23-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, हे तुमचे जीवन फार फार, अमूल्य आहे, कारण तुम्ही श्रीमतावर विश्वाची सेवा करत,या नर्काला स्वर्ग बनवत आहात ".

प्रश्न:-
खुशी नाहीसे होण्याचे कारण किंवा त्याचे निवारण काय आहे?

उत्तर:-
खुशी देह अभिमानात आल्यामुळे नाहीशी होते.(२) जेव्हा मनामध्ये कोणती शंका निर्माण होते, तरी पण खुशी नष्ट होऊन जाते , त्यामुळे बाबा मत देतात की, जेव्हा कोणतीही शंका निर्माण होईल ,तर त्वरित बाबाला विचारा. आत्माभिमानी बनायचा अभ्यास करा, तर नेहमी खुशी मध्ये राहाल.

ओम शांती।
उच्च ते उच्च भगवान आणि मग भगवानुवाच मुलांसाठी. मी तुम्हाला उच्च ते उच्च बनवत आहे, तर तुम्हा मुलांना किती खुशी झाली पाहिजे.तुम्ही समजता पण की, बाबा आम्हाला साऱ्या विश्वाचे मालक बनवत आहेत. मनुष्य मानतात कि, परमपिता परमात्मा उंच ते उंच आहेत. .बाबा स्वतः म्हणतात की, मी तर विश्वाचा मालक बनत नाही. भगवानुवाच मला मनुष्य म्हणतात की, भगवान उच्च ते उच्च आहे, आणि मी म्हणतो की, माझी मुले उच्च ते उच्च आहेत.सिद्ध करून सांगत आहे. पुरुषार्थ पण विश्वनाटका नुसार, कल्पा पूर्वीप्रमाणे करुन घेत आहे.बाबा समजावत आहेत की, कोणती पण गोष्ट समजली नाही, तर विचारा. मनुष्यना तर कांही पण माहित नाही. जग काय आहे, वैकुंठ काय आहे. जरी किती, पण कोणी, नवाब, मुगल इत्यादी, होऊन गेले आहेत, जरी अमेरिकेमध्ये किती पण पैसेवाले आहेत, परंतु या लक्ष्मी नारायण सारखे तर होऊ शकत नाहीत. ते तर व्हाईट हाऊस, इत्यादी बनवतात. परंतु तेथे तर रतन जडित गोल्डन हाऊस, बनत आहेत.त्याला म्हटले जाते, सुखधाम. तुमचीच हिरो हिरोईन ची भूमिका आहे. तुम्ही हिरेतुल्य बनत आहात. सुवर्णयुग होते,आता आहे लोहयुग.बाबा म्हणतात की तुम्ही किती भाग्यशाली आहात . भगवान स्वतः बसून समजावत आहेत,तर तुम्हाला किती खुशी झाली पाहिजे. तुमचे हे शिक्षण आहेच, नवीन जगा साठी. हे तुमचे जीवन फार अमूल्य आहे,कारण तुम्ही विश्वाची सेवा करत आहात. बाबाला बोलावतातच, येऊन नरकाला स्वर्ग बनवा. हेवनली गॉड फादर(स्वर्गिय पिता) म्हणतात ना. बाबा म्हणतात की, तुम्ही स्वर्गामध्ये होता, आता नरकामध्ये आहात, नरक सुरू होतो, तर मग स्वर्गातील गोष्टी विसरून जातात. हे तर नंतर तसेच होईल. तरी पण तुम्हाला स्वर्णयुगा पासुन लोहयुगा मध्ये जरूर यायचे आहे. बाबा वारंवार मुलांना सांगतात की, मनामध्ये कोणती पण शंका असेल, ज्यामुळे खुशी राहत नाही , तर विचारा. बाबा बसून शिकवत आहेत, तर शिकले पण पाहिजे ना.खुशी राहत नाही कारण,तुम्ही देह अभिमानात येता. खुशी तर झाली पाहिजे ना. बाबा तर फक्त ब्रह्मांडाचे मालक आहेत, तुम्ही तर विश्वाचे पण मालक बनत आहात. जरी बाबाला रचयिता म्हटले जाते,परंतु असे नाही की, प्रलय होऊन जातो, मग नवीन दुनिया निर्माण करतात,नाही.बाबा म्हणतात, मी फक्त जुन्याला, नवीन बनवत आहे. जुन्या दुनियेचा विनाश करत आहे, तुम्हाला नवीन दुनियेचा मालक बनवत आहे. मी कांही करत नाही .हे सर्व विश्व नाटकांमध्ये नोंदलेले आहे.पतीत दुनिये मध्ये मला बोलावतात. पारसनाथ बनवत आहे. तर मुले स्वतः पारसपुरी मध्ये येतात. तिथे तर मला कोधी बोलावत नाहीत. कधी बोलतात कां की,बाबा पारसपुरी मध्ये येऊन थोडे भेटून तर जावा,बोलवतच नाहीत.असे म्हटले पण जाते की, दुःखामध्ये सर्व आठवण करतात, पतीत दुनियेमध्ये आठवण करत आहेत, सुखांमध्ये कोणी करत नाही. ना आठवण करतात, ना बोलावतात. फक्त द्वापार युगामध्ये मंदिर बनवून,त्यामध्ये मला बसवतात. दगडाचा नाहीतर, हिऱ्याचे लिंग बनवून ठेवतात, पूजा करण्यासाठी. किती आश्चर्यकारक गोष्टी आहेत . चांगल्या प्रकारे कान देऊन ऐकले पाहिजे. कान पण पवित्र केले पाहिजेत. पवित्रता प्रथम आहे.असे म्हणतात ना वाघिणीचे दूध, सोन्याच्या भांड्यामध्ये ठेवले जाते .यामध्ये पण पवित्रता असेल, तर धारण होईल. बाबा म्हणतात की , काम महाशत्रू आहे. यावर विजय प्राप्त करायचा आहे, तुमचा हा अंतीम जन्म आहे . हे पण तुम्ही जाणत आहात कि, ही तीच महाभारता ची लढाई आहे .कल्प कल्प जसा विनाश झाला आहे, आता पण तसाच होईल. विश्वनाटका नुसार.

