23-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, हे अनादि अविनाशी बनलेले नाटक आहे, यामध्ये जे दृश्य होऊन गले, ते परत कल्पानंतर पुनरावृत्त होईल, त्यामुळे नेहमी निश्चित राहा...!!

प्रश्न:-
ही दुनिया तमोप्रधान अवस्थेला गेली आहे, त्याची लक्षणे काय आहेत?

उत्तर:-
दिवसेंदिवस उपद्रव होत आहेत, किती गोंधळ होत आहे. चोर कसे मारपीट करुन लुटत आहेत. विना मौसम पाऊस पडत आहे. किती नुकसान होत आहे. ही सर्व तमोप्रधानतेची चिन्हे आहेत. तमोप्रधान प्रकृती दु:ख देत आहे. तुम्ही मुले नाटकाच्या रहस्यला जाणत आहात त्यामुळे म्हणता की, नविन काही नाही.

ओम शांती।
आता तुम्हा मुलांवर ज्ञानाचा पाऊस पडत आहे. तुम्ही आहात संगमयुगी आणि इतर जे पण मनुष्य आहेत ते सर्व आहेत कलियुगी. यावेळी दुनियेमध्ये अनेक मत मतांतर आहेत. तुम्हा मुलांची तर आहे एक मत. जी एक मत भगवानाची मिळत आहे. ते लोक भक्ती मार्गामध्ये जप तप तीर्थ इ. जे काही करतात, तर समजतात की, हे सर्व रस्ते भगवानाला भेटण्याचे आहेत. म्हणतात की, भक्ती नंतरच भगवान मिळेल. परंतू त्यांना हे माहित नाही की, भक्ती कधी सुरु होते, आणि कधी पर्यंत चालते. फक्त म्हणतात की, भक्तीद्वारे भगवान मिळेल, त्यामुळे अनेक प्रकारची भक्ती करत आले आहेत. हे पण स्वत:च समजतात की, परंपरेपासून आम्ही भक्ती करत आलो आहे. एकदिवस भगवान जरुर मिळेल. कोणत्या ना कोणत्या रुपात भगवान भेटेल. मग काय करतील? जरुर सद्गती करतील कारण ते आहेतच सर्वांचे सद्गती दाता. भगवान कोण आहे, कधी येतील, हे पण जाणत नाहीत. महिमा जरी वेगवेगळ्या रुपात करतात, म्हणतात की, भगवान पतित पावन आहे, ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानानेच सद्गती होत आहे. हे पण जाणतात की, भगवान निराकार आहे. जसे आम्ही आत्मे पण निराकार आहेत, नंतर शरीर घेतो. आम्ही आत्मे पण बाबा बरोबर परमधाममध्ये राहणारे आहोत. आम्ही येथील रहिवासी नाहीत. निवासी कुठले आहेत, हे पण यर्थात रितीने सांगत नाहीत. कोणी तर समजतात की, आम्ही स्वर्गामध्ये जावू. आता सरळ स्वर्गामध्ये तर कोणाला पण जायचे नाही. कोणी मग म्हणतात ज्योती ज्योतीमध्ये समाविष्ठ होईल. हे पण चुक आहे. आत्म्याला विनाशी बनविले आहे. मोक्ष पण होत नाही. तेव्हा म्हणतात की जे बनले ते होत आहे---हे चक्र फिरत राहत आहे. इतिहास-भुगोलाची पुनरावृत्ती होत आहे. परंतू चक्र कसे फिरत आहे, हे जाणत नाहीत. ना चक्राला जाणतात, ना ईश्वराला जाणतात. भक्तीमार्गामध्ये किती भटकत आहेत. भगवान कोण आहे ते तुम्ही जाणता. भगवानाला पिता पण म्हणतात, तर बुध्दीमध्ये आले पाहिजे ना. लौकिक पिता पण आहेत, तरी पण आम्ही त्यांची आठवण करतो तर दोन पिता झाले, लौकिक आणि पारलौकिक. त्या पारलौकिक बाबाला भेटण्यासाठी भक्ती करत आहेत. ते परलोकामध्ये राहत आहेत. निराकारी दुनिया पण आहे जरुर.

