22-11-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   21.01.87  ओम शान्ति   मधुबन


स्वराज्य अधिकारी हेच विश्व राज्य अधिकारी.


आज भाग्यविधाता बाबा, आपल्या सर्वश्रेष्ठ भाग्यवान मुलांना पाहत आहेत. बापदादा समोर आता फक्त हेच संघटन नाही, परंतु चोहीकडील भाग्यवान मुले समोर आहेत. ते जरी देश-विदेशातील कोणत्या पण दिशेला असतील, परंतु बेहद चे बाबा बेहदच्या मुलांना पाहात आहेत. या साकार वतन मध्ये तर स्थानाची हद्द आहे, परंतु बेहद्द बाबाची, दृष्टीची सृष्टी बेहद्दची आहे. बाबाच्या दृष्टीमध्ये सर्व ब्राह्मण आत्म्यांची सृष्टी सामावलेली आहे. त्यामुळे दृष्टीच्या सृष्टीमध्ये सर्व समोर आहेत. सर्व भाग्यवान मुलांना, भाग्यविधाता भगवान पाहून आनंदी होत आहेत. जसे मुले बाबांना पाहून आनंदी होतात, तसे बाबा पण सर्व मुलांना पाहून आनंदी होत आहेत. बेहदच्या बाबांना मुले पाहून आत्मिक नशा व खुशी होते कि,एक एक मुलगा या विश्वासमोर, विशेष आत्म्यांच्या यादी मध्ये आहे. जरी १६ हजार च्या माळेतील शेवटचा मणका आहे, तरी पण बाबा समोर आल्यामुळे, बाबाचे बनल्यामुळे, विश्वासमोर विशेष आत्मा आहे, त्यामुळे आणखीण कांही ज्ञानाच्या विस्ताराची माहिती नसली, परंतु एक शब्द "बाबा" मनापासून मानला आणि मनापासून इतरांना सांगितले, तर विशेष आत्मा बनतात, दुनिये समोर महान आत्मा बनतात, दुनिये समोर महान आत्म्यांच्या स्वरूपामध्ये गायन योग्य बनतात. एवढे श्रेष्ठ आणि सहज भाग्य आहे, तसे समजता कां? कारण "बाबा" शब्द "चावी" आहे.कशाची? सर्व खजान्याची, श्रेष्ठ भाग्याची. चावी मिळाली तर भाग्य वा खजाने अवश्य प्राप्त होतातच. तर सर्व माता व पांडव चावी प्राप्त करण्याचे, अधिकारी बनले आहेत? चावी लावता येते, कां कधी लागत नाही? चावी लावण्याची विधी आहे, मनापासून जाणणे आणि मानणे. फक्त मुखाद्वारे म्हटले, तर चावी असून पण लागणार नाही. मनापासून म्हटले तर खजाने नेहमी हजर राहतील.अखुट खजाने आहेत ना. अखुट खजाने असल्यामुळे, जेवढी पण मुले आहेत, ते सर्व अधिकारी आहेत. खजाने खुले आहेत, भरपूर खजाने आहेत. असे नाही कि,जे शेवटी आले आहेत, तर खजाने नष्ट झाले आहेत. जेवढे पण आता पर्यंत आले आहेत, म्हणजे बाबाचे बनले आहेत, आणि भविष्या मध्ये पण जेवढे बनणारे आहेत, त्या सर्वांसाठी खजाने अनेकानेक गुणा जादा आहेत, त्यामुळे बापदादा प्रत्येक मुलांना सुवर्ण संधी देत आहेत कि, जेवढा ज्यांना खजाना घ्यायचा आहे, तो मोठ्या मनाने घ्या. दाता जवळ कमी नाही, घेणाऱ्यासाठी हिम्मत किंवा पुरुषार्थाचा आधार पाहिजे.असा कोणता पिता, साऱ्या कल्पा मध्ये आसत नाही, ज्यांची एवढी मुले आहेत, आणि प्रत्येक जण भाग्यवान आहे‌! त्यामुळे सांगीतले कि, आत्मिक बापदादांना आत्मिक नशा आहे.

