शांती |||

ओम शांती.