तुम्ही चांगल्याप्रकारे जाणता कि, मनुष्य जे काही करतात ते सर्व भक्तीमार्गातील आहे. रावण राज्यात भक्तीच भक्ती होत आली आहे. ज्ञान तर नाहीच. भक्तीद्वारे कधी सद्गती होऊ शकत नाही. सद्गती करणाज्या बाबाची आठवण करतात तर, जरुर कधी तरी ते येऊन सद्गती करतील. तुम्ही जाणता कि, ही फारच तमोप्रधान दुनिया आहे. सतोप्रधान होते ते आता तमोप्रधान आहेत, किती उपद्रव होत आहेत. फारच गोंधळ होत आहे. चोर पण लुटत आहेत. कशी कशी मारपीट करुन चोर पैसे लुटत आहेत. असली औषधे आहेत, जे हुंगल्याने बेहोश होतात. हे आहे रावणराज्य, हा फार मोठा बेहदचा खेळ आहे. याला फिरण्यासाठी 5 हजार वर्षे लागतात. खेळ पण नाटकासारखा आहे. नाटक म्हणता येत नाही, नाटकामध्ये समजा कोणी अभिनेता आजारी पडला तर त्या जागी आदल बदल करतात. यामध्ये अशी गोष्ट होत नाही. हे तर अनादि नाटक आहे ना. समजा कोणी आजारी पडले तर म्हणू कि असे आजारी पडणे नाटकातील भुमिका आहे. हा अनादि बनलेला बनविलेला आहे. आणखी कोणाला तुम्ही नाटक म्हटले तर गोंधळून जातील. तुम्ही जाणता कि हे बेहदचे नाटक आहे. कल्पानंतर तरी पण हेच अभिनेते राहतील. जसा आता पाऊस पडतो, कल्पानंतर तसाच पडेल. असेच उपद्रव होतील. तुम्ही मुले जाणता कि, ज्ञानाचा पाऊस तर सर्वांवर पडणार नाही, परंतू हा आवाजा सर्वांचे कानावर जरुर पडेल कि ज्ञानसागर भगवान आले आहेत. तुमचा मुख्य आहे योग. ज्ञान तर तुम्ही ऐकत आहात बाकी पाऊस तर साज्या जगामध्ये पडत आहे. तुमच्या योगाद्वारे कायमची शांती होऊन जाते. तुम्ही सर्वांना सांगता कि, स्वर्गाची स्थापना करण्यासाठी भगवान आले आहेत, परंतू असे पण फार आहेत जे स्वत:ला भगवान समजत आहेत, तर तुमचे मग कोण मानेल, त्यामुळे बाबा समजावतात कि, कोटीमध्ये कोणी निघतील. तुमच्यामध्ये पण नंबरवार जाणतात कि, भगवान पिता आले आहेत. बाबांकडून तर वारसा घेतला पाहिजे ना. कशी बाबाची आठवण करावयाची ते पण समजावले आहे. स्वत:ला आत्मा समजा. मनुष्य तर देह अभिमानी बनले आहेत. बाबा म्हणतात कि, मी येतोच तेव्हा जेव्हा सर्व आत्मे पतित बनतात. तुम्ही किती तमोप्रधान बनले आहात. आता मी आलो आहे. तुम्हाला सतोप्रधान बनविण्यासाठी. कल्पापुर्वी पण मी तुम्हाला असे समजावले होते. तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान कसे बनाल? फक्त माझी आठवण करा. मी आलो आहे तुम्हाला स्वत:चा आणि रचनेचा परिचय देण्यासाठी. त्या पित्याची सर्व आठवण करतातच रावण राज्यामध्ये. आत्मा आपल्या