तुम्हा मुलांना स्वर्गामध्ये परत आपले महल बनवायचे आहेत. जसे कल्पा पूर्वी बनवले होते. स्वर्गाला म्हटले जाते पॅराडाईज .पुराणां मधून पॅराडाईज अक्षर निघाले आहे . म्हणतात की , मानसरोवर मध्ये प-या राहत होत्या .त्यामध्ये डुबकी मारल्याने, तर परी बनून जातो. खरे तर आहे ज्ञान मानसरोवर. त्यामधून तुम्ही, कशा पासून, कसे बनत आहात.सुंदर ला परी म्हटले जाते. असे नाही की, पंखवाली कोणी परी असते. जसे तुम्हा, पांडवाना महावीर म्हटले जाते. त्यांनी मग पांडवांचे फार मोठे चित्र,गुंफा, इत्यादी बसून बनवले आहेत. भक्ती मार्गा मध्ये किती पैसे नाहीसे करत आहेत. बाबा म्हणतात की, मी तुम्हा मुलांना किती सावकार बनवले होते. तुम्ही एवढे सर्व पैसे काय केले. भारत किती सावकार होता.आता भारताची काय अवस्था आहे .जो शंभर टक्के सावकार होता , तो आता शंभर टक्के कंगाल बनला आहे .आता तुम्हा मुलांना, किती तयारी करावयाचे आहे.लहान मुलांना, पण हेच समजायचे आहे की, शिवबाबा ची आठवण करा, तर तुम्ही कृष्णा सारखे बनाल. कृष्ण कसे बनले, हे कोणाला पण माहित नाही. पूर्वीच्या जन्मांमध्ये शिवबाबा ची आठवण, केल्यानेच कृष्ण बनले. तुम्हा मुलांना किती खुशी झाली पाहिजे,परंतु अपार खुशी त्यांना होईल, जे दुसऱ्यांची सेवा करत राहतात .ज्यांची मुख्य धारणा, वागणे फार,फार उत्तम आहे. खान-पान फार चांगले आहे. तुम्हा मुलांजवळ, जर कोणी आले, तर त्यांची प्रत्येक गोष्टीं मध्ये सेवा केली पाहिजे. स्थूल मध्ये पण आणि सूक्ष्म मध्ये पण. शारीरिक आणि आत्मिक दोन्ही केल्याने ते फार खुश होतील. कोणी पण आले तर, तुम्ही त्यांना खरी सत्यनारायण ची गोष्ट सांगा. शास्त्रांमध्ये तर काय काय गोष्टी लिहिल्या आहेत. विष्णुच्या नाभी मधून ब्रह्मा निघाले, मग ब्राह्माच्या हातामध्ये शास्त्र दिले आहेत. आता विष्णूच्या नाभी मधून ब्रह्मा कसे निघतील. याचे किती रहस्य आहे. आणखीन कोणी या गोष्टीला कांही पण समजत नाही. नाभीतून निघण्याची तर गोष्टच नाही. ब्रह्मापासून विष्णू ,विष्णूपासून ब्रह्मा, बनतात.ब्रह्मा ला विष्णू बनण्यांमध्ये एक सेकंद लागतो. सेकंदांमध्ये जीवनमुक्ती म्हटले जाते ना. बाबांनी साक्षात्कार केला, तुम्ही विष्णूचे रूप आहात. सेकंदा मध्ये निश्यय झाला. विनाशाचा साक्षात्कार पण झाला . नाही,तर कलकत्त्या मध्ये राजाई थाटात राहत होते. कोणत्या त्रासाची गोष्ट नव्हती, उत्तम प्रकारे राहत होते. आता बाबा, तुम्हाला हा ज्ञान रत्नांचा व्यापार शिकवत आहेत. तो व्यापार तर याच्यापुढे काहीच नाही, परंतु यांची भूमिका आणि तुमच्या भूमिके मध्ये फरक