सर्वांची मधुबनला येण्याची, भेटण्याची, इच्छा पूर्ण झाली. भक्ती मार्गातील यात्रेपेक्षा, मधुबन मध्ये आरामात बसण्याची, राहण्यासाठी जागा तर मिळाली आहे ना. मंदिरा मध्ये तर उभे राहून, भक्त दर्शन घेतात. इथे आरामा मध्ये बसले तर आहात ना. तिथे तर 'पळा-पळा' 'चला-चला' म्हणतात, आणि इथे आरामात बसलात, आरामात, आठवणीच्या खुशीमध्ये मजेत राहा. संगमयुगा मध्ये खुशीत राहण्यासाठी आले आहात. तर प्रत्येक वेळी चालता-फिरता, खाता-पिता, खुशीचा खजाना जमा केला? किती जमा केला आहे? एवढा जमा केला आहे, जो 21 जन्म आरामात खात राहाल? मधुबन विशेष सर्व खजाने जमा करण्याचे ठिकाण आहे, कारण इथे 'एक बाबा दुसरे कोणी नाही' हे साकार रुपामध्ये पण अनुभव करत आहात. तिथे बुद्धी द्वारे अनुभव करत आहात, परंतु इथे प्रत्यक्ष साकार जीवना मध्ये बाबा शिवाय आणि ब्राह्मण परिवारा शिवाय आणखीन कोणी दिसून येते कां? एकच लगन, एकच गोष्ट, एकच परिवार आणि एकरस स्थिती, आणखीन कोणता रसच नाही. शिकणे आणि शिकवणे याद्वारे शक्तिशाली बनणे, मधूबन मध्ये हेच काम आहे ना. किती क्लासेस करत आहात? तर येथे विशेष जमा करण्याचे साधन मिळत आहे, त्यामुळे सर्व पळत-पळत पोहोचले आहेत. बाप दादा सर्व मुलांना विशेष हिच आठवण देतात कि, नेहमी स्वराज्य अधिकारी स्थिती मध्ये पुढे चालत राहा. स्वराज्य अधिकारींची निशाणी विश्वराज्य अधिकारी बनण्याची आहे.

कांही मुले वार्तालाप करताना, बाबाला विचारतात कि, 'आम्ही भविष्यामध्ये काय बनू.राजा बनू कां प्रजा बनू?'. बापदादा मुलांना प्रतिसाद देतात कि, स्वतःच स्वतःला एक दिवस तपासून पाहा, तर माहित पडेल कि, मी राजा बनेल कां सावकार बनेल, कां प्रजा बनेल. प्रथम अमृतवेळेला तुमचे मुख्य तीन कारभारी अधिकारी, तुमचे सहयोगी, साथीना चेक करा, ते कोण ? (१) मन म्हणजे संकल्पशक्ती (२) बुद्धी म्हणजे निर्णय शक्ती (३) मागील किंवा वर्तमानातील श्रेष्ठ संस्कार.हे तीन विशेष कारभारी आहेत. जसे आजकाल च्या जमान्या मध्ये राजा बरोबर महामंत्री किंवा विशेष मंत्री असतात, त्यांच्या सहयोगाने राज्य कारभार चालतो. सतयुगात मंत्री नसतात, परंतु जवळचे संबंधी, साथी असतात. कोणत्या पण रूपामध्ये साथी समजा किंवा मंत्री समजा. परंतु हे चेक करा, हे तिघे तुमच्या अधिकारा मध्ये चालत आहेत? या तिघांवर तुमचे राज्य आहे कां, त्यांच्या अधिकारा मध्ये तुम्ही चालता? मन तुम्हाला चालवत आहे,कि तुम्ही मनाला चालवत आहात? जसे पाहिजे, जेंव्हा पाहिजे, तसेच संकल्प करू शकता? जिथे बुद्धी लावू इच्छिता, तिथे लावू शकता, कां बुद्धी तुम्हा राजाला भटकवत आहे? संस्कार तुमच्या वश आहेत कां, तुम्ही संस्काराच्या वश आहात? राज्य म्हणजे अधिकार. राज्य अधिकारी ज्या शक्तीला, ज्यावेळी, जो आदेश देतात, त्या तशा विधीपूर्वक कार्य करतात, का तुम्हीं एक गोष्ट सांगता, त्या दुसरी गोष्ट करतात? कारण निरंतर योगी म्हणजे स्वराज्य अधिकारी बनवण्याचे विशेष साधन मन आणि बुद्धी आहे. मंत्रच मन्ममनाभव चा आहे. योगाला बुद्धी योग म्हटले जाते. तर हा विशेष आधारस्तंभ, तुमच्या अधिकारा मध्ये नसेल किंवा कधी आहे, कधी नाही, आता आहे, आता नाही, तिघांपैकी एकाची पण कमी अधिकारा मध्ये असेल, तर तपासून पाहा कि, आम्ही राजा बनू की प्रजा बनू? फार काळाचे राज्य अधिकारी बनण्याचे संस्कार, फार काळाचे भविष्य राज्य अधिकारी बनवतील. जर कधी अधिकारी, कधी वशीभूत होत असाल, तर अर्धाकल्प म्हणजे पूर्ण राज्य भाग्याचा अधिकार प्राप्त करू शकणार नाहीत. अर्ध्या वेळेनंतर त्रेतायुगी राजा बनू शकाल. पूर्ण वेळ राज्य अधिकारी म्हणजे राज्य करणारे, रॉयल घराण्यातील जवळच्या संबंधांमध्ये राहू शकत नाहीत. जर वारंवार वशीभूत होण्याचे, अधिकारी बनण्याचे संस्कार नसतील, परंतु राज्य अधिकाऱ्यांच्या, राज्या मध्ये राहणारे बनाल. मग ते कोण झाले? ती प्रजा झाली. तर समजले. राजा कोण बनेल, प्रजा कोण बनेल? स्वतःच आरशा मध्ये स्वतःच्या नशिबाचा चेहरा पाहा. हे ज्ञान म्हणजे ज्ञान आरसा आहे. तर सर्वां जवळ आरसा आहे ना. तर स्वतःचा चेहरा पाहू शकता ना. आता फार काळासाठी अधिकारी बनण्याचा अभ्यास करा. असे नाही की अंताला तर बनून जाऊ. जर अंताला बनाल तर अंताचे एक जन्म थोडेसे राज्य करू शकाल. परंतु हे पण लक्ष्यात ठेवा कि, जर फार काळाचा आता पासून अभ्यास नसेल किंवा आदि पासून आभ्यासी नसाल,आदि पासून आता पर्यंत हे विशेष कार्यकर्ता, तुम्हाला त्यांच्या अधिकारा मध्ये चालवत आहेत किंवा डगमग स्थिती करत आहेत, म्हणजे धोका देत आहेत, दुःखाच्या लहरी चा अनुभव करवितात, तर अंता मध्ये पण धोका मिळू शकेल. धोका म्हणजे दुःखाची लहर जरूर येईल. तर अंताला पण पश्चातापाची, दुःखाची लहर येईल, त्यामुळे बापदादा सर्व मुलांना परत आठवण करून देतात कि, राजा बना आणि आपल्या विशेष सहयोगी कर्मचारी किंवा राज्य कारभारा तील साथींना आपल्या अधिकारा मध्ये चालवा. समजले?