पित्याची आठवण करत आहे. बाबा आहेतच अशरीरी, बिंदू आहे ना. त्यांचे नाव मग ठेवले आहे. तुम्हाला म्हणतात शालीग्राम आणि बाबाला म्हणतात शिव. तुम्हा मुलांचे नाव शरीरावर पडत आहे. बाबा तर आहेतच परमआत्मा. त्यांना शरीर तर घ्यायचे नाही. त्यांनी यांच्यात प्रवेश केला आहे. हे ब्रह्माचे शरीर आहे, त्यांना शिव म्हणत नाहीत. आत्मा नांव तर तुमचे आहेच नंतर तुम्ही शरीरामध्ये येता. ते परम आत्मा आहेत सर्व आत्म्यांचे पिता तर सर्वांचे दोन पिता झाले, एक निराकारी एक साकारी. यांना मग अलौकिक पिता म्हटले जाते. किती मुलं आहेत. मनुष्यांना हे समजत नाही की, प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी एवढ्या अनेक आहेत, हे काय आहे? कोणत्या प्रकारचा हा धर्म आहे. समजू शकत नाहीत. तुम्ही जाणता कि हे कुमार-कुमारी प्रवृत्ती मार्गाचे अक्षर आहे ना. माता पिता कुमारी आणि कुमार, भक्ती मार्गामध्ये तुम्ही आठवण करता कि तुम्ही मातपिता आता तुम्हाला मातपिता मिळाले आहेत, तुम्हाला दत्तक घेतले आहे. सतयुगामध्ये दत्तक घेत नाहीत. तेथे दत्तक पणाचे नांव नाही. येथे तरी पण नांव आहे. ते आहेत हदचे पिता, हे आहेत बेहदचे पिता. बेहदचा दत्तकपणा आहे. हे रहस्य फारच समजण्यालायक आहे. तुम्ही मुले पुर्ण रितीने कोणाला समजावत नाही. पहिल्या प्रथम कोणी आत आले, म्हणतात कि, गुरुचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे, तर तुम्ही सांगा कि, हे काही मंदीर नाही. बोर्ड वर पहा काय लिहले आहे! ब्रह्माकुमार-कुमारी तर अनेक आहेत. हे सर्व प्रजापिता ची मुलं झाली. प्रजा तर तुम्ही पण आहात. भगवान सृष्टी रचतात, ब्रह्मा मुख कमळाद्वारे आम्हाला रचले आहे. आम्ही आहोतच नविन सृष्टीचे, तुम्ही आहात जुन्या सृष्टीचे, नवीन सृष्टीचे बनावे लागते. संगमयुगावर हे आहे पुरुषोत्तम बनण्याचे युग. तुम्ही संगमयुग वर उभे आहात, ते कलियुगामध्ये उभे आहेत जसे कि, विभाजन झाले आहे. आजकाल तर पहा किती विभाजन झाले आहे. प्रत्येक धर्मातील समजतात कि, आम्ही आमचे प्रजेला संभाळतो, आपले धर्माला, आमचे जाती वाल्याला सुखी ठेवू, त्यामुळे प्रत्येक जण म्हणतात की, आमच्या राज्यामधून ही वस्तू बाहेर जावू नये. पुर्वी तर राजाचा साज्या प्रजेवर हुकुम चालत होता. राजाला माईबाप, अन्नदाता म्हणत होते. आता तर राजा राणी कोणीच नाही. वेगवेगळे टुकडे झाले आहेत. किती उपद्रव होत राहत आहेत. अचानक महापूर येतो, भुकंप होतात, हे आहे दु:खाने मरणे.