आहे. शिवबाबांनी यांच्या मध्ये प्रवेश केला आणि झटक्यात सर्व सोडून दिले. भट्टी बनायची होती. तुम्ही पण सर्व कांही सोडले. नदी पार करून आलात आणि भट्टी मध्ये राहिलात. काय काय झाले ,कोणाची पण परवा केली नाही. म्हणतात ना कि, कृष्णा नी पळवले. कां पळवले? त्यांना पटराणी बनवण्यासाठी . ही भट्टी पण झाली ,तुम्हा मुलांना स्वर्गाची महाराणी बनवण्यासाठी. शास्त्रांमध्ये तर काय, काय लिहिले आहे, आणि प्रत्यक्षात काय, काय आहे. ते तुम्हीं आता समजत आहात. पळवून नेण्याची गोष्टच नाही. कल्पना पूर्वी पण शिव्या मिळाल्या होत्या .नाव बदनाम झाले होते. हे तर वैश्विक नाटक आहे, जे कांही चालले आहे ,ते कल्पा पूर्वीप्रमाणे. आता तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात की, कल्पा पूर्वी ज्यांनी राज्य घेतले होते, ते जरूर घेतील. बाबा म्हणतात की मी कल्प, कल्प येऊन ,भारताला स्वर्ग बनवतो. पूर्ण 84 जन्मांचा हिशोब सांगितला आहे. सतयुगा मध्ये तुम्ही अमर राहता. तेथे अकाली मृत्यू होत नाही . शिवबाबा काळावर विजय प्राप्त करून देतात. म्हणतात की, मी काळाचा काळ आहे.कथा पण आहेत ना.तुम्ही काळावर विजय प्राप्त करता. तुम्ही अमर लोकांमध्ये पद प्राप्त करण्यासाठी जाता.एक तर पवित्र बनायचे आहे ,दुसरे दैवी गुण, पण धारण करायचे आहेत. रोज आपला जमा खर्च पहा . रावणा द्वारे तुम्हाला घाटा तर पडला नाही . माझ्या द्वारे फायदा होत आहे. व्यापारी लोक या गोष्टीला चांगल्या प्रकारे समजतात. हे आहेत ज्ञान रतन. कोणी विरळा व्यापारी च यांच्या बरोबर व्यापार करेल. तुम्ही व्यापार करण्यासाठी आले आहात .कोणी तर चांगल्या प्रकारे व्यापार करून ,स्वर्गाचा सौदा करुन घेतात, २१ जन्मासाठी, २१ तर काय तुम्ही, तर ५०-६० जन्म फार सुखा मध्ये राहता. पद्मापती बनता. देवतांच्या पायामध्ये पदम दाखवतात ना. अर्थ थोडाच समजत आहेत. तुम्ही आता पद्मापती बनत आहात. तर तुम्हाला किती खुशी झाली पाहिजे. बाबा म्हणतात की, मी किती साधारण आहे. तुम्हां मुलांना स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे. बोलावतात पण की, हे पतीत पावन या, येऊन पावन बनवा. पावन राहतातच सुखाधाम मध्ये. शांतीधाम चा कांही इतिहास-भूगोल नाही. ते तर आहे, आत्म्याचे झाड. सूक्ष्मवतन मध्ये कोणत्या गोष्टी नाहीत. बाकी हे सृष्टीचक्र, कसे फिरते, ते तुम्ही ओळखले आहे.