बापदादा हेच पाहत आहेत कि, कोण कोण किती स्वराज्य अधिकारी बनले आहेत? बरं, तर सर्व काय बनू इच्छित आहेत? राजा बनू इच्छिता? तर आता स्वराज्य अधिकारी बनले आहात, कां, असे म्हणता, बनत आहोत, जरूर बनू . गे, गे, करायचे नाही. बनू म्हणले तर बाबा पण म्हणतात, होय, राज्यभाग्य देण्यासाठी पण पाहीन. सांगितले ना, फार काळाचा संस्कार आता पासून पाहिजे. तसे तर फार काळ नाही, थोडा काळ आहे. परंतु तरीपण एवढ्या वेळेचा अभ्यास नसेल, तर मग शेवटच्या वेळी असे बोलायचे नाही, आम्ही तर समजले होते, शेवटी बनून जाऊ, परंतु म्हणतात, कधी नाही, आता. कधी तरी बनू, नाही, आता करायचे आहे. बनायचे आहे. स्वतःवर राज्य करा, आपल्या साथी वर राज्य करायचे नाही. ज्यांचे स्वतःवर राज्य आहे, त्यांना आता पण स्नेहा मुळे, सर्व लौकिक अलौकिक साथी, 'जी हुजूर' 'हा, जी' म्हणून, साथी बनून, राहतील. स्नेही आणि साथी बनून, हा, जी चा पाठ प्रत्यक्षा मध्ये दाखवतील. जसे प्रजा राजाची सहयोगी असते, स्नेही असते, तसे तुमच्या या सर्व कर्मेंद्रिया, विशेष शक्ती, नेहमी तुमच्या स्नेही,सहयोगी राहतील, आणि त्याचा प्रभाव साकार मध्ये, तुमच्या सेवा साथी वर,लौकिक संबंधी, साथीवर पडेल. दैवी परिवारा मध्ये अधिकारी बनून, आदेश देणे, हे चालू शकत नाही. स्वतः आपल्या कर्मेन्द्रियांना ताब्यात ठेवा, तर स्वतःच तुमचे आदेश करण्या अगोदर, सर्व साथी तुमच्या कार्यामध्ये सहभागी होतील. स्वतःच सहयोगी बनतील, आदेश करण्याची आवश्यकता नाही. स्वतःच स्वतःहून सहयोग करतील, कारण तुम्ही स्वराज्य अधिकारी आहात. जसे राजा म्हणजे दाता, तर दाताला सांगावे लागत नाही, म्हणजे मागावे लागत नाही. तर असे स्वराज्य अधिकारी बना. बरं, हा मेळा पण विश्व नाटकांमध्ये नोंदलेला होता. 'वाह ड्रामा' म्हनणत आहेत ना. दुसरे लोक कधी' हाय ड्रामा' म्हणतात. कधी 'वाह ड्रामा', आणि तुम्ही नेहमी काय म्हणता? वाह ड्रामा! वाह! जेंव्हा प्राप्ती होते, तर प्राप्ती समोर कांही अवघड वाटत नाही. तर तसेच, जर एवढ्या श्रेष्ठ परिवाराला, भेटण्याची प्राप्ती होत आहे, तर कांहीपण अवघड, अवघड वाटत नाही. अवघड वाटते कां? खाण्या साठी उभे राहावे लागते. खाताना पण प्रभु चे गुण गात राहा, आणि रांगे मध्ये उभे राहिला, तरीपण प्रभूचे गुण गात राहा. हेच काम करायचे आहे ना. याचा पण सराव होत आहे. आता तर कांही नाही. आणखीन वृध्दी होणार आहे ना. तशी स्वतः मध्ये बदल करण्याची सवय करा, जशी वेळ येईल, तसे स्वतःच स्वतःला चालवा. तर जमिनीवर पण झोपण्याची सवय झाली ना. असे तर नाही,खाट मिळाली नाही, तर झोप येत नाही? टेंन्ट मध्ये पण राहण्याची सवय झाली ना. चांगले वाटले कां? थंडी तर वाजली नाही ना ? आता साऱ्या आबू मध्ये टेंन्ट लावावे लागतील, टेन्ट मध्ये झोपणे, चांगले वाटले?कां खोली पाहिजे? आठवणीत आहे, पहिल्या प्रथम जेंव्हा पाकिस्तान मध्ये होता, ते़व्हा महारथीं ना पण जमिनी वर झोपवत होते. जे प्रसिद्ध महारथी होते, त्यांना हॉल मध्ये जमिनी वर तीन फुटाची जागा देऊन झोपवत होते. आणि जेंव्हा ब्राह्मण परिवाराची वाढ झाली, तरी पण कुठून सुरुवात केली? टेन्ट पासूनच सुरुवात केले ना. पहिल्या प्रथम जे निघाले, ते पण टेन्ट मध्ये राहिले, टेन्ट मध्ये राहणारे सेंन्ट (महात्मा) झाले. साकार चा पार्ट असताना पण टेन्ट मध्येच राहिले. तर तुम्ही लोक पण अनुभव कराल ना. तर सर्व प्रत्येक गोष्टीं मध्ये खुश आहात? बरं, आणखीन 10,000 टेन्ट मागवून व्यवस्था करु. सर्व आंघोळी च्या व्यवस्थेचा विचार करतात, ती पण होऊन जाईल. आठवणीत आहे, जेंव्हा हा हॉल बनला होता, तर सर्व काय म्हणत होते? एवढी स्नानगृहे काय करायची? या उद्देशाने बनविला होता, आता कमी पडत आहे ना. जेवढे बनवाल, तेवढे कमी तर होणारच आहे, कारण शेवटी तर बेहद मध्येच जायचे आहे. अच्छा.