आता तुम्ही ब्राह्मण समजता कि, आम्ही सर्व आपसामध्ये भाऊ भाऊ आहोत. तर आम्हाला आपसामध्ये फार फार प्रेमाने क्षीरखंड होऊन राहावयाचे आहे. आम्ही एका बाबाची मुले आहोत त्यामुळे एकमेकांत फार प्रेम असले पाहिजे. रामराज्या मध्ये सिंह आणि शेळी जे एकदम, पक्के शत्रू आहेत, ते पण एकत्र पाणी पितात. येथे तर पहा घराघरामध्ये किती भांडणे आहेत. राज्या राज्यात भांडण, आपसामध्येच फुट पाडतात. अनेक मते आहेत. आता तुम्ही जाणता कि, आम्ही सर्वांनी अनेकवेळा बाबांकडून वारसा घेतला आहे आणि मग घालवला आहे, म्हणजे रावणावर विजय प्राप्त केला आहे, आणि नंतर हारलो आहोत. एका बाबांच्या श्रीमतावर आम्ही विश्वाचे मालक बनतो, त्यामुळे त्यांना उंच ते उंच भगवान म्हटले जाते. सर्वांचे दु:ख हर्ता, सुखकर्ता म्हटले जाते. आता तुम्हाला सुखाचा रस्ता सांगत आहेत. तुम्ही मुले आपसामध्ये क्षीरखंडा प्रमाणे राहिले पाहिजे. दुनियेमध्ये एकमेकांत सर्व मिठाचे पाण्याप्रमाणे खारट आहेत. एक दोघाला मारण्यासाठी उशीर करत नाहीत. तुम्ही ईश्वरीय मुले तर क्षीरखंडाप्रमाणे असले पाहिजेत. तुम्ही ईश्वरीय संतान देवता पेक्षा पण उंच आहात. तुम्ही बाबांचे किती मददगार बनत आहात. पुरुषोत्तम बनण्यासाठी मददगार आहात तर हे मनामध्ये आले पाहिजे की, आम्ही पुरुषोत्तम आहे, तर आमच्यामध्ये ते दैवीगुण आहेत? आसुरी गुण असतील तर ते मग बाबाचा मुलगा तर म्हणू शकत नाहीत त्यामुळे म्हटले जाते सतगुरुचा निंदक उंच पद प्राप्त करु शकत नाही. ते कलियुगी गुरु मग स्वत:साठी म्हणून मनुष्यांना भिती घालत आहेत. तर बाबा मुलांना समजावतात कि, सपूत मुले ती आहेत जे बाबाचे नांव प्रसिध्द करतात, क्षीरखंड होऊन राहतात. बाबा नेहमीच म्हणतात की, क्षीरखंड बना. मिठाचे पाणी बनून आपसामध्ये भांडण करु नका. तुम्हाला तर क्षीरखंड होऊन राहावयाचे आहे. आपसामध्ये फार प्रेम पाहिजे, कारण तुम्ही ईश्वरीय संतान आहात ना. ईश्वर सर्वांत प्रेमळ आहेत. त्यामुळे तर त्यांना सर्व आठवण करत आहेत. तर तुमचे आपसात फार प्रेम असले पाहिजे. नाही तर बाबाची प्रतिष्ठा घालवाल. ईश्वराची मुले आपसामध्ये मिठाचे पाणी कसे असू शकतील, मग पद कसे प्राप्त करु शकतील. बाबा समजावतात कि, आपसामध्ये क्षीरखंड होऊन राहा. मिठाचे पाण्यासारखे राहाल तर काही पण धारणा होणार नाही. जर बाबांच्या सुचनेप्रमाणे नाही चाललात तर मग उंच पद कसे प्राप्त कराल. देह अभिमानामध्ये आल्यानेच एकमेकांमध्ये भांडत आहात. आत्म अभिमानी होऊन राहिलात तर काही पण खिटपीट होणार नाही. ईश्वर पिता मिळाले आहेत तर मग दैवी गुण धारण करावयाचे आहेत. आत्म्याला बाबासारखे बनायचे आहे. जसे बाबा मध्ये पवित्रता, सुख प्रेम इ. सर्व आहे, तुम्हाला पण बनायचे आहे. नाही तर उंच पद प्राप्त करु शकणार नाही. शिकून बाबा कडून उंच वारसा घ्यावयाचा आहे, अनेकांचे जे कल्याण करत आहेत, तेच राजा राणी बनू शकतील. बाकी दास दासी जावून बनतील समजू तर शकता कि, कोण कोण काय बनतील? शिकणारे स्वत:च समजू शकतात कि, या हिशोबाने आम्ही बाबांची किती प्रसिध्दी करु शकतो. ईश्वराची मुले तर जास्तच प्रेमळ असली पाहिजेत, जे कोणी पण पाहून खुश होतील. बाबाला पण गोड ते वाटतील. प्रथम घराला तर सुधारा-अगोदर घराला नंतर परला (दुसरे) सुधारायचे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये कमल फुल समान पवित्र आणि क्षीरखंड होऊन राहा. कोणी पण पाहतील तर म्हणतील, ओहो, येथे तर स्वर्ग आहे. अज्ञान काळामध्ये पण बाबा ने स्वत: अशी घरे पाहिली आहेत. 6-7 मुले लग्न केलेली सर्व एकत्र राहत होते. सर्व सकाळी उठून भक्ती करत होते. घरामध्ये एकदम शांती होती. हे तर तुमचे ईश्वरीय कुटूंब आहे. हंस आणि बगळा तर एकत्र राहू शकत नाहीत. तुम्हाला तर हंस बनायचे आहे. मिठाच्या पाण्यासारखे राहिल्याने तर बाबा खुश होणार नाहीत. बाबा म्हणतात तुम्ही किती नांव बदनाम करत आहात. जर क्षीरखंड होऊन नाही राहिलात तर स्वर्गामध्ये उंच पद प्राप्त करु शकणार नाहीत. फार सजा मिळेल. बाबाचे बनून नंतर जर मिठाचे पाण्यासारखे राहिलात तर शंभर गुणा सजा खाल. मग तुम्हाला साक्षात्कार पण होईल कि आम्ही काय पद प्राप्त करु. अच्छा,

गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. नेहमी ध्यानात ठैवा, आम्ही ईश्वराची मुले आहोत, आम्हाला अतिशय प्रेमाने राहायचे आहे. एकमेकांत कधी पण मिठाचे पाण्यासारखे व्हायचे नाही. अगोदर स्वत:ला सुधारायचे आहे, नंतर दुसऱ्याला सुधारण्यासाठी शिकवायचे आहे.

2. जसे बाबांमध्ये पवित्रता, सुख प्रेम, इ. सर्व गुण आहेत. तसे बाबासारखे बनायचे आहे. असे कोणते कर्म करु नका, ज्यामुळे निंदक बनाल. आपल्या चलनाद्वारे बाबाचे नांव प्रसिध्द करावयाचे आहे.

वरदान:-
बुध्दीची रेषा स्पष्ट ठेवून नंबर एक मध्ये उत्तीर्ण होणारे नेहमी तयार राहणारे भव :-

नेहमी तयार राहणे ही ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे. आपली बुध्दी एवढी स्पष्ट ठेवावी की, बाबाचा इशारा मिळाला आणि तयार. त्यावेळी कोणता पण विचार करण्याची जरुर नसावी. अचानक एकच प्रश्न येईल, आदेश होईल, तेथेच बसा, तिकडे पोहचा तर कोणती पण गोष्ट वा संबंध आठवणीत न येवो, तेव्हा नंबर एक मध्ये उत्तीर्ण व्हाल. परंतू ही सर्व अचानकची परीक्षा होईल. त्यासाठी तयार राहा.

बोधवाक्य:-
मनाला शक्तीशाली बनविण्या साठी आत्म्याला ईश्वरीय स्मृती आणि शक्तीचे भोजन द्या.