सतयुगा मध्ये लक्ष्मीनारायण ची राजधानी होती . असे नाही कि,एकच लक्ष्मी नारायण फक्त राज्य करत होते,वृध्दी तर होत राहते ना. मग व्दापरयुगा पासुन तेच पूज्य पासून पुजारी बनतात. मनुष्य मग परमात्मा साठी, म्हणतात की, तुम्हीच पूज्य,तुम्हीच पुजारी. जसे परमात्म्या साठी, सर्वव्यापी म्हणतात. या गोष्टीला तुम्ही समजत आहात. अर्धा कल्प तुम्ही गायन करत आले आहात, उंच ते उंच भगवान, आणि आता भगवानुवाच- उंच ते उंच तुम्ही मुले आहात. तर अशा बाबा च्या मता वर पण चालले पाहिजे ना.गृहस्थ व्यवहार पण सांभाळावयाचा आहे.इथे तर सर्व राहू शकत नाहीत. सर्व राहिले तर, किती मोठी घरे बांधावी लागतील.हे पण तुम्ही एके दिवशी पहाल,की खाल पासून वर पर्यंत, फार मोठी रांग लागेल, दर्शन करण्यासाठी, कोणाला दर्शन झाले नाही, तर शिव्या पण देऊ लागतात.. समजतात की, महात्म्याचे दर्शन करावे.आता बाबा तर आहेत मुलांचे, मुलांनाच शिकवत आहेत. तुम्ही कोणाला रस्ता दाखवता, त्यापैकी कांही चांगल्या प्रकारे चालतात, कांही धारणाच करत नाहीत. किती जण आहेत, फक्त ऐकतात, मग बाहेर गेल्यानंतर, तेथील, तिथेच राहते. ती खुशी नाही ,अभ्यास नाही ,योग नाही. बाबा किती समजावत आहेत, चार्ट ठेवा.नाहीतर फार पश्चाताप करावा लागेल. आम्ही बाबाची किती आठवण करतो, त्याचा चार्ट पाहिला पाहिजे. भारताच्या प्राचीन योगाची फार महिमा आहे. तर बाबा समजावतात की कोणती पण गोष्ट समजली नाही, तर बाबाला विचारा. पूर्वी तुम्ही काही पण ओळखत नव्हता. बाबा म्हणतात की, हे तर, काट्याचे जंगल आहे. काम महाशत्रू आहे. हे अक्षर स्वत: गीते मध्येच आहे. गीता वाचत होतो, परंतु समजत थोडेच होतो. बाबाने सारे आयुष्य गीता वाचली. समजत होते की, गीतेचे महत्त्व फार चांगले आहे.भक्ती मार्गामध्ये गीतेचा किती मान आहे. गीता मोठी पण आहे,तर छोटी पण आहे. कृष्ण इत्यादी, देवतांची चित्रे, पैशाला मिळत राहतात. त्या चित्रांचे मग किती मोठ मोठे मंदिर बनवत आहेत. तर बाबा समजावतात की, तुम्हाला तर विजय माळेचा मणी बनायचे आहे. अशा गोड गोड बाबा ला ,बाबा बाबा ,पण म्हणत आहेत. असे समजतात पण की, आम्हाला स्वर्गाची राजाई देतात,ते पण ऐकतात, इतरांना सांगतात ,आणि माया त्यांना बाबा पासून वेगळं करते. बाबा म्हटले तर, बाबा म्हणजे बाबा. भक्ती मार्गा मध्ये पण गायन केले जाते कि,ते पती चे पती आणि गुरूचे गुरु एकच आहेत. ते आमचे पिता आहेत .ज्ञानाचे सागर, पतित-पावन आहेत. तुम्ही मुले म्हणता की, बाबा आम्ही कल्प,कल्प तुमच्या कडून वरसा घेत आलो आहोत. कल्प, कल्प भेटत राहू . तुम्हा बेहद्द च्या बाबा कडून, जरूर बेहद चा वारसा मिळेल. मुख्य आहेच अल्फ.त्यामध्ये बादशाही आपोआप येते.बाबा म्हणजे वरसा. तो आहे हदचा, आणि हा आहे बेहदचा. हद चे बाबा तर अनेकानेक आहेत. बेहद चे बाबा तर एकच आहेत. अच्छा.