सर्व बाजूची मुले पोचहली आहेत. तर हे पण बेहदच्या हॉलचा शृंगार झाले आहेत. खाली पण बसले आहेत. (वेगवेगळ्या ठिकाणावर मुरली ऐकत आहेत) ही वाढ होणे पण खुशनसीबी ची निशाणी आहे. वृध्दी तर झाली, परंतु विधीपूर्वक चाला. असे नाही, इथे मधुबन मध्ये तर आलो, बाबाला पण पाहिले, मधुबन पण पाहिले, आता जसे पाहिजे, तसे चालू. असे करायचे नाही, कारण कांही मुले असे करत आहेत, जो पर्यंत मधुबनला यायला मिळत नाही, तो पर्यंत पक्के राहतात, मग जेंव्हा मधुबन पाहतात, तर थोडे अलबेले होऊन जातात. तर अलबेले बनू नका. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण जीवन आहे, तर जीवन म्हणजे नेहमी, जोपर्यंत आहे, तोपर्यंत आहे. जीवन बनवली आहे ना. जीवन बनवली आहे कां थोड्या वेळा साठी ब्राह्मण बनले आहात? नेहमी आपल्या ब्राह्मण जीवनाच्या विशेषतांना बरोबर ठेवा, कारण या विशेषता मुळे वर्तमान पण श्रेष्ठ आहे आणि भविष्य पण श्रेष्ठ आहे. आता काय राहिले? टोली. ( वरदान) वरदान तर वरदाताची मुले बनलात. जी आहेतच वरदाताची मुले, त्यांना प्रत्येक पावला मध्ये वरदाता कडून, वरदान स्वतः मिळत राहते. वरदानच तुमची पालन करते. वरदानाच्या पालने मध्येच जगत आहात. नाही तर विचार करा, एवढी श्रेष्ठ प्राप्ती आणि मेहनत काय केली. बिना मेहनतीची जी प्राप्ती होते, त्यालाच वरदान म्हटले जाते. तर मेहनत काय केली आणि प्राप्ती किती श्रेष्ठ आहे! जन्मोजन्मासाठी प्राप्तीचे अधिकारी बनलात. तर वरदान प्रत्येक पावला मध्ये वरदाता कडून मिळत आहे आणि नेहमीच मिळत राहील. दृष्टीद्वारे, बोलण्याने, संबंधाने वरदान च वरदान आहेत. अच्छा.