गोड गोड, पाच हजार वर्षांनंतर , भेटलेल्या, मुला प्रति, बापदादा ची प्रेमळ आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते .

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) स्थूल आणि सूक्ष्म सेवा करून अपार खुशीचा अनुभव करायचा आणि करावयाचा आहे. वागणे आणि खाणे पिणे फार उत्तम ठेवायचे आहे.

(२) अमर लोकां मध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी, पवित्र बनायचे आणि त्याच बरोबर दैवी गुण, पण धारण करायचे आहेत. स्वतःचा जमा खर्च पाहायचा आहे कि,आम्ही बाबाची किती आठवण करत आहोत? अविनाशी ज्ञान रत्नांची कमाई जमा करत आहोत? कान पवित्र झाले आहेत, तरच त्याच्या मध्ये धारणा होऊ शकेल.

वरदान:-
मायेच्या खेळाला साक्षी होऊन पाहणारे,नेहमी निर्भय, मायाजीत भाव:

वेळेनुसार जशी, तुम्हा मुलांची अवस्था पुढे जात राहत आहे, तसा आता मायेचा वार, झाला नाही पाहिजे .माया नमस्कार करण्यासाठी यावी ,वार करण्यासाठी नाही .जरी माया आली तरी त्याला खेळ समजून पाहा.असा अनुभव करा,जसे साक्षी होऊन हद्दचे नाटक पाहत आहोत. माया चे कोणते पण विक्राळ रूप असले,तरी तुम्ही त्याला खेळ समजून पहाल, तर फार मजा येईल, त्याला घाबरायचे नाही. जी मुले नेहमी खेळाडू बनून साक्षी होऊन खेळ पाहतात, ते नेहमी निर्भय व मायाजीत बनून जातात .

बोधवाक्य:-
असे स्नेहाचे सागर बना,ज्यामुळे क्रोध जवळ पण येऊ शकणार नाही.