आता तर स्वर्णजयंती साजरी करण्याची तयारी करत आहात. सुवर्ण जयंती म्हणजे सुवर्ण स्थितीमध्ये स्थित राहण्याची जयंती साजरी करणे. नेहमी खरे सोने, थोडी पण भेसळ नाही. त्याला स्वर्ण जयंती म्हणतात. तर दुनिये समोर, सोन्याच्या स्थितीमध्ये, स्थित राहणारे, खरे सोने प्रत्यक्ष व्हावीत, त्यासाठी ही सर्व सेवेची साधने बनवत आहात, कारण तुमची सुवर्ण स्थिती, स्वर्ण युगाला आणेल, स्वर्णिम संसाराला आणेल, ज्याची इच्छा सर्वांना आहे कि, आता दुनिया बदलली पाहिजे. तर स्व परिवर्तना द्वारे, विश्व परिवर्तन करणारे, विशेष आत्मे आहात. तुम्हां सर्वांना पाहून इतर आत्म्यांना, हा निश्चय होईल, शुभ भावना येईल कि, खरोखर स्वर्णिम दुनिया आली की आली.नमुना पाहून निश्चय होत आहे ना,होय, चांगली वस्तु आहे. तर सुवर्ण संसाराचे सैम्पल तुम्ही आहात. स्वर्ण स्थिती वाले आहात. तर तुम्हा सैम्पला पाहून, त्यांना निश्चित होईल कि, होय, जेंव्हा सॅम्पल तयार आहेत, तर अवश्य असा संसार आला की आला. अशी सेवा स्वर्ण जयंती मध्ये कराल ना. नाउम्मीद मध्ये उम्मीद निर्माण करणारे बना. अच्छा.

सर्व स्वराज्य अधिकारी, सर्व फार काळाचा अधिकार प्राप्त करण्यारे अभ्यासी आत्म्यांना, सर्व वरदाताच्या वरदाना मध्ये जगणाऱ्या श्रेष्ठ आत्मांना, बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण, आणि नमस्ते.

वरदान:-
भटकणाऱ्या आत्म्यांना, खरा ठिकाणा देणारे, चैतन्य लाइट माइट हाऊस भव:

कोणत्या पण भटकणाऱ्या आत्म्यांला खरा ठिकाणा देणारे, चैतन्य लाइट माइट हाऊस बना. त्यासाठी दोन गोष्टी लक्ष्यात ठेवा. (१) प्रत्येक आत्म्याच्या इच्छेला ओळखा,जसे योग्य डॉक्टर त्याला म्हटले जाते, जो नाडी परीक्षा जाणत आहे, तसे परखण्याच्या शक्तीचा नेहमी वापर करा.(२) नेहमी आपल्या जवळ सर्व खजाण्यांचा अनुभव कायम ठेवा. नेहमी हे लक्ष्य ठेवा की, सांगायचे नाही परंतु सर्व संबंधांचा, सर्व शक्तींचा अनुभव करावयाचा आहे.

सुविचार:-
दुसऱ्याचे करेक्शन करण्यापेक्षा, एका बाबा बरोबर ठीक कनेक्शन